Tuesday, October 29, 2013

दिवस फार वाईट आले आहेत.....!


पोरी
तो कुटुंबवत्सल
भला बापही असेल
जो देईल लेकीची माया
किंवा
तो
तुझ्या राखीला लायक
असा
भाऊही असेल
तो
तुझे हृद्गत समजावुन घेणारा
जसा कृष्ण द्रौपदीला
तसा सखाही असेल
किंवा
तो
ज्यांच्याशी बालकासम
क्रीडा
करावी वाटेल
असा सानुला लाडुला सवंगडीही असेल...
किंवा सर्वस्व अर्पण करावे
असा तो तुझ्या स्वप्नातला
राजकुमारही असेल!

पण गे माझ्या लाडक्या पोरी
आज शक्यताय
कि "तो" कोणीही
लिंगपिसाट
तुझ्या
आत्म्याचा खुन करणारा
वैरीही असू असेल...

पोरी...
काही सांगायला म्हणुन
कोणाहीकडे जाऊ नकोस....
तुझा धपापता भावनोत्कट उर
तुझ्यापुरताच  ठेव....
एकाकी

दिवस फार वाईट आले आहेत.....!

25 comments:

  1. bhedak samajik vastav mandnari kavita

    ReplyDelete
  2. संजय सर ,

    अत्यंत अर्थपूर्ण आणि अंतर्मुख करणारी कविता वाटली

    पहिल्या तीन कडव्यानंतर ओघवतेपणे येणारे ते भयानक शब्द अगदी शब्दशः अंगावर येतात आणि कवितेत किती सामार्त्य असते - ते समजते -

    कवितेच्या चार ओळी कधीकधी संपूर्ण पुस्तकापेक्षाही परिणाम साधून जातात !

    धन्यवाद !

    ReplyDelete
  3. संजय सर ,

    फ,मु शिंदे यांनी परवाच्या एका लेखात विनोदी अंगाने लिहिले जाणारे वाग्मय लगेच परिणामकारक पणे आपला हेतू साध्य करते असे काहीतरी म्हटले आहे -

    कवितेचेपण तसेच आके -

    कमीत कमी जागेत कमीतकमी वेळात विचार पोचवते - -

    अतिशय उच्च मांडणी तिला अजून प्रमाणित करण्याची किंवा शब्दांचा अर्थ सांगत बसायची गरज गरज नसते

    आणि कमीतकमी शब्दात अनंत मनाना गवसणी घालायची किमया आपल्या लेखणीत आहे हे आपण सिद्ध केले आहे

    परत एकदा !

    सुनीता

    ReplyDelete
  4. संजय सर

    शब्दांची मांडणी आणि त्यांचे प्रतीत होणारे अर्थ यामुळे कविता एका वेगळ्या उंचीवर गेली आहे

    आपल्या नीटस कवितेबद्दल आपले मनः पूर्वक अभिनंदन !

    आपली या लेखन पद्धतीवर किती मजबूत पकड आहे ते सिद्ध होते !


    आजवर कधी आपल्या लिखाणाबद्दल लिहायची वेळ आली नाही

    इतरांच्या शिव्या खायची आणि अर्थाचा अनर्थ होण्यातच वेळ वाया गेला !

    आपल्या या कवितेने मन थरारून आणि हेलावून गेले


    आमच्या सारख्या तरुणाईला यातून बरेच शिकता येईल !

    आपण याचा अंतर्भाव आपल्या कविता संग्रहात करून तो प्रसिद्ध करा !

    ReplyDelete
  5. अतिशय गंभीर विषयावर काव्यातून आपल्या भावना मांडणे फार अवघड काम आहे

    ते आपण यशस्वी पेलली आहे त्याबद्दल अभिनंदन !

    अनेक वर्षांनी असे वाचायला मिळाले

    ReplyDelete
  6. अविनाश नेमाडे सरांनी दतात्रेय आगाशे सरांच्या आगाऊ चुका दाखवून सागर भंडारी यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल अतिशय जिव्हाळ्याने मी आपले गूढ मानतो -असेच धार्मिक द्वैत आणि अद्वैत राखत एक दिवस काश्मीर आणि गरिबी असे दोन्ही प्रश्न सुटतील आणि समस्त देव पांडूरंगाच्या नावाने जयजयकार करतील

    त्यावेळेस पिश्पक विमानातून सर्वांवर अंत्य दर्शनाची वृष्टी होईल असा हवामानाचा अंदाज आहे त्यामुळे यंदा दिवाळीनंतर कांदे स्वस्त होणार आहेत म्हणून

    ReplyDelete
  7. M .D RAMTECHE- YANCHYA BLOG WARIL LATEST ARTICAL WACHA.

