Monday, February 14, 2011

मराठा कोण आहेत?

 मराठा कोण आहेत?

मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या प्रश्नांना लगेच न भीडता मुळात "मराठा" या संज्ञेबद्दल चर्चा करणे हा या लेखाचा हेतु आहे. तसेच या चर्चेला अनेक पैलु आहेत. प्रथम आपण "मराठा" या शब्दाचे मूळ पाहुयात.

१. रामायण-महाभारतात ते "अश्मक", "कुंतल", दंडक", :गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, मल्लराष्ट्र अशा स्वरुपात महाराष्ट्राचे उल्लेख मिळतात. अशोकाच्या शिलालेखांपर्यंत व महावंसपर्यंत महारट्ठी हा शब्द तेत्पुर्वी दिसत नाही. मराठा एक जात असा उल्लेख पुराणामद्धेही अथवा कोणत्याही (अगदी बाराव्या शतकातील सुद्धा) स्मृतीमद्धे मिळत नाही.

२. महारट्ठी हा शब्दप्रयोग आपल्याला सातवाहन काळापासुन वापरला गेलेला दिसतो. अनेक इतिहासतज्ञ "महारठ्ठी" या शब्दाचा अर्थ "रथ चालक" ते रथी (रट्ठी) आणि या रथींचा स्वामी तो महारट्ठी असा लावतात. पण ते अयोग्य आहे. रट्ठी आणि रथी हे रुप केवळ शाब्दिक साम्य दाखवतात म्हणुन ते एक अर्थी आहेत असे मानता येत नाही. ...अर्थ वेगळे आहेत. रट्ठ म्हणजे प्रदेश असा खरा अर्थ आहे. महाराष्ट्र हा शब्द अनेक रट्ठांचा समुह आहे.

३. महारट्ठी हे सातवाहनकाळात एक पद होते. प्रत्येक रट्ठाचा (आजचा कलेक्टर) करसंकलन ते रक्षणात्मक कार्य करणारे राजनियुक्त प्रतिनिधी होते त्यांना महारट्ठी म्हटले जात होते. हे पद वंशपरांगत नव्हते तसेच सातवाहन काळापर्यंत त्यांच्या इतर रट्ठांत बदल्याही होत असत. स्वत: सातवाहनांनी कनकवीर या महारठीच्या मुलीशी विवाह केल्याचे दाखले आहेत.

४. महारट्ठी हे विशिष्ट जातीतुन निवडले जात असल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. नाग, कदंब, पौन्ड्र, औन्ड्र, (पुंडे, उंडे ही आडनावे या द्रुष्टीने तपसता येतील.) यदु, अहिर, गुजर अशा अनेक तत्कालीन विभिन्न समाजसमुहांतुन त्यांची निवड झाल्याचे दिसते.

५. इ.स. च्या २३० मद्धे सातवाहनांची सत्ता कमजोर झाल्यानंतर हे महारट्ठी स्वतंत्र सरंजामदार बनले व काहींनी स्वतंत्र सत्ताही स्थापन केल्या. यात बादामीचे चालुक्य, राष्ट्र्कुट व यादव ही घराणी मोठी साम्राज्ये उभी राहीली. याच काळात महारठ्ठी हे पद वंशपरंपरागत झाले असावे कारण त्यांनी प्राप्त केलेले सामर्थ्य व राजसत्तांची अपरिहार्य गरज.

६. राष्ट्रकुट हे घराणे मुळचे "रट्ठीकुत" असावे...राष्ट्रकुट हे कृत्रीम संस्कृतीकरण आहे हे उघड आहे.

७. राजकीय सत्ता अशा रितीने महारट्ठ्यांचा हाती गेल्याने (मग ती सरंजामदार/जहागिरदार म्हणुन का असेना) या संपुर्ण प्रदेशाला महारट्ठी असेच नाव पडले व त्याचे संस्कृतीकरण म्हणजे महाराष्ट्र. महारठ्ठी हे जसे पदनाम होते, तसेच अनेक रठ्ठांचा समूह म्हणून महारठ्ठ हे प्रदेशनाम बनल्याचे दिसते.

८. थोडक्यात इ.स.पु. ३०० मद्धेच महारट्ठी शब्द सर्वत्र प्रचलित झाला होता असे महावंस वरुनही दिसते.

९. मराठे राजपुत वंशाचे आहेत असे मानण्याचा एक प्रघात आहे. अनेक मराठा घराण्यांनी आपली वंशवेल प्रसिद्ध राजपुत घराण्याशी जुळवलेली दिसते.

