Thursday, February 20, 2014

या एल्गाराचा दाहक स्फोट .....!

काल फ्यंड्री पाहिला. पाहिला म्हणजे खरे तर पडद्यात घुसून पात्रांपैकी एक पात्र होऊन अनुभवला. कारण मुळात हा चित्रपट नाही. कोणत्याही संवेदनशील मानसाच्या अंतर्मनाच्या डोहात डुबलेल्या व्यथावेदनांचा हा विस्फोट आहे. हा चित्रपट नाही. हजारो मिती असलेला, वास्तव असुनही प्रतिकात्मक असलेला म्हणुन सर्वांचा अनुभवपट आहे.

वरकरणी दाहक असला आणि जातीव्यवस्थेचे भिषण वास्तव मांडणारा हा चित्रपट असला तरी तो त्याहीपार जातो. त्यामुळे तो वैश्विकही बनतो. मानवाची चिरंतन वेदना ज्या पद्धतीने साकार होते तिला तोड नाही.

आपल्या समाजातील "आजकाल कोठे राहिलीय जातपात?" असे मुखंडांसारखे विचारणा-यांनी आपल्या मनातील अदृष्य पण सतत वावरणा-या जातीयवादाला प्रथम प्रश्न करावा. वैदिक धर्माने हिंदूत घुसवलेली उच्च-नीच्च भावना कोणत्या थराला जावून पोचली आहे याबद्दल स्वत:ला प्रश्न विचारावा आणि मग वैदिक संस्कृतीचे गोडवे गावेत. या चित्रपटात मराठे वैदिक उच्चवर्णीयतेचे प्रतिनिधित्व करतात. पण हा चित्रपट जातीयवादाबद्दल पात्रांच्या मुखातून क्वचितच बोलतो. तो दाखवतो. पण जातीयवादाच्या तीव्रतेपेक्षा या चित्रपतातील प्रतिकात्मकता अधिक महत्वाची आहे.

फ्यंड्री म्हनजे कैकाडी भाषेत डुक्कर. जवळपास ३०% चित्रपट हा गांवातील माजलेले डुक्कर जब्याचे कुटुंबिय कसे पकडतात हे विभिन्न दृष्टीकोनांतुन दाखवतो. हे डुक्कर एक प्रतीक बनते. म्हणजे देवाच्या पालखीला भर मिरवणुकीत मुसंडी मारून पाडनारे हे डुक्कर मुळात मानवी श्रद्धा या केवढ्या तकलादू आणि कामचलावू असतात हे दाखवते. डुक्कराचा मैत्रीनीला स्पर्श झाला म्हणून तिच्यावर गोमुत्रशिंपण ते आंघोळ घालायला लावणारी शालु डुक्कर पकडण्याचा धंदा असणा-या जब्याची होऊ शकत नाही हे एक सामाजिक वास्तव...पण देवाची पालखी मात्र डुक्कराने पाडूनही देव मात्र पवित्र...पालखी तशीच पुढे निघते हे एक वास्तव.

याच संपुर्ण प्रसंगात शालुचे लक्ष वेधण्यासाठी बेभान हलगी वाजवनारा...नाचनारा जब्या उर्फ जांबुवंत आणि बाप सांगतो म्हनून शेवटी मस्तकावर मिरवणुकीला उजेडासाठी ग्यसबत्त्या घेनारा अश्रुपुर्ण जब्या...मानहानी...सर्वत्र मानहानी...

आणि मानाच्या...आत्मसन्मानाच्या निरंतर शोधात असलेले हे कैकाडी कुटुंबिय...आणि त्यांचाच नव्या पिढीचा, सजग पण हतबल प्रतिनिधी हा जब्या.

जब्या प्रेमात पडलाय कोणाच्या? एका उच्चवर्णीय मुलीच्या कि प्रत्येक माणुस पडतो त्या सुखद...आल्हाददायक पण अप्राप्य अशा भवितव्याच्या? शालू या चित्रपटात जब्याशी एकदाही बोलत नाही. त्याने लिहिलेली असंख्य प्रेमपत्रे तिच्यापर्यंत कधीच पोचत नाहीत. किंबहुना तिच्याकडे पाहण्याचीही अनुमती त्याला नाही. शालुही एक प्रतीक बनून जाते ते त्यामुळेच!

प्रत्येक मानसाचा आपल्या भवितव्याशी असाच संघर्ष सुरू असतो. पण तरीही भवितव्य एवढे निर्दय असते कि ते कोणालाही संपुर्ण प्राप्तीचे सुख उपभोगू देत नाही.

गांवात इतिहासाचे भरपूर अवशेष आहेत. पडके वाडे...भुयारे..देवड्या...या इतिहासाची या, सर्वच गांवात दिसनारी बाब, म्हनजे या हगनदा-या आहेत. इतिहास हगनदारी आहे हे दाखवणा-या दिग्दर्शकाला सलामच केला पाहिजे. आणि याच हगनदारीत रानवट डुक्करही पकडायचे आहे. "तमस" या भिष्म साहनींच्या कादंबरीची सुरुवातच एक डुक्कर पकडण्याच्या अंगावर काटे फुलवणा-या प्रसंगाने सुरू होते. येथेही तसेच अंगावर काटे फुलवनारे...

आणि तमाशाई विद्यार्थी ते गांवातल्या प्रौढांचे विविध ढंगी...उपहासात्मक प्रतिक्रियांचे...

का पकडायचे आहे ते डुक्कर? देवाची पालखी पाडली म्हनून कि कोणाच्या हगत्या ढुंगनाला त्या डुक्कराने चावा घेतला म्हनून?  उत्तर अनिर्णित आहे पण डुक्कर पकडले गेलेच पाहिजे. आणि कचरू माने (जब्याचा बाप) ती कामगिरी घेतो कारण मुलीच्या लग्नाला हुंड्याचे पैसे कमी पडत आहेत...येथे मिळतील म्हनून. त्याची डुक्कर पकडने हा पेशापेक्षा जगण्याची अपरिहार्यता आहे. सारे कुटुंबिय त्याने या डुक्कर पकडण्याच्या मोहिमेत घेतले आहेत.

