Tuesday, December 17, 2013

नर्सरी -हाईम...रेन इज पवरिंग...




२००० सालची गोष्ट असेल. माझी मुले तेंव्हा शाळेत शिकत होती. ते इंग्रजीतील नर्सरी -हाइम्स म्हणत त्या मला आजिबात आवडत नसत. रेन रेन गो टु स्पेन...हे काय आहे म्हटलं? मग मी स्वत: आठ बालगीतं लिहिली...संगीतबद्धही केली. अजय-अतुलने संगीत संयोजन केलं. पण व्हाईसओव्हर राहुनच गेला. मग बनवलं फक्त म्युझिकल...खरेच पक्क्या भारतीय नर्सरी -हाइम्सची गरज आहे.

म्युझिक खाली दिलेल्या लिंकमद्धे आहे. खाली दिलेल्या शब्दांसोबत स्वत:लाही म्हणता येतं का बघा हे गीत...

Rain is pouring from the sky
Come brother let's get wet
Dont worry for mother
She won't get angree
Let's go out and get wet....(4)

Look at the streams
So lovely streams
Don't you like the shining beams? (2)

Come brother let's play
Dont worry for father
He wont get angry...
Rain is pouring from the sky...

Look at the frogs
Happy jumping frogs
From where they come
I know not (2)

Look at that rainbow
Seven color it has
isn't it a magic of the God?
rain is ...

http://yourlisten.com/sonawani/rain-is-pouring-from-the-sky

15 comments:

  1. नमस्कार ,




    संजय सर आपल्याकडे पूर्वापारची प्रसिद्ध बडबड गीते आहेतच आपण रचलेली गीते आमच्या पर्यंत पोचली असती तर आनंद झाला असता

    र्हीम्स चा अर्थ यमक असलेली कविता असे मी मानले आहे शाळेतील यमक प्रधान गीते हि मुख्यतः ( मराठीत )बाल संदेश गीतेच असली पाहिजेत का ?




    ससा नि कसा नि कापूस जसा त्याची कासवाशी पैज लागली

    वेगे वेगे जाऊ नि डोंगरावर जाऊ हि शर्यत रे आपुली




    अशा प्रकारची असतील असे आपणास म्हणायचे असावे असे मानले आहे

    तसेच

    चांदोबा चांदोबा भागलास का - - लिम्बोणीच्या झाडाखाली लपलास का

    लीम्बोणी चे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी

    किंवा

    आई आवडे अधिक मला - सांग मला रे सांग मला

    त्यातील बाबांचा क्रम वरती राही त्यांच्या पाया पडते आई

    म्हणून आया तयार होती बाबांसंगे लग्नाला - हा अबोधपणा अवीट आहे हे असे आई बाबांचे गीत

    शाळा ते घर घर ते शाळा

    आम्हा येतो कंटाळा

    रात्र भर तू चाल चालशी

    लिंबामागे जाउन रडशी - - चंदाराणी

    त्यापूर्वीची म्हणजे

    आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक -

    अशा बाल कविता यासाठी वृत्तबद्धता हि आवश्यक आहे का ?

    संजय सर , आपणास नर्सरी र्हिम्स यातून कोणत्या बाल कविता सुचवायच्या आहेत ?

    माझे काही चुकत असेल तर सांगावे व मार्गदर्शन करावे

    हा अतिशय मन तल्लीन व प्रसन्न करणारा विषय आहे तितकाच अवघड पण आहे

    भोंडल्या मधली गाणी हि पण एकप्रकारे बालगीते आहेत आपली आणि त्यांच्या गरजा आणि पाश्च्यात्य समाज यात हाच फरक आहे

    भोंडला , गोपाळकाला , कोळीगीते आणि त्यातील नवरा नवरी आणि इतर नातेवाइक यांची शाब्दिक देवाण घेवाण , अशी अनेक उदाहरणे आहेत

