Saturday, August 18, 2012

.....तुम्ही त्या दिशेला आम्हाला नेवू नका.


हिंसकता, असहिष्णुता आणि असामाजिकता हा प्रत्येक समाजाला लागलेला रोग आहे. एखादी घटना घडली कि त्या धर्म-जातीशी निगडीत सर्वच समाजाला धारेवर धरण्याची जागतिक परंपरा आहे. आपण तरी या परंपरेचा त्याग करायला हवा. भारतात भारतीयच असुरक्षीत असतील तर आपल्या स्वातंत्र्याला तिळमात्र अर्थ नाही. याला आपणही जबाबदार आहोत. पुर्वोत्तर भारतियांना चिंकी म्हणुन हीनवनारे कोण आहेत? त्यांना पोलीस रस्त्यांवर अडवत हरघडीला पासपोर्ट का मागतात? लदाखला जायला पासपोर्ट लागतो का असे मला १९९७ सालापर्यंत विचारले जायचे...म्हणजे लडाख हा भारताचाच भुप्रदेश आहे हे आपल्या बापड्यांना माहितच नव्हते...तरीही आम्ही अखंड भारताचा उद्घोष करतो...हा आमचा वेडेपणाच नाही काय?

बांगलादेशी घुसखोर असोत कि पाकिस्तानच आपली मायभुमी मानत येथीलच सोयी उपभोगणा-यांना घरचा रस्ता दाखवायची हिम्मत आपल्या कोणत्याही सरकारमद्धे नव्हती व नाही. ती कशी आणायची याचा विचार कोणताही सर्वच समाज टार्गेट न करता आपल्यालाच करावा लागनार आहे.


पुर्वोत्तर भारतातील बांगलादेशींना हाकललेच पाहिजे याबाबत शंका असण्याचे कारण नाही. जो देश आपल्याच प्रजेला पोसु शकत नसेल, प्रजेला शरणार्थी म्हणुन अन्य देशाचा आश्रय घ्यावा लागत असेल तर अशा देशाचे अस्तित्वच मुळात असण्याचे कारण नाही. भारतीय प्रजातंत्राचे गैरफायदे घेत पार येथील निवडनुका लढवत लोकनियुक्त प्रतिनिधी बनु शकण्याइतपत जर त्यांची मजल जावू शकत असेल तर भारतीय कायदा आणि एकुणातील व्यवस्था ढिसाळ झाली आहे हे मान्य करत त्यावर कठोर हल्ले व्हायलाच हवेत. घुसखोरांना परत हाकलणे हा एकमेव पर्याय आहे. आमच्या नागरिकांचे हक्क हिरावण्यात घुसखोर आघाडीवर येत येथील शांतता व सुव्यवस्थेवरच आक्रमण करत असतील तर त्यांचे निर्दालन करण्याचे कार्य आमच्या सरकारला करावेच लागेल.

येथील राष्ट्रप्रेमी मुस्लिमांची जबाबदारी अधिक आहे. ते जर इस्लामी मुलतत्ववादाला बळी पडत या घुसखोरांना केवळ धर्मबंधु म्हणुन आश्रय देत असतील, त्यांचे संरक्षण करत असतील वा त्यांना पाठिंबा देत असतील, तर मग त्यांची राष्ट्रप्रियता प्रश्नांकित होणारच. यातुन हिंदु दहशतवाद उफाळुन आला तर मग त्याची जबाबदारी कोणावर?

पुर्वोत्तर राज्यांत घुसखोरी करत, तेथे वा ब्रह्मदेशात मुस्लिमांवर हल्ले होताहेत असा कांगावा करत, खोटे फोटो प्रसृत करत सा-या देशात आग भडकावण्याचे काम जिहादी करत आहेत. आमचेच देशवासी या देशात भयभीत होत आपापल्या घराचा मार्ग पकडु लागले आहेत. पण जे घुसखोर आहेत त्यांनी मात्र आमच्याच देशबांधवांच्या मुलभुत हक्कांवर गदा आणली असुनही ते मात्र शिरजोर होत येथीलच कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत. अशा घुसखोरांना लषकराची मदत घेत प्रथम त्यांच्या भुमीत रेटुन हाकलले पाहिजे. अन्यथा हा प्रश्न एवढा उग्र होईल कि कदाचित एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बांगलादेशी घुसखोर असेल.

