Friday, July 8, 2011

त्यांना काही समजत नाही....

त्यांना काही समजत नाही
त्यांना काही उमजत नाही....

सडे सांडले रक्ताचे...कोणाचे हो कोणाचे?
जगणे केले निंध्य....कोणाचे हो कोणाचे?
स्पर्शावरतीही बंधन...कोणाच्या हो कोणाच्या?
जगण्यावरतीही बंधन...कोणाच्या हो कोणाच्या?
उष्ट्यावरती जेही जगले...होते कोण ते होते कोण?
हाणा रट्टे...उडवा मस्तके...म्हणनारे ते होते कोण?
पोटासाठी पोरी विकल्या...विकणारे ते होते कोण?
अबलांची ती अब्रु लुटली...लुटणारे ते होते कोण?
मंदिरांतही प्रवेश नाही...बजावणारे होते कोण?
अतिशुद्रांची नावे अभद्र असावी...सांगणारे होते कोण?
ही गतजन्माची पापसजा...हे रटनारे होते कोण?
सत्तेच्या पालख्या केल्या पुण्यवत...हे करणारे होते कोण?
ज्या सत्तांनी समाज लुटला...नागवणारे होते कोण?
जगण्या साधन येता हाती...लुबाडणारे हे आहेत कोण?

यांना काही समजत नाही...
यांना काही उमजत नाही...
सांगुन सांगुन थकले जेही
थकणा-यांना विचारी कोण?

मदमत्त पिपासा अन्यायाची
सत्ता सत्ता कित्ता गिरवण्याची
रडती त्यांना रडविण्याची
आपुल्या टे-या बडवत बडवत...
गाथा कालच्या वदणा-यांची
शोषण आणि अधिक शोषण
हीच भाषा या तद्वद्न्यांची
बोला हे जन आहेत कोण?


वेळ बदलला काळ बदलला
उगा कशा इतिहास उगळीता?
पणजोबाने जर खुन केला
शिक्षा नातवा देतो कोण?
ज्यांना द्यावी खरीच शिक्षा
असे पडद्याआडे लपले कोण?
आम्हीही बहुजन...बहुजन आम्ही
असले नारे देती कोण?
धर्माचे फळ खावून झाले
सत्तेचे बळ घेवून झाले
तरी मदांध ते असती कोण?

त्यांना काही समजत नाही
त्यांना काही उमजत नाही
दिसत नाही पाठीवरचे वळ
चल उठ गड्या, जरा हिम्मत धर...!

सत्तेचे चालक...मालक...शासक
होतात जेंव्हा तेही याचक
ज्यांना लुटले अविरत काळ
त्यांच्यासाठी बनती काळ
एक शिवबाचा जपत मंत्र ते
पापांना पाठी घालत काय?
अरे डोळे उघडा...उघडा कवाडे
नवनिर्मितीची पहाल स्वप्ने
तलवारींचा मंत्र पुरा तो
माज नि गुर्म्या उतरवील तो
हे तोडु ते फोडु सोडा
उभारण्या तो येई कोण?

पण त्यांना काही समजत नाही
त्यांना काही उमजत नाही
रक्ताची भाषा सुटत नाही
पण मज एकच कळते...गड्या धीर धर...गड्या धीर धर!

3 comments:

  1. माझ्या आणि एनेक बहुजनांच्या मनातील भावना याच्या पेक्षा चांगल्या शब्दात मांडता येणे शक्य नाही. Thanks.

    ReplyDelete
  2. कविता चांगली केली आहे. दाद द्यावी अशीच आहे. मराठ्या विरोधात यापेक्ष्या सुंदर रीतीने लिहिणे खूप कमी लोकांना जमेल.....फक्त मराठ्यांनीच अन्याय केला आहे दालीतावर........बाकी इतर मागास्वरीगीयानी बरोबरीची वागणूक दिली आणि देण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणाची काही चूक नवती..कारण ते सोवळे पळतच नव्हते. अजून पण माली, कुतर, न्हावी, धनगर या जाती महार आणि मंग या जातीला बरोबरीची वागणूक देतात.

    ReplyDelete
  3. "REVOLUTION" ase Naw ghetale mhanaje vaicharik krantikarakata yetech ase nahi.Tyasathi adhi DECASTE vhave lagate.SATTADHARI MANSIKATA TE karayala motha adathala asate. Mag asa "kangavaa" suru hoto.Shoshan karanarya sarvanvarach yethe korde odhalele ahet.JATIY VISHAMATA hi payaryanchi vishamata aahe he Dr.BABASAHEB AMBEDKAR sangun gelet.hi KAVITA chitrshailitil asun ti ASWASTHA Karate.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...