जब्याला ते अपरिहार्यपने मान्य करावे लागले तरी त्याचे मन त्यात नाही. त्याचे सारे लक्ष शालुकडे आहे. तिने तरी हे दृष्य पाहू नये यासाठीचा पराकोटीचा प्रयत्न आहे. डुक्कराच्या स्पर्शाबाबत तिची घृणा त्याला माहित आहे. त्याच वेळीस डुक्कर पकडण्याची गरजही त्याला माहित आहे. तथाकथित असभ्य व्यवसाय सोडून मेहताची कोक-कुल्फी सायकलवरून विकण्याचा अयशस्वी उद्योगही त्याने करून पाहिलेला आहे. या अपयशाचे कारण म्हणजे "काळ्या चिमणी"चा शोध!

त्याच्याच प्रौढ मित्राने सांगितलेला हा तोडगा. काळ्या चिमनीला मारून तिला जाळूण तिची राख शालुवर टाकती कि शालू त्याची होईल. येथे दिग्दर्शक एक नवी पुराकथा...मिथक तयार करतो. कोणाचे तरी बलिदान दिल्याखेरीज यश नाही हाच तो अर्थ! याला अर्थातच भारतीय अंधश्रद्धेचे पदर असले तरी मिथक तेच राहते.

काळी चिमणी आणि तिचा शोध चित्रपटाचा पुर्वार्ध व्यापतो. सोबत गांवजीवन आहेच.

डुक्कर पकडायचा प्रसंग! सारे कुटुंबिय सामील. हगनदारीत सदणा-या इतिहासातील जीवघेणी धामधूम. जब्याचे लक्ष शालुकडे. डुक्कर पकडण्यात त्याला रस नाही...कुटुंबाची अपरिहार्यता असली तरी.

आणि कच-या साकारणा-या किशोर कदमला सलाम. एकच प्रसंग. शाळेत राष्ट्रगीत सुरु होते...जब्या बाजुलाच...तो ताट्‍ह उभा राहतो...बापालाही नाईलाजाने उभे रहावे लागते...डुक्कर अगदी आटोक्यात...सहज पकडता येईल असे...आणि राष्ट्रगीत सुरु असल्याने हलताही येत नाही...ती तगमग...तो आविर्भाव...ती जीवघेणी तडफड किशोर कदमांनी ज्या पद्धतीने अभिव्यक्त केली आहे केवळ तेवढ्याच साठी त्यांना ओस्कर मिळाले पाहिजे!

ते डुक्कर...म्हनजे सामाजिक व्यवस्थेची कीड मानली गेलेले द्रव्य, सर्व सामाजिक आघात उरावर घेत ते पकडतात.  शालुने जब्याला डुक्कर पकडतांना पाहिले आहे. तिच्या दृष्टीने तो मनोरंजनाचा खेळ आहे...कारण तिचे असे जब्यावर प्रेमच नाही...पण जब्याच्या (सोमनाथ अवघडे) दृष्टीने ती सर्वस्व आहे. एकमेव वांच्छित स्वप्न आहे.

आता ते स्वप्न साकार होणे असंभाव्य आहे याची विषण्ण करणारी जाणीव आणि स्वत:च्या बहिणीबाबत उद्गारले गेलेले असभ्य उद्गार...

याचा कडेलोट जब्या एक पत्थर फेकतो आणि तेथेच होतो आणि आपल्याला उत्तर मिळते.

व्यवस्था विरुद्ध एक माणूस याचा हा अंत नसुन आरंभ आहे. खरे तर हा चित्रपट जेथे संपतो तेथेच याची सुरुवात आहे. व्यवस्थेवर नव्हे तर आपल्या मनातील विषमतेच्या घाणीवर फेकलेला तो पत्थर आहे. तो पत्थर वैश्विक यासाठी आहे कि आपले समग्र वैश्विक मानवी जीवन हे उदार हृदयी गांधीवादाकडे जात नसून पराकोटीच्या विषमतावादी जागतिकीकरणाकडे जात आहे. सामान्य माणसांची जीवनविषयक स्वप्ने अपूर्णच राहण्याचा अभिशाप घेत उद्ध्वस्ततेकडे वाटचाल करत आहेत. आपण स्वत:च डुक्कर, म्हणजे डुक्करांच्या व्यवस्थेचे भाग आणि डुक्कर पकडत डुक्करांनाच (तथाकथित मानवांना) अभय देणारे आपण...माणसाच्या देवतांनाही धुत्कारनारी डुक्करे आणि त्या डुक्करांनाच घाबरणारी मानवी जमात...डुक्करांचा स्पर्श विटाळ माननारी मानवी ही जमात....तेही कोणत्या? रानवट आक्रमक डुक्करांना घाबरनारी ही मानवी जमात...

आपलीच नव्हे, वैश्विक समाजव्यवस्था अशा स्वार्थनिपूण डुक्करांनी भरलेली आहे. काळी चिमणी अस्तित्वात नाही. शालू मिळुच शकत नाही. सारे शेवटी स्वप्न! रानटी डुक्करांना पकडणारे पायतळी तुडवण्यासाठीच असतात. या डुक्करांच्या जगात!

पण तेही एल्गार करतात!

या एल्गाराचा दाहक स्फोट म्हणजे जब्याने हाणलेला पत्थर!

मी दिग्दर्शक नागराजजी मंजुळे यांना विनम्र मानाचा मुजरा घालतो. जब्या साकार करणारा सोमनाथ अवघडे हा जब-याच. या चित्रपटातील सर्वच स्त्रीया जगातील अद्वितीय सुंदर महिला तर आहेतच पण त्यांना त्यांच्या सहज अभिनयासाठी सलाम. किशोर कदमांना...जो बाप त्यांनी साकार केला...बाप माणुस...ओस्कर मिळायलाच हवे असा महान कलावंत...

मित्रांनो, या चित्रपटाचे एवढेच नाहीत...प्रत्येक नजरेतून उमगतील असे अगणित पैलू आहेत. मी फोटोग्राफी, पार्श्वसंगीत...याबद्दल लिहिले नाही...ते या अनुभवपटाचे सहज भाग म्हणून येतात...

सा-या टीमला विनम्र अभिवादन...मला माझे जग पुन्हा उलगडून दाखवल्याबद्दल!


61 comments:

  1. अत्यंत सुंदर विश्लेषण. चित्रपट आवर्जून पाहणे आवश्यक .

    ReplyDelete
  2. "या चित्रपटात मराठे वैदिक उच्चवर्णीयतेचे प्रतिनिधित्व करतात."
    हाण तिच्यामायला!!

    ReplyDelete
    Replies
    1. "या चित्रपटात मराठे वैदिक उच्चवर्णीयतेचे प्रतिनिधित्व करतात."

