Monday, August 13, 2012

जर्मनांनी जपलेला वाघ्याचा पुरावा....





Verhandlungen: Autoren- und Sachregister der Hefte I-X (1834-1852) der Verhandlungen der Naturforschenden Gesellschaft Basel

Naturforschende Gesellschaft in Basel
E. Birkhäuser & Cie, 1930 - 126 pages

मित्रहो, वाघ्याबाबत कोनत्याही समकालीन साधनांत माहिती मिळत नाही हा दावा धादांत असत्य कसा आहे हे आपण येथे पाहुयात. जर्मनांनी वर उल्लेखलेल्या १२६ पानी ग्रंथसुचीत खालीलप्रमाणे वाघ्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यासंबंधीत मजकुराचे इंग्रजी भाषांतर खालीलप्रमाणे...

पुस्तकाचे नांव..."Negotiations: authors and subjects of books I-X (1834-1852) " प्रकाशित झल्याचे वर्ष...१९३०. 
या पुस्तकातील मुळ जर्मन भाषेतील मजकुर येणेप्रमाणे...

1680 starb Shivaji auf Raigad eines natürlichen Todes. Über der Kremationsstätte ist ein Schrein errichtet worden. Ein aus Stein gemeisselter Hund blickt von einem Podest aus zu diesem hin: es ist Vaghya, Shivajis Lieblingshund, der in den brennenden Scheiterhaufen gesprungen sein...(Page No. 76) 

या जर्मन मजकुराचा इंग्रजीतील अनुवाद खालीलप्रमाणे...

Shivaji died in 1680 at Raigad a natural death. About the cremation, a shrine has beenerected. A chiseled in stone on a pedestal made ​​of dog looks down to this: it is Vaghya,Shivaji's favorite dog, which have jumped into the burning pyre...(Page 76)

हे पुस्तक म्हणजे १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची १२६ पानी सुची असुन त्यात लेखक व पुस्तकांच्या विषयांबाबत माहिती आहे. याच पुस्तकात जे लिहिले आहे त्याचा मराठी अनुवाद असा...

"शिवाजी नैसर्गिक मृत्युने रायगड येथे १६८० साली मरण पावला. त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्याबाजुलाच एका पाषाणस्तंभ असुन त्यावर दगडात ताशीवपणे बनवलेला कुत्रा (शिवस्मारकाकडे) पहात आहे. हाच वाघ्या...शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने जळत्या चितेत उडी घेतली होती..."

या ग्रंथात फक्त १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या ऐतिहासिक पुस्तकांची नोंद आहे, म्हणजेच वाघ्याबाबतचा मजकुर याच काळात लिहिल्या गेलेल्या कोणत्यातरी पुस्तकातुन या सुचीत घेण्यात आला आहे हे उघड आहे. या पुस्तकाचे नांव जरी खुप प्रयत्न करुनही मला मिळालेले नसले तरी हा उल्लेख अत्यंत महत्वाचा व वाघ्याचे सत्य जाहीर करणारा आहे.

या सुचीचे पुनर्मुद्रण १९३० सालचे आहे. तेही जर्मनीत झालेले. वाघ्याचा नवा पुतळा पुन्हा बसवण्यात आला तो १९३६ साली. शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी हा पुतळा ब्राह्मणांनी १९३६ साली बसवला असा ब्रिगेडचा आरोप आहे. पण मग १८३४ ते १८५२ साली अधेमधे प्रसिद्ध झालेल्या, त्याही जर्मन ग्रंथात, वाघ्या कसा आला?

याचा अर्थ एवढाच आहे कि संभाजीराजांनी शिवस्मारक बांधल्यानंतर लगेच वाघ्याचेही स्मारक बनवले होते. येथे वाघ्याच्या दगडी ताशीव पुतळ्याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ असा कि मुळ पुतळा दगडीच होता. कालौघात तो नष्ट झाला...वा केला गेला. आताचा पुतळा तर पंचधातुचा आहे. १९३० साली मुळात तो अस्तित्वातच नव्हता. म्हणजेच ज्याही लेखकाने वाघ्याच्या स्मारकाची माहिती दिली आहे ती मुळच्या पुतळ्याची व स्मारकाची आहे. म्हणजेच वाघ्याचे स्मारक शिवस्मारक जेंव्हा मुळात बनवले गेले तेंव्हापासुनचेच आहे. कोणा महाराणीच्या जागेवर आताचे स्मारक नाही.

