मला काल (२६ मार्च) औरंगाबाद येथील प्रियदर्शी अशोक अकादमीसह विविध जिल्ह्यांतील १७ फुले-शाहु-आंबेडकरवादी संघटनांनी आयोजित केलेल्या "फुले-आंबेडकरांचा जातीअंताचा विचार आणि वर्तमान चळवळीचे वास्तव" या विषयावरील परिसंवादास उपस्थित रहाण्याचे भाग्य मिळाले. मी "भाग्य" हा शब्द अशासाठी वापरत आहे कि चळवळीचे परिसंवाद म्हनजे शिविगाळीचे, ब्राह्मणांवरील न संपणा-या आरोपांचे पाढे वाचत बसण्याचे अड्डॆ असतात असाच माझा अनूभव आहे. परंतू असे काहीएक न घडता (कोणीएका बहुजनीय चळवळीतील कार्यकर्त्याने प्रा. हरी नरके यांच्या भाषणाच्या वेळीस १-२ मिनीट केलेला गोंधळ वगळता) ही चर्चा अत्यंत मुलगामी, आत्मचिंतनात्मक, सैद्धांतिक मांडणी करत, भूत, वर्तमान आणि भविष्याची वाटचाल यावर अत्यंत प्रगल्भ, विद्वेषरहित चिंतन करणारी झाली. यामुळे बहुजनीय विचारवंत फुले-आंबेडकरांनंतर जी वैचारिक/सैद्धांतिक पोकळी निर्माण झाली आहे असा जो भ्रम निर्माण करण्याचा ज्या "शिव्यावादी" मंडळीने चंग बांधून चळवळच बदनाम कशी होईल आणि सर्वच सामाजिक स्तर तिचा द्वेष कसा करतील यासाठी वैद्वेशिक वातावरण निर्माण करत ती संपवण्याचा प्रयत्न करणा-या सरंजामशाही मनोव्रुत्तीच्या संघटनांच्या विरोधात मतैक्य करत ती द्वैषिक पोकळी भरून काढण्यास केवढे समर्थ आहेत याची प्रचिती आली, आणि त्यांना तेवढेच सामर्थ्य देणे ही सा-याच समाजाची जबाबदारी आहे याची जाणीवही झाली. खालील मजकुर हा माझे या परिसंवादाचे समग्र आकलन आहे, हे क्रुपया लक्षात घ्यावे.
बहुजनीय चळवळ बदनाम झाली आहे आणि तिचे पडसाद सर्वच सामाजिक स्तरांतुन येत आहेत हे एक वास्तव आहे. संभाजी ब्रिगेड आणि वामन मेश्राम प्रणीत बामसेफ़ वा भारत मुक्ती मोर्चा हेच काय ते एकमेव बहुजन-उद्धारक आहेत असा आव आनत ब्राह्मणांना शिव्या देणे म्हणजे बहुजनीय चळवळ असा नव-सिद्धांत बनवत समाजाला एका नव्या वांशिक आणि जातीय तणावाला सामोरे जाण्यास भाग पाडत नव-हिटलरशाही आणण्यअचा प्रयत्न कसोशीने करणा-या मंडळीनेही खरे बहुजनीय मतप्रवाह समजावून घेतलेले नाहीत हे एक दुर्दैवी वास्तव आहे.
या मंडळीचा नव-इतिहास फक्त जातीय द्रुष्टीकोनातुन लिहिला जातो आहे...जणु काही इतेरेजणांचा काहीच इतिहास नाही. असला तरी जणु तो काही सरंजामदारांच्याच वर्चस्वाखालील होता...ही जी नवी ऐतिहासिक मांडणी हे नव-सरंजामदार करत आहेत त्यावर प्रश्नचिन्ह उठणे स्वाभाविक आहे. ब्राह्मणांचा द्वेष शिकवत हीच मंडळी इतिहासातील आपली पापे लपवण्याचे अश्लाघ्य प्रयत्न तर करत नाहित ना असा प्रस्य्ह्न उद्भवला आहे. म्हणजे ब्राह्मणवाद जेवढा घातक होता तेवढाच हा त्यांच्याच वाटीने पाणी पिणारा राज्यसत्ता आणि अर्थसत्ता गाजवणारा समाज होता. प्रा. हरी नरके यांनी मनुस्म्रुतीतील श्लोक उद्ध्रुत करत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना विविध जन्मजात आरक्षणे उतरंडीनुसार दिली असली तरी शुद्रांना दिलेले एकमेव आरक्षण म्हणजे सर्वच उच्च-वर्णीयांची कोणतीही कुरकुर न करता, विना-मोबदला सेवा करणे हे होय. आरक्षण व्यवस्थेचे प्रवर्तक शाहु -आंबेडकर नसुन मनू होता असे मत त्यांनी त्यांच्या अध्यक्षिय भाषणात मांडले.
