Saturday, April 27, 2013

सामाजिक लायकी वाढवण्यासाठी.....


भारतीय मानसिकतेला लागलेली सर्वात मोठे कीड म्हणजे भेकडपणा. खोटी आत्मप्रतिष्ठा. खोट्या गौरवगाथांचा उदो उदो. आपल्यांच्याबाबत वर्चस्वतावाद आणि दुस-यांसमोर शेपुट घालणे. पण बाहेरचे आले लिंग उभारुन कि सर्वांनीच आपली शेपुट ...त घालणे. आपापसात कट्टर इस्लामवादी, बहुजनवादी, हिंदुत्ववादी, ख्रिस्तीवादी, आंबेडकरवादी, वैदिकवादी ईईई आपापली झडुन गेलेली नखे परजत आपसी संघर्षाला हमेशा तयार असतात. पण हे सारे लोक पौरुषहीण आहेत हे त्यांनी वारंवार सिद्ध केले असले तरी ते "तसे" आहेत हे त्यांना कोण सांगणार? बव्हंशी मुस्लिमांना पाक जवळचा वाटतो तर ख्रिस्त्यांना पोप. कम्युनिस्टांना चीन जवळचा वाटतो तर नवभाडवलशाहीवाद्यांना अमेरिका...उद्या भारतीय बुद्धीस्टांना चीन-जपान वगैरे जवळचे वाटले तर नवल वाटुन घ्यायचे काही कारण नाही. तसेही माओवादी समर्थक  विपुलतेने हयात आहेतच...आणि दुर्दैवाने ते बहुतेक जातीघटकांत आहेत. प्रत्येक आपापल्या जातीतील माओवाद्यांना समर्थन देण्याचा कसोशीने कसा प्रयत्न करतो हे आपण अलीकडे पाहिलेच आहे!

माझा प्रश्न कोणी कोणता वाद जपावा या स्वातंत्र्याबाबत नसून राष्ट्रीय प्रेरणा या सर्वोपरी आहेत कि प्राधान्यक्रमात शेवटच्या आहेत याबद्दल आहे. या देशाची भुमी...क्रमश: गिळंकृत होत आहे. होता होता घरदारेही गिळली जातील. याला कदाचित अजून हजार वर्ष लागतील पण ते कधीच होनार नाही असे नाही.  तसेही हिंदुत्ववादी या देशाचा गौरवशाली इतिहास किमान २५००० हजार वर्ष एवढा पुरातन आहे हे सांगतातच. त्यांचे आधार त्यांनाच माहित. पण या देशाचा इतिहास हा पराजयांचा इतिहास आहे हे लक्षात का घेतले जात नाही? विजिगिषु वृत्तीचा अभाव हेच तर कारण नाही ना?

हिंदुत्ववादी जगापेक्षा ख्रिस्ती जग...इस्लामी जग आणि बुद्धीष्ट जग हे अधिक व्यापक आहे हे या महामुढ हिंदुत्ववाद्यांना कधीच समजले नाही किंवा त्यांना तसे वास्तव माहितही नाही. त्यांना त्याची कधी गरजही पडत नाही...सारे काही वेदांत होते ना? बस्स!

हा सारा सर्वांचाच भेकडपना आहे. जीवन ओवाळुन टाकण्यासाठी जी मानसिकता लागते ती आपल्याकडे नाही हे आपल्याला कधीही समजणार नाही. मला खात्री आहे...स्वस्तात मिळते म्हणुन वैर्यांच्याही वस्तु घेणारे कमी नाहीत.

येथे बसून सीमांची काळजी होत नसते. स्वत:ला वेळ द्यावा लागतो. सीमावर्ती प्रदेशांतील लोकांना सांस्कृतीक जिव्हाळा द्यावा लागतो. शत्रू राष्ट्रांतही मित्र बनवावे लागतात. त्यांची संस्कृती आणि विचार समजावून घ्यावे लागतात.

येथे बसून जय श्रीराम, जय भीम, जय मल्हार, जय जिजाउ ईईई करणा-यांना हे समजले पाहिजे कि तुमच्या जय म्हणण्याला जग यत्किंचितही किंमत देत नाही.

कारण तुमची तेवढीही लायकी नाही!

सामाजिक लायकी वाढवण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. अंगात दमही लागतो. भ्रामक कवचांत जगणा-यांना जगाचा उन्हाळा सोसवत नसेल तर त्या राष्ट्राचे भवितव्य तरी काय असनार आहे?
बदलायला हवे!