न्यचरल सोसायटी ओफ बासेल या मिशनरी संस्थेने अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील शेकडो पुस्तकांचे पुनर्मुद्रण केले आहे. तेही आता दुर्मीळ असुन क्वचित एखाद्या विद्यापीठांत प्रती असल्याचे दिसते. शिवप्रेमींनी वरील मुळ ग्रंथ अवश्य मिळवावा. परंतु वर दिलेला मजकुर पुरेसा असुन त्यातुन वाघ्याचे सत्य लखलखितपणे समोर येते हे आता निर्विवाद आहे.

म्हणजे वाघ्या ही दंतकथा नाही. कुत्र्याचे नांव "वाघ्या" आहे असे जर्मनांनीही नोंदवलेले आहे. तसा भारताशी जर्मनांचा कसलाही राजनैतीक वा साम्स्कृतीक हितसंबंध नव्हता. याच ग्रंथात तमिळनाडुमधील राजकीय घटनांचीही वर्णने आहेत. १८१८ नंतर रायगडाची कशी दुर्दशा झाली हेही या पुस्तकात नमुद करण्यात आले आहे. पण इंग्रजी तोफांच्या भडिमारामुळे शिवस्मारक वा वाघ्याची समाधी उद्ध्वस्त झालेली नव्हती याचाच पुरावा जर्मन देतात. हा पुरावा जर्मन ख्रिस्ती मिशन-यांमुळे अथवा एखाद्या इंग्रजी लेखकाच्या पुस्तकातुन त्यांना मिळाला असावा.

मराठे साद्घनांत वाघ्याचा उल्लेख मिळत नाही म्हणुन वाघ्या अस्तित्वातच नव्हता असे म्हणणे अज्ञानमुलक कसे आहे हे आतातरी लक्षात आले असेल. शिवरायांच्या हयातीतील शिल्प आणि जर्मनांनी करुन ठेवलेली ही नोंद वाघ्याचे शिवचरित्रातील स्थान अधोरेखित करते. संभाजी महाराजांनी ती स्मृती जपली. पण आमचेच काही नतद्रष्ट मात्र आपलाच हेका चालवत शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचाही अवमान कसे करत आहेत हे पाहुन उद्वेग वाटतो.

33 comments:

  1. सर, जबरदस्त पुरावा आहे..

    ब्रिगेडवाल्यांचे तोंड आता कायमचेच बंद ...............

    ReplyDelete
  2. Replies
    1. Sachin Shendge,कुत्र्याच्या पुतळ्याच्या आडून तुझे सर जातीयवादी राजकारण रंगवत आहेत.शहाणा हो रे बाबा.नेहमी हा अनामिक मित्राचा निरोप ध्यानात ठेव.आणि कोणत्याही राजकारणात चेकमेट नसतो.चेक-पे-चेक असतो,ध्यानात ठेव.

      Delete
  3. U R VERY GRATE SIR,THAT IS MOST INMPORTANT FACTOR LITERALY

    ReplyDelete
  4. संजय सर, एकदम जबरदस्त माहिती.द्वेषाने बरबटलेले ब्रिगेडी मराठ्यांचे डोळे आता तरी उघडतिल का? ्हे निश्चितच पहावे लागेल.नाहितर अजुन काही तरी नवा इतिहास शोधुन काढतिल,की जर्मन लोकांना ब्राहमणांनीच असे काहितरी लिहायला लावले.......:D

    ReplyDelete
  5. जबरदस्त आणि कडक पुरावा आहे सर :)

    ...सौ सुनार की एक लुहार की !!!!!!!!!!!!!!!!!!!!



    ReplyDelete
  6. Good search! there are many such proofs present in the Dutch, French, Portuguese and Spanish archives and it takes lot of effort to dig in there. Kudos to your patience.

    ReplyDelete
  7. या ग्रंथात १८३४ ते १८५२ मधील पुस्तकांची नोंद जर असेल तर वाघ्याबाद्दलचा मजकूर कोणत्या पुस्तकातून घेण्यात आला याबाबत काहीच माहिती नसावी हे थोडे संशयास्पद वाटते. विशेषत: ग्रंथाचे नावच "Negotiations: authors and subjects of books I-X (1834-1852)" असे असतांना वाघ्याचा मजकूर कोणत्या लेखकाने आणि कुठल्या पुस्तकात लिहिला आहे याची माहिती नसावी हे चमत्कारिक आहे. जर्मन्स इतके ढिसाळ असतील असे वाटले नव्हते.

