Saturday, July 23, 2011

सोमवंश....भारतीय संस्क्रुतीचे मुळ घटक...एक अभ्यास!

भारतीय धर्मेतिहास/इतिहास हा माहित करून न घेण्याच्या प्रयत्नांमुळे असंख्य गैरसमज प्रचलित आहेत. येथे मी थोडक्यात सोमवंश हा सुर्यवंशाच्याच बरोबरीने प्रसिद्ध असनारा पुरातन राजवंश/लोकसमुदाय आहे त्याबद्दल माहिती देत आहे. पुरुरवा हा सोमवंशाचा मुळ पुरुष अशी मान्यता आहे. सोम म्हणजे चंद्र हे येथे लक्षात घेतले पाहिजे. हे चंद्राला आपले पुर्वज मानणारे लोक हे स्त्रीसत्तावादी होते. चंद्र हा तत्कालीन जनमानसात स्त्रीचा भाऊ नव्हे तर पती मानला जात होता. कारण स्त्रीचे स्त्रीत्व हे चंद्रकलांवर अवलंबुन होते/आहे. त्या काळात पुरुष हा जननक्रियेतील महत्वाचा घटक आहे हेच मुळी द्न्यान नव्हते व विवाह संस्था अद्याप अस्तित्वात आलेली नवहती. सोमवंश हा तदर्थाने आद्य संस्क्रुतीचा घटक होता. पुरुरवा यास या वंशाचा आद्य पुरुष मानले जाते. किंबहुना "पुरुष" हा शब्दच या पुरुरव्याचा आजतागायत जतन केला गेलेला महिमा आहे.

कालिदासाने विक्रमोर्शियम यात जी इतिहासकथा सांगीतली आहे ती येथे उल्लेखनीय आहे. भारतात पहिली द्न्यात राजसत्ता स्थापणारा हा वंश असूर होता हे यावरुन सिद्ध होते. पुरुरवा हा सप्तद्वीपांचा राजा होता. तो यद्न्यविरोधक होता. त्याने अनेक यद्न्यांचा नाश केल्याने चिडलेल्या ऋषिंनी नैमिषारण्यात त्याचा खुन केला व त्याचा मुलगा आयु यास सिंहासनावर बसवले. आयु हा प्रतिष्ठान (म्हणजे महाराष्ट्रातील पैठण?) येथुन राज्य करु लागला तर त्याचा भाऊ अमावसु याने स्वतंत्रपणे कान्यकुब्ज येथे राजधानी करुन स्वतंत्र राज्य बनवले. आयुने असुर राजकन्या प्रभाशी विवाह केला. त्याचा मुलगा नहुष. नहुषाची कथा महाभारतात विस्ताराने आलेलीच आहे त्यामुळे येथे मी त्याबद्दल अधिक लिहित नाही...पण नहुषानेही यद्न्यधर्मीय ऋषिंना छळले म्हणुन त्यालाही ठार मारण्यात आले. त्याचा मुलगा ययाती. ययातीने असुरांचा गुरु शुक्राचार्य (भ्रुगूवंशीय) याची कन्या देवयानीशी तसेच असूरसम्राट व्रुषपर्वा याची मुलगी शर्मिष्ठा यांशी विवाह केला. देवयानीपासुन त्याला यदु हा पुत्र झाला. यदु हे पुढे यादव म्हणुन प्रसिद्धीला आले व त्याच वंशात श्रीक्रुष्णाचा जन्म झाला. शर्मिष्ठेपासुन त्याला अनु, द्रह्यु, व पुरु हे पुत्र झाले. ययातीनंतर पुरुला राज्य मिळाले हा इतिहास सर्वांना माहितच आहे.