ज्या देशाला आपल्याच नागरिकांना सुरक्षीत वातावरण देता येत नाही त्याला देश म्हणता येत नाही. आपल्या, देशाचे असोत कि राज्यांचे, गृहमंत्री मुळात एवढे लुळे आहेत कि त्यांनी त्या महत्वाच्या पदावर का असावे हाच प्रश्न आहे. लोक घाबरुन जात आहेत तर त्यांना सुरक्षा देत, धीर देत, थांबवण्याऐवजी जादाच्या रेल्वे सोडणारे कोणती देशभक्ती दाखवत आहेत?

घुसखोर मुस्लिम हा या देशाला फार मोठा धोका आहे. इथल्या मुस्लिमांना जर हे समजत नसेल तर ते एक दिवस गुजरातेपेक्षा महाभयंकर घोटाळा स्वहस्ते निर्माण करतील आणि अकारण या देशात विध्वंसाचे वादळ निर्माण होईल. आम्हाला मोदी आजिबात नकोय. आम्हाला कोणताही कडवा आंधळा धर्मवादी नकोय. पण तुम्ही त्या दिशेला आम्हाला नेवू नका.

घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवा. आपल्याच देशबांधव नागरिकांना भयभित करत, त्यांना असुरक्षित वाटेल अशा कृत्यांपासुन दुर रहा...

मुस्लिम धर्म तसाही जगभर पराकोटीचा बदनाम करण्यात कडव्या इस्लामियांनी हातभार लावला आहे. आम्हे अजुनही इस्लामी बांधवांवर प्रेम करतो...

त्याला द्वेषात बदलवायला हातभार लावु नका हीच काय ती विनंती.

24 comments:

  1. सुंदर लिखाण केलेय सोनवणी. वास्तव आणि सर्व भारतीयांच्या मनातील खदखद व्यक्त केलीय.

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या देशाला आपल्याच नागरिकांना सुरक्षीत वातावरण देता येत नाही त्याला देश म्हणता येत नाही. आपल्या, देशाचे असोत कि राज्यांचे, गृहमंत्री मुळात एवढे लुळे आहेत कि त्यांनी त्या महत्वाच्या पदावर का असावे हाच प्रश्न आहे. लोक घाबरुन जात आहेत तर त्यांना सुरक्षा देत, धीर देत, थांबवण्याऐवजी जादाच्या रेल्वे सोडणारे कोणती देशभक्ती दाखवत आहेत?
      shivalik verma,याओळींचा अर्थ समजून घ्या.सध्याची परिस्थिती पहा,लेख परत वाचा.मग प्रतिक्रिया द्या.

      Delete
  2. uttam! samyak shabdat samanya bharatiya chya bhavana maandalya aahet.. dharmandh muslima babat bolayla tatha kathit purogami/ media nehmi kacharatat..lekh aawadla

    ReplyDelete
  3. dear sonawani sir,
    Bangladeshi pratyashat kon ahet?

    1)brahamananchya chalala kantalun dharmantar kelele lok ahet.
    2)majuri karun jaganare bahujan ch ahet.
    3)brahman us/usa la nokarya karatat te barobar ani he bichare
    kami paishat yetat te ghusghor ha nyay ahe ka?
    4)shahu/phule/ambedkar chalwaline manuwadyancya ya kawyala
    bali padu naye.
    5)bharat/pak/bangladesh ya sima krutrim ahet.
    6)surwa bangladeshina bahujan chawalit samawun ghene
    hach yawaril khara marg ahe.
    7)WICHAR kara ya lokana bahujan chalawalit samawun ghetale
    tar chalwal kiti mothi w vyapak banel?

    krupaya waril prashnanchi uttare aplya manashi shodha.

    UTTAM JAGTAP(BAMBIWADE KOLHAPUR)