    ReplyDelete
    Replies
    1. अनामिक मित्रा...जर्मन ढिसाळ नाहीत...पण हा संपुर्ण ग्रंथ उपलब्ध होत नाहीहे. परंतु या ग्रंथात दिलेला उल्लेख शब्दश: मी दिलेला आहे. याची खात्री आपण इंटर्नेटवरुन अर्काइव्ज वर जावून सर्च करुन घेवु शकता. संपुर्ण ग्रंथही मी मिळवेलच याची खात्री बाळगावी. मग मुळ पुस्तक कोणी लिहिले होते हेही आपल्याला कळेल. पण वाघ्या हे नांव व त्याची समाधी अठराव्या शतकात होती एवढे यावरुन पुरेपुर सिद्ध होते.

      Delete
  8. अनामिक मित्रा...आपल्यासारख्या भारतीयांना इतिहास लेखनाची साधी अक्कल नव्हती, तेव्हा ब्रिटीश, जर्मन्स हे युरोपिअन लोकांनी आपल्याला शिकवले, तेव्हा त्यांना ढिसाळ म्हणण्या पेक्ष्या आपण त्या काळात किती शिस्तबद्ध होता हे जरा इतिहासात तपासून पहा.

    ReplyDelete
    Replies
    1. शिवकालीन ऐतिहासिक साधनांमध्ये वाघ्याचा उल्लेख नाही म्हणून त्या इतिहासकारांना इतिहास लेखनाची साधी अक्कल नव्हती हे वाचून डोळ्यांचे पारणे फिटले.
      जर्मन लेखकांनी आपल्याला शिकवले हे आपले मत चिंतनीय आहे. पण मग फ्रेडरिक नित्शे सारख्या प्रसिद्ध जर्मन विचारवंताने मनुस्मृतीचा केलेला पुरस्कार हा देखील भारतीयांना ग्राह्य मानावा लागेल. नाहीतरी भारतीयांना अक्कल नाही हे ठरवल्यानंतर जर्मन विचारवंतांचे मत मान्य करायला कसलीच अडचण नसावी.

      Delete
    2. कुठला विषय कुठे नेता अनामित राव, मी बोलतोय इतिहासकराबद्दल आणि तुह्मी विषय नेल्हा विचारवन्त्ताकडे,,,,,इतकेच काय आजूनही काही (विशेषत बिग्रेडी) इतिहासकारणा इतिहास कसा तटस्थपणे लिहायचा याची अक्कल नाही. नाहीतर आजही काही बिग्रेडी इतिहासकारची पुस्तके वाचली कि असे वाटते कि भाकड कथांनी भरलेली बखर आहे.. इतिहास कसा शिस्तबद्धपणे आणि तटस्थपणे हे जर्मन इतिहासकाराकडून शिकले पाहिजे...

      Delete
    3. shendge aata tu sang...surat sur milasla

      Delete
  9. http://www.aisiakshare.com/node/1125

    ReplyDelete
    Replies
    1. http://mahavichar.blogspot.in/2011/05/blog-post.html

      Delete
  10. Sachin Shedage wrote:
    सर, जबरदस्त पुरावा आहे.. ब्रिगेडवाल्यांचे तोंड आता कायमचेच बंद ...............

    संभाजी ब्रिगेडला सत्याशी काय देणे घेणे आहे? त्यांचा हेतू जर पुतळा काढणे हाच असेल तर तुम्ही कितीही पुरावे दिले तर ते कसे मानतील? जरी आज शिवाजी महाराजांनी पुतळा काढू नये असा लेखी हुकुम केला तरी बिग्रेडी लोक तो केराच्या टोपलीत टाकतील. त्यामुळे गाफील न रहाता त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे.

    ReplyDelete
  11. संजयजी, यावर आता ब्रिगेड म्हणेल हे ब्राह्मण मुलनिवासी नाहीच, ते बाहेरून आलेले आर्य आहेत. आणि म्हणुनच त्यांच्या म्हणण्यावरून जर्मनांनानी हे सगळे आधीच लिहून ठेवले आहे. (हा हा हा)
    मस्त सर ! खरा इतिहास समोर आणलात, अभिनंदन !