    MHANAJE KALEL KI SWTALA HUSHAR MHANWANARE LOK

    KASE WASNAN-NDH HOT CHALLE AHET .

    ARTICAL CHE NAW " MI LAXMI MANTRA NAKARALA"

    ReplyDelete
    Replies
    1. आपण सांगितलेली एम डी रामटेके ब्लोग वरची माहिती वाचली

      पूर्वीची आठवण झाली आणि आठवलेल्या गोष्टी शेयर करते आहे

      पोलीसला आम्ही सांगत असू

      पोलिसमामा रामराम

      -तुमच आमच काय काम - पोलिसमामा हसायचा

      थोड मोठ्ठ झाल्यावर आपण वर्णन केली आहेत तशी पत्रे -

      या मंत्राच्या ११ प्रती करून आपल्या नातेवाइकाना पाठवा नाहीतर xxx देवीचा कोप होईल

      नंतर संतोषी माता आणि आता सिद्ध केलेली चक्रे आणि त्यांची पूजा !

      लहानपणी छापील गोष्टीवर विश्वास चटकन बसतो - तीच खरी चिंतेची बाब असते !


      लहानपणाचे वय छान असते - त्यावेळेस सगळेच खरे वाटते - कोणताही ज्येष्ठ माणूस जे सांगेल ते खरेच वाटते मग तो आपला नातेवाइक असो किंवा शेजारी - तो काल विश्वासाचा होता

      पण संजय सरांनी सार्थपणे आजच्या विकृतींची धोक्याची घनता त्यांच्या कवितेत वाजवालि आहे

      ती फारच महत्वाची आहे -

      Delete
  8. संजय सर

    आपण मानवतेचे पंख लावून ही जी विचारांच्या अथांग आकाशात

    चिंतनाची उत्तुंग भरारी घेतली आहे ती पाहून जगण्यावरच विश्वास वाढू लागतो


    चारही दिशाना वाढत चाललेला असुरक्षीततेचा अंधार

    आणि चारही बाजूनी फैलावलेला विषय विकारांचा उन्माद हा मनाची विषण्णता वाढवणाराच ठरतो आहे - पण अशा अवस्थेत भेदरलेल्या जीवाना आपले चार शब्द आश्वासक वाटू लागतात -

    आपण केलेली सावध पानाची सुचना किती अबोध जीवाना समजेल ?


    माता भगिनींना त्यातील आर्तता मात्र नक्कीच जबाबदारीची जाणीव करून देईल


    आपले या कवितेबद्दल मनापासून अभिनंदन !

    ReplyDelete
  9. m.d ramteche ha manus bhayanak wikrut ahe..Ha manus swtala

    Ambedkari mhanawto. ANDHA-SHRADDHE wirodhi lekh lihitana,

    lekhacya shewati yane lihile ahe ' " 'ki mi tya mulila mhantale

    ki tu ek ratra mazya kade rahilis tar ,mi tula duppat paise dein."

    Aj ashi wruddh manase suddha betal zali ahet.

    Amachya ambedkari chalwalitil ase kide wechun baher takle pahijet.

    ReplyDelete
  10. वाटे इथून जावे

    तुझ्यापुढे निजावे

    नेत्री तुझ्या हसावे

    चित्ती तुझ्या ठसावे


    घे जन्म तू फिरुनी

    येईन मीही पोटी

    होती धरून देवा

    ही एक आस मोठी


    प्रेमस्वरूप आई



    किंवा आपण संजय सर ,आज लिहिलेली कविता आणि त्यात रेखाटलेले सत्य यामुळे सर्वांचे भावनाविश्व

    किती विस्कटून गेले आहे त्याचा अनुभव येतो आणि मन विषण्ण होते

    किती जणांच्या डोळ्यात आज अश्रू उभे राहिले असणार ते आपण कल्पनाही करू शकणार नाही -

    फारच निर्व्याज रचना झाली आहे -


    पूर्वी नुसते घरच नाही तर घराच्या चाव्या सुद्धा शेजाऱ्या कडे ठेवणे हे आपोआप घडायचे पण आज विश्वासघात आणि विषयांधता यामुळे सगळीकडे हलकल्लोळ माजला आहे

    याचे मूळ कशात आहे ?

    प्रत्येकाला काहीतरी कमी पडत आहे - नुसते पैसे नाही - पैसे पुर्वीपण नसायचे -पण न तोडता येणारे संस्काराचे बंध आणि आईची आठवण आणि घराचे प्रेम माणसातला माणूस जिवंत ठेवत असे -आई आणि घरामुळे माणूस स्वप्ने पहात होता


    आज काम करणारे रिक्षावाले काका आणि डबे गोळा करणारे डबेवाले असे लोक अजूनही असेच प्रेमळ आणि विश्वासू आहेत ! त्यांच्यामुळे आपले जीवन किती सुरक्षित आहे ते मनात येते -

    आणि आशेचा किरण दिसू लागतो -आपण नुसतेच संस्कृतीच्या असतो - पण हे लोक जीवन जगतात आणि संस्कृती जिवंत ठेवतात


    पण मग हे इतके वाईट एकाएकी का घडू लागले ?

    कुणी म्हणत की पुर्वीपण असे अभद्र घडताच होते - फक्त त्याला वाचा फुटत नव्हती आता चव्हाट्यावर मांडले जाते -म्हणजे हा तर किती भयानक भूतकाळ होऊ शकतो ?

    डोके गरगरायला लागते -

    एकीकडे आपण चित्रपटगृहात भावा बहिणीच्या प्रेमाचे सीन बघत अश्रू ढाळत असतो आणि त्याच शहरात असे अभद्र आणि ओंगळ विचार करणारे हिंडत -असतात - उरल्या नाहीत हेच -खरे - आता देवाकडे राहताना हिशोब असतो - मागणे आणि गणित असते - देवाला नुसता नमस्कार आता केला तर ढकलून देतो आणि मागचे लोक ओरडू लागतात - मागणी पण भव्य पाहिजे - तुमची दुःख सुद्धा ५ स्टार पाहिजे आणि तुमचा नवस पण ५ स्टार लेव्हलचा !

    ReplyDelete
  11. पक्षी आकाशात हिंडतात ,मासे पाण्यात पोहतात ,आणि जनावरे जमिनीवर सरपटतात - चालतात !

    त्यातलेच एक जनावर म्हणजे आपण!- पक्षांचे आणि माशांचे नियम असतीलच !

    आपण नियम तयार केले - तुझ ते माझ असं म्हणणाऱ्याना लांब ठेवण्यासाठी !

    दुर्बलाला या नियमांची गरज असते -दुष्ट सबळ मनगटावर आपले नियम बनवायला जातो

    आणि सुरु होतो संघर्ष - नीती अनीतीचा -सत्य असत्याचा -


    देवाण घेवाण सुरळीत व्हावी म्हणून चलन आणि चलनाचे जसे नियम तसेच

    आपल्या भावनांचा धीण्डवडा निघू नये, आपण मानलेली आणि काळाने सिद्ध केलेली निसर्गाची नाती जपली जावी म्हणून जे यम नियम आणि संयम त्यालाच संस्कृती म्हणायचे का ?


    आणि ती सर्वांनी पाळायची - पण या सुसंस्कृतपणाची कसोटी लागते अगदी आणीबाणीच्या वेळी - ती कसोटी उत्तीर्ण होणे न होणे हे खरोखर फार मोट्ठे दिव्यच असते

    त्याला आधार लागतो ,आपल्या माणसांचा आपल्या घराचा ,आपल्या देवांचा ,आपल्या सणांचा , आपल्या गाण्यांचा -क्षण तास दिवस महिने आणि वर्ष असा आपला प्रवास या सणांच्या आणि संस्कारांच्या आधारे होत असतो -

    पण काही दुर्भाग्यपूर्ण जीवाना हा सोहळा वाट्यालाच येत नाही -

    आणि असे हे उघडे वाघडे विषय वासनांचे तांडव सुरु होते -

    ते निश्चित थांबवता येईल - सुजाण लोक हे टाळू शकतील !

    संजय सरांनी अत्यंत उत्कट प्रतिभेने आपले म्हणणे शब्दांचा कुंचला वापरत सर्वांसमोर ठेवले आहे

    अभिनंदन आणि प्रणाम !

    ReplyDelete
  12. Very beautiful poem. Stark reality.

