Sunday, July 24, 2011

सांख्य तत्वद्न्यान: थोडक्यात परिचय

भारतीय संस्क्रुतीत सहा दर्शने अत्यंत महत्वाची मानली जातात, त्यापैकी एक म्हणजे सांख्य दर्शन. या तत्वद्न्यानाचा प्रवर्तक म्हनजे कपिल मुनी. हा असुर प्रल्हादाचा पुत्र. भग्वद्गीतेत श्रीक्रुष्णाने "मुनीनां कपिलास्मि" म्हणुन त्याचे अभिवादन केले आहे. कपिलाने प्रवर्तीत केलेले सांख्य दर्शन पुढे त्याचा मुख्य शिष्य आसुरी याने प्रचारीत केले. या तत्वद्न्यानालाच सांख्ययोग असेही म्हनतात.

या तत्वद्न्यानाला सांख्य म्हटले जाण्याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे सांख्यांनी विश्वनिर्मिती व जीवनासाठी २५ विभिन्न तत्वांची कल्पना केली आहे. दुसरे व्युत्पत्ती अशी कि विवेकद्न्यान हेच या तत्वद्न्यानात महत्वाचे मानले गेले असल्याने त्यास सांख्य म्हतले जाते. हे दर्शन भगवद्गीतेच्या निर्मितीपुर्वी किमान १००० वर्ष आधी आस्तित्वात आले.

या तत्वद्न्यानाची महत्ता म्हणजे ईश्वरी सार्वभौम सत्ता यात ठोकरून लावण्यात आली असून तत्वेच विश्वाच्या निर्मितीचे कारण मानन्यात आले आहे. प्रक्रुती व पुरुष हीच आद्य दोन मुलतत्वे आहेत व प्रक्रुती ही जड असून पुरुष हा चेतन आहे असे मानण्यात आले आहे. यात पुरुष म्हणजे धनात्मक उर्जा तर प्रक्रुती म्हनजे ऋणात्मक उर्जा असे महत्वाचे वैद्न्यानिक ग्रुहितक धरण्यात आले आहे.

हे तत्वद्न्यान संक्षिप्तपणे असे आहे....

१. जर जगातील सर्वच पदार्थ सीमित (Limited) आणि परतंत्र (dependent) असतील तर त्याचे मुलकारण मात्र असीमित (unlimited) व स्वतंत्र (independent) असले पाहिजे. आजही विश्व सीमित असले तरी उर्जा मात्र असीमित आहे या निष्कर्षाशी भौतिकविद पोहोचले आहेत.

२. प्रत्येक पदार्थात सत्व, रज, तम हे गुण द्रुष्टीस येतात. आणि प्रत्येक पदार्थ हा सुख, दु:ख वा मोह उत्पन्न करणारा आहे. याचाच अर्थ ही सर्व वैशिष्ट्ये एकाकार असनारे मुलकारण कोठेतरी असले पाहिजे.

३. प्रत्येक कार्य हे कारणात अव्यक्तपणे दडलेले असते. हे जग म्हनजे अन्य काही एक नसून असंख्य कार्यांचा एक समूह आहे. या कार्यांत जे कारण अव्यक्त रुपाने असते ते म्हणजेच प्रक्रुती होय.

४. कोणतेही कार्य कोणत्यातरी कारणातुन निर्माण होते आणि शेवटी कार्य हे कारणातच विलीन होते. प्रक्रुती हीच सर्व कार्यांचे कारण आहे. विश्वाची निर्मिती या प्रक्रुतीमुळेच होते. प्रक्रुती (कारण) ही अद्रुष्य पातळीवर वावरत असून विश्व (कार्य) मात्र द्रुष्य असते. या दोहोंच्या संयोगाने विश्व निर्माण होते व जेंव्हा कार्य हे कारणाच्या दिशेने उलट वाटचाल सुरु करते तेंव्हा विश्व लय पावते.

