Sunday, August 5, 2012

निवेदन व निषेध


मा. संपादक,
दै. पुढारी,
सांगली आवृत्ती,
सांगली.

निवेदन व निषेध

आज दि. ६ आगस्टच्या दै. पुढारी (सांगली आवृती) पष्ठ क्र. ३ वर "अहिल्यामाईंच्या बदनामीचा जातीयवाद्यांचाच कट" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले असून फ़ेसबुकवर मानव भोसले असे बनावट नांव वापरुन संजय सोनवणीनेच धनगर समाजाची बदनामी केली आहे असा संभाजी ब्रिगेडने (सांगली) केलेला संतापजनक, अत्यंत खालच्या पातळीचा आरोप प्रसिद्ध केला आहे. असे आरोप प्रसिद्ध करत असतांना किमान पुराव्यांची आवश्यकता असते हे पुढारीसारख्या जबाबदार वृत्तपत्राने विसरावे व बदनामीकारक मजकुर सरळ प्रसिद्ध करुन मोकळे व्हावे हे या वृत्तपत्राला शोभादायक नाही. याबद्दल मी आपला व संभाजी ब्रिगेड (सांगली) पदाधिका-यांचा निषेध करत आहे.

मी फ़ेसबुकवर कोणत्याही नांवाने वावरत नाही. माझा स्वत:चा माझ्याच नांवाने पुर्वी अकाउंट होता तो बंद करुन आता दीड वर्ष झालेली आहेत. त्यानंतर मी कधीही कोणत्याही नांवाने फ़ेसबुकवर गेलेलो नाही. बोगस अकाउंट शोधण्याचे तंत्र सायबर विभागाला माहित आहे. मानव भोसले या फेसबुकवरील अकाउंटविरुद्ध महाराष्ट्रात ठिकठिकाणी (उदा. बारामती, पुणे) तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मी माझ्या ब्लोगवरही २८ जुलै रोजीच मानव भोसलेचा " महाराणी अहल्याबाई व धनगरांची बदनामी..." या शिर्षकाखाली तीव्र निषेध नोंदवला आहे. ( संदर्भासाठी पहा     http://sanjaysonawani.blogspot.in/2012/07/blog-post_28.html ) वाघ्या प्रकरणी मी वाघ्याची बाजु सातत्याने घेतल्याने व वाघ्याचा संभाजी ब्रिगेड्ने हटवलेला पुतळा दुस-याच दिवशी शासनाने जाग्यावर बसवल्याने निराश झालेल्या संभाजी ब्रिगेडने केवळ द्वेषापोटी मानव भोसले म्हनजे मीच असे धादांत असत्य ठोकुन द्यावे आणि आपल्यासारख्या जबाबदार वृत्तपत्राने कसलीही शहानिशा न करता ते प्रसिद्ध करावे याची करावी तेवढी निंदा कमीच आहे.

सायबर सेलने IT Amendment Act 2008 नुसार या मानव भोसले या कथित अकाउंटचा शोध घ्यावा, म्हणजे यामागे नेमके कोण आहे हे सामोरे येईल. असे न करता द्वेषमुलक बुद्धीने माझे नांव घेत बदनामी करावी हे इंडियन पिनल कोड ४९९ नुसार फौजदारी कायद्यानुसार बदनामीकारक आरोप करणारे व तो प्रसिद्ध करणारे यांच्याविरुद्ध दंडनीय अपराध कृत्य आहे हे आपणास विदित असेलच. शिवाय मानहानीसाठी नुकसानभरपाईचा सिव्हिल खटलाही दाखल करता येवू शकतो हेही आपणास माहित असेलच आणि हा दंडनीय गुन्हा संबब्रिगेडचे सांगली येथील आपण वृत्तात नमुद केलेले सर्व पदाधिकारी व आपणाकडुन घडला आहे.

वरील निवेदन दोन दिवसांत ठळकपणे प्रसिद्ध करावे अन्यथा मला वरील दंडसंहितेतील कलमाअंतर्गत सर्व संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावे लागतील याची कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद,
आपला,
संजय सोनवणी


(दै. पुढारीतील वृत्त वाचण्यासाठी http://epaper.pudhari.com/epapermain.aspx#   Page 3)





16 comments:

  1. "आज दि. ६ आगस्टच्या दै. पुढारी (सांगली आवृती) पष्ठ क्र. ३ वर "अहिल्यामाईंच्या बदनामीचा जातीयवाद्यांचाच कट" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले असून फ़ेसबुकवर मानव भोसले असे बनावट नांव वापरुन संजय सोनवणीनेच धनगर समाजाची बदनामी केली आहे असा संभाजी ब्रिगेडने (सांगली) केलेला संतापजनक, अत्यंत खालच्या पातळीचा आरोप प्रसिद्ध केला आहे. असे आरोप प्रसिद्ध करत असतांना किमान पुराव्यांची आवश्यकता असते हे पुढारीसारख्या जबाबदार वृत्तपत्राने विसरावे व बदनामीकारक मजकुर सरळ प्रसिद्ध करुन मोकळे व्हावे हे या वृत्तपत्राला शोभादायक नाही. याबद्दल मी आपला व संभाजी ब्रिगेड (सांगली) पदाधिका-यांचा निषेध करत आहे."

    चार दोन धनगर समाज बांधव तुझ्या पाठीशी काय राहिले तू तर सगळा भारत आपला झाल्याच्या अविर्भावात वावरत होतास. मानव भोसले हे अकाऊंट कुणाचे आहे याच्या साठी पुराव्याची आवशकता लागते हे जर तुला कळले आहे तर मग गाढवा हाच आरोप तुम्ही लोकांनी त्या संभाजी ब्रिगेडच्या कुण्या भैया पटलावर ठेवला तेव्हा तुमच्याकडे कोणता पुरावा होता रे हरामखोरा? बर हा आरोप तू केवळ भैया पाटलावर ठेऊन मोकळा झाला नाहीस तर त्याच्या "संभाजी ब्रिगेड सारख्या एका जबाबदार आणि प्रतिष्ठीत संघटनेच्या नावावर ह्या आरोपाची काळीमा फसली." तेव्हा तुला लाज नाही वाटली. संजय सोनवणी मी पूर्वी पासून सांगतोय की तू उन्मादाचा बळी झाला आहेस. केवळ वाघ्याचे शिल्प पुन्हा बसविले म्हणून संभाजी ब्रिगेड ला संपवण्याच्या वल्गना तुम्ही लोकांनी केल्या. आता तुम्हीच लावलेल्या बीजाची कडू जहर फळे खाण्याची वेळ आली की निषेधाचे पत्रक? माझ्या मुद्द्याचे खंडण करू न शकणाऱ्या बाजार बुनग्या तुझ्या सारखे दीड दमडीचे विचारवंत "शिवरायांना आणि मराठ्यांना " संपवू शकत नाहीत.

    तुला जर तुझ्या अक्कल हुशारीचा एवढंच मज असेल तर भडव्या दे ना माझ्या प्रश्नाची उत्तरे? की वाघ्या सारखे *** शेपूट घालून बसलास "ओल्ड मोन्क च आवडता ब्रान्ड" पीत?

    ReplyDelete
    Replies
    1. खोट्या आयडी ने मुक्ताफळे उधळणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या लूत भरलेल्या कुत्र्या
      कोणावर तू आरोप करतो आहेस? याचा प्रतिसाद देताना तरी विचार करायचा.आणि ते ही धादांत खोटे?
      पुराव्याशिवाय बोलायची संभाजी ब्रिगेडचीच परंपरा तू चालवतो आहेस, तेव्हा संभाजी ब्रिगेडचाच तू निष्ठावंत आहेस हे उघड आहे. संभाजी ब्रिगेड जबाबदार ???आणि प्रतिष्ठीत ??? आत्तापर्यंतचा मी ऐकलेला मोठा विनोद आहे हा. कुत्रं सुद्धा विचारत नाही त्या ब्रिगेडला. नाहीतर आतापर्यंत बामणांचे शिरकाण झाले असते महाराष्ट्रात.

      तोडफोडीची कृती व गुर्मीची भाषा न करता पुराव्यासकट बोलायला शिका मग अवघा महाराष्ट्रच काय पण सोनवणी साहेब पण ब्रिगेडला सहकार्य करतील. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, सोनवणी साहेब हे समस्त धनगर समाजात अतिशय मान्यताप्राप्त व लोकप्रिय आहेत. त्याचे सर्टिफिकेट तुझ्यासारख्या सारखं सारखं तंगडं वर करणार्‍या कुत्र्याला द्यायची गरज नाही. तू पेताडासारखे हवे ते बरळत बसलास तरी सोनवणी साहेबांचा ब्लॉग वाचणार्‍या विचारवंतांना तेवढं नक्कीच कळतं की खरं कोण आणि खोटं कोण ते. तेव्हा (बिनबुडाचे बोलणार असशील तर) मुकाट्याने तोंड आवर नाहीतर तुझी आयडेंटीटी जाहीर करायला आम्हाला काही अवघड नाहिये समजून ऐस.

      Delete
    2. विधानिक इशारा: सोनवणी सारख्या पोटभरू विचारवंतांची त्या संभाजी ब्रीगेडवाल्यांना गरज नाही.असले सडके विचारवंतच पद मागण्यासाठी बिगेडकडे खेट्या मारत असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आलेआहे.पद न मिळाल्यामुळे नैराश्य पोटी सोनवणी साहेब वाघ्याचा जप करायला लागले आणि बाकीच्या सामाज बांधवांना बिगेड विरोधात वापरून घेऊ लागले. यात नुकसान त्यांच्या मागे लागनार्यांचेच आहे.अन्यथा नरके साहेबांनी माळी समाजालही रस्त्यावर उतरवले असते. पण नरके जाम हुशार आहेत.

      Delete
  2. ब्रीगेडीचे दिवस भरलेत अस मला वाटत. कारण कुरापती म्हणजे पाण्यातून बाहेर काढलेल्या मास्याची फडफड म्हणावी लागेल. यांची ही फडफड आणिखी काही दिवस चालेल आणि आपोआप शांत होतील. त्यामुळे तुह्मी दुर्लक्ष करा.

    ReplyDelete
  3. संजय सोनवणी,
    संभाजी ब्रिगेडचे सदर पत्रक आणि त्याची कोणतीही शहानिशा न करता ते छापणारे दैनिक पुढारी यांनी वृतपत्रीय संकेतांचा भंग केलेला आहे. हे कृत्य निषेधार्ह आहे.दै.पुढारीला सत्यशोधक ग.गो.जाधवांचा वारसा लाभलेला आहे.आपले सत्य निवेदन पुढारी छापील अशी आशा आहे. वाघ्या प्रकरणाच्या अपयशातुन आलेल्या नैराश्यापोटी ब्रिगेडने हा खोडसाळपणा केलेला आहे."सत्यमेव जयते" वर आपला विश्वास आहे.मानव भोसले कोण ते पोलिसांनी त्वरित शोधुन काढणे गरजेचे आहे.ब्रिगेडने हा बेजबाबदार आणि रडीचा डाव खेळुन चुकीचे पावुल टाकले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. याला म्हणतात उंदराला मांजर साक्ष. संभाजी ब्रिगेडचे पत्रक आणि त्याची कोणतीही शहानिशा न करता छापणारे ते दैनिक पुढारी यांनी वृत्तपत्रीय संकेताचा भंग केला हे वादासाठी मान्य करू. मग हरी नरके महाशय,मानव भोसले कोण आहे हेच मुळात माहित नसताना तूम्ही आणि तुमच्या चेल्यांनी त्या ब्रिगेड वाल्यांची नावे घातली पेपरात ती कोणत्या पुराव्याच्या आंधारे? मग तुम्हा लोकांना कसलाच संकेत नाही का? तुमचा हाच डाव ब्रिगेड ने सही सही खेळला की ते रडीचा डाव खेळणारे आणि तुम्ही मारे जहामर्द? व्वा समता कोणत्या मार्गाने नेताय नरके. जो न्याय ब्रिगेडला तोच न्याय तुम्हाला. तुमच्या या बगल बच्चाला माझ्या एकाही मुद्द्याचे खंडण करता आले नाही. जेव्हा पासून सोनावाणीने हा ब्लॉग बनवला तेव्हापासून त्याची एवढी कुणीच फाडली नसेल.

      ब्रिगेडने ना रडीचा डाव खेळलाय ना ब्रिगेडने बेजबाबदार पण केलाय.त्यांनी तर तुमच्या पावलावर पाउल टाकलाय इतकच. आणि खऱ्या नैराश्याचे बळी तुम्ही आहात. कारण "फुले-शाहू-आंबेडकरांचे " विचार वापरून जेव्हा ब्रिगेड पराभूत झाली नाही तेव्हा तुम्ही लोकांनी दंतकथेतील वाघ्याचे भांडवल करून ब्रिगेडला नामोहरम करायचा प्रयत्न केलाय. तरीही ब्रिगेडच्या एकाही पदाधिकाऱ्याने तुम्हा लोकांविषयी एकही चुकीचे किंवा तुमचा अनादर करणारे विधान केले नाही. ही त्यांच्या लढय्ये पनाची साक्षच आहे. रडे तुम्ही कारण ब्रिगेड वाल्यांमुळे तुम्हाला कोणी कुत्रही विचारत नव्हत, मग तुम्हीच वाघ्याला विच्रायला लागलात.

      Delete
  4. तेरे दर पर सनम चले आये. तू ना आया तो हम चले आये.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by a blog administrator.

      Delete
    2. माझ्या नाव नसलेल्या प्राणप्रिय मित्रा, एवढा नैराश्यात जाऊ नकोस. कारण मुद्दे संपले की नैराश्यापोटी माणूस गुद्द्यावर येतो. तुझ्या आणि तुझ्या त्या चांडाळ चौकडी कडील सगळे मुद्दे संपलेत.म्हणून तू असा निराशे पोटी सैरभैर होत आहेस. संभाजी ब्रिगेडने दगडी कुत्र्यचा पुतळा फोडला म्हणून ते अतिरेकी असतील तर "सोनवणी-नरके-रामटेकेने " फेकलेल्या तुकड्यावर जगणारा तुझ्या सारखा एखादा वाघ्या(वाघ नाही कुत्रा बर का) जाहीर पने माझ्या सारख्या जिवंत व्यक्तीला "जागच्या जागी खांडोळी करू" अशी धमकी देत असेल तर खरे तालिबानी,खरे अतिरेकी, आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची हत्या करणारे कोण? हे त्या समतावादी नरकेला विचारशील काय?

      मी जगासमोर येऊन, तुझ्या बापाच्या ब्लॉगवर येऊन माझे मुद्दे जाहीर पने मांडत आहे. पण तुझा बापच मला घाबरून सात पाताळात दडून बसलाय. मी वैचारिक प्रतिक्रिया देणारा एक साधा-सरळ माणूस आहे.त्यामुळे मला तुझ्या सारखी खांडोळी करण्याची भाषा बोलता येत नाही. त्यात डॉ.बाबासाहेबांच्या राज्यघटनेबद्दल मला नितांत आदर आहे.पण याचा अर्थ माझे हात तलवार चालवायला विसरलेत असे मात्र समजू नकोस.तुला आमच्या या वैचारिक चर्चेतले काही ढेकाळही समाजात नाही. म्हणून तुझ्या सारख्या लहान मुलांनी यात न पडलेले बरे.

      Delete
    3. अनिता पाटील उर्फ भय्या पाटील उर्फ दिगंबर काले उर्फ मानव भोसले उर्फ शिवालिक वर्मा .... रुप एक पर भेस अनेक.

      Delete
    4. ajun ek rahila.. ravindra tahakik .. :-).. bhasha shaili varun kalatay ki ekach vyakti ahe..

      Delete
  6. साध कुत्त्र पण ज्यांना विचारात नव्हत , अशे नरके ,सोनवणी वाघ्या कुत्र्याची अस्मिता करून प्रसिद्ध झाले .... धन्यवाद संभाजी ब्रिगेड ....!

    ReplyDelete
  7. त्या भैया पाटलाला मनोरुग्णालयात पाठवायला पाहिजे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...