Sunday, June 24, 2012

नामदेवे रचिला पाया...


पंढरीची वारी हा वारक-यांसाठी एक आनंदसोहोळा असतो. त्या आनंदामागील कारणे ही फक्त भाविक असतील अथवा नसतील. पण ही एक परंपरा आहे हे तर नक्कीच आहे. वारकरी मंडळी द्न्यानेश्वरांना वारकरी संप्रदायाचे आद्य संत मानतात. किंबहुना "द्न्यानदेवे रचीला पाया...तुका झालासे कळस" अशीच आपली मान्यता आहे. या मान्यतेचे दोन अर्थ होतात...एक म्हणजे द्न्यानरायांपुर्वी वारीची प्रथाच नव्हती. दुसरा अर्थ होतो तो हा कि नामदेवांचा या संप्रदायाच्या उभारणीत कोणताही आद्य हातभार नाही. यातुन अजून निर्माण होणारा प्रश्न म्हणजे चोखोबाचा. एकाच समकालात गोरोबा, चोखोबा, जनाई असे अनेक बहुजनीय संत जर नामदेवाच्या मांदियाळीत येतात तेथे द्न्यानेश्वरांचा नेमका संबंध काय?

द्न्यानेश्वर हे कट्टर नाथपंथीय होते. योग हा त्यांचा साधनामार्ग होता. अमृतानुभव या त्यांच्या महनीय तत्वद्न्यानाने मंडित ग्रंथात शैव तत्वद्न्यान ठासुन भरलेले आहे. द्न्यानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिला. या ग्रंथात एकाही ठिकाणी द्न्यानेश्वरांनी विट्ठलाचा साधा उल्लेखही केलेला नाही. अगदी आद्य नमनातही.

राहिली द्न्यानेश्वरांच्या अभंगांची बाब. द्न्यानेश्वर एक कि किमान तीन याबाबत विद्वानांत वाद आहेच. पण त्या जंजाळात न जाता मी येथे एवढेच नमुद करतो कि द्न्यानेश्वरांचे म्हणुन जे अभंग आहेत त्यांचा समारोप "बाप रखमादेवू वरु विट्ठल" असा असतो. आता हे सर्वांना माहितच आहे कि द्न्यानेश्वरांच्या माता-पित्यांचे नांव रखुमाई- विट्ठल असेच होते. मी याबाबत द्न्यानेश्वरांचे महाराष्ट्रातील गाढे अभ्यासक डा. द.भि. कुलकर्णी यांना एक प्रश्न विचारला होता...तो असा...

"द्न्यानेश्वरांनी आपल्या अभंगांची समाप्ती आपल्या माता-पित्यांना उद्देशुन का केली नसेल? कारण एकाही अभंगात द्न्यानेश्वर समाप्ति वगळता विट्ठल भक्तीचा उल्लेख करत नाहीत."

यावर दभि म्हणाले होते..."तुझा तर्क योग्य आहे. पण तो सिद्ध करता येणे आज अशक्य आहे."

माझे म्हणने आहे कि हाच तर्क सिद्ध होतो कि द्न्यानेश्वर हे कधीही वारकरी संप्रदायाशी निगडीत नव्हते तर ते नाथ संप्रदायाचे अखेरपर्यंत अनुयायी होते. त्यांनी व त्यांच्या भावंडांनीही ज्या समाध्या घेतल्या त्या अगदी नाथ संप्रदायाला साजेशा. वारकरी संप्रदायात खरे तर समाधीची पद्धतच नाही. ती असुही शकत नाही.