एकच घटना दु:ख, आनंद वा उदासीनता निर्माण करू शकते आणि ते त्या घटनेत सहभागी असणा-यांच्या स्वाभाविक अपेक्षांवर अवलंबून असते असेही हे दर्शन सांगते आणि ते महत्वाचे आहेच. जे गुणधर्म कार्यात असतात तेच कारणातही असल्याने मुलतत्वात शेवटी एकाकारता सिद्ध होते. या सत्व-रज-तम यांतील साम्यावस्था म्हणजे प्रक्रुती होय असेही हे दर्शन सांगते. तसेच द्न्यानाची उत्पत्ती ही एकटी स्वतंत्रपणे होत नसून ती आत्मा (चैतन्य) आणि बुद्धी यांच्या सहायातेनेच होते. पुरुषाला बुद्धी, मन, इंद्रिये आणि चैतन्य याच्या समागमाने द्न्यान होते.

सर्वात महत्वाचे म्हनजे सांख्य तत्वद्न्यान हे भावनीक नाही. ते श्रद्धेवर अवलंबुन नसून निखळ बौद्धिक तर्कशास्त्रे व वास्तव अनुभव यावर आधारीत आहे. येथे कर्ता-करवित्या परमेश्वर या संद्न्येला महत्व नसून मानवी प्रद्न्या आणि तर्काच्या बुद्धीनिष्ट पातळीवर जीवनाचे, स्रुष्टीचे अवगाहन महत्वाचे मानले गेले आहे.

पुढे ही तर्कनिष्ठ परंपरा मागे पडली आणि सांख्य दर्शनही. भारत देश हा श्रद्धाळु अंधविश्वासू समुदाय बनला आणि विद्न्यानाची झेप थांबली ती थांबलीच. ईहवाद मागे पडला आणि काल्पनिक परलोकवादाच्या मागे सारे लोक लागले. या देशाची प्रागतीक गती खुंटली ती खुंटलीच. आजही कपिलाचे हे तत्वद्न्यान पुढे नेले गेले पाहिजे...फक्त तात्विक पातळीवर नव्हे तर आचरणात. आज विद्न्यानात मानले जाणारे महत्वाचे सिद्धांत बीजरुपात का होईना , सांख्य दर्शनात आढलतात याबद्दल आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे आणि त्या बुद्धीनिष्ठ तत्वद्न्यानाची आपण कास सोडली याबद्दल शरमही!

10 comments:

  1. हा चार्वाक तत्त्वज्ञानाचा जमाना आहे. सांख्य तत्त्वज्ञान समजून घेण्याइतकी मानसिक तरलता चार्वाकाला मंजूर नाही. अशा तरलतेला तो भ्रमिष्टपणा मानतो

    ReplyDelete
    Replies
    1. सर,
      खूपच छान लेख.......
      जर सांख्य तत्वज्ञान गीतेपुर्वी १००० वर्षे आधी झाले, गीता, महाभारत या मध्ये सांख्य तत्वज्ञानाचा गौरवपूर्ण उल्लेख आलेला आहे.......
      तर असे तत्वज्ञान, वेद, उपनिशीद, पुराने, लोकायत यांच्या निर्मितीचा कार्यकाल कळेल का ?

      हे ग्रंथ, तत्वज्ञान, जीवन पद्धती, संस्कार, रूढी, धर्म, पंथ हे कोणा नंतर कोण आणि कोणाच्या प्रभावाने किव्हा विरोध करण्यासाठी कोणाची निर्मिती कोणी केली ह्याचा एखादा लेख लिहिला तर
      फार बरे होईल......

      Delete
    2. संजय जी,
      आपण यामागोमाग श्रेष्ठ तत्वज्ञ चार्वाक यांच्या बद्दल लिहिले पाहिजे.
      कारण
      शरयू सारख्या असंख्य वाचकांचा असा भ्रम दिसत आहे की चार्वाक हा कुणीतरी "रात गाई बात गई " असे मानणारा सामान्य माणूस होय.
      आपण जर त्यांना सांगितले की ( मुळात आपणास मान्य असेल तरच ) चार्वाक हे लोकायत तत्व ज्ञान असून एकेकाळी त्याला
      सांख्य आणि इतर अद्वैत -द्वैत-विशिष्ठाद्वैत इतकेच मानले जात होते.
      आणि हे अजिबात भोगवादी नसून काकणभर सांख्य तत्वज्ञाना पेक्षा उच्च मानले गेले आहे !

