Monday, June 18, 2012

बाबासाहेबांचा पराभव कोण करतंय?खरे तर या विषयावर मी पुर्वीच लिहायला हवे होते. कालच माझे परम मित्र प्रा. हरी नरके आणि शुद्धोदन आहेर यांचे डा. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्राबाबत निर्माण झालेल्या वादाबाबत १७ जानेवारीच्या नवशक्तीतील लेख वाचले आणि असे वाटले कि या विषयावर लिहायलाच हवे. प्रा. नरके यांच्या मते आंबेडकरी चळवळीच्याच समर्थकांना (पळशीकर आणि यादव) उधळुन फेकायच्या कटात आंबेडकरी जनता आपसुक सापडली आहे आणि प्रा. नरके पुढे म्हणतात..."पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर हेत्वारोप, हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयीस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचंच नुकसान करणारं ठरेल. यापुढं मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकून पितील."

शुद्धोदन आहेरसाहेब म्हणतात...…"जर या व्यंगचित्रातून जातिसंस्था समर्थक संदेश जात असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड ते खपवून घ्यायचे काय? हा मुद्दा चर्चेलाही न घेणारी मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी आहेत काय?"


मी या दोन्ही मतांपार जात माझी निरिक्षणे नोंदवू इच्छितो...

ब्रिगेडने हल्ले केले, तोडफोड केली तर ते तालीबानी असतात...एम. एफ. हुसेनच्या चित्राविरुद्ध तोडफोड करणारे बजरंगदलीय रानटी असतात, टाईम्सच्या कार्यालयावर केवळ एखादी बातमी विरोधातील (आणि म्हणुन ती खोटीच) आली म्हणुन हल्ला करणारे अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे शतृ असतात...तर मग पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला करनारे वेगळे कसे ठरतात? आहेर साहेबांनी त्यांचा निषेधच केला आहे हे महत्वाचे आहेच. पण अन्य चळवळीतील म्हनवणा-या संघटना याबाबत मुग गिळुन का गप्प आहेत?

बाबासाहेबांचे व्यंगचित्र अभ्यासक्रमातील पुस्तकात आले. खरे तर राजकीय व्यंगचित्रे उत्तुंग व्यक्तिमत्वांवरच काढली जातात. ऐरे-गैरे हे कधीच व्यंगचित्रांचे विषय नसतात. मागे एकदा टाइम्सने रतन टाटांचे एक व्यंगचित्र प्रकाशित केले होते. टाटांनी त्या व्यंगचित्राचा व टाइम्सचा निषेध केला होता. टाइम्सने त्यांचे पत्र चक्क वाचकांच्या पत्रव्यवहारात छापुन त्यांना त्यांची जागा दाखवुन दिली आणि मुख्य पानावर ते व्यंगचित्र पुन्हा प्रसिद्ध करुन टाटांना सुनावले कि आम्ही गांधीजींची, नेहरुंचीही व्यंगचित्रे ते प्रसिद्धीच्या कळसावर असतांनाही प्रसिद्ध केलेली आहेत. टाटांना असा झटका कोणी दिला नसेल.

खरे तर जेम्स लेन प्रकरणी जी चुक मराठा समाजाने केली तीच चुक काही वाट चुकलेल्या आंबेडकरवादी म्हणवना-यांनी केली. त्यांनी  भांडारकर संस्थेवर कसलाही विवेक न वापरता, सरसकट जबाबदारी थोपवत हल्ला केला... तसाच यांनी पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला केला. फरक काय आहे? आजच्या बुद्धीवंतांना समर्थनच करायचे झाले तर मग दोन्ही हल्ल्यांचे करावे लागेल. पण एकही सुद्न्य विचारवंत तसे करनार नाही. करुही नये.

पण तरीही व्यंगचित्रात जातीयतावाद शोधणे याचा अर्थ असा होतो कि जातीयता इतरांच्या मनातुन जावो-न-जावो-  ती खुद्द आमच्याच मनात जीवंत आहे. प्रत्येक बाबीकडे आम्ही निखळ दृष्टीकोनातुन पाहुच शकत नाही. आम्हीच जातीयवादी आहोत, मग जातीय-अंताची लढाई आम्ही खरेच लढत आहोत काय हाही प्रश्न आम्हाला स्वत:ला विचारावा लागणार आहे.