मग जाती-व्यवस्था निर्मितीची नेमकी कारणे कोणती?
हा प्रश्न भारतीय परिप्रेक्षात एकमेवद्वितीय आणि आजही आस्तित्वात असलेल्या जाती-व्यवस्थेसंदर्भात उठणे स्वाभाविक होते आणि त्यावर या परिसंवादात अत्यंत मुलगामी अशी चर्चा झाली. जाती व्यवस्थेचे निर्मिक-कारण ब्राह्मणी व्यवस्था होती कि ती विशिष्ठ सामाजिक रचनेमुळे निर्माण झालेली एक अपरिहार्य स्थिती होती यावर समाजशास्त्रीय चर्चा जगभर होत राहिलेली आहे. मा. प्रा. डा. प्रतिभा अहिरे यांनी या विषयाला हात घालत एक वेगळीच स्त्रीवादी उंची दिली आणि त्यांचे विश्लेशन हे जातीव्यवस्थेकडे पहाण्याचे एक वेगळे परिमाण देते.
हिंदू समाजव्यवस्था ही मुळात पुरुषप्रधान आहे आणि जाती असल्या तर त्या फक्त पुरुषांच्या आहेत. हिंदु स्त्रीयांना मुळात जातच नाही मग ती कोणत्याही वर्ण वा जातीतील असो. पुरुषाच्या (पित्याच्या) जातीवरुन मुलांची जात ठरते त्यामुळे स्त्रीयांना पुरुषसत्त्तक पद्धतीत
असले तर फक्त गुलामाचे स्थान असते. आणि ते खरेही आहे. प्रा. प्रतिभा अहिरे यांनी स्त्रीवादी भुमिकेतुन जातीव्यवस्थेचे जे विवेचन केले ते सर्वच हिंदु म्हनवणा-या स्त्रीयांचे आक्रंदन आहे. मग त्या ब्राह्मण असोत कि अन्य कोणी. स्त्रीयांना ख-या अर्थाने समता प्रदान करणे हेच जाती-अंत घडवून आणन्यातील महत्वाचे साधन ठरेल. . पुरुषसत्ताक पद्धतीतुन स्त्रीयांची मालकी ही परिवार, नातेवाईक यांचीच रहावी या भावनेतुन जाती बनत गेल्या आणि त्या कायम राहिल्या यामागे "स्त्रीयांची मालकी" हीच भावना केंद्रस्थानी होती असेही त्या म्हणाल्या
भारतात जातीयतेचे चटके बसले नाहीत असा एकही माणुस सापडणे अशक्य आहे. जातीच्या आधारावर चांगला-वाईट ठरवता येत नाही. जातींचे स्वर्थ हे सार्वत्रिक आहेत. फुले-आंबेडकर चळवळीतही स्वार्थी लोक घुसले आहेत. ही चळवळ तात्विक पातळीवर नेण्यात अशांना कसलाही रस नसतो. त्यांना सत्यशोधन म्हणजे नेमके काय हे समजत नाही. दांभिक आंबेडकरवाद्यांची गर्दी वाढत आहे. कोण प्रतिगामी आणि कोण पुरोगामी हे जातीवर ठरत नसून मानसिकतेवर ठरते. "जय भीम" म्हटल्याने कोणी आंबेडकरवादी ठरत नसुन अशांची मानसिकता तपासूनच त्यांच्या सचोटीबद्दल निर्णय घ्यायला हवा असेही विविध वक्त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जातीतही जागतिकिकरणामुळे एक वर्गव्यवस्था निर्माण झाली आहे. पुरातन काळापासुन होणारे आर्थिक विषम वाटप (संपत्तीची निर्मिती अणि त्याबदल्यात मिळना-या बलुत्याच्या मोबदल्यातील अंतर.) हे सामाजिक -हासाचे कारण बनले आहे. आता ही स्थिती बदलली असली तरी जी नवीन वर्गव्यवस्था इर्माण होत आहे त्यातुन नवे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत, पण तरीही त्यातुन जाती-उन्मुलन होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. आत्मकथने, कथा कवितादी साहित्य जातीय साच्यांत अदकले आहे.
