Saturday, October 25, 2014

प्रिये...!

नेहमी विचारतेस
मी काय लपवून ठेवलंय
माझ्या हृदयाच्या
गच्च अंधारल्या
गुंफेत....

काय करायचंय तुला?

एवढा स्वच्छ प्रकाश
मी ओसंडलाय तुझ्याच साठी...
नाच त्यात...बागड...हस
खळाळत्या निर्झरांसारखी...
उगा व्यर्थ प्रश्न विचारु नकोस....
अनंत वेदनामय
आक्रोशांतून
उमदळेल्या
माझ्या हृदयगुंफेतील
साकळलेल्या
एकाकी
आसवाच्या थेंबाला
रडवू नकोस...

प्रिये...!

यशवंतराव होळकर आणि मी....

  गोपीचंद पडळकर, महाराजा आज माझे बंधुतुल्य मित्र प्रा. हरी नरके यांनी श्री. गोपीचंद पडळकर यांनी “अनसंग हिरो ऑफ इंडिया- महाराजा यशवंतराव होळक...