१०. पण राजपुत हे मुळचे भारतीय नाहीत असे आता डा. आर. जी, भांडारकर, टोड इ. अनेक संशोधकांनी सिद्ध करुन दाखवले आहे. बव्हंशी राजपूत हे मुळचे सिथियन वंशाचे असुन ते सनपुर्व पहिल्या शतकापासुन भारतात यायला सुरुवात झाली. त्यांनी सत्ता स्थापन केल्या आणि कालौघात येथील धर्मही स्वीकारला. धर्म स्वीकारला म्हनुन त्यांचे संबंध रामायण-महाभारतातील प्रसिद्ध व्यक्तिंशी नाळ जोडायला सुरुवात झाली. सुर्य-सोम या वंशापासुन आपली उत्पत्ती झाली असे दरबारी भाटांनी सांगायला सुरुवात केली. वसिष्ठाने अग्नीतुन क्षत्रियांची चार कुळे निर्माण केली ही कथा प्रथम पृथ्वीराज चौहानाचा भाट कवी चंद याने प्रथम "पृथ्वीराजरासो" मद्धे प्रसृत केली आहे. ही कथा राजपुतांनी लगेच उचलुन धरली. पण त्याला अन्य कोणताही आधार नाही.

११. महारट्ठी शब्द तत्पुर्वीच प्रचलीत होता हे मी स्पष्ट केले आहेच...म्हणजे राजपुतांपासुन मराठा जात बनली असे म्हणने चुकिचे व अनैतिहासिक ठरेल.

१२. तरुण संशोधिका क्रांती चमार यांचे मत आहे कि भोसले हे मुळचे सिसोदिया राजपुत आहेत व त्यासाठी त्यांनी राणा लक्ष्मणसिंहपासुन (सन १३०३ पासून) एक वंशावळ दिली आहे जी मालोजीराजे व विठोजी राजे यांच्यापर्यंत भिडते.

१३. डा. रा. चिं. ढेरे राजपुत मुळाशी सहमत नाहीत. (पहा शिखर शिंगनापुरचा शंभु महादेव.)

१४. राजपुत हेच येथील पुरातन वंशांशी आपली नाळ जुळवु लागले होते आणि ही प्रक्रिया ४-५ व्या शतकापर्यंत चालु राहिलेली दिसते. त्यामुळे केवळ मराठ्यांत यादव, जाधव, परमार, गुजर, अहिर, साळुंखे इ. आडनावे आहेत आणि त्यातील काही राजपुत घराण्यांशी जुळतात म्हणुन मराठे हे राजपुत कुलीन ठरवता येत नाही...कारण सिथियनांचे पुर्ण हिंदुत्वीकरण होण्याच्याही खुप आधी मराठा ही एक जात/शक्ती म्हणुन उदयाला आली होती हे वरील घटनाक्रमावरुन स्पष्ट दिसते. खुद्द राजपुतांनीही स्वता:ला सुर्यवंशी, चंद्रवंशी समजत यदुवंशाशीही संबंध जोडला, ते कार्य सत्तेत येताच महारट्ठी मंडळीने त्यांच्याही पुर्वी करुन टाकले होते.

१५.अहिर, गुजर, औन्ड्र, पौन्ड्र, यादव, नाग अशा अनेक मानवी गटांचा वावर महाराष्ट्रात पुरातन काळापासुन (ऐतरेय ब्राह्मणात व महाभारतात औन्ड्र/पौन्ड्र/अहिरांचे स्पष्ट उल्लेख आहेत. या जमाती शुद्र (अवैदिक) होत्या असेही सा स्पष्ट निर्देश आहे.)

१६.होयसळ, (या कानडी रुपाचे "होयसळे" मराठी रुप भोसले झाले असु शकते असे अनुमान आहे.) डा रा, चिं ढेरे यांनी होयसळ घराण्याचा महाराष्ट्रात आलेल्या बलियप्पाला भोसले घराण्याचा संस्थापक मानले आहे. शिखर शिंगनापुरचे मंदिर त्यानेच स्थापन केले अशा अर्थाचा शिलालेखही आहे.

१७. थोडक्यात मराठा (महारट्ठी) समाज हा विविध वंशांच्या मिश्रणातुन निर्माण झालेला समाज आहे. महारट्ठी हे पद पुढे जात बनला व त्यातुनच मुळच्या ९६ कुळ्या (ज्या मुळच्या सत्ताधारी होत्या) निर्माण झाल्या. अथवा महाराष्ट्र हा प्राचीन काळ्दी ९६ रठ्ठांत विभागला गेल्याने या कुळ्या निर्माण झाल्या. सत्तेत असल्याने इतर सत्ताधार्यांशी विवाहसंबंध जोडने स्वभाविक होते...त्यातुनच ही जात विकसीत होत गेली. अन्य वंशीयही अनेक जातींत पुढे विभक्त होत गेले. मराठ्यांची अनेक आडनावे ओ, बी.सी ते अन्य अति-वंचितांतही दिसतात ती यामुळेच, कारण वांशिक अर्थाने सर्वांचे मुळ त्या-त्या वंशाशी निगडीत आणि एकच होते.

