Saturday, March 9, 2013

भाषा हे वर्चस्ववादाचे एक साधन!


भाषा हे वर्चस्ववादाचे नेहमीच जगभरचे एक साधन राहिलेले आहे. संस्कृत ही भाषा अर्वाचीन व कृत्रीम रित्या बनवली गेली असुनही तिला साक्षात "देववाणी" चा अनादि दर्जा दिला गेला. वेद तर ईश्वराचे नि:श्वास बनले. जे जे संस्कृतात पारंगत तेच काय ते विद्वान व प्राकृतात पुरातन काळापासून जनव्यवहार करणारे ते हलके, दुय्यम अशी विभागणी केली गेली. स्त्री-पुरुष भेदाचाही जन्म संस्कृत साहित्याने घातला. उदा. सर्व संस्कृत म्हणवणा-या नाटकांतील स्त्रीपात्रे प्राकृतातुनच बोलतात...मग ती स्वर्गीची उर्वशी असो कि एखादी महाराणी का असेना! संस्कृत संवाद फक्त कथित उच्चभ्रु पुरुषांना! खरे तर याचा मुलार्थ वेगळा होता पण संस्कृत भाषेचा वापर समाज विभागण्यासाठी निरलसपणे केला गेला. स्त्री-पुरुष भेदभावासाठीही तिचा वापर केला गेला. वैदिक धर्मियांना त्यांच्याच धर्माच्या स्त्रीयांबद्दलचा इतका आकस पुर्वी का होता हे कळत नाही.

संस्कृत भाषेने प्राकृत भाषकांच्या मनात अखंडित न्युनगंड निर्माण करायचे अखंड कार्य केले. "संस्कृत देवांनी केली मग प्राकृत काय चोरांपासून झाली?" असे एकनाथांनी दरडावून विचारले असले तरी त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. वैदिक धर्मियांनी संस्कृतचाही उपयोग एका हत्याराप्रमाणे केला. संस्कृत ही प्राकृतोद्भव उत्तरकालीन भाषा असुनही उलट प्राकृत भाषाच संस्कृतोद्भवच आहेत असे एवढे बिंबवले गेले आहे कि त्या भ्रमातून बाहेर निघणे आजही अनेकांना अवघड जाते.

दहाव्या शतकानंतर वैदिक धर्मीय पुनरुज्जीवनाच्या चळवळीच्या काळात (निबंध काळात) संस्कृत भाषा शिकण्याची हिंदुंवर बंदी आली आणि धार्मिकही गोंधळ घालणे सुरु झाले हे तर सर्वांना माहितच आहे...संस्कृत ही चक्क देववाणी बनली. तीही मग अपरिवर्तनीय अणि व्याकरणनिष्ठ बनल्याने लवकरच मृतप्राय भाषेत जमा झाली. मनुस्मृतीचे उलटपालट अर्थ लावत हिंदुंना शुद्र लेखत त्या भाषेच्या आसपासही फिरकू देणे बंद झाले. खरे तर या भाषेची निर्मिती हिंदु, बौद्ध, जैन व वैदिकांनीही संयुक्तपणे केलेली! पाणिनी वैदिक धर्मीय नव्हता पंण त्याने संस्कृतला व्याकरण दिले. संस्कृतचे स्वामित्वाधिकार मात्र नंतर बळकावल्यावर भाषेचे मातेरे होणे अपरिहार्य होते. कालिदास, शूद्रकासारखे हिंदू कवी-नाटककार नंतर संस्कृतात यामुळेच झाले नाहीत.

संस्कृत भाषा कृत्रीम असली, उत्तरकालीन असली तरी त्या भाषेचे निर्मिती अत्यंत शास्त्रशुद्धपणे केली गेलेली आहे यात शंका नाही. ते श्रेय अर्थात पाणिनीचे. त्याचे नादमाधुर्य अप्रतीमच आहे. परंतू कठोर व्याकरणाच्या नियमांत जखडली गेल्याने तिची प्रगती थांबत थांबत शेवटी ती जवळपास मृत भाषेच्या जवळ पोहोचली हे वास्तव नाकारता येत नाही.

पण आक्षेप असा आहे कि कोणत्याही भाषेने वर्गीय वर्चस्वाची भुमिका घ्यावी काय? वैदिक-अवैदिक या विभाजनात संस्कृत भाषा एक हत्यार म्हणुन वापरली गेली. इंडो-युरोपियन भाषा गट या नांवाखाली युरोपियनांनी तोच उद्योग केला आहे. पण इंग्रजांनी इंग्रजी भाषेचा वर्चस्वतावाद माजवला पण ती भाषा गैर-इंग्रजांना शिकायची बंदी घातली नाही. आधुनिक काळात इंग्रजीने लवचिकता स्विकारल्याने इतकी विविध रुपे धारण केली आहेत व फोफावत आहे कि त्यापुढे उद्या आपल्या भाषाही टिकाव धरतील कि नाही ही शंका आहे.

