Sunday, April 3, 2011

हे काय जाती-अंत करणार?

फक्त आपापल्या जातीच्या हितासाठी "बहुजनीय चळवळ" हे लेबल लावून तोंडी लावण्यासाठी फुले शाहु-आंबेडकर यांचे नाव घेत जाती-स्वार्थगतच भुलभुलैय्या निर्माण करणे हेच चळवळींचे कार्य असेल तर त्या यशस्वीच होवू शकनार नाहीत. जातीअंत तर खूप दुरची बाब आहे. भविष्यातील युद्ध(वैचारिक असो कि रस्त्यावर उतरुन) हे प्रत्येक जाती-जातींत व्हावे अशीच सध्याच्या चळवळींची रणनीति आहे आणि तेच अपरिहार्य फलितही आहे. ब्राह्मण द्वेष हा फक्त बागुलबुवा आहे.

सध्या ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण आस्तित्त्वात आहेत हे वास्तव भोगुनही आणि क्षत्रिय आणि वैश्य या धर्मप्रमाणित एकेकाळचे वर्ण संपुष्टात आनले गेले आहेत हे लक्षात न घेता एक वर्णीय पद्धत सांगायची प्रथा नव्याने पडली आहे. प्रत्यक्षात क्षत्रिय वा वैश्य गेल्या हजार वर्षांच्या काळात धर्म-मान्यता पातळीवर आस्तित्वातच नसतानाही कथित वैश्य वगळता सत्ताधारी मर्यादित समाजाने क्षत्रियत्वाचा हट्ट बाळगला आहे असे इतिहासावरुन दिसते. याचा अर्थ चातुर्वर्ण्य व्यवस्था जिंकली आहे असे म्हनायचे का?

पण वास्तव हे आहे कि तथाकथित हिंदु समाज हा गेली हजार वर्ष तरी फक्त द्वैवर्णीक आहे...म्हनजे ब्राह्मण आणि शुद्र. अशा वास्तवात सर्वच शुद्र हे एकसमान असुन त्यांच्यातील जाती या व्यवसायाधिष्ठीत असल्या तरी त्यांचे सामाजिक स्थान एकसारखेच आहे हे समजावून घायला हवे. शुद्राति-शुद्र म्हणुन एक पंचम वर्ण धार्मिक परिप्रेक्षात निर्माण केला गेला...त्यांच्यावर या शुद्रांनीही अन्याय केले आहेत. आपल्या जातीय उतरंडी या अन्याय्य, अनैसर्गिक असून प्रत्येक जात ही समाजाच्या हितासाठीच राबत होती हे वास्तव दुर्लक्षीत ठेवले गेले. त्यांची अद्रुष्य संपत्ती-निर्मिती (निर्मितीचे वास्तव मुल्य आनि मिळनारा मोबदला यातील फरकामुळे) कधीही आर्थिक पातळीवर मोजलीच गेली नाही. जवळपास सर्वच समाजापैकी सरासरी ५०% असलेला स्त्री-वर्ग शुद्रच असुनही तिची सेवा-किंमत संस्क्रुतीच्या नावाखाली दडपली गेली आणि तीही शोषित बनली तसेच शोषितांचीही शोषित बनली. स्त्रीया घरातही जे काम करतात त्यांचे वेतन त्यांना मिळण्याचा अधिकार आहे हे मी २ वर्षांपुर्वी एका लेखात लिहिले आहे.

थोडक्यात आजमितीला, पारंपारिक व्व्यवसाय व सेवा संपुष्टात आल्या असल्याने सारेच शुद्र हे एकाच पातळीवर आहेत म्हणुन त्या मुद्द्यावर तरी त्यांनी समतेचा विचार करून जातीय आधारावरील संघटना आणि चलवळी संपवल्या पाहिजेत. आजच्या ब्राह्मण समाजाचाही वर्णलोप झाला आहे...कारण ते ब्राह्मनांना एक वर्ण म्हणुन जी कर्तव्ये दिली आहेत त्याचे पालन बहुसंख्य ब्राह्मण करत नाहीत. त्यामुळे स्म्रुतींच्याच आधारे हे सांगता येते कि अगणित ब्राह्मण हे शुद्रच बनले आहेत.

परंतु स्वजाती-अभिमान हा या समतेच्या तत्वातील फार मोठा अडथळा आहे. ब्राह्मण वर्णलोप झाला असुनही स्वता:ला श्रेष्ठ समजतात तर मराठे हे आजही मानसिक पातळीवर क्षत्रिय असतात तर व्यावहारिक पातळीवर कुणबी...बहुजन असतात...

खरा लढा या मनोव्रुतीबाबतचा आहे...आणि तो जिंकला जाणार नसेल...तर या सा-या बहुजनीय म्हनवणा-या जात-केंद्रित चळवळी संपणार यात शंका असण्याचे कारणच नाही.

