Monday, November 19, 2012

...कोणाच्या बापाचे काय जाते?




वाढते व तेही केंद्रीत औद्योगिकरण...चराऊ कुरणांचा नाश...उरलाय  त्यांचा खालावत चाललेला दर्जा...जनावरांची उपासमार...पर्यावरणाचा ढासळता समतोल...धनगरांची कुरणांच्या शोधातील वाढती पायपीट...गांवगुंडाची बेसुमार खंडणी-वसूली...




राष्ट्राच्या सकल उत्पादनात अजुनही वाढवता येण्यासारखा मोलाचा वाटा असुनही मेंढपाळांचे मुलभूत अधिकार नाकारणे ही कसली लोकशाही? पर्यावरणाचा खून पाडत प्रगतीच्या गप्पा हाकणे ही कसली प्रगती?





देशाच्या सकल उत्पादनात ९% वाटा (शेतीचा १४% आहे) घसरत जात धनगर व पर्यायाने पशुपालक समाज एक दिवस या संपूर्ण उद्योगातून बाहेर हाकलला जाणार...आजही देशाचे कुरणांबाबत धोरणच नाही...कुरणे बळकावणे सहज सोपे आहे...हजारो वर्ष धनगर वहिवाटीने कुरणांचा वापर शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी करत आहेत...त्यांच्या नैसर्गिक हक्काकडे कोणाचेही लक्ष नाही...




कोणी एक कुरण बळकावले कि दुस-या जागेच्या शोधात वणवण करायची...उघड्यावरचे फिरस्ते संसार..मुलाबाळांना शिक्षण नाही....धरणांखाली, सेझखाली, औद्योगिक वसाहतींखाली....कुरणे चाललीच आहेत...पर्यायी व्यवस्था नाही...चराऊ गवताच्या नव्या सकस जाती शोधण्यासाठी कसलेही प्रयत्न नाहेत...अपारंपारिक वनीकरणाने अधिकच घात केलेला...



इकडे शेती आणि शेतमालासाठी आंदोलने होतात...रक्त सांडते...दुसरीकडे असला जहरी अन्याय...बहुदा पशु आणि पशुपालकांना या व्यवस्थेत स्थानच नसावे...शेळ्या-मेंढरे मूक...धनगर मूक...नेते येथे चरू शकत नसल्याने ते मूक-बधीर...पर्यावरण मरो कि धनगर मरोत...कोणाच्या बापाचे काय जाते?


For more details also see...

11 comments:

  1. M.d. Ramteke on Face book.... धनगर समाज उभा होऊन जो पर्यंत डरकाळी फोडत नाहे तो पर्यंत कोणी लक्ष देणार नाही. ती डरकाळी आली की हालचाली सुरु होतील.

    ReplyDelete
  2. Naikwade Vishal Arun on FB-..... Agadi barobar ahe sir..kharatar newly drafted land acquisition bill ( special empowerd group chairman-sharad pawar) madhe ya sambandhi tartud karayla hawi hoti....kuranachi dekhbhal hi panchayat samiti karte mahnun P R S level la pan ya vishayi kahi acts karta yetil pan yaat kahi chara khata yenar nahi ( chara scam).... aani dhangar nete pan mug gilun bastat.....mahnunach muki bichari kuni haka ashi awastha mendharanchi aani samajachi doghanchi ahe.

    ReplyDelete
  3. धनगर समाजाने डरकाळी फोडण्याची गरज रामटेके यांना का वाटावी? त्यांच्यात स्वत: डरकाळी फोडण्याची ताकद नाही का? धनगर समाजाला भरीला घालून स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचा छान प्रयत्न आहे. स्वत:च्या बळावर सत्ता मिळवणे आणि ओझ्याचा बैल होणे यात फरक असतो.

    ReplyDelete
  4. Dear Sanjay,
    With your kind permission,
    I would like to suggest that ,as far as possible , everyone using this blog
    to express their thoughts,or to react -
    may please use "MARATHI" as a language of expression.with DEVNAGARI script.
    because the grammar of the English language they are using is extremely poor.
    And at the time of reading their remarks , it sounds funny to read such kind of things.
    One gets confused and it becomes difficult to understand and grasp the contains .
    The impact of their expression is lost due to incorrect grammar.