      Delete
  2. सम्यक ख्याती इति सांख्य
    रचयिता-कपिल मुनि
    दर्शन तत्व-सत्कार्यावाद
    असद्कारणात, उपादान ग्रहणात ,सर्व संभव अभावात,शक्तस्य शक्य कारणात, कारणाभावात
    च सत्कार्याम.

    ReplyDelete
  3. तदेतत्सर्वं बहस्पतिनाप्युक्तम् -

    तर हे सर्व बृहस्पतीनेही म्हटले आहे

    न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
    नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥१॥

    स्वर्ग नाही, मोक्ष नाही, पारलौकिक असा आत्माही नाही,वर्ण, आश्रम आदींची कर्मकांडे फळ देणारी नाहीच नाहीत.

    अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम् ।
    बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥२॥

    अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड (साधूंची क्रिया), शरिराला राख फासणे - बुद्धी आणि पौरुष नसलेल्यांच्या उपजीविकेसाठी विधात्याने (या सर्व गोष्टी) निमाण केल्या आहेत.

    पशुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
    स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥३॥

    ज्योतिष्टोम यज्ञात मारलेले जनावर जर स्वर्गात जाते, तर यजमान स्वतःच्या पित्यालाच का मारत नाही?

    मृतानामपि जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम् ।
    निर्वाणस्य प्रदीपस्य स्नेहः प्रज्वलयेच्छिखाम् ॥४॥

    मेलेल्या जिवांची तृप्ती जर श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल, तर तुपाने विझलेल्या दिव्याची ज्योतही मोठी होईल.

    गच्छतामिह जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम् ।
    गेहस्थकृतश्राद्धेन पथि तृप्तिरवारिता ॥५॥

    येथे प्रवासाला जाणार्‍या जिवंत‍या लोकांसाठी शिदोरी बनवणे व्यर्थ म्हणावे - घरच्याघरी केलेल्या श्राद्धाने आयतीच रस्त्यात तृप्ती होईल.

    स्वर्गस्थिता यदा तृप्तिं गच्छेयुस्तत्र दानतः ।
    प्रासादस्योपरिस्थानामत्र कस्मान्न दीयते ॥६॥

    दानामुळे स्वर्गात असलेल्यांची तिथल्या तिथे तृप्ती होत असेल, तर इमारतीत वरच्या भागात राहाणार्‍यांसाठी अन्न येथे (खाली) अन्न का देत नाहीत?

    यावज्जीवेत्सुखं जीवेदृणं कृत्वा घृतं पिबेत् ।
    भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥७॥

    जोपर्यंत जगावे, सुखाने जगावे, कर्ज घेऊन तूप प्यावे. राख झालेल्या देहाचे पुन्हा येणे कुठचे?

    यदि गच्छेत्परं लोकं देहादेव विनिर्गतः ।
    कस्माद्भूयो न चायाति बन्धुस्नेहसमाकुलः ॥८॥

    देहच सोडून गेलेला जर परलोकात जात असेल, तर नातलगांच्या जिव्हाळ्यामुळे तो वारंवार परत का येत नाही?

    ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विहिस्त्विह ।
    मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित् ॥९॥

    तर उपजीविकेसाठी ब्राह्मणांनी उपाय सांगून दिले आहेत, नाहीतर येथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापि अस्तित्वात नसती.

    त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
    जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम् ॥१०॥

    वेदांचे कर्ते भंड, धूर्त, आणि निशाचर आहेत. जर्भरी, तुर्फरी, वगैरे (निरर्थक) बोल पंडितांकडून ऐकल्याचे आठवतच असेल.

    अश्वस्यात्र हि शिश्नं तु पत्नीग्राह्यं प्रकीर्तितम् ।
    भण्डैस्तद्वत्परं चैव ग्राह्यजातं प्रकीर्तितम् ।
    मांसानां खादनं तद्वन्निशाचरसमीरितम् ॥११॥

    (अश्वमेध यज्ञात) पत्नीने घोड्याचे शिश्न घ्यावे हे माहीतच आहे. (आणखी) याहून वेगळ्या गोष्टी घ्याव्यात असे भंडांनी सांगितलेलेही प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे मांस खाण्याचे विधीही निशाचरांनी निर्माण केलेले आहेत.

