हिंदू धर्मासमोरील समस्या-५.
वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था ही हिंदु धर्माचे अव्यवच्छेदक लक्षण आहे हे उघड आहे. जन्माधारीत वर्ण-जात ठरवणारी ही जगातील एकमेव धर्मव्यवस्था आहे. सर्वच समाजशास्त्रद्न्यांना आव्हान देणारी ही व्यवस्था कशी उदयाला आली, हजारो वर्ष कशी टिकली याचे गुढ उलगदण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला आहे परंतू समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेले नाही. ही व्यवस्था अन्याय्य आहे म्हणुन तिचे समुळ उच्चाटन व्हायला हवे असे मत मांडनारे इतिहासात झाले नाहीत असे नाही पण असे म्हनणारेही जातीय चौकटीत एवढे घट्ट बसवले गेले कि जातीच्या बेड्या (?) तुटने अशक्यच झाले.
वर्णव्यवस्थेचे मुळ ऋग्वेदातील दहाव्या मंडलात येणा-या पुरुषसुक्तात आहे आणि त्याचाच विस्तार पुढे ऐतरेय ब्राह्मण ते मनुस्म्रुतीत झाला आहे असे सर्वमान्य मत आहे. त्यामुळे मुळात पुरुषसुक्त काय आहे ते तपासणे योग्य ठरेल.
पुरुषसुक्ताच्या सर्वच ऋचांचा खालील अनुवाद पहा.
ऋचा १) पुरुषाला १००० मस्तके आहेत, १००० नेत्र आहेत आणि १००० पाय आहेत.प्रुथ्वीला व्यापुनही तो दशांगुळे उरला आहे.
२. पुरुष हाच विश्व आहे. जेही काही होते,आहे आणि होईल, तो अमरतेचा नियंता आहे आणि अन्नाने तो विस्तारत रहातो.
३. ही पुरुषाची महानता आहे. सारी अस्तित्वे हा त्याचा एक चथुर्तांश भाग असुन उर्वरीत तीन चतुर्थांश अवकाशात अमरता घेउन आहेत.
४. तीन चतुर्थांश भाग घेवुन पुरुष उर्ध्वगामी विस्तारीत झाला आणि त्याचा एक चतुर्थांश भाग येथे विभाजीत झाला ज्यातुन खाणारे आणि न खाणारे उत्पन्न झाले.
५. त्याच्यापासुन विराज निर्माण झाला आणि विराजापासुन पुरुष. जन्मताच पुरुष प्रुथ्वी व्यापुन मागे व पुढे गेला.
६. देवतांनी पुरुषाला यद्न्यात बळी दिले. त्यात (यद्न्यात) वसंत ऋतु हा तुप झाला तर ग्रीष्म अग्नी आणि शिशिर हवी झाला.
७. पुरुष बळी झाला. त्याला हविद्रव्यावर जाळले आणि त्याच्यासह देवता, ऋषि आणि साध्यासही बळी दिले.
८. या वैष्विक बळीतुन दही आणि तुप उत्पन्न झाले. त्यातुन पक्षी आणि पाळीव व वन्य पशू उत्पन्न झाले.
९. या वश्विक बळीतुन ऋक, साम आणि यजस मंत्रांची निर्मिती झाली.
१०. त्यातुनच अश्व, बोकड, शेळ्या असे सर्व प्राणी निर्माण झाले.
११. देवांनी जेंव्हा पुरुषाचे असे विभाजन केले ते त्याचे तुकडे करुन काय? त्याचे मस्तक काय होते? त्याचे हात काय होते? त्याच्या मांड्यांचे आणि पायांचे काय झाले?
१२. तर ब्राह्मण हे त्याचे मुख होते. राजन्य हे त्याचे हस्त होते. मांड्या हे वैश्य तर शुद्र हे त्याच्या पायापसुन उत्पन्न झाले.
१३. चन्द्र हा त्याच्या मनापासुन उत्पन्न झाला तर नेत्रांपासुन सुर्य. इंद्र आणि अग्नी त्याच्या मुखापासुन तर वायु त्याच्या श्वासातुन निर्माण झाले. १४. त्याच्या बेंबीपासुन हवा, मस्तकापासून आकाश, त्याच्या पावलांपासून प्रुथ्वी, त्याच्या कानांपासून चार दिशा आणि अशा रितीने देवांनी विश्व बनवले.