      वाक्य खटकले

      Delete
    2. चित्रपट पाहून खूप दिवस /वर्ष गेली. पण जब्याने मारलेला दगड रप्पकन बसला आहे. आणि आज जवळजवळ नऊ वर्षानंतर हे परीक्षण माझ्या वाचनात आले. जे संदर्भ वरवर फक्त बघितले त्याची ते किती खोलवर रुजलेले हे अधिक स्पष्ट झालं.ते या लेख मुळे. नागराज मंजुळे थेट विषयाला हात घालतात. उगाच भारुड भरती नसते.(त्यांच्या झुंड नं मात्र निराश केलं.)

      Delete
  3. a great cinema.........where was director manjule till now. Hats off.

    ReplyDelete
  4. Sanjay ji,

    When writing a review about any movie one should take care not to revel everything about a movie... it spoils half the fun future audience. and you have given very detailed interpretation and even reveled the END which no one should tell in review... Please Sir this is not conducive for the movie or the Audience.

    ReplyDelete
  5. याहीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ चित्रपट येउन गेले आहेत प्रभातचे चित्रपट ,राजा परांजपे ,जब्बार पटेल हे झाले मराठीतले !त्या मानाने हा चित्रपट अगदीच फालतू आहे
    सामनामधील निळू फुले यांचे काम ,उंबरठा मधील स्मिता पाटील यांचे काम याना तोडच नाही
    दोघेही राष्ट्र सेवा दलाचे हे पण नोंद करण्यासारखे आहे

    सत्यजित राय आणि गोविंद निहलानी जब्बार पटेल श्याम बेनेगल असे अतिरथी सर्व जगाला परिचित आहेत !
    मुळात हा सिनेमा झी चा आहे , गल्ल्यावर नजर ठेवून बनवलेला ,त्यामुळे काहीतरी प्रचंड चमत्कार घडला आहे असा हाकारा करण्याची काहीच गरज नाही
    नामदेव ढसाळ , किंवा दया पवार , लक्षमण माने याना ही कला अवगत होती ,कारण ज्याना आजवर दडपले गेले आहे असे मानले जाते त्यांना लिहायला लावायचे आणि मग त्याचा उदोउदो करायचा हे एक तंत्र आहे हे हमखास यश देणारे तंत्र आहे, आणि झी अशाचाच आधार घेत धंदा करत असते ,
    सत्यजित रे ,शंभू मित्रा ,बसू भट्टाचार्य हे तर ब्लाक आणि व्हाईट चित्रपटाचे आणि तंत्राचे आशयाचे सम्राट होते मराठीत तर जब्बार पटेल सारखा कुणी होईल की नाही कोण जाणे ?
    सामना,जैत रे जैत ,सिंहासन, उंबरठा हे चित्रपट आणि घाशीराम कोतवाल नाटक ,
    डॉ बाबासाहेब आंबेडकर हा उत्तुंग चित्रपट सुपरस्टार मामुट्टी ला घेऊन करण्यात जब्बारचे कौशल्य पणास लागले होते ,घाशीराम उभे राहताना खरोखर ती एक चळवळ होती असे वाटत होते !
    त्या लोकांनी समाजास अतिशय उत्तम पद्धतीने आपले मत सांगितले ,डॉ आंबेडकर यांच्या चित्रपटाच्या वेळी तर त्यांच्यावर जी टीका झाली त्यावेळेस त्यांनी लिहिलेले विचार फारच बोधक आहेत ते वाचताना जब्बारच्या विचारांची खोली समजते
    एक साधा सोलापूर सारख्या शहरातून आलेला माणूस, व्यवसायाने डॉक्टर , घाशीराम करताना काय धाडस दाखवतो ते अभ्यास करण्यासारखे आहे त्यापुढे अशा गल्लाभरू खास झी शैलीची निर्मिती काहीच नाही !हास्यास्पदच ठरते असली बनवाबनवी
    कुणीतरी शेवटी जे म्हटले आहे ते तर फारच महत्वाचे आहे
    आपण परीक्षण करताना सर्व कथा आणि शेवटही सांगितला आहे ,असे कधीही करत नाहीत ही साधी गोष्ट आपणास कळत कशी नाही ?
    आपणास परीक्षण येत नाही म्हणून त्या भानगडीत पडून स्वतःचे हसे करून घेऊ नये तुमच्या आजूबाजूला तुमचे कौतुक करणारे भरपूर असतात त्याना याचा राग येईल पण हे तुम्हाला सांगितलेच पाहिजे असे आहे त्यामुळे तुमच्यात सुधारणा होईल आणि तुम्ही एक उत्तम समीक्षक होणे हे महत्वाचे !
    अण्णा केजरीवाल आणि अरविंद हजारे

    ReplyDelete
  6. अनुदिन अनुतापे तापलो रामराया
    परम दिन दयाळा नीरसी मोहमाया
    अचपल मन माझे नावरे नावरीता
    तुजवीण शीण होतो धावरे धाव आता
    वाचकहो नमस्कार ,तुम्ही शिव्या घालणारच ! संत रामदास हा विकृत होता लैंगिक होता चोर होता असे तुमचे म्हणणे असतेच
    पण हे एक नुसते नाव तुमच्या सर्वाना शिव्यांची लाखोली म्हणायला पुरून उरते
    असे हे थोर संत त्यांच्यावर एक चित्रपट करायचा विचार करायला पाहिजे
    त्यांनी शिवाजी नावाच्या भुरट्या उनाड पोराला मार्गाला लावले नाही का ?आणि महाराष्ट्र धर्म नावाचा धर्म स्थापन केला भिक्षा मागत त्यांनी सर्व घराघरातून आपल्या धर्माचा प्रचार केला
    आता तुम्हाला प्रश्न पडेल कि हि समता " फ़न्द्रॆ " पिक्चरचे कौतुक करायचे सोडून असे रामदासाचे गोडवे का गाते आहे ?
    सांगा बरे ,
    आपली परंपराच आहे तशी या ब्लोगचि ,
    आपले अनेक अनानिमस हाच उद्योग करतात लेकाचा आशय काय ते न बघता सुरु एकदम - कुठून तरी गाडी ब्राह्मणांवर आली पाहिजे मग अजून सोपे केले डायरेक्ट समर्थ रामदास यांचाच उल्लेख केला म्हणजे कसे पिसाळलेल्या वाघ्या सारखे बोंब मारतील बघा आता
    एकीकडे चालू द्या फ्यांद्री चे कौतुक इतका बोर पिक्चर मी पाहिला नाही
    या समीक्षकाला पैसे दिलेले दिसतात काय हो संजयकुमार ?
    समता गोखले

    ReplyDelete
    Replies
    1. समता-विषमता !!!!!!!!