मराठीलाही आता व्याकरणात जखडण्याचे चंग बांधले जात आहेत. सत्वशीला सामंतांसारख्या विदुषि त्यात मोठा पुढाकार घेत असत. मराठी संस्कृतोद्भव भाषा आहे असे मानून संस्कृताच्याच व्याकरण नियमांत मराठी जखडली तर मराठीचेही संस्कृत व्हायला वेळ लागणार नाही हे बहुदा या विद्वानांच्या लक्षात येत नसावे. आज पुणेरी मराठी अन्य मराठी बोलींवर प्रभुत्व गाजवायचा प्रयत्न करत प्रादेशिक बोलींत लिहिणा-यांना आपसूक दुय्यम स्थान देत चालली आहे.

भाषिक न्युनगंड निर्माण करणे मानवी अस्तित्वावर घाला घातल्यासारखेच नव्हे काय? संस्कृत भाषेने जे कार्य पुर्वी पार पाडले तसेच आता मराठीने करावे अशी अपेक्षा ठेवत कोणी काम करत असेल तर त्याचा विरोध करायलाच हवा.

संस्कृत भाषा ही सिंधी/शौरसेनी/मागधी/द्राविड/माहाराष्ट्री प्राकृत अशा अनेक भाषांचे ग्रांथिक कारणांसाठी केलेले कृत्रीम प्रस्फुटन होते. परंतु अन्य भाषा संस्कृतोद्भव आहेत हा भ्रम भाषिक न्युनगंडाला कारण झाला नाही काय? जसे युरोपात ल्यटीनमद्ध्ये लिहिणाराच तेवढा विद्वान असा एक भ्रम होताच कि! पण ल्यटीन मृत पावली. खुद्द उच्चभ्रु इंग्रजांना इंग्रजीत बोलायची शरम वाटे. ते फ्रेंच भाषेत बोलत. परंतु इंग्रजी समाजाने भाषिक वर्चस्वतावाद हाणुन पाडला. आज ती जगाची संपर्कभाषा बनली ती केवळ राज्यकर्त्यांची भाषा होती म्हणुन नव्हे तर भाषेला लवचिकता दिली म्हणुन. आम्ही मात्र भाषेला उलट्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असू तर मग मराठीच्या भवितव्याबद्दल गळे काढण्यात अर्थ नाही.

14 comments:

  1. मराठीला धोका कोणापासून?
    आपल्या येथे आजपर्यंत मराठी भाषा ही संस्कृत प्रेमींच्या ताब्यात होती, ते ठरवतील तेच योग्य असे वातावरण होते. त्या लोकांचा मराठी भाषेला मनातून नेहमीच विरोध होता. त्यामुळेच त्यांनी कधीही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केला नाही, उलट कोणी तसा प्रयत्न केला तर त्याला विरोध केला. त्यामुळे अशा लोकांना मराठी भाषिक म्हणण्यापेक्षा संस्कृत भाषिक म्हणणे जास्त योग्य ठरेल. मराठीला धोका असल्याची आवई हे लोक नेहमी उठवत असतात, पण मराठीला इंग्रजी, हिंदी या भाषांपासून, परप्रांतीयांपासून अजिबात धोका नाही, तर या ओठात मराठी आणि पोटात संस्कृत असणा-या, तथाकथित प्रमाण भाषा आणि शुद्ध भाषा यांचा आग्रह धरणा-यांपासून आहे.