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या शंकांची उत्तरे खालीलप्रमाणे...
      १. धर्म कोणत्याही कारणांनी बदलला असेल...(उदा. अनेक ब्राह्मनांनीही इस्लाम स्वीकारला आहे व धर्मांतरीत ब्राह्मनही नंतर कट्टर मुस्लिमच बनले. ब्राह्मनांनी कोणत्या अत्याचारांमुळे धर्म बदलला होता?) आज त्यांचा धर्म स्वतंत्र आहे हे वास्तव नाकारणे वेडेपणा आहे.
      २. ते बहुजन असोत कि अजुन कोणी, मजुरी करुन जगोत कि दाउदसारखे दहशतवादी, जोवर असे लोक या देशाला राष्ट्र मानत राष्ट्रबांधवांशी बांधवांसारखा व्यवहार न करता राष्ट्रप्रेमी इस्लामियांनाही द्वेषाचे कडु जहर प्यायला भाग पाडत त्यांनाहे असुरक्षीत करत असतील तर त्यांन यी देशाबाहेर हाकलणे हेच उत्तर आहे. भारत ही काही धर्मशाला नाही...कोणीही यावे आणि बस्तान बसावे. राष्ट्राचे काहे नियम असतात ते पाळले गेलेच पाहिजेत.
      ३. ब्राह्मणच काय, लाखो बनिया, शुद्र अमेरिकेत, आखाती देशात नोक-या करतात. पण ते त्या देशाचे नियम पाळतात. त्यांचाकडे पासपोर्ट व व्हिसा असतो. या घुसखोरांकडे कसलेही कागद नसतात.
      ४. देशद्रोह्यांना, घुसखोरांना समर्थन देना-यांना मी चळवळीचे मानतच नाही...तुम्हीही मानु नये. चलवळीचे असे विचार असतील तर तेही देशद्रोहीच आहेत.
      ५. देशाच्या सीमा कधीही कृत्रीम नसतात. एवढे सैन्य सीमांवर जिलेब्या खायला बसवलेले नसते. गोळ्या घालायला वा गोळ्या झेलायला ते असते. एकेका इंचासाठी सैनिक ल्ढतो म्हणुन तुम्ही येथे शांतपने टाइपरायटर बडवत बसु शकता...
      ६. एक काम कर्रा...बांगलादेशात जा आणि तेथे बहुजनीय चलवळीचे तुनतुने वाजवुन दाखवा...येथे घुसलेल्यांना बहुजनीय चळवळीत त्यंना सामील करुब्न घ्यायचा विचारच देशविघातक व राष्ट्रद्रोही आहे.
      धन्यवाद.

      Delete
    2. Very Good Bajunan Chalval mhanje kunachehi tushtikaran nasave.........

      Delete
    3. सोनवणी,घुसखोरांनी देशात घुसू नये,याची जबाबदारी सिमा सुरक्षा दलाची असते.पर्यायाने सरकारची असते.त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही आता चळवळींविरोधात घसरला.तुम्ही स्वतः He is a social activist as well and has been promoting "One World: One Nation" concept for better tomorrow since last 10 years.अशी स्वतःची ओळख करून देता,याच्या नेमकी विरोधी भूमिका घेत आहात.मला वाटते,खरेतर तुम्हाला कशाचेही देणे-घेणे नाही.फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ व सत्ताधारी पक्ष यांविरोधात आहात.,पण तसे कुणालाही कळू नये याची पुरेपूर दक्षता घेत आहात,तरीदेखील कळल्याशिवाय कसे राहील,नाही का....?

      Delete
  4. जातीय व धार्मिक दंगली घडविण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी म्हणा जबाबदार असणारे हिंदुत्ववादी यांचेविषयी चकार शब्द लिहिला नाही,उलट आम्हाला मोदी आजिबात नकोय. आम्हाला कोणताही कडवा आंधळा धर्मवादी नकोय. पण तुम्ही त्या दिशेला आम्हाला नेवू नका,असे म्हणत अप्रत्यक्षपणे याला उत्तर म्हणून कट्टर हिंदुत्ववाद्यांना बरोबर ठरवत आहात.जी प्रसारमाध्यमे अकलेची दिवाळखोरी दाखवत आहेत,त्याविषयीही काहीही लिहिले नाही.सरकारवर सडकून टिका न करता फक्त महाराष्ट्रीयन गृहमंत्री केंद्रातले व राज्यातले यांनाच कसे काय बुवा दोष लावत आहात ? कायदा व सुव्यवस्था राखणे हे त्यांचे आद्य कर्तव्य असते.त्यांनी केले ते प्राप्त परिस्थितीत योग्यच केले.नुकतेच कुत्र्याच्या प्रकरणात हा अनुभव घेतला आहे,नाहीतर कुत्रं बसलं असतं का ?उपोषण संपलं असतं का ? बरोबर ना !!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. कट्टर हिंदुत्ववादी म्हनवनारे हिंदु नसुन वैदिक धर्मीय आहेत. त्यांचा शैव हिंदु धर्माशे काडीएवढाही संबंध नाही. वैदिक धर्मीय कट्टरतावादी देशद्रोही जेवढे आमचे शत्त्रु आहेत तेवढेच घुसखोर आणि आमच्याच देशबांधवांना धर्माच्या नांवाखाली भयभित करणारे मुस्लिमही आमचे शत्रु आहेत. मोदी कधीहे पंतप्रधान होनार नाही...पण हे देशद्रोही मुस्लिम जिहादी मात्र त्यालाच अप्रत्यक्ष पाठबळ देतात ही चाल समजावुन घ्यायला हवी. वैदिकेतर हिंदुंशी त्यांना काहीएक घेणेदेणे नाही. मरनारे वैदिकेतरच असतात हे आपण समजावुन घ्यायला हवे. "आम्हाला त्या दिशेला नेवु नका..." असे मी म्हनतो ही धमकी नाही कि लुळेपणाही नाही. हा इशारा आहे. रा.स्व. संघ हा या देशावरील कलंक आहे. ही हिंदुंची नसुन वैदिक धर्मियांची संघटना आहे. त्यांना विरोध करतच या कट्टरतावादी मुस्लिमांचा निषेध करत (वेळच पडली तर शस्त्रेही हाती घेत) करत रहावा लागणार आहे...जर ते असेच द्वेषाचे व असुरक्षिततेचे जहर घोळत राहतील तर...