    ReplyDelete
  13. भा रा तांबे , बालकवी केशवसुत आणि अलीकडचे पाडगावकर

    यांच्या सारख्यांपुढे या सोनावणी चे लेखन म्हणजे अतिशय फालतू वाटते

    सर्वाना तांबे पाडगावकर जशी प्रतिभा आणि मांडणीचे कौशल्य जमतेच असे नाही -

    आजकालचे त्यामानाने अगदी उजवे कवी म्हणजे शांता शेळके , इंदिरा संत !

    पण यांच्यापासून हे काहीच शिकले नाहीत -

    स्वयम्भुपनाच्या नावाखाली उद्धटपणा आणि मनमानी करण्याची वृत्ती आणि त्यालाच स्वच्छंदी कविवृत्ती म्हणवून स्वतःच स्वतः ची पाठ थोपटत बसायचे हे हास्यास्पद ठरते - अशी स्तुती करणारी कोंडाळी अवती भवति असणारच -


    पण यापेक्षाही अजून काहीतरी आणि कितीतरी राहून गेले आहे असे वाटते - नेमके काय ते सांगता येत नाही

    पण आशयात कमतरता आहेच आणि रचनेत पण दोष स्पष्ट दिसतात

    विषयाला हात घातलाच नाही आणि लांबून लांबून नुसती शब्दांची खेळी झाली असे वाटते

    त्यापेक्षा गद्यात लिहिले असते तर जास्त समजायला सोपे झाले असते

    पण दुर्दैव ,

    या सोनावणी ला आपण म्हणजे कुणीतरी थोर कविवर्य झालो आहोत

    असे वाटून ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात , आधी ब्राह्मण द्वेषाची कावीळ आहेच त्यात हे नवे पिवळेपण - काय होणार याचे ?


    प्रसन्न

    ReplyDelete
  14. सर्व या कवितेचे विरोधी आणि चाहत्यांना धन्यवाद. शुभ दिपावली.

    ReplyDelete
  15. कविता आवडली.
    बाईला उपभोगने मर्दाचं काम हाय.
    आन प्रस्ताव मांडनं संविधानिक अधिकार हाय.

    ReplyDelete
  16. शिवाजी महाराजांनी परस्त्रीला आईसमान वागणूक दिली पाहिजे असा आग्रह धरत

    मराठी मनावर संस्कार केले - आपली मने घडवली

    कल्याणाच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देवून परत पाठवली आणि ज्या ब्राह्मणाने तिला कैद केले होते त्यांची कान उघडणी केली - तिथे उच्चनीच भेद केला नाही आणि उच्च वर्णाची तमा बाळगली नाही

    रामटेके आडनावात राम आहे पण वागण्यात राम तर बहोत दुरकी बात है -रावण सुद्धा नाही -

    आणि रावान्पण रामाइतकाच सुसंस्कृत होता -

    रावणाने निदान सीतेला शेवट पर्यंत हात लावला नाही -तिच्या इच्छे विरुद्ध !

    पण रामटेके हा राक्षस पण नाही - माणूस तर नाहीच ! त्याचे पूजनीय त्याची दैवते कोण असतील ?

    डॉ आंबेडकर ?- शक्यच नाही - ते असे कधीच सांगणार नाहीत

    म फुले - शक्यच नाही - ते अत्यंत सुसंस्कृत होते

    मग या राम टेकेवर संस्कार कुणी केले ?-

    कोणताही किंवा कोणतीही सुजाण बाई असे सांगणार नाही

    रामसेतू ची आई काय विचार करत असेल ?-आपण आपल्या मुलाला असे नव्हते शिकवले -!

    हा असा कसा निपजला ? याचा बाप तर किती साधा सरळ आहे - मग हा असा कसा ?

    कुणाच पोर आहे हे - ?

    जत्रेत याच्या जन्माच्या आधी नऊ महिने त्या दिवशी आपल्याला दिवे गेले त्यावेळेस अंधारात

    कोण भेटलं - कोण भिडलं ?अरे देवा ! घात झाला !हे तर संवैधानिक काम नाही झाल ! आणि

    मर्दाच पण नाही ! हा दगा झाला ! ! अरे देवा ! म्हणूनच हा असा बोलतोय ! पापाच पाप वाढवला मी - अरेरे - घात झाला - कोण असेल तो ? याचा खरा ?- हिंदू - बौद्ध - का मुसलमान ? नाही ते सर्व असे वागले नसते !- बहुतेक बारामतीचेच असणार कुणीतरी ! नक्कीच -

    ReplyDelete
  17. संजय सर ,

    आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती स्वातंत्र्य देत आहात ? आपण संमेलनाचे अध्यक्ष झाला असतात तर हे सहन केले असते का ?आपण त्यांची मेल लगेच नष्ट करावी आणि खरमरीत उत्तर द्यावे ! हि विनंती -

    रामटेके यांची खरडपट्टी काढणारी जी कोण असेल तिचे मनापासून अभिनंदन !

    थोडेसे शब्द त्यांच्यासारखेच वापरलेले दिसतात - पण जशास तसे हा न्याय पाहिला तर चांगलेच उत्तर दिले आहे

    संजय सरांनी इतके उत्तम विचार मांडले असताना या बावळट माणसाला इतके टोकाचे विचार कसे सुचतात ? आणि संजय सर ते मांडू कसे देतात ?

    यात सगळ्यांचाच अपमान होतो -

    त्या अभोध बालिकेचा जिच्या नावे हि कविता लिहिली आहे ,आणि तिची काळजी व्यक्त करणार्या असंख्य ब्लोग वाचकांचा पण हा अवमान आहे !

    धिक्कार असो ! !

    मुक्ता आचरेकर

    ReplyDelete
  18. स्वातंत्र्य म्हणजे स्वैर पणा नव्हे - रामटेके - तुमच्या मुलीच्या बाबतीत काही विपरीत घडले तर आपण असेच लिहित बसाल का ?

    संजय नि व्यक्त केलेली काळजी योग्य आहे -

    नाहीतर कवितेचा अर्थच आम्हाला समाजाला नसेल - आणि आम्हीच वेडे ठरत असू

    बोला संजय सर - काय अर्थ आहे तुमच्या आणि रामटेके यांच्या लिहिण्याचा ?

    आमचे अज्ञान तरी दूर करा

    ReplyDelete
  19. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  20. सोनवणी आणि एम डी रामटेक यांनाच या कवितेचा अर्थ समजलेला असेल , कारण बरेच लोक उगीचच गळा काढून रडत आहेत ,

    पण एम डी चे लिखाण संजयने कौतुकाने सर्वांसमोर ठेवले आहे - म्हणजे आपल्या सर्वांचा पोपट झाला आणि आपणच यादे ठरतो से वाटू लागेल बहुतकरून सर्वाना - त्यामुळे आता संजय यांनी अर्थ सांगत एम डी यांच्या बोलान्याचापण महांपाना सांगावा

    वसंतराव पद्माकर संगनाल -

    परभणी

    ReplyDelete
  21. On the occasion ofestival Deepaavali and its a sad thing to write a thing which is totally humiliating to all the casts and religions

    I am sure , mr ramteke m d will not write such things in future .

    Sanjay Sir , You have done a brave job to write on such a difficult subject with controlled emotions

    Wishing everybody Happy Dipavali and Festive seasons

    Tariq Bagwan

    ReplyDelete
  22. मला आशा वाटते की एम डी रामटेके याना काहीतरी वेगळेच म्हणायचे असेल पण त्यांनी जरा झोप जास्त झाल्यामुळे किंवा रात्री जास्त झाल्यामुळे असे शब्द वापरले असतील

    आपण सर्वांनी त्याना क्षमा करणे या दिवाळीच्या शुभ क्षणांना शोभून दिसेल

    कधीकधी आपणच अत्यंत टाकाऊ माणसाला उगीचच महत्व देत जातो - तसेच या राम्तेकेचे आहे

    अत्यंत भंगार माणूस - त्याच्या जगण्यालाच काही अर्थ नाही म्हणून आपण हा विषय सोडून देणे

    जास्त योग्य - खरे तर हे काम सोनाआआवनि यांचे आहे ,पण आजकाल असे दिसते आहे कि त्यांनाच असे मुद्दे घेऊन सणासुदीला लोकाना अस्वस्थ करणे आवडते

    त्याचा खुलासा त्यांनी केला तर बरे होईल

    एकीकडे ते सर्वाना दीपावलीच्या शेभेच्छा पण देतात आणि रामटेके सारख्या विकृताचे विचारपण शेयर करतात हे विचित्र वाटते

    तनया गोपालचारी

    ReplyDelete
  23. दिवस खरोखरच फार वाईट आले आहेत. सध्या सोनवणीच्या ब्लॉगवरच्या प्रतिक्रिया पहिल्या तरी हे सहज लक्षात येईल.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...