      चित्रपट प्रत्यक्ष पहिल्याचा आव आणू नको, चित्रपट पहा अन नंतर बोल, कस्स !

      Delete
    2. http://9gag.com/gag/6739531/don-t-ignore-me-i-m-ignoring-you

      ह्या लिंकवरील चित्र पहा. ह्या सारखीच ब्राह्मणांची अवस्था झाली आहे. बिचाऱ्या ब्राह्मणांकडे कोणी लक्षच देत नाही त्यामुळे इतरांना अक्कल शिकवण्याची संधीच त्यांना मिळत नाही. मग ब्राह्मणद्वेषाचा भोंगा वाजवून इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे ह्याशिवाय त्यांच्याकडे शिल्लक काय राहते?

      ज्या वेळी बहुजन खरोखरच ब्राह्मणांचा द्वेष करतील तेव्हा प्रतिक्रिया देण्यापुरते देखील ब्राह्मण शिल्लक राहणार नाहीत. ती वेळ प्रत्यक्षात येऊ नये म्हणूनच ब्राह्मणद्वेषाचा आरोप करून बहुजनांच्या मनात सतत न्यूनगंड निर्माण करत राहणे आणि बहुजनांच्या विचारांचा लगाम घट्ट धरून ठेवण्याची धडपड करणे ह्यावरच ब्राह्मणांचे अस्तित्व अवलंबून आहे.

      Delete
  7. समर्थ भिक्षा मागत आणि
    तुकाराम म्हणत भिक्षापात्र अवलंबणे जळो जीणे लाजिरवाणे
    खरे कोणाचे ?
    आम्हाला आरक्षण देत असाल तर ,
    मग तो रामदास असो किंवा तुकाराम आम्हाला आरक्षण द्या आणि
    आमची जात पण मराठाच ठेवा !वाटलं तर कुणबी ठेवा !
    आरक्षणाची भिक्षा घाला म्हणजे झालं
    राणेसाहेब भिक्षा घाला !
    मग आम्ही गाय सुद्धा कापू
    त्यासाठी सपोर्टला संजय सारखे इतिहास तज्ञ आहेतच
    ब्राह्मण गोमांस खात असत वगैरे वगैरे !
    या वैदॆकाना हाकलून द्या
    बिभीषण चीरमिरे

    ReplyDelete
    Replies
    1. @ बिभीषण चीरमिरे ,

      तुम्ही अगदी खरे तेच लिहिले आहे.


      Delete
  8. कैकाडी

    महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील एक भटकी विमुक्त जात. ते मुळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी होते व नंतर कर्नाटक व महाराष्ट्र यांत आले असावेत. त्यांच्या भाषेत कानडी आणि तेलुगू शब्दांचा भरणा असतो. काहींच्या मते ते तमिळनाडूमधून आले असावेत. तमिळ भाषेत हात कापणारे आणि हाताने कापणारे, असा कैकाडीचा अर्थ होतो. तेथे त्यांना कोरवा म्हणतात.

    बोरिवाले, धुंताळे, कामाठी, कैजी, लमाण, माकडवाले, उर कैकाडी, वाईवसे व भामटे या त्यांच्यात नऊ पोट जाती आहेत. यांपैकी महाराष्ट्रात उर कैकाडी ऊर्फ गाव कैकाडी ऊर्फ कोरवा, पाल्मोर ऊर्फ धुंताळे व माकडवाले यांच्या तीन पोट जाती आढळतात.

    गावात राहून आपला पूर्वापार बुरूडकामाचा धंदा करणाऱ्या कैकाड्यांना गाव कैकाडी म्हणतात. पाल्मोर गारूड्याप्रमाणे सापांचा खेळ करून उदरनिर्वाह करतात. कुंची कोरवा जातीचे लोक विक्रीसाठी कुंचले वा कुंची तयार करतात. १९६१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात त्यांची लोकसंख्या सु. ५०,००० पर्यंत होती.

    त्यांच्या कुळींची नावे गायकवाड, जाधव, पवार, माने, मधवंत, मलाजू, काडे वगैरे आहेत. त्यांच्या भाषेला कैकाडी अथवा कुलूर म्हणतात.

    यांच्यात आते-मामे विवाह प्रचलित आहे. मावशीच्या मुलीबरोबर विवाह होऊ शकत नाही. बहुपत्नीकत्वाची प्रथा रूढ आहे. एक भाऊ दोन बहिणींबरोबर लग्न करू शकतो. तसेच दोन भाऊ दोन बहिणींबरोबर लग्न करू शकतात. वरपित्याने ५० ते १०० रु. वधूपित्यास द्यावे लागतात. वधूची मागणी वरपित्याकडून केली जाते. विधवा-विवाह होऊ शकतो. तो अमावस्येच्या रात्री करण्याची प्रथा आहे. विधवेस दुसरा विवाह करताना पूर्वीच्या नवऱ्याकडील नातलगांस पहिल्या लग्नाचा खर्च द्यावा लागतो. बहुधा ही रक्कम तिचा दुसरा पती देतो.

    बहुतेक कैकाडी हिंदू आहेत. त्यांच्या प्रमुख देवता भवानी, बहिरोबा, मरीआई, तुकाई, गणपती, यमाई या होत. तसेच त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबात जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी, सोनारीचा बहिरोबा आणि मारुती यांची पूजा केली जाते. आळंदी, जेजुरी, सोनारी आणि पंढरपूर ही त्यांची तीर्थस्थाने होत. त्यांचे धार्मिक गुरू गोसावी असतात.

    मृताबाबत शोक पाच, नऊ, दहा अथवा बारा दिवस करतात. मृताला वाहून नेणाऱ्यास म्हणजे खांदे देणाऱ्यास ते पाच दिवस शिवत नाहीत. ते मृतास जाळतात अथवा पुरतात. मृताबाबत टाक करून त्याची पूजा करतात. त्यांचा जादूटोणा, चेटूक, शकुन आणि अपशकून यांवर विश्वास असतो.

    खानदेशातील कैकाड्यांमध्ये, मुल्हेरच्या दावल मलक या मुसलमान संताबद्दल आदर असून काही कुटुंबांत तर खंडोबाबरोबरच या साधूच्या हिरव्या काठीची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांच्या प्रमुखाला ओकाम्या असे म्हणतात. कोल्हाटीशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. जाती पंचायतीच्या वेळी त्यांना ते बोलावितात.