फूले-आंबेडकरवाद आता पुन्हा तपासायला हवा. त्यावर आधुनिक परिप्रेक्षात चिंतन करायला हवे कारण फूले-आंबेडकरांनी तत्कालीन स्थितीत आपली सैद्धाईतिक मांडणी केली होती, आता स्थिती पराकोटीची बदलली आहे असेही वक्त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. नरके यांनी आपल्या भाषणात अधिक स्पष्ट भुमिका घेत चलवलीत घुसलेल्या सांस्क्रुतिक दहशतवादी प्रव्रुत्तींचा थेट नावे घेत प्रहार केले. जे मुळात सत्ताधारी वर्गाचे आहेत, होते अशांनी फुले-आंबेदकर चळवळीचे अपहरण करत ते ठरवतील तेच फुले-आंबेडकरवादी आणि जे विरोधात जातात ते फुले-आंबेडकरांचे शत्रू असा प्रचार सुरु केला आहे. श्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तिकांतील अर्पणपत्रिका आणि अनेक उतारे त्यांनी वाचुन दाखवले. त्यातील समाजात भयंकर जातीद्वेष पसरवण्याचा, आणि मराठा समाजानेच नेत्रुत्त्व करत बहुजनांना हाती धरुन ब्राह्मणांनांविरुद्ध दंगली घडवण्याचा पुरस्कार करनारा उताराही त्यांनी वाचुन दाखवला. जेम्स लेनला आणि मनोहर जोशींना पुस्तिका अर्पण करणारे कसे शिवभक्त होतात आणि इतरांना ब्राह्मण द्वेष शिकवतात असा प्रश्न विचारुय्न ते म्हणाले कि अशा मंडळीमुळे चळवळ मुख्य उद्दिष्टाकदुन भरकटवण्याचा प्रयत्न होत असुन खरे तर यामागे राजकिय उद्दिष्टे आहेत. फुले-आंबेदकरांनी असा जातीद्वेष शिकवला नसुन त्यांनी समविचारी ब्राह्मणांना बरोबर घेतले होते. त्यांचा विरोध हा ब्राह्मणी व्यवस्थेला होता...सरसकट सर्वच ब्राह्मणांना नव्हे हे सांगीतले जात नाही, त्यामुळे फुले-आंबेदकरी चळवळ बदनाम होते आहे. वामन मेश्राम यांच्या भारत मुक्ती मोर्चाचे मुखपत्र "मुलनिवासी नायक" हे गेली ६ महिने प्रा. नरके यांची अत्यंत अश्लाघ्य पातळीवरून बदनामी करत असून त्याचा समाचार घेतांना प्रा. नरके म्हणाले अशी व्रुत्तपत्त्रे कोणत्या फुले-आंबेडकरवादाचा टेंभा मिरवतात? धादांत खोटे छापत त्या व्रुत्तपत्राने केलेल्या बदनामीबद्द्ल मी त्यांच्या विरुद्ध फौजदारी कार्यवाही करणार आहे.
