Friday, February 11, 2011

आर्य हे एक मित्थक

(खरे तर या विषयावर मी "हिन्दु धर्माचे शैव रहस्य" हा ग्रंथ लिहिला आहे...पण अजुनही "आर्य" हा वादग्रस्त मुद्दा आहे असे दिसल्याने येथे मी त्यावर थोड्क्यात प्रकाश टाकतो.)

१. आर्य नावाचा कोणताही वंश भुतलावर कधीही अस्तित्वात नव्हता. "आर्य" हा शब्द रुग्वेदात फक्त ३४ रुचान्त ३६ वेळा येतो....आणि तो वैदिक धर्माचे पुरस्कर्त्या राजा सुदास आणि त्याच्या वंशजांना उद्देशुन वापरला गेला आहे. हा शब्द वंश्वाचक नाही.

२. रुग्वेदात वैदिक धर्मीय कोठुन बाहेरुन आल्याचा एकही उल्लेख नाही.
३, या कथित आर्यांनी येथील "मुलनिवासी" दास, दस्यु, असुर इ. जमातींना पराभुत केले व आपली संस्क्रुती लादळी असे दावे केले जातात. पण प्रत्यक्ष या वैदिकांच्या नावातच दास, दस्यु हे शब्द येतात...उदा. सुदास, त्रसदस्यु, दिवोदास इ. वैदिकांची सर्वश्रेश्ठ देवता वरुण याला वारंवार "असुर वरुण’ असे गौरवाने म्हटले आहे तसेच अग्नीलाही "असुर अग्नी" असे म्हटले आहे. म्हणजे वैदिकही कधीकाळी असुर/दास/दस्यु यांच्याशीच निगडीत होते. सुदासाच्या काळात यद्न्यधर्माची सुरुवात झाली...सिन्धु संस्क्रुतीमधील मुर्तिपुजा (लिंग्पुजा) त्यांनी सोदली आणि तसे अनेक उल्लेख रुग्वेदात येतात. शिवाची ते "शिस्न्देव" म्हणुन निर्भत्सना करतांना दिसतात...व्रुषाकपि (हनुमानाचे पुरातन सिन्धु रुप) वेदांत डोकावतो.
४. याचा अर्थ वैदिक आनि शैवजनांत जो विभेद होता तो धर्मिक स्वरुपाचा होता...वांशिक नव्हे.डा, बाबासाहेब आंबेड्करांनीही हेच मत मांडलेले आहे.
५. आजतअगायत आर्य बाहेरुन आल्याचा एकही भौतिक पुरावा कोठेही सापडलेला नाही.
६,. संस्क्रुत भाषा मुळची व त्यातुन प्राक्रुत भाषा निर्माण झाल्या हा एक गैरसमज आहे. प्राक्रुत भाषा ग्रांथिक कारणासाठी विकसित करुन जी परकोटीचे संक्षिप्तीकरण करता येइल अशा पधतीने संस्क्रुत बनवली गेली. ही कधीएही भारतातील बोलीभाषा नव्हती...संस्क्रुत ही शिकावीच लागत असे. फुलपाखरासाठी संस्क्रुतमद्धे प्रतिशब्दच नाही.अशी अनेक उदाहरणे आहेत.
७. ग्रीक भाषेत काही संस्क्रुत/प्राक्रुत शब्द मिळतात...पण त्याचे कारण आर्य वैदिक नसुन सिंधु जनांचा जो विदेश व्यापार होत असे त्यातुन झालेली ही देवाण-घेवाण आहे.
८. हेर्मान याकोबी आणि माक्स-मुल्लर या जर्मन विद्वानांनी प्रथम इंडो-आर्यन ही संद्न्या आणली. हे भाषातद्न्य होते...वंशशास्त्रद्न्य नव्हते. रुग्वेदासारखी रचना करणारे या "अडाणी" देशातील मुळचे असु शकत नाही हा अहंगंडही होताच. त्यांना काय पुरावे मिळाले तर ग्रीक ल्यटीन भाषेत आढळणारे काही शब्द. यावरुन एकदम घाइचे निष्कर्ष त्यांनी काढ्ले. १५-१६ शब्द समान सापडतात म्हणजे युरोपियन आणि भारतातील ब्राह्मण एकाच वंशाचे आणि कोठल्या तरी मुळ प्रदेशातुन त्यांनी स्थलांतर केले असा निष्कर्ष त्यांनी काढला. पण त्यामधील धोका लक्षात आल्यावर माक्स-मुल्लरने आपला सिद्धांत मागे घेतला.
९. पण भारतीय ब्राह्मणानी तो सिद्धांत उचलुन धरला. इतका कि टिळकांनी "आर्क्टिक होम इन वेदा’ज" असा चक्क ग्रंथही सिद्ध केला. यामागे इंग्रज अनुनयाचे धोरण होते. कारण ब्राह्मण आणि इन्ग्रज एकवंशीय ठरत होते....ते ब्राह्मणाना जेवढे हवे होते तसेच इन्ग्रजांनाही. विश्णुशास्त्री चिप्ळुण्कर तर इन्ग्रजांना "आमचे पुरातन आर्य रक्ताचे बांधव..." असे म्हनत.
१०. यामुळे व्यक्तिगत अपवाद वगळले तर ब्राह्मणी संघटना स्वातंत्र्य लढ्यात उतरल्या नाही. आर. एस. एस., हिंदु महासभा ही मुख्य उदाहरणे आहेत. सावरकर तर दुसर्या विष्वयुद्धात सैनिकांनी मोठ्या प्रमणावर भरती व्हावे असा प्रचार देशभर करत होते.
११. याची पुढील प्रतिक्रिया म्हणजे आर्य-द्रविड संघर्ष. दक्षीणेत पराकोटीची हिंसक आंदोलने झाली...हिंदी नाकारली गेली. आर्य जर बाहेरचे तर त्यांनी या देशातुन चालते व्हावे अशा स्वरुपाच्या चळवळी सुरु झाल्या...मुलनिवासी विरुद्ध परकिय ब्राह्मण असा संघर्ष पेटवण्यात आला. आजही तो आहेच...आणि तो इतका पराकोटीचा द्वेषमुलक आहे कि आर्य सिद्धांताला विरोध म्हणजे "भटाळला" अशा शिव्या खाणे.
१२. आजकाल मायकेल बाम्शाद याचा आधार घेत डी. एन. ए. चाचणीनुसार ब्राह्मण (खरे तर त्याने उच्च जातीय हा शब्द वापरला आहे...ज्यात क्शत्रिय-वैश्य सुद्धा येतात.) हे युरेशियन वंशाचे आहेत असे सांगीतले जात आहे. बामशादचे हे संशोधन २००१ मधील आहे. या निष्कर्षासाठी त्याने ६० नमुने तपासले आहेत असा त्याचा दावा आहे. २००४ मद्धे बाम्शाद काय म्हनतो ते पहा,: The success of many strategies for finding genetic variants that underlie complex traits depends on how genetic variation is distributed among human populations. This realization has intensified the investigation of genetic differences among groups, which are often defined by commonly used racial labels. Some scientists argue that race is an adequate proxy of ancestry, whereas others claim that race belies how genetic variation is apportioned. Resolving this controversy depends on understanding the complicated relationship between race, ancestry and the demographic history of humans. Recent discoveries are helping us to deconstruct this relationship, and provide better guidance to scientists and policy makers.