    ReplyDelete
    Replies
    1. कैकाडी समाजाबद्दल सुंदर माहिती मिळाली, खूपच छान !

      कैकाडी आणि बुरुड समाज यांचा व्यवसाय एकच, मग या दोन जातीं मद्धे भिन्नता कोठे आहे. हे कोणी सांगू शकेल काय?

      प्रसाद दाभाडे.

      Delete
  9. आप्पा - नागराज मंजुळे याना नमस्कार
    बाप्पा - अहो आप्पा ,हे काय हे ?आपल काय ठरलं होत?दोघांनी मिळून सिनेमा बघायचा आणि मग दोघांनी मिळून परीक्षण करायचं !मग तुम्हाला इतकी कशी घाई झाली ? हे काय बरोबर नाही ,
    आप्पा - सॉरी ,मला वाटलं आजपण तुम्हीच माझ्या आधी सुरु करणार ! बोलूया ,दोघे मिळून बोलूया ,या ,बोला +आता मी मध्ये मध्ये नाही बोलणार ! झालं .
    बाप्पा - किती हेलावून गेलो आहोत ना आपण , काही सुचतच नाहीये - काय करू आणि काय नाही असं झालंय - एकाच सीटवर दोन अडीच तास बसून आपण किती विचाराच्या आवर्तनातून जातो नाही का ?एका दिशेने जावे तर दुसराच संदर्भ हाती लागतो आणि या दिग्दर्शकाचे कौतुकाच वाटू लागते ,जणू आनंदाचा पूराच येतो - हा माणूस आधीच का नाही आला या क्षेत्रात ?किती बारकावे सांगावेत - मागे एकदा श्याम बेनेगलच्या अंकुर चित्रपटात असा शेवटी दगड फेकल्याचा सीन होता तसाच वापर किती सुंदरपणे या डायरेक्टर ने केला आहे +
    आप्पा - आता मी बोलतो हा चित्रपट आत्ताच्या सगळ्या इतर दायरेक्तर लोकाना अंतर्मुख करेल हा काही गल्लाभरू सिनेमा नाही दुनियादारी हा गल्लाभरू ! पण हा एक जब्बार आणि स्मिता पाटीलच्या घराण्याचा सिनेमा आहे ,काय कसब आहे , हे काही फार मोट्ठे कसलेले नट नाहीत इतक्या लहान मुलाकडून त्याच्या बोलक्या डोळ्यातून , अबोलपणातून किती थोर भावना पोचतात आपल्या पर्यंत अथांग हाच एक शब्द आहे त्याला !सवर्ण लोकांच्या दहशतीला इतक्या समर्पकपणे मांडलेले आम्हीतरी नाही पाहिले +
    बाप्पा - यात काहीच फिल्मी नाही इथे नट खरीखुरी भूमिका जगतो , ढळढळीत उघडे नागडे सत्य जगत असतो हेच या सिनेमाचे सौंदर्य आहे या सिनेमातील काही ठिकाणी घेतलेले शांततेचे क्षण खरोखर ताकतवान आहेत आणि अत्यंत महत्वाच्या क्षणीही वाद्यांचा गोंगाट नाही हे पण महत्वाचे
    ग्रेट ग्रेट आणि ग्रेट ! अजून एकदा दोनदा तीनदा बघावासा वाटतोय !

    ReplyDelete
    Replies
    1. Great ? Third Class "aappa bappa" and his third class thoughts !!!

      Delete
    2. किती खोटी Accounts open करून तीच व्यक्ती लिखाण करीत राहणार आहे, समजायला मार्ग नाही? आप्पा-बाप्पा, केवलभाई-रमणभाई, प्रज्ञा बडोदेकर, अमृता विश्वरूप, पद्मजा कुंभारे, समीर घाटगे, दत्तात्रेय आगाशे, प्रतिभा-प्रतिमा या व अशा अनेक नावांनी एकच व्यक्ती लिखाण करीत असते, हे सूर्यप्रकाशा एवढे स्पष्ट आहे. स्त्रियांची नावे वापरून लिहायला सुद्धा याला लाज वाटत नाही.

      अनुज, बारामती

      Delete
  10. आप्पा- काय हो बाप्पा डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन काल सहा महिने उलटले, अजूनही मारेकरी व सूत्रधार सापडले नाहीत.

    बाप्पा- कसे सापडतील, हे काम त्यांच्या विरोधकांनी अगदी शांत डोक्याने केलेले आहे.

    आप्पा- ते कसे काय?

    बाप्पा- अहो, विरोधकांनी असे अनेक खून पचविले आहेत. यावेळी त्यांनी मागे अजिबात पुरावा सोडलेला नाही, भोडोत्री मारेकऱ्यांना सुद्धा यांनी मारून टाकले आहे कि काय अशी शंका येते आहे.

    आप्पा- मारेकऱ्यांनी वापरलेली मोटार सायकल सुद्धा पार्टन-पार्ट सुटा करून भंगार वाल्यांना ठराविक कालावधीच्या अंतराने फुकट दिले कि काय अशी सुद्धा शंका येते आहे.

    बाप्पा- तुम्हाला शंका येते आहे, मलातर खात्रीच वाटते आहे.

    आप्पा- पण पोलिस काय करीत आहेत?

    बाप्पा- ते बिचारे तपासाची दिशा शोधत असतील !

    आप्पा- आणि सरकार?

    बाप्पा- सरकारने तर खून पचविला आहे आणि वरून ढेकरही देत आहे.

    आप्पा- म्हणजे या मागे सरकारचे कारस्थान सुद्धा असू शकते काय?

    बाप्पा- तसे नव्हे, तर सरकारला गुन्हेगार माहित असतील, मात्र ते उघड करण्यास सरकार घाबरत असेल.

    आप्पा- निवडणुका जवळ आल्या असताना ती नावे जाहीर झाल्यास एका मोठ्या वर्गाकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    बाप्पा- कोणता मोठा वर्ग?

    आप्पा - तोच, जो दाभोलकरांना मारण्याची भाषा करीत होता, अंधश्रद्धा विधेयकास बेंबटापासून ओरडून विरोध करीत होता. धर्मच बुडाल्याची भाषा करीत होता. विधेयक हिंदू धर्मा विरुद्ध असल्याचे विष सनातन प्रभात मधून समाजात भिनवत होता.

    बाप्पा- माझे तर स्पष्ट मत असे आहे कि त्या सनातनच्या अभय वर्तकला टायर मद्धे घालून जो पर्यंत पोलिस बडवीत नाहीत तो पर्यंत धागे-दोरी हाती येण्याची सुतराम शक्यता नाही.