उलट नामदेव लहानपनापासुन पंढरीच्या विठुरायाला परंपरेने नैवद्य देत होते. कारण नैवद्याचा अधिकार त्यांच्याच घराण्याकडे होता. याचा दुसरा अर्थ असा कि तेंव्हा विट्ठल मंदिरावर बडव्यांचा अधिकारच नव्हता. किंबहुना विट्ठल हा अखिल महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणुन  तोवर उदयाला आलेलाच नव्हता. आला असला तरी तो एखाद्या विशिष्ट मानवी समुदायांपर्यंतच मर्यादित होता. द्न्यानेश्वर जर वारकरी संप्रदायाचे असते तर द्न्यानेश्वर आणि नामदेवांची भेट पंढरपुरलाच खुप आधी झाली असती, पण दंतकथा सांगतात कि द्न्यानेश्वरांची किर्ती ऐकुन नामदेव द्न्यानेश्वरांना भेटायला आळंदीला गेले. म्हणजे दोन वेगळ्या संप्रदायांची तत्कालीन महनीये एकमेकांना भेटली. आणि याचाच दुसरा अर्थ असा कि द्न्यानदेवांचा वारकरी संप्रदायाशी काहीएक संबंध नव्हता. असता तर किमान वारीच्या निमित्ताने त्यांची भेट पंढरीलाच झाली असती.

आता द्न्यानेश्वर जर वारकरी संप्रदायाचे मुळात नव्हतेच तर त्यांनी नामदेवांबरोबर उत्तर भारतात एकदा प्रवास केला ही कथा खोटी ठरते. उपलब्ध पुराव्यांनुसार उत्तर भारतातील द्न्यानदेवांच्या यात्रेचा एकही पुरावा उपलब्ध नाही, नामदेवांचे म्हणावे तर त्यांची उत्तर भारतात असंख्य मंदिरे आहेत. द्न्यानेश्वरांचे एकही नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या तत्वद्न्यानाचा गौरव खुद्द नामदेवही करतांना दिसत नाहीत. याचे कारण द्न्यानदेव हे निकृष्ठ होते म्हणुन नव्हे तर नाथपंथीय तत्वद्न्यान आणि वारकरी समुदायाचे तत्वद्न्यान हेच विभिन्न होते. नाथ संप्रदायाही तसा जातीभेदातीत...पण द्न्यानेश्वर हे वर्णपद्धतीचे समर्थकच होते. नामदेवांना अखिल भारताने स्वीकारले...इतके कि त्यांच्या नांवाची जातच बनली. उतरेपासुन दक्षीणेपर्यंत नामदेव अवघा आकाशची झाला.

आता विट्ठल हा पौंड्र वंशीय पशुपालक, धनगर कुरुबांचा पुरातन राजा होता हे फक्त मीच नव्हे तर डा. रा. चिं. ढेरे सुद्धा सांगतात. पौंड्रंक विट्ठल म्हणजेच पांडुरंग विट्ठल हे पुन्हा सांगायलाच हवे काय?

आता विट्ठलाची वारी. ही परंपरा पुरातन अगदी जेंव्हा पौंड्रपुर तथा पंढरपुर पशुपालक धनगर-कुरुबांची राजधानी बनली तेंव्हापासुन पंढरीची वारी सुरु झाली. कधी? जेंव्हा या महाराष्ट्रात पशुपालन हाच महत्वाचा उद्योग होता आणि आपल्या राजांना दायभाग आणि कृतद्न्यता व्यअक्त करण्यासाठी हे धनगर-कुरुब-गवळी पंढरीची वाट चालत असत. पुढे सम्राट देव बनला. पण ती वाट थांबली नाही. आजही पंढरपुर जेथे स्थित आहे त्या सोलापुर जिल्ह्यात आणि सीमावर्ती कर्नाटकी प्रदेशात धनगर-कुरुबच बहुसंख्येत आहेत. नंतर जे कुणबी (शेतकरी) झाले तेही या पंढरीच्या रायाची...त्यांच्या प्राचीन सम्राटाची भक्ति आजही त्याच निष्ठेने करत असतात.

वारी पुरातन आहे. आज वारी स्वार्थी झाली असली तरी वारीच्या उद्देश्य एकच तो म्हणजे पंढरीच्या सम्राटाला आपले भागध्येय वाहणे.