      हा देश या देशवासियांचा आहे. मग ते कोणत्याही जातीधर्माचे असोत. जेही कोणी राष्ट्रबांधवांच्या जीविताला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष धोका निर्माण करतील...मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत...त्यांच्याविरुद्ध यथाशक्ती उभे रहायलाच हवे.

      Delete
    2. कट्टर हिंदुत्ववादी म्हनवनारे हिंदु नसुन वैदिक धर्मीय आहेत......त्यांना विरोध करतच या कट्टरतावादी मुस्लिमांचा निषेध करत (वेळच पडली तर शस्त्रेही हाती घेत) करत रहावा लागणार आहे...जर ते असेच द्वेषाचे व असुरक्षिततेचे जहर घोळत राहतील तर...
      तुमच्या ध्यानात का येत नाही,हे सर्व 2014 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चालले आहे.हिंदू- मुस्लिम दंगे घडले तरच कट्टर हिंदुत्ववादी वैदिकधर्मीय सत्तेत येवू शकतात,अन्यथा नाही.त्यासाठी हे असेच घोळत ठेवले जाणार.मुख्य प्रश्न हा आहे-परिस्थिती संयमाने हाताळायची की आगीत तेल ओतत हिंदुत्ववाद्यांना सत्तेत जाण्यास मदत करायची.तुम्ही लिहित काहीही असला तरी कृती हिंदुत्ववाद्यांना मदत करणारी आहे.

      Delete
    3. संजय सर तुम्ही वैदिक धर्म आणि हिंदू धर्म ह्यांच्यात फ़रक करत आहात ते तुम्ही केलेल्या संशोधनावर. पण खरं पाहिले तर वैदिक धर्म पाळणारे फ़क्त आर्य समाजी लोकच आहेत.्नाहितर इथुन तिथुन प्रत्येक जण स्वत:ला हिंदूच समजतो व मला वाटत नाही की संघ ही आर्य समाजी संघटना आहे.काही ब्राहमण ही स्वत:ला वैदिक म्हणतात पण एकाने ही वेद पाहिले सुद्धा नाही.मग आपण आज सर्व समाजात हिंदू कोण आणि वैदिक धर्मीय कोण हे कशावरुन ठरवावे ?का फ़क्त धर्म मार्तंडच वैदिक धर्मीय आहेत?

      Delete
  5. ......तुम्ही त्या दिशेला आम्हाला नेवू नका....धमकी म्हणायची की विनंती.....की लुळेपणा....?

    ReplyDelete
  6. संजय सर अगदी योग्य ते लिहिलत.धर्मांधपणा हा कुठलाही असो तो चुकीचाच आहे. बाहेरच्या देशातल्या स्वधर्मीयां साठी जर भारतात दंगली होत असतिल तर दुस-या बाजूला कट्टरपणा हा येणारच.मग मोदी सारखे नेते पंतप्रधान झालेच पाहिजेत.गोधरा नंतर गुजरात मध्ये काहिच घडले नाही व आता सर्व धर्मीय बंधुत्वाची भावना ठेवुन राह्त आहेत, असे सध्या तरी दिसत आहे.

    ReplyDelete
  7. संजयजी, मला वाटते की तुम्ही निष्कर्ष काढण्यात घाई करत आहात. तुम्हाला माहीतच आहे की जे कांही घडले त्यामागे पाकिस्तानचे किंवा अगदी भारतीय राजकारण्यांचे भयानक कारस्थान असू शकते. त्याला बळी पडणा-या मूठभर मुस्लीम दंगेखोरांमुळे संपूर्ण मुस्लीम समाजाला आरोपीच्या पिंज-यात उभे करणे योग्य ठरणार नाही.

    बांगला देशाच्या विशिष्ट भौगोलिक स्थितीमुळे आणि तेथील अंतर्गत परिस्थितीमुळे तेथील लोकांची भारतात घुसखोरी होत रहाणार, त्याला हिंदुत्ववाद्यांनी हिंदू-मुस्लीम संघर्षाचे रूप दिले आहे. बांगला देश मधून जे लोक भारतात घुसखोरी करतात त्यात हिंदू आणि बौद्ध यांचीही संख्या लक्षणीय आहे.