१८. .खंडोबा, विट्ठल, रेणूका ही मुळची वैदिकांच्या दृष्टीने शूद्र स्वरुप असणारी दैवते सर्वच मराठे ते अन्यजातीयांची कुलदैवते आहेत तसेच पुरातन शैव अशी शिव, जगदम्बा हीसुद्धा कुलदैवते आहेत. राजपुत हेही शैव बनल्याने त्यांचे कुलदैवतही एकलिंगजी वा भवानी बनणे स्वाभाविक आहे. त्या आधारावर मराठ्यांना सर्वस्वी राजपुत ठरवता येत नाही. महाराष्ट्रावर काही सिथियन राजांनीही राज्य केलेले आहे, त्यामुळे काही महारठ्ठी सिथियन कुळाचे असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

१९. पुरणकारांनी महाराष्ट्रातील सर्वच समुदायांना शूद्र मानले असल्याने, ते कधीही वर्णाश्रम धर्मानुसार क्षत्रिय असु शकत नव्हते. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी "क्षत्रिय" असल्याचे सिद्ध केले ते राजपुतांशी वंशावळ जोडुन, परंतु गागाभट्टाने प्रथम ती वंशावळ अमान्यच केली होती. नंतरही महाराजांना शुद्रच म्हटले वा समजले जात होते हे आपण महात्मा फुले यांनी रायगडावरील महाराजांची समाधी स्वच्छ करुन फुले वाहीली तेंव्हाीका ब्राह्मणाने ती फुले लाथाडुन "एका शुद्राला फुले वाहतोस..." असा कांगावा केल्याप्रकरणी पाहु शकतो. शाहु महाराजांचा वेदोक्त प्रकरणातही वैदिक धर्मियांनी त्यांना (म्हणजे पर्यायाने मराठ्यांना) क्षत्रिय मानलेच नव्हते, त्यांना अवैदिक म्हणजेच शूद्रच समजत होते हे स्पष्ट आहे.

थोडक्यात मराठा ही पुर्वी जात नव्हती. महारट्ठी पद हे कोणत्याही समाजगटातील योग्य माणसाला मिळत होते...पुढे हे पद वंशपरांगत बनल्याने तीचे जातीत रुपांतर झाले, कालौघात त्यांची संख्या वाढत गेली. म्हनजे आजचे मराठे तसे मि्श्रवंशीयच आहेत. सत्तेत असल्याने ते स्वता:ला उच्च जातीय/क्षत्रिय (म्हणजेच वैदिक) समजू लागले...पण तसे ते वास्तव नाही, कारण वैदिकांनी त्यांना कधीही आपल्या धर्मातील क्षत्रियत्व बहाल केलेले नाही.

त्यामुळे आज मराठा समाज (धनगर ते अनेक ओबीसीसुद्धा) दुर्दैवाने भ्रमित होत वैदिक अर्थाने उच्च वर्णीय स्वत:ला मानत असतील तर तो त्यांचा केवळ भ्रम आहे. त्याला कसलीही वैदिक मान्यता मुळातच नाही. वैदिक उच्च-नीचतेच्या तत्वज्ञानाच्या वृथा गारुडातून मूक्त होणे सर्वांनाच आवश्यक आहे.

54 comments:

 1. Atishay Sunder Vivechan vachun maratha samajachi
  asmita dukhavali tari chalel
  shrimantani ya babivar kahitari lihave

  ReplyDelete
 2. I differ from many of your statement. I would like to write an article on this subject on my blog soon.

  ReplyDelete
  Replies
  1. तुझ्या पोटात गोळा उठणारच कारण मराठी लोकं आपापसात भांडत राहावे हाच तर तुझा खरा उद्देश आहे नाही का ?
   बघ कसं पोटातलं ओळखतो मी > : )

   Delete
 3. लेख खूप माहितीपूर्ण आणि संशोधनात्मक आहे. पण त्यांनी मांडलेले कांही मुद्दे चुकीचे वाटतात. त्यावर माझी मते व त्यांनी दिलेल्या माहितीला पूरक माहिती मी येथे देत आहे.

  १. संजय सोनवणी यांनी व या अगोदर अनेक इतिहास संशोधकांनी महारठ्ठी या शब्दाचा संबंध मराठा व मराठी या शब्दांशी लावण्याचा प्रयत्न केला आहे. महारठ्ठ या शब्दापासून महाराष्ट्र हा शब्द तयार होऊ शकतो. पण मराठा व मराठी हे शब्द महारठ्ठ पासून बनलेले नाहीत. मराठा हा शब्द मरहट्टा व मराठी हा शब्द मरहट्टी या शब्दापासून बनला आहे हे सरळ दिसून येते. मरहट्टी ही प्राचीन काळतील लोकप्रिय भाषा होती. सातवाहनकालीन साहित्य हे मरहट्टी भाषेत आहे. मरहट्ट्यांची भाषा ती मरहट्टी. मराठा व मराठी हे शब्द अगदी अलिकडेपर्यंत मर्‍हाटा व मर्‍हाटी असे लिहिले जात असत. आजची मराठी ही मरहट्टी भाषेचे अपत्य आहे, संस्कृतचे नव्हे, तसेच आजचा मराठा हा शब्द मरहट्टा या शब्दाचे अपत्य आहे, महारठ्ठ या शब्दाचे नव्हे.