नामदेवांनी या परंपरेला भक्तीचे अनावर अधिष्ठाण दिले. नामदेव कारण मुळचे अहिर होते. शिंपी जात ही भारतात सर्वात उशीरा जन्माला आलेली जात. त्यामुळे नामदेवांचे नांव घेत काही जातीय संघटना बनल्यात. पण नामदेव हे एकमेव राष्ट्रीय व्यक्तिमत्व आणि त्याची साक्ष अवघा देशच देत असतो.

नामदेवे रचिला पाया...हेच काय ते सत्य आहे.










21 comments:

  1. Vittal was worshiped as Buddha in some times, some people claim that Vittal temple was Buddha Vihar like Jagannath (Jagannath temple was Vihara that is proved now)now how will relate your theory to this......If Namdeo was Shaiva then his GOD must be Shaiva, some links are missing..........As per Bhalchandra nemade and other scholers Vari tradition has its routes in Buddhisam when 70% India was Buddha for four centuries.............

    ReplyDelete
  2. Great info Sonwani sir.... thanks for sharing with us.....

    ReplyDelete
  3. Mr. Vikas, your statements are just Buddhist propaganda. Know the timeline of Buddhism and Varakari sect. Varakari sect has nothing to do with Buddhism.

    http://shodh-bodh.blogspot.in/2012/06/blog-post_3665.html

    ReplyDelete
    Replies
    1. saglyan mhade chadhaodh lagaliy varkari smapraday jo sampurn maharshtrat shekado varshapasun pay rowun ahe tyala hijack karaychi. ugach samanta ahe mganun sambhad jodu naka ulat pakshi amhi jar mhantale ki jain dharmane he sarw amchyapasun ghetale tar karan rushabdewacha ullekh amchya bhagwatathi ahe

      Delete
    2. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात दगडी खांबावर ध्यानस्त बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात.
      विठ्ठलाचा इतिहास कोठेच दिसत नाही. रामाचा रामायणात, कृष्णाचा भागवत पुराणात किंवा महाभारतात; मग विठ्ठलाचा इतिहास का आढळत नाही?
      विठ्ठल मूर्ती एकटीच का? शेजारी कोणीच स्त्री नसून तो एकटाच विटेवर उभा आहे. रुक्मिणी (?) विठ्ठलाच्या शेजारी नसून दुसऱ्याच मंदिरात आहे. संन्याशाचे (श्रमण) स्त्री असणे असंभवनीय होय. विठ्ठल हा एकटाच असल्याने बुद्ध असणे संभवनीय आहे.
      विठ्ठलाचा हात कमरेवर , हातात शस्त्र नाही.
      मूर्तीचे सूक्ष्म अवलोकन केले तर तीत बुद्धत्वाच्या खुणा दिसतात. विठ्ठलाचे कान सुद्धा बुद्धासारखे लांब दिसतात. विठ्ठल पितांबरधारी आहे. बौद्ध श्रामाणांची वस्त्रे ‘पीत’ असतात.
      वारकरी (मूळ शब्द्द वारीकारी) ह्या संप्रदायात प्रवेश करतो तेंव्हा त्याला (तुळशीची माळ घालताना) शपथ घ्यावी लागते. हि शपथ म्हणजे बुद्धाचे पंचशील (सदाचाराचे पाच नियम) होय.
      १) मी प्राण्याची हिंसा करणार नाही.
      २) मी चोरी करणार नाही.
      ३) मी व्यभिचार करणार नाही.
      ४) मी खोटे बोलणार नाही आणि
      ५) मी अपेयपान करणार नाही, हे ते पाच नियम होत.

      पंढरीच्या वारीला निदान पंढरपुरापुरते स्पृश्य-अस्पृश्य भेद विसरून एकत्र गोळा होतात. चातुर्मासात वारी हे वैदिक संप्रदायाप्रमाणे अयोग्य होय. बुद्ध हा जातिभेदा विरुद्ध होता. जातीव्यवस्ता व अस्पृश्यताविरोध हे बौद्धधर्माचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

      -अनघा.