    ReplyDelete
  2. श्री संजय सोनावणी ,
    आपण मांडले विचार हे अशुद्ध आहेत .विचित्र आहेत आणि कलुषित आहेत
    आपल्या लेखनाचा आणि विचार करण्याचा दर्जा खालावत चालला आहे.
    आपणास काहीतरी विचित्र गंड आहे तो आपल्या लेखनात डोकावत असतो. आपला सर्व रोख ब्राह्मण वर्गावर असतो
    येनकेनप्रकारेण आपण वेद आणि ब्राह्मण यावर घसरत असता.
    आपल्या भोवताली असलेले श्री सांगलीकर यांच्या सारख्यांचे कोंडाळे तर विदुषकी वाटते .
    फक्त शब्दाला शब्द जोडून पल्लेदार लिखाण होत नसते .
    काळजी घ्या अभ्यास करून बोलत जा नाहीतर हसे होईल आपले !
    श्री रा रा महावीर सांगलीकर ,
    आपले विचार अत्यंत कलुषित आणि दुषित आहेत हे आपणास पण माहित असणारच !
    आपण इतके हिणकस कसे ? .
    आपण किती विकृत विचार करत असता याचे हे उत्तम द्योतक आहे.
    स्वतः म.फ़ुले आणि डॉ आंबेडकर यांचे लिखाण सुद्धा अगदी शुद्ध होते .
    तेसुद्धा नेहमी परफ़ेक्शनचा आग्रह धरत असत !.
    आपली विचार करण्याची धाटणी विचित्र आहे !
    श्री रा रा सांगलीकर यानी तर कहरच केला आहे . कोणता पुरावा आहे त्यांच्या कडे ?
    जे मनात येते ते लिहित सुटायचे , हे योग्य नाही ,
    श्री रा रा सांगलीकरांचे प्रत्येक वाक्य आचरट पणाचे वाटते .
    त्याना नेमके कोणते लेखक अभिप्रेत आहेत ? त्यांची नावे सोदाहरण त्यांनी मांडावीत
    डॉ आंबेडकर यांचे शुद्र पूर्वी कोण होते किंवा तत्सम वाग्मय वाचताना ( मराठी अनुवाद श्री चांगदेव भवानराव खैरमोडे )
    त्यांची मराठी व्याकरण आणि लेखन यांच्या शुद्धातेविषयीची कळकळ पाहून त्यांच्या विषयी असलेला आदर द्विगुणीत होतो.
    आपल्याकडे शुद्ध मराठी लेखनाची परंपरा प्रदीर्घ आहे . त्यात कादंबरी लेखनात वास्तव रेखाटण्यासाठी बोलीभाषेचा केलेला वापर हा समजू शकतो ,
    पण वैचारिक लेखनात व्याकरण शिस्त पाळणे अपरिहार्य आहे.
    सांगलीकर आपले मित्र असल्यामुळे माझ्या मताला आपण किती दाद द्याल हे सांगता येत नाही

    ReplyDelete
  3. संजय सोनावणी सर ,
    आपले या विषयावरचे लिखाण अजिबात न पटण्यासारखे आहे.
    संगीत असो वा नृत्य , प्रत्येक विषयात एक दर्जा आणि शुद्धता पाळावीच लागते,
    प्रत्येक विषयाला - लेखन प्रकाराला मांडणीची आणि रचनेची शिस्त असतेच.
    आपण आपले विचार स्वतःच्या खाजगी डायरीत लिहित असू तरी आपण त्यात एक शिस्त पाळतोच !
    ज्या वेळेस समाजापुढे आपण एखादी कृती ठेवतो त्या वेळेस त्यात शुद्धता असणे अनिवार्य आहे !
    इंग्रजीतील पिग्मेलीयान नाटक किंवा माय फेयर लेडी हा चित्रपट किंवा मराठीतील ती फुलराणी किंवा नटसम्राट
    या रचना काय सुचवतात ?त्यातील प्रत्येक वाक्य लाख मोलाचे आहे !
    माय फेयर लेडीतील रेक्स हारीसन किती शुद्ध इंग्रजीचा आग्रह धरत असतो
    आणि त्यातील भाषेतील गोडव्याच्या आणि उच्चारांच्या अचूकपणाबद्दल आग्रही असतो !
    नटसम्राट मध्ये तर नटसम्राट गणपतराव बेलवलकर आपल्या विठोबा नावाच्या नोकराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगतात -
    कोणत्या शब्दावर जोर द्यावा / तर - प्रत्येकावर देऊन पहा , जो मोडेल तो सोडायचा , जो टिकेल तो धरायचा ,
    थोडक्यात , शब्दफेक उच्चार आणि आवाजाचा चढ उतार याचा पण विचार करायचे शास्त्र आहे.ते जसे नाटकात तसेच इतर ठिकाणीही महत्वाचे ठरते आहे
    म्यानेजमेंट आणि इतर उच्च शिक्षणात सुद्धा तो एक विषय धरला जातो .
    त्यात व्याकरण आणि शुद्धलेखनाची शुचिर्भूतता हे महत्वाचे अंग म्हणून गणली जाते.
    उथळ पणाचा पुरस्कार हे क्षणभर लोकप्रियता आणि टाळ्या मिळवून देईल
    पण अंतिम सत्य वेगळेच आहे हे आपणास सांगण्याची आवश्यकता नाही - ते आपण जाणताच !

    त्यातच श्री सांगवीकर नावाचे कुणीतरी फार घाईघाईने आपल्या ब्लोग वर प्रतिक्रिया देत असतात ,
    सखोलपणे पहाता त्यांच्या एकाही वाक्यात सुसंगतता नसते किंवा अर्थही नसतो,पण उथळपणा मात्र फारच स्वैरपणे असतो !
    शब्दांचे अवडंबर तर हमखास असते .- शब्द बंबाळ पणा असतो - त्याने प्रतिक्रिया हास्यास्पद होत जाते !

