1. मुळात श्रद्धा, ईश्वर, धर्म, पुजा-अर्चा, नीति या संकल्पनाच मानवी आदिम भयातून निर्माण झालेल्या आहेत. निसर्गावर मात करण्याचा मानसाचा प्रयत्नही याच आदिम भयातुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नांचा आविष्कार आहे. भयमुक्त माणसाला कसल्याही श्रद्धेची गरज असू शकत नाही. भयाच्या भावनेतुनच सामाजिक बंधने येतात...कायदे येतात, राज्यव्यवस्था येते...सैन्यदले येतात...भयमुक्त मनुष्य सापडणे जवळपास अशक्य आहे...
2. भय हे निरंतर अबोध पातळीवर वावरत असते. मृत्युचे भय, जीवनातील असुरक्षिततेचे भय...ई. प्रेम, वात्सल्य, बंधुभाव अशा उच्च नैतिक संकल्पना मुळात कृत्रीमपणे विकसीत केल्या त्या निकोप सामाजिक सहास्तित्वासाठी. मनुष्य हा अबोध पातळीवर रानटीच असतो. या रानटीपनाचा स्फोट प्रसंगी कथित सभ्यांचाही होत असतो....खाजगीत वा जाहीरपणे. अजुन आपण त्या आदिम भयातुन व त्या भयावर मात करण्यासाठी लागना-या हिंसक (शारीर/लैंगिक) भावनांतुन पुरेपुर बाहेर पडलेलो नाही. खरे तर आदिम नैसर्गिक भावना आणि समाज सुरक्षिततेसाठी विकसीत केलेल्या उदात्त नैतीक संकल्पना यात आजचा मनूष्य सापडलेला आहे. माणसअला कृत्रीमतेचा हव्यास का याचे उत्तर या मानसिक संघर्षात आहे.
3. सश्रद्ध मीही आहे. श्रद्धेने वास्तव जीवनातील काही भये दुर झाल्यासारखे वाटते तर काही भये अधिकच श्रद्धेकडे नेत "भय इथले संपत नाही" अशीही मानसिक अवस्था बनवतात. कोणत्या प्रसंगांचा आपण सामना करत आहोत यावरही श्रद्धा कितपत कामाला येते हे अवलंबुन असते. अत्यंत असुरक्षीत आयुष्ये जगनारे आणि तुलनेने अधिकाधिक मुळात व्यवस्थेने दिलेली सुरक्षीतता मिळना-यांच्यात तुलना केली तर असुरक्षीत लोक सर्वाधिक श्रद्धाळु असतात. श्रद्धा हा मानसिक उपाय आहे. निसर्गाने मानसाला गंभीर इजा झाल्यावर बेशुद्ध पडण्याची संधी दिलीय तसा. त्यामुळे श्रद्धा ही भय कमी करते पण स्थिती बदलवत नाही...
4. भयावर मात करण्यासाठी मनुष्य साधने शोधु शकला (म्हनजे मानसिक श्रद्धादि असोत कि वैज्ञानिक...बुद्धीच्याच जोरावर...त्यामुळे दोहोंचा अन्योन्य संबंध आहेच.
5. बुद्धीमान मनुष्य भयरहित असतो असे नसून तो बुद्धीच्या जोरावर भयावर मात करण्याचा प्रयत्न करत असतो एवढेच...तो त्यात यशस्वी होईल का? मानवी बुद्धी अंतत: भयावर पुर्ण मात करु शकेल का? खरा भयमुक्त मानवी समाज (समाज होतो कारण तो भयभीत असतो म्हणुनच...त्यामुळे समाज हा शब्दही बाद ठरेल अशे मानवी नवी व्यवस्था येईल का?) हे प्रश्न आपल्यासमोर आहेत. उपनिषदांत म्हटलेय कि जेथे राजा नसेल कि प्रजा, दंड नसेल कि शासित, असा समाज निर्माण व्हावा. थोडक्यात भयमुक्त समाजातच हे शक्य आहे. मी या प्राचीन ऋषींच्या स्वप्नावर विश्वास ठेवतो. असाच समाज निर्माण होण्यासाठी आपण काय करु शकतो?
सुंदर लेख
ReplyDeleteDhanyavad Sir.
DeleteSundar Lekh
DeleteThanks.
Deleteजबरा लेख...! आवाकाही जबराच....!!!
ReplyDeleteThanks friend.
Deleteहिंदू तत्त्वज्ञानानुसार मृत्युभय हे सर्वात मोठे भय असून इतर भये त्याच्या फक्त पडछाया आहेत. माणूस स्वताला शरीर या एकाच स्वरूपात पाहतो तोपर्यंत भय कैयम राहील.
ReplyDelete>>समाज होतो कारण तो भयभीत असतो म्हणुनच.<<
ReplyDeleteपरफेक्ट. आणि अंतर्मुख करणारा लेख.