      Delete
  4. sonwani saheb warkari samprday jatiwada pasun dur ahe tyala durach rahu dya ugach he jatidweshakancha hatat khote aite kolit deu naka...

    ReplyDelete
  5. नामदेवे रचिला पाया... I Totally agree!
    not dnyandeve..!

    ReplyDelete
  6. सांगलीकर जी तुमची लिंक वाचली: काही मुद्दे
    १. मी बुद्ध नाही
    २. तुम्ही जैन आहात आणि प्रचार जसा बुद्ध लोक करतात तेच तुम्हाला पण लागू होते
    ३. तुम्ही विठ्ठल मंदिर हे जैन मंदिर आहे हे म्हणता (मला माहित नाही मी असेच लोकांचे वाचून त्याला बुद्ध मंदिर म्हणालो होतो.
    ४. स्वामी विवेकानंदानी जग्गानाथ पुरी हे बुध मंद्री आहे हे आपल्या भाषणातून सांगितले आहे आणि बुधा धर्म ४ - ५ शतके सर्व भारतभर पसरला होता ते पण सांगितले आहे , त्यांना कोणता प्रचार करायचा होता किवा कोणती पुस्तके विकायची होती?
    त्यावेल अम्बेद्कारणी बौद्ध धर्म स्वीकारला नवता त्यामुळे राजकारण आणि अर्थकारण याचा संभंध येत नाही.
    ४ भाचंद्र नेमादेना हे माहित आहे कि बौद्द्ध धर्माच्या नावावर पुस्तक विकण्य ऐवजी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कर्ण ya नावावर जास्त पुस्तके विकतात ते का बुद्धाचा प्रचार करतील ....
    ५. महारास्त्रात जर जैन धर्म सगळीकडे होता आणि बुद्ध धर्म ८ व्या शतकात संपला होता तर जैन लेण्या पेक्ष्या बुद्ध लेणी जास्त का आहेत? कारला भाजे, नाशिक, ओस्मानाबाद, औरंगाबाद, अजिंठा, वेरूळ मध्ये बुद्ध लेण्या नंतर जैन लेणी येतात
    ६. वारकरी संप्रदाय आत्मा असणे किवा मोक्ष्याच्या भानगडीत पडत नाहीत...ते फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि त्याची स्तुती गटात त्यामुळे ती जैन परंपरा आहे हे सिद्ध होत नाही पण काही लोकांचे असे म्हणणे आहे कि विठ्ठल मंदिरात बुद्धाच्या मूर्ती आहे भिंतीत कोरलेल्या (मी पहिल्या नाहीत)
    ७. आजचा वारकरी धर्म हा जैन, बुद्ध, ई अधिवासी संकृतीच्या मिश्रणातून झाला आहे.....वैदिक धर्माचा काही संबंध नाही ...बुद्ध धर्माला जरी मूर्ती पूजा मान्य नसली तरी महायान पंथातून मूर्ती पूजा चालू झाली
    ८. बुद्ध बुद्ध धम्मा हा सत्याच्या जास्त जवळ जाणारा आहे कारण त्याला आत्मा मान्य नाही स्वर्ग मान्य नाही उपवास मान्य नाही (कारण तो अनैसर्गिक आहे ) त्यामुळे मला तर बुद्ध धर्म आहा माणसाचा तारणहार वाटतो......
    ९. माझे वडील सध्या वारीत आहेत , माझे कुटुंब वारकरी कुटुंब आहे म्हणून मला त्याचा अभिमान बाळगणे वगरे अप्रस्तुत वाटते.
    १०. माझ्या प्रश्नाची उत्तरे द्या......मूर्तीत देव असतो का? उपवासाने तुम्ही कुणाला प्रसन्ना करता , मग भुकेल्य लोकांना देव का पावत नाही?
    ११. तुम्ही स्वर्ग पहिला आहे का? नर्क पहिला आहे का? आत्मा पहिला आहे का?
    १२. अगोदर काय होतो , आपली संस्कृती अकय होती आणि आहे यापेक्ष्य प्रश्न विचारायला शिका, आई जर म्हणत असे, किवा तुमचे गुरु जर म्हणत असतील म्हसोबाला बोकड कप तर प्रश्न विचार......