खेडेकर आणि मेश्राम हे जातीय दहशतवादी असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले कि जाती-अंताच्या लढाईत अशीच काही मंडळी अदथळे आणत आहेत. मराठा आरक्षनाला विरोध का हे स्पष्ट करतांना ते म्हनाले कि घटनात्मक तरतुदी न पहाता ही मागणी केली जात आहे. शोषित-वंचितांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आरक्षण असुन त्यातीलही वाटा हडप करण्यासाठी ही चाल आहे. थोडक्यात ख-या बहुजनांना पुन्हा गुलाम बनवण्याचा हा प्रयत्न आहे. ब्राह्मणी सत्ता आणि मराठ्यांची राजकीय सत्ता यातील ही युती असून बहुजनीय लढा आता या दोन्ही प्रव्रुत्तींविरुद्ध असायला हवा तरच चळवळ प्रगती करेल असेही ते म्हणाले. चिकित्सा नाकारणे चुकीचे असून नव्या स्थितीत नवे आकलन करुन घेणे गरजेचे आहे. वामन मेश्राम आणि खेडेकरांनी सातत्याने शिवीगाळ, विद्वेष म्हनजेच फुले-आंबेदकरवादी चळवळ असे समीकरण रुढ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे...फूले-आंबेदकरांचे तत्वद्न्यान संपले आहे अशी भावना त्यामुळे निर्माण केली जात असून चळवळीकडे पहाण्याचा द्रुष्टीकोन दुषित होत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
या परिसंवादाचे मी स्वागत करतो कारण प्रथमच मला खरे फुले-आंबेदकरवादी भेटले, आणि त्यांची संख्या अफाट असल्याचेही जाणवले. अत्यंत ठाम-स्पष्ट सैद्धांतिक मांडणी करणारे, वर्तमानाचे परखड विश्लेशन आणि भविष्याचा, कसल्याही प्रचारकी भूमिका न घेता, वेध घेणारा हा परिसंवाद होता. ज्यांचा कसलाही अभ्यास नाही, नवे संशोधन नाही, चळवळीसाठी आवश्यक अशी सैद्धांतिक मांडणी नाही, विद्वेष ओकणे म्हणजे चळवळ असा समज करून घेनारे हे खरे फुले आंबेदकरवादी नसून खरी चळवळ त्याहीपार फार मोठी आहे या वास्तवाचे मला भान आले. फक्त या मंडळीने गरळी ओकण्याचा धंदा केला नसल्याने मुख्य प्रवाहाला त्यांचे भान नाही वा जानीवही नाही ही खेदाची बाब आहे. या परिसंवादात भाग घेणारे डा. प्रा. उत्तम अंभोरे, प्रा, डा. उमेश बगाडे, प्रा. डा. प्रतिभा अहिरे, प्रा. डा. श्रावण देवरे आणि प्रा. डा. संजय मुन यांचे मी मन:पुर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या आणि त्यांच्याच स्वतंत्र विचार करणा-या आणि अंतिम उद्दिष्टाचे भान बाळगणा-या सर्वच समद्धेयी मंडळीला शुभेछ्छा देतो. सर्वच समाजाने त्यांचे स्वागत करायला हवे. केवळ एखादी वैचारिक भुमिका आहे म्हणुन त्याला संपवण्याची भाषा करणा-या प्रव्रुत्तींचा मी निषेध करतो. ही नवी सरंजामशाही असुन ती समाजाच्या हिताची नाही. खरी चळवळ ही नेहमीच सत्य आणि समतेच्या वैश्विक सिद्धांतावर आधारीत असते, तीला राजकिय पैलु असणे हे विघातक ठरते. ज्यांना हिटलर हाच एकमेव आदर्श वाटतो (मग त्या ब्राह्मनी संघटना असोत वा काही बहुजनीय,) त्यांचा धि:कार सर्वांनीच केला पाहिजे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता
वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
सर , खरे पाहता ..... संभाजी ब्रिगेड ला , मराठा सेवा संघाला जे संघाला जे सांगायचं आहे ते सांगून झालाय ...
ReplyDeleteइतिहासात जातीने जर जातीवर आक्रमण केले असेल तर
आणि स्वताच्या इतिहासतल्या चुका लपवून ठेवल्या असतील तर
आणि जे घडल नव्हत तेही इतिहासात दाखवलं ...
तर त्याचं काय चुकल
जयभिम सर,
ReplyDelete१००% सहमत.
मराठा समाजानी आरक्षण मागण्याचा मुख्य हेतु स्पष्ट १००% बरोबर मांडला, अन पटला.
मराठा हा खरा जातियवादी आहे. ब्राह्मणाचे अनपेड पोलिस म्हणजे मराठा.
ब्राह्मण जातियवादी होता, पण मराठा मात्र जातियवादाची नवी समिकरणं उभी करतोय. त्यांचा ब्राह्मणद्वेष हा सत्ता मिळविण्यासाठी आहे. आंबेडकरवादी ब्राह्मणद्वेष करत नाही, ते हक्कासाठी लढतात. हा ब्रिगेड अन आंबेडकरवादी यातला फरक आहे.