यदु वंशातुनच हैहय ही शाखा निर्माण झाली. सहस्त्रार्जुन हा हैहय सम्राट त्यातीलच. परशुराम याच शाखेतील. हे सर्वच असूर संस्क्रुतीचे लोक. भारताची आद्य द्न्यात राजकीय संस्क्रुती निर्माण करणारे लोक. हैहय आणि परशुराम खुप झगडले पण त्यामागील कारणे सर्वस्वी सांस्क्रुतीक होती. भारत हे नाव देशाला मिळावे असा लोकोत्तर पुरुष निर्माण करणारे हे लोक. पुरुष, पुरंध्री, पूर, ही विशेषनामे याच पुर्वजांपासून निर्माण झाली आहेत हे विसरता येत नाही. यद्न्यधर्मियांशी सातत्याने संघर्ष करनारे हेच ते लोक. प्रसंगी यद्न्यधर्मियांनी त्यांचे खुनही केले आहेत. अगदी खुद्द पुरुरव्याचाही. पण त्यांचे महिमान आजही जीवित आहे...फक्त ते आपण डोळे उघडुन पहायला तरी हवे कि नाही?

क्रुष्णाबद्दल कोणाची मते काहीही असोत, पण तो इंद्रविरोधक होता. गीतेत त्याने ज्यांनाही आपले अंश मानले आहे ते असुरच आहेत. किंबहुना ज्या सांख्य तत्वद्न्यानावर गीतेची इमारत उभी आहे ते सांख्य तत्वद्न्यान प्रवर्तीत करणारा कपिल हा असूर प्रल्हादाचाच मुलगा होता. हे असुर संस्क्रुतीचे महिमान आहे. त्यावर कितीही वैदिक पुटे चढवली तरी ती कदापी पुसता येण्यासारखी नाहीत.

आणि आजही या सोमवंशाचे वारस, अनेक उच्च-नीच जातींत वाटले गेले असले, तरीही ते एका महान वारशाचे पाईक आहेत हे विसरता कामा नये.

4 comments:

  1. सुंदर लेखसुंदर लेख

    ReplyDelete
  2. खूपच उत्तम लेख आहे
    सर माझा एक प्रश्न आहे अपेक्षा आहे तुमच्याकडून उत्तराची
    तुमचे नेमका कोणता दृशिकोन आहे ? संभाजी ब्रिगेडचे तुम्हाला नेमके काय खटकते?
    मि काही तुमच्या किंवा हरी नाराके सरांसारखा हुशार नाही
    तरी तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा ठेवतो.

    ReplyDelete
  3. संजय जी
    या ठिकाणी जो विषय चालला आहे तो ब्रीगेड वाल्या लोकांच्या (मेंदूच्या )आवाक्या बाहेरचा आहे.
    तुमच्या संभाजी ग्यांग ला मेंदू नसतोच !
    आता उरले दोन मुद्दे
    एक - हरी नरके हे हुशार आहेत हे कोणत्या वेड्याने तुम्हाला सांगितले.?
    तो एक ठिसूळ , आरक्षित ,खुर्चीला चिकटलेला प्राणी आहे !
    ढोंगी आणि चिकटू !गवऱ्या आणि लाकडे या पलीकडचे सगळे फुले नावाची किमया १.
    त्यानातरी इतके महत्व का देव जाणे !
    दुसरा - तुम्ही मंदबुद्धी -तुम्हाला याचा काय उपयोग ?तुमची बुद्धी गुढग्यात म्हणतात लोक ते खरे आहे.
    आणि एक काम करा
    हा लेख तुम्हाला का आवडला ते क्रमाने सांगा. उगीच त्या नेअके सारख्या साब्दांच्या फुलबाज्या नकोत !

    ReplyDelete
  4. "हैहय आणि परशुराम खुप झगडले पण त्यामागील कारणे सर्वस्वी सांस्क्रुतीक होती."

    खरं की काय? मग परशुरामाने एकवीस वेळा क्षत्रियांची हत्या केली हे शेकडो वर्षे ओरडून का सांगितले गेले?

    तुम्ही ज्यांना "वैदिक" किंवा "यज्ञधर्मीय" म्हणता ते आजही ह्याबद्दल अभिमानाने चर्चा का बरे करतात?

    हे "वैदिक" किंवा "यज्ञधर्मीय" समाजातील लोक कृष्ण आणि इतर अवैदिक देवतांना परशुरामापेक्षा मोठे मानायला तयार आहेत काय? जर नसतील तर मग अवैदिक समाजावर परशुरामाचे महात्म्य लादण्याचा उपद्व्याप कशासाठी?

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...