    आता एवढेच

    ReplyDelete
  7. tumhachyat tar chadhaodach lagali ahe ek aiata sarwmanya hindu samprday bhudh kiwa jain tharwachi he tumhi tharwany peksha amha warkaryana tharwu det amhi bhagwat he praman manto dyandew tukaram namdev eknath chokha yan guru manto yachyatil ekanehi bodh athwa jain dharmacha prasar athwa vidwesh kela nahi ekandarit kay tar chadhaodh ahe ki hindu dharm samplay he dhakwaychi

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. khot saheb tumachi pratikriya vachayla avdale aste....tumhi delete keli

    ReplyDelete
  10. मूळ अभंग असा आहे. यात संत नामदेवांचा उल्लेख खाली आलेला आहे. असे ठरवून ज्ञानेश्वरांबद्दल जे तुम्ही लिहिलेत त्यामुळे ज्ञानेश्वरांची महती कमी होते असे नाही. तुमचा ज्ञानेश्वरांवर चांगला अभ्यास असेल अशी आशा करतो. त्यांच्या कर्तृत्वाबाबत/ प्रतिभेबाबत एखादा कौतुकास्पद लेख आपल्याकडून यावा ही अपेक्षा.

    सन्त क्रुपा झाली इमारत फळा आली
    ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया
    नामा तयाचा किन्कर तेणे विस्तरिले आवार
    जनी जनार्दन एकनाथ स्तम्भ दिला भागवत
    तुका झालासे कळस भजन करा सावकाश
    बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा.