१३. २००६ साली national Institute of Biologicals या राष्ट्रीय संस्थेने ३२ आदिवासी जमाती आणि ४५ जातीन्चे सर्वेक्षण केले आणि हे सिद्ध केले कि युरोपियन रक्तसंबंध अभावानेच आढळतो.
१४. २००९ साली सेंटर फ़ोर सेल्युलर आणि मोलेक्युलर बायोलोजी (हैद्राबाद) या संस्थेने हार्वर्ड मेडिकल स्कुल इ. अशा तीन अमेरिकन संस्थांच्या सहाय्याने व्यापक सर्वेक्षण केले व त्यांचा निष्कर्ष असा होता कि भारतातील कोणत्याही जातींत जेनेटिक फरक नसुन त्या भारतातीलच मुळच्या आदिम जमातींतुन विकसीत झाल्या आहेत. आर्यन आक्रमण वा घुसखोरीशी काही संबंध नाही.
१५. द्न्यान पुढे जात असते. सिंधु संस्क्रुती उजेडात येण्यापुर्वी भारताचा इतिहास हा फक्त वैदिक काळापर्यंत मागे जात होता. १९२० साली ती उजेडात येताच सारी समिकरणे बदलली. २००१ साली बामशाद याने जे मत निरिक्षण मांडले ते अपुर्या अर्ध-विकसीत साध्नांवरुन. २००९ सालचा रिपोर्ट मात्र काही मडळी लक्षात घ्यायला तयार नाहीत हे स्पष्ट आहे आणि त्यात मुलनिवासीवादीच आहेत असे नव्हे तर आर्य गंडाने बाधीत ब्राह्मणही आहेत.
१६. आर्य सिद्धांताने भारताचे पराकोटीचे वाटोळे केले आहे...आताच त्यापासुन बोध घ्यायला हवा नाहीतर भारतात एक वांशिक तणाव निर्माण होत त्याची परिणती सर्वविनाशात होइल.

