Tuesday, September 11, 2012

धनगरांच्या पुनरुत्थानासाठी...



धनगर ही तशी जात नसून जमात आहे हे त्यांच्या पुरातन इतिहासापासुन दिसुन येते. म्हणजे जेंव्हा वर्णव्यवस्था वा जातीसंस्थासुद्धा अस्तित्वात आली नव्हती तेंव्हापासुन धनगर समाजाचे अस्तित्व महाराष्ट्रात राहिले आहे. या समाजाची स्वतंत्र अशी संस्कृती आहे. खंडोबा, बिरोबा या त्यांच्या मुख्य देवता. पानकळा संपला कि मेंढरांचे कळप घेवून बाहेर पडायचे आणि पानकळ्याच्या आरंभी परत यायचे. थोडक्यात हा समाज अजुनही मोठ्या प्रमाणावर निमभटका राहिलेला आहे. यामुळे या समाजात शिक्षणाचे प्रमाण खुपच कमी आहे. अर्थतच त्यामुळे आर्थिक दारिद्र्यही मोठ्या प्रमानावर आहे. एके काळी संपन्न असलेला, "धनाचे आगर" म्हणुन धनगर म्हटला जाणारा हाच तो समाज यावर सहजी विश्वास बसणे अशक्य वाटावे एवढी आर्थिक अवनती या समाजाची आज महाराष्ट्रात झाली आहे.

मेंढपाळी व्यवसायावर कोसळलेली संकटे

मेंढपाळांना हवी असतात चरावू कुरणे. परंतु जसे भारतात औद्योगिकी करण होवू लागले व औद्योगिक वसाहतींसाठी शासनाने ज्या जागा ताब्यात घेतल्या त्या जागा म्हणजे चराऊ कुरणेच होती. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर धरणे बांधली गेली. त्यात जशा शेतजमीनी बुडल्या तशीच हजारो हेक्टर चरावु कुरणेही. सेझमुळे या आपत्तीत भरच पडली. शेतक-यांना वा विस्थापितांना सरकारने उशीरा का होईना भरपाया तरी दिल्या व पर्यायी जागाही दिल्या. पुनर्वसनेही झाली. विस्थापितांच्या प्रश्नांसाठी आंदोलनेही झाली व आजही होतच आहेत. पण मेंढपाळांना सरकारने कसलीही आर्थिक मदत तर केली नाहीच पण पर्यायी व्यवस्थाही केली नाही. ते तर सोडाच, वनखात्याच्या जाचक नियमांनी पुर्वांपार ज्या क्षेत्रांत मेंढरांना चरायची सोय होती तीही आक्रसली. धनगर समाज हा मुळात मूक समाज. त्यांनीही आपल्या प्रश्नांना कधी वाचा फोडली नाही. तो कधी रस्त्यावर आला नाही. कधी आवाज उठवला नाही. त्यांच्या बाजुने कोणी अन्य पक्षनेत्यांनीही विधानसभेत वा संसदेत साधा आवाज उठवला नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण देशातील मेंढपाळी उद्योगाच्या गळ्याला आपण नख लावतो आहेत याचे भान कोणालाही राहिले नाही.

शेतक-यांच्या प्रश्नांवर आजवर असंख्य आंदोलने झालीत. महाराष्ट्रात शरद जोशींची शेतकरी संघटना असो कि उत्तरेतील महेंद्र टिकैतांची...त्यांनी शेतकरी प्रश्नांवर वारंवार रान उठवले आहे. अनेक पुस्तके, अगणित लेख लिहिले गेले आहेत...पण मेंढपाळांच्या एकुण अवस्थेबाबत, त्यांच्या व्यावसायिक समस्यांबाबत अभ्यासक/विचारवंतही कधी अभ्यास करते वा लिहिते झाले नाहीत. एकुणात मेंढपाळांच्या प्रश्नावर कोणीही तोंड उघडलेले दिसत नाही...आंदोलने तर खुप दुरची गोष्ट झाली.

आज महाराष्ट्रात धनगर समाज हा वाड्या-वस्त्यांवर विखरुन राहिला आहे. या समाजाची एकुण लोकसंख्या दीड कोटीच्या घरात आहे. म्हणजे एकुण लोकसंख्येच्या एकुण जवळपास सोळा-सतरा टक्के एवढा हा समाज असुनही एवढा दुर्लक्षित रहावा ही पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने खरे तर लांच्छनास्पद बाब आहे. पण लक्षात कोण घेतो? खुद्ध धनगर समाजाचे सध्या फक्त सहा आमदार आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासुन आजतागायत फक्त तीन जणांना मंत्रीपदे मिळाली आहेत. आजतागायत या समाजातुन एकही खासदार झालेला नाही. याचे कारण म्हणजे कोणत्याही पक्षाने उमेदवारी देतांना धनगर समाजाच्या प्रतिनिधित्वाचा विचारच केलेला दिसत नाही.

यामुळेच कि काय श्री. महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करुन धनगर व बहुजन समाजाला एकत्र करत राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु केले. परंतु अद्याप या पक्षाला खुप मोठी मजल मारायची आहे. तोवर काय होणार हा प्रश्न आहेच. पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व नसल्याने धनगर समाजावरील अन्याय कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही.

मेंढपाळी व्यवसायाचे महत्व

मेंढ्यांपासुन मांस, कातडी, दुध व लोकर मिळते. आज हा जगभर अत्यंत महत्वाचा उद्योग मानला जातो. चीन, आस्ट्रेलिया व अमेरिकेत या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर अनुदानेही दिली जातात. चरावू कुरणांना पुर्ण संरक्षण आहे. चीन देश या उद्योगात प्रथम क्रमांकावर असुन या देशात चवदा कोटी मेंढ्या आहेत. भारत हा दुस-या क्रमांकावर असून भारतातील मेंढ्यांची संख्या आजमितीला आठ कोटींच्या आसपास आहे. अमेरिका आज आपली बोकड/मेंढी मांसाची ५०% गरज आयातीतुन पुर्ण करतो.

महाराष्ट्रात आजमितीला चाळीस लाखांपेक्षा अधिक मेंढरे आहेत. अत्यल्प अपवाद वगळले तर या मेंढरांचे सर्वस्वी मालक धनगरच आहेत. नाबार्डच्या अहवालानुसार महाराष्ट्रात अजुनही पन्नास लाख मेंढरांची गरज आहे...ती लोकर व मांसाची गरज पुरवण्यासाठी. पण मुळात चरावु रानेच नष्ट होत चालल्याने वाढ तर सोडा यात घटच होत जाणार आहे हे उघड दिसते. यामुळे भारत मांसाचा निर्यातदार नव्हे तर आयातदार होत जाईल हा धोका कोणी लक्षात घेत नाही हे दुर्दैवच आहे.

मेंढपाळांवर कोसळत असनारे दुसरे संकट म्हणजे शेतकरी आणि मेंढपाळामद्धे अकारण उठणारे संघर्ष. एखादे मेंढरु चुकुन शेतात घुसले कि धनगरांना अक्षरशा चोपुन काढले जाते. धनगरांना मिळनारे एक अत्यल्प उत्पन्न साधन म्हणजे रिकाम्या शेतात मेंढरे बसवून सेंद्रिय खत पुरवणे. पण आजकाल रासायनिक कीटनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, अनेकदा मेंढरांना वीषबाधा होते. अनेक मेंढरे दगावतात. वीमा नसल्याने भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही.  त्यात दुष्टाव्याने वीष घालुन मेंढरे मारली जाण्याच्याही घटना मोठ्या प्रमानावर होवू लागल्या आहेत. नुकतीच बुलढाना जिल्ह्यातील मोताळा तालुका येथील खडकी शिवारात लोणच्यात वीष घालुन शेकडो मेम्ढरांना वीषबाधा करण्यात आली...त्यात छप्पन्न मेंढरांचा जीव गेला. या दुष्टाव्याबाबत आजतागायत कसलाही गुन्हा नोंदवून घेतला गेलेला नाही. कुरणे कमी होत असल्याने व त्यात आता नवीन भुमीग्रहण कायदा केंद्र सरकार आणत असल्यामुळे असे प्रकार वाढत जाणार व अकारण तेढीही. एक नवा सामाजिक संघर्ष उभा राहण्याचा धोका या निमित्ताने होवू शकतो.  त्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलत चरावु कुरणांची पुरेशी उपलब्धता कशी होइल यावर वनखात्याशी चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे.

पण असे करत असतांनाच मेंढपाळ समाजालाही आधुनिकीकरणाची कास धरली पाहिजे. हजारो वर्ष चालत आलेली भटकी मेंढपाळी आधुनिक युगात उपयोगाची नाही. यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजे बंदिस्त मेंढीपालन.  आंध्र-कर्नाटकात असे अपुरे असले तरी अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रात मात्र धनगर समाज आधुनिकीकरणापासून दुरच राहिला आहे. किंबहुना त्यांचे नीट प्रबोधन झालेलेच नाही.  किंबहुना ते केले पाहिजे याचे भान धनगर समाज नेत्यांना राहिलेले नाही. प्रत्येक मेंढपाळ जर बंदिस्त मेंढीपालन करु लागला तर आज नवी आर्थिक क्रांती घडु शकते. म्हणजे आज जो एक मेंढपाळ दिड-दोनशे मेंढ्यांचे कळप पाळतो तोच पाचशे-हजार मेंढरांचे संवर्धन करु शकतो आणि मनुष्यबळ कमी लागत असल्याने मुलांना शिक्षणाकडे वळता येईल. आज लहान मुला-मुलींनाही पालकांबरोबर मदतीसाठी भटकावे लागते.  त्यामुळे त्यांचे शिक्षण होण्याची शक्यता शुण्य. बंदिस्त मेंढीपालनामुळे ही वेळ येणार नाही व समाजात सुशिक्षितांचे प्रमाण वाढायला मदत होइल. बंदिस्त मेंढीपालन खर्चिक नाही. त्यासाठी नज़बार्डच्या अनेक स्वस्त दरातील कर्जयोजना आहेत. अनुदानेही आहेत. दुर्दैवाने त्यांचा फायदा घेण्यात हा समाज पुर्ण मागे राहिलेला आहे. चारा-पाण्याचा बंदोबस्त गवळी बंधव करतात तसाच करता येवू शकतो हेही लक्षात घ्यायची गरज आहे. यामुळे धनगर समाज स्वत: भांडवलदार तर बनु शकतोच, पण विक्रय व्यवस्थाही दलालांमार्फत न करता स्वतंत्रपणे उभारु शकतो. थोडक्यात त्याचे उत्पन्न मोठ्या प्रमानावर वाढवू शकतो. यासाठी महादेव जानकर, रमेश शेंडगे, प्रकाश शेंडगे, अण्णा डांगेंसारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर या अर्थक्रांतीची सुरुवात तरी होवू शकते. कारण मांस-लोकरीची गरज वाढतच जाणार आहे व जोवर मनुष्यप्राणि भुतलावर आहे तोवर हा उद्योग सुरुच राहनार आहे...पण आज धनगरांनी पुढाकार घेतला नाही तर हा उद्योग अन्य भांडवलदारांच्या हाती जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

सामाजिक समस्या

धनगर समाज आज्मितीला बावीस पोटजातींत वाटला गेलेला आहे. या पोटजातींत अजुनही नीट स्मन्वयही नाही. आजची तरुण शिक्षित पिढी "धनगर सारा एक" असा नारा देत असली व त्या दिशेने प्रयत्न होत असले तरी ते पुरेशे नाहीत. प्रत्येक पोटजातीची स्वतंत्र संघटना आहे. वधुवर मेळाव्यांपलिकडे त्यांची मजल जात नाही. इतिहासाचे नीट आकलन नसल्याने कोणी धनगरांचे मुळ राजपुतांत शोधतो तर कोणी क्षत्रियत्वात. या भ्रमांतुन बाहेर येवून आपले पुरातन मुळ पाहण्याची अद्याप सुरुवात नाही. पोटजातींतही कोण उच्च-कोण खालचे असे विवाद आहेतच. ऐतिहासिक दृष्ट्या खरे तर हे उतरंडीचे धोरण अत्यंत आक्षेपार्ह आहे. कदाचित त्यामुळेच हा समाज आपले सामाजिक अस्तित्व हरपत चालला आहे असे दिसते. उदा. धनगर समाज हा निमभटका समाज आहे. धनगर समाजाला प्रदेशनिहाय भाषाभेदामुळे विविध नांवे आहेत. उदा. उत्तरेत धनगर समाज धनगड, पाल, गडरिया आदि नांवांनी ओळखला जातो तर दक्षीणे कुरुब, दनगार, इ. नांवांनी ओळखला जातो. व्यवसाय मात्र एकच. तरीही त्यांना त्या-त्या राज्य सरकारांनी वेगवेगळ्या गटअंत आरक्षण दिले आहे. मानव वंशशास्त्र द्रुष्टीने हा सर्वच समाज अनुसुचित जमातींत येतो हे सर्वमान्य असतांनाही महाराष्ट्र शासनाने धनगरांची भटक्या जमातीत केलेली आहे. हा समाज पुर्णवेळ भटका नाही हे सामाजिक सत्य डावलले आहे. धनगर समाज आपली मागणी मांडत असला तरी त्यासाठी नेमलेला आगरवाल आयोग अद्याप कोणत्याही निष्कर्षाला पोहोचलेला नाही. याबाबत आजतागायत महाराष्ट्र सरकारने धनगरांची घोर फसवणुकच केलेली आहे. पण पुरेसा रेटा नसल्याने काही होईल अशी आशा बाळगता येत नाही. रेनके आयोगाला जे सरकार गुंडाळुन ठेवते ते सरकार समजा अजुन चार-पाच वर्षांनी आगरवाल आयोगचा अहवाल आला तरी काहीएक कार्यवाही करेल या भ्रमात राहने गैर आहे. असो.

एक गौरवशाली इतिहास असलेला, महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार असलेल्या या समाजाची दैना सर्वच समाजांनी समजावून घ्यावी व या मुक समाजाला बोलते होण्यासाठी प्रेरणा द्यावी ही अपेक्षा.

(समाप्त)

संजय सोनवणी
९८६०९९१२०५

46 comments:

  1. इतिहास लिहायचा महारांचा, महात्मा म्हणायचे फुल्यांना आणि पुनरुत्थान मात्र करायचे धनगरांचे ! व्वा! पुरोगामित्व का काय म्हणतात ते बहुधा हेच असावे.

    ReplyDelete
    Replies
    1. Friend, you have not read my articles on the history of many communities, even Marathas and Kunbi's.

      Yes this is real Purogami work...I shall keep doing it forever.

      Delete
    2. asalya comments kade laksha deu naka sanjayji asale murkha shiromani jati uchhadanala kadhich madat karu shakat nahi te fakta jaticha unmad ghalayala tayar asatat.

      Delete
    3. MASTWAL MARATHYA TUZI JAAT MATRA KALALI! JAY BHIM..!!!

      Delete
    4. मस्तवाल कांबळ्या तुझी शेंडी मात्र दिसली.

      Delete
    5. MURKHA SARAATYA MAZI SHENDI DISLI MHANTOS..KITI DIVAS FASAVNAR RE TUMHI SWATHALA..TUZYA MANACHI ZALELI KONDI MATRA MI SAMAJU SHAKTO...UGI UGI LEKARA..RADU NAKO...JAY BHIM..!!!

      Delete
    6. खोटे नाव वापरून जय भीम म्हणून लोकांना कशाला फसवतोस? स्वत:ची शेंडी उघडपणे मिरवायला लाज का वाटते? कुत्र्याची शेपटी तशी तुमची शेंडी. पाय दिला की लगेच बोंबलत सुटणार.

      Delete
    7. ARE SARAATYA..MAZYA RADKYA LEKARAA...TUMCHYA BRAHMAN VIRODHASATHI AATA BAUDDHA JAVAL YET NAHI, MAZYASARKHA EK DOLAS BUDDHIST EKA SARAATYACHI MAARTOY HE KONTYAHI SARAATYALA SAHAN HONAR NAHI HE MI SAMAJU SHAKTO BETA..SHEDI NAHICH TAR LAPAVNAR KAAY..? SHENDI SHENDI MHANAT TUZI KONDICH VYAKTA KARTOY TU SARAATYA..! GAAVO GAAVI AAMCHYAVAR TU AANI TUZI JAAT JE ATYACHAR KARTEY TE VISARUN AAMI TUMCHYASOBAT BRAHMAN DVESH KARU HA TUMHA LAANDGYANCHA GOD GAIRSAMAJ AAHE...WE TRUE BUDDHIST ARE CHANGING...TIME NOW TO CHANG..WE WILL CHANG...ONLY JAY BHIM..!!!

      Delete
  2. शास्त्रीय उपाय गरजेचे नाहीत काय ?
    मी मागेच अरुण देशपांडे व काका चव्हाण यांच्यासारख्याच्या दिग्गज शास्त्राज्ञान्बाद्दल्च्या लेखांमध्ये वाचले कि जनावरांना कुरणात घेवून चरायला नेण्याची पद्धत योग्य नाही त्यामुळे जनावरे शक्यतो कोवळे गावात खातात व चार्याची वाढ थांबते .

    त्याऐवजी चार्याची शेती करून जनावरांना chara पुरवल्यास बरेच कमी कुरण क्षेत्रही पुरेल काका चाव्हान्नांनी अतिशय यशस्वी प्रयोगही केलेला आहे .
    माझ्या मते सध्याच्या Resource crunch मध्ये शास्त्रीय उपाय शोधल्यास ते अशक्य नाही .

    ReplyDelete
    Replies
    1. अनिल अवचट यांच्या कार्यरत या पुस्तकात दोघांबद्दल फारच छान माहिती आहे . काका चव्हाण यांच्या प्रयोगाचे फारच छान वर्णन केलेले आहे . तसेच अरुण देशपांडे यांनी अन्कोलीमध्ये मेंढ्यांना अगदी वेगळ्या प्रकारे चारा देण्याचासुद्धा प्रयोग आहे .

      माझ्या मते हे नक्कीच उपयोगी पडू शकेल .

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. Pavankumar ji...Uday ji pramanikapane upay suchavat aahet tyancha sanman karayala shika. Dhanagar atyant budhiman asatil tar yaa maahitikade chakk durlaksh karave va junat kalatach vavarat rahave. aapalech klhare karat konachihi pragati jhaleli nahi. Ani aika athava naka aiku, pan dusaryani talamaline sangitale tar kiman adar balagaava hi manusaki tari thevavi.

      Delete
    4. उदय सर धन्यवाद माहिती बद्दल .....अणि माझे समाज बांधव पवन याच्या बोलण्याचा मातीत अर्थ पुढील प्रमाने आहे .. मुलातच धनगर हे अल्प भूधराक आहेत आणी या समाजाच्या जमीनी या बहुतांशी कोरडवाहू / पवसाच्या भरोशावर आहेत ..त्यामुलेच पवसाली 4 महीने सोडले ...तर चारा - शेती साठी व पशुसाठी पानी उपलब्ध नाही ..
      सोलापुर , जत ,सांगली ,फलटन ,सांगोला , मान ,इंदापूर .... या धनगर समाजाची लोकसंख्या जास्त असणार्या भागाचे निरक्षण केल्यास सत्य आपल्याला कलेलच... याचा बरोबर जनून बुजुन या भागामधे
      सिंचन योजना केल्या जात नाहीत ...

      जानकर साहेब व बाबत कायम आवाज उठावत आहेत... पण जे सत्तेत नसल्या मुले प्रशाकीय कामे अडकून आहेत ... कांग्रेस अणि शासित या जिल्याचा विकास स्वातंत्र्याच्या ६५ वर्षे होउनही झाला नाही

      Delete
    5. धन्यवाद सर मेंढपाळाची म्हणजे धनगरांची व्यथा मांडल्या बद्दल,,, नाहीतर
      अलीकडे मराठ्यांचा
      पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या शेतकऱ्यांची (म्हणजेच मराठ्यांची)व्यथा
      मांडली म्हणजे पुरोगामी काम करणे असे समीकरण ह्या लोकांनी करून ठेवले
      आहे. अलीकडे चांभार, लोहार, धनगर, सुतार यांची व्यथा मांडली कि ह्यांच्या
      पोटात दुखायला सुरु होते. त्यामुळे अश्या बांडगुळांकडे तुह्मी दुर्लक्ष
      कराल अशी आशा.

      Delete
    6. Pavankumar Sargar ,


      तुम्हाला माहित आहे का तुम्ही कोणाबद्दल बोलताय . अरुण देशपांडे अन काका चव्हाण यांचे कार्य कधी जावून बघा .
      मी मेंढ्या घेवून चाललो नाही अन साम्भालालो नाही , अन यापुढेही करणार नाही कारण मला त्यातील अक्कल नाही अन त्यात मला रसही नाही .

      माझ्या वाचनात जे आले ते सांगितले , बघा उपयोगी पडतंय का ? नाहीतर सोडा .
      काका चव्हाण यांनी धुळ्यात केवळ एका वर्षात दुष्काळी तालुक्यामध्ये जिथे चारा मागवला जायचा तोच तालुका महाराष्ट्र व गुजरात यांना चारा पुरवणारा बनवला . संपूर्ण जगात सागवानाच्या लागवडीमध्ये त्यांनी तयार केलेले यंत्र वापरले जाते .

      आणि अरुण देशपांडे यांनी तर चार इंच पावसाच्या अन्कोलीमध्ये नंदनवन फुलवले आहे ते काय उगाच नव्हे त्यांनी मेंढ्यांच्या चाराप्रशनी संशोधन केलेले आहे व ते वाचन नक्कीच उपयुक्त ठरेल .

      तुम्ही जर जनावरे पळत असाल व तर तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त चारा लागवडीबद्दल माहित पाहिजे .

      उगाच माझी व इतरांची अक्कल काढण्याची गरज नाही .

      एकीकडे म्हणायचे कि यांच्या व्यथांकडे लक्ष द्या अन काही सकारात्मक माहिती द्यायला गेलो तर मग अक्कल काढायची व आम्हीच किती शहाणे असे दाखवायचे . हा शुद्ध दुटप्पी पण आहे .

      Delete
    7. उदय सर धन्यवाद माहिती बद्दल .....अणि माझे समाज बांधव पवन याच्या बोलण्याचा मातीत अर्थ पुढील प्रमाने आहे .. मुलातच धनगर हे अल्प भूधराक आहेत आणी या समाजाच्या जमीनी या बहुतांशी कोरडवाहू / पवसाच्या भरोशावर आहेत ..त्यामुलेच पवसाली 4 महीने सोडले ...तर चारा - शेती साठी व पशुसाठी पानी उपलब्ध नाही ..
      सोलापुर , जत ,सांगली ,फलटन ,सांगोला , मान ,इंदापूर .... या धनगर समाजाची लोकसंख्या जास्त असणार्या भागाचे निरक्षण केल्यास सत्य आपल्याला कलेलच... याचा बरोबर जनून बुजुन या भागामधे
      सिंचन योजना केल्या जात नाहीत ...

      जानकर साहेब व बाबत कायम आवाज उठावत आहेत... पण जे सत्तेत नसल्या मुले प्रशाकीय कामे अडकून आहेत ... कांग्रेस अणि शासित या जिल्याचा विकास स्वातंत्र्याच्या ६५ वर्षे होउनही झाला नाही

      ===================================================================================================================================

      साहेब ,

      धनगरांच्या तुम्ही म्हणत आहात त्या समस्या खर्याच आहेत . मी स्वत: धनगर dominated दुष्काळी तालुका तासगाव ला belong करतो . धनगर व इतर पालीत राहणाऱ्या इतर भटक्या विमुक्तांची अवस्था मी स्वत: डोळ्याने बघितली आहे . मुळात आडात नाही तर पोहर्यात काय येणार , राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प पैश्याच्या अभावी अपूर्ण आहेत व चारणे कि मुर्गी बाराने का मसाला अशी परिस्तिथी आहे .

      मी असे म्हणत नाही आहे कि काका चव्हाण किंवा अरुण देशपांडे व इतर संशोधाकांमुळे प्रश्न सुटेल परंतु त्यांच्या प्रयोगामुळे किंवा संशोधनामुळे काहीतरी कल्पना सुचतील व दिशा मिळेल .

      संघटनेचे प्रयत्न तसेच सत्तेत येण्याचा प्रयत्न चाळूनच राहावा परंतु त्यातून सर्वच प्रश्न सुटतील असे मला वाटत नाही .

      मुळातच resource crunch असल्यावर शास्त्रीय दृष्टीकोन हाच उपयोगी ठरतो कारण त्यातूनच उपलब्ध साधन सामुग्रीचा सर्वोत्तम वापर होवू शकतो म्हणूनच विज्ञानाची कास धरणे हे आपले कर्तव्य आहे .

      हे भारता सारख्या देशात सर्वांना लागू होते केवळ एका समाजाला नाही . मग तो शहरी निम्न मध्यम वर्ग असो किंवा दुष्काळी प्रदेशातील शेतकरी किंवा पशुपालक .

      Delete
    8. सोलापुरात ‘वैज्ञानिक चाराछावणी सुरू करणार’
      प्रत्येक जनावराला २४ तास पाणी व चारा
      ४ हजार जनावरांची सोय
      सोलापूर, दि. १७ (प्रतिनिधी) - राज्यातील दुष्काळ निसर्गनिमित्त नसून मानवनिर्मित आहे. या आपत्तीला तोंड देण्यासाठी वैज्ञानिक साक्षरतेची गरज आहे. यामुळेच राज्यात प्रथमच वैज्ञानिक चाराछावणी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. अंकोली येथील अरुण देशपांडे यांच्या शेतात असलेल्या वॉटर बँक परिसरात ही चाराछावणी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणादेखील सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. प्राणिमित्र विलास शहा सर्वोदय ट्रस्ट व प्रयोग परिवार अंकोली यांच्या वतीने अंकोली येथे वैज्ञानिक चाराछावणी प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अरुण देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      मोहोळचे तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी या चाराछावणीच्या जागेवर जाऊन पाहणी केली आहे. व मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे. येथील चाराछावणीसाठी ५ कोटी लिटर पाण्याने भरलेल्या वॉटर बँकचा फायदा होणार आहे. या परिसरातील २० एकरांच्या जागेवर सर्वत्र हिरवीगार झाडे असल्याने जनावरांना सावलीही मिळणार आहे. प्रत्येक जनावराला २४ तास पाणी व चारा मिळणार आहे. एक थेंबही पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. या ठिकाणी जवळपास ४ हजार जनावरांची सोय होणार आहे.

      Delete
  3. १ कोटी ६० लाख धनगर.
    ११.२३ कोटी - महाराष्ट्र लोकसंख्या.
    त्यापैकी साधारण ७५% मराठी .
    म्हणजे ८.४० कोटी साधारण,
    त्यात मुस्लीम ११% म्हणजे साधारण १ कोटी.
    दलित (बुध, हिंदू महार, मातंग, चामरकर इतक...१४% ) म्हणजे १ कोटी १७ लाख.
    सर्व इतर मागासवर्गीय - ४० % म्हणजे ३.४० कोटी...
    ब्राह्मण ४ % म्हणजे ४० लाख
    लिंगायत मराठी जैन ४% म्हणजे - ३५ लाख...
    आता वादग्रस्त मराठा - कुणबी - ४० % म्हणजे -३ कोटी ३६ लाख

    सगळे जर एकत्र केले तर मराठी लोकसंख्या १२ कोटीच्या घरात जाते.....जी कि ८ कोटी आहे ४ कोटी आणायचे कोठून?

    ReplyDelete
    Replies
    1. Vikas ji, I hope we will get real picture of caste base population only after the present census. Till then we just have probable figures. Thanks.

      Delete
    2. VAIKYA TU SARAATA SORRY MARATHA AAHE KA RE..? JAY BHIM...!!!

      Delete
  4. संजय सोनवणी यांचे पुढील काळातील ठळक संशोधन असे असेल
    १. आर्य हे धनगर होते. पुरावा : आर्य हे पशुपालक होते. आर्य हे आद्य वसाहतकार होते. म्हणून भारतावर पहिला हक्क धनगरांचाच असला पाहिजे.
    २. श्रीकृष्ण हा धनगर होता. पुरावा : त्याला गोपाल म्हणतात. महाराष्ट्राच्या जावळी खो-यातून श्रीकृष्णाचे वंशज मथुरा परिसरात गेले होते. जावळी वरून जावळ, जावध, जाधव, यादव असे रूपांतर होऊन कृष्णाचे कूलनाम बनले.
    ३. येशू ख्रिस्त धनगर होता. पुरावा : येशूला शेफर्ड म्हणतात. शेफर्ड म्हणजे मेंढपाळ. येशूचे आईवडील महाराष्ट्राच्या तारळ खो-यातून इस्रायलला स्थलांतरीत झाले होते.
    ४. श्रीराम हा धनगर होता. पुरावा : श्रीराम १४ वर्षे रानावनात सहजपणे वावरू शकला. वनांची एवढी माहिती केवळ धनगरांनाच असू शकते.

    ReplyDelete
    Replies
    1. इस्रायल हा शब्द तारळ खो-याचे अपभ्रंश होऊन बनला आहे. तो असा : तारळ, इस्तारळ, इस्तारल, इस्रायल.

      Delete
    2. avadle. sonavani sahebanchi mast khechali tumhi.

      Delete
    3. MASTWAL SARAATYA TUZI JAAT DAKHAVILYA BADDAL THNX... ASACH JALAT RAHA..JAY BHIM..!!!

      Delete
    4. अरे कांबळ्या आधी तुझी शेंडी लपव आणि मग बोल. आडनाव बदलले म्हणून तुमची शेपटी सरळ होणार नाही.

      Delete
    5. हिटलरकडे देखील Blondi नावाची कुत्री होती. याचा अर्थ हिटलरला देखील कुत्रे आवडत होते. म्हणजेच हिटलर हा धनगर होता. हिटलर ला आर्य रक्ताचा अभिमान होता म्हणून धनगर हे आर्य आहेत असे ही यावरून सिद्ध होते.

      Delete
    6. MUTHBHAR SARAATA AANI EK MARAATHAA equal!!! mala shendi mhanta mhanta tuzya JIRETOPACHA gonda tutayala laagla bhurtya raja! mi 100 takke buddhist aahe..saraatya mag tu sang tu fakt 96 takke kasaa..? tuze 4 takke kuthe visarle..? jaago saraata jaago..patli gali bhaago..ek din jarur aayega maharashtra hi nahi sansad par bhi NEELA ZANDA laharayega..!! baatgya saraatyanno aadhi 100 takke vha mag samatechi bhaasha karaa..uth saraatya uth, ghe haati talwaarichi muth.. 2-4 dukaane lut aani gaavakad sut.. aandhal brahman virodh swathachya balaavar karaa saraatyanno.. phule ambedkar buddha kashala vaapartaa? aadhich sangitley WE TRUE BUDDHIST GUYS ARE CHANGING...!!! ONLY JAY BHIM...!!!

      Delete
    7. शेंडीवाल्या कांबळ्या मराठ्यांना बाटगा म्हणून कशाला उगाच स्वत:ला उघडा पाडतोस? स्वत:ची विकृती कांबळ्याच्या नावावर खपवू नकोस. भीम आणि संभाजी आपसात काय ते बघून घेतील. पेशव्यांनी मध्ये नाक खुपसू नये अशी सक्त ताकीद देण्यात येत आहे.

      Delete
  5. @ Anonymous Urf Manav Bhosle Urf ' B Grade...

    हिटलरकडे देखील Blondi नावाची कुत्री होती. याचा अर्थ हिटलरला देखील कुत्रे आवडत होते. म्हणजेच हिटलर हा धनगर होता..........

    -------------------------------------

    आता पुढील लिंक'मधील चित्रातून काय सिद्ध होते वा अर्थ आपणांस समजते, हे हि आपण जरा आम्हांस सांगावे ?

    http://sanjaysonawani.blogspot.in/2011/05/blog-post_9325.html

    http://2.bp.blogspot.com/-LVk-0C3QvrQ/TeUHjuP4ugI/AAAAAAAAAE4/e0xIXN8Ge9I/s1600/vaghyaashivaji.JPG

    --------

    http://marathachronicles.blogspot.in/2010/11/chatrapati-shahu-maharaj.html

    --------

    http://travelogueunlimited.blogspot.in/2010/11/sangam-mahuli-and-wai-menawali-temples.html

    --------

    http://www.uppercrustindia.com/ver2/showpage.php?pagetitle=A%20Peak%20Behind%20The%20Royal%20Curtain&postid=122

    http://www.uppercrustindia.com/oldsite/13crust/thirteen/season4.htm

    आपणांस असे अनेक चित्र दाखविणे अजून बाकी आहे ... पण सध्या एवढेच पहावे व समजावे....

    - जय शिवमल्हार

    बोला............ हर हर महादेव !!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. मराठे आणि धनगर हे एकच आहेत हे सिद्ध केलेत त्याबद्दल आपले आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. हेच तर ब्रिगेड सांगत होती. पण तुम्ही स्वत:च मान्य केल्यावर प्रश्नच मिटला. आता पुढच्या निवडणुकीत सत्तेवर कोणीही आले तरी काय फरक पडतो? नाही का?

      Delete
    2. एवढी मोठी कोलांटी उडी मारल्याबद्दल आपले हि धन्यवाद.

      आणि हा....

      ब्रिगेड काय सांगत होती ? वा 'नेमके' काय सांगावयाचे आहे व आपणांसहि नेमके काय सांगावयाचे आहे ? हे आम्हांस चांगलेच ठावूक आहे....

      गेल्यावर्षभरापासून आपणांस नेमके... होय 'नेमके' काय सांगावयाचे आहे, हे हि आम्हांस चांगलेच ठावूक आहे..... ( एक प्रकारे दहशत निर्माण करणे, धनगर समाजाची, महापुरषांची, नेत्यांची बदनामी करणे तसेच धनगर व मराठा समाजात कसे फूट पाडेल याची विशेष काळजी घेणे ... ) हे सर्व आम्ही आजवर पाहत आलेलो आहे....


      प्रथम धनगर समाजाची कुचेष्टा करणे ( आपले comments निट पाहणे ) आणि नंतर विषय नसताना मराठे ( का मराठा ?) व धनगर आपण एकत्र आणले....सरळ सरळ कोलांटी उडी.( आपणांस काय सिद्ध करावयाचे आहे व नेमके कोणते अर्थ आम्हांस सांगावयाचे आहे ? )

      ( सत्तेसाठीच.... होय सत्तेसाठीच ) मराठा व धनगर एक आहे, असे आपण सांगून 'सत्ता' आपणांस / ब्रिगेडस किती प्रिय आहे,( सत्तेसाठीच सर्व काही...) हे पुनः एकदा दिसले...

      आपणांस हेच सांगावयाचे आहे का ? ....

      http://www.loksatta.com/daily/20090308/sun01.htm

      -------------------

      आपणच टाकलेले एका चित्रा'ची (Jagatguru Tukobaray Ani Shivrajya चित्र ) आठवण आपणांस करून देत आहे...... पहावे व समजावे >>>>

      http://shivdharm.blogspot.in/


      ------------------

      ..... अजून भरपूर काही सांगावयाचे आहे ...पण सध्या एवढेच .

      - जय शिवमल्हार

      बोला............ हर हर महादेव !!!!!!!!!!!!!!!!!

      Delete
    3. हा हा हा...मी ब्रिगेडी नाही. त्यामुळे ब्रिगेडवर टीका करायला माझी काहीच हरकत नाही. वरील कमेंट मध्ये धनगरांची नव्हे तर सोनावनींची त्यांच्या मांडणीविषयी चेष्टा केली आहे. हे कळण्याची बुद्धी तुम्हाला मिळो अशी प्रार्थना.
      आणि हो, या भारतीय समाजात कोणी वेगळी फूट पाडायची गरज नाही. ब्रिगेडसारख्या संघटनांमुळे मुळात असलेली फूट चव्हाट्यावर येते इतकेच त्यातील सत्य आहे. तुम्हाला काय म्हणावयाचे आहे की ही फूट फक्त धनगर आणि मराठे यांच्यातच आहे? जरा पुलाखालून अजून थोडे पाणी वाहू द्या. म्हणजे ही जातीयवादाची मुळे तुमच्यात आणि इतरही समाजात किती खोलवर रुजली आहेत हे तुमचे तुम्हालाच कळेल. नाहीतर ओबिसी समाजाला एकत्र करण्यासाठी सोनवणीना एवढे रान उठवावे लागले नसते.
      ब्रिगेडी त्यांच्या मनीचे हितगुज असे उघड करून सांगणार नाहीत हे सुद्धा ज्यांना कळत नाही त्यांना इतर गोष्टी काय कपाळ कळणार?
      माज प्रत्येकालाच दाखवायचा आहे. सत्ता प्रत्येकालाच हवी आहे. पण खापर मात्र इतरांच्या डोक्यावर फोडून मोकळे व्हायचे आहे. गेली शेकडो वर्षे हा समाज असाच वागत आला आहे. आणि यापुढेही असाच वागणार आहे. थोडक्यात म्हणजे 'मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली' हे भारतीय समाजाचे ब्रीदवाक्य आहे.

      Delete
    4. TU KON AAHES HE NA SAMAJNYA ITKE MURKHA AAMHI NAKKICH NAHI! ARE BAATGYA SONAWANI SIR YANCHYA LIKHANAMUE OBC JAAGRUT HOT AAHET.., AAMCHYASARKHE DOLAS BUDDHIST TUMCHI LAAYKI CVHATYAVAR AANAT AAHET HE KHARE TUMCHE DUKHANE AAHE (AWAGHAD JAAGCHE)SAHAN HI HOT NAHI AANI SAANGTA HI YET NAHI..JAY BHIM

      Delete
    5. शेंडीवाल्या कांबळ्या, पेशवाई गेली तरी तुझे सोवळे काही सुटत नाही.

      Delete
  6. पुनः एकदा कोलांटी उडी मारल्याबद्दल धन्यवाद.




    ReplyDelete
    Replies
    1. कडी आतून लावून घेतल्याबद्दल धन्यवाद.

      Delete
  7. For Uday kalgaonkar,

    Thodya velat,thodya jaget lihane va te samajane (Tyache khare swarup)he mhanave tevde sope nasate.

    Mala sangavas vatata ki me baramaticha kahi koradvahu,dongral bhag pahila aahe,tethe paani naahi va paani pohchel asshi vyavastha nahi tithe je problem shepherd anubhavtat te ase ki chara ugavala ani to khanyachya yevda motha zala tarach shepherd tithe mendhya charayla netat.

    othervise te dusarikade nadichya parisarat tya charayla netat.

    Mi tumhala mendhya charayla lavu shakat nahi pan tyanche problem Internetvar basun kalat nahit asa mazya tya thodya(Mothaya)tirkas bolnyacha arthaa aahe.

    Shepherd communitisathi phakta pavasavar va jangalavar avalambitva kami karave tynchya sathi kurane uplabdhakaravait ya sha aganit magany aahet.

    Tumhi kon chavan,avachat yanche sandarbha deta te dekhil....asel tyanni khup changle kam kele asel tumhi tyanchi pustake vachali asatil pan tyacha kiti implementation hota aahe.

    To apalya charchecha vishay hoto pan tya yojna kevha rabnar ha vishay aahe.

    Mapha(Sorry)kara te mazyapeksha mothe aahet me tyancha anadar kela aahe pan pustaki dnyan pagalnya peksha kivha apali pustakanchi publication chi sankhya vadhavnya peksha Practically shepherd kase follow karatat te baghave.

    Te kase chukiche he pustakat dakhavne soppe aahe ki matichi ziz hote,charychi vadh hot nahi....are thoda vadhala tari mendhya khanar...motha vadhala tari ..mendhyach khanar.....to paryant chara nasalyas shepherd lokkani tyachi vat kashi baghavi...mendhya upashi thevavyat kaa?

    Mhanun tumhala mendhya valnyachi offer dili khup chan aahe me tumchi soy karu sahakato maze khuup mitraa aahet tyanna sutti milel.

    ReplyDelete
  8. थोर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी
    लावलेले आणखी काही शोध पुढील प्रमाणे असू शकतील.

    १. भगवान दत्तात्रय हा एका धनगराचा पूत्र होता. कारण त्याच्यासोबत गाय आणि कुत्रा कायम राहत असे.

    २. महाभारतातील राजा आणि थोरला पांडव महाराजा युधिष्ठिर हा धनगर होता. कारण त्याच्याकडेही कुत्रा होता. इतकेच काय हा कुत्रा त्याच्यासोबत स्वर्गापर्यंत चालत गेला होता. जिज्ञासूंनी महाभारताचे स्वर्गारोहण पर्व पाहावे.

    ३. मृत्यदेव यमराज हा जातीने धनगर होता. कारण त्याने यमलोकात फार भयंकर अशी कुत्री पाळून ठेवलेली आहेत. पापी लोकांना शिक्षा देण्यासाठी ही कुत्री पाळली, असे यमराज सांगत असले तरी ते खरे नव्हे. त्याला जन्मत:च कुत्राप्रेम आहे, त्यामुळे त्याने ही कुत्री पाळली आहेत.
    ..........................
    अंतिमत: श्री. आदरणीय सोनवणी यांचा सर्वांत महान शोध असा : ‘हाल कुत्रे खाईना' ही म्हण धनगरांनी तयार केली आहे.

    वरील म्हणीचे पेटंट मिळविण्यासाठी श्री. सोनवणी हे आता अमेरिकेला जाणार आहेत. सोनवणी यांनी या आधी वॉशिन्गटनला जाऊन ‘लोहभुकटी'चे प्रात्यक्षिक दाखविलेले आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकेची उत्तम माहिती आहेच.

    वाचकांना विशेष सूचना : वाचकांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, सोनवणी यांनी वॉशिन्गटनला नेलेली लोहभुकटी ही त्यांनी स्वत:च तयार केली होती. (हे त्यांचे स्वत:चे म्हणणे आहे.) शिवाय सोनवणी यांनी स्वत: नवी ‘भुकटीकरण पद्धती' शोधली आहे. (हे त्यांचे स्वत:चे म्हणणे आहे.)

    वाचकांना आणखी एक विशेष सूचना : भुकटी विषयीची माहिती आम्ही सोनवणी यांच्या ब्लॉगवरूनच मिळविली आहे. त्यामुळे ती सत्य आहे, असे बिनधोकपणे समजावे.

    ReplyDelete
    Replies
    1. सर्व वाचकांना आवाहन - थोर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांचे आणखी काही शोध कोणाला सापडल्यास येथे कळवावेत.

      Delete
  9. Sonavani sir koni kahi mhano keep it up!

    ReplyDelete
  10. But I appreciate one thing. Sonavaniji publish all post. Even if that are against him. नाहीतर शिव्या व कोणत्याही प्रकारची शारीरिक किवा मानसिक हिंसा हि अपरिहार्यतेतून येते. जेवा एखाद्याला किवा एखाद्या समाज्याला असे समाजेते कि मी ह्या परिस्थितीत काहीच करू शकत नाही किवा परिस्थिती बदलण्याची धमक माझ्यात नाही तेवा तो माणूस शिव्या देत सुटतो.........पुढचा भाग सिव्या देण्यातून जर काहीच होत नसेल तर मग शारीरिक हिंसा चालू करतो.............कोणत्याही हिंसेमागे एक पराभूत मानसिकता असते.......

    ReplyDelete
    Replies
    1. हिंसा हा मूळ प्रश्न नसून वर्चस्ववादी मानसिकता हा मूळ प्रश्न आहे. ह्या वर्चस्ववादाच्या भावनेतून निर्माण होणारी मानसिकता ही पराभूत असते; त्यामुळे त्या मानसिकतेतून येणारी हिंसा ही समर्थनीय नसते. वर्चस्ववादाला आव्हान देताना हिंसा करणे हे काही बाबतीत अपरिहार्य असू शकते. धर्माच्या किंवा जातीच्या नावावर निष्पाप स्त्रिया मुलांना मारणे आणि रणांगणावर शत्रूच्या गोळ्यांचा सामना करणे ह्यात हाच फरक आहे.

      Delete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. Hi. Sanjay .
    Thanx for informative articles abt the Dhangar community n issues. enjoying ur blog.
    @ Uday - thanx 4 the info abt Mr. Arun Deshpande n Mr. Kaka Chavan n their work n new methods..indeed helpful 4 those who want to follow tat.
    @ Pavankumar Sargar - hope u dnt mind . 1st of all v must need to understand wat points Sanjay N Uday r trying to make here. yes, all farmers n shepherds know their job well n ther experience is priceless. but there r new methods n research done for the community/business not only in india but all over.. v need to implement it n take the suggestions in rite spirit if v want to succeed.

    http://www.nabard.org/modelbankprojects/animal_sheep.asp
    http://www.facebook.com/VishwaAgroTech

    ReplyDelete
  13. thanks sir, khup chan mahiti aahe , tumcya blog var comment taknare 2 brigedi kavle aahet? tyanchi laykich ti aahe...............

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...