    मुंबईतील परवा झालेल्या प्रकारात हिंदुत्ववाद्यांनी फेस बुकवर खोटे पण प्रक्षोभक फोटो टाकलेले आहेत. हे फोटो बारकाईने बघितल्यास ते खोटे आहेत हे सहज कळून येते. पण शिखांनी खरोखरच भारताचा झेंडा जाळला त्याचे खरेखुरे फोटो फेसबुकवर आले, तेंव्हा हेच हिंदुत्ववादी शेपूट घालून बसले.

    भारतातील मुस्लिमांचा दहशतवाद हा हिंदू दहशतवादाची प्रतिक्रिया आहे असे तुम्हीच तुमच्या दहशतवादाची रूपे या पुस्तकात लिहिले आहे. त्यामुळे तुमचा हा लेख तुमच्या पुस्तकातील मतांशी विसंगत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सोनवणी दारू पियुन लिहिले आहे काय.....
      घुसखोर..धर्म या गोष्टीची भेसळ करून मनात येयील ते लिहितोय..उगाच दुकान लाऊ नको

      Delete
  8. मुद्दा, नेमकेपणाने व प्रभावीपणाने मांडणे म्हणतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा लेख. ज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संजय सोनवणी यांनी आपले मत मांडले आहे, ती वास्तविक अत्यंत प्रक्षोभक अशीच आहे. तरीही, शक्य तितक्या सौम्य शब्दांत सोनवणी यांनी कान टोचले आहेत. मुस्लीम समाजाला समजून घ्या असे म्हणणे सोपे आहे. पण ते कीती, यालाही काही मर्यादा आहेत. हिंदू समाजात जातीपाती आहेत, मतभेद आहेत. मात्र, त्याच प्रमाणाच येथे समाजसुधारकही झाले आहेत. त्यांच्या विचारांवर चिकित्साही होत राहते. समाज विकसित होत असतो तो अशा वातावरणात. दुर्दैवाने मुसलमानांमध्ये विचारवंतांना मुळीच किंमत नाही. हिंदू समाजाला पदोपदी सल्ले देणारी मंडळी मुसलमांनाचा विषय निघाला की मूग गिळून गप्प असतात. त्यातून फावते कुणाचे? आणखी एक महत्त्वाची बाब अशी, की आक्रमण करताना हे धर्मांध तुम्ही ब्राम्हण आहात की मराठा, शिंपी आहाता की सोनार, अमूक जातीचे आहात की तमूक वगैरे काही पाहात बसत नाहीत. भिवंडीमध्ये त्यांनी ठेचलेले दोन्ही पोलिस हवालदार दलित समाजातील होते. त्यांच्या बाजूने कोणी आश्रू ढाळल्याचे आठवत नाही. याचाच अर्थ, ज्यांना धर्म हीच गोष्ट राष्ट्रीयत्वापेक्षा मोठी वाटत असेल, त्यांनी खुशाल या देशातून (त्यांनी ज्यांचा कैवार घेत रस्त्यावर उतरले)त्या बांगलादेशात जावे. इथे, तमाशा करुन वातावरण बिघडू नये. अगदी खरे सांगायचे तर उत्तर प्रदेश, बिहार व बांगलादेशातून इथे येऊन बस्तान बसवणाऱ्यांनीच वातावरण अगदी कलुषित करण्यास सुरवात केली. पाकिस्तान, सिरिया, इराक, अफगाणिस्तानात रोज तालिबानी हल्ले करतात व त्यात मारले जातात, तेदेखील मुसलमानच ना...मग त्यांच्या विरोधात उतरण्याची हिंमत हे लोक का दाखवत नाही. अफगाणिस्तानमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती फोडली गेली किंवा अगदी परवा लखनौमध्ये बुद्धमूर्तीची विटंबना करण्यात आली तेव्हा त्याविरुद्ध कोणी चकार शब्द काढला का? इतके सोयीचे राजकारण विचारवंतही करीत असतील, तर सर्वसामान्यांना दिशा कोण दाखवणार? मग, धर्माचे राजकारण करणाऱ्या पर्यायी संस्था व संघटना मजबूत होणारच. त्यात दोष त्यांचा नाही, तर पाखंडी, दुटप्पी विचारवंतांचा व राज्यकर्त्यांचा आहे. मुंबईतील हल्लेखोरांवर ईदनंतरच कारवाई करण्याचे ठरले असल्याचे समजते. आता उद्या हाच न्याय तुम्ही गुन्हेगारांचे धर्म पाहून लावणार का? मग या परिस्थितीत कुणाला साध्वी प्रज्ञासिंगला तपासयंत्रणांनी दिलेली द्वेषमूलक वागणूक आठवली तर त्यात त्याचे काय चुकले? विचारांत स्पष्टता ही हवीच. केवळ संघवाल्यांनी म्हटले म्हणून उद्या तुम्ही राष्ट्र ही संकल्पनादेखील मोडीस काढायला निघालात, तर तुमच्यासारखे कपाळकरंटे तुम्हीच. या एकूणच, परिस्थितीवर सामान्यजनांच्या मनातील खदखद संजय सोनवणी यांनी व्यक्त केली आहे, ती खरोखरच कौतुकास्पद आहे, हे मान्य करायलाच हवे.