मी येथे फार थोडक्यात मुद्दे मांडले आहेत...काही शंका असतील तर विचाराव्यात वा स्वतन्त्र संशोधन करावे. मी त्याचे स्वागतच करेल...पण द्वेषमुलक...फक्त सोयीचे संशोधन स्वीकारणे मला पुर्ण अमान्य आहे हेही क्रुपया लक्षात घ्यावे.

26 comments:

  1. ऋ अक्शर टाईप करण्यासाठी शिफ्ट+आर दाबून नंतर यू दाबावे[बाराह लिपी डाउनलोड करावी].

    ReplyDelete
  2. यामुळे व्यक्तिगत अपवाद वगळले तर ब्राह्मणी संघटना स्वातंत्र्य लढ्यात उतरल्या नाही. आर. एस. एस., हिंदु महासभा ही मुख्य उदाहरणे आहेत. सावरकर तर दुसर्या विष्वयुद्धात सैनिकांनी मोठ्या प्रमणावर भरती व्हावे असा प्रचार देशभर करत होते.
    -----------------------------------------------

    कृपया हे समजून घ्या की सावरकरांचे सैन्य भरतीचे आवाहन आणि आर्य सिद्धांत याचा काहीही संबंध नाही.१९४२चा लढा म्हणजेच फक्त स्वातंत्र्यलढा नव्हे.भारतीयांनी सैनिकी प्रशिक्शण घ्यावे आणि आझाद हिंद फौजेस मदत करावी असा हेतू सैनिक भरतीच्या आवाहनामागे होता.आझाद हिंद सेनेचा लढा हा स्वातंत्र्य्लढा नव्हता काय?
    याच कारणासाठी संघानेही सैनिकभरतीचे आवाहन केले होते.एस.एम.जोशींच्या आत्मचरित्रात संघाने तसे आवाहन केले होतेase mhaTale aahe..
    १९४२च्या लढ्यात आंबेडकरही नव्हते.
    सुभाषबाबू सावरकरांना भेटून गेल्यानंतरच रासबिहारी बोस यांनी ्स्थापन केलेल्या आझाद हिंद संघटनेस जाऊन मिळाले.

    संदर्भ:
    समग्र सावरकर वांग्मयातील नेताजी सावरकर भेटीवर सावरकरांनी स्वत: लिहिलेला लेख.
    राम शेवाळकर यांचे www.savarkar.org वरील भाषण.या भाषणात त्यांनी एका जपानी लेखकाचा संदर्भ दिला आहे.जपानी लेखक आाद हिंद सेनेच्या स्थापनेबाबत म्हणतो,”veer saavarkar's militarisation strategy started taking shape.''
    सोनवणीसाहेब,सावरकरांबाबत आपले खूप गैरसमज आहेत.कृपया समग्र सावरकर वांग्मय मुळातून वाचावे.
    मुंबईच्या जपानी बुद्धविहारातील भिक्खु सावरकर आणि रासबिहारी बोस यांच्यातील संदेशांचे आदान प्रदान करीत होते.
    कृपा करून केवळ ४२च्या लढ्यात सामील झाले नाहीत म्हणून तोच तोच आरोप पुन्हा पुन्हा संघ आणि सावरकरांवर करू नये.