    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Amogh. We have to cross lot many roaring insane hurdling streams to reach the goal of absolute unity. And we shall one day overcome these nonsense obstacles. And we will...together...

      Delete
  12. saheb samkalin purava lagato.etihas ha samkalin ,eaitihasik,satya mahitiwar adharit asala pahije.

    ReplyDelete
  13. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते.....

    ReplyDelete
  14. रायगडवरील कूत्र्यासंदर्भात दैनिक पूण्यनगरीचा आग्रलेख जरुर वाचा जसाच्या तसा देत आहे.....
    'वाघ्या'ची आख्यायिका

    रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील सन 1936 मध्ये उभारण्यात आलेल्या वाघ्या कुर्त्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर कार्यकत्र्यांनी उद्ध्वस्त केला. त्यानंतर सरकारने दबावाला बळी पडून त्या पुतळ्याची पुनस्र्थापना केल्याने आता नवीन वादाला तोंड फुटणार असाच रागरंग दि
    सतो. कारण या अस्मितेशी संभाजी ब्रिगेडच काय कोणीच तडजोडस्वीकारणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला दंतकथेवर आधारित भाकड संदर्भ चिटकून अधून-मधून जो वादंग उद्भवतो तो टाळण्यासाठी या इतिहासाचे वस्तुनिष्ठ संशोधन झाले पाहिजे. युगपुरुषाच्या इतिहासाचे विकृतीकरण कसे केले जाते, ही बाब जेम्स लेन या माथेफिरू इंग्रजी लेखकाच्या पुस्तकातून स्पष्ट झाली. त्यातूनच पुण्यातील भांडारकर इन्स्टिटय़ूटची संभाजी ब्रिगेडने मोडतोड केली. त्या वेळी त्यांना 'गुंड' म्हणून संबोधण्यात आले. त्यांच्याविरोधात मोठा गजहब झाला, पण तद्नंतर जेव्हा वस्तुस्थिती पुढे आली तेव्हा संभाजी ब्रिगेडची भूमिकाच योग्य होती, ही बाब सर्वमान्य झाली. जेम्स लेन प्रकरणावर पडदा पडल्यानंतर संभाजी बिग्रेडने दादोजी कोंडदेव यांचा वाद ऐरणीवरघेतला. त्यांनी दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा दावा केला. त्यासाठी इतिहास संशोधकांना ललकारून त्यांना ऐतिहासिक सबळ पुरावा देण्याचे आवाहन केले, पण त्यांना एका पाठोपाठ एक मुदत देऊनही ते सिद्ध करू शकले नाहीत. परिणामी संभाजी ब्रिगेडने पुण्याच्या लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रातोरात हलवला. उलट - सुलट चर्चा झडली, पण कोणी अजूनही पुरावा देऊ शकले नाही. इतिहासाचा कोणताच संदर्भ नसेल तर केवळ श्रद्धेपोटी तो वस्तुनिष्ठ कसा मानता येईल. तेव्हा संभाजी ब्रिगेडचा विरोध अनाठायी म्हणता येणारच नाही. संभाजी ब्रिगेडला 'बोल' लावून मनुवाद्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण किती काळ सहज करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबाबतच इतिहासातील वाद-विवादाला सुरुवात होते. महाराष्ट्र सरकारने त्यावर इतिहास संशोधकांच्या माध्यमातून संशोधन करून तो जाहीर केला तरी अनेक पक्ष आणि मंडळी आपला हेका दरवर्षी चालवतातच ना, हे कशाचे द्योतक मानायचे. रायगडकिल्ल्यावरील वाघ्या कुर्त्याचा पुतळा त्याच कपोकल्पित पठडीतील आहे. म्हणून तर संभाजी ब्रिगेड विरोध करत आहे. वाघ्या कुर्त्याचे समर्थक कोणताच ऐतिहासिक पुरावा अथवा संदर्भ का देऊ शकत नाहीत. महाराजांचा इमानी कुत्रा म्हणून मानल्या जाणार्‍या वाघ्या कुर्त्याने महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेत उडी मारली होती,अशी आख्यायिका रंगून सांगणे म्हणजे इतिहास नव्हे. राम गणेश गडकरी यांच्या 'राजसंन्यास' या नाटकात आलेल्या कुर्त्याच्या या उल्लेखावरून हा इतिहास समजणे संयुक्तिक नाही. गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते तेनाटककार होते. भाकडकथा नाटक-सिनेमात उठून दिसतात इतिहासात नाहीत. इतिहास, दंतकथा आणि श्रद्धा याची सरमिसळ सामाजिकदृष्टय़ा हानीकारक ठरते. तेव्हा इतिहास जशाच्या तसाच स्वीकारावा लागतो. तशी अवस्था दंतकथा अथवा श्रद्धेची नसते. राम गणेश गडकरी यांचे नाटक हा ऐतिहासिक दस्तऐवज मानला, तर छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी होणार नाही का ? ती वाघ्या कुर्त्याच्या समर्थकांना मान्य होईल का, याचे उत्तर द्यावे. महात्मा फुले यांनी 1869 साली रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचा प्रथम जीर्णोद्धार केला. शिवरायांवर प्रदीर्घ पोवडा लिहिला पण त्यात या कुर्त्याबाबत कोठेच उल्लेख नाही. 1981-82 च्या दरम्यान इंग्रजी लेखक जेम्स डग्लस यांनी शिवरायांवर अभ्यास करून पुस्तकलिहिले, त्यात कोठे हा संदर्भ नाही. 1929 साली वि. वा. जोशींनी राजधानी रायगड नावाचे पुस्तक लिहिले, त्यातही या कुर्त्याचा संदर्भ कोठे आढळत नाही. जेधे शकावली आणि अन्यतत्कालीन साहित्यात कोठेच उल्लेख नसताना केवळ गडकरींच्या नाटकावरून वाघ्या कुर्त्याचे उदात्तीकरण करणे ही नाटय़रूप विकृती ठरते. ती टाळण्यासाठी संभाजी ब्रिगेडने तीन वर्षे सातत्याने शासन दरबारीपाठपुरावा केला. पुराव्याच्या संशोधनाची मागणी केली. पुरातत्त्व विभागाकडे कोणता ठोसपुरावा नसल्यानेच संभाजी ब्रिगेडने वाघ्या कुर्त्याचा पुतळा उद्ध्वस्त केला. सरकारने त्याची पुनस्र्थापना केल्याने राज्य सरकारने आता एक तर ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा संभाजी ब्रिगेडची मागणी मान्य करावी