    -sarv darshan sangrah by madhvacharya about "lokayati"..this is related "darshan" to charvak......charvak is most realistic person...and founder of equalization movement...but no one called "Padadalit"..take cognigence of him....when we talk about manu and parshuraam we must talk about this "darshan"

    ReplyDelete
  4. संजय सर
    आमच्याकडे नेहमी वाद होतो की आपणाकडे इतका लेखनाचा प्रचंड आवाका आहे ,
    तर आपण जाहीर भाषणे का देत नाही - कारण तसे केल्याने आपला संदेश आणि ज्ञान सर्व थरातील लोकांकडे पोहोचेल !
    जे वेळ काढून येतात ते आपल्या हेतूबद्दल शंका नसणारे असणार ,
    जे येणार त्यांना आपल्या बुद्धिमत्तेबद्दल श्रद्धा असणार !
    जे येणार त्यांना आपल्या अभ्यासाबद्दल खात्री असणार !
    त्यामुळे इतर प्रचारकी भाषणांपेक्षा आपले भाषण हर तऱ्हेने श्रवणीयच असणार !
    नेट -ब्लोग यामुळे पळपुट्या घाबरट अतिरेकी लेखकांची झुंबड उडाली आहे .त्यांच्यात एखाद्या लपून दगड फेकणाऱ्या
    नाठाळ मुलाची प्रवृत्ती वाढीस लागलेली असते ! आम्ही संभाजी ब्रिगेड किंवा खेडकर ,पाटील ताई यांचे किंवा संघ सनातनी लोकांचे लिखाण पाहतो त्यावेळेस आपली प्रकर्षाने आठवण होते.
    अशा वृत्ती आता रस्त्यावर पुस्तक रूपाने सीडी रूपाने येत आहेत.
    त्याला प्रत्युत्त्तर नाही दिले तर ती फार मोठ्ठी चूक ठरेल.
    एकेकाळी प्रा.कुरुंदकर,ग.प्र.प्रधान,नाथ पै,मधु लिमये, शिवाजीराव भोसले ,मिनू मसानी,
    आचार्य अत्रे,पु.ल..एसेम.श्री.अ.दडांगे.अशा थोरांची भाषणे ऐकून हे कान तृप्त झाले आहेत.

    आपण कै.प्रा.शिवाजीराव भोसले यांचे भाषण ऐकलेच असेल !
    आपण कै .नरहर कुरुन्दकर यांच्या सान्निध्यात कधी आलात की नाही ते माहीत नाही .
    आपण प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन ऐकलेच असेल.
    या तिघांचे उदाहरण आत्ताच्या काळात अलिकडले आहे म्हणून दिले.
    अभ्यास,सराव,आणि मांडणी याबद्दल त्यांना तोड नाही.
    हे सर्व आपणास नक्की जमेल.
    आपल्या भाषणांमुळे आपल्याला एक वेगळा चेहरा मिळेल !
    आपल्या विचारांना नवीन माध्यम मिळेल.
    आज महाराष्ट्राला अशा कार्याची कमतरता भासते आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. शकुनजी, व्याख्याने मी अधून मधून देत असतो. आयोजक कोणत्या ना कोणत्या विचारधारांशी संबंधीत असल्याने ते मला टाळतात वा काहीवेळा मलाच त्यांना टाळावे लागते. त्यामुळे माझ्या व्याख्यानांचे प्रमाण कमी आहे. समविचारी तटस्थ लोकांचे प्रमाण (संयोजक) कमी असल्याने असे घडत असावे. शिवाय मी जास्त कोणात मिसळतही नाही व स्वत:हून कोणाला बोलतही नाही हेही कारण असावे. तरीही काही लोक आवर्जून बोलवतात हेही नसे थोडके. आपण अगत्याने वरील प्रतिसाद दिलात याबद्दल आभार.

      Delete
  5. संजयजी,

    थोडेसे मला जाणवणारे सांगते.
    आपण म्हणता तसे बऱ्याच मान्यताप्राप्त लिखाणात प्रक्षिप्त भाग असणारच.
    जणू तसे असणे हि त्या पुस्तकाच्या लोकप्रियतेची पावतीच म्हणावी लागते.
    ऐतिहासिक आणि त्तत्वॆक रचनांमध्ये हे प्रकार जास्त घडत असतील.