    ReplyDelete
  3. संघ आर्यसिद्धांत मानतो हे आपले आवडते मत आहे.आपल्या संपर्कात आलेल्या ब्राह्मणी विचारांच्या स्वयंसेवकांमुळे आपले संघाविषयीचे मत तसे बनले आहेत.
    परंतु आर्य हे मूळचे भारतीयच असल्याचे मी सर्वप्रथम संघाच्या विवेक साप्ताहिकातच वाचले.गोळवलकर गुरुजींचे विचारधनही तेच सांगते आणि संघाचे तेच अधिकृत मतही तेच आहे.आमच्या गावात संघाचे कार्यक्रम ब्राह्मणेतरच चालवतात.

    ReplyDelete
    Replies
    1. स्व:ताच्या चुकिवर पांघरून घालायला काही लोक सदैव मोकले असतात

      Delete
    2. mala he mahit aahe ki aarya he bhartabaherche asuch shakat nahit. watavarnacha jo aadhar yasathi ghetla jatoy to agdi nirthak aahe. karan 30 - 35 hajar varshanpurviche watavaran aani aajche watavaran yat farak padnarch.vaidnyanikani pn he siddh kele aahe hi pruthvicha aas sarkar asto . ! aani jari aarya baherun aale he swikaraychch zale tari mg tyanche 1000 vela aabhar manayla hawet.

      Delete
  4. टिळक आणि चिपळूणकर म्हणजे सर्व ब्राह्मण नव्हेत.याच टिळकांनी नंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा केली.कांग्रेसलाही आंबेडकर आणि जेधे जवळकर ब्राह्मणी संघटनाच म्हणत.साम्यवादीही४२च्या लढ्यात सामील झाले नाहीत.महात्मा फुले तर इंग्रजांना बळीचे वंशज म्हणत.
    मंगल पांडे,नानासाहेब पेशवे,चंद्रशेखर आझाद,राणी लक्श्मी,विनोबा भावे,एसेम जोशी,नाना गोरे,काका कालेलकर,आसुदेव फडके,नेहरू,इंदिरा गांधी,....ही नांवे अपवाद आहेत काय?

    ReplyDelete
  5. संघाने संघटना या नात्याने स्वातंत्र्यलढ्यातच काय,अगदी रामजन्मभूमी आंदोलनात नाही.रामज्न्मभूमी आंदोलन लढवले ते विश्व हिंदू परिषदेने.अर्थात संघाचे स्वयंसेवक वैयक्तिकरीत्या विश्व हिंदू परिषदेत कार्य करतात तसे स्वातंत्र्य लढ्यातही करीत.हेडगेवारांनी स्वत: २ वेळा तुरुंगवास भोगला आहे.सावरकर १९१० ते १९३७ असे प्रदीर्घ काळ वेगवेगळ्या कैदेत होते.सावरकरांनी वेळोवेळी ब्राह्मणाम्नी जात मोडण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले असताना त्यांना आपण ब्राह्मणी विचाराचे का म्हणता?

    ReplyDelete
  6. फुले,शाहू,आंबेडकर या तिघांपैकी कोणीही स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्श भाग घेतला नाही.ते एकही दिवस तुरुंगात गेले नाहीत.फुले इंग्रजाम्ना बळीराजाचे वंशज समजत तर शाहू महाराज हे स्वत:स आर्य समजणारे आणि आर्य सिद्धांत मानणारे होते.त्या न्यायाने त्यांनी इंग्रजांना बांधव म्हटले आहे.बाबासाहेबांनी मात्र फक्त आर्यसिद्धांतच खोडला असे नव्हे तर शूद्रांनी पूर्वी ब्राह्मणांवर अत्याचार केल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे.[शूद्र पूर्वी कोण होते,शेवटचे प्रकरण]

    ReplyDelete
    Replies
    1. Shame on......
      Mejor saheb apan ambedkar ani phule yanche vichar vachlele distay.
      tari sudha apan fule kinva ambedkar svatantra ladhyat sahabhagi navte he agdi oradun oradun sangtay.
      ha kontya prakarcha gand ahe aplya manat?
      Dr.Ambedkaranche simon commision madhale karya ka apan najread karta??????