7 comments:

 1. काय हे सोनवणी सर! तुमच्याकडून अशा असभ्य लेखनाची अपेक्षा नव्हती. चांगल्या शब्दांत विकृत विचार मांडणे ही या महान देशाची परंपरा आहे. तिला अशी एकदम तिलांजली देऊन कसे चालेल बरे? कठोर शब्दांत चांगले विचार मांडले तर आमच्या अस्मिता दुखावतील ना! जर हे राष्ट्र जळून खाक झाले तर आम्ही गोऱ्यांच्या देशांत जाऊन त्यांचे तळवे चाटत [म्हणजेच अनुनय करत] आमच्या अस्मिता टिकवून ठेवूच.
  शिवाय "राष्ट्र", "राष्ट्रीय", "राष्ट्रीयत्व" इत्यादी शब्द वापरण्याचे सर्वाधिकार तुमच्याकडे आहेतच कुठे मुळी? ते अधिकार ज्यांच्याकडे आहेत त्यांना राष्ट्राची चिंता करूद्यात. आपल्यासारख्या लोकांनी सर्वांना सामावून घेणाऱ्या अतिसंकुचित अस्मितेची चिंता केलेली बरी नाही का?

  ReplyDelete
 2. Mr. Sonwani,
  Unnecessarily you are giving reference of Vedas here. If Buddhist and Islamic worlds are wider in scope than Hindu world, then why there is no peace in the Islamic and Buddhist world. Accept the failure of Bahujan Politics in last some decades especially in Maharashtra. Bahujans must introspect themselves for this failure instead of blaming Brahmins. Moreover you were one who like other Bahujan intellectuals opposing Nationalism once blaming it is RSS ideology.

  ReplyDelete
  Replies
  1. In think you are grossly mistaken. The people those do not stop singing false glories of the past are one who have corrupted Hindu mind set. Buddhist, Islamic and Christian worlds are wider because they are powerful over this country, why to think of their internal collisions? It doesn't help us anyway.

   I agree with you bahujaniy movement already dead...so there is none to introspect. Those who have been singing same Brahmin hatred tune are thrown back to the place where they deserve. RSS nationalism is an idea that has little sense in practice. However, Nation is first and then other disputes....! What made you think RSS ideology of Nation is only correct and others wouldn't have their own ideology about the nation? We should be sensible enough when to broach topics those always will be discused and fought over...but for that Nation should survive...

   Anyway...thanks for commenting.

   Delete
 3. अगदी बरोबर बोललात सर. पण मुळात ह्या देशात जो काही चुकीचा धर्मनिरपेक्षवाद चालवला आहे आणि त्याच्या नावाखाली सत्ता मिळवण्यासाठी ज्या प्रकारची जाती पातीत कॉंग्रेसने फुट चालवाली त्यावर कोणी बोलत नाही. ब्राह्मण्यात्वाला दोष देण्या आईवाजी फक्त ब्राह्मण समाजाला दोष दोष दिला जातोय आणि सगळे संधी मिळाली कि तसेच वागता आहेत. कुठल्याहि संस्थेमध्ये पुढील ५० वर्षांसाठी आपल्याला काही करायचे आणि ह्याचा फायदा पुढील पिढीला झाला पाहिजेल ह्याकडे कोणाचेच लक्ष नाहीये. पण फार खरे लिहिले आहेत तुम्ही. सगळ्या युरोप आणि अमेरिकेमध्ये आह्मी ख्रिश्चन आहोत आणि आमच्या राज्यात जे येतील त्यांना आमच्या कायद्याप्रमाणे राहावे लागते हे ठासून सांगितले जाते. नियम म्हणजे नियम. कोणाचाही आवाज रात्री १० नंतर घराबाहेर जाता कामा नये. आपल्यासारखे नाही. आधी मशिदीला परवानगी देणार कारण मते हवीत. मग काकड आरतीला. पुण्यात गणेश मिरवणुकीसाठी नियम तोडून परवानगी देणार. मग भावना दुखावल्या जातात. काय वाटेल तो गोंधळ घालायचा आणि म्हणजे देव प्रसन्न होणार. ह्यापेक्षा नियम पाळून प्रगती करायची ते नाही. फक्त भावनिक मुद्दे पुढे करायचे. इतिहास पण असाच. सगळ्या भाकडकथा आणि आह्मी कथा कादंबर्या खऱ्या मानून त्यात आमचे पूर्वज यंव होते आणि त्यंव होते म्हणणार. मग कोणीही येवून टप्पल मारून गेला तरी जोपर्यंत आपल्याला बसत नाही तोपर्यंत गप्पा बसणार. दुसर्याकडून आपल्या नको असलेल्याच काटा काढला जातो आहेना मग बस पण ह्याचे दूरगामी परिणाम काय आहेत त्याची फिकीर नाही. ह्यात फार काही बदल होइल असे वाटत नाही. इंज्राजांनी त्यांच्यासाठी कारकुनी शिक्षण देणे सुरु केले पण ते उडाले पण सध्या ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते त्यावर कोणी भाष्य करत नाहीये. मग हे असेच चालू राहणार. जो तो फक्त आपलेच बघण्यात मश्गुल आहे. पण त्यात त्यांचा काय दोष व्यवस्थाच अशी आहे. कायदे रग्गड आहेत पण राबविणार कोण. लोकप्रतिनिधींना खरोखर दूरदृष्टी आहे का? आपल्याला मिळालेला मन हा खरा त्या पदाचा आहे पण लोक तो आपलाच समजत आहेत. मग व्यक्तिपूजा आणि काहीही करून सत्ताकारण चालू. हे बंद झाले तर थोडीफार प्रगती होईल नाहीतर पुन्हा कोणीतरी, कदाचित चीन आपल्यावर राज्य करेल. मग चीनी भाषा शिकण्यात धन्यता मानणे आले.