१५. देवांनी सात प्रज्वलीत समिधांनी त्याला (पुरुषाला) बांधुन बळी दिला.
आता वरील सुक्त बारकाईने वाचले तर एक लक्षात येइल कि हे खरे तर विश्वनिर्मितीचे पुरातन मित्थक आहे. डा. बाबासाहेब आंबेडकरांनीही या सुक्ताचे अत्यंत विद्वत्तापुर्वक विश्लेषन केले असून त्यांनी म्हटले आहे कि खरे तर तत्कालीन विश्वात स्रुष्टीजन्माची अशी कथा मिळत नाही.(Who were shudra's?) ही अनेकार्थाने एकमेवद्वितीय अशी कथा आहे. ते म्हणतात...The Purusha Sukta is a theory of the origin of the Universe. In other words, it is a cosmogony. No nation which has reached an advanced degree of thought has failed to develop some sort of cosmogony. The Egyptians had a cosmogony somewhat analogous with that set out in the Purusha Sukta. According to it, it was god Khnumu, ' the shaper,' who shaped living things on the potter's wheel, "created all that is, he formed all that exists, he is the father of fathers, the mother of mothers... he fashioned men, he made the gods, he was the father from the beginning... he is the creator of the heaven, the earth, the underworld, the water, the mountains... he formed a male and a female of all birds, fishes, wild beasts, cattle and of all worms." A very similar cosmogony is found in Chapter I of the Genesis in the Old Testament.
पुरुषसुक्ताबद्दल बाबासाहेबांनी पुढे अत्यंत विस्ताराने लिहिले असून विश्वनिर्मितीच्या सिद्धांतात वर्णव्यवस्थेचा उगम दर्शवला जाणे आणि त्याला धर्ममान्यता देणे हे सुद्धा जागतीक मित्थकथांमद्धे न आढळनारे वैशिष्ट्य आहे असे स्पष्ट केले आहे. बाबासाहेबांनी या सर्व सुक्तात जो महत्वाचा आक्षेप (कोडे) नोंदवले आहेत ते सुक्तातील ११ आणि १२ क्रमांकाच्या ऋचांबद्दल. बाबासाहेब पुढे म्हणतात "But it is quite different with regard to verses 11 and 12. Primafacie these verses do no more than explain how the four classes, namely. (1) Brahmins or priests, (2) Kshatriyas or soldiers, (3) Vaishyas or traders, and (4) Shudras or menials, arose from the body of the Creator. But the fact is that these verses are not understood as being merely explanatory of a cosmic phenomenon. It would be a grave mistake to suppose that they were regarded by the Indo-Aryans as an innocent piece of a poet's idle imagination. They are treated as containing a mandatory injunction from the Creator to the effect that Society must be constituted on the basis of four classes mentioned in the Sukta.Such a construction of the verses in question may not be warranted by their language."
हे विवेचन लक्षात घेवुन मला या सुक्ताबाबत ठळक मुद्दे स्पष्ट करायचे आहेत आणि या सुक्तातील विसंगती टिपायची आहे ती अशी:
१. पुरुषाला हजार मस्तके, हजार नेत्रे आणि हजार पाय आहेत असे हे सुक्त म्हनते.
२. ऋचा क्र. १४ मद्धे हेच सुक्त पुरुषाच्या पावलापासुन प्रुथ्वीची निर्मिती झाली असे म्हणते.
३. ११ व १२ ऋचा मात्र पुरुषाच्या मस्तकापासुन ब्राह्मण, बाहुंपासुन राजन्य (क्षत्त्रिय नव्हे) मांड्यांपासुन वैश्य तर पायांपासुन शुद्र निर्माण झाले असे म्हणतात.
हाच सिद्धांत (ऋचा ११ व १२) पुढे नेत ऐतरेय ब्राह्मण व शेवटी मनुस्म्रुतीने वर्णव्यवस्थेवर सैधांतिक/धार्मिक शिक्कामोर्तब केले असल्याने यावर चर्चा आवश्यक आहे. यासाठी प्रथम खुद्द ऋग्वेदात हे सुक्त कसे आले हे पहाणे गरजेचे आहे.