      Delete
  7. कांग्रेसचे,साम्यावादी पक्शांचे,समाजवादी पक्शाचे नेतेही ब्राह्मणच होते.मग हिंदुमहासभा आणि संघच कसे फक्त ब्राह्मणवादी ठरतात?मला दुसर्या बाजीरावापेक्शा महादजी शिंदेचा अधिक अभिमान वाटतो असे म्हणणारे सावरकर ब्राह्मणवादी कसे काय ठरतात?सावरकर आर्य्सिद्धांत मानत असल्याचा कोणता पुरावा उपलब्ध आहे?सावरकरांनी स्वत:च्या मुलांच्या मुंजी केल्या नाहीत.शिवाजी महाराजांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हटलेले सावरकरांना आवडत नसे.त्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे.

    ReplyDelete
  8. Netaji in his speech on Azad Hind Radio (June 25, 1944) acknowledged Savarkar's perspicacity in these words: "When due to misguided political whims and lack of vision, almost all the leaders of Congress party have been decrying all the soldiers in Indian Army as mercenaries, it is heartening to know that Veer Savarkar is fearlessly exhorting the youths of India to enlist in armed forces. These enlisted youths themselves provide us with trained men and soldiers for our Indian National Army.नेताजींनी अशा प्रकारे स्वत:च सावरकरांचे योगदान मान्य केले आहे.कोई माने या ना माने...

    ReplyDelete
  9. संजयजी, आपण लिहिलेले 'हिंदू धर्माचे शैव रहस्य' हा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. त्यात आपण ब्राम्हणांचा चालूपणा व्यवस्थित पणे उघड केला आहे. प्रत्येक हिंदूने हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे मला वाटते. ब्राम्हण म्हणजे हिंदू धर्मातील 'लाडाने बिघडलेले पोर' आहे. काही झाले तरी 'माझेच म्हणणे खरे' आणि यांच्या मनासारखे झाले नाही तर आरडा-ओरडा , कांगावा करण्याची त्यांना सवय आहे. त्यासाठी ते काहीही 'तर्कट' लढवतील. असो.
    असे लिखाण करून आपण जे समाज प्रबोधन करत आहात त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे ! आपले हार्दिक अभिनंदन !

    ReplyDelete
  10. सारंग महाशय,काही ब्राह्मणांच्या चुका संपूर्ण ब्राह्मण समाजावर आरोपित करू नका.एका विशिष्ट व्यक्तीतही काही चांगले आणि काही वाईट गुण असतात.तसेच समाजातही असते.गांधीजी लाख चांगले होते पण त्यांनी पाकिस्तान काश्मिरमध्ये भारताशी लढत असताना भारताने पाकिस्तानला५५ कोटी रूपये द्यावेत म्हणून उपोषण केले.हे एक राष्ट्रविघातक कृत्य होते पण म्हणून गांधीजींच्या इतर सद्गुणांकडे दुर्लक्श करता येत नाही.त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजाच्या राष्ट्र उभारणीतील योगदानाकडे दुर्लक्श करता येत नाही.

    ReplyDelete
  11. You have said

    ही कधीएही भारतातील बोलीभाषा नव्हती...संस्क्रुत ही शिकावीच लागत असे. फुलपाखरासाठी संस्क्रुतमद्धे प्रतिशब्दच नाही.अशी अनेक उदाहरणे आहेत.

    the website

    http://spokensanskrit.de/index.php?script=HK&tinput=butterfly&country_ID=&trans=Translate&direction=AU

    clearly gives the word for butterfly, thus making your assertion wrong.

    Your overall work is very good, I must say.

    ReplyDelete
  12. sanjayji, maratha ani boudh ya tikhat vicharachya kahi lokanchya atiwadi vicharanmule pragatishil mhanvinaryanchya mage laglyawar ji awastha hote, tashya awasthela tumhi pohochale aslyache watate. Racist ani Fascist yanchya garadyat tumhala kahi vel sukhakarak watel. pan kharya lokshahit jo mokala swash gheta yeto to tumhala racist ani fascistanmadhe adhik awshyak watel. tumhi konache prabodhan karayala nighale te lakshat ghene awshyak watate. jyana muskatdabi and hisacharashiway (malegaon, samzouta express)dusari bhasha yet nahi, tyana tumhi vichar sangat ahat. jara houn jau dya malegaon, samzouta war charcha.