    असे लोक स्वतःला थोडासा आवर जर घालतील आणि विचारपूर्वक लिहितील तर आपल्या ब्लोग ची वाचनीयता वाढेल हे निर्विवाद !
    नाहीतर आपला ब्लोग हा उथळ पाण्याला येणारा खळखळाट ठरेल ! नव्हे तो तसा झालाच आहे !
    तीच गोष्ट आपल्या फेसबुक च्या लिखाणाला लागू आहे !
    अविनाश एकबोटे

    ReplyDelete
  4. श्री संजय सोनावणी ,
    आपण मांडलेले विचार हे अत्यंत अपरिपक्व आणि अशुद्ध आहेत .विचित्र आहेत आणि कलुषितहही आहेत
    आपल्या लेखनाचा आणि विचार करण्याचा दर्जा खालावत चालला आहे.
    आपणास काहीतरी विचित्र गंड आहे तो आपल्या लेखनात डोकावत असतो. अनेकवेळा आपला सर्व रोख ब्राह्मण वर्गावर असतो
    येनकेनप्रकारेण आपण वेद आणि ब्राह्मण यावर घसरत असता.
    आपल्या भोवताली असलेले श्री सांगलीकर यांच्या सारख्यांचे कोंडाळे तर विदुषकी वाटते .
    फक्त शब्दाला शब्द जोडून पल्लेदार लिखाण होत नसते .
    काळजी घ्या अभ्यास करून बोलत जा नाहीतर हसे होईल आपले !
    श्री रा रा महावीर सांगलीकर ,
    आपले विचार अत्यंत कलुषित आणि दुषित आहेत हे आपणास पण माहित असणारच !
    आपण इतके हिणकस कसे ? .
    आपण किती विकृत विचार करत असता याचे हे उत्तम द्योतक आहे.
    स्वतः म.फ़ुले आणि डॉ आंबेडकर यांचे लिखाण सुद्धा अगदी शुद्ध होते .
    तेसुद्धा नेहमी परफ़ेक्शनचा आग्रह धरत असत !.
    आपली विचार करण्याची धाटणी विचित्र आहे !
    श्री रा रा सांगलीकर यानी तर कहरच केला आहे . कोणता पुरावा आहे त्यांच्या कडे ?
    जे मनात येते ते लिहित सुटायचे , हे योग्य नाही ,
    श्री रा रा सांगलीकरांचे प्रत्येक वाक्य आचरट पणाचे वाटते .
    त्याना नेमके कोणते लेखक अभिप्रेत आहेत ? त्यांची नावे सोदाहरण त्यांनी मांडावीत
    डॉ आंबेडकर यांचे शुद्र पूर्वी कोण होते किंवा तत्सम वाग्मय वाचताना ( मराठी अनुवाद श्री चांगदेव भवानराव खैरमोडे )
    त्यांची मराठी व्याकरण आणि लेखन यांच्या शुद्धातेविषयीची कळकळ पाहून त्यांच्या विषयी असलेला आदर द्विगुणीत होतो.
    आपल्याकडे शुद्ध मराठी लेखनाची परंपरा प्रदीर्घ आहे . त्यात कादंबरी लेखनात वास्तव रेखाटण्यासाठी बोलीभाषेचा केलेला वापर हा समजू शकतो ,
    पण वैचारिक लेखनात व्याकरण शिस्त पाळणे अपरिहार्य आहे.
    सांगलीकर आपले मित्र असल्यामुळे माझ्या मताला आपण किती दाद द्याल हे सांगता येत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा बाप्पा आणि विपश्यना
      आप्पा - स्वरदाबाइनी तर कमालच केली असे दिसते आहे
      बाप्पा - अहो मला वाटते की हा सर्व खेळ चालला आहे !
      आप्पा - तेच लिखाण कॉपी मारून लिहीण्याची काय हौस आहे ?
      कॉपीची इतकी सवय ?
      बाप्पा - अहो हि बाई उद्या ज्ञानेश्वरीपण अशीच लिहील आणि सांगत सुटेल की मी लिहिली म्हणून ! एकनाथांच्या नंतर हिच्याच स्वप्नात आली म्हणेल माउली !
      आप्पा - चालायचेच ! विचार पटले आणि अनुमोदन द्यायचे असेल तर - फक्त तसे सांगावे - असो ,
      आत्ता या वेळेस इकडे कुठे निघालात ? काय ? - विपश्यना च्या चौकशीसाठी ?
      बाप्पा - मी त्या संजय सराना शोधायला निघालोय ,काल मला म्हणाले की परवा पुण्यात आहे म्हणे - मरकळला विपश्यना केंद्रात जाणार आहेत म्हणे !
      आत्ताच इथे कोर्नारला वळल्यासारखे वाटले म्हणून धावत आलो ,म्हटलं भेटून घ्यावे ! त्यांनापण विपश्यनेची महती सांगायची आहे !
      आप्पा -तुम्हाला सांगू का एक - आता त्याना विसरा - काही महिनेतरी !
      बाप्पा - अहो , त्याना मी विपश्यना करण्याचा सल्ला दिला आहे ! खूप चांगले आहेत हो ते , पण असे कसे वहावत जातात देव जाणे -
      सगळेच असे बोलू लागल्येत , तेंव्हा काल त्यांना सांगितले कि तुम्ही देव पण मानत नाही - नाहीतर तुम्हाला तोडगा सांगितला असता जालीम !
      मग असे करा - विपश्यना करा - बेस्ट ! एकदम बोलायचे नाही , हसायचे नाही -
      आप्पा - भारी आहे कि - बोलायच नाही म्हणजे - खोकल शिंकल तर ?
      बाप्पा - ते चालत रे , पण मनातले विचार बोलून दाखवायचे नाहीत , ते पण व्यसनच असत बघा ,मी पहिली विपश्यना केली त्यावेळेस पहिल्या दोन तासांनी अस्सा वैतागलो , की एक नंबरला गेलो आणि शिट्टी वाजवत बसलो - बर वाटलं बघ ,इतक्यात आला ना एक स्वामी - हाकलायला - आमची शिट्टी बंद !- रेडियो नाही , मोबाईल नाही ,भाषण नाही , वेद शैव वैष्णव - काहीही नाही !
      आप्पा - " आपलाची वाद आपणासी " असे म्हटलेच आहे ! मन फिरते फिरते आणि शांत होते !
      बाप्पा - बोलायचे नाही लिहायचे नाही ,ब्लोगवर तर म्हणे अजिबात लिहायचे नाही - एकदम संजय सरांची आठवण झाली !
      आप्पा - अरे तू मी आणि संजय सर जर एकत्र विपश्यनेला बसलो तर काय धमाल येईल - नाही का ?
      बाप्पा - आपण तिथल्या अंगणात काडीने जमिनीवर खुणा करत ३ मुक्यांसारखे भांडत राहू ,
      आप्पा - नाहीरे तिथे फारशी आहे , खडू नाही , रांगोळी नाही , फक्त आपण आणि आपणच !
      बाप्पा - चाल , खरच जाऊ या की , बघू तर काय ते !