ब्रिगेडवाले खरे जातियवादी व देशद्रोही आहेत.
जातीयवाद्यांची कानउघाडणी केल्याबद्दल अभिनंदन. हा रोग सर्वच थरांवर पसरत चालला आहे. खरे तर जातिंवर आधारित कुठल्याही गोष्टीला (मग ते आरक्षण असो वा संरक्षण) विरोध झाला पाहिजे. भूतकाळात काय चुका झाल्या हे पुनः पुनः उच्चारून त्या चुका दुरुस्त होणार नाहीत. त्याने केवळ द्वेष पसरेल. आता भारताचे भविष्य तेव्हाच ऊज्वल आहे जर एक जाती पाती विरहित समाज एकजुटीने देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करेल. त्यासाठी सर्वप्रथम जातींचा विनाश झाला पाहिजे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. तसे कारानाऱ्याना नोकरी, व्यवसाय इ मध्ये सूट मिळाली पाहिजे. त्यांच्या संततीलाही तश्याच सोयी मिळायला हव्या. मग बघा, हा हा म्हणता जाती पाती मोडल्या जावून एकसंध समाज निर्मित होईल,ज्यात जात फक्त एकच, भारतीय असेल.
ReplyDeleteसंजय सर आपण केलेली मांडणी एकदम योग्य आहे.
ReplyDeleteकेवळ द्वेषाच्या आधारावर समाजामध्ये जातीय आणि वांशिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता आहे आणि त्याला फुले आंबेडकरांचे वेष्टन लावून.खरी फुले आंबेडकरांची चळवळ मागेच राहिली.आणि अश्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संघटना यांचा निषेध करणे आवश्यक आहे.
समाजाच्या प्रगतीसाठी तणाव कमी करून सर्वांगीण मंगल मैत्रीचे नाते प्रस्तापित होणे आवश्यक आहे.
ब्राम्हण-ब्राम्हणेतर चळवळ संपून मराठा-मराठेतर चळवळ सुरू होत आहे. समाजच्या दृष्टीने हे चांगले नाही.
ReplyDeleteमहावीर ना ब्राम्हण-ब्राम्हणेतर चळवळ सुरु हवीये कि काय ?
ReplyDeleteएका महावीराने जातपात संपवून सगळ्यांना समान मानणाऱ्या जैन धर्माची शिकवण दिली आणि एक तू आहेस, कि जो मराठ्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सर्व बहुजन samajachi वाट लावायला बघतो आहेस. तुझा द्वेष जातीयवादाविरुद्ध असेल तर तो मराठा जातीयावादावारही दाखव नाही तर आपल्या घरात बैस.
ReplyDeleteamhala yevdhach mahit aahe key sb ani bmm muley bahujan ekatra yet aahet narke sirranchi khari bhiti he aahe key obc arakshan kami hoil pun hey saaf khota aahe ani hey brahmani pasravleli 'trend' aahe, mahaviranni jatiyavaad sampavnyacha prayatna kela pun tyach mahaviranna var brahmanani kutre sodli.hari narke sirrane ani sonawani sirrane rss babat pun tyanchi bhoomika spasht karavi.
ReplyDeletemaratha araxanamule rajyat jari jaga wadhalya tari kendrat jaga 27 takkech rahanar.tya ghatana durustishivay wadhu shakat nahit. ghatanadurusti shakya nahi.mhanaje upsc la mulache obc ni vjnt yancha wata maratha ghenar. shivay panchayat rajyatil 69000 jaga jya prathamch obc, vjnt yanna milalya ahet tyahi maratha ghenar. aaj jari te rajkiy araxan nako ase mhanat asale tari fakt educational, ni service reservation deshat konalahi dilele nahi.aaj he ghyayache,ni mag court through political milavayache asa davpech ahe.maratha samajane araxan magun bahujan ekya sampawile ahe.dubalya obc, vjnt cha ghas palau naka. maratha garib ahet pan araxan ha garibi hatavcha karykram nahi.to representationcha karyakram ahe.
