Monday, December 9, 2013

अमानूष: एक थरार

माणुस वेडा असतो. तो कसलं तरी वेड घेतो आणि ते पुर्ण करायला धावतो. मी तर ठार वेडा. मी नुसती स्वप्न पहात नाही. स्वप्न पहातो आणि ती पुर्ण करण्याची शिकस्त करतो. "अमानुष: एक थरार" हा चित्रपट मी अशाच झपाटलेल्या वेडेपणातून पुर्ण केला. पैशांची कमतरता...नुकत्याच भयाण संकटातून बाहेर आलेलो...पुरता बदनाम झालेलो. पण खचणा-यांपैकी मी तरी नक्कीच नाही. आयुष्यच संकटांनी भरलेलं. थांबून कसं चालेल?

अमानुषची कथा मला सांगलीच्या जेलमद्धे सुचली. बाहेर आल्यावर मी पहिलं कोणतं काम केलं असेल तर ते म्हणजे पटकथा लिहिण्याचं. मूळ कथेला न्याय द्यायचा तर पैसा बराच लागणार होता आणि मी तर होतो कफल्लक. दुस-याकडे हात पसरण्याची स्थितीही नव्हती. मी शेवटी माझा फ्ल्यट गहान ठेवला...७ लाख रुपये उभे केले. या बजेतमद्धे चित्रपट करायचा तर मलाच ब-याच भुमिका निभवाव्या लागणार होत्या...आणि त्या मी निभावल्या. म्हणजे दिग्दर्शन, अभिनय, संगीतकार ते गायक...तरीही ७ लाखात मी फक्त शुटिंग पुर्ण करु शकत होतो...पोस्ट प्रोडक्शनला जवळपास तेवढेच पैसे लागणार होते. पण म्हटलो...नंतरचं नंतर बघु...पण शुटिंगच्या दरम्यानच माझे निर्मिती व्यवस्थापक राज उमरकर यांना काय रस वाटला कोणास ठाउक...ते भागीदार बनायला स्वत:हून पुढे आले...काम झाले. हा चित्रपट मी जेथे पावनेदोन महिने जेलमद्धे राहिलो तेथे...सांगलीत प्रथम रिलीज केला. हा चित्रपट तसा वेगळा...जेमतेम दोन आठवडे त्याने तेथे दम धरला...पण म्हटले ना...मी ठार वेडा माणूस आहे...

पण या चित्रपटाने मला दोन पैसे मिळवून दिले हेही खरे. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार!

असो.

हा चित्रपट फिरतो तो डा. विक्रम चौधरी या मृत्युवर संशोधन करणा-या शास्त्रज्ञाभोवती. तो अलीकडेच एका भिषण प्रसंगातून गेलेला. एका रिसोर्टमद्धे परिषदेसाठी जमलेल्या सर्वच शास्त्रज्ञांची निघृण हत्या होते. फिरायला गेला होता म्हणून हा एकमेव वाचलेला. त्याचे सावट (कि गतायुष्यातील काही घटनांचेही?) बाळगत हा राहतोय निर्जन भागातील एकाकी बंगल्यात...एकटाच...संशोधनात गढलेला. चिडचिडा बनलेला.

त्याच्या बंगल्याजवळ का न कळे कधी काळीच जाणारी वाहने बंद पडतात. लोक मदत मागायला शेवटी त्याच्याकडेच जातात. ते आत जसे जातात तसे बाहेरही पडतात. पण का नकळे ते गायब होतात.

पोलिस अजुनही रिसोर्टवरील घटनेचा तपास करताहेत. त्यात या अदृष्य होणा-या माणसांच्या घटना. दुवा एकच...डा. चौधरींचा बंगला...आणि त्या भिषण हत्याकांडातून वाचलेला एकमेव माणूस...डा. चौधरी. पण तो मोठा माणूस आणि त्याच्याविरुद्ध तर एकही पुरावा नाही....

त्यात डा. चौधरीला भेटायला येते त्याची जुनी प्रेयसी. माया. ती त्याला तेथे यायला नकोशी वाटतेय. तो तिला टाळायचा...लवकरात लवकर घालवायचा आटोकाट प्रयत्न करतोय. तिच्यावरील प्रेमही लपवता येत नाहीय आणि गतकाळाची भुतेही पाठ सोडत नाहीत...असह्य कोंडमा-यात सापडलेला माणूस...आणि बंगल्यावर झाकोळलेली गुढाची छाया...

मायाला हे काय माहित? ती स्वप्न पहात आलेली साधी तरुणी. तिचे अबोध प्रेम उचंबळतेय...ते विक्रमलाही समजतेय...पण साराच नाईलाज...

तिला अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या बंगल्यात थांबावेच लागते...आणि तिला भयानक अनुभवांतून जावेच लागते. अटळ नियतीच जशी.