      Delete
  5. बाप्पा - काय रे आप्पा , मला एक सांग ,आज विशेष काय ?
    आप्पा - महाशिवरात्र !
    बाप्पा - अजून ?
    आप्पा - लागोपाठ संजय सरांचे लेख वाचायला मिळताहेत !
    बाप्पा - पर्वणीच की हि मोठ्ठी ! पण एक गोष्ट राहून राहून खटकते बघा !
    आप्पा - चुकीचे लिहितात आणि त्याला होयबा म्हणणारेही वाढत चालले आहेत -
    बाप्पा - इंदिरा गांधीच्या काळात असेच होत गेले ,एकापेक्षा एक महान लेखक तुरुंगात ,लेखक पत्रकार , सर्व इलाइट वर्ग आत तुरुंगात -
    आणि यशवंतराव , आणि कंपनी आणीबाणीचे समर्थन करत्ये ! -
    आप्पा - पण त्याचा इथे काय रेफ़रन्स ?
    बाप्पा - अरे खर सांगू का , संजय सर हल्ली वहावत चालले आहेत ! अभ्यासूपणा संपला आणि लोकप्रियता वाढत चालली की हा धोका असतोच रे प्रत्येकाला !
    आप्पा - पूर्वी कितीजण आपले विचार मांडत असत इथे - आता एकदम शुकशुकाट असतो बघ - मोजके लोक लिहितात !
    बाप्पा - तेच तेच विषय - आणि तीच तीच पद्धत - त्यांचे आणि उच्च वर्गाचे काहीतरी मागच्या जन्मीचे भांडण असावेसे वाटते - नाही का ?
    आप्पा - आत्ता तुला समजले बघ !मंडईत मटार महागला - ? पाण्याचा प्रश्न गंभीर ? भारतीय टीम हरली ? एक्स्प्रेस वेवर अपघात वाढले ?
    बाप्पा - सर्वाला हे ब्राह्मण जबाबदार ना ? पेशव्यांची चूक ? टिळक आगरकर जबाबदार ?
    आप्पा - अगदी इतक जरी नसेल तरी त्यांचे विचार हल्ली तसेच होत चालले आहेत !
    कावीळ झालेल्या माणसाला जसे सगळे जग पिवळे दिसते तसे याना सगळ्या दोषाणा ब्राह्मणच जबाबदार वाटू लागले आहेत .
    बाप्पा - मी समज म्हणालो की संस्कृत हि अतिशय शुद्ध भाषा आहे तर ?
    आप्पा - वाट लागेल - संस्कृत हि कृत्रिम भाषा आहे - कालिदास किंवा भ्रर्तृहरी किंवा भवभूती ने ती वापरली नाटकांसाठी असे हे म्हणतात ,
    बाप्पा - मग तो गटे डोक्यावर घेऊन नाचला ते रे काय ? तो का नाचला ? काय - ते पण सर्व ब्राह्मणांनी रचलेले थोतांड आहे ? अहो रूपं अहो ध्वनिम ! ?
    आप्पा - जाऊ दे रे - एकंदरीत हा प्रकार विचित्र चालला आहे ,हे कधी सुधारणार नाहीत ! एकतर हे शैव वैष्णव करत बसतात किंवा शिवाजी पासून ब्राह्मणांनी कसे राजकारण करत पानिपतात सगळ्यांना आपल्या बरोबर बुडवले ते सांगत पार टिळक रानडे सगळ्यांना झोडपत सुटणार ! गाडी गोडसे पर्यंत आली कि यांचा आत्मा थंड होतो !
    बाप्पा - आणि हे जे काय सिंधू संस्कृती वगैरे बडबडत बसतात ते तर इतके हास्यास्पद असते की यांचे नेहमीचे वाचक पण यांची फजिती उडवतात !
    आप्पा - पण हे असे का करतात ?
    बाप्पा - अर्धवट ज्ञान वाईट असते त्या पेक्षा अशिक्षित बरा म्हणतात ते हे असे !
    आप्पा - आपण च बावळट याना हुशार समजून यांचे लिखाण वाचत बसत होतो , अगदीच हास्यास्पद निघाले - मडके अगदीच कच्चे निघाले कि रे ज्ञानदेवा ! !
    बाप्पा - आणि तो सांगलीकर ? तो असा काय लिहितो ? बेसिक पण अभ्यास नाही रे करत हि लोक - उचलली जीभ लावली टाळ्याला !
    आप्पा - कठीण आहे रे बाप्पा -

