"मूलनिवासी नायक" : एक धादांत असत्य वृत्तपत्र
वृत्तपत्रे निपक्षपाती असावीत, घटनात्मक जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा सर्वसामान्य वाचक करत असतो. त्यात ती जर चळवळीशी संबधीत असतील तर त्यांची जबाबदारी अधिकच वाढते. पण या अपेक्षाना पुरेपूर छेद देणारे बहुजनीय चळवळीचे (भारत मुक्ती मोर्चा या संघटनेशी निगडीत) मुखपत्र "मूलनिवासी नायक" हे आहे. खोटे कसे छापावे, कोणास कसे टार्गेट करून पुरते बदनाम करावे याचा आदर्श नमुना म्हणजे हे वृत्तपत्र होय. हे मी अनुभवाने सांगू शकतो. माझा या संघटनेशी कसलाही संबंध नाही...पण जे अनुभव आहेत ते असे:
१. ह. मो. मराठे याना हाताशी धरून २५ लोकांची "बहुजनीय चळवळीचे मारेकरी कोण?" यावर प्रा. हरी नरके यांनी "गुप्त चर्चा घडवून आणली असा आरोप ४ फेब्रुवारी ११ च्या अंकात केला आहे. प्रत्यक्षात हा परिसंवाद होता, नोव्हेंबर (2010) महिन्यात जाहीरपणे पत्रकार भवनात झाला होता, सर्वत्र स्थानिक कार्यक्रमात या कार्यक्रमाची माहिती आली होती आणि हा परिसंवाद घेणार्या संयोजकांपैकी मी एक होतो. या परिसंवादाच्या (after function) बातम्या सर्व वृत्तपत्त्रांत आल्या होत्या आणि त्याचा वृत्तांत माझ्या ब्लोग वर उपलब्ध केला होता...आजही तो कोणीही पाहू शकते. या कार्यक्रमाला srotyaanmaddhe सर्वच स्तरातील लोक उपस्थित होते आणि त्यात श्री. ह. मो. मराठे हेही होते. शंकर सारडा सारखे समीक्षकही होते. या कार्यक्रमातील वक्ते सर्व बहुजनीय होते. प्रा. नरके हे अध्यक्ष होते. But the heinous allegation is as if in alliance with Mr. H. M. marathe this secret meeting was organuized. Shame.
आता प्रा. नरके यांच्याशी त्यांचे काही व्यक्तिगत वाद झाले असतील म्हणून एवढ्या उशिरा त्या कार्यक्रमाची विपर्यस्त वूत्ते देणे याला काय म्हणावे? गुप्त कार्यक्रम आणि जाहीर कार्यक्रम यातील फरक ज्यांना काळात नाही त्यांनी मुळात लेखणी उचलावी कशाला हा प्रश्न उपस्थित होतो. श्री. ह. मो. मराठे srote mhanun कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात...त्यांची उपस्थिती खटकणारे हे कोण? mag त्यांना उपस्थित रहायला कोणी अडवले होते कि काय? KI swatache sodun itar vruttapatre vaachayche yaanee band kele aahe?
एवढेच नव्हे तर युराशियन ब्राह्मण नावाची कोणती तरी संकल्पना या वृत्तपत्त्राने शोधून काढली आहे. प्रत्त्येक बहुजनीय विचारवंतांनी त्यांच्या ताटाखालचे मांजर बनावे ani amhi mhanu tech tatvadnyaan mandave अशी विकृत महत्वाकांक्षा असल्याचे दिसते.
प्रा. नरके यांचे सर्वच विचार मला मान्य नाहीत हे मी स्पष्ट करतो. परंतु त्यांचे अलीकडेच उदगीर येथे एक भाषण झाले. Tehi kadhi tar 9 jan. 11 rojee. या भाषणाचा वृत्तांत मी itar vruttpatraant आधीच वाचला होता. या भाषणात प्रा. नरके यांनी बाबासाहेबांच्या स्त्री/शेतकरी/ओ. बी. सी. यांच्या साठीचे अद्भुत योगदान वर्णिले आहे आणि तेही ज्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन निमित्त होते त्या संग्रहाच्याच संदर्भात...ही सी. डी. मी कालच पाहिली आणि मूलनिवासी नायक मधला वृत्तांत पाहिला...अशी वृत्तपत्रे...आणि तीही चळव्लींची...मला शरम वाटली. Most importantly Mulnivasi nayak published this defamatory news on 3rd Feb. 11...after almost one month...what kind of journalism...or was it done purposely? I am sure it was done purposely.