    आपण एक सुंदर विषय स्पर्शला आहे याबद्दल धन्यवाद

    आपण नर्सरी र्हीम्स याचा खुलासा कराल तर बरे होईल

    तसेच आपल्या बाल कविता ताबडतोब या ब्लोगवर प्रसिद्ध कराव्या हि नम्र विनंती

    ReplyDelete
  2. आपल्याकडे सर्व प्रथम दुसऱ्याशी संवाद करणारी अशी भक्तीगीते झाली असावीत

    एखादे मागणे , हट्ट तक्रार याची सुरवात देवाकडे झालेली दिसते मग मीराबाई असो वा कबीर

    ज्ञानेश्वर असो वा तुकोबा



    तुकाराम महाराज किंवा ज्ञानोबा , किंवा त्यांच्या विरहीण्या - -


    देवा बोला माझ्याशी हि ज्योस्त्ना भोळे यांच्या हाकेतील आर्तता किंवा क्षणभर उघड नयन देवा हि माणिक वर्माची मागणी हाच प्रकार

    विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा असा काव्यात भेटतो आणि गाणारी चिमुरडी असते तेंव्हा

    ते बालगीत होते ,पण त्याला वृत्त - छंद असणे अनिवार्य आहे का हा वादाचा मुद्दा असू शकतो

    त्यानंतर बालगीते हा प्रकार फार अलीकडचा असावा

    आपल्याकडे भोंडला हा अप्रतिम प्रकार आहे त्याचे मूळ कानडी आहे

    आपल्याकडे लहान मुलांनी दिवाळीत किल्ले करायला कधी सुरवात झाली असेल ?त्याचे कुठे रेकोर्ड सापडते का ते पहायला पाहिजे.

    कुत्तात्रेय

    ReplyDelete
    Replies
    1. "कुत्तात्रेय" हे कोणत्या गाढवाचे नाव आहे?
      दत्तात्रेय आगाशे नाही ना?

      Delete
    2. माझे आडनाव कुत्रे

      त्यामुळे आम्हाला तुम्ही जे नाव दिले आहे त्याचे वाईट वाटत नाही

      दत्तात्रेय आगाशे हा कोण ?तुमच्या सारखा वेडपट अवलादी दिसतो आहे

      असो

      आमचे बेळगावच्या गाडी तळा समोर दोरखंड आणि इतर मालाचे दुकान आहे

      आपण आम्हाला सारखे कुत्तात्रेय असे म्हणत असता त्याची मात्र मजा वाटते आपण कधी इकडे आलात तर अवश्य आमच्या दुकानात या

      तुमच्या मापाचा दोर करायला टाकू का ?

      तुमचा साइज सांगता का ?तुम्हाला काय सुतळी पण बास -

      निनावी लोकाना काय सगळे सारखेच

      या मग एसटी समोर

      राजन कुत्रे

      Delete
    3. tumachya khaandaani paddhateene saangaayache tar aaiche naav pan kutrech aahe aani baapaache naav pan kutrech aahe

      tuzyaa aaibaapaache naav kaay re gaadhavaa ?

      Delete
    4. आईचे नाव आई आणि वडिलांचे नाव बाबा

      जन्मोजन्मीचे सुंदर नाते अमर नाते

      वाटे इथून जावे तुझ्यापुढे निजावे

      नेत्री तुझ्या हसावे

      चित्ती तुझ्या ठसावे - प्रेमस्वरूप आई --

      घे जन्म तू फिरुनी

      येईन मीही पोटी

      होती धरून देवा हि एक आस मोठी - प्रेम्सेअरुप आई - -



      कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला

      वैभवाने बहरून आला याल का हो बघायला

      असे बाबा -

      तुम्ही गेला आणिक तुमच्या देवपण नावा आले

      असे ते बाबा !

      गोरे असोत काळे असोत पण ते आपले असतात दोघेही !

      बाळ ,तुला तुझे आई वडील दिर्ग्घाकाळ लाभोत असा आशीर्वाद !