  याउलट महारट्ठ हा शब्द महार व महाराष्ट्र या शब्दांना जवळचा आहे. प्रसिद्ध विदुषी दुर्गा भागवत यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे म्हंटले आहे. ते जास्त बरोबर वाटते.

  २. राजपुतांना अनेक संशोधकांनी सिथिअन (शक) ठरवले आहे. पण सगळेच राजपूत हे सिथिअन नाहीत. जसे, राजपुतातील राठोड हे मूळचे दख्खन वरचे राष्ट्रकूट (मूळ मरहट्टी शब्द रट्टुउड) आहेत. तसेच त्यांच्यातील सोळंकी हे मूळचे दख्खन वरचेच चालुक्य आहेत.

  राजपूतांमध्ये गंग, होयसळ-यादव, शिलाहार अशा अनेक कुळ्या आहेत, ज्या सिथिअन वंशाच्या नाहीत.राजपुतांच्या कुळ्यांमध्ये चंद्रवंशी, सुर्यवंशी, यदुवंशी, नागवंशी असे प्रकार आहेत. त्यातील फक्त सुर्यवंशी कुळ्या याच फक्त सिथिअन असू शकतात. अनेक मराठ्यांचे मूळ कर्नाटक मध्ये आहे. पण काहीजण प्रत्येक मराठ्यांचे मूळ राजस्थानात शोधतात. ते पूर्ण चुकीचे आहे.

  ३. मुळात ९६ कुळ्या हा प्रकार अगदी अलिकडचा आहे. शिवपूर्वकाळात कुळ्यांची संख्या फारच कमी होती. त्यातील प्रमुख कुळ्या यादव, मोरे, कदम, राष्ट्रकूट(राठोड),चालुक्य, शिंदे, कलचुरे,शिलाहार, सावंत, पवार, साळवी या होत्या. शिवकालानंतर कुळ्यांची संख्या वाढत जावून ती ९६ झाली. याचे कारण म्हणजे शिवकालात मराठा या शब्दाला महत्व आले. त्यामुळे अनेक समूह स्वत: ला मराठा म्हणवून घेऊ लागले. दुसराही एक प्रकार घडला, तो म्हणजे जुन्या कुळ्याचे विभाजन एका कुळीतून दोन वा अधिक कुळ्या उदयाला आल्या.

  ४. भोसले हे मूळचे होयसळच असले पाहिजेत. ते सिसोदिया असते तर त्यांनी सिसोदिया अथवा सिसोदे हेच नाव कायम ठेवले असते.
  याउलट होयसळचा अपभ्रंश होवून भोसले हे आडनाव तयार झाले असणे जास्त शक्य वाटते. देवगिरीचे यादव आणि होयसळ यांचे पूर्वापार संबंध होते ही गोष्टही या दृष्टीने विचार करण्यासारखी आहे.

  http://mahavichar.blogspot.com/

  ReplyDelete
  Replies
  1. You have done deep study sir. Nice Info

   Delete
  2. माझ्या माहिती नुसार भोसले हे आडनाव मालोजी राजे ( शिवाजींचे आजोबा )ह्याचे आजोबा " भोसाजी सिंह ह्या च्या नावावरून तयार झाले.
   भोसाजी सिहं हे राजस्थान वरून महाराष्ट्रात आले तेव्हा भोसाजीचे वंश म्हणन "भोसले"

   Delete
  3. Aaho maloji raje chya ajoba cha naav malkarnraje bhosale hota.

   Delete
 4. जयभिम साहेब.
  एकदम भारी माहिती.

  ReplyDelete
 5. jai jijau, jai bhim sir. navin mahiti vachun dnyanat bhar padli

  ReplyDelete
 6. lekh chhan ahe..Dr.Sahebrao Khandare,Dr.P.S.Sadar Ani Dr.Neeraj Salunkhe Hyani je kahi navin Sanshodhan kele ahe ..te hi ekda wachawe.. sanshodhan paripurn hoil..