    ReplyDelete
  9. ब्रिगेडींनो आणि बामसेफींनो, हे नीट समजावुन घ्या कि आपले वाद आपले आहेत ते आपण कितीही काळ लढु शकतो...जर हा देश शिल्लक राहिला तर! हा देशच शिल्लक राहिला नाही, भारतियांनाच भितीने निर्गमण करावे लागत असेल तर उद्या तुम्हालाही हाकलले जाईल, याची शंका बाळगु नका. हिंदु वा ब्राह्मनांचा द्वेष करण्याच्या नादात एक नवा अराष्ट्रीयवाद तुम्ही निर्माण करत आहात. त्याला विरोध होणारच! मला शिव्या देवून, मी दारु पिवुन लिहितो कि गर्द घेवून याची अधिक पंचाईत न करता हा प्रश्न हिंदु-मुस्लिमांतील नसुन राष्ट्रद्रोही मुस्लिमांचा व घुसखोरांचा आहे, हे आधी तुमच्या टाळक्यात घुसवा. तुमच्या घरात कोणी घुसखोरी केलेली तुम्हाला चालते का? शेताच्या बांधावर अतिक्रमण झाले तर दुस-याच्या डोक्यात कु-हाड घालायला आपण कमी करत नाही. येथे प्रश्न राष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे. आपल्याच भयभीत होवून पळत सुटलेल्या नागरिकांचा आहे. ११० कोटींचा देश वीस-पंचविस नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यात असमर्थ असतील तर त्यांना देशभावना समजत नाही असे म्हनावे लागते. इशान्य भारतीय हे आमचे बांधव आहेत. धर्म कोणताही असो. १९४७ नंतरही या देशात राहिलेले आणि या देशावर जे प्रेम करतात तेही आमचे तेवढेच राष्ट्रबांधव आहेत. येथे राहुन येथल्याच लोकांचे गळे कापणारे अथवा विश्वासघात करणारे अथवा गरीबीने येवोत कि त्यांच्या सरकारांच्या प्रोत्साहनाने...ते आमचे शत्रुच आहेत. ते आमच्या देशबांधवांच्या रोजगारावर, राहण्याच्या जागांवर अतिक्रमण करत येथील अर्थव्यवस्था पोखरत असतात...आणि मग तुम्ही-आम्हीच महागाईची बोंब...बेरोजगारीची बोंब मारत शासनावर टीका करत असता. हा सारा येडचाप राष्ट्रवादाचा परिणाम आहे.

    यामागे हिंदुत्ववाद्यांचे षड्यंत्र असेल तर त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे...पण त्याच वेळीस या धर्मांध मुस्लिमांचे डाव कोण समजावून घेणार? या घटनेमुळे अनेक हिंदुत्ववादी लगोलग मोदीच कसे पंतप्रधान व्हायला हवेत असा प्रचार करु लागले आहेत...तेही गंभीर चुक करत आहेत. भय...दहशत...हिंसा...विनयभंग करनारे कधीही मनुष्य प्राणि म्हनवण्याच्या योग्यतेचे नसतात. त्यांना पिसाळलेल्या जनावरांना दिली जाते तशीच ट्रीटमेंट द्यावी लागते.

    एक जग एक राष्ट्र हे स्वप्न आहे हे खरेच...पण त्यासाठी मानवजातीला प्रचंड वाट चालावी लागणार आहे. तोवर तरी राष्ट्र हेच सर्वोपरि राहणार आहे. या देशाचे दुर्दैव हे आहे कि बाहेरच्या शत्रुंपेक्षा आतलेच शत्रु भयानक आहेत. यांन राष्ट्रापेक्षा फालतु, अगदी वाघ्यासारख्या विषयावर वेळ घालवायला...आपल्याच ब्रेन वाश केलेल्या कार्यकर्त्यांना आत घालवण्यात अधिक वेळ व पैसा आहे...पण आपल्याच राष्ट्रबांधवांना धीर देत, रक्षण देत त्यांना दिलासा देण्यात मात्र एक क्षणही व्यतीत करायचा नाहिहे...हे असे फक्त राष्ट्रद्रोहीच करु शकतात.

