Saturday, April 27, 2013

असेही असते एक राष्ट्र...!






राष्ट्रांच्या व्याख्येपारही
असते एक राष्ट्र
जे मनात नसले
ध्यानात नसले
जगण्यात नसले
तरीही असते एक राष्ट्र...

वागवत असते ते खुणा
व्यभिचारी लांडग्यांच्या
बलात्कारी पाऊलखुणा
ओरबाडल्या गेलेल्या
शरीराच्या जखमा
स्वत:च सोसत...
अंधारी मनांतून उफाळनारे
सूस्त आणि शांत उद्रेक
सुन्नपणे ऐकत...
वेदना गिळत
निमुटपणे
असेही असते एक राष्ट्र...

ते राष्ट्र मानली जाते मालकी
कोणा-ना-कोण्या वाद्याची
कधी हिंदुत्ववाद्यांची तर कधी
निरपेक्षतावाद्यांची
कधी अल्ला हो अकबरवाल्यांची
तर कधी कम्युनिस्टांची
कधी या वाद्यांच्या तर कधी त्या वाद्यांच्या
मालकीच्या अविरत गोंधळात
हरवलेले
आणि आपल्याच पुत्रांकडुन बलात्कारीत
नितनियमाने होणारे
असेही असते एक राष्ट्र...

हे राष्ट्र कोणत्याही व्याख्येत कसे बसेल?
हे राष्ट्र "राष्ट्रवाद्यां"च्या
इवल्या संकुचित डबक्यात
कसे मावेल?

राष्ट्राला विचाराल कधी...
तुझे देणे फेडणे
आहे तरी
बाकी किती?

असेही राष्ट्र असते एक
जिला प्रजा नांवाची गोष्टच नसते...
प्रजेशिवायचे राष्ट्र
अशीच तर व्याख्या जर आमची तर
राष्ट्र एकाकी
राष्ट्र एकाकी...!

असेही आहे एक राष्ट्र...
एकाकी आणि फक्त एकाकी...
जेथे आम्ही
बिनभाड्याचे अनंत काळ राहतोय

आणि तेही केवढ्या
निर्लज्जपणे बरे?



4 comments:

  1. सर

    अनंतचतुर्दशी नंतर दुसऱ्या दिवशी समुद्र जसा सगळ्या शाडूच्या मूर्ती किनाऱ्या वर विखरून टाकतो

    आणि आपले मन विषण्ण होते ,

    तसे आपली कविता वाचून मन गलबलले !

    अफाट लिहिली आहे ,

    ReplyDelete
  2. भावनांचा उद्रेक मन हेलावून टाकतो

    अशी कविता काळजाचा टवका उडवते

    खलिल जीब्रान ची आठवण झाली

    ReplyDelete
  3. कविता छान आहे. मला कधी कधी वाटते आपली प्रगती झाली म्हणजे काय झाले नक्की ? तसेही आजही आपण टोळ्यांमध्ये जगतो आहोत. फक्त त्याला आपण बहुजनवादी, हिंदुत्ववादी इ. गोंडस नावाने ओळखतो. या सर्व आधुनिक टोळ्याच आहेत.खरेच आता या राष्ट्राला एका अश्या नेत्याची गरज आहे. कि जो राष्ट्र प्रथम म्हणेल.

    ReplyDelete
    Replies
    1. I am first Indian and last also Indian- Dr. B.R. Ambedkar

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...