  ReplyDelete
 7. मराठे राजपुत वंशाचे आहेत असे मानण्याचा एक प्रघात आहे. अनेक मराठा घराण्यांनी आपली वंशवेल प्रसिद्ध राजपुत घराण्याशी जुळवलेली दिसते.
  kya spectial bhaparii aahe !!!!!!!!!hahahhahahha

  udya jay bhim mahanta yacha sanbhand hi MAHABHARTATIL bhim shi hi lavyla kami nai karanar !!!!!!!hahhahaha mahane मराठे राजपुत वंशाचे आहेत ..hasun hasun pot dukahyala lagte

  ReplyDelete
 8. RAJPUT AAHET MANUN TUMI HA DIVAS PAHU SHAKLAT NAHITAR MUSALMAANANI KADICH TUMCHI VAAT LAVUN TAKLI ASTI........

  ANI TUJYA MAHITI SAATHI SANGTO RAJPUT MANJECH KSHATRIYA ANI KSHATRIYA FAR PURVI PASUNACH BHARTAT RAHATAT AGDI RAMAYAN,MAHABHARAT PASUN

  JAYENDRASINGH TEJENDRASINGH RAWAL(RAJPUT)
  At/Post:Karwand,Tal:Shirpur,
  Dist:Dhule(Maharashtra)

  ReplyDelete
 9. फार माहितीपूर्ण लेख आहे. असेच लिहीत राहा. संकुचित जातीयवादाला माझा नेहमीच विरोध आहे आणि राहणार.

  ReplyDelete
 10. मराठे कोण कुठले आणि कोणत्या वंशाचे याचा विचार करण्या पेक्षा हा विचार कर कि त्या काळी मराठ्यांनी पराक्रम केला , स्वराज्य निर्माण केले स्वातंत्र्याची ज्योत पेटवली ,त्यांनी त्यावेळी त्याग केला नाहीतर आज हे बोम्बाल्णारे लोक सुंता करून बसले असते .

  ReplyDelete
  Replies
  1. i agree...marthtynai teva parakram kela mhanoon aaj marathi ani maharshtra shabd aahet..nahitar muslimashtra asa kahitari zala asta

   Delete
 11. माणूस पराक्रमाने आणि कर्तुत्वाने मोठा होत असतो , आणि मराठ्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे .आणि जो स्वतः जगतो आणि समाजाला जागवतो तो खरा धरमवीर आणि जातिवंत मग तो कोणत्याही जातीचा असो ,

  ReplyDelete
  Replies
  1. माझ्यासुद्धा जातीची नाळ राजपुत ( क्षत्रिय ) वंशासी जोडली जाते. तसेभाट वदंतकथा सांगतात पण मी स्वतःला माणूस म्हणून जगणे जास्त पसंत करतो.....

   Delete
 12. Jayendrasingh Rawal and Shivraj Patil are right

  ReplyDelete
 13. मराठा समाज हा क्षत्रिय समाज आहे कारण या समाजातील ३६ कुळे हि थेट क्षत्रिय राजपूत समाजातून आलेली आहेत आणि ६० कुळे हि स्तानिक पण सधन कुटुंबातील असून, ती क्षत्रिय आहेत
  बाकीची ६० कुळे हि यामध्ये गवळी,मेश्पालक, कुणबी,गुर्जर पण आहेत.
  आणि पशुपालाकाची सर्व कुळे हि क्षत्रिय वंशातील आहेत हे काही पुस्तकातून सिद्द झाले आहे,
  १९१३ आणि १९३३ साली मराठा समाजाला क्षत्रिय वर्ण हिंदू महासभे मध्ये घोषित करण्यात आला होता .

  ReplyDelete
 14. मराठा समजा मध्ये ४ वंश आहेत
  १.सुर्यवंश
  २.चंद्रवंश किव्हा यदुवंश
  ३.अग्निवंश
  ४.नागवंश
  मराठा,धनगर,राजपूत,गवळी हे सर्व कर्म रीग्वेद नुसार पण कर्म क्षत्रिय आहेत मी आपणास e -mail
  करीन या गोष्टी साठी

  ReplyDelete
 15. लेख जितका गंभीर आणि वैचारिक आहे, त्याहून अधिक विनोदी अशा प्रतिक्रिया, ज्या इंग्रजी इन टू मराठी अशा आल्या आहेत त्या, वाचून मस्त करमणूक झाली. शेपटावर पाय पडल्यामुळे व लेखनाचा विषय समजून न घेतल्यामुळे प्रतिक्रिया देणाऱ्यांचे हसे झाले आहे.

  ReplyDelete
 16. according to judicial decision given by court of india(during/of british india govt),
  only 5 kuli and 96 kuli maratha are kshatriya.

  ReplyDelete
  Replies
  1. sorry only 5 and 9 kuli not 96.