आम्ही भारतीय नको तिथे भावनाशील असतो आणि हवे तेथे षंढ असतो. हा आमचा हिजडेपणा शतकानुशतके आम्हाला गलितगात्र करत आला आहे. बाबासाहेबांनी या देशाला, या अखिल समाजाला एक नवी दृष्टी देण्याचा अविरत प्रयत्न केला. त्यांच्या अनुयायांनीच बाबासाहेबांना धाब्यावर बसवावे, त्यांची तत्वे पायतळे तुडवावीत...जे महनीय उदात्त व्यक्तित्व...गोतम बुद्ध त्यांनी एक आदर्श म्हणुन स्वीकारावे त्याला कनभरही समजुन न घेता एक नवा तालीबानवाद निर्माण करावा याचे मला वैषम्य वाटते. मग प्रा. नरके म्हणतात त्याप्रमाणे......"पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर हेत्वारोप, हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयीस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचंच नुकसान करणारं ठरेल. यापुढं मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकून पितील."

मी सहमत आहे.

ज्यांने खरे तर समाजाचे आदर्शभुत होत नवे पायंडे पाडायचे, मोकळ्या मनांची क्षितिजे विस्तारायची. तेच जर असे दहशतवादी होणार असतील तर तेच आंबेडकरवादाचे हत्यारे ठरतील.

माझे नुकतेच "दहशतवादाची रुपे" हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यात मी दहशतवाद अपवादानेच या देशात केला आहे असा धर्म म्हणजे बौद्ध धर्म असे म्हटले होते. मला वाटते हे नवबुद्ध मला माझे विधान बदलायला भाग पाडतील. मग ब्राह्मणी दहशतवाद काय, मराठ्यांचा काय आणि आंबेडकरवाद्यांचा काय...आशय एकच असेल...कारणे वेगवेगळी असतील...परिणाम मात्र समान विघातक असतील...आणि त्याची जबाबदारी या बेजबाबदारांनाच स्वीकारावी लागेल. आपण एका सबळ, क्षमाशील आणि व्यापक विचारांच्या समाजरचनेच्या दिशेने निघालो आहोत कि केवळ गतानुगतीकतेच्या वांझ भावनांत रमत आपला भविष्यकाळ उद्ध्वस्त करणार आहोत हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर शोधणे आजच्या विचारकांसमोरील आव्हान आहे.

ते विशिष्ट व्यंगचित्र योग्य कि अयोग्य, संयुक्तिक कि असंयुक्तिक, जातीद्वेषाने आहे कि केवळ तत्कालीन स्थितीचे व्यंग-प्रतिबिंब आहे हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. त्यावर अगदी मनमोकळी चर्चा होवु शकते आणि ती व्हावी. गरज नसली तरी व्हावी. काळाची चौकट बदलली असली तरी व्हावी असे वाटत असेल तरी व्हावी.


व्यंगचित्रांचे तत्वद्न्यान आपल्या भारतीय समाजाल कोणीतरी शिकवायलाच हवे!


पण दहशतवाद्यांच्या व्याख्येत बसेल अशी कृती ज्यांनीही केली त्यांचा जाहीर निषेध सर्वप्रथम आंबेडकरवाद्यांनीच करायला हवा. तेच बाबासाहेबांच्या तत्वद्न्यान आणि एकंदरीत व्यक्तित्वाशी सुसंगत असेल. पण ज्याअर्थी तसे झालेले दिसत नाही त्याचाच अर्थ बाबासाहेबांचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला आहे असे म्हणावे लागेल.13 comments:

 1. फुले-आम्बेडकरी चळवळीचे तत्वद्न्यान हिंसेला मान्यता देत नाही.पळशीकर/यादव यांच्याशी आमचे मतभेद असतील तर ते आम्ही वैचारिक पातळीवर मांडले पाहिजेत.हिंसक हल्ले करणे ही विचारविरोधी,सरंजामशाही आणि कालबाह्य गोष्ट होय.संविधान याला मान्यता देत नाही.चळवळीतील अपप्रव्रुतींना वेळीच आवर घातला गेला नाही तर हेच लोक चळवळीचा नाश करतील.चळवळीला हे लोक बदनाम करीत असताना मुग गिळुन गप्प बसता कामा नये.