      Delete
    5. मोहरीर सरांची खूप आठवण आली

      Delete
    6. बाळा अनामिका ,

      ज्येष्ठ कवी फ . मु .शिन्दे यांनी आईचे वर्णन केले ते वाचून आता यापुढे कुणाला कुणाच्या आईचे आडनाव विचारण्याची इच्छा राहील असे वाटत नाही

      मुळात अशी विकृती अभ्यासाने नष्ट होईल

      पण त्यासाठी इच्छा आणि उमेद पाहिजे आणि जग हे सुन्सार आहे आणि आपल्याला देवाने दिलेला जन्म हे जग सोडण्यापूर्वी ,सर्वांचा निरोप घेण्यापूर्वी ,अजून सुंदर करून जाण्यात वापरण्या साठी वेचण्याची ओढ हवी - तीच ईश्वरसेवा आहे

      जे खळांची व्यंकटी सांडो

      त्या सत्कर्मी राती वाढो

      भूतां परस्परे जडो

      मैत्र जीवांचे

      Delete
  3. अरे रे कुणीच प्रतिसाद देत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. आई एक नाव असतं

      घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!

      सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
      आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

      जत्रा पांगते पालं उठतात
      पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात

      आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
      जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही

      आई असतो एक धागा
      वातीला उजेड दावणारी समईतली जागा
      http://www.m4marathi.com
      घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
      विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

      पिकं येतात जातात
      माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान
      दिसत नसलं डोळ्यांना तरी
      खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण

      याहून का निराळी असते आई?
      ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?

      आई खरंच काय असते?
      लेकराची माय असते
      वासराची गाय असते
      दुधाची साय असते
      लंगड्याचा पाय असते
      धरणीची ठाय असते
      poem on aai in marathi
      आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!

      - कविवर्य श्री. फ. मु. शिंदे.

      Delete
    2. माननीय नियोजित अध्यक्ष

      फ मु शिंदे यांच्या कवितेच्या सहभागाने आनंद झाला

      कवितेचे सामर्थ्य आणि आई या नात्याची महती अधोरखित झाली

      वाईटातून सुद्धा शेवटी चांगलेच निघते त्यासाठी अनामिकाला खरेतर धन्यवाद दिले पाहिजेत

      आपणास चांगली सांगत लाभो

      हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा



      प्रतिमा आणि प्रतिभा

      Delete
  4. आचरट प्रकारच्या चर्चा करणे हे फार हुशारीचे काम नाही

    इथे वेळ आहे कुणाला ?

    रिकामा न्हावी आणि भिंतीला तुमड्या लावी अशी अवस्था आहे

    काही क्त्र्याना पाय वर करायची सवयच आहे

    दुकारांचे पण तेच ,त्याच चिखलात लोळत पडतात

    ReplyDelete
  5. संजय सोनवणी सरांनी अतिशय पटकन लक्षात न येणारा विषय निवडला आहे

    त्यांचे अभिनंदन त्यांनी आता अशाच नवीन विषयावर लिहावे आणि जुने विषय सध्या बाजूला ठेवावेत असे वाटते

    अगदी फार पूर्वी अशा अनेक कथा कविता ऐकायला मिळत असत असे वयस्कर लोक अजून

    सांगतात

    संजय सरांनी प्राथमिक शाळेतील गीतांची आठवण काढली आणि आम्हाला आमचा काळ आठवला प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक हि चैन तिथे नव्हती - शाळेतील गाणीपण वर्षानुवर्षे तीच असत

    ये राजाच्या श्रावणी करुणा वाणी

    डोळ्याला आले पाणी

    त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी

    शोकाकुल झाला अवनी

    हा आईघे दीर्घ फोडुनी हाक तो पडला जाउनि झोक

    अशी श्रावण बाळाची कविता होती

    असो

    आपल्या आरत्या तर फारच सुंदर आहेत किंवा देवाचा धावा असाच ओढ लावणारा आहे

    शेवटचा शब्द पुढच्या ओळीत खेचून परत ओळ वाढवत जाण्याची पद्धत - त्याला काहीतरी म्हणत असावेत - ते कुणाला एम ए ला वगैरे अभ्यासाला असेल सुद्धा - पण आमच्या सारख्या गणिती लोकाना त्याचा मोह पडतो हे मात्र काबुल केले पाहिजे