    ReplyDelete
  11. मा.संजय सोनावणी,
    आपला लेख वाचला आणि त्यातले काही मुद्दे पटले नाहीत म्हणून हा प्रपंच (मला मराठी टंकलेखन करायचा अतिशय कंटाळा असूनही!)
    ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांनी नाथपंथाची दीक्षा दिली, याकारणे ज्ञानेश्वरही नाथपंथिय ठरतात. मान्य. पण त्यांचे अभंग पाहिले, तर?
    "गरुडवाहना गंभीरा, येई गा दातारा
    बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला"
    यात गरुडवाहना, गंभीरा, दातारा ही विशेषणे कोणाची?
    " कटी कर विराजित मुगूट रत्न जडित ।
    पीतांबरू कसिला तैसा येऊ का धांवत ॥३॥
    विश्व-रूपे विश्वं-भरे कमल-नयनें कमलाकरे वो
    तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ॥४॥ "
    विश्वरूप, विश्वम्भर, कमलनयन, ही विशेषणे नि:संशय 'बापरखुमादेविवर' विठ्ठलाची आहेत असे आपणास वाटत नाही का?
    ज्ञानदेवांचे बरेच अभंग "बापरखुमादेविवरू विठ्ठलू" या पदाने संपतात, पण त्याने विशेष काही सिद्ध होते, असे मला वाटत नाही. (अनेक अभंग "ज्ञानदेव म्हणे", "ज्ञानदेव बोले" या पदाने संपलेले आहेत.)अमृतानुभव आणि भावार्थदिपिकेत विठ्ठलाचा उल्लेख नाही, कारण तो कदाचित अप्रस्तुत ठरला असता. ज्ञानदेवांच्या अभंगांत विठ्ठलाचा उल्लेख कितीदा येतो, हे मोजणे अशक्य. (अभंग लिहिणारे ज्ञानेश्वर आणि अमृतानुभव लिहिणारे ज्ञानेश्वर हे वेगळे, असे जर आपले मत असेल, तर काय बोलणार?) अभंगातून सिद्ध होते ज्ञानेश्वरांची आर्त भक्ति. विठ्ठलभक्ति आणि अलौकिक प्रतिभा.
    आता 'कट्टर नाथपंथिय', 'शैव' निवृत्तिनाथांचे अभंग पाहू.
    १) "रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष । पंढरीनिवास आत्माराम
    पुंडलिकभाग्य वोळलें संपूर्ण । दिननिशीं कीर्तन विठ्ठल हरी
    त्रैलोक्य उद्धरे ऐसी पव्हे त्वरे । कीर्तन निर्धारे तरुणोपाव
    निवृत्तीचा सखा विठ्ठलरूप देखा । निरालंब शिखा गगनोदरीं"
    २) "विठ्ठल श्रीहरि उभा भीमातीरीं । तिष्ठती कामारी मुक्तिचारी ॥ १ ॥
    मुनिजनां सुख निरंतर लक्ष । भक्तां निजसुख देत असे ॥ २ ॥
    पुंडलिकपुण्य मेदिनीकारुण्य । उद्धरिले जन अनंत कोटी ॥ ३ ॥
    निरानिरंतर भीमरथी तीर । ब्रह्म हें साकार इटे नीट ॥ ४ ॥
    नित्यता भजन जनीं जनार्दन । ब्रह्मादिक खुण पावताती ॥ ५ ॥
    निवृत्ति तत्पर हरीरूप सर्व । नाम घेतां तृप्त आत्माराम ॥ ६ ॥"
    याचप्रमाणे नाथपंथिय सोपानदेव आणि मुक्ताई यांचे अभंगही देता येतील. विस्तारभय म्हणून देत नाही.
    वारीचे श्रेय नक्की कोणाचे,नाथपंथ आणि वारकरी संप्रदाय, हे विषय माझ्या अल्प अभ्यासापलीकडचे आहेत . पण एकंदरीत मला जे वाटले, ते लिहिले.
    विठ्ठलाविषयी नंतर कधीतरी.

    ReplyDelete
    Replies
    1. अश्वीनजी, धन्यवाद. आधे मी एक प्रदीर्घ प्रतिसाद लिहिला होता पण वीज गेली अणि म्या आळशाकडुन तो संरक्षित न झाल्याने आता अल्पसा प्रतिसाद देत आहे. आपण म्हणता ते खरे मानले तरी इतिहासात किमान तीन द्न्यानेश्वर झाले आहेत अशी मान्यता आहे. त्यामुळे (विराण्या वगळता) अभंग द्न्यानेश्वरांचे मानत येत नाहीत. दुसरे बाब अशी कि तीर्थावळी, आदी, समाधी आदि प्रकरणे खुद्द मुळ नामदेवांची नाहीत असाही विद्वानांचाच निर्वाळा आहे. अशा स्थितीत द्न्यानेश्वरांना वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक मानणे अनैतिहासिक आहे.

      याचा अर्थ असा मुळीच नव्हे कि मी द्न्यानदेवांचे अलौकिक कर्तुत्व नाकारतो आहे. पृथ्वी स्थिर नाही हा आर्यभटाचा चवथ्या शतकातील सिद्धांत द्न्यानेश्वरांनी तेराव्या शतकात अधिकृतपणे पुन्हा सांगितला (अध्याय चवथा...सुर्याचे न चालता चालणे) अमृतानुभवास मी त्यांच्या स्वतंत्र प्रद्न्येची झेप समजतो जी माहाराष्ट्री तत्वद्न्यानात कोणी गाठली नाही. उलट माझा आक्षेप आहे कि द्न्यानेश्वरांची स्वतंत्र्य प्रद्न्या पुढे नेली गेली नाही. असो.

