Monday, December 23, 2013

माझं गांव ...

माझं गांव 
हरवलंय
शोधतोय मी दशदिशांत 
आणि
प्रत्येक हृदयांत 
विचारतोय हरेक सहृदयाला
कोठाय माझे गांव...?

प्रत्येक जण 
म्हणतोय साश्रू नयनांनी
नाही माहित बा...
आम्हीही त्याच 
अनवरत शोधात
कोठे गेले ते आमचे गांव...?

गांवाचा शोध 
आत्म्याचा शोध
हरपलेल्या श्रेयांचा शोध
शोध-शोध शोधतोय
पण नाही सापडत कोठेच
माझे
तुमचे
हरवलेले गांव!

4 comments:

 1. Man kara re prasanna
  Sarva siddhi che karan
  Moksha aathava bandhana
  Sukha samadhan ichha te

  Mane pratima sthapili
  Mane mana puja keli
  Mane ichha puravili
  Man mauli sakalanchi

  Man guru aani shishya
  Kari aapulechi dasya
  Prasanna aap aapanas
  Gati aathava aadhogati

  Sadhak vadak pandit
  Shrove vakte aaika maatra
  Nahi nahi aanudaivat
  Tuka mhane dusare
  here it seems sant tukaraam has written these lines and not Samarth Ramdas

  ReplyDelete
 2. शेवटची ओळ लिहीली
  आणि तो दूर झाला
  आपल्या कवितेपासून
  बराचसा थकलेला
  पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
  प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
  जरा प्रसन्न, जरा शांत
  नाही खंत, नाही भ्रांत….

  आणि ती कविता नवजात
  एकाकी, असहाय, पोरकी
  आधाराचे बोट सुटलेल्या
  अजाण पोरासारखी
  भांबावलेली, भयभीत,
  अनुभवणारी एका उत्कट नात्याची
  परिणती विपरीत

  ती आहे आता पडलेली
  कागदाच्या उजाड माळावर
  आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
  तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
  संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!

  कवियत्री – शांता शेळके

  ReplyDelete
 3. संजय सर

  आपल्या कवितांचा आकार लहान होत चालला आहे पण आशय मात्र अधिक सखोल होतो आहे हे पाहून आनंद झाला आपण आपले आत्मचरित्र कधी प्रसिद्ध करणार ?आम्हाला आपण कसे घडलात ते समजून घेणे आवडेल, आपण आपल्या वडिलांविषयी फेसबुक वर लिहिले आहे ते त्रोटक लिखाण वाचून तर अजूनच आदर आणि औत्सुख्य वाढले आहे आपण फेस् बुक वर आपल्या कुटुंबाचा आणि मुले व परिवार यांचा फोटो दिला होता आपण साहित्य क्षेत्रात हि जी गरुडझेप घेतली आहे त्याचे आम्हाला सर्वाना प्रचंड कौतुक आहे

  आपल्या चरित्राची आम्ही वाट पहात आहोत - - २०१४?

  ReplyDelete
 4. बरेच लोक जसे आधी बीज एकले हा संत तुकारामांचा अभंग समजतात तसेच मी

  मना करा रे प्रसन्न ही संत ज्ञानेश्वरांची रचना समजत होतो

  पण ती संत तुकडोजी महाराजांची रचना आहे हे पाहिल्यावर अभिमान वाटला

  संजय सरांची शोधक वृत्ती याबद्दल अभ्यासूपणे आपल्यापुढे नवी माहिती उलगडतील

  असाच प्रकार ज्ञानेश्वर आणि नामदेव एक का अनेक या बद्दल आहे

  दतात्रेया यांचे विषय मांडला म्हणून आभार संजय सरांनी थोडक्यात गावाची ओढ चांगली मांडली आहे काल गालिबची पुण्य आठवण करण्याचा दिवस होता त्याच वेळेस हि कविता दिसली

  गाव हि एक आठवणींची अबोध विचारांची आणि नात्यांची ओवलेली माळच असते आपले बालपण आपल्याला हुहूर लावून जाते तसेच गावातील प्रत्येक वळण आणि प्रत्येक दगड आपल्या भावनांचा साक्षीदार असतो - गाव हे रूपक अतिशय सुंदर उलगडले आहे

  ReplyDelete