    गुरुचरित्रात पण पहिल्या अध्यायात असाच प्रकार दिसतो



    छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा नांदतसे माझा मायबाप

    माझा मायबाप त्रैलोक्य समर्थ सर्व मनोरथ पूर्ण करी

    पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा नाथानाथांचा स्वामी माझा

    स्वामी माझा राम योगिया विश्राम सापडले वर्म थोर भाग्य

    थोर भाग्य असे राम ज्याचे कुळी संकटी सांभाळी भावबळे

    भावबळे जेणे धरिला अंतरी त्या क्षणभरी विसंबिना

    विसंबेना कदा आपुल्या दासाशी रामी रामदास स्वामी माझा



    ज्ञानेश्वरीत तर इंद्र धनुष्य हे रूपक छानच वापरले आहे

    आपल्याकडली भावगीते सुद्धा अतिशय हळवी आणि भावुक आहेत

    तुकाराम महाराजांनी आणि माऊलिनी मृगजळाचा वापर समर्पक केला आहे

    पण

    कधीमधी " भो पंचम भूप " असेपण सहन करावे लागले होते

    ReplyDelete
  6. सुजाण वाचकांच्या लक्षात आले आहे का ?

    असे का घडत आहे ?

    हल्ली कुणीच यांच्या ब्लोगवर लिहित नाही उत्तर नाही -प्रत्युत्तर तर अजिबातच नाही

    वाद नाही प्रतिवाद नाही चैतन्य नाही आगाशे नाहीत पद्मजा नाही समीर घाटगे नाहीत

    सगळे शांत

    आप्पा बाप्पा नाहीत

    संजय सर तर त्यांचे - आप्पा बाप्पा यांचे कौतुक करत असत

    चैतन्य यांचे विचार अत्यंत प्रगल्भ असत

    समीर घाटगे आणि ओंकार यांचे विचार तिखट असत आगाशे हे तर वयस्कर त्यांचे विचार काह्से आगंतुक आणि अप्रगल्भ असतात पण सागर भांडारे आणि सांगलीकर हे तर अतिशय सुंदर !संजय देशपांडे हे तर स्पष्ट लिहिणारे

    पण हल्ली कुणीच लिहित नाही आणि फक्त कुणाला तरी शिव्या आणि लाखोली - हाच प्रकार चालू असतो प्रज्ञा आणि अमृता या मात्र नियमित असतात लिहित चिंतन हाच एक मुद्दा सर्वाना दिशा दाखवतो - अभद्र टीका काय कुणीही करू शकते पण त्याची गरजच काय ?

    का असे घडते ?

    हे थांबले पाहिजे!

    सर्वाना अशी विनंती की हे एक सभ्य दालन आहे - एक अभ्यासिका आहे - हिचा विचका करू नका !

    ReplyDelete
  7. फारेनची व्हिस्की नाही मिळाली कि हात भट्टी वर भागवायचे हि आपल्या महाराजांपासुनची

    परंपरा आहे - त्यातूनच वाघ्याला फेकून देण्याच्या चुका होतात

    तसेच दुधाची तहान ताकावर भागवायची म्हणून

    आपले संजय सर शेकोटी चे अध्यक्ष झाले

    मजा आली ! गड्यांनो काय सांगू -अहाहा !

    काठोकाठ कल्पनांचा प्याला भरून विचारांचा फेस उसळत होता

    रात्र कशी संपली कळलच नाही - शेकोटी विझली तरी उन्माद सरत नव्हता

    छान रंग भरला होता - जर तसे घडले नसते तर - अजून मजा आली असती

    मोहरीर सरांची खूप आठवण आली

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...