    ReplyDelete
  6. मी नेहमीप्रमाणेच तुम्हा सर्वांच्या मतांचा आदर करतो. संस्कृतला नव्हे तर गटे शाकुंतलला डोक्यावर घेऊन नाचला होता. त्याने शाकुंतलचा जर्मन अनुवाद वाचला होता. कालिदास श्रेष्ठ दर्जाचा महाकवि होता यात शंका नाही. भाषा व्याकरणांच्या नियमांनी किती जखडलेली असावी याबाबत नेहमीच चर्चा झडत असतात. भाषाशुद्धतेबद्दल बोलायचे तर नेमकी कोणत्या काळातील मराठी शुद्ध मानायची? ज्ञानेश्वरांची मराठी कि तुकोबाकालीन मराठी? अठराव्या शतकातील मराठी कि विसाव्या शतकातील मराठी? ह. ना. आपटेंची मराठी कि जी.एं.ची मराठी? भाषा प्रवाहित राहिली आहे व रहावी म्हणुन तिला व्याकरणाच्या कठोर नियमांत बांधु नये. बदलत्या काळाच्या संवेदना टिपायला भाषेचे बदलते राहणे अपरिहार्य आहे. नाहीतर नवीच स्ल्यंग जन्माला येईल आणि मराठी निघून जाईल. मराठी मातृभाषिकांना मराठीपेक्षा इंग्रजी शिकणे सोपे जाते असा नुकताच एक अहवाल आहे. कारण मराठीचे व्याकरण किचकट आहे.

    संस्कृतचा वापर समाज विघटनासाठी झाला व श्रेष्ठत्वतावादासाठी झाला हे नाकारणे हे आजच्या विचारी म्हणवणारे लोकही आपल्या पुर्वग्रहांना कसे चिकटुन बसलेले असतात याचेच दर्शन घडवत नाही काय? वास्तवांकडे खुल्या मनाने पहावे एवढेच. विट्झेलचे Tracing the Vedic Dialects अवश्य वाचावे. त्यातही संस्कृत आणि प्राकृताचा संबंध माता-पुत्र असा नसून त्याउलट कसा आहे हे सिद्ध केलेले आहे. ट्रंपने ऋग्वेदिक संस्कृतचे मुळ सिंधी प्राक्रुतात सिद्ध केलेले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. i have read your article on "bhasha- varchasvavadache sadhan" and all comments.dattatraya agashe has pointed the right thing.....it is well accepted that only change is eternal.any language should be flexible enough to accomodate many more words to remain as language of people.it is also bitter truth that puneri marathi has dominated other regions' marathi. but at the same time it should be in mind that all 'bolibhasha 'are there to convey our message to others with 'sulabhikaran' so it is clear that all 'boli' types could not be a language of writing broadly.....the question about time based superiority of language hdid and would not have any stand because u can't compare two different articles with same notions. Grammar of language is also a flexible thing, so one can't put it into some "............. " your thoughts reflects the saturation level u reached ....it is easy to any "vichari vyakti" to gain strong likes and dislikes, so this is the time to introspect the layers of unidirectionality. we expect correct and logical information from u so that we would come to know the various awspects of an act or thoughts....finally a humble request to u that don't ignore our suggestions as by some elites to kumar ketkar on being a pseudo spokesperson when he was an editor of a famous and unbiased newspaper.... hope there would be a good article on some delicate issues recently thank u ..........