  ReplyDelete
 4. आजकाल राष्ट्राविषयी कुणालाही प्रेमच राहिलेले नाही. ज्यांना आहे ते शक्तीहीन आहेत. ज्यांच्याकडे ताकत आहे त्यांचे राष्ट्रप्रेम हे बेगडी आहे. फक्त टोळी जमवण्यासाठी वापर केले जाणारे. तर आपला देश हा अशा शक्तिहीन/कणाहीन राष्ट्राभिमानी नागरिकांचा देश राहिलेला आहे.
  हे सर्व का होत आहे तर सगळ्यात दोष जो जातो तो आपली शिक्षण पद्धती आहे त्याकडे. ज्या प्रकारचे शिक्षण आज दिले जाते त्यावरून असे वाटते कि पुढच्या ५-१० वर्षात किती वाईट परिस्थिती असेल.
  मी कुठे तरी वाचल्याचे स्मरते कि बाबासाहेबांनी सर्वांसाठी काही वर्ष लष्करी शिक्षण अनिवार्य करावे असे म्हटले आहे जेणे करून जे नागरिक तयार होतील ते राष्ट्राभिमानी असतील.
  आपल्याकडे खरा दोष हा आहे कि आपल्याकडे लोकांच्या अंगीभूत असणाऱ्या कौशल्याचा वापर न करता फक्त त्यांच्या दोषावर बोट ठेउन त्यांना स्वत: च्या ताटाखालचे मांजर करून राबवले जाते. जे काम मला जमते ते न करु देता कमी कौशल्याचे काम दिले जाते.
  असे सर्वच क्षेत्रात होत आहे. राजकारणही त्याला अपवाद नाहीये. जे लोक आजकाल राजकारणात आहेत ते राजकारण आवडते, देशाविषयी प्रेम आहे म्हणून नाही तर पैसा मिळतो म्हणून. जर राजकारण आणि अर्थकारण वेगळे करण्यात आपण यशस्वी झालो तर कदाचित खरे राष्ट्रप्रेमी लोक राजकारणात येतील आणि कदाचित परिस्थितीमध्ये बदल होईल.
  लोकशाहीत खरेतर वेगवेगळे प्रवाह असणार हे गृहीतच धरलेले असते.त्या प्रवाहामुळेच लोकशाही जिवंत असते. पण त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे दबावगटही असतात. पण आपल्याकडे एक तर अश्या प्रकारच्या दबाव गटाना एकतर संपवले आहे किंवा मिंधे तरी केले आहे.त्यामुळे फक्त डबके राहिले आहे (प्रवाह नाही).
  ज्यावेळेस एखादी नदी मरणसन्न अवस्थेत असते पण ज्यावेळेस आपण तिचे सर्व प्रवाह मोकळे करतो, स्वच्छ करतो. त्यानंतर ती नदी पुन: प्रवाहित होते. तसेच आपल्याला आता लोकशाहीचेहि प्रवाह मोकळे करण्याची वेळ आलेली आहे.