    ReplyDelete
  13. Milind ji, lavakarach majhe "Vaidikancha dahashatvad ani dahashatvaadaachi rupe" he pustak yet ahe. Konachyahi gotat janyacha prashn nahi. Maratha ani Bouddhancha, te tikhat ahet mhanun mulich rag nasun tyana je nete bharakatavatat ani tyanche antata nukasan karatat tyache vait vatate. Phule, Ambedkar kharya arthane sarvach samajasamor yevu dilech jat nahit to ek prashnach ahe.

    ReplyDelete
  14. @ डा.मेजर मधुसूदन चेरेकर phule shahu ambedkar yanchi ladai tyaweles hindu samja madhali rudi parmpara barobar hoti.... brtisha peksha julmi gulamgiri hi ithlya dalit samaja la hoti... tymule aadi aaplya samja madhali ghan kadane he mahatvwache hote... rahila prashna ambedkara ni desha sathi kay kele... aajchi lokshai tyni lihilelya swatantra, samta bandhuta he tatwawar adharit aahe...

    ReplyDelete
  15. डा.मेजर मधुसूदन चेरेकर तुमची तुमच्या समाजाप्रती तळमळ समजू शकतो. पण सावरकरानी कधी स्व:त बदूंक चालवली नाही. फक्त कारावास भोगला,त्यातुनही सुटकेसाठी इंग्रजांना काही वेळा माफिनामे लिहुन दिले. फुले-शाहू-आंबेडकर ही माणसेच होती,तुमच्या कुठल्या देवाचा अवतार नव्हते. त्यामुळे काही वेळा समाजहितासाठी विचार मांडताना तडजोडी कराव्या लागतात.

    ReplyDelete
    Replies
    1. किती दुतोंडीपणा आहे हा???? ;)

      Delete
  16. May due due to less reading and analysis I am not able to derive that is Aryan theory correct or not? Because Babasaheb Ambedkar also supported this theory, Bhalchandra nemade also refered this in novel "Hindu" (I am aware that it is not history book.

    ReplyDelete
  17. aviraj planet mi sangu icchito ki sawarkar brahman hote vedik nusar dnyan dene prabodhan karne brahmanache kam ahe. ani rajya sambhalane ladhai karane he kshatriyache kam ahe.

    ReplyDelete
  18. ladhai karnyasathi bharkatlelyana ekatra ananesuddha mahatwache asate

    ReplyDelete
  19. आमची लढाई ही स्वातंत्र्य साठी आहे , आमची लढाई बहुजन माणसाच्या आर्थिक आणि राजनैतिक सत्तेसाठी नाही आहे , आमची लढाई आहे ही माणसाच्या मानव व्यक्तित्व उद्धारासाठी . आणि तसेच हिन्दू सामाजिक व्यवस्थेत विकृति म्हणून ती दाबली गेली आहे. ---- परम पूज्य भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

    ReplyDelete
  20. अतिशय उत्तम लिहल आहे , आर्य हि वांशिक पदवी नाही पण भावा .. आर्यांनी यज्ञा केले पाहिजेत असा तरी कुठ नियम आलाय ? जटायू , हनुमान हि वनात राहणारी लोक त्यांना सुद्धा आर्य पदवी वापरण्यात आली आहे .
    हे तुंम्ही साफ दुर्लक्षित केल , वाशिस्थ आर्य पदवी बद्दल लिहताना म्हणतात .. जो चुकीच्या गोष्टी सोडतो, चांगल्या गोष्टी आत्मसात करतो , प्रकृतीन दिलेल्या आयुश्यातील जवाबदार्या योग्य रित्या पार पडतो तो उत्तम मनुष्य आर्य आहे .
    आणि भाव खरा इतिहास पहा शिव हे आर्य देवत आहेत , त्यांचा वेगळ्या संस्कृतीशी संबंध होता असा काही पुरावा नाही . यज्ञा तील स्तूप पूजेतून शिवलिंग पूजा पुढे आले , शिस्न्देव हा काही अपमान नाही शिश्न उत्पत्ती साठी वापरलेलं आहे ज्यातून उत्पत्ती होते तो देव .
    असुर हा जेव्हा इंद्र , अग्नी, वरून, रुद्र यांच्या साठी आला आहे तो बलाढ्य या अर्थान आला आहे . दैत्यकाय म्हणजे प्रचंड आकाराचा .. मोठ्ठे मोठ्ठे दात असलेला ,हातात झाड उचलून चालणारा माणूस न्हवे. का उग संस्कृत न समजून घेता अर्थाचा अनर्थ करताय .