    ReplyDelete
  15. sanjay sonavani tula maharajanchya putalyashejari kutryache smarak havech kashala?? kutra asel tar asel tyacha putla kashala hava ahe tasech asel dynaneshwaranni redyala geeta wachayala shikvali mhanun tyanchya shejari redyacha putla ubha karnar ka?

    ReplyDelete
  16. "maharajanchya putalyashejari..."

    Are Shivashree...ekadaa taree Rayagadavar jaavun ye re baba.

    ReplyDelete
  17. बीग्रेडवाल्यांना कुत्रा चांगलाच चावलेला आहे.

    ReplyDelete
  18. युक्तिवादासाठी खूप सडेतोड पुरावा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या मेहनतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!

    ReplyDelete
  19. https://www.facebook.com/photo.php?fbid=460789780644303&set=a.137126639677287.23753.100001398544462&type=1&theater

    This is the new conspiracy of brigade to deny the existence of waghya

    ReplyDelete
  20. http://www.youtube.com/watch?v=tCzXjWpDr40&feature=youtu.be

    Now the brigadis have made this so called new documentary on waghya..

    ReplyDelete
  21. संजयजी ह्या माहिती पटात तुम्ही जो धारवाडच्या शिल्पाचा उल्लेख केला आहे तो एक कुत्रा नसुन चित्ता आहे असे ह्या माहितीपटाचे लोक म्हणत आहेत. इतिहासतज्ञ जयसिंहराव पवारांनी ही वाघ्या च्या जागी सोयराबाईंची समाधी असू शकते असे सांगितले आहे.माहितीपटात जातीयवाद प्रखरतेने जाणवतो.आता ह्यावर तुम्ही काय उत्तर द्याल हे पहायला खरच आवडेल........