   Delete
 17. MARATHA JAAT SURVATILA NAVTI...KAHISHATKE...TASHI..MALI.MAHAR,,,MANG....ITYADI JATIHI NAVHTYA...HE KHARECH AAHE...eRAN,DIST:SAGAR: ETHE NAGVANSHIY SENAPATI SWTHALA PRATHAMCH MAHARSHTRI ASLYACHE MHANUN GHETO..MHANJE NAG VANSH TAR NAKKICH NANTAR MATHA ZALA...ANI SENAPATI HA YUDHASHI SAMBANDHIT ASLYANE...TO VARNANE TO (YETHE JATI ANI VARN YANCHI GALLAT NAKO) KSHTRIYACH HOTA...HE WEGALE SANGNYCHI GARAJ NAAHI...SHIVAJI MAHARAJ HI SWATHAS AMHI TO MARATHE...ASE MHANUN GHETAT..HEHI VISARUN CHALANAAR NAAHI...ANI KON KONTYA WARNACHA,...HE mANU KALA PURVI KARMA WARUN THARAT HOTE JANMANE NAAHI...JNMAWRUN JAAT FAKT EKACH SANGITLELI MALA ADHALI SMRUTI MADHE TI MHANJE CHANADAL...YACH PRKARE WEG VGALE VARNSANKAR..ANULOM PRATILOM VIVAH,,,YA MISHRANATUN MANUNE SNGITLELI VYASTHA KOLAMDALI..PAN NAWYANE NIRMAN ZALELYA ANTATILA SAMJ ACHANET STHAN TAR DEN GARJECH THARALE..MHANUN TATKALIN PUROHIT WARG JO TYA KALCHYA SHASKANCHA SALLAGAR HOTA TYANE HI JNMADHARIT JAATI VYAWASTHA NIRMAN KELI ASAVAI...PUROHIT WARG HA BAHUTANSHI BRAMHAN HOT WA SHASHAK WARG BHAUTANSHI KSHTRIY..BHAUTANSHI YA STHI KI KAHI KSHUDR RAJE..HI TYA WELI HOE...TYA MULE KONTI JAAT KONTYA WARNACHI HE THARAVNE AAJ TARI SHKY NAAHI.....MARATHYANCHYA VRUTTI VISHAYI BAGHTA MARATHE DASRYA PARYNT SHETI WA DASRYANNANTAR TALWAR GAJWAYLA JAAT,,WEL PADLYS MADHE ADHE HI YUDHWAR JAAT..HE APLYALA MAHIT AAAHE...AATA KRISHI HI KSHUDRNCHI VUTTI TAR LADHANE HI KSHTRIYANCHI...MAG MARTAH NAKI KONTYA WARGAT GHALAYCHE?...TYAMULE WARN WYASTHA HI MODIT NIGHALI WA JAATI WYASTHENE TICHI HALU HALU JAGA GHETALI..FAKT EK WARN TIKALA....BRAMHAN...PAN TYNCHYATAHI WARN SANKAR ZALACH..ANI TYNCHAYA PAOT JAATI TAYAR ZALYA..HE SAGALCH KLHST PRAKARAN AAHE TYAMULE JATINCHE WARN KINVE TYNCHI MULE SHODHAN HA AAJ TARI UPYOGACHE NAAHI...AAPAN JATICHYA BHINTI EVDHYA GHATTA KA KARTOY? APAN MANUS MHNUN NAAHI KA RAHU SHAKAT...?

  ReplyDelete
 18. Sanjay sir, me khup thikani vachale ahe ki Shivaji maharajanche ajoba Malojirao he Dhangar hote ani Shivaji Maharajani tyanchya Rajyabhishekaveli te Dhangar(kshatriya) aslyache siddha kele hote. Me wikipedia vachale ahe ki Shivaji Maharaj he '' Hatkar-Dhangar'' hote he khar ahe ka? Plz reply?

  ReplyDelete
  Replies
  1. https://www.facebook.com/photo.php?fbid=423456054453482&set=a.267277083404714.64323.100003672720193&type=1&theater

   Delete
  2. https://www.facebook.com/shares/view?id=443679542431133&overlay=1&notif_t=story_reshare

   Delete
 19. sala baman
  kiti nalayak aahes

  ReplyDelete
 20. Afjal khanala fadla , he bhatukdyani bocha aptun sangitle . Karan dangal, hindu muslim. >>>>>>>>>>>>> kothla fadla khanacha , tyach veli mundke todle bamanache... Ha itihas apan jagala sangu.. Karan bhatukde ahet gandu~~~~~

  ReplyDelete
 21. मनु ने बहुजन एकता को तोड़ने के लिए जाति का मकडजाल बनाया ...लेकिन आधुनिक मनु बहुत शातिर तरीके से जातियों कि पार्टी ..दलितों चमचों को पैसा देकर पार्टी का जाल(बहुत पार्टी हो चुकी मगर सब कि सब गुलाम न जिताऊ )..बामसेफ (उफ़ जो मुह उठाता बामसेफ बनाकर मान्यवर कांशीराम बनना चाहता है ) का मकडजाल ( परमार्जित चमचों की फ़ौज ) ..जातिगत पार्टी बनाकर बहुजन एकता को बिखंडित करता जा रहा है ..और नए नए मुर्गे इनकी जाल में फसते जा रहे है...क्या आपको नहीं लगता कि जाति का स्थान आब पार्टियों ने ले लिया जो बहुय्जन एकता को तोड़ रही हें