    One should also be careful about devnagari script.
    We can easily avoid words such as आनी पानी and write clearly आणि पाणी .
    And we can add power to our beautiful words and write our thoughts to perfection.
    most of the topics and reactions are easy to express in marathi with DEVNAGARI script.

    If one wants to spread his/her thoughts to the bottom layer of the society,
    and intends to reach the masses,the deprived,the poor ,we must use simple ,correct ,
    grammatically perfect mothertounge as a source of communication.
    It is their birthright.and so to say it is our duty .
    One has to express himself/herself in the DEV NAGARI script.
    Either very perfect ,balanced and grammatically correct English or perfect Marathi
    with Devnagari script and zero grammatical mistakes will serve the purpose.
    Thanks.

    ReplyDelete
  5. दुर्दैव हे आहे की आज कितीतरी जमिनी शासकीय अधिकाराखाली पडिक पडली आहे. त्या जमिनीचा वापर न करता येणे, हे निष्क्रिय नोकरशाही आणि बेजबाबदार नेते हेच कारणीभूत आहेत. कारण वन आणि जमिनींसदर्भात आजसुद्धा ब्रिटिशकाळातील कायदेच ग्राह्य धरले जातात आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा काहीच प्रयत्न केला जात नाही.

    ReplyDelete
  6. प्रिय संजय ,
    आपल्यासमोर घडलेले उदाहरण ,परमपूज्य बाबा आमटे यांचे आहे.
    त्यांच्या दोन मुलांचे आहे.
    त्यांनासुद्धा बऱ्याच विचित्र परिस्थितीतून जावे लागले.
    त्यांना किती निःकृष्ट दर्जाची जमीन मान्य करावी लागून , अपार कष्टानंतर त्याचे
    आनंदवन घडले - ते सर्वज्ञात आहे .

    कुठूनतरी सुरवात करावी लागते हे मात्र निर्विवाद.

    सरकारकडे जमीन असते आणि मनात असेल तर सरकार डोळ्याची पापणी लवायच्या आत निर्णय घेऊ शकते.
    फाइल्स हलवू शकते.हे आपण पुण्यात राष्ट्रपतींना ज्या प्रकारे घरासाठी जमीन देण्याचा प्रयत्न झाला त्यावरून
    म्हणू शकतो.

    ही झाली असामान्य उदाहरणे !,
    सामान्यांच्या बाबतीत काय घडते ?

    माझे एक मित्र -ब्राह्मण -मध्यमवर्गीय - शहरी - स्वतःची कुठेही इवलीशिदेखील जमीन नाही ,
    पिंड शेतकऱ्याचा नाही .पण उदंड उत्साह ! हिरव्या वनराईची प्रचंड हौस ! वयोपरत्वे ओढ निसर्गाकडे .
    जर सरकारच्या कुठे जमीन मिळण्याबाबत योजना असतील तर त्यासाठी पाठपुरावा करण्याची तयारी .
    अखंड पाठपुराव्यानंतर वनराई साठी सरकारी जमीन वृक्ष संवर्धनासाठी मिळाली - अनेक अटी मान्य कराव्या लागल्या.
    वृक्ष लागवड केली.सरकारी भेटीगाठी - निरीक्षणे झाली.प्रश्नोत्तरे झाली -शंका समाधान झाले.
    जमीन मालकी हक्काने नसूनही हा समाधानी होता.त्याने सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून,तोशीश सहन करून,
    वृक्ष जगवले,वन फुलवले.सगळीकडे हिवराई फुलली.त्याने पूर्वोत्तर प्रदेशातून लोकांना आणून,त्यांना रोजगार मिळवून दिला.
    मणिपूर,भूतान,अरुणाचल कडून मुले आली.आणि या मराठी वातावरणात आपली झाली.
    आपणपण असे करू शकतो.योग्य मार्गदर्शन हवे .इच्छा हवी,
    कुणी घेईल का असा ध्यास !
    सगळेकाही सरकार करेल ही वृत्ती आपण सोडून या मार्गाने जायला काय हरकत आहे -
    वाट खडतर असणार हे गृहीतच आहे इतके मनात ठेवलेकी पुढच्या गोष्टी जड जात नाहीत.