पुरुषसुक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येते. हा भाग वैदिक धर्माच्या अपकर्शकाळी रचला गेला आहे. त्यावेळी सुदासाचा (ऋग्वेद निर्मिती ज्या वंशाच्या कालखंडात झाली) वंश संपलेला होता. इतका कि ज्यांचा द्वेष वैदिक ऋषिकुळे करत त्या पणींकडुनही देणग्या मिळवाव्या लागत होत्या. (पहा आप्रीसुक्ते...दानस्तुती)
दुसरे असे कि ऋग्वेद अविक्रुत नाही. कालौघात त्याच्यातील काही भाग वगळला गेला आहे तर काही भागाची भर पडलेली आहे. उदाहरणार्थ ईसपु सहाव्या शतकात होवुन गेलेल्या झरठ्रुष्टाचे नाव ऋग्वेदात येते. आणि विद्वानांच्या मते कसल्याही स्थीतित ऋग्वेदनिर्मितीचा काळ ईसपु १५०० च्या अलीकडे आणता येत नाही. मग ऋग्वेद अविक्रुत असेल तर त्यात झरठ्रुष्ट कसा डोकावू शकतो? दुसरे असे कि वेदव्यासांनी मुळच्या विस्म्रुत होत चाललेल्या वेदाला पुन्हा संकलीत करून त्याचे चार भागात विभाजन केले ही दंतकथाही या संदर्भात विचारात घ्यावी लागेल. मुळचे वेदार्थ नष्ट होत चालल्यानेच ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती झाली हे ऐतिहासिक वास्तवही लक्षात घ्यावे लागेल.
आता पुरुषसुक्त एकुणात पाहिले तर लक्षात येते कि ते विसंगत असून ऋचा ११ व १२ यांचे मुलार्थात काहीएक स्थानच नाही. पुरुष हे प्रतीक मानुन त्याच्या बळीतुन विश्वाची निर्मिती कशी झाली हे दर्शवण्याचा हा पुरातन प्रयत्न आहे आणि तो स्प्रुहणीय आहे. या सुक्तात मुळात मनुष्यप्राण्याची निर्मिती कशी झाली याबद्दल मात्र एकही अवाक्षर नाही ही तर खुप मोठी विसंगती आहे. अन्य प्राणी, पक्षी, आकाश, प्रुथ्वी ई. ची निर्मिती कशी झाली हे या सुक्तात आहे पण मनुष्याची निर्मिती कशी झाली याबाबत या सुक्तात मौन आहे हे एक कोडेच आहे असे बाबासाहेब म्हणतात ते योग्यच आहे. कोणत्याही विश्वनिर्मितीच्या मित्थकात मनुष्यच कसा जन्माला आला याचा सिद्धांत नसणे हे असंभाव्य आहे.
अशा स्थीतित सरळ ११ व १२ ऋचा मात्र सरळ वर्णव्यवस्थेबाबतच बोलतात ही तर सर्वात मोठी विसंगती आहे हे उघड आहे. मुळात सर्व ऋग्वेद अभ्यासला तर वर्णव्यवस्थेबाबत ऋग्वेद कोठेही भाष्य करतांना दिसत नाही. किंबहुना वर्णव्यवस्था अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा ऋग्वेदाच्या प्राचीन भागांत दिसत नाही. कोठेही शुद्र हा शब्दही येत नाही. तो येतो तो फक्त या पुरुषसुक्तात हे नवलच नाही काय?
बरे विश्वनिर्मितीचा हा एकच सिद्धांत ऋग्वेदात नाही. दहाव्या मंडलात तो पुन्हा एकदा येतो पण त्यात पुरेपुर वेगळे मित्थक मांडलेले आहे. (दक्ष प्रजापतीचे). एवढेच नव्हे तर दीर्घतमा ऋषिचेही एक विलक्षण सुक्त आहे त्यात स्रुष्टीजन्माविषयीचे अनिवार कुतुहल अभिव्यक्त झाले आहे.
