Wednesday, August 22, 2012

महात्मा ते महात्मा


या देशात महात्मा पदवी मिळालेल्या दोनच महान व्यक्ती आहेत...पहिले म्हणजे महात्मा फुले आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी. पहिल्याने मानवी स्वातंत्र्याचा एल्गार केला तर दुस-याने मानवी स्वातंत्र्याला अस्तित्वात आणले...

महात्मा फुले शोषितांचे, वंचितांचे अस्पृष्यांचे, नाडल्या जाणा-यांचे पहिले कैवारी बनले. बहुजनीय सामाजिक चलवळीच्या पाया जातीभेदातीत होवून त्यांनी घातला. शेतक-यांचा आसुड लिहुन त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या शिका-यांना उजेदात आनले. गुलामगिरी लिहुन त्यांनी वैश्विक केवळ भारतीयच नव्हे तर वैश्विक गुलामगिरीकडे जगाचे लक्ष वेधले. त्यासाठी नवीन सर्वैक्याचे तत्वज्ञानही निर्माण केले.

महात्मा गांधींनी त्याच मुलभुत तत्वज्ञानाला अधिक व्यापकता देत सर्व राष्ट्राला राजकीय, मानसीक आणि वैचारिक गुलामीतुन बाहेर काढत एक नवीन राष्ट्रीय आत्मा सर्वांत भरला. अध्यात्माला नवा अर्थ दिला. मानवी जीवनाचा नवा संदर्भ शोधला. महावीर, बुद्ध आणि कृष्णाच्या तत्वज्ञानाला एक नवे रंगरुप देत एक नवा राष्ट्रधर्म घडवला. भारतीय घटनेने तो धर्मनिरपेक्ष आत्मा जपला.

सत्य, अहिंसा, अतुलनीय धैर्य, जीवनाकडे अतिव्यापक दृष्टीने पाहण्याची सर्वसमावेशक भुमिका...

म्हणुन देशवासियांनी केवळ या दोघांनाच महात्मा म्हणुन गौरवले आहे...

महात्मा ते महात्मा ही वाटचाल या देशाने केली म्हणुन आज जोही काही भारत आहे तो शिल्लक आहे...

18 comments:

  1. बरोबर आहे, महात्मा फुले आणि महात्मा गांधी हेच खरे महात्मा आहेत. कांही लोक गौतम बुद्ध यांना देखील महात्मा बुद्ध या नावाने ओळखतात, पण गौतम बुद्ध यांना महात्मा म्हणणे म्हणजे त्यांचा अपमान ठरेल, कारण गौतम बुद्ध यांनी आत्मा नाकारला आहे.

    ReplyDelete
  2. navin eka wadala tond futle. Mahatma Jyotiba Fule vs Mahatma Gautam Buddha. wah wah wah. maja yete hey sagl wachun.

    ReplyDelete
  3. महात्मा फुले यांचा संक्षिप्त जीवनपट

    इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

    इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

    इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

    इ.स. १८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

    इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

    इ.स. १८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

    इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

    सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

    इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

    मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

    नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

    इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.

    इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

    इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

    इ.स. १८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

    इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

    इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

    इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

    इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

    इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

    इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

    इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

    इ.स. १८७५ - शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

    इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

    इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

    इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

    इ.स. १८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

    इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

    इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली इ.स. १८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

    इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.

    २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रत रुजवण्यासाठी सत्यशोधक दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली.राजषी शाहू महाराजांनी समाजप्रबोधनासाठी मदत केली.ब्राम्हणेत्तर चळवळीने अवघा महाराष्ट्र जेधे जवळकर जोडीने ढवळून काढला. देशाचे दुश्मन हे त्यांचे पुस्तक प्रंचड गाजले.

    ReplyDelete
  4. Maga aata waril teen Mahantmyanpaiki kuthla Mahatma shreshtha yawar ekhada lekh lihi Sonawnya.

    ReplyDelete
  5. महात्मा बसवेश्वर वाचला का ?

    ReplyDelete
    Replies
    1. बसवेश्वर या देशात झालेले वर्णव्यवस्था नष्ट करत समता आणनारे नुसते महामानव नव्हे तर माझ्या मते शैव तत्वज्ञानाचे नवे उद्गाते होते. मित्रा येथे आपण फक्त आधुनिक काळ विचारात घेत आहोत...विसरु नका.

      Delete
    2. धन्यवाद! आमचे समाधान झाले.

      Delete
  6. अहो पण तुम्ही तुमच्या कोणत्याच लेखात आमच्या जातीच्या महापुरुषाचे नाव अजिबात घेत नाही. तुम्ही आमच्या जातीचा इगो दुखावला आहे. इथून पुढे असे करू नका. जेवढे पण खरे-खोटे महापुरुष झाले त्यांची नावे घेत चला, म्हणजे सगळेच खूष होतील. पण आगरकर वगैरे बामणाचे नाव अजिबात घेवू नका, नाहीतर तुमच्यावर आधीच राग असणा-या बहुजनांना आणखी राग येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. खरे-खोटे महापुरुष ?

      Delete
    2. जवाब्दारीने बोल ! मुर्खासारखी विधाने करून आपले नालायकत्व सिद्ध करू नको ! समजलास

      Delete
  7. बसवेश्वरांचे अनुयायी ब्राम्हनांपेक्षा कट्टर जातीवादी झाले आहेत. अस्पृश्यता पाळतात. बहुतेकांच्या घरात बसवेश्वर सोडून सगळ्या देवांचे फोटो असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. कांही अंशी हो बाळ, परुंतु तो त्यांचा मूळ धर्म नाही( तुमच्या सारखा ). ते तुमचा संगतीमुळे ( सर्व जातीतील प्रतिगामी लोकांच्या) बिघडले असतील. परुंतु तुमच्यात आणि त्यांच्यात पुढील मुलभूत फरक आहेत हे समजून घे.
      १. ते सामुहिक जातिवाद किंवा अस्पृशता पळत नाहीत.
      २. जातीच्या नावावर कोणावर गुलामगिरी लादत नाहीत.
      ३. केवळ आपल्याच जातीतील किवा जातीला पोषक महापुरुषच श्रेष्ठ(फोटोत मोठा आकार आणि भाषणात वारंवार नाव घेवून किंवा वेगवेगळी संबोधणे देवून) ठरवत नाहीत.
      ३. राजकारणात जातीला महत्व देत नाहीत.
      ४. जातीचे दबावगट तयार करून कोणावर अन्याय कारत नाहीत.
      ५. जातीचे दबावगट तयार करून कोणाच्या हक्काच्या नोकरया/पदे लुबाडत नाहीत.
      ६. कोणाच्या माई बहेणीवर अत्याचार करीत नाहीत.
      आजून खूप सांगता येते. या लोकांच्या बद्दल!

      Delete
    2. आज अस्पृशता नष्ठ होत असली तरी सर्वच समाजात( जातीत) जातीयवाद भन्नाट वाढत आहे. आणि हा सुद्धा तितकाच घातक आहे.

      Delete
    3. शेवटी चोरी करणे आणि खून, बलात्कार करणे यात फरक असतो समजलात पाटील कि काय ...

      Delete
  8. kaal Kesari wadyat Tilkancha aawaj ghumla.

    Tuzi aani tya Narkyachi gand jalun khak zaali asel naahi ka Sonawnya?

    Hari Narkyachi tar Tilkanchya wiruddha conspirecy theorices sangnari bhashan youtube war available aahet. Narkya mhanto me Brahmani stage war kadhi chadhnar naahi. ha jatiyawaad nahi ka re zala Sonawnya?

    ReplyDelete
  9. Sanjay Saheb, ha lekh lihanymagacha prayojan kay ahe? What is timing of this article?

    ReplyDelete
    Replies
    1. "पहिले म्हणजे महात्मा फुले आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी."
      हा हा हा... याचा अर्थ माळी समाजाचे नेतृत्व काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे असा काढता येऊ शकतो. निवडणुका जवळ आल्या की असे होणारच!

      Delete
  10. जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
    please name
    ज्योतिबा फुले यांना मारण्यासाठी गेलेल्या दोघा मारेकऱ्यांची नावे काय होती?

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...