    आप्पा- मलाही तसेच वाटते आहे, बघू निवडणुका झाल्या नंतर तरी सरकारचे डोळे उघडतात कि नाही ते! तो पर्यंत तरी आपल्याला शांतच बसावे लागेल.


    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !

      केवलभाई-रमणभाई

      असेच लिहित रहा.

      अगदी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद !!!!!!!!!

      ओंकार नाईक

      Delete
    2. केवलभाई-रमणभाई ???????????

      Delete
    3. आप्पा-बाप्पा आणि केवलभाई-रमणभाई व्यक्ती एकच आहे !

      ओंकार नाईक

      Delete
    4. "माझे तर स्पष्ट मत असे आहे कि त्या सनातनच्या अभय वर्तकला टायर मद्धे घालून जो पर्यंत पोलिस बडवीत नाहीत तो पर्यंत धागे-दोरी हाती येण्याची सुतराम शक्यता नाही"

      होय, अगदी खरे आहे हे, दाभोलकरांच्या हत्ये मागे सनातन संस्कृती संस्थेचाच हात असण्याची शक्यता जास्त आहे. अभय वर्तक याला पकडून पोलिस का सत्य बाहेर काढत नाहीत, हे न कळे? अजूनही त्यांचे घाणेरडे लिखाण "सनातन प्रभात" मधून चालू आहे. यांचा बंदोबस्त करायलाच हवा!

      अविनाश पाटील.

      Delete
  11. आप्पा-बाप्पा अर्थात केवलभाई-रमणभाई असे खरे सांगण्याचे धाडस फारच थोडेच लोक करतात.

    अभिनंदन.

    ReplyDelete
  12. आप्पा-बाप्पा अर्थात केवलभाई-रमणभाई,

    तुम्ही आता खरेच सुधारल्यासारखे लिहित आहात, फालतू लिहित बसण्या पेक्षा असेच चांगले/समर्पक लिहिणे चालू ठेवा म्हणजे झाले!

    सचिन पुरोहित

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-बाप्पा ह्या थर्ड क्लास माणसाचा खोटारडेपणा जाणून घ्यावयाचा असल्यास याच ब्लोग वरील

      “साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद हा सन्मान नव्हे...जबाबदारी!- संजय सोनवणी
      Sunday, August 25, 2013”

      ह्या ब्लोग वरील सुरवातीची टिप्पणी आणि तिला मिळालेली प्रतुत्तरे सुज्ञांनी वाचावीत म्हणजे आप्पा-बाप्पा या बोगस नावाने लिखाण करणारी व्यक्तीची काय लायकी आहे ते समजून चुकेल.

      ओंकार नाईक



      Delete
    2. किती खोटी Accounts open करून तीच व्यक्ती लिखाण करीत राहणार आहे, समजायला मार्ग नाही? आप्पा-बाप्पा, केवलभाई-रमणभाई, प्रज्ञा बडोदेकर, अमृता विश्वरूप, पद्मजा कुंभारे, समीर घाटगे, दत्तात्रेय आगाशे, प्रतिभा-प्रतिमा या व अशा अनेक नावांनी एकच व्यक्ती लिखाण करीत असते, हे सूर्यप्रकाशा एवढे स्पष्ट आहे. स्त्रियांची नावे वापरून लिहायला सुद्धा याला लाज वाटत नाही.

      अनुज, बारामती

      Delete
    3. आपण सांगितलेले साहित्य संमेलनाचे वाचले आणि आवडले अतिशय अप्रतिम!
      विचारांची एव्हढी रेंज बघितली की कौतुक वाटते आप्पा बाप्पांचे त्यांचे ओरीगीणाल कौतुक केले सर्व प्रथम स्वतः संजय सोनवणी यांनीच त्यामुळे ते पुढे स्वातंत्र्य घेत गेले असावेत
      ओरीजनल आप्पा बाप्पाना सलाम !
      विनोद हा अवघड प्रकार आहे
      अलाणे फलाणे हे जयवंत दळवी याचे लिखाण हा आप्पा बाप्पा यांचा आदर्श असेल असे वाटते
      ओरिजनल आप्पा बाप्पा तुमच्या नावाची कोपी केली जात आहे यातच तुमचे यश आहे
      असेच खुसखुशीत लिहित जा !
      अनुजा बारामती

      Delete
    4. "आपण सांगितलेले साहित्य संमेलनाचे वाचले आणि आवडले अतिशय अप्रतिम!
      "
      अप्रतिम???????????

      जुना आप्पा बाप्पा म्हणजे खुळचट माणूस आहे, यात अजिबात दुमत असण्याचे कारण नाही. हा नालायक खोटारडा आणि खोटारडाच आहे. आणि वरून सारवासारव करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहे.याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे!

      अनुज, बारामती

      Delete
  13. बघा की जरा आमच पण ,
    आप्पा - हे तोतया आप्पा बाप्पा कुठून आले
    बाप्पा - या लोकाना काहीतरी लिहिताना आप्पा बाप्पाचा आधार घ्यावासा वाटतो यातच सर्व आले यांच्या आईची अनौरस प्रजा आप्पाबप्पाचे नाव लावू लागली की काय काय?
    आमचा आधार हवा आहे का ?

    आप्पा - पूर्वी असायचे नाही का - दुसरा शिवाजी तिसरा शाहू ,दहावा संभाजी - खरे आईबाप हातभट्टी पीत बसलेले असायचे किल्ल्याच्या भिंतीपाशी !आणि हे मिरवायचे छत्रपती म्हणून !
    बाप्पा -तसेच आता आप्पा बाप्पा सुरु झाले म्हणा की ! हा हा !
    आप्पा - अहो तुमचे झाले पांढरे , आता कशाला हा वाद ,खर खोट त्यांनाच माहित
    बाप्पा - हे सातारचे आप्पा बाप्पा ,रस्त्याच्या कडेला सापडलेले ! ओरीजनल पुण्याचे ,ते संपले
    डॉ दाभोलकर आणि मंडळींच मांडायला हे आप्पा बाप्पा कशाला ?
    आप्पा - एक मात्र खरे ,कैकाडी लोकांची माहिती अतिसुंदर ,असेच लिहित जा अननिमस !
    खरे आप्पा बाप्पा आता वसवसुन येतील अंगावर पण काही उपयोग नाही +कोकणस्थ सगळे एकजात * * *
    आम्हीपण प्रयत्न केला पण जमत नाही राव तसं - शेवटी ओरीजनल ते ओरिजनल
    एकनाथ खरात