एकाच वेदात विभिन्न विश्वनिर्मितीच्या कथा/मित्थके येणे आस्चर्यकारक नाही. आश्चर्य आहे ते या तर्कविसंगत २ ऋचा ऋग्वेदातील या पुरुषसुक्तात आल्या कशा?
या आश्चर्यामागील कारणे अशी...
१. मुळात जन्माधारीत वर्णव्यवस्था ऋग्वेदाला मान्य नाही हे जवळपास १०,००० ऋचांमधुन स्पष्ट होते. म्हणजे मंत्र रचतो तो त्याक्षणी ब्राह्मण आहे, शेती करतो त्यावेळीस तो विश आहे तर तोच युद्धात भाग घेतो तेंव्हा क्षत्र आहे.
२. ऋचा रचनारे अनेक व्यवसाय करनारे आहेत. त्यात रथकार आहेत, लोहकर्मी आहेत तसेच शेतकरीही आहेत.
३. ऐतरेय ब्राह्मणाचा रचनाकार हा इतरा नामक दासीचा पुत्र आहे, म्हणजे तदार्थाने शुद्र आहे. पण त्याचे ब्राह्मण आजही पुज्य आहे.
४. भ्रुगु हे असूर वंशीय असुनही त्यांनीही ऋग्वेदातील मोठा भाग लिहिला/रचलेला आहे.
असे असता जी व्यवस्था ज्या काळात मुळात जन्मालाच आलेली नाही तीचा उगम, तोही विसंगत रीतिने एका सुक्तात व्हावा असे दिसावे यात काहीतरी गफलत आहे हे उघड आहे.
आणि ती गफलत म्हणजे या विश्वनिर्मितिविषयकच्या सुक्तात ती नंतर कोणीतरी घुसवली आहे. मुळ सुक्ताला विक्रुत केले गेले आहे. मुळात मनुष्य कसा निर्माण झाला हे सांगणारी ऋचा वगळुन वर्णव्यवस्थेला वेदमान्यता आहे, पावित्र्य आहे हे दाखवण्याचा हा खोटा प्रयत्न जाणीवपुर्वक केला गेला आहे.
हे कधीतरी उत्तरकाळात...म्हणजे मनुस्म्रुतीच्या काही काळ आधी कोणीतरी केले आहे. मुळ ऋग्वेदातील पुरुषसुक्ताचा या ११ व १२ क्रमांकाच्या ऋचांशी संबध असू शकत नाही हे वरील विवेचनावरुन लक्षात आले असेलच.
पण याच २ ऋचांमुळे (आज ब्राह्मणांना नेमक्या याच दोन ऋचा पाठ असतात. आधीच्या आणि नंतरच्या त्यांनाही माहित नसतात.) वर्णव्यवस्थेला ऋग्वेदाचीच मान्यता आहे असा समज आहे आणि तो समूळ चुकिचा आहे हे मला येथे स्पष्ट करायचे आहे. या दोन्ही ऋचा कोणीतरी अनाम ग्रुहस्थाने ऋग्वेदात घुसवल्या आहेत हे स्पष्ट व्हावे एवढ्या त्या मुळ पुरुषसुक्तात विसंगत आहेत. अन्यथा पुढील ऋचांतच पुरुषाच्या पायापासुन प्रुथ्वी निर्माण झाली असे विसंगत विधान आले नसते. जर पायापासुन प्रुथ्वी आली तर शुद्र कोठुन आले? आणि शुद्र आले तर प्रुथ्वी कोठुन आली? एवतेव या दोन्ही ऋचांना प्रक्षिप्त मानणे भाग आहे. परंतु याच दोन ऋचांनी वर्णव्यवस्थेला एक sanctity दिली हेही विसरता येत नाही. म्हणुन ती दुरुस्त करुन घ्यावी लागणार आहे.