  ReplyDelete
 22. sanjay sahebani bahutek marathyavishyi aslela dvesh baher kadhla ahe.......pan mahavir sirani changli mahiti dli

  ReplyDelete
 23. स्वतःला क्षत्रीय घोषीत करुन क्षत्रीय होत नाही कारण परशुरामाने आधीच पृथ्वी निःक्षत्रीय केली आहे. त्यामुळे पृथ्वीतलावर कुणीही क्षत्रीय शिल्लक नाही...

  ReplyDelete
  Replies
  1. मग यापुढे मुस्लिमांनी देवळे फोडून तुम्हाला भिकेला लावले की या "तथाकथित क्षत्रीयांकडे" धर्म वाचवण्यासाठी धाव घेऊ नका. पूजा आणि श्राद्धाच्या नावावर फुकटचे चरायला देखील येऊ नका.

   "तुमचे भोंदूराष्ट्र" देखील तुम्हीच स्थापन करा.
   "तुमचे वेद-पुराणे-गीता" तुमच्याच ***त घाला.
   "तुमच्या धर्माच्या" कुचाळक्या तुमच्याच घरांत ऐकवा.
   "तुमची संस्कृती, तुमचा धर्म आणि तुमचे जानवे" तुम्हीच सांभाळा. बाकी इतर सारे त्यांना हव्या त्या धर्माचा आणि संस्कृतीचा स्वीकार करायला मोकळे आहेत.
   "आमचा" आणि "तुमचा" काहीही संबंध नाही.

   Delete
  2. रवींद्र खानंदे, परशुरामाने एकदा नव्हे तर एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केली आहे असे ब्राम्हण म्हणतात. एकदा पृथ्वी निःक्षत्रीय झाल्या नंतर पुढील वीस वेळा क्षत्रीय कसे पैदा झाले?

   Delete
  3. माझ्यासुद्धा जातीची नाळ राजपुत ( क्षत्रिय ) वंशासी जोडली जाते. तसेभाट वदंतकथा सांगतात पण मी स्वतःला माणूस म्हणून जगणे जास्त पसंत करतो.....

   Delete
  4. एकदा पृथ्वी निःक्षत्रीय झाल्या नंतर पुढील वीस वेळा क्षत्रीय कसे पैदा झाले?
   >>>>>>> याचे उत्तर आपल्याला ब्राम्हणच देतील.रामायण, महाभारत मत्स्यपुराणात याचे जागोजागी उल्लेख आहेत.त्यावरून आपल्याला तर्क करता येईल.उद: कौरव-पांडव यांचा जन्म . कर्ण याचा जन्म.

   Delete
 24. म्हणजे तुमचे म्हणणे असे दिसते कि जर वैदिकांनी म्हणले किवा तशी मान्यता दिली तरच खरेच उच्च वर्णीय होता येते आणि गुणांनी म्हणजे आपला पराक्रम आणि शौर्य सिद्ध केल्यावर नाही? तुम्हीपण भटा बामणांची जुनी फालतू मते कुठवर घेऊन बसणार सर ?
  दलित आणि obc ना जर तुम्हाला स्वाभिमान द्यायचा असेल त्यांना जागृत करायचे असेल तर,त्यांची चळवळ उभारायची असेल तर,ह्या काळात फक्त मराठा ब्राह्मणांवर टीका करून भागणार नाही,लोकांना मार्ग दाखवा ,
  त्यांनी काय केले पाहिजे ते त्यांना सांगा,

  खरे पहिले तर तुम्ही मराठ्यांना खालीपणा दाखवण्यासाठी आसा आटापिटा करीत आहात हे तर स्पष्ट दिसत आहे,

  ReplyDelete
  Replies
  1. त्यामुळे आज मराठा समाज (धनगर ते अनेक ओबीसीसुद्धा) दुर्दैवाने भ्रमित होत वैदिक अर्थाने उच्च वर्णीय स्वत:ला मानत असतील तर तो त्यांचा केवळ भ्रम आहे. त्याला कसलीही वैदिक मान्यता मुळातच नाही. वैदिक उच्च-नीचतेच्या तत्वज्ञानाच्या वृथा गारुडातून मूक्त होणे सर्वांनाच आवश्यक आहे.
   you havent reached to end may be...