  ReplyDelete
 2. Sanjay ji, I think this problem is very common among the south Asians. We first react and then think if at all. Indian always let the emotions get better of them. And sense of humor is completely missing. Hence we see absurd things like objections to the cartoons, professors getting jailed and attacked for forwarding cartoons etc.
  This unwarranted overreaction is the sign of immature core of our country. We have a long way to go before we mature as people.

  ReplyDelete
 3. माझे बरीच मित्र हे आंबेडकरी चळवळीतील असून भारत मुक्ती मोर्चा यांचे कार्यकर्ते आहेत. मी आज विठ्ठलाच्या पंढरपूर वारी बद्दल पण आक्षेपाहार्य फेसबुक वर मी पोस्त पाहिले. आणि देवी देवतांचे पण अपमान करणारे पोस्ट पाहिले. आणि जमेल तसा विरोध पण केला. परंतु देवांना शिवीगाळ सुरूच आहे.
  ह्याच्या कचाट्यातून बहुजन समाजाची देवस्थाने पण सुटली नाहीत. ब्राह्मण समाजाने लावली खूळ सांगत शिवीगाळ सुरु आहे. खरे पाहता आमच्या गवळी-धनगर समाजामध्ये कोणत्याच शुभ कार्यात ब्राह्मणाला स्थान नाही. आह्माला जंगम समाजाच्या पुरुषाने धार्मिक विधी करावे लागतात. आणि बरीच अशी देवस्थाने आहेत कि ज्यांची पूजा ब्राह्मण समाज करूच शकत नाही.

  मी गौतम बुद्धांची माहिती काढली ते पण सवर्ण असून मुळचे भारतीय उपखंडातील नाह्वते. (जन्माने भारतीय होते) आणि बाबासाहेबांनी पण शांतीचा संदेश देणारा धर्म म्हणून त्यांना आकर्षण वाटले होते. (धर्म मूल्यान आधारित असल्यामुळे)परमपूज्य बाबासाहेबांचे विचार कोणत्याच बहुजना पर्यंत पोचले नाहीत हेच काय ते खरे.

  बाबासाहेबांनी कधीच हिंसेचे समर्थन केले नाही. कधीच कोणत्या जाती धर्माचा अपमान केला नाही. आणि बाबासाहेबांसारखा प्रभावी आणि शक्तिशाली नेतृत्व परत मिळणे शक्य नाही. जे लोक त्यांचे नाव घेतात ते फक्त मतांसाठी आणि राजकारणासाठी.

  विठ्ठल खोत

  ReplyDelete
  Replies
  1. अहो खोट साहेब ह्या सार्‍यांचा कपाळकराटेपणा इतका की ज्या माणसाने अखिल भारताबद्दल एवढे मोठे विचार मांडले ज्यांनी समग्र भारताची राज्यघटना लिहली त्यांना एका समाजापुरता मर्यादित केला ह्या माणसाने धर्मांतराचा निर्णय घेण्यासाठी तब्बल 35 वर्षा घेतली आणि आम्ही कै करतोय निवळ उथळपणा

   Delete
 4. मुद्दा भरकटला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाचीही बदनामी करण्याचा परवाना देता येऊ शकत नाही. जेम्स लेन, एनसीआरटीच्या पुस्तकातील व्यंगचित्रे या दोन्ही गोष्टी एकाच पातळीच्या आहेत, असे माझे मत आहे. इतकेच नव्हे तर एम. एफ. हुसैन, तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी आणि आपले आनंद यादव ही सर्वच मंडळी माझ्या दृष्टीने दोषी आहेत. खरे म्हणजे या सर्वांवर खटले भरले जायला हवे होते. पळशीकर आणि यादव यांच्यावरही खटला भरला जायला हवा. तसे होत नाही. म्हणून हल्ले होतात. बदनामी करणाèयांना जोपर्यंत लगाम बसणार नाही, तोपर्यंत असे हल्ले होतच राहणार.