पण प्रश्न येथेच संपत नाहीत. ऋग्वदिक मान्यता घेण्यासाठी खोटेपणा करणे हा एक भाग झाला. पण तो समाजाने मानला काय याबाबत मी मागील प्रकरणात विवेचन केलेच आहे. मुळात याची (जन्माधारीत वर्णव्यवस्थेची) गरज का भासली? पुढे चार वर्ण जावून अवर्ण कोठुन आले? त्याही पुढे मग कलियुगात क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण आस्तित्वात नसुन फक्त ब्राह्मण आणि शुद्र हेच दोन वर्ण असतेल या टोकाला भारतीय धर्मशास्त्र का गेले यावरही आपल्याला क्रमाक्रमाने विचार करायचा आहे. आपल्या मौलिक विचार-सुचनांचे स्वागत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता
वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
http://en.wikipedia.org/wiki/Purusha_sukta
ReplyDeleteVerse 10: Bhatta Bhaskara interprets the animal creation from this Purusha. He states that horses, animals with two rows of teeth in the upper and lower jaws such as donkeys were born. Additionally, cows, goats and sheep were created.
Raghavendra Swami states that Vishnu created horse, donkey, sheep, cow and goats for this yajna.
Verse 12: Both commentators state that the four classes of human society (castes) were born from Him.
Warriors were created from the arms of God and the priests were from his head and the merchants from his abdomen and the laborers from his legs. This may be interpreted as meaning that no one caste is more important than the other and that society cannot survive without all parts working together.
Verse 13: Both commentators state that the devas such as Indra, Agni and Vayu were born from various parts of the Supreme Being, The saint comments that Hari has created Chandra by his mind, Surya by his eyes, Indra and other devas from his face. Sri Hari created Vayu by his breath.
http://sukta.blogspot.com/2006/10/purusha-sukta-meaning.html
ReplyDeletehttp://www.swami-krishnananda.org/invoc/in_pur.html
१.हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वेद हे अपरिवर्तनीय आहेत. जर हे गृहीतक सत्य मानले तर पुरुषसूक्त हे प्रक्षिप्त आहे ह्या गोष्टीला वैदिक धर्माचे अभिमानी कधीही मान्यता देणार नाहीत.
ReplyDelete२.वेदांमधील काही भाग प्रक्षिप्त आहे हे जर पुराव्याने सिद्ध करता येत असेल तर वेद अपरिवर्तनीय आहेत हे गृहीतक खोटे ठरते. म्हणजेच हिंदू धर्माचा पाया कोसळतो.
३.तेव्हा वर्णव्यवस्था हे वैदिक धर्माचे मूलभूत तत्व आहे ही समजूत पुराव्यांच्या आधारे खोडून काढता आली तरी बहुसंख्य हिंदूंच्या श्रद्धेच्या विरोधात असलेल्या या गोष्टीला मान्यता मिळणे कठीण आहे.
४.म्हणून सत्य काय आहे हे शोधून काढणे महत्वाचे आहेच पण ते सत्य ज्यांच्यासाठी आहे त्यांची ते सत्य स्वीकारण्याची मानसिकता आहे का हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे.
@ Jidnyasu, व्वेदाभिमान्यांना काय वाटते हे महत्वाचे नाही. त्यांना खुप गोष्टी वातत असतात. पुरुष्सूक्त प्रक्षिप्त तर आहेच, पण त्यातील ते २ विशिष्ट श्लोक प्रतिपाद्य विषयाशी मुळात विसंगत असल्याने त्या फार नंतर, म्हनजे वर्णव्यवस्थेच्या आदि-काळात वर्णव्यवस्थेला वेदमान्यता देण्यासाठी घुसवले आहे. २. वेदांत अनेक भाग प्रक्षिप्त असल्याचे महत्वाचे पुरावे म्हणजे सनपुर्व २५०० ते १७५० या काळात रचल्या गेलेल्या ऋग्वेदात इस्पु ६०० मद्धे होवून गेलेल्या झरतुष्ट्राचा उल्लेख आहे. पहिले व दहावे मंडल फार नंतर ऋग्वेदाला जोडले गेले आहे हे विद्वानांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे वेद अपरिवर्तनीय व ईश्वरप्रणीत आहेत ही भाकडकथा आहे हे सिद्ध होते. ३. वर्नव्यवस्था ही वेदप्रणित नाही हे ऋग्वेदातील अन्य १०००० पेक्षा अधिक असलेल्या ऋचांकधुन सिद्ध होते, कारण हे पुरुष सुक्त वगळता अन्यत्र कोठेही वर्णव्यवस्था नाही. ४. हे कोणी मान्य करावे कि अमान्य....तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपले काम आहे सत्य मांडण्याचा प्रयत्न करणे.