खाली चित्रपटाची लिंक दिली आहे. यात अभिनय करणे हे आव्हान होते. सतत तणावाखाली असलेला, गतकालाची अनाम ओझी वागवनारा आणि तरीही ते दाखवायचा प्रयत्न न करनारा माणुस मला उभा करायचा होता. मला ते जमले कि नाही माहित नाही. प्रज्ञा जाधव ही नवखी नायिका...तिने मात्र समजून उत्तम अभिनय केला. या चित्रपटाचे शुटिंग अवघ्या सात दिवसात संपवले. रात्रंदिवस मला सर्वांनी अनमोल सहकार्य केले. छायाचित्रण करणारे गोपाळ तर भारीच! मी चित्रपटाची लय संथ ठेवली. मानवी संबंधातील गुढे, मृत्युचे तत्वज्ञान आणि त्याचे वास्तव संदर्भ यात टिपले...मराठीत असे चित्रपट दुर्मिळच! मी अशा एका वेगळ्या पण सर्वांशी सम्बंधित विषयावर चित्रपट काढु शकलो याचे मला अप्रूप आहेच.

बघा...आणि ठरवा...

http://www.youtube.com/watch?v=C5S9TkGhQ78


4 comments:

  1. kahitari changale karnyasathihi vede hone aatal.
    khupch chhan sir ,
    tumhi kadhi lihanar aatmacharitra
    krupya liha
    aamhi vat pahatoy.

    ReplyDelete
  2. संजय सर,

    अलिकडेच 'अमानुष एक थरार' हा चित्रपट एका दमात पाहिला.
    तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरच मानवी भावना अशा अँगलने टिपलेल्या क्वचितच चित्रपटांतून दिसतात.
    एक संथ अशी लयबद्धता या चित्रपटात आहे. शेवट तर अगदी थरकापवून सोडणारा आहे. अनपेक्षितच.

    हा चित्रपट बघण्याची खूप लोकांची इच्छा असणारच. ऑनलाईन चित्रपट पाहू शकणार्‍यांसाठी युट्युबचा दुवा देऊन तुम्ही मोठीच सोय केली आहे.. एक चाकोरीबाहेरील चित्रपट बघण्याचा अनुभव मला मिळाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    ReplyDelete
  3. संजय सर,

    मी दुबईत डिजाईनर आहे आणि काम करताना कधी बोअर झालो तर online तुमचे लेख वाचतो… काही लेख खरंच खुप चांगले असतात… वेगवेगळ्या विषयावर असतात…वाचल्यावर त्यामागचा अभ्यास केलेले कष्ट दिसतात… यावरून तुम्ही एक अभ्यासु, समंजस आणि सत्य लिहिणारे लेखक आहात असा माझा समज होता.… पण हा सिनेमा पहिल्या नंतर मला जाम धक्का बसलाय, तुमचा अभिनय पाहून तर हसावं का रडावं कळत नाहीये आणि मनात अनेक प्रश्न येतात जमल्यास उत्तरे द्या

    १. रिसोर्टमध्ये शास्त्रज्ञांची हत्या कोणी केली, रिसोर्ट नेमके कुठे होते आणि डॉ. आपल्या आर्धवट जिवंत बायका-मुलाला घेऊन तिकडे गेलेला का ????
    २. सुरुवातीला डॉ. पळताना दाखवलाय तो का? तो कुठून पळालेला आसतो ? त्याला त्याच्या बायको पासून धोका नसतो तरी तो का पळत असतो ?
    ३. डॉ. प्रेयसीला डायनिंग हाल मध्ये बोलावतो आणि दारू देत काहीतरी बावळट एक्ष्प्रेशन देतो ????? का?????
    ४. गाड्या का बंद पडतात म्हणजे कोण बंद पाडतं आणि प्रेयसीची आणि पोलिसांची गाडी का बंद पडत नाही ???
    ५. आर्धवट जिवंत बायको आणि मुलगा नक्की कुठल्या अवस्थेत आहेत, भुतं आहेत? झोंबी आहेत? त्याच्या कडे सुपरन्याचरल पावर कुठून आल्या ??
    ६. सिनेमा Science बेस आहे, तरी घडणाऱ्या घटनांवरून भुताचा का वाटतो???
    ७. सिनेमाचा उद्देश्य काय ???मध्ये मध्ये जी फिलोसफि डॉ. सांगत असतो त्याने काही साध्य होत नाही.

    सिनेमाचे कथानक लॉजिकलेस तर आहेच वर अभिनय आणि स्क्रीनप्ले त्याचा दर्जा आणखी कमी करतात, पैसे नाही तरीही सिनेमा काढायचा हे पटतंय पण पैसे नाही म्हणून त्यात अभिनय(?) करायचा हे कारण काही पटत नाही, या मागे सिनेमात काम करायची सुप्त इच्छा तुमच्या मनात होती हे दिसते… असो! तुमची स्तुती करणारे मुर्ख आहेत किंवा त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे, पड्खर प्रतिक्रियेसाठी क्षमा करा पण मला जे वाटले ते मी सांगितले यातून तुमचा फायदाच होईल, कृपा करून हि लिंक काढून टाका कारण एक चांगला लेखक म्हणून तुमच्या भविष्यासाठी हे चांगले नाही.
    तुमचा पड्खर मित्र

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...