Saturday, April 14, 2012

मरणालाही चिंता वाटे....!

मरणालाही चिंता वाटे
जीवनालाही भय वाटे
अशी खिन्नता दाटुन येते
आभाळही मग रड रड रडते....
पडते...झडते...का? नच कळते!


येथुन तेथे...तेथुन येथे
वारा घालत सुनसान हेलपाटे
दिसतील येथे...दिसतील तेथे
व्यर्थची आशा...हिरवी राने न कोठे
व्यर्थ उसासे...व्यर्थची अश्रु...
कधी न समजे जावू कोठे?

ज्यांच्या जखमा ओल्या ताज्या
भळभळ वाहत रक्ताश्रु त्यांच्या
पोटी जावे घेण्या त्यांना तर
पिसाट लाथा घ्याव्या अंगावर
कारण तु ना त्यांच्या जातीचा
ना पातीचा ना मातीचा...मग स्पर्श तुझा का?

स्नेहांनाही असली बंधने...?

उगाच म्हटले मोडुन टाकु...तोडुन टाकु
उदास भिंती दुष्ट मनांच्या
जरा दाखवू कसे तयापार
उज्वल विगत अन आशा अनावर
भवितव्याच्या
पण नकोच आहे तोडाया त्या
सीमाभिंती पराजित मनांच्या
त्या असण्यात तयांचे जर
असेल स्वहित स्वार्थ अनावर
तर मग कसले तुटते बंधन...?
तोडील तो तर शत्रु नसे मग?

पण का वेडेपण दिधले मजला
नकळे निशिदिन का हे पारायण
थिजली माती भिजली माती मज रक्ताने
पण अविरत धडका का नियतीसही पण?
मरणही बावरुन उभे बाजुला
थक्क असा तो या वेडाला
जीवन स्तंभित असे उभे कि
कवटाळु वाटे त्या मरणाला...
जीवन म्रुत्यु...म्रुत्यु जीवन
एककार ते असती निरंतर
विभिन्नतेतही!

तरी खिन्नता...उदासीनता
ना म्रुत्युची...ना जीवनाची
अशीच आपल्या अबोधतेची
हे का झाले...ते का नाही
अशाच मुर्ख प्रश्नपणांची
सर्व व्यर्थता दाटुन येते
या जगतातील मनुष्यपणांची!

मग का जगतो मी?
म्रुत्यु दुर का?
ये... म्रुत्यु... कवटाळी मजला...
हे अगत्य निमंत्रण...

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...