Tuesday, February 8, 2011

चळ्वळीचा म्रुत्यु कसा होतो? (भाग २)

चळवळीन्चे अपyaश अनेकदा त्यान्च्या नेत्यान्च्या मानसिकतेतच दडलेले असते. अनुययन्ची फौज जमा झाली कि आपण सर्वमान्य आहोत असा भ्रम निर्माण होवु लागतो. थोडे यश मिळाले कि सत्तेची स्वप्ने पडु लागतात. त्यासाठी त्यांना अधिक अनुयायन्ची गरज भासु लागते आणि त्यासाठी ते हव्या त्या तड्जोडी करु लागतात. शिवसेना ही एके काळी चळवळच होती...नंतर ती राजकीय शक्ति बनली. अनेक युत्या केल्या...अजुनही होतील...आणि ती सन्घटना फुटली...आता तीही नवी युती करत आहे असे दिसतेय. असो...ते महत्वाचे नाही...पण चळवळ ही शुद्ध चळवळ न रहाता ती स्वता:च स्वता:चा अंत घडवत समाजाला दीर्घ काळासाठी फसवण्याची, भ्रामक स्वप्ने निर्माण करण्याची...दाखवण्याची आणि ती कधीच पूर्ण न करण्याची जी अभद्र परंपरा निर्माण करत जात चळवळीच्या मुलभूत सिद्धांतावरच घाला घालत स्व-मृत्यू घडवते ती प्रक्रिया चिंताजनक आहे.

मी येथे उदाहरणे देत बसत नाही. असंख्य उदाहरणे आहेत...पण त्या सार्यांचा मतितार्थ एकाच आहे तो हा कि सामाजिक नेते, मग ते कोणत्याही विचारधारेचे असोत, अपवाद वगळता, एकतर अनुयायीच त्यांना स्वर्थ्पुरक धोरणे राबवायला लावतात वा ते नेते स्वत:चे स्वार्थ साधण्यासाठी अनुयायांना राबवतात. याची परिणती साध्यापासून च्युत होण्यात होते आणि चळवळ संपते.

महाराष्ट्रात आजवर कमी चळवळी झाल्या नाहीत...पण यश-अपयश पाहिले तर त्या सर्वस्वी अयशस्वी ठरल्या आहेत असेच दिसून येईल. आज ज्या तथाकथित चळवळी सुरु आहेत त्यांचे भाग्यही विनाशात जाणे एवढेच आहे. कारण त्यांत खरोखर मानवी जीवनाचे कल्याण होणे हा उद्देश आहे काय हा खरा प्रश्न आहे. त्यांचे हेतू खरोखर समता, बंधुता, विचार-स्वातंत्र्य आणि वैश्विक परिप्रेक्ष यात मानवी जीवन आणणे हा हेतू आहे काय हा प्रश्न आहे...आणि दुर्दैवाने त्याची उत्तरे नकारार्थी आहेत.

विरोधात विचार/ कृती जातात तेंव्हा खून, हल्ले, बदनाम्या, बहिष्कार, धमक्या अशी असंख्य हत्यारे वापरत हेच चळवळीचे अध्वर्यू जो नंगानाच घालतात आणि काही बळी घेऊन दीर्घ काळात स्वता:च्या चळवळीचे बळी देवून मोकळे होतात...तेंव्हा अनुयायी मात्र पुरेपूर नागवले गेले असतात...जे शहाणे असतात ते प्राप्त स्थितीचा फायदा घेण्याच्या स्पर्धेत उतरलेले असतात...प्रामाणिक कार्यकर्ते मात्र पुरते नागवले गेलेले असतात.

चळवळ ही खरे तर नेते नव्हे तर अनुयायीच चालवत असतात. नेते फारतर वैचारिक पाठबळ देत असतात...व त्याचाही अभाव असतो तेंव्हा फक्त भावनिक बळावर अनुयायांना भडकावत असतात.

हे अनुयायांना काळात नाही आणि त्यातच त्यांची आणि चळवळीची शोकांतिका असते.

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...