    सखा हा शब्द माझ्यामते फार अलीकडचा वाटतो.पण,

    त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव
    किंवा
    माता रामो मत्पिता रामचन्द्रः
    स्वामी रामो मत्सखः रामचन्द्रः अशा रामरक्षेतील ओळी वाचल्या की
    त्या रचनांच्या काळाबद्दल - त्यांच्या प्राचीनतेबद्दल शंका येते.
    माझ्यासारख्या अनेक जणांना अशा गोष्टी जाणवतात.
    असे म्हटले जाते की
    भगवद्गीता पण मूलतः कमी अध्यायांची होती.
    नंतर त्यात भर घातली गेली.
    तुम्ही डोळसपणे अनुष्टुभ किंवा इतर छंदांच्या अनुरोधाने जर या रचनांचा काल आणि त्या वेळेस ते ते छंद अस्तित्वात होते का -
    किंवा कधी ते वापरात आले त्याचा शोध घेतला तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो.
    ऋग्वेद रचनेत जास्त कोणते छंद आले आहेत त्यावर आपण काही प्रकाश टाकू शाकाक का ?
    ते जाणायला मी उत्सुख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मूळ गीता हि केवळ ६६ श्लोकांच्या आसपासची आहे ज्यात २ रा अध्याय पूर्ण होता व बाकीच्या आद्ययांमधले काहीसे श्लोक | आजकाल समाजात श्री कृष्णा जी ना भगवान मानल्या कारणाने युद्धाच्या वेळी म्हणले जाते कि १५ मिनटात गीता सांगितली मुळात कोणताही पकड विद्वान हा १५ मिन १५० वर श्लोक सांगू च शकत नाही त्याकाळी असलेली संस्कृत भाषा यावरून समजावे कि अर्जुनास काव्य रूपात सांगितलेले श्लोक हे समजले हि असावेत पण आजकाल च्या लोकांना समजत नसल्याने त्याचे अर्थ बनवले जातात खोलात खोल आणि स्वार्थ हि साधण्यासाठी जगाची काहीही मान्यता असेल पण वेदिक मान्यते अनुसार ५१०० वर्ष झाली आता महाभारताच्या त्यानांतर याच ६६ श्लोकांच्या गीतेचे इंग्रजांच्या कला पर्यंत अनेक वेळा विकृतीकरून कृष्णा ला च देव बनवले गेले असे बरेच विरोधाभाषित श्लोक सापडतील पण गीते तीळ कोणत्याच श्लोकात कृष्णा स्वतःला ईश्वर म्हणवून घेतच नाही हि वस्तू स्थिती आहे त्यामुळे १५ मिन जेमतेम आजची व्यक्ती जास्तीतजास्त १०० श्लोक म्हणेल ( मॅक्स ) ६६ श्लोक या कारणाने कारण ते काव्य रूपात सांगितले आहेत. त्यामुळे आजची ७०० श्लोकांची गीता हि पूर्ण पाने बदलेली आहे कारण यजुर्वेदात ४० व्या कांडावर आधारित ती गीता होती. कोणतीही व्यक्ती १०० च्या वर श्लोक ते हि युद्ध काळात सांगू शकत नाही ७०० चा विषय तर लांबच | तर्काच्या कसूतीत आणि अष्टाध्यायी पद्धतीने जेवढे श्लोक वाचतील तेवढेच खरे समजावेत |

      Delete
  6. संजयजी,
    भगवद्गीतेमध्ये अनेक वाद वेगवेगळ्या अध्यायांमध्ये दाखवले आहेत.
    द्वैत , अद्वैत, सांख्य , याबद्दलच्या चर्चा आल्या आहेत.
    विश्वरूप दाखवताना वेगळीच भूमिका आहे !
    तसेच
    भगवान ऊवाच असे म्हणत काही अध्यायांची मांडणी आहे. तर काहीवेळा प्रथम पुरुषी एकवचनी मांडणी आहे !.
    त्याबाबत अशी प्रत्येक वेळी वेगळी मांडणी का झाली असावी ते आपण विस्तृतपणे सांगाल का ?
    धन्यवाद !

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...