Wednesday, May 30, 2012

माझ्या सर्व मित्रांना सविनय निमंत्रण
१ जुन २०१२ रोजी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे आघाडीचे विचारवंत प्रा. हरी नरके यांना पहिल्या महाराजा यशवंतराव होळकर सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. कोणताही जातीविद्वेष न ठेवता सर्व समाजाची पुरोगामी वैचारीक बैठक सम्म्रुद्ध व्हावी यासाठी ते गेली ३५ वर्ष अहोरात्र झटत आहेत. १ जुन रोजी ते वयाच्या ५०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हे औचित्य साधुन हा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला असून जातीय विद्वेषाने बरबटु लागलेल्या महाराष्ट्रीय जनतेचे प्रबोधन आता कोणत्या मार्गाने पुढे न्यायचे यावरही त्यात विचारमंथनही होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डा. सुधाकर जाधवर असणार असून डा. सु. दा. तुपे यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह व मानपत्र प्रदान केले जाणार आहे. या कार्यक्रमात सर्वश्री. शुद्धोदन आहेर, राजाराम पाटील व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित असणार आहेत.

हा कार्यक्रम उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशीव पेठ, खजीना विहीरीजवळ, पुणे येथे १ जुन १२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास आपली उपस्थिती आम्हास नक्कीच नवे बळ देईल.

धन्यवाद.

आपला,

संजय सोनवंणी

5 comments:

 1. हरी नरके सरांचे अभिनंदन!आपलेही हा उपक्रम चालू केल्याबद्दल अभिनंदन!

  ReplyDelete
 2. संजयजी - आपले कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आणि श्री. हरी नरकेंचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.
  {जातीविद्वेष न ठेवता सर्व समाजाची पुरोगामी वैचारीक बैठक सम्म्रुद्ध व्हावी}
  माझा आपल्याला आणि नरकेना पाठींबा राहील. पुरोगामी महाराष्ट्रात उभ्या राहत असलेल्या अतिरेकी जातीयवादींना आपण दोघांनी सक्रीय लेखनातून, भाषणातून आणि न्यायालयीन कारवाईद्वारेसुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जहाल, अतिरेकी, भडक विचारसरणीच्या पुढ्यात मावळ, समन्वयाची भाषा फिकी वाटते, कधी कधी आपण हरतो आहोत की काय असे वाटते. पण त्यावेळी आपण इतिहास लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार जगात आत्तापर्यंत जहाल विचारसरणीचा सरतेशेवटी पराभवच झाला आहे.

  कृपया सभेचा वृत्तांत आणि जमल्यास भाषणे आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध करा.
  =सस्नेह
  कोहम महोक

  ReplyDelete
 3. नरकेसरांची यू ट्यूबवरची भाषणे एकून असे नाही वाटत की गेले ३५ वर्षे ते जाती द्वेष न करता झटत आहेत .
  असो अत्यंत हुशार व्यक्तीमत्वास पुढच्या वाटचालीबद्दल अनंत शुभेच्छा . स्वतंत्र भारताला बलशाली करण्यासाठी आई भवानी त्यांना उदंड आयुष्य , संपत्ती , किर्ती व बुद्धिमत्ता देवो हिच माझी प्रार्थना .

  ReplyDelete
 4. प्रा. हरी नरकेंना अनंत शुभेच्छा. संजय सर, या निमित्ताने माझी तुमची भेट अवश्य होईल. बरेच दिवस झालेत, योग चालून आलाय...

  चैतन्य भुरे
  टिम ग्रंथद्वार

  ReplyDelete
 5. great thing.. keep it up . i fully suppot your mission regarding the
  {जातीविद्वेष न ठेवता सर्व समाजाची पुरोगामी वैचारीक बैठक सम्म्रुद्ध व्हावी}this. if possible i will try to come and attend such type of good event. we all shld support and encourange such a good peoples from the society .

  ReplyDelete