    ReplyDelete
  7. संजयजी - माझ्या काळजाला घर पाडणाऱ्या प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली पण अजूनही लोक भटके जीवन जगतात, मुलभूत शिक्षण, आरोग्य अश्या सुविधा नाहीत ही लाजिरवाणी परिस्थिती आहे. भांडवलशाही ही सर्वांना समान संधी उपलब्ध करून देते असा एक सिद्धांत आहे. आणि ह्या धनगर आणि भटक्या विमुक्त, पारधी अश्या समाजाचे जीवन पहिले की लक्ष्यत येते की ह्या "ट्रिकल डाऊन" थियरी मध्ये काहीतरी मिसिंग आहे. ह्या पालावरची लहान मुले आणि सिग्नल पाशी भिक मागणारी मुले बघितली की कोहम अतिशय विकल आणि दुखी होतो.
    ह्या लोकांसाठी एकाधि मोठी ४००-५०० एकर जमीन/गायराने शासनाकडून घेऊन, मेंढ्या, लोकर, मास, गायी, अंडी, कोंबड्या उत्पादनाचे को-ऑपरेटीव्ह सुरु करता येणार नाही का? उसाचे सहकारी कारखाने आणि त्यांना कितीतरी अनुदाने मिळाली, मिळतात, तर धनगर, पारधी अश्या सारख्या गरजू समाजांना पण मदत होईल. अर्थात ह्या संस्था चालवणे हा काही जोक नाही, आणि तिथे पण सत्ता स्पर्धा, पैसे खाणे असले प्रकार कसे टाळायचे हा पण मोठा प्रश्न आहे.
    - कोहम

    ReplyDelete
  8. सोनवणीजी, धन्यवाद!

    सोनवणीजी, तुम्ही फार महत्त्वाच्या मुद्याला हात घातला आहे. या विषयावर लिहिण्याचे धाडस कोणीही करीत नाही. तुम्ही ते केले. पूर्वी प्रत्येक गावात आठ ते दहा गायराने होती. ही गायराने म्हणजेच चराऊ कुरणे. मात्र, स्वातंत्र्यानंतर या गायरानांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. मुख्यत: दलितांनी ही अतिक्रमणे केली आहेत. त्यामळे कुरणांवरील अतिक्रमणांचा मुद्दा संवेदनशील बनलेला आहे. या अतिक्रमणांना राज्य सरकारचेच अभय आहे. अतिक्रमित गायरानांचे पट्टे दलितांच्या नावे करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खास कायदाच केला आहे. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी आपण हा मुद्दा लावून धरावा, असे सूचवावेसे वाटते.

    कळवण परिसरातील सुमारे ५० गायरानांवर आज अतिक्रमित शेती उभी आहे.

    रामभाऊ जगदिश्वरकर, कळवण.

    ReplyDelete
  9. येवढेच नव्हे तर मेंढपाळांची जनगनना सुद्धा केली नाय शासनाने आमची चराऊ कुरणे त्याब्यात घेतल्यावर आंम्हाला शेतक-यांच्या बांधाला जाने भाग पाडले या नालायक सरकारणे इतकेच नव्हेतर रस्त्याने जानार्या मेंढपाळांच्या मेंढ्या पळवुन नेल्या जातात पोलिसांत तक्रार द्यायला गेल्यावर पोलीस सुद्धा दखल घेत नाहित.
    मेंढपाळांच्या मेंढरांना शासकीय औशध ऊपचार नाहित रोग प्रतीबंधक लसीकरण नाही आणी असल्यास आमच्या पर्यंत पोचत नाहित.
    आनंद कोकरे एक मेंढपाळ

    ReplyDelete
  10. संजयजी ,
    आपल्या लिखाणाचा मी नेहमी शक्यतो नियमितपणे आढावा घेत असतो.
    आपण एका सामाजिक बांधिलकीतून प्रेरणा घेऊन जमेल तशी टिपण्णी करत असता .
    मला मांडावेसे वाटले ते काही मुद्दे उदधृत करत आहे.नवीन भाषेत म्हणजे शेयर करत आहे !
    १.भाषा शुद्धतेबद्दल आपण आग्रहाने लिहावे असे वाटते.त्याला कारण असे आहे की मराठी आपली मातृभाषा असली तरी आजकाल बरीच मुले इंग्रजी
    माध्यमातून शिकतात.मी बरेच वेळा असे निरीक्षण केले आहे की त्यांचे मराठी लिखाण आणि बोलणे अतिशय सुमार दर्जाचे असते.
    मराठीतला प्रत्येक शब्द , त्याचे शुद्ध रूप आणि त्याचा अर्थपूर्ण अचूक वापर याची जबाबदारी त्या मुलांना कळत नाही .त्याचे महत्व त्यांना सांगणे फार गरजेचे आहे.
    मराठीपासून दूर जाण्याची हि वृत्ती नैसर्गिक नाही.रोजच्या वापरातून मराठीचे अवमूल्यन ही काळाचीही गरज नाही.