ReplyDeletejack, तू हि एक मराठा दिसतोस. संभाजी ब्रिगेड मुले बहुजन एकत्र येत आहेत पण ते मराठा हितासाठी, बहुजन हितासाठी नव्हे. महाविरांवर ब्राह्मणांनी कुत्रे सोडले याबद्दल माझ्या वाचनात काहीही आले नाही. (माझा जैन धर्माचा चांगला अभ्यास आहे.) पण सोडलेही असतील म्हणून, २५०० वर्षानंतर त्या ब्राह्मणांच्या पोरांचा जैनांनी द्वेष करावा काय ?
ReplyDeleteआरक्षणासाठी ओबीसी आरक्षणातच मराठा सामील होऊ शकतात दुसरे काहीही होऊ शकत नाही (तुमचेच म्हणणे कुणबी = मराठा मान्य केले तर ). आणि ह्यात ओबिसिंचाच तोटा होणार. मराठ्यांनी ब्राह्मणविरोधी दंगली केल्या, मुसलमान विरोधी, दलित विरोधी झाले आता ओबीसींना फिताव्वायला निघाले. संभाजी ब्रिगेड चा एकही मोठा नेता बिगर मराठा नाही, का? दादोजी कोन्न्द्देओ समितीत एकही ओबीसी नाही, का ? ब्राह्मणांच्या सीकेपी, कायस्थ , प्रभू, कोकणस्थ ह्या पोत्जातींनाही तुम्ही ओबीसी म्हणून जाहीर करता. म्हणजे ब्राह्मण सोडून सर्व मागास. तुमच्या शेतजमिनी, तुमचेच सारे, तुम्हालाच आरक्षण म्हणजे बहुजनांनी भिक मागावी काय ?
मतभेद विसरून सर्व लोकांनी जातीअंतासाठी प्रयत्न करावा.आर्यसमाजाची आंतरजातीय विवाहाची चळवळ भरभराटीस आणावी,विपश्यना करून मन:स्वास्थ्य मिळवावे आणि रामदेवबाबांच्या पाठीशी उभे राहून बलशाली भारत बनवावा.फक्त स्वत:च्या जातीचा विचार न करता पूर्ण देशाचा व त्याही पुढे जाऊन मानवतेचा आणि भूतदयेचा विचार हवा.
ReplyDeleteदलितांना आरक्षणाची भिक मिळतेय म्हणून ३५% मिळवले तरी इंगीनीरिंग ला प्रवेश मिळतो.नुसती प्रमाणपत्रे मिळवून बौद्धिक विकास होत नाही. ( लायकी असावी लागते, रक्तात धमक असावी लागते)
ReplyDeleteमराठे लढले नसते तर ब्राह्मण काय नि दलित काय सगळ्यांची सुंता झाली असती. हाच इतिहास आहे.हा ब्लॉग लिहिणारा मूर्ख आहे आणि जातीय विद्वेष पसरवतोय. लायकी नसणारे बहुतेक क्षेत्रात आरक्षणाच्या जोरावर बहुसंख्य आहेत म्हणूनच सरकारी कारभार आणि प्रशासन भ्रष्ट झाल आहे.
स्वतःची मराठांच्या पेक्षा जास्त प्रगती झाली असा वाटत असेल न तर मग आरक्षणाच्या कुबड्या का घेता अजून? आणि अजून खाजगी क्षेत्रात पण आरक्षणाची भिक का मागता आहात? मराठ्यांनी भिका नाही मागितल्या स्वबळावर जगतायत ते.
Dear Mak, your remarks are of the fascist nature. If Mratha community is as much as strong per your say, why they are demanding reservation? Pls revert back with answer....
ReplyDeleteMak,
ReplyDeleteलायकी नसणारे बहुतेक क्षेत्रात आरक्षणाच्या जोरावर बहुसंख्य आहेत म्हणूनच सरकारी कारभार आणि प्रशासन भ्रष्ट झाल आहे.
हे अगदी १०० काय १०००% बरोबर आहे.
एक उदाहरण सांगतो
MSRTC एक आगारामध्ये आरक्षणामुळे एक व्यक्तीला ३०% मार्क असून सुद्धा पास करण्यात आले. माझा याला विरोध नाही, पण जर हा व्यक्ती परीक्षा पास होऊ शकत नसेल तर त्याची बुद्धी किती असेल? आणि मग तो आगार व्यवस्थापक म्हणून आपले कर्तव्य किती चोखपने पार पडू शकतो हाच एक मोठा प्रश्न नाही का?