    .... आर्य हरीतेजम

    ReplyDelete
  21. mejar madhusudan saheb shahu phule babasahebani turungavas bhogla nahi aho pan tya turungvasapeksha khadtar shiksha hi tumachya nich rudhine dili na tyana aho babasahebani tar akkh ayushy vechal samajasathi jo gavabaherr rahanarya samjala tyani gavat anal ani ya deshasathi kai nai kel ya deshachi gghatna kai tumchya lokani lihali babasahebani hindu kod bill lihal konasathi fakt amachyasathi ka nahi saheb babasahebani sarya bharatasathi kel pan bharatane kai dil tyana tyanchya samajala tumhi swata tumachya samajachi baju gheta sarv brahmanana doah nahi det amhi pan jyani te kel te amhi kadhich visaru saknar nahi

    ani brahmanani kai kel jativyavastha pasaravanyachi kame

    ithe madhe koni tari comment keliy kshatriyani deshach rakshan karanyasathi alet konta kshatriy manus ahe jo aaj ya bhar deshat simevar ubha ahe
    ya deshachi bataliyanahi amha bahujanachi ahe bharatati' laskaramadhil,pramukh bataliyan hi vahujanachi ahe

    ani mejar saheb sahu fule ambedkarana turungvas bhogla nahi ase mhantana thoda vicharr kara tumhi nakki itigas vachata ki koni sangitalela ekata
    kai paristhiti hoti

    savrkar he brahman hote
    mhanuntyancha dvesh nahi tyani kadhi bahujanala sobat ghevun nahi bahujanala kadhich sahara nahi dila aajparyant peshavyachi udo udo karanare tumhi babasaheb kai he kai samjanar

    ya deshach itihas baghitala tar dolyat pani yet saheb kase jagalet lok bagha nit

    tumhi nusta ata baghatay pan kadhi bhutkal pahilat na mag samjel

    ReplyDelete
  22. आजची परिस्थिती आणि बाराव्या ते विसाव्या शतकातील परिस्थिती यात जमिन अस्मानाचा फरक आहे. इतिहासाचा अभ्यास करायचा तो भुतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. पण ते न होता जर एकमेकांवर शिंतोडे उडविण्यासाठी असा अभ्यास केला जात असेल तर त्याने अख्ख्या समाजाचे नुकसान होणार आहे. आतापर्यंतच्या सर्व पोष्ट पाहिल्या तर स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक असोत वा महात्मा फुले, राजर्षि शाहु छत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर; यांच्यावर अतीव स्तुती वा अतीव निंदा केलेली दिसते. देशासाठी या सार्‍यांचेच योगदान मोलाचे आहे. जर यांच्यापैकी कोणाहीकडुन आपल्या कृतीत वा उक्तीत वा विचारात चुका झालेल्या असल्या तरी त्यावर टीका करणारे तुम्ही आम्ही कोण हा प्रश्न आपण स्वत:लाच विचारायला हवा. आजच्या परिस्थितीला सर्व भारतीयांनी एकत्र राहणे ही खरी गरज आहे. ते कसे होईल याचा विचार व्हावा. माझ्यापुरते मी एव्हढेच लिहितो की माझा सर्व थरांतील लोकांशी संपर्क येतो. माणसातच सुष्ट व दुष्ट प्रवृत्तींची सरमिसळ आहे, तेव्हा मनुष्यनिर्मित सर्वच तथाकथित जातीजमातीत ते राहणारच, जर व्यक्तिश: प्रत्येकानेच आपल्या विचार, उक्ती आणि कृतीमध्ये सुधारणा घडवली तरच समाज सुधारेल. उगाच गतकाळातल्या समाजधुरिणांवर टीका करत राहण्यात अर्थ नाही.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...