ReplyDeleteआपल्या विचारपुर्वक दिलेल्या अभ्यासु प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
संजय जी ,
ReplyDeleteमला वाटते की हिंदू धर्माचा अर्थ लावायचे काम पूर्वी पैठण , काशी ,आणि काही ठराविक मठ अशा ठिकाणाहून होत असेल.
पण नंतर आता आधुनिक कायदे आणि आधुनिक शिक्षण यामुळे,यात बरेच बदल झाले आहेत .
स्थापित धर्मासनांच्या अधिकाराचा इंग्रजांच्या काळापासून संकोच होत गेलेला दिसतो.आणि ते त्यांना पण माहित असते.
आपली सद्दी संपली याचे भान सर्वात आधी त्यांनाच असणार.
( तोच प्रकार मुसलमानांच्या बाबतीत अजूनही होताना दिसत नाही याचे खरेतर वाईट वाटते ! )
संत तुकारामांच्या काळातील मंबाजीला आज समाजात स्थानच नाही ! इतर आधुनिक सुशिक्षित ब्राह्मणानीच त्यांना हद्दपार केले आहे !
त्यासाठी इतरेजनांकडून ब्राह्मण द्वेषाची झोडही उठावी लागली नाही .हेपण तितकेच महत्वाचे आहे ! चर्चेच्या दृष्टीने अतिशयच महत्वाचे आहे !
महाराष्ट्रात सध्या चाललेला ब्राह्मण द्वेष हा समाजाचे उथ्थान व्हावे म्हणून नसून , तो मराठा समाजाचा आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या डावाचा एक भाग आहे
हे सांगायला काही विशेष बुद्धीमत्ता लागत नाही.
आज जर पुण्या मुंबईत एखादा भस्म फासलेला - शेंडी ठेवलेला ब्राह्मण , दुसऱ्या ब्राह्मणाला जाती बहिष्कृत करू लागला तर ,
त्या शेंडी वाल्याचीच फजिती होईल.आणि हे त्याला पण पक्के माहित आहे.
मला कल्पना आहे की राजस्थान आणि इतर उत्तर दक्षिणेतील राज्ये यामध्ये अजूनही ब्राह्मण सनातनी सत्ता जोर धरून आहे.
पण केरळ,तामिळनाडू आणि आंध्र ची कथा थोडीशी वेगळी आहे.आश्चर्याचा भाग म्हणजे त्यांचे धार्मिकत्व त्यांच्या आधुनिक शिक्षणाच्या , आधुनिक मनोवृत्तीच्या आड येत नाही.
मुख्य म्हणजे , त्यांच्या धार्मिक परंपरांची उघड टिंगल होत नाही .ती जास्त करून महाराष्ट्रातच होते .आपण मद्रास आणि केरळ प्रांतात फिरताना नेहमी असे दिसते की ,
कोणतीही जात असो,अगदी ब्राह्मण सोडूनही -मुलीसुद्धा भस्म लावून आनंदाने बस किंवा लोकलचा प्रवास करत असतात.त्यांची जात नेहमीच ब्राह्मण असते असे पण नाही.
इंग्लंड मध्येतर आता बकिंग ह्याम राजवाड्यात सुद्धा शीख लोकाना त्यांचा फेटा घालून सुरक्षा दलात प्रवेश दिला गेला आहे .भस्म असो वा पगडी ,
त्या श्रद्धा आहेत,सिम्बॉल आहेत ,पण विचार आधुनिक आहेत हे पण सर्वात महत्वाचे .
आपल्याकडे पोशाख आधुनिक पण विचार छत्रपतींच्या मामादानीच्या वलयातून बाहेर पडत नाहीत.हे दुख्ख आहे .
आज महाराष्ट्रात ब्राह्मण विशेषतः कोकणस्थ ब्राह्मण इतक्या वेगाने का पुढे गेला आहे त्याचा विचार इतर जाती का करत नाहीत ?