    ReplyDelete
  22. मित्रहो, या बाबत माझ्याशी सावंत व कोकाटेंनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत निवाडा करण्यासाठी शासकीय समिती बसवून त्यात मला घ्यायची तयारीही अत्यंत उदारपणे दाखवली आहे. पण हे औदार्य न समजण्याएवढा दुधखुळा मी नाही. शिवाजी महाराज दक्षीणदिग्विजयाला गेले होते कि चित्ता हंटींगला? आणि यांनी कधी चित्ता तरी पाहिला आहे काय? जयसिंगराव पवार हे इतिहासकार आहेत काय? असते तर "जर-तर" ची भाषा वापरली नसती. सोयराबाईंना संभाजी महाराजांनी वीष देवून ठार मारले होते असे पुरावे असतांना ते सोयराबाईंची समाधी बांधतील कसे हे त्यांना समजत नाही हा त्यांचा प्रोब्लेम आहे. कोणी म्हनतो ती समाधी पुतळाबाईंची असेल तर कोणी म्हणतो सईबाईंची. इतिहासाला असले अंदाज चालत नाहीत. या लघुपटाचा निर्माता-दिग्दर्शक एक अत्यंत साधा सरळ तरुण आहे. त्याने मला फोन केला होता. मी त्याला पटातील त्रुटी सांगितल्या आहेत व त्या त्याला मान्यही आहेत. भावनेच्या भरात त्याने या सीडीची निर्मिती केली असली तरी त्यात त्याचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे हे ऐकुन मलाच वाईट वाटले आहे. माझ्या मतांविरोधात पट केला याबद्दल मला मुळीच राग नाही...उलट मी त्याला म्हणालो...तुझी बाजु किमान कन्व्हिन्सिंग आणि एकवाक्यता ठेवणारी असायला हवी होती...यात चार लोक चार वेगळ्या गोष्टी सांगतात...कसे व्हायचे? असो. राहिली जातीयवादाची गोष्ट...त्यामुळे खुद्द छ. शिवाजी महाराजांचे अवमुल्यन होते आहे याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे.

    ReplyDelete
    Replies
    1. संजय सर तुम्ही वाघ्या कुत्र्याच्या समधीसाठी जो जर्मन उल्लेख दिला त्यात च स्पष्ट म्हटले आहे की शिवरायांचा नैसर्गिक मृत्यू झाला
      आणि इथं तुम्ही विषप्रयोग झाला म्हणून बोलता आहात ??

      Delete
  23. संजय सर शिल्पातुन हे ब्रिगेडी कुत्र्याला चित्ता बनवतात ह्या पेक्षा अजुन हस्यासस्पद गोष्ट नाही.तो भैय्या तर ब्राहमण द्वेषाने ्वेडा झाला आहे .कुठे ही त्याला ब्राहमणांवर राग काढायची सवय लागली आहे. परत प्रश्न विचारला आणि त्याच्या जवळ उत्तर नसले की लगे़च ब्लॉक करतो.सोमनाथ मंदिरावर इस्लामी आक्रमकाने ने केलेल्या आक्रमणाला ब्राहमण जबाबदार होते असा जावईशोध ह्याने मागे लावला होता.तुम्ही पुराव्या निशी हे जरी सिद्ध केले की तो चित्ता कुत्राच आहे तरी ह्या मागे भटी कावा आहे हे सांगायला तो कमी करणार नाही....:D

    ReplyDelete
  24. "शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने जळत्या चितेत उडी घेतली होती" कीव येते अशा लिखाणावर.चला आपण एक प्रयोग करून बघू चार पाच लाकडं गोळा करून त्याला आग लावू आणि त्याचा समोर कोणत्याहि जातीचा कुत्रा समोर उभा करू बघू तो कुत्रा काय करतो ते. माज्या माहिती प्रमाणे कोणता हि कुत्रा त्या अग्नी पाशी जाणार नाही आणि तो कितीही निष्ठावंत असला तरी.तुमच्या लेखना नुसार जरी वाघ्या नावाचा कुत्रा असेल तर तो जळत्या चितेत उडी कशी घेणार.आणि असा उल्लेख कोणत्या हि बखरी मध्ये येत नाही (आणि येत असल्यास मला त्या विषयीचे संदर्भ द्यावे ) ......मला माहिती आहे जे काही मी बोलो आहे त्याला कोणत्या इतिहासाचे पुरावे नाही. पण प्रश्न मात्र सर्व साधारण आहे सगळ्यांना पडत असेल असे.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...