  आपला समाज जातींमध्ये विखुरलेला आहे, हे वास्तव एकदा सर्वांनी स्वीकारयला हवे. ते स्वीकारले की, मग सगळे प्रश्न ध्यानी येतील. काही थोडके अपवाद सोडल तर महापुरुषांनाही जातींची बंधने तोडता आलेली नाहीत. भविष्यातही तोडता येणार नाहीत. अशा परिस्थितीत जाती समूहांच्या श्रद्धास्थानांना तडा जाणार नाही, हे पाहणे सुज्ञ समाजाचे काम आहे. त्याऐवजी भुरट्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांचा पुरस्कार करण्यातच आपला सूज्ञ म्हणविणारा समाज शक्ती खर्च करीत आहे. हे चित्र उद्वेग आणणारे आहे.

  हा मुद्दा जरा ढोबळ शब्दांत सांगतो. आपल्या जातीचे महापुरुष लोकांना माता-पित्यासमान वाटत असतात. qकबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटत असतात. आपल्या माता-पित्याचा अवमान कोणीही सहन करू शकत नसतो. हीच बाब धार्मिक श्रद्धा स्थानांची आहे. स्वत:ला संशोधक म्हणविणारा कोणीही भुरटा तुकारामांना दारुडा, बाहेरख्याली, जुगारी ठरवू शकत नाही, qकवा प्रेषित मुहंमदाला सैतान ठरवू शकत नाही. श्रद्धास्थानांचा योग्य सन्मान करणे, हेच सज्जनपणाचे लक्षण आहे. ते पाळले की हल्ले होण्याचे प्रकार थांबतील.

  आपल्याला वाईट वाटेल, पण भांडारकरवरील हल्ला, सुहास पळशीकरांवरील हल्ला यांचे मी समर्थनच करीन. बेजबाबदार लोकांना सरकार शिक्षा करणार नसेल, तर लोक ते काम करतील.

  Suryakant Palaskar

  ReplyDelete
  Replies
  1. Aho Palaskar saheb vicharancha mukabla vicharani karta yeto he tari manya ahi ka nahi tumahala ka kontyacha goshtisathi manhanje changlya aso kinva vaaiet goshtinsathi snadshir margancha avalamba cha karu naye asa tumcha mahana aahe uchal kathi ani kar suru asa mahanaicha ka tumhala

   Delete
 5. हिंसेचे समर्थन होत नाही याचा अर्थ असा नसतो कि लोकांनी हेतू पुरस्पर केलेली बदनामी सहन केली जावी. अजूनही भांडारकर संस्थेतील ज्यांनी लेनला मदत केली त्यांच्यावर केस केलेली नाही. याचा अर्थ काय होतो. निस्पक्ष्य पाने चिकित्सा होणार असेल तर स्वागतच आहे. पण फक्त बदनामी म्हणून कोणी करणार असतील ती अजिबात खपवून घेता कामा नये.......म्हातारी मेल्याचे दुख नसते काळ सोकावतो सोनावानिजी.

  मला एक उत्तर द्या - ११ वी १२ वी च्या पोरांना त्या व्यंग चित्राचा अर्थ तरी कळेल का? आणि लोक हसतील म्हणतील.....(मुले) नेहरूंनी चाबकाने अम्बेद्काराना मारले तेवा घटना पूर्ण झाली. चित्रात तसेच दिसत आहे. ५० वर्ष पूर्वीचे व्यंग चित्र १७ वर्ष्याच्या पोरांना दाखवणे यामागे चांगला हेतू नक्कीच नवता.

  विठ्ठल जी : हिंदू देव देव्तावर टीका होते ; त्यामागे चिकित्सा एक कारण असते.......कारण हिंदू देव देवता किवा कोणत्यापण देवता किती ऐतिहासिक आहेत ते पल्याला माहीतच आहे. जगन्नात पुरी हे अगोदर बुद्ध विहार होते...बालाजी मंदिर आणि विठ्ठल मंदिर सुद्धा पूर्वी बुद्ध विहार होते.असे काही संशोधकांनी सिद्ध केले आहे .....एवढेच काय अयोध्येत सुद्धा बुद्धाच्या विहाराचे पुरावे सापडले होते ते व्यवस्थितपणे दाबले गेले.........मग आम्ही हे सत्य समोर आणले तर आम्हाला हिंदू द्रोही म्हटले जाते........