      Delete
  7. प्रयत्ने मराठीचे कान पिळता संस्कृतही जळे ! चालायचेच. "ज्योतिबाच्या" नावानं चांगभलं !

    ReplyDelete
  8. "संस्कृतचा वापर समाज विघटनासाठी झाला व श्रेष्ठत्वतावादासाठी झाला" हे वास्तव नाकारण्यात काही अर्थ नाही. संस्कृत हि त्याच्या अर्थाप्रमाणे 'संस्कारित' भाषा आहे, त्याचे मुळ प्राकृत भाषेमध्ये आहे. संस्कृत भाषा हि अलंकारिक असूनही व्याकरणीय क्लिष्टते मुळे तिची प्रगती थांबलीय हे सोनवणी यांनी अचूक मांडलेय. हीच व्याकरणीय क्लिष्टता जर मराठीवर लादली गेली तर तिची अवस्था हि संस्कृत भाषेप्रमाणे होईल. भाषा जिवंत आणि प्रवाही राहण्यासाठी तिची व्यापकता, समावेशिपणा वाढला पहिजे. जर इतर बोलीभाषांतील शब्द मराठीत आले तर तिचा प्रवाहीपणा वाढेल. व्याकरणीय क्लिष्टता कमी करून तिची लवचिकता वाढली पहिजे. आज पुणेरी मराठीच्या प्रभावामुळे इतर बोलीभाषात न्यूनगंड वाढला हे हि तेवढेच खरे आहे. प्र. नरेंद्र जाधव म्हणाले कि "याच न्यूनगंडामुळे" ते शालेय जीवनात अबोल होते. आज मराठीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी इतर बोलीभाषाची मदत हविय. आपल्या मराठीचे वेगळेपण आपण निर्माण करु. जर नागपुरी, अहिराणी, मालवणी इ. या भाषांतील वैशिष्ट, वाक्यरचना मराठीत सामावली गेली तर भाषा प्रवाही होइल. भाषेला व्याकरणाची जोड हवी, पाहिजेच, पण ती क्लिष्ट नसावी, प्रवाहीपणा जपणारी हवि. परत संजय सोनवणी यांचे आभर.

    ReplyDelete
  9. गाढवाच लग्न हे त्याच स्टाईल मध्ये लिहिले पाहिजे ,
    तुंबाडचे खोत तसेच लिहिले पाहिजे
    वऱ्हाड निघालाय लंडनला तसेच सादर केले पाहिजे
    वसंत सबनीस असोत किंवा प्रा देशपांडे - त्यात त्यांनी मुद्दाम पुणेरीपणा टाळला कारण ?
    वग हा वगाच्याच भाषेत लिहिला गेला पाहिजे - अगदी ब्राह्मणाने लिहिला तरी -
    पोवाडा हा त्याच भाषेत लागतो ,सदाशिव पेठी भाषा तिथे चालणार नाही , पण बांधणीतील शिस्त त्यालापण आहेच !
    भूपाळी असो,लावणी असो,वा पोवाडा प्रत्येकाला एक वेगळा बाज आहेच पण व्याकरण सोडून चालले ,
    वृत्त सोडून बहकले कि पाय घसरणारच हे निर्विवाद !आणि हसेपण १०० टक्के होणार

    " कोसला " क्रांतिकारक का आहे ? तर कादंबरीची तथाकथित सगळी शिस्त मोडीत काढत ती लेखणी चालली आहे !
    म्हणून तर ती सार्थपणे युगप्रवर्तक मानली जाते.