या संध्र्भातील बातमीचे शीर्षक असे दर्शवते कि प्रा. नरके यांचे गुरु नरहर कुरुंदकर....म्हणजे प्रा. नरके भटालले . प्रत्यक्षात मराठवाड्यात भाषण, कुरुंदकर हे मराठवाड्याचे गुरु असून मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे असे प्रा. नरके यांचे उद्गार, म्हणजे ज्यांना काही माहित नाही त्यांचे गैरसमज कोण करून देतोय? आणि कुरुन्द्करांबद्दल मुल्निवासीवाल्यांना आदर नाही (कारण ते पुरोगामी असले तरी ब्राह्मण) हे मी समजू शकतो...पण इतरांना आदर वाटू नये कि काय? ही कसली दडपशाही आहे? असेच गैर-लेखन करून त्यांनी याच भाषणाचा धादांत खोटा आधार घेत प्रा. नरके यांच्याविरुद्ध मातंग समाजाला भडकावण्याचे काम केले आहे. करत आहेत.
अशी चळवळ चालाव्नार्यांची मुखपत्रे असतील, ज्यातून फक्त द्वेष आणि खोटेपणा झळकत रहात असेल तर समाजाचे काय कल्याण होणार हा खरा प्रश्न आहे. बहुजनीय चळवळ हेच लोक गळा घोटून मारायला सज्ज आहेत. त्यांचे राजकीय, आर्थिक स्वार्थ असतील ते असोत, पण सामान्य तळागाळातील पिचलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणी झिजवण्याऐवजी ती फक्त काही व्यक्ती, विचारवंत यांना संपवण्यासाठी वापरली जात आहे आणि मी त्याचा निषेध करतो. having difference of opinion is one thing, making counter arguments is also welcome, but publishing trash stories/editorials is certainly a shame on movement...
These croocked minded people have trampled the very journalistic values those were introduced by Mahatma Phule and Dr. Babasaheb Ambedkar and still boast of being followers of Phule and Babasaheb is a very sad part of todays status of movement...and I lament on it.
प्रा. नरके यांची मी वकिली करत नाहीय. जे सत्य आहे आणि मी प्रत्यक्ष अनुभवले आहे तेच सांगतो आहे. याची चल्वलीतील मंडळीने दाखल घ्यावी ही सध्या जरी अशक्य वाटली तरी अपेक्षा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी
ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
अभिनंदन साहेब,
ReplyDeleteआता मुलनिवासी विरुद्ध आघाडी उघडल्याशिवाय पर्याय नाही. संत तुकारामाचं जगत गुरु म्हणुन उदात्तीकरण करणारी हि टोळी जेरबंद केल्याशिवाय आम्ही बौद्ध बांधव शांत बसणार नाही.
जयभिम.
jay joti jay bhim.sanjay, mi tumacha abhari aahe.tumhi viveki bhumika ghetleli aahe.mathefiru sodale tar sarva vichari bahujan n vivekvadi tumachyabarobar rahtil.satymev jayate ha bhagvan buddhancha sandesh aahe.