      अश्वीनजी, मी येथे आवर्जुन सांगतो कि मी आपला ब्लोग पाहिल्यानंतर माझा आपल्याबाबतचा आदर..केवळ आदरच नव्हे तर एक सुहृद भेटल्यासारखे वाटले. एक खरा मनुष्य भेटल्याचा आनंद वाटला. या मातीत...कीटकांत वा अवाढव्य पुरातन अवशेषांत, या मातीत...खडकांत जो आपण "स्व" शोधला तो सर्वांनीच शोधायला हवा. ही निसर्गाप्रती येणारी, त्याची महनियता समजावून घेत येणारी एक विनम्रता जी प्रत्येक मनुष्यप्राण्यात असायला हवी खरे तर...पण ती तुमच्यात आहे याचा आनंद अलौकिक आहे. वैचारिक वाद-संवाद शेवटी मानवतेच्या अंतिम ध्येयाकडॆ जावोत हीच सदिच्छा. धन्यवाद.

      Delete
    2. मा. संजय सोनावणी यांसी,
      समाधीचे अभंग नामदेवांचे आहेत की नाहीत याची मला खरंच कल्पना नाही. पण ते अभंग आहेत ह्रदयस्पर्शी. असो. ज्ञानेश्वरांच्या विराण्यातही जो विरह आहे, तो कृष्ण/विष्णु/विठ्ठल न आल्याने असे मला वाटते. मी दिलेला पहिला अभंग ही विराणीच आहे.
      ज्ञानदेवांचे कर्तृत्व वादातीत आहे हे खरे, आणि समजा ज्ञानदेव हे वारकरी संप्रदायाचे प्रणेते नाहीत हे सिद्ध झाले (परत हा विषय माझ्या अभ्यासा(!) पलिकडला) तरी त्यांची महती यत्किंचितही कमी होणार नाही हेही खरे. वैष्णवांच्या हृदयावर 'ज्ञानोबा-तुकाराम' यांचे अधिराज्य गेली कित्येक शतके आहे, आणि ते तसेच चालू राहील.

      माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार. (खरं तर ब्लॉगवर आपली प्रथमच भेट होते आहे.) आपण माझा ब्लॉग वाचून जे लिहिलेत, त्याबद्दल काय लिहावं? हा आपला मोठेपणा.खरंच आभारी आहे. आदर वाटावा, इतका मी मोठा नाही, वयाने आणि व्यासंगाने मी लहान आहे, पण आपल्याला जर माझा ब्लॉग वाचून सुहृद भेटल्यासारखे वाटले असेल, तर तो माझा सन्मान आहे. असाच लोभ असो द्यावा.
      वैचारिक चर्चा, विचारमंथन आणि संशोधन यातच माणसाचं माणूसपण सामावलं आहे. ते सतत जागृत रहावं, हीच इच्छा. धन्यवाद.

      Delete
  12. gnyaneswar nathpanthiy hote he 100% satya ahe.(mulat nathsampraday

    bahujanat jast wadhala .)parantu gnyaneswarani ruksh asha

    ya yog margala bhaktichi jod dili.

    ReplyDelete
  13. संजयजी, मी दिलेल्या प्रतिसादावर उत्तर न देणे किंवा पोच न देणे वेळेअभावी झाले असावे अशी आशा करतो.

    ReplyDelete
    Replies
    1. साधकजी, संत ज्ञानेश्वरांबद्दल लवकरच लिहित आहे. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