    मी जवळपास अठरा आसामी व मणीपुरी विद्यार्थ्यांना जाण्यापासुन थांबवले आहे. त्यांना धीर आल्याने त्यांचे अधिक मित्रही थांबतील अशी आशा आहे. माझे मित्र संजय नहारही अधिक नेटाने आपली शक्ती पणाला लावुन हे कार्य करत आहेत. सर्वांनीच यात हातभार लावला तर आपण राष्ट्रद्रोही शक्तींना हाणुन पाडु शकतो. नक्कीच.

    कोणाला मी प्रतिगामी वाटलो तर हरकत नाही. आंधळ्या पुरोगामित्वापेक्षा हे बरे...मला माझ्या राष्ट्रातील माझ्या बांधवांच्या मनाला कसलाही धक्का पोहोचवणा-यांचा संतापच येणार...इस्लामप्रेमाचे गळे येथे काढणारे व या व्यथित व भयभित निर्गमनाकडे डोळे झाकणारे देशद्रोही आणि फक्त देशद्रोहीच आहेत हे पक्के समजुन चालावे.

    ReplyDelete
    Replies
    1. संजय सोनवणी,तुम्ही कितीही ठाकठीक खुलासा लिहिला तरी----मूळ लेख,सध्याची परिस्थिती,भारतीय समाजाची मानसिकता,यामागचे राजकारण,2014 ला येवू घातलेल्या निवडणूका,त्यासाठी राजकारणी व हिंदुत्ववादी यांची कारस्थाने,सोईस्कर दुर्लक्ष,इ.इत्यादी अनेक कारणांमुळे तुमचा हा लेख अप्रस्तुत आणि बिनकामाचा आणि आगीत तेल ओतणारा ठरण्यासारखा आहे.विनाकारण देशप्रेमाचा आव आणून भडकावण्याचे काम करू नका.तुम्ही कुत्र्यासारख्या फालतू विषयावर वेळ घालवत आहात.ते इथे लिहिण्याचे काही कारण होते का ? दुसर्यांवर राष्ट्रद्रोहाचे आरोप लावू नका.आपल्याखाली काय जळतंय ते कळेना,लागले दुसर्याला राष्ट्रद्रोही ठरवायला.मुस्लीमांची काळजी आहे आम्हाला.राष्ट्रद्रोही लोकांना शिक्षा होण्यासाठी(धर्म मध्ये आणू नका,हि नम्र विनंती)बघा उपोषणाला बसता आले तर.....

      Delete
  10. मुंबईतील धर्मांधांचा हल्ला झेलत गंभीर जखमी झालेले पोलिस, भररस्त्यात आब्रुवर हात पडलेल्या पोलिस भगिनी हे देखील बहुजनच आहेत. लखनौमध्ये दंगेखोरांनी विटंबना केलेल्या मूर्ती शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या आहेत. आता, बामसेफी मंडळी त्यांची मुळातच वाकडी असलेली शेपूट कुठे घालणार? कारण, त्यांना एक भीती नक्की सतावत असणार, आपण याविरुद्ध काही बोललो की आपल्याला सीमेपलीकडे बसलेले मायबाप तुकडे फेकणार नाहीत. त्यामुळे, या साऱ्या प्रकारांवर न बोलता ते पुन्हा हे सारे ब्रामणांनी घडविले वगैरे अशी मुक्ताफळे उधळत बसतील व त्यांच्या बोलणाऱ्यावर माना डोलावणाऱ्यांना वास्तव समजेपर्यंत त्यांची सुंता होऊन गेलेली असेल. पाकिस्तान हेच मूलनिवासी स्थान असून तेथे तुम्हाला साऱ्या सुविधा देऊ असे आश्वासान मिळाले, की हे लोक पाकिस्तानात जाऊन भारतावर भुंकण्यास कमी करणार नाहीत, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. तोंडात शिवाजी महाराजांचे पवित्र नाव घेऊन पापी अफजलखान, औरंगाजेब यांच्या उद्दात्तीकरणाची घेतलेली सुपारी हा या मोहिमेचाच एक भाग आहे, हे आम्हा बहुजनांना आता कळून चुकले आहे.