    ReplyDelete
    Replies
    1. एकनाथ खरात हे बोगस नाव धारण करून आप्पा-बाप्पाने (हे सुद्धा बोगस नाव) हरामखोरी करीत वरील टिप्पणी लिहिली आहे. जुन्या ओरिजिनल(?) आप्पा-बाप्पा (जातीयवादी, खुळचट, ब्राह्मणी, हेकेखोर, आडदांड, अहंकारी, लाचार, अक्कल गहाण ठेवलेल्या) पेक्षा ह्या नवीन आप्पा-बाप्पाने चालू घडामोडीतील ज्वलंत विषय अतिशय उत्कृष्ट रीतीने हाताळला आहे. तरुण आप्पा-बाप्पांचे विचार म्हाताऱ्या आप्पा-बाप्पापेक्षा अनंत पटीने चांगले आहेत, यात अजिबात शंका नाही, यांनी प्रत्यक्ष मुद्यालाच हात घातला आहे. नवीन आप्पा-बाप्पा तुम्ही चालू घडामोडींवर असेच मार्मिक लिखाण करीत रहा, आमचा तुम्हाला पूर्ण पाठींबा आहे.

      अनिकेत व पंकज, विले-पार्ले.

      Delete
    2. संजय सोनवणी
      आप्पा बाप्पा यांच्या नावाचा वापर दुप्लिकेत होत आहे हेच त्यांचे यश आहे !
      अनिता पाटील विचार मंच यांनी जो खुलासा केला त्या साहित्य संमेलनाच्या संदर्भात , त्याबद्दल त्यांचे सादर आभार !इतरांनी विनाकारण चिखल फेकून घाण मात्र केली असे हे आप्पा बाप्पा , त्याना अनुल्लेखानेच मारता येईल
      पण तेकाहि वाईट करतच नाहीत , उलट हसत खेळत किहीत असतात , ते अवघड आहे
      आप्पा आणि बाप्प्पा , निराश होऊन , वैतागून थांबू नका , आम्ही आपले लेखन आवडीने वाचत असतो
      हम आपके साथ साथ है
      स्वतः संजय सोनवणी यांचे ऐकत जा , बाकीची माकड चेष्टा करणारच !

      Delete
    3. हा म्हातारा आप्पा बाप्पाच माकडचेष्टा करीत काही-तरी भंकस लिखाण करीत असतो. स्वतःला हा महामूर्ख विनोदवीर जरी समजत असला तरी तो त्याचा सर्वात मोठा भ्रम आहे, हे सांगणे न लगे! विनोद बुद्धी असायला डोके लागते, आणि हेच याच्या जवळ नाही तर हा काय विनोद करणार आणि हसविणार! रिकामटेकडा कुठला? निराश होऊन, वैतागून लिखाण बंद करील तर तो खोटारडा-धांदरट आप्पा बाप्पा कसला?

      अनिकेत व पंकज, विले-पार्ले.

      Delete
    4. आप्पा आणि बाप्पा यांचे बोलणे अभ्यास करून म्हाताऱ्या माणासा सारखे केलेले असते
      हे अनुज आणि अनुजा अनिकेत पंकज आणि ओंकार नाईक असे कसे लिहितात ?+ ,
      इतक्या साध्या ट्रिकला सर्व पटकन बळी पडून त्यांना शिव्या घालत सुटतात

      इतके मस्त लिखाण आम्ही अफाट आवडीने वाचतो
      आप्पा बाप्पांची पद्धत भारी आहे , उगीचच त्यांच्यावर कुणी टेपर ठेवला कि ते जाम चावत बसतात पण कुणाशी विनोदाने बोलायची वेळ आली कि एकदम धमाल !४५ - ५० वय असेल त्यांचे आणि लेखक असतील चांगले ,
      कदाचित , नाही . नक्कीच ते संजय सोनावणी चे मित्र असतील कारण संजय सर त्यांची बाजू घेत असतात कायम !कधीही त्या आप्पा बाप्पाला उलट बोलत नाहीत हे कसेकाय ?बहुतेक संजय सरांचेच कुणीतरी आप्पा बाप्पा बनत लिहून त्यांना मदत करत असतील
      अनिकेत पंकज आणि ओंकार नाईक यांनी साहित्य संमेलनाचे सांगितलेले आम्ही वाचले साहित्य संमेलनाबाबत आप्पा बाप्पांनी सुंदरच लिहिले आहे !दोघेही हसत हसत इतरांना सिरियस करतात आणि त्यांना बुद्धी नाही असे म्हणणे म्हणजे आपलीच इज्जत आपण काढण्यासारखे आहे +
      पण नीट पाहिले तर ब्राह्मण वाटतात किंवा सोनार वाटतात , सोनारच ! लिखाणाच तसे आहे !
      कधी कधी टांकसाळे तर नाहीत ना असे वाटते !
      आप्पा हिरणवळे पुणे गवळीवाडा

      Delete
    5. आप्पा बाप्पा "विदुषक" (बोगस) व्यक्ती! "वाचाळ" विनोद करणारी (बोगस) व्यक्ती, "धरणीला भार" झालेली (बोगस) व्यक्ती.............

      Delete
  14. या चित्रपटात मराठे हे वैदिक उच्च वर्णाचे प्रतिनिधित्व करतात हा सिद्धांत समाजाला नाही ,
    जरा समजावून सांगाल का
    वो बात कुछ हजम नही हुई
    बाय द वे हे आप्पा बाप्पा आणि केवल्भाई रमण भाई काय प्रकार आहे
    मुख्य चित्रपटाचा कौतुकाचा विषय डावलून हा कोणता आचरट पणा

    ReplyDelete
  15. संजय साहिब ,
    आपने बहुत अच्छा अभिप्राय देकार हमारी भावना सही तरहसे लोगोंको बतायि है
    आजकाल भाषा कोईभी हो ,सच्चा कलाका आविष्कार बहुत कम जगह नजर आता है इसका कारण येह है की कोईभी नया दायरेकटर या निर्माता किसीभी प्रकारकी जोखीम नाही उठाना चाहता
    हर चीज महेंगी हो रही है और सिनेमा भी इसको अपवाद नाही बन सकता
    इस सिनेमाकी कथा इस चित्रपट का प्राण है और उसको पेश करणा याह अपने आपमे एक च्यालेंज था उसको दिग्दर्शकने अच्छी तरह निभाया है
    इस मुव्हीको सलाम