  ReplyDelete
 5. प्रिय चैतन्य ,

  आणि प्रिय पांढरे ,

  आपले विचार काही प्रमाणात अस्वस्थ करतात - म्हणून हे चार शब्द गोड मानून घ्यावेत हि विनंती

  आपण तळमळीने लिहिता ,

  एक प्रयोग करा ,

  आणि तुम्ही तर तो केलाच पाहिजे म्हणून मुद्दाम लिहित आहे


  संजय सोनावणी हे केवळ परिस्थितीमुळे ब्राह्मण विरोध सोडून , स्वतःला निधर्मी म्हणवत आहेत - ती त्यांची तात्पुरती सोयीची भूमिका असावी असे वाटते -


  त्यांचे खरे विचार प्रचंड ब्राह्मण द्वेषावर आधारलेले आहेत

  त्यांना एकसारखे वेद आणि आर्य यावर चर्चा करायला आवडते -आणि सारांश म्हणून आत्ताच्या ब्राह्मणांना हिणवायला आवडते -परंतु वाघ्या कुत्र्याच्या प्रकरणामुळे त्यांच्यात फूट पडली .संजय ची अवस्था न घरका ना घाटका अशी झाली -


  दुसरी गोष्ट आपण काही वर्षासाठी भारताबाहेर राहून आलेले वाटता - फक्त नोकरी व्यवसायानिमित्त - तात्पुरते -

  इंग्लंड आणि अमेरिकेतील आठवणीमुळे आपण भारताच्या जीवन पद्धतीबद्दल साशंकीत होता

  आम्हीपण जवळजवळ दोन पिढ्या अमेरिकेत रहात आहोत - आम्हाला आता भारताबद्दल काहीच आत्मियता वाटत नाही - कशी वाटणार ?आमच्या वडलांनी इथे सर्व आयुष्य जातपात विसरून सर्व थरातील समाजाला शिकवण्याचे पुण्य कर्म करत घालवले आणि त्यांना काय फळ मिळाले ? त्यांनी कधी अपेक्षा केली नाही ,

  पण

  गांधीहत्येनंतर सर्व घरदार जाळले गेले

  कसे कुणी ते जगजाहीर आहे ,

  तरी वडिलांनी कधीही त्यांना दूर लोटले नाही ,

  आम्ही आमची घरे जळताना लहानपणी पाहिली आहेत - आज आमचे वय सत्तरीच्या पुढचे आहे !मी नंतर प्रथम एकोणीसशे पंचाहत्तर पासून अमेरिकेत आणि नंतर कानडा ला आणि परत आता अमेरिकेत आहे -आता मुले आणि नातवंडे स्व कर्तृत्वावर इंग्लंड अमेरिकेत आहेत -

  मी स्वताःला कधी कधी प्रश्न विचारतो की माझे किंवा मुलांचे चुकले का ?- माझे मन म्हणते की आम्ही फार अवघड निर्णय घेतला -आमची इच्छा परत येण्याची होती पण मुलांशी भावनिक आणि तात्विक वाद घातल्यावर त्यांचे म्हणणे पटले -मी सहा सात वर्षाचा असताना माझे घर धडाधडा जळताना मी पाहिले आहे - कुणी पेटवले आणि का ?- उत्तर नाही !आज इतकी वर्षे आम्ही तिकडे आहोत - पण कधीही कसलाही त्रास नाही - वायोवृद्धाना तर नाहीच -आणि इथे माझे इतर मित्र ? काय अवस्थेत आहेत ?

  आमची गरज काय होती आणि ती साधी होती - आम्हाला प्रामाणिक शांत आयुष्य जगायचे होते - आमच्या मातृभूमीत येउन - पण आमच्या बरोबरच्या आणि इकडे परतलेल्या मित्रांकडून जे ऐकले ते फारच निराशाजनक होते आणि आहे -

  असे का ? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला कधीच मिळाले नाही - चालता ही - हे काही उत्तर नाही - आणि मन फार निराश होते -

  सुधाकर

  ReplyDelete
 6. सुधाकारजी
  आपण म्हणता कि मी प्रयोग करावा पण कोणता ते स्पष्ट केले नाही. गांधी हत्येनंतर आपल्यावर झालेल्या अत्याचाराचे खरेच मला अतीव दु:ख आहे. पण असे प्रत्येक वेळेस घडलेले आहे. फाळणी, गांधी हत्या ( म. गांधी आणि इं. गांधी ), बाबरी मस्जिद, गोध्राकांड इ. या प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त सामान्य माणुसच यात भरडला जातो. का ? याचे उत्तर म्हणजे त्यावेळेस असनाऱ्या शासनाने त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही हे आहे.
  संजय सोनवणी हे ब्राम्हणद्वेषने पछाडून नव्हे तर ब्राम्हन्याविरुध्ध लिहितात माझी माहिती प्रमाणे. पण तुम्हाला त्यात फक्त ब्राम्हणद्वेष दिसत असेल तर काय करणार.

  ReplyDelete