ReplyDeleteसोनवणेजी प्रा. हरी नरके यांच्यावर दै. मूलनिवासी नायक ने आगपाखड केली म्हणून ते धादांत खोटे वृत्तपत्र आहे असे होत नाही. आमच्या चळवळीचे थोर मार्गदर्शक नेते जेव्हा पथभ्रष्ट होतात, तेव्हा त्यांना माननारी बहुजन मंडळी त्यांच्या मागे चुकीच्या दिशेने जाऊ नये चळवळीबाबत संभ्रम होऊ नये म्हणून अश्या पथभ्रष्ट्र नेत्यांचा पर्दाफाश करणे क्रमप्राप्त होते. बाबासाहेबांनी आपल्या थोड्या आयुष्यात अनेक महत्वाची कामे केलीत. त्यांच्या मागे असंख्य जवाबदार्या होत्या, कामे होती. पण असे असतांनाही या अति busy schedule मधून त्यांनी वेळ काढून, अनेक तास खर्ची घालून, कष्ट सोसून एक मोठा ग्रंथ होईल इतके गांधीजी वर लिखाण केले आहे. ते आपण वाचावे. बाबासाहेबांना एवढे महत्वाचे काम सोडून गांधीजीवर लिखाण करण्याची काय गरज होती ? कारण गांधीजी एक वादळ होते. महात्म्याचे ढोंग करून त्यांनी बहुजन लोकमानसावर स्वत:चा पगडा निर्माण केला होता. आमच्या महापुरूषांनी बहुजनांना ब्राम्हणाच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी व स्वत:ची तर्कावर आधारित विज्ञानवादी दृष्टिकोण तयार व्हावा म्हणून आंदोलन चालवले. त्यांचे आंदोलन हे वैचारिक आंदोलन होते विचार परिवर्तनाचे होते. गांधीजीने जन्माला घातलेला गांधीवाद हा भविष्यात आमच्या बहुजनाची दिशाभूल करून पुन्हा गुलामगिरीत घेऊन जाऊ नये म्हणून गांधीजीना ओपन करून बाबासाहेबांनी त्यांचे खरे स्वरूप जगासमोर आणले. हा दुसर्र्या अर्थाने इतिहास शुद्धीकरणाचा प्रयत्न होता हे विसरून चालणार नाही. कारण आम्ही बघतो आमचे म्ह्णजे बहुजनाचे सत्यानाश करणारे ब्राम्हणच इतिहासात खोटे लिखाण करून ( कारण लिहिण्या वाचण्याचे अधिकार फक्त त्यांनाच होते ) ब्राम्हणाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात खरा इतिहास लपवून ठेवतात त्यामुळे बहुजनांना शत्रू मित्राची ओळखच राहिली नाही. छ. शिवाजी महाराजाचे स्वराज्य निर्मितीचे श्रेय ते समर्थ रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव यांना देतात. चंद्रगुप्त हा शूद्र चक्रवर्ती सम्राट का झाला तर चाणक्यमुळे. म्हणून आमच्या बहुजन समाजास योग्य दिशा देण्यासाठी पथभ्रष्ठ नेते आमचे जरी असले तरी त्यांची पोलखोल करणे गरजेचे असते आणि ते काम दै. मूलनिवासी नायकने चोखपणे केले आहे. दै. मूलनिवासी नायक फक्त प्रा.हरि नरके यांच्यावरच रोज लिखाण करीत बसले नाही. आवश्यक तेवढेच लिहिले आहे. सनातनी ब्राम्हण व पुरोगामी ब्राम्हण हे एकाच शरीराच्या दोन बाजू आहेत” असे लिखाण करणारे मा. हरी नरके साहेब हेच जेव्हा पुरोगामी ब्राम्हणांच्या कंपूत शामील होतात तेव्हा ते आपल्या स्वत:च्या विचाराशी प्रामाणिक नाहीत हे सिद्ध होते. दै. मूलनिवासी नायकने त्यांच्या हालचालींचे पूर्ण निरीक्षण करूनच विचारांती त्यांच्यावर लिखाण केले आहे. आहे. आज बहुजनाची चळवळ कोण चालवीत आहे ? किती संघटना आहेत अश्या? चळवळ म्हणजे काय ? कशी चालवावी ? कोणाविरूद्ध चालवावी ? निर्धारित शत्रू कोण ? हे एकाही संघटनेला कळत नाही. चळवळ चालविण्यासाठी आवश्यक उद्दिष्टाला धरून विचारधारा, नेतृत्व बामसेफ/भारत मुक्ती मोर्चा शिवाय इतर कोणाकडेच नाही हे आजच्या काळातील एकमेव सत्य आहे.
ReplyDeletesir leakh far awdla.
ReplyDeleteस्वातंत्र्य मिळून ७० वर्ष होत आहेत आणि आपण अजूनही वाद आणि प्रतिशोधाच्या गोष्टीच करत आहोत .अजूनही इतिहासातच अडकून आहोत तर भविष्य सुधारायचे कधी .उठ-सुठ तोच तो विषय ऐकायला मिळतो बाबासाहेबांनी भविष्याचा विचार करायला सागितला आहे तिकडे लक्ष केंद्रित करा समाजाला चिंता आणि संभ्रमातून बाहेर काढव .अशांत करूनये असे मला वाटते....... जय ज्योती
ReplyDelete