  माववीर सांगलीकरांनी पण हिंदू धर्माला का शिव्या देता असा एक ब्लोग लिहिला आहे. मी कोणत्याही धर्माला शिव्या देण्याच्या विरोधात च आहे पण बहुजन लोकांना ह्या दलदलीतून बाहेर काढणे हे खूप महत्वाचे काम आहे.......त्यामुळे हिंदू या शब्दाच्या उत्पती पासून ते सगळ्या देव धर्माच्या जन्माच्या कहाण्या सांगून जन जागृती केली तर काय बिघडले.
  यावेळ अर्जुन डांगळे यांची एक कथा मला आठवते बोकडोबा कि काय असे त्याचे नाव होते.......वाचून पहा.

  गौतम बुद्ध सवर्ण होते कि दलित ह्या चर्चेला अर्थच नाही कारण त्यांनी ज्यावेळी वेद नाकारले, देव (इन conventional टर्म ) आणि आत्मा नाकारला आणि प्रत्येकाला ज्ञान प्राप्त करता येते सर्व लोक समान आहेत हे सांगितले (प्रत्येकाला बुद्धत्व प्राप्त होवू शकते) हे सांगितले तेवाच आजचा हिंदू धर्म आणि तेवाचा वैदिक धर्म आणि जातीभेद नाकारला होता. त्यामुळे ते सवर्ण होते म्हणू काही लोक आजकाल स्वताची पाठ थोपटून घेत असतात त्याला काही अर्थ नाही.

  आजचा मेडिया हा खूपच एकतर्फी आहे तुम्ही झी मराठी , स्तर माझा पहा असे वाटेल महारास्त्रात फक्त ५-६ च आडनावे आहेत. तीच खरी मराठी संस्कृती आहे.

  ReplyDelete
 6. सुर्यकांतजी, विकासजी, मी आपल्या भावनांचा सन्मान करतो, परंतु मी आपल्या विचारांशी असहमत आहे. जेंव्हा आठवले खासदार होते तेंव्हाही या पुस्तकाचा विषय संसदेत आला होता असे मला आठवते. तेंव्हा या चित्रावर चर्चा झालेली दिसत नाही. पुस्तक वा तो धडा मागे घ्यावा अशीही मागणी झालेली दिसत नाही. ५-६ वर्ष याबाबत कसलीही चर्चा झालेली दिसत नाही. म्हणजे एवढा काळ ते चित्र सर्वांनाच आक्षेपार्ह वाटले नव्हते कि काय?

  चित्रकार शंकर ब्राह्मण होते. पण त्यांनीच अजुन एक व्यंगचित्र काढले होते त्यात गांधी व शंकराचार्य चातुर्वर्ण्याच्या चौथ-याला शेंदुर फासत आहेत आणि बाबासाहेब मोठ्या हातोड्याने तो चौथरा उद्ध्वस्त करत आहेत असे दाखवले आहे. (हे चित्र नुकतेच कलमनामा या मुंबईतुन प्रसिद्ध होणा-या साप्ताहिकाने पुनर्प्रकाशित केले आहे.) हेही चित्र जातीयवादाचे प्रतीक आहे काय?