    , "सॉरी हं ,मला नीट मराठी बोलता येत नाही - यु नो माझे शिक्षण कॉनवेन्ट मध्ये झाले - यु नो." असे मराठी सिनेमातील नायिका
    म्हणतात ते हास्यास्पद वाटते. अनैसर्गिक वाटते. ठेच लागली की "आई ग "असे उद्गार येणे स्वाभाविक आहे.
    दुसरीकडे त्या मुलांचे इंग्रजी वाचन सुद्धा अपुरे आणि रुचीहीन असते.ज्याला अभिजात इंग्रजी म्हणतात ते त्यांच्या कानावरून
    गेलेले नसल्यामुळे त्याची आवड पण निर्माण होत नाही. ज्याला slang म्हणतात अशी बोली बोलायची पद्धत चोखाळल्यामुळे
    इतर श्रद्धांबाबत सुद्धा तितकाच उत्साह असतो.अशा लोकांना खरा इतिहास किती भावत असेल हा प्रश्नच आहे ! याला काही अपवाद असू शकतात .
    अशा लोकांना अफझलखान हा सर्व धर्म समभाव बाळगणारा होता असे नव्या क्रमिक पुस्तकाने सांगितले तरी "ओ.के."म्हणून हि मंडळी त्यावर पडदा टाकतील .
    "त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही" हा संस्काराचा अभाव दर्शवणारा भाग फार वेदना देणारा असतो. हा विषय भाषा, राष्ट्र , आणि राष्ट्रीय अस्मिता या वाटेने जातो .

    २.आपण एक मुद्दा जर समजून घेतलात तर बरे होईल.
    एक मतप्रवाह असा आहे की या जातीनिहाय आरक्षणाच्या राजकारणामुळे जवळजवळ ५०% " हिंदू " जनतेचेच कल्याण झाले आहे.
    म्हणजे हे राष्ट्र हिंदूंचेच असून ते एकप्रकारे अक्कल हुशारीने हिंदूंचेच हितरक्षण करत असते.- मग पक्ष कोणताही असो !
    कोन्ग्रेस असो किंवा भा.ज.प.किंवा समाजवादी !
    आरक्षण होते ते पण हिंदू , देणारे हिंदू आणि घेणारेपण हिंदूच !
    ३. आरक्षणाला घटनेनेच "तात्पुरती व्यवस्था " असे स्टेटस दिले आहे का ? ही व्यवस्था संपण्याची मर्यादा आणि त्याचे भान आम जनतेला आहे का ?
    ही व्यवस्था संपवणे हे आपले नैतिक आणि सामाजिक कर्तव्य नाही का ?आंतर राष्ट्रीय स्तरावर असे आरक्षण नसते
    तर मग त्याची सवय राष्ट्रीय स्तरावर का लावायची ?
    ऑलिम्पिक स्तरावर जातीनिहाय पदकांसाठी वेगळे आरक्षित निकष लावण्याची मागणी करणे हे जसे " आंतर राष्ट्रीय " बिनडोकपणाचे ठरेल तसेच हे खरेतर देशांतर्गत आरक्षणाचे पण आहे
    हा पांगुळगाडा अधिकाधिक लोकांना मिळवून देण्यासाठी राजकीय धडपड करण्यात कृतकृत्यता मानणे हे लज्जास्पद नाही का ?
    ४. असे सांगितले जाते की लोकमान्य टिळकांनी एक वर्ष व्यायाम आणि तब्येतीसाठी खर्च केले.त्याच उद्देशाने तुम्ही मुलांसाठी आरोग्य आणि बलोपासना यावर लिहावे.
    आजच्या युगात गेल्या काही वर्षात धूम्रपानाच्या प्रमाणात बरीच घट झाली आहे. बलोपासना आणि त्या जोडीला सकस विचार आणि ज्ञानोपासना यांचे महत्व शिकवणारे विचार आपण मांडावेत अशी विनंती आहे. ही गाडी ब्रह्मचर्य अस्तेय या मार्गाने नेऊ नये ही नम्र विनंती.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...