4 comments:

 1. आपण सारेच तीढ्यातुन तीढ्याकडे अशी वाटचाल करु लागलो आहोत. ब्राह्मण विरुद्ध बहुजन, बहुजनांत मराठे विरुद्ध माळी, मराठे विरुद्ध कुणबी, मराठे-माली विरुद्ध अन्य छोट्या-मोठ्या जाती असा संघर्ष शाहु-फुले-आंबेदकर यांचेच नाव घेत वाढवला जात आहे, हे आनखी दुर्दैव. खैर्लांजी प्रकरनात मराठे नव्हे तर काही माळीच मुख्य आरोपी आहेत असे सांगितले जात आहे. ते कदाचित खरेही असेल...पण त्या सांगण्यामागील हेतु प्रामाणिक नाहित हे नक्कि. प्रत्येक जातीचे स्वतंत्र सम्मेलन असते...अगदी साहित्य सम्मेलनेही. प्रत्येक जात फक्त स्वता:पुरता विचार करु लागली आहे...आणि याला स्वत:ला मुख्य समजनारे प्रवाहही जबाबदार आहेत.

  आंतरजातीय विवाह विखार कमी करतील हे आता तरी खरे वाटत नाही कारण जात शेवटी बापाचीच लागते...स्त्रीयांना आपली जात मुलांना आजही देता येत नाही हे पुरुषप्रधान कायद्यांचे एक वास्तव आहे. सत्ताधारी जाती अन्य सर्वच शोषित-वंचीत जातींना वापरुन घेत एका नव्या तीढ्याला जन्म देत आहेत हेही वास्तव आहे....मग ती जात कोणतीही असो...! जातीचा अभिमान बाळगावा असे आता काहीएक शिल्लक उरले नसता केवळ सत्ता आणि संपत्तीतला वाटा वाढावा , मग लायकी काहीही असो, यासाठी जातीच्या नुसत्या ढाली बनवल्या जात नाहीहेत तर शस्त्रेही परजली जात आहेत. जाती-जातींत रक्तबंबाळ संघर्ष व्हावा अशीच ही वाटचाल आहे. कारण ज्या छॊत्या जाती आहेत त्याही आपली फसवणुक आज ना उद्या ओळखणार. शुद्रातिशुद्रांचा तर आजही राजकीय वापरच केला जात आहे. ब्राह्मण द्वेष हा खरा नसुन त्यामागे केवळ समाजाची दिशाभुल करण्याचे ष्ड्यंत्र आहे असे मला म्हनावे लागते. जेथे ब्राह्मणा-विचार-संस्क्रुतीचा विरोध करायचा तेथे यांचे हात-पाय गळालेले असतात हे मी अनुभवत आहे. अशा स्थितीत समाजाला जरी वातले तरी हे मुर्ख दिशांध, सत्तांध आणि धर्मांध नेते जातीयतेला जगवत राहण्यासाठीच प्रयत्न करणार हे दिसते आहे. विचारवंतही याला अपवाद नाहीत.

  वेदवाक्य प्रमानम याप्रमाणेच शाहु फुले आंबेडकर वाक्य प्रमानम असा काळ आला आहे, यालाच मी नव-सनातनवाद म्हनतो. जे त्यांना त्यांच्या काळात अभिप्रेत होते ते आजच्या काळाला लागु कितपत होईल याचा साकल्याने विचार केला जात नाहीहे. चलवळवाले मात्र स्स्वता:च्या नालायक्या लपवण्यासाठी नवा सनातनवाद जन्माला घालत आहेत आणि त्याचा निषेध करणे आवश्यक आहे. एका गुलामीकडुन दुस-या गुलामीकडे ही वाटचाल आहे. गतकालाची चिकित्स्सा जेंव्हा हट्टाने बंद पाडली जाते तेंव्हाच नवा सनातनवाद सुरु होतो. हा नवसनातन वाद नको असेल तर सर्वच समाजाने जागे होण्याची गरज आहे.

  ReplyDelete
 2. I like what you have written. Please reflect on the root cause of all this mishap. Please reflect the prism which distorted the incoming rays of Western egalitarianism coming to us. Please reflect on the role the Constitution has played and then you will have known most of the answers to your questions.

  ReplyDelete
 3. स्वताला श्रेष्ठ समजून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करणारे,हेटाळणी करणारे,दुसऱ्यास तत्वज्ञान सांगणारे-शिकवणारे व स्वताची व नातेवाएकांची खळगी भरणारे सर्व जातीतले महाज्ञानी हे ब्राम्हणच आहेत!!!!!

  ReplyDelete
 4. atishay yogya shabdat aapan aaplye vichar mandale aahet.aaj sarvannich ya babat vichar karane garjeche aahe.

  ReplyDelete