    भालचंद्र नेमाडे असोत किंवा विश्वास पाटील,किंवा
    लक्ष्मण माने असोत वा बहिणाबाई ,
    जसे गाण्यात लता आशा , गीता दत्त ,शमशाद अशा अनेक छटा , संगीतात भजन , कव्वाली ,टप्पा ,ठुमरी ,
    तसेच लेखनात प्रत्येकाचा बाज वेगळा ,आणि क्लासिकल मध्ये जशी घराणी तसेच लेखनात पण ! कालानुरूप बदल आहेतच - असणारच !
    बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे . आत्मा आहे .
    पण एकदम व्याकरण विरहित शब्दांची मांडणी हा पोरकट विचार आहे !
    वेदांमध्ये किती मोजके छंद वापरले आहेत ?
    नंतर त्यांचीच संख्या वाढत वाढत आज किती वृत्ते आणि छंद झाले ?

    एकदम रामदास तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ हि उदाहरणे घेण्यात काय सुचवायचे आहे ?
    ते तर मोरोपंत नाहीत - ते संत जास्त आणि पंत कमी - पण त्यांनीही लेखनाची मर्यादा ओलांडली नाही -
    केशवसूत -गोविन्दाग्रजानीही आणि विडंबन काव्य करताना प्रा. प्र क़े. अत्रे (केशवकुमार ) यांनी सुद्धा !
    मुक्त छंद हा उत्तम काव्य प्रकार आहे - मंगेश पाडगावकर ,कुसुमाग्रज पासून ग्रेस -अरुणा ढेरे , संदीप खरे यांनी तो समर्थपणे पेलला आहे !
    पण त्यात पण एक रिदम आहेच पौज आणि ह्रस्व आणि दीर्घ वाक्य रचना घेण्याची कसोटी आहेच .
    रसस्वाद निर्मितीची मुल्ये आपण नाकारूच शकत नाही मग ते मराठी असो वा इंग्रजी !

    ReplyDelete
  10. SANJAY SONAWANE SAHEB

    KADHI KADHI ASE WATATE KI SANGLIKAR/BRIGEDI/P.KHEDEKAR

    YA PRAMANE APAN SUDDHA JATIYA HOT AHAT. PARANTU SURWA SAMANYA

    JANTEWAR APAN KARIT ASLELYA LIKHANACHA FARSA PARINAM DISUN

    YET NAHI.NUSATI TIKA ANI LEKHAN YANI KAHI HONAR NAHI TYA SATHI

    LOKANA KAHI KARYAKRAM DYAWA LAGATO.NANASAHEB DHARMADHIKARI

    SARAKHYA LOKANI NA BOLATA JASE PRACHAND KAAM KELE TASE KARAWE

    LAGTE. MALA EK GOSHT ITHE NAMUD KARAWISI WATATE KI JEWHADA

    BRAHMAN DWESH PASARAWALA JAT AHE TYA PRAMANAT BRAHMANANCHI

    LOKPRIYATA PRACHAND PRAMANAT WADHAT AHE.

    SHEWATI EK LAKSHAT THEWA "YOU CAN HATE US OR YOU CAN LOVE US"

    YOU CANNOT NEGLET US.

    ReplyDelete
  11. भाषेचा वर्चस्ववाद सांगितला कि त्याला ब्राह्मणद्वेष म्हनायचे हे विचित्र आहे. आत्मचिंतन करत जावे एवढेच सुचवू शकतो. मुस्लिम राज्यकर्ते आले तर त्यांनी फार्सीचा वर्चस्ववाद आनला नव्हता काय? संस्कृत तेच कार्य करत आली आहे. ती भाषा चांगली आहे हे मी म्हटलेच आहे व तिचा अस्त का झाला याचेही कारण सांगितले आहे. मराठीलाही असेच मारुन टाकायचे असेल तर कोण अडवणार? दुसरे, येथे कोणेही कितीही माझ्यावर टीका केली तरी टोपननांवाने अथवा अज्ञात म्हणुन टिप्पण्णी करण्याएवढा वा कोणाला करायला लावण्याएवढ उथळ मी नक्कीच नाही. टीकेचे मी नेहमीच स्वागत करतो आणि वेळ मिळाला तर अवश्य उत्तर देत असतो. अनेक लोकांना सत्याचे वावडे असत. आपले स्थान आणि महत्ता यांना धक्का लागत नाही तोवर त्यांना सारे प्रिय वाटु शकते...पण त्याविरुद्ध घडले कि चवताळतात...हा मानवी स्वभाव आहे, त्याला इलाज नाही. वैदिक धर्म स्वतंत्र आहे हे मी आज सांगत नाहीहे. अवैदिकांचा जर वैदिक धर्माशी संबंधच नसेल तर वैदिक पुजारी कशाला हवेत हा प्रश्न कसा चुकीचा वाटतो? ख्रिस्त्याचे लग्न मौलवी लावतात कि काय? यात कसला आलाय द्वेष? साधे व्यवहारज्ञान आहे हे. ते सांगण्याचा कोणा वर्णाच्या द्वेषाशी काय संबंध?

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...