   Delete
 25. छान लेख आहे सर
  तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी "माझा मराठाचि बोलू कवतिके परी अम्रुतातेही पैजा जिंके" असे म्हंतले आहे यामध्ये मराठा शब्दाचा अर्थ काय ? तो भाषेसाठी घॆतला असेल तर मराठा चे पुढे मराठी कसे झाले याविषयी लिहिलात तर बरे होईल

  ReplyDelete
 26. संजय सोनवनी सर खूप छान विवेचन केले आहे आपण. पण मराठा हे मरहट्टा आणि मराठी हे मरहट्टी या शब्दापासून झाल्याचे वाचायला मिळते.
  मरहट्टी हा शब्दप्रयोग कन्नड़ मध्ये वापरला जातो. पशुपालन करणारे लोक हट्टीजन म्हणून ओळखले जातात. म्हणजेच शेळ्या मेढ्या (मर) गाई म्हैसी चारणारे (हट्टी) यापासून मरहट्टी हा शब्द तयार झाला अन तद्नंतर मरहट्टी चा अपभ्रंश होऊन वरतून मराठी हा शब्द प्रचलीत झाला. पुढे या मरहट्टी (मराठी) व मरहट्टा(मराठा) भाषिकांचा प्रदेश(राष्ट्र) म्हणून आजचा महाराष्ट्र उदयास आला.

  ReplyDelete
 27. lekh apur vatato ajun kahi mahiti jodta / lihita ali asti...

  ReplyDelete
 28. सर लेख शेयर करू शकतो का,,

  ReplyDelete
 29. Aamche sir name Salekar khar aamhi pune jilhyatil bhor taluka yethil aahot jithe shivrayanni Rayreshwar yethe swaraj shapath ghetli ...tr ya talukyatil pratyek maratha ha 96
  Kuli maratha asun navin 96 kuli list madhe aamchya adanavacha ullekh nahiye..yavrunch 96 kuli maratha ji latest list madhe chukichi/bogas mahiti update karnyat aalo aahe

  ReplyDelete
 30. Mi jat manit nahi. Mi ek manus ahe ani sarva mansanche (vadik-avaidik) origin afriket ahe.

  Tatasthapane vichar kela tar, samajamadhe marathyana itar jatsamuh kase wagwatat yavarun tyanche sthan samajte.

  Bramhmanani marathyana shudra mhanle mhanun te shudra tharat nahit. Marathe avaidik asavet parantu mhanje te shudra tharat nahit. Shudra hi ek jamat hoti. Bhatkya vaidikani ya jamatiche nav sarva avaidakana dile. sarva avaidik samaj ha avaidika peksha jast sanmaniy ahe karan tyani vaidikana samaun ghetle. Tyancha nash kela nahi.

  ReplyDelete
 31. The Great Maratha....Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai..

  ReplyDelete
 32. अवघड आहे संदर्भासाठी पोती पुराण कथा घेऊन त्या मध्ये आपल्या मना प्रमाणे शब्दांचे खेळ खेळत भेद निर्माण करायचा. पण कोणत्या आधारावर तर पोती पुराण कथा रामायण महाभारत तुंनच ना ? एक वेळ स्पष्ट करा रामायण महाभारत आम्हाला मान्य आहे. जुन्या भटांनी आपली दुकानादिली बंद करत आणली आहे आणि आता नवभट तयार झालेत. हा..हा...हा...

  ReplyDelete
 33. Ji Kunbyanci 92 kule Ahmadnagar Nizama kade hoti ti 92 kuli. Ji 96 kunbyanchi kule Adilsha kade hoti ti 96 kuli. Maratha hi jaatiwaachak naav 18 wys shatkaat waaprla gela. ingrajaani jaati vargikarnaala suruwaat keli ani tyaat pahilyandaa Maratha hi jaat ase lihile. pan tyanchi loksankhya fakt 4-5% evdich hoti. Karan haa jamindaar warg hota. aata Kunbi suddha swathaa Maratha mhanvtaat.

  ReplyDelete
 34. भारतीयांमध्ये फूट पाडण्यासाठी टॉड ने राजपुतांना सिथीयन सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जो गौरीशंकर ओझा , दशरथ शर्मा सारख्या अनेक मोठ्या भारतीय इतिहासकारांनी सप्रमाण भारतीय सिद्ध केलं आहे . भारत सरकार नं भारतीय जातीचं मुल शोधण्याचं काम रिस्ले मानववंशतज्ञाला दिलं होतं त्यांनीही स्पष्ट निर्वाळा दिला आहे राजपुत हेच प्राचीन आर्य क्षत्रिय आहेत । तुमची काय राजकीय महत्तवकांक्षा आहेत माहित नाही पण त्यासाठी आमचा इतिहास बिघडवू नका शेवटी आम्ही राजपुत आहोत ब्राम्हण नाहीत शांत बसायला ।
  जय राजपुताना

  ReplyDelete