  दुसरे असे कि रा.स्व. संघ हा नेहमीच अभ्यासक्रमांशी निगडीत संस्थांवर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करत असतो. त्यांनी चित्राच्या निमित्ताने यादव-पळशीकरांचा बळी घ्यायचा तो घेतला. वैचारिक विरोधाशी दुमत असण्याचे काहीएक कारण नाही. विरोध आहे तो ज्या पद्धतीने तो व्यक्त केला गेला त्याला. संघाच्या भेदनीतिला बळी पडले ते खुद्द बाबासाहेबांचे तत्वद्न्यान. असेच घडत राहिले, सर्वांनीच एवढे हिंसक व्हायचे ठरवले तर या देशात कोणीही सुरक्षीत राहु शकणार नाही. जातीयता हे वास्तव आहे हे खरे असले तरी ते जर असेच हिंसक बनवत न्यायचे असेल तर बुद्ध आणि बाबासाहेबांचे नांव घेण्याचे कारण उरत नाही. हिंदु देवदेवतांच्या टवाळ्या त्यांच्या उत्पत्तीच्या भाकडकथा सांगत केल्या जातात म्हणुन मग हिंदुंनीही असे करणा-यांविरुद्ध तलवारीच उचलायच्या कि काय? विकासजी, आपण करतो ते न्याय्य आणि इतर करतात ते मात्र हेतुपुरस्सर असा कोणता न्याय उरेल मग? रक्ताचे सडेच सांडायचे आहेत कि काय? आपणा दोघांसारखे विचारी लोकही असे मत व्यक्त करायला लागले कि मग अजुन दहा-वीस फाळण्या व्हायला वेळ लागणार नाही. मी हिंदुभिमानी नाही हे आपनास महित आहे, पण याचा अर्थ असाही नव्हे कि जेंव्हा विट्ठलादि देवतांचा अवमान केला जातो याचा मला राग येत नाही. पण राग आवरणे व संयतपणे प्रबोधन करणे हा मला बुद्ध-गांधी-आंबेडकरांचा मार्ग योग्य व संयुक्तिक वाटतो. असे न करता आपण द्वेषमुलक भावनांनीच जर वागत राहिलो तर असे म्हणावे लागेल कि आपण जातीय बेड्या घट्ट करत नेत जावू. आपल्याला पुरोगामी वगैरे म्हणवुन घेण्याचा अधिकार राहणार नाही. जातीयवादी शक्तींचे बळी होत आपण आपापसात झगडत राहु. एक दिवस जय सावरकर-गोळवलकर म्हणत त्यांचा भगवा खांद्यावरुन मिरवत राहु....एवढेच आपले भवितव्य असणार....धन्यवाद.

  ReplyDelete
 7. beautiful article wrote by Respected Author-Mahavir Sanglikar on Bahujan-Hindu
  http://mahavichar.blogspot.in/2012/06/blog-post_17.html

  ReplyDelete
 8. धन्यवाद विठ्ठल जी तुमच्यामुळे महावीर सांगलीकरांची लिंक वाचली. माझे निरीक्षण खालील प्रमाणे.

  सगळे सत्यशोधक, बुद्धिवादी आणि हिंदू धर्मातील जातिभेदाला कान्तालेले लोक हे बुद्ध धम्माचे नाव घेतात म्हणू ते निराश झालेत आणि अप्रतेक्ष्यपणे आपली निराशा व्यक्त करत आहेत. कारण कोणाच जैन धर्माचे नाव घेत नाहीत हे खरे दुखः आहे. फेसबुक वर पण श्री संग्लीकारणी बुद्धाला बामसेफ पासून वाचवा असे सांगितले आहे जणू काय हे बुद्ध धाम्राचे तारणहार आहेत........त्यांनी असे पण लिहिले आहे कि मायावतींनी वगैरे बुद्ध धम्म स्वीकारला नाही व त्या पण जैन धर्म स्वीकारणार आहेत. अहो बुद्ध धम्मा अधिकृत पाने स्वीकारण्याची गरजच काय, शरद पवारांच्या पाठीमागे बुद्ध असतो..मायावती बुद्ध पूजा उघड पाने करतात....म्हणजे हे लोक बद्धाच कि....

  माझे निरीक्षण चूक असेल तर please correct me.

  ReplyDelete
 9. http://mahavichar.blogspot.in/2012/06/blog-post_20.html

  see above link of Mr. Mahaveer Sanglikar. He see only political motive behind Babasaheb's conversion to Buddhisam. And had called him Parampujya in his many blogs. I do not object to his opinion as it is his right to see things or happenings in his perspective. But it was not necessary for him to compare Bauddhisam and Jainism and jump on conclusion that Jainism is a best way of upliftment of downtrodden.

  Whatever sympathy and respect he had shown to Buddha religion and bahujan movement was hypocrisy. He wanted to promote Jainism. I will never object to that but he has said that babasaheb ambedkar wass wrong and he is correct. this is too much.

  ReplyDelete
  Replies
  1. I am completely agree with you Mr. Vikas.

   Delete