      Delete
  14. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात दगडी खांबावर ध्यानस्त बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात.
    विठ्ठलाचा इतिहास कोठेच दिसत नाही. रामाचा रामायणात, कृष्णाचा भागवत पुराणात किंवा महाभारतात; मग विठ्ठलाचा इतिहास का आढळत नाही?
    विठ्ठल मूर्ती एकटीच का? शेजारी कोणीच स्त्री नसून तो एकटाच विटेवर उभा आहे. रुक्मिणी (?) विठ्ठलाच्या शेजारी नसून दुसऱ्याच मंदिरात आहे. संन्याशाचे (श्रमण) स्त्री असणे असंभवनीय होय. विठ्ठल हा एकटाच असल्याने बुद्ध असणे संभवनीय आहे.
    विठ्ठलाचा हात कमरेवर , हातात शस्त्र नाही.
    मूर्तीचे सूक्ष्म अवलोकन केले तर तीत बुद्धत्वाच्या खुणा दिसतात. विठ्ठलाचे कान सुद्धा बुद्धासारखे लांब दिसतात. विठ्ठल पितांबरधारी आहे. बौद्ध श्रामाणांची वस्त्रे ‘पीत’ असतात.
    वारकरी (मूळ शब्द्द वारीकारी) ह्या संप्रदायात प्रवेश करतो तेंव्हा त्याला (तुळशीची माळ घालताना) शपथ घ्यावी लागते. हि शपथ म्हणजे बुद्धाचे पंचशील (सदाचाराचे पाच नियम) होय.
    १) मी प्राण्याची हिंसा करणार नाही.
    २) मी चोरी करणार नाही.
    ३) मी व्यभिचार करणार नाही.
    ४) मी खोटे बोलणार नाही आणि
    ५) मी अपेयपान करणार नाही, हे ते पाच नियम होत.

    पंढरीच्या वारीला निदान पंढरपुरापुरते स्पृश्य-अस्पृश्य भेद विसरून एकत्र गोळा होतात. चातुर्मासात वारी हे वैदिक संप्रदायाप्रमाणे अयोग्य होय. बुद्ध हा जातिभेदा विरुद्ध होता. जातीव्यवस्ता व अस्पृश्यताविरोध हे बौद्धधर्माचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

    -अनघा.

    ReplyDelete
  15. वारकरी संप्रदायाला ज्येष्ठ ठरतो तो महानुभाव किंवा त्यापुर्वीचे अनेक जसे नाथ पंथ तसेच ईश्वर केंद्रीत भ्रक्तीमार्गाकडे जाणारे महानुभाव व वारकरी पंथ काही लोकांनी कृष्ण/विष्णू मागीर्य लोकांकडून हाय ज्ॅक केला असण्याची शक्यता वाटते. कारण तत्वज्ञानाची सुरुवात तर पूर्ण बौध्द मार्गी असून अंतिमत:ही निर्वाण किंवा तूर्यावस्था तसेच समत्वाची वारंवार दिलेली शिकवण , नाम रुपाचे झालेले नामस्मरण तसेच त्याआधीच्या दीर्घकाळातील बौध्द भिख्खू यांचा धर्म प्रचार निसर्ग व मानवतेशी संबधित शिकवण आदी त्या धर्माच्या भग्नावस्थेतील विविध संप्रदाये ही बदलती रुपे वाटतात. कारण शिकवण तीच आहे. शक्यताे महायानी पंथ तसेच इतर पंथातील मतभेद व इतर कारणांमुळे ही परंपरा नव्याने नव्या रुपात प्रवाही पणे सुरु झाली असणे वाटते. बाकी विठठल मुर्तीची मूळू प्रतिमा पैाड्र पूर च्या राजापेक्षाही वेगळी असू शकते.तो एकटाच आहे . पण सोबत एैकणारे सुध्दा होते. हे आता दडवले गेले असावे.. ज्ञानेश्वरांच्या बाबत त्यांची शिकवण सामंजस्य तत्कालिन परिस्िातीचा प्रभाव असणारच . पण तो स्वाभाविकच आहे. शिकवण जागतीक दर्जाचीच आहे. त्यासाठी असे सांगणारे आम्ही काही नवे बौध्दच पाहिजे असे नाहीत. समाजातील इतरही लोक या संबधात गांभीर्याने विचार करताहेत. देवळाचा धर्म व धर्माची देवळे या प्रबोधनकारांच्या ग्रंथांची या निमित्ताने आठवण झाली. सांगलीकर महाविरांना माझा प्रणाम. दिनेश कामत, मुंबई

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...