    ReplyDelete
  11. SANJAY SAHEB

    TUMHI WARANWAR LIHILYAPRAMANE BAMSEF/BRIGADE YA SANGHATANA

    VISHISHTA RAJKIY PUSHANCHYA SOYISATHI NIRMAN ZALYA AHET.

    TYANA KOTHALAHI TATWIK ADHAR NAHI.JAR YA DESHAT THARAVIK

    LOKASANKHE PESHA MUSLIMANCHI SANKHYA WADHALI(GHUSAKHORIMULE)

    TAR DESHACHACHYA ISLAMI-KARANACHI PRAKRIYA CHALU HOIL .

    HINDUNA/BRAHMANANA SHIWYA DETANA HE LUSHAT GHETALE PAHIJE

    KI HINDUBAHUL DESHAT APAN WATEL TYA BHASHET WATEL TYAWAR

    TIKA KARU SHAKTO PUN ISLAM BAHUL DESHAT NA RPI/RSS/BRIGADE

    /BAMSEF/NIDHARMI ITYADI KONI SHILLAK RAHANAR NAHIT.SURAWATICHA

    KAHI KAL CONGRESS(SHAKTI KAMI ZALELYA RUPAT) RAHIL PUN NANTAR

    EK ANAGONDI MAJEL.

    AJ HI GOSHTA KHUP LAMB WATAT AHE PUN MAHAWIR SANGLIKAR YANJSARKHI

    WICHARI LOK SUDHA ASA LIHU LAGLI TAR TO DIWAS FAR LAMB ASANAR NAHI.

    ARTHAT EK FAYDA HOIL KI HINDU/BUDHA/JAIN HE DHARMA EKA ISLAM MUDHE

    WILLIN HOUN(JABARDASTINE) NANTAR TARI APAN SURWA BARTIYA EK HOU.

    ReplyDelete
  12. त्रिशंकूAugust 20, 2012 at 8:17 AM

    सत्य हे आहे की या देशाला काही ठराविक उद्योगपती आणि धनदांड्ग्यांच्या घशात घालण्याची योजना आखली जात आहे. त्यांना त्यांचे हेतू निर्वेधपणे तडीला नेता यावेत म्हणून अधून मधून असे प्रश्न निर्माण करणे भागच असते. राजकारणीही त्यांचेच, नोकरशाहीही त्यांचीच आणि माध्यमेही त्यांचीच. सर्वसामान्य माणसाला कुठेही प्रतिनिधित्व शिल्लक राहिलेले नाही.
    सामान्य जनतेच्या असंतोषामध्ये सत्ता उलथवून टाकण्याची शक्ती असते हे त्यांना चांगलेच माहित आहे. म्हणूनच हा असंतोष अत्यंत हुशारीने वेळोवेळी कधी मुस्लिम तर कधी ब्राह्मण तर कधी दलित आदिवासी यांच्या विरोधात रीडायरेक्ट केला जातो. देशातील सर्व समस्यांसाठी एकाच जातीला किंवा धर्माला जबाबदार धरले जाते. हुकुमशाही आणि भांडवलशाही यांच्या मैत्रीच्या सुरस आणि चमत्कारिक कथा जागतिक इतिहासात अनेक वेळा घडलेल्या आहेत. ह्या देशात सध्या केवळ त्याच कथेचे पुनरुज्जीवन होत आहे. पण ही कथा सफळ संपूर्ण होणार नाही. हजारो वर्षांपूर्वी ज्यांची ह्या देशावर सत्ता होती त्यांचे वंशज आज दरिद्री अवस्थेत फिरत आहेत. एक काळ असाही येईल जेव्हा आजच्या भांडवलदारांचे वंशज भीक मागत फिरतील. कोणताही संघर्ष हा अस्तित्वाचाच संघर्ष असतो. पण आपले अस्तित्व कशाशी जोडलेले आहे हे सर्वसामान्य जनतेला कळू न देण्यातच भांडवलदार वर्गाचे हित सामावलेले आहे.

    ReplyDelete
  13. bee gredi- baamsefi lok kuthe aahet.. paaki dharmandh muslim loka baddal boltana kuthe jaato tyacha jatyandh abhimaan? shivai/ sambhaji ne praan devun dharm / desh rakshan kele..he nalayak lok tyanche naav badnam karat aahet

    ReplyDelete
  14. ek bahujan lady police constable cha (kamble) vinay bhang jhala tari he dhongi jatiy vadi gapp aahet... he lok aaplya aai- bahini vinay bhang sahan kartil pan aaple jaatiy dhorna sodnar naahit.. thit yanchya var..

    ReplyDelete
  15. The Ruling class wants only one thing: To make CLASS and CASTE inseparable in this nation. Thats how they march towards HinduRashtra!

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...