    ReplyDelete
  16. एकनाथ खरात हे बोगस नाव धारण करून आप्पा-बाप्पाने (हे सुद्धा बोगस नाव) हरामखोरी करीत वरील टिप्पणी लिहिली आहे. जुन्या ओरिजिनल(?) आप्पा-बाप्पा (जातीयवादी, खुळचट, ब्राह्मणी, हेकेखोर, आडदांड, अहंकारी, लाचार, अक्कल गहाण ठेवलेल्या) पेक्षा ह्या नवीन आप्पा-बाप्पाने चालू घडामोडीतील ज्वलंत विषय अतिशय उत्कृष्ट रीतीने हाताळला आहे. तरुण आप्पा-बाप्पांचे विचार म्हाताऱ्या आप्पा-बाप्पापेक्षा अनंत पटीने चांगले आहेत, यात अजिबात शंका नाही, यांनी प्रत्यक्ष मुद्यालाच हात घातला आहे. नवीन आप्पा-बाप्पा तुम्ही चालू घडामोडींवर असेच मार्मिक लिखाण करीत रहा, आमचा तुम्हाला पूर्ण पाठींबा आहे.

    अनिकेत व पंकज, विले-पार्ले.

    ReplyDelete
  17. आप्पा-बाप्पा ह्या थर्ड क्लास माणसाचा खोटारडेपणा जाणून घ्यावयाचा असल्यास याच ब्लोग वरील

    “साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद हा सन्मान नव्हे...जबाबदारी!- संजय सोनवणी
    Sunday, August 25, 2013”

    ह्या ब्लोग वरील सुरवातीची टिप्पणी आणि तिला मिळालेली प्रतुत्तरे सुज्ञांनी वाचावीत म्हणजे आप्पा-बाप्पा या बोगस नावाने लिखाण करणारी व्यक्तीची काय लायकी आहे ते समजून चुकेल.

    ओंकार नाईक

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा बाप्पा या बोगस नावाने लिखाण करणाऱ्या रिकाम टेकड्या म्हातारबुवा (?) , तू तुझे खरे नाव सांगशील काय?

      ओंकार नाईक

      Delete
    2. आप्पा आणि बाप्पा यांचे संवाद एकदम कडक !
      हे अनुज आणि अनुजा बहिण भाऊ का असे लिहितात कायम ?
      त्यांनी सांगितलेले आम्ही वाचले साहित्य संमेलनाबाबत आप्पा बाप्पांनी सुंदरच लिहिले आहे !दोघेही हसत हसत दुसर्यांना अंतर्मुख करतात आणि त्यांना बुद्धी नाही असे वाटत नाही हुशार वाटतात
      पण अगदी भिंग लावून पाहिले तर ब्राह्मण वाटत नाहीत माली किंवा सोनार वाटतात , सोनाराच ! लिखाणाच तसे आहे !
      समीर घाटगे

      Delete
    3. आप्पा बाप्पा "विदुषक" (बोगस) व्यक्ती! "वाचाळ" विनोद करणारी (बोगस) व्यक्ती, "धरणीला भार" झालेली (बोगस) व्यक्ती.............

      Delete
  18. निमित्त फँड्रीचे

    माणूस म्हणून प्रत्येकाचा एक वेगळा संघर्ष असतो. मग तो त्याच्या परिस्थितीनुरूप असेल, जन्माने त्याला मिळालेली जात आणि जातीने तथाकथित समाज नावाच्या व्यवस्थेत त्याला मिळालेले स्थान यामुळे त्याच्या वाटय़ाला आलेला संघर्ष असेल.. हा संघर्ष, असं जगावं ही आतून असलेली उर्मी आणि तसं जगता येणार नाही हा जगाने दिलेला अनुभव यातून माणूसमन घडतं. कधीतरी मग शिक्षणाने असेल किंवा परिस्थिती बदलल्याने असेल तेच मन जेव्हा या कुंपणातून बाहेर पडतं आणि मग मागे वळून पाहताना कुंपणातलं ते अस्वस्थ, मनात साचून राहिलेलं जगणं पडद्यावर उतरतं तेव्हा 'फँड्री'सारखी कलाकृती जन्माला येते. मनातल्या उर्मीला मारून टाकणारं जगणं, त्यातली अस्वस्थता इतरांच्या काळजालाही भिडली आहे हे 'फँड्री'ला मिळालेल्या विविध पुरस्कारांवरून आणि प्रतिक्रियांवरून सिध्द झालं आहे. पण, एक सर्वसामान्य माणूस ते दिग्दर्शक हा प्रवास अनुभवणाऱ्या नागराज मंजूळे आणि त्यांच्या टीमचे 'फँ ड्री' जगतानाचे अनुभव खास वाचकांसाठी.. 'फँ ड्री' माझ्या जगण्याची गोष्ट आहे हे दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. पण, 'फँ ड्री'ची कथा-पटकथा लिहित असताना त्यांचं ते जगणं त्यांनी पुन्हा अनुभवलं. 'लोकसत्ता'च्या कार्यालयात रंगलेल्या गप्पांच्या कार्यक्रमात नागराज मंजूळे यांनी चित्रपटातली जब्याच्या मनातली अस्वस्थता, न्यूनगंड आपल्यात कसा आणि का निर्माण झाला होता याचा अनुभव सांगितला.
    सिनेमातला जब्या साकारताना अनुभवी कलाकार नको होता, असे नागराज मंजूळे यांनी सांगितलं. हलगी वाजवणाऱ्या काळ्या, उंच सोमनाथला पाहून हाच आपला जब्या असं त्यांच्या मनात आलं तरी जब्या साकारण्यासाठी सोमनाथने मात्र तीन महिने त्यांना पळवलं. एकीकडे सोमनाथची ही तऱ्हा तर पिऱ्या साकारण्यासाठी सूरजचा विचार त्यांनी केला नव्हता. सूरजने त्यांच्या 'पिस्तुल्या'त काम केलं होतं आणि त्याला पुरस्कारही मिळाला होता. पण, सूरज खूप बारीक आहे त्यामुळे या चित्रपटात त्याला घेता येणार नाही असं नागराजच्या मनाने घेतलं होतं. सूरजला मात्र काहीही करून चित्रपटात काम हवं होतं. म्हणून त्याने वाट्टेल ते प्रयत्न केले आणि सातत्याने ऑडिशन देत राहिला. शालू ही त्यांनी अगदी गावातली साधी मुलगी वाटावी अशीच हवी होती. राजेश्वरी शालूच्या भूमिