Wednesday, September 5, 2012

बाबासाहेब म. गांधींनंतरचे ग्रेटेस्ट इंडियन....

बाबासाहेबांनी फक्त पुर्वास्पृश्यांसाठीच नव्हे तर देशातील तमाम जनतेसाठी तर्कशुद्ध बुद्धीवादाचा पाया घातला. एक वैचारिक अव्यभिचारी नैतीक दृष्टी कशी असावी हे आपल्या चिंतन लेखन व वर्तनातुन मांडले. हे बाबासाहेब भारताला सोडा त्यांच्या अनुयायांनाही पचले नाही. त्यांनी सातत्याने बाबासाहेबांची एकच बाजु उचलुन धरली आणि इतरांनी सोयीने तीच बाजु मानत बाबासाहेबांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण चालु ठेवले. एकांगी उदात्तीकरणात बाबासाहेबांच्या मुलभुत तत्वज्ञानाचा पाया खचवण्यात अंधानुयायांनी जसा हातभार लावला तसाच मनुवाद्यांनीही लावला. एवतेव वैश्विक दृष्टीच्या बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला एक प्रकारे हरताळ फासण्यात आला. अत्यंत संयमी पण टोकदार भाषा वापरणारे बाबासाहेब शिवीतंत्राच्या अनुयायी म्हनवुन घेणा-यांच्या दुष्ट काव्याने अकारण दुरावले गेले. बाबासाहेब आवाक्यात आलेच नाहीत...किंबहुना येवू दिलेच गेले नाहीत...प्रा. नरकेंसारखे विचारवंत अज्ञात बाबासाहेब समजावुन सांगतात तर हे त्यांची डी.एन. ए. टेस्ट करा म्हणतात. पोलद्वारे बाबासाहेब म. गांधींनंतरचे ग्रेटेस्ट इंडियन ठरवणे हा भारतियांचा अडानीपणा आहे...जर भारतियांनी त्यांच्या कार्यावर, तत्वज्ञानावर पुढची इमारत बांधण्यचा हव्यास धरला असता तर प्रत्येक भारतीय ग्रेट इंडियन बनला असता. पण हे होणे नव्हते. अर्थशास्त्रज्ञ, कृषितज्ञ, समतावादी, राष्ट्रवादी बाबासाहेब दुरच फेकले गेले आणि फक्त दलितांचे कैवारी या मुखवट्यात त्यांना बंदिस्त करत एकाच जातीच्या चौकटीत त्यांना बांधत इतरांना त्यांच्यावर बोलण्याचीही चोरी वाटावी अशी स्थिती निर्माण केली गेली...बाबासाहेब सर्वांचेच कैवारी होते म्हणुन त्यांच्याबाबत चर्चा करण्याचा सर्वांना अधिकार आहे हे भान सुटले. सा-याच चर्चा आकसानेच वा भावना दुखावण्यासाठीच असतात असा ग्रह करुन घेतल्याने बाबासाहेब टाळण्याकडे प्रवृत्ती निर्माण झाली. निकोप मनाने त्यांचा अभ्यासही जवळपास थांबला. त्याला मिळाली ती जातीय परिमाणे जी कधीही बाबासाहेबांनाही अभिप्रेत नव्हती. मला वाटते पोलद्वारे जरी बाबासाहेब ग्रेटेस्ट इंडियन अफ्टर गांधी ठरले असले तरी त्यावर किती इंडियनांचा विश्वास आहे हेही तपासुन पहायला हवे. तो जर तसा नसेल तर बाबासाहेबांना सर्वांनीच नव्याने समजावून घेण्याची गरज आहे.

4 comments:

  1. खरोखरच आता बाबासाहेबांच्या विचारांना सर्व-समावेशक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
    आपल्या देशाला जर पुढे जायचे असेल तर बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्षात उतरवायला हवेत.
    अंतर्मुख करायला लावणारी पोस्ट आहे, संजयजी.

    ReplyDelete
  2. dear sanjay sir,

    1)Babasahebana sudha amryad kal paweto rakhiw jaga apeshit

    navhatya.ekikade babasahebanche naw gheun sankhyeca jorawar

    warshanu warshe rakhiw jaga latat rahane he yogya ahe ka?

    2)katakari/mahar/dhend ityadi jatina arashan dene he kharokharach

    nyayache ahe.

    3)PARANTU SONAR/YADAW(BIHAR/UP) ITYADI ASANKHYA OBC JATI YA

    PAHILYAPASUN DHANADYA HOTYA TYANI SUDHA RAKHIW JAGANWAR TAW

    MARAWA YA BADDAL UCHHAWARNIYANCHYA MANAT PRACHANDA RAG KHADKHADAT

    AHE.

    4)"BANGLADESHI YEU CH DET ,MUSLIM BAHUSANKYA ZALE TAR NIDAN RAKHIW

    JAGANCYA KAT-KATI TUN MOKALE HOU.BHALE AMACHI WAT LAGEL PARANTU

    TUMCHI DADAGIRI/ WA SHIWYA SHAP TARI SAMPATIL" ASHA PRAKARCHE

    DHAKKA-DAYAK WICHAR (BHALE RASHTRA DROHI ASATIL) TURALAK PUNE

    KA HOINA UCHHAWARNIYANCHYA BOLANYAT YEU LAGLE AHET.

    5)SURAWA BAJUNI KONDI ZALELYA JATI DWESHA CHI SHIKAR HOTAT.

    ISAP NITIT DON TONDE ASLELYA BAGALYACHI GOSHTA AHE.SURWA FALE

    EKACH TONDANE KHALLI YACHA RAG YEUN DUSARYA TONDANE WISHARI

    FAL KHALLE.

    6)WARIL LEKHAN KONTYAHI DWESHATUN KELELE NAHI.KRUPAYA RAG YEU

    NAYE.

    7DALIT PURASHAN CHYA MULANA ARASHAN/ PUN DALIT STRINE SUWARNASHI

    WIVAH KELA TAR TICHA MULANA ARASHAN NAHI HE BABASAHEBANA PATNARE

    HOTE KA?

    8)DALIT CHALWALINE APALE SAMRTHYA ARASHANA SATHI WAPARTANACH

    DESHATIL NOKRYANCHI SANKHYA WADHAWINE/ BHRASHTACHAR WIRIDHI

    PRACHAD AWAJ UTHWANE ITYADI BABIN KADE PAN LUKSHA DILE PAHIJE.

    9)DIWASE DIWAS SANDHI KAMI HOT GELYA/MAHAGAI AHICH WADHAT RAHILI

    TAR UCHHA WARNIYA TARUNANCHI SHAKTI VIDHWANSAK MARGA KADE JAU

    SHAKATE.

    10)DALIT/OBC CHALWALI NE KUTHE TARI SURWA SAMAWESHAK KARYAKRAM

    SUDDHA HATI GHETALA PAHIJE.

    11)PARISTITI KHUP GAMBHIR AHE.

    12)UCHHAWARNIYA MUTHBHAR AHET TE KAY KARNAR YA BHRAMAT RAHU NAYE.

    ASHI BHADKALELE MANE TABYAT GHEYALA BHRPUR DESH WIGHATAK SHAKTI

    UTSUK ASTAT.

    13)KRUPAYA PUTRA +VELY WACHANE . KRUPAYA LASHAT GHYAWE KI RAKHIW

    JAGA WIRODHA TUN SADAR LIKHAN KELE NAHI AHE.TAR PUDHACHYA 25

    WARSHAT JI PARISTITI UD-BHAU SHAKATE TYACHYA KADE LAKSHA WEDHAYCHA

    LELA AHE.

    14)APALYA PRASTUT LEKHASHI HA WISHAY WISANGAT AHE.PRANTU APLA..

    E MAIL ID MAHIT NASLYAMULE APLYASHI KAHI PATRA VYAWAHAR KARAYCHA

    ZALA TAR APLA NAWA LEKH PRSIDH ZALYA WAR KARAWA LAGTO.

    ReplyDelete
    Replies
    1. मी आपल्याशी काही बाबतीत सहमत आहे. भाकरी छोटी आणि वाटा मागनारे फार हे च्घित्र आहे. भाकरी कशा वाढतील इकडे लक्ष न देता शासन आहे तेवढ्याच भाकरीवर लोकांना अवलंबुन रहायला सांगत आहे...त्यामुळे संघर्ष अटळपणे होतो हे खरेच आहे. सगळेच नोक-यांचे भिकारी न होता नोक-या देणारेही पुढे यायला हवेत याचा विचार कोण करणार? आपणच पुढे यायला हवे. सरकार स्वत:च बेकार आहे...ते काय नोक-या पुरवणार?

      Delete
  3. Sanjayji thnx for EYE OPENER article! Jay Bharat..!!!

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...