सांगायचा मुद्दा असा की आपापल्या जाती सांभाळून ,आपापले व्यक्तीगत संस्कारांचे पालन करत तरुण पिढी महाराष्ट्राबाहेर
आधुनिक विचार तितक्याच तन्मयतेने समजावून घेताना दिसते.
आज सर्व भारतभर उच्च पदे याच लोकांनी पटकावलेली दिसतात.कोणत्याही बौद्धिक क्षेत्रात आज दाक्षिणात्यांची बाजू वरचढ दिसते .
आधुनिकता आणि धार्मिक परंपरा यांचा उत्तम संगम दक्षिणेत दिसतो ! केरळ मध्ये तर ख्रिश्चन लोकसुद्धा कुंकू भस्म लावून समाजात वावरताना दिसतात.हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे !
उत्तरेत इतर जातींचे मुखीये मात्र त्यांच्या त्यांच्या जातीचा सच्चेपणा जपायला उत्सुख असतात.हा अज्ञानाचा भाग आधुनिक शिक्षणानेच नाहीसा होईल.
दक्षिण आणि उत्तर भारत - पंजाब - आणि महाराष्ट्र असा विचार केला तर ,महाराष्ट्रात सर्व दोष ब्राह्मणांवर थापायची एक विचित्र प्रथा पडली आहे.
त्यामुळे ब्राह्मणांचे किंचितही नुकसान होणार नाही.ह्याचा पण विचार करावा लागेल.
DEAR SANJAY SONAWANI (YOUR ATTENTION PLASE)-
ReplyDeleteSWAMI SWARUPANAND (PAWAS )WAS A SAKSHATKARI NATH-SIDDH.
HE WROTE NUMBER OF BOOKS .AMRITDHARA IS ONE OF IT INDICATONIG
HIS EXPERIENCE ABOUT ';SAKSHATKAR'.
FOLLOWING ARE TWO SENTENCES FROM AMRITDHARA.
1 VEDANTACHYA THOTAND-ACHI PATHI WARATI ZOOL
GHALUNI TADA HOTO SAJALO TUNDIL NANDI-BAIL.
THESE TWO SENTENCES INDICATES THAT ALL BRAHMIN SAINTS
ALSO ARE NOT AGREE WITH VEDAS.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteनम्र विनंती ,
ReplyDeleteसर्वानी मराठीत लिहावे.
सर्वांनाच वाचनाचा आनंद घेता .येईल
दुसरी गोष्ट अशी की जे रोमन लिपी वापरतात त्यांच्या लिखाणात प्रचंड दोष निर्माण होतो.
संजयजी,
आपण सर्वाना सोपे जाईल अशी काहीतरी मराठीत सहभाग करण्याची युक्ती लवकर लवकर सांगा- प्लीज !
गुगल मध्ये सेटिंग मध्ये जाऊन हे बदल समजावून सांगता येतील ! दुसरी भाषा वापरण्याचा पर्याय आहे तिथे
जाऊन मराठी असा खुलासा केल्यास मराठीत लिहिता येते.अगदी शेवटी आउट गोइंग मेसेज एनकोडिंग या पर्यायाला निवडून पुढे जावे.
मलातरी तुमच्या ब्लोग वर इथे कुणाचेच इंग्लिश चांगले वाचण्या इतपत भारदस्त वाटले नाही.सगळा धेड गुजरी प्रकार ! त्यापेक्षा मराठी काय वाईट ?
मांडणी आणि व्याकरण ,लेखनात चुका करून इंग्रजी लिहिण्यापेक्षा मराठी लिहावे.
मातृभाषेचे प्रेमपण साजरे करता येईल.
नव बौद्ध - त्यांचा धर्माभिमान जागृत ठेवण्यासाठी त्यांच्या सोयीसाठी त्यांनी पाली किंवा अर्धमागधी मध्ये लिहावे.असे सुचले म्हणून सांगते.
तसा पर्याय देण्यास गुगलला भाग पडावे.त्यांना तुमची ताकद काय आहे त्याची झलक दाखवावी .
ब्राह्मणांना ठेचलेच आहे.
मराठा तर आपलेच आहेत.
गुगलला सरळ करायला काय ? कीस झाडकी पत्ती !