Wednesday, July 18, 2012

राजेश खन्नांचे आज निधन झाले.




एका विलक्षण प्रभावशाली अभिनय युगाचा अस्त झाला. राजेश खन्ना माझा लाडका अभिनेता. अमिताभ युग अवतरले व राजेश खन्ना मागे पडला पण मला अमिताभ मला कधीच भावला नाही. राजेश युगातील उत्कृश्ठ कथा...तसेच जबरदस्त संगीत व त्यातील वैविध्ये...अमिताभ युगाबरोबरच अस्तंगत पावली. राजेश खन्नामद्धे कोणी आपला आदर्श, भाऊ, मुलगा तर कोणी प्रियकर-पती पाहिला. त्याचे चित्रपट म्हणजे अभिनयाची, जबरदस्त श्रवणीय गीतांची व वैविध्यपुर्ण कथांची रेलचेल असायचे. आराधना, बावर्ची, आनंद, अवतार, सौतन, कटी पतंग, नमक हराम, अजनबी, थोडीसी बेवफाई अशा काही चित्रपटांकडे नजर टाकली तरी वैविध्यपुर्ण कथांत वैविध्यपुर्ण असे जे नायक राजेश खन्नाने जीवंत केले ते पाहुन नवल वाटते. असे नशीब अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेच नाही. त्यामुळे माझ्यावर राजेश खन्नाचा जेवढा प्रभाव आजतागायत राहिला तेवढा अन्य कोणत्याही अभिनेत्याचा नाही.

कधी नव्हे तो आज बाहेर पाऊस पडतो आहे. माझ्या डोळ्यांतुनही अश्रु झरत आहेत.
राजेशने साकारलेले प्रसंग आणि त्याची आनंददायी ती अत्यंत हळवी गीते चहुकडुन उमदळुन येत आहेत.
अधिक लिहु शकत नाही.
राजेश खन्नांना विनम्र श्रद्धांजली.


3 comments:

  1. ज़माने ने मारे जवाँ कैसे-कैसे
    ज़मीं खा गई आसमाँ कैसे-कैसे
    पले थे जो कल रंग में धूल में
    हुए दर-ब-दर कारवाँ कैसे-कैसे

    लहू बन के बहते वो आँसू तमाम
    कि होगा इन्हीं से बहारों का नाम
    बनेंगे अभी आशियाँ कैसे-कैसे
    ज़माने ने मारे ......
    मजरूह सुलतानपुरी

    ReplyDelete
  2. सर खूप छ्यान भावना व्यक्त केल्या आहेत.नक्कीच राजेश खन्ना एक मनस्वी कलाकार होता.त्याचे चित्रपट,कथा आणि गाणी,अभिनय खूप मनाला भावणारे होते.किशोरकुमार आणि राजेशखन्ना एक समीकरण झाले होते.अनेक अजरामर चित्रपटगीते.नक्कीच असे कलाकार त्यांच्या अभिनयातून अजरामरपना सिद्ध करतात.त्याच्या कार्यकीर्दीस सलाम......!

    ReplyDelete
  3. सुपरस्टार राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

    ReplyDelete

अमेरिकन शेतीचे भविष्य आणि आपण!

  २०५० पर्यंत ,  वाढत्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी शेतीत व शेतीउत्पादनपद्धतीत काय बदल करावे लागतील यावर जगभरच्या प्रगत राष्ट्रांत नुसते...