Wednesday, October 5, 2011

दसरा हा स्रुष्टीजन्माचा अद्भुत सोहोळा!

दसरा हा स्रुष्टीजन्माचा अद्भुत सोहोळा आहे. क्रुषीवल संस्क्रुतीने प्राचीन काळी या उत्सवाची सुरुवात केली. जगन्माता नऊ महिने स्रुष्टीगर्भ धारण करुन दहाव्या महिन्यात स्रुष्टीचे स्रुजन करते ही मुलभुत कल्पना या सणामागे आहे. नवरात्रीचे नऊ दिवस हे नऊ महिन्यांचे प्रतीक बनता. घट्स्थापना ही स्रुष्टीगर्भाची शिव या चैतन्यातुन झालेली विश्वनिर्मितीची सुरुवात असते. घट हे जगन्मातेच्या ओटीपोटाचे प्रतीकरुप आहे. एका अर्थाने दसरा म्हणजे आपण स्रुष्टीचा जन्मसोहोळा साजरा करत असतो.

या उत्सवाची सुरुवात क्रुषीवल संस्क्रुतीने करणे स्वाभाविक आहे. वर्षाकाल सरत असता, सुगीचा हंगाम ओसरत असता, नव्य चैतन्याची चाहुल मानवी मनाला लागणे स्वाभाविक आहे. आदिशक्ती ही आपल्या पुर्वजांनी भुमीच्या रुपात पाहिली. तीच मानवी जीवनाची गंगोत्री, आधार आणि अंतिम विश्रामस्थळ. मानवी जीवनाचे स्रुष्टीनियमांवर आरोपन प्राचीन काळी मानवाने केले. त्याला एक उदात्त अर्थ दिला आणि आपल्या जीवनप्रवाहाला स्रुष्टीशी नाळ जुळवुन घेणारी व्यापक दिशा दिली.

त्या अर्थाने दसरा हा एक महन्मंगल उत्सव आहे. या सणाला रावणवधाचे मित्थक जोडुन त्याचा मुलार्थ मात्र घालवुन टाकला गेला आहे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. रावणवधाचा दस-याशी काडीइतकाही संबंध नाही. दस-याला रावणवध झाला असता तर आधीच्या नवरात्रींचे प्रयोजनच रहात नाही हे सांस्क्रुतीक भेसळ करणा-यांच्या लक्षात आलेले दिसत नाही.

पावसाळा संपला कि लष्करी मोहिमा सुरु होत. पावसाळ्यात सहसा युद्धे केली नसत. शेतकरी हेच सैनिक असल्याने पानकळ्यात त्यांना शेतीकडे लक्ष देणे भाग होते. हंगाम संपला कि मोहिमांत सामील होण्याचे आदेश येत. सीमोल्लंघन हा त्याचाच एक प्रतिकात्मक भाग या स्रुष्टीजन्माच्या सोहोळ्याशीही नंतर जोडला गेला आहे.

स्रुष्टीचा जन्म खरोखर कसा झाला याचा शोध विद्न्यान घेत राहीलच. पण क्रुतद्न्य क्रुषिवलांनी स्रुष्टीजन्माचे एक मित्थक रचले आणि हजारो वर्ष श्रद्धेने ते जपले हे महत्वाचे आहे.

माझ्या सर्व वाचकांना दस-याच्या मन:पुर्वक शुभेच्छा!



7 comments:

  1. make lot sense...far better than other myths..good read.

    ReplyDelete
  2. संजय सर, तुम्ही फ़ेसबुक सोडल्यापासुन तिथे नुस्त फ़ेसच बघुन येत आहे. वैचारिक चर्चाच बंद झाली आहे.परत जात-पात चर्चा सुरु.
    हा लेख वाचला. पण रामाचा आणि रावण वधाचा ह्यात कस काय संबंध नाही? जर आपण फ़क्त तर्का नुसार गेलो तर वरील तुमचे विधान हे सत्यच आहे. पण जर तुम्ही वामन-बळि,परशुराम ह्यांच अस्तित्व मानतात तर रामाच अस्तित्व का नाकारतात. माझ्या वाचनानुसार, रामाने ९ दिवस दुर्गेची पूजा केली होती रावणाला मारण्यासाठी.. ह्यातला चमत्कारी भाग सोडला तर रामाने खरेच मारले असेल रावणाला दस-या च्या दिवशी.मग ह्याला नाकारता कस येऊ शकत?

    ReplyDelete
  3. हिमांशुजी, आपणास येथे भेटुन खुप आनंद झाला. मी रामाचे आस्तित्व नाकारत नाही, पण दस-याला रावणवध झाला हे मित्थक नाकारतो. वाल्मिकी रामायण दसरा सिद्धांताचे समर्थन मुळीच करत नाही. रामाने ९ दिवस दुर्गेचे व्रत केले असेही कोठे म्हणत नाही. नंतर कधीतरी दस-याला अजुन मित्थके जोडली गेली आहेत. उदा. महिषासुराचा वध वगैरे. पण हा मुळात स्रुष्टीजन्माचा सोहोळा आहे आणि त्याचे मांगल्य अधिक आहे. वध-म्रुत्यु या हिंसक घटनांपेक्षा स्रुजनाचा सोहोळाच श्रेष्ठ आहे असे मला वाटते. आणि तसेच या सणाचे मुळ रुपही आहे. या रुपामुळे या सणाला नुसते प्रादेशिक नव्हे तर वैश्विक रुप मिळु शकते.

    ReplyDelete
  4. सोनवणी सर, तुम्ही रामाच्या अस्तित्वाचा एक तरी सबळ पुरावा दाखवावा. कोणत्या पुस्तकात काय लिहिले आहे तो खूप कमी वेळा पुरावा म्हणून गृहीत धरला जावू शकतो. आज आपण जसे एखाद्या पुस्तकाला पुरावा धरून दुसरे पुस्तक लिहिता आणि तिसरीच गोष्ट करू शकतो....तसेच रामायण हे पण एक साहित्य करीतु आहे. रामासेल तर तो हा नवे रावण पण हा नाव्ह्वे. रामायण हि फक्त एक दंत कथा आहे. आणि महाभारत विषयी.......महाभारत जर ५००० किवा वर्ष पूर्वी झाले तर हडप्पा आणि मोहन्जोधाडो मध्ये त्याचे अवशेष का आढळत नाहीत? परशुराम रामायणात पण येतो, महाभारतात पण येतो.........ते कसे...तुम्ही परशुराम अमर आहे हे मानता का मग.............? माफ करा महाभारात आणि रामायणात मिसळ केल्या बद्दल.....पण ह्या गोष्टींचा आपण वेगळा विचार करू शकत नाह...................ह ओअजून एक .....रावणाला बोद्धीसात्वा म्हणण्याचे एक नवीनच फॅड निघाले आहे त्या विषयी जरा मार्गदर्शन करावे............बुद्धाचा काल २००० वर्ष पूर्वी पर्यंत जातो...मग राम्यानात बुद्ध विचार कसा................रावण बुद्ध कसा?

    ReplyDelete
  5. विकासजी, या आपल्या प्रश्नांनी अनेक मजेशीर बाबी सांगायची संधी मिळाली आहे. पहिली बाब म्हनजे कलक्रमानुसार रामायण आधी घदले कि महाभारत यावर मी महाभारत आधी आणि रामायण नंतर असे याच ब्लोगवर अन्यत्र लिहिलेच आहे. रामाचे आस्तित्व होते काय? या प्रश्नाकडे वळण्याआधी रामायण कशावर आधारीत आहे हे पाहिले पाहिजे. म,उख्य म्हणजे मुळ रामकथा ही एक साधे वीरकाव्य (ballad) होते, आणि त्याचा कर्ता आज आपलुयाला माहित नाही. वाल्मिकीने जे रामायण लिहिले त्याचे नांव होते पौलत्स्यवध. आपल्याला आज तेही रामायण उपलब्ध नाही. आज जे रामायण आहे ते अत्यंत भाकडकथांनी भरलेले आहे आणि त्याचे शेवटचे संस्करण इ.स.च्या चवथ्या शतकात झाले आहे...त्यामुळे त्यात बुद्धाचे तत्वद्न्यान आले नाही तरच नवल. पण राम (रामायणात वर्णील्याप्रमाणे नव्हे पण काहे अंशी तसा) झाला कि नाही तर त्याचे उत्तर आहे होय. कारण वीरकाव्ये प्राय: काल्पनिक नसतात तर होवुन गेलेल्या एखाद्या योद्द्याच्या पराक्रमाचे , अतिशयोक्त असले तरी वर्णण त्यात असते. महाभारतातही बौद्ध धर्म डोकावतो त्याचेही कारण हेच् आहे कि आज उपलब्ध असनारे महाभारत साधारनपणे ज्या कालात रामायणाचे शेवटचे संस्करण झाले त्याच काळातील आहे. दुसरी बाब म्हणजे बौद्ध रामायणे आहेत तशीच जैन रामायणेही आहेत आणि तीही ब-यापैकी पुरातन आहेत. गम्मतीचा भाग असा कि बौद्ध रामायणात राम बौद्ध धर्मीय असतो त्साच रावणही. हेच जैन रामायणातही आहे. कथांत सोयिस्कर फरक आहेच. उदा. जैन रामायणात सीता त्यागानंतर ती पुंड्रपुर येथील जैन राजाकडे आश्रय घेते व लव कुश हे जैन बनतात. रावणाला बोधीसत्व मानतात कारण लंकावतार सुत्त या ग्रंथात चक्क गौतम बुद्ध व रावणाचा प्रश्नोत्तर रुपी तात्विक संवाद असुन रावणाने महाबोधी प्राप्त केली असे स्पष्ट म्हटले आहे. अर्थात रावणाचा उपयोग धर्मप्रसारासाठी केला आहे. तसेच मिलिंद प्रश्नांबाबत म्हणता येते. हे पुस्तक वाचले तर त्यातील बुद्ध, तथागत, भंते, विहारादि शब्द वगलले तर चक्क्क हिंदु धर्मच सांगितला आहे. रावणाला बोधीसत्व का म्हणतात हे लक्षात आले असेल...पण ते वास्तव आहे काय? उत्तर आहे नाही. रावणाचा...काल्पनिक असला वा खरा असला समजा तरीही बौद्ध धर्माशी संबंध असु शकत नाही. परंतु अर्धवट माहितीने पिडीत लोक अशा भाकडकथांवर विश्वास ठेवतात.

    आता पुरातन अवशेषांबद्दल. महाभारत आताच्या दिल्लीच्या परिसरात घडले आणि कुरुक्षेत्रावरील उत्खननांत तत्कालीन भरपुर अवशेष मिलाले आहेत. हदप्पा-मोहेंजोदडोचा प्रदेश सप्तसिंधुच्या खो-यात असल्याने तेथे महाभारतीय अवशेष कसे मिळणार? रामायणाचे अवशेष मिलणे शक्यच नाही कारण राम हा एक छोटा राजा होता आणि त्याची अयोद्ध्या नेमकी कोनती हे कळायचे आज साधन नाही. आताच्या अयोद्धेशेजारुन शरयु नव्हे तर घोगरा नदी (चु,भु, देणे-घेणे...या क्षणी मी फक्त स्मरणावर लिहित आहे...)वाहते. शरयु खुप दुरुन वाहते. आधीच म्हटल्याप्रमाणे रामायणाचे बीज एका वीरकाव्यत असल्याने मुळ भुगोल वेगळा असुन नंतरच्या कवींनी तो भुगोलच कल्पनेने पालतला आहे हे उघड आहे. उदा. रामायणातील लंका म्हनजे श्रीलंका नक्कीच नाही हे आता असंख्य पुराव्यांनी सिद्ध झाले आहे. त्यामुळे कथित रामसेतुचे आस्तित्वही बाद होते. दुसरे असे कि याच ब्लोगवर माझा "असुर परशुय्रामाचे रहस्य" हा प्रदिर्घ लेख आहे...त्यात परशुराम चिरंजीव वा क्षत्रीयांचा २१ वेळा संहार करणारा नसुन नेमका कोण होता व परशुराम ही एकच व्यक्ती नसुन वंशपरंपरागत तेच पदनाम घेत चाललेली संस्था कशी होती हे विषद केले आहे. आपण तो लेख अवश्य वाचावा ही विनंती. धन्यवाद.

    ReplyDelete
  6. आपण माज़या प्रश्णासाठी एवढा वेळ काढून अतिशय मुद्देसुद उत्तर दिले त्या बद्दल धन्यवाद. शतशा: आभारी आहे.....बर्‍याच प्रमाणात शंका दूर होण्यासाठी मदत झाली.

    ReplyDelete
  7. लिखाण चांगले झाले आहे.
    आपल्या संस्कृतीचे हे वैशिष्ठ्य आहे कि ती मूलतः या जमिनीशी नाते सांगते.
    घटस्थापना -ते कोवळे कोंब , आणि पावसाळा सरतानाचा हा सुंदर निसर्ग !आपली संस्कृती फार पुरातन असल्यामुळेच इतका गोड विचार करू शकते.
    पण .
    वर्षभरात आपण एकदाच बळी राजाचे नाव काढतो.बलिप्रतिपदेला.
    दशावतारातला अत्यंत दुर्लक्षित असा हा अवतार आहे. वामन आला-३ पावले इतकी जागा मागितली - आणि संपले -
    देव तरी काय विचित्र -एक अवतार यासाठी वाया घालवला .परशुरामाने आईला ठार मारले - तरी तो अवतारी ?

    रामायण फार वेगळे आहे .जसा विचार करावा तसे आहे !

    १) माणूस नाती निर्माण करत होता , कुटुंब संस्था निर्माण होत होती , बळी तो कान पिळी असे न राहता - पत्नी आणि पती आणि विवाहसंस्था निर्माण होत होती,
    त्यावेळची हि साधी बाळबोध कथा असावी .एकाने दुसऱ्याची पत्नी पळवली तर तो गुन्हा आहे हे जाहीर करणारा हा अवतार आहे.

    २) कैकयी हि अतिशय धोरणी सेनापती आणि उत्तम राज्यकर्ती होती.त्या काळचा त्या वर्णाचा त्यांचा समाज इतरत्र पसरवण्यास यज्ञ हा एक मार्ग होता.उत्तरेतून दक्षिणेत ती संस्कृती हात पाय पसरवत असताना , त्यांना अशी एक राजसत्ता हवी होती कि जी एकाग्रपणे यज्ञ संस्थेचे संरक्षण करायच्या निमित्ताने दक्षिणेत आपले पाय रोवेल .पण रावणाने त्यालाच चालेन्ज देत तेथील त्याच्या प्रस्थापित राजसत्तेचे सार्वभौमत्व अबाधित आणि निरंकुश आहे हे जाहीर करण्यासाठी रामाची बायको पळवली - रामाचा पाणउतारा करणारी हि घटना होती.दोन वेगळ्या संस्कृतीन्मधला हा लढा होता.

    ३) मत्स्य कूर्म वराह हे उत्क्रांती दर्शवणारे अवतार धरले आणि नृसिंह हा पहिला शस्त्र धरी अवतार मानला तर परशुरामाचा परशु हि पुढची पायरी !
    रामाचे धनुष्य हि त्यापुढील पायरी आणि सुदर्शन चक्र हि त्यापुढील पायरी .तसेच वामन नृसिंह च्या काळात घोडे किंवा अश्वदल दिसत नाही .परशुरामाचे संघटीत सैन्य दिसत नाही रामकाळात आणि कृष्ण अवतारात घोडे - रथ दिसतात - संघटीत सैन्य दिसते - कदाचित पगारी सुद्धा असेल -

    ४) एकंदरीत रामायणात एकमेकांच्या भावनाना छेद देणारी नाते संबंधांची मांडणी दिसत नाही .पण महाभारतात हीच गम्मत आहे कि कोणाचे नेमके काय चुकले ते ठरवता येत नाही आणि शेवटी सगळे
    नियतीचे हातचे खेळणे ठरतो.अगदी आंधळ्या धृतराष्ट्रा पासून ते विश्वदर्शन दाखवणाऱ्या श्रीकृष्णा पर्यंत !
    ५) या सगळ्यापेक्षा सध्या जो विचित्र प्रकार चालू आहे तो म्हणजे , जातीय आणि प्रांतीय दृष्टी कोनातून अगदी देव देवता आणि या महाकाव्यांचा विचार करत बसायचे-
    राम शबरी-राम अहिल्या - वालीहत्या - कृष्ण सुदामा -एका मंथरे मुळे- एका दासिमुळे रामायण घडले का ?करुणानिधी यांनी म्हणायचे कि राम घुसखोर होता ,जय ललिता यांनी रामसेतू रक्षा अभियान चालवायचे ! दिल्लीला रामलीला आणि रावण वाढ होतो त्याचा दक्षिणेत निषेध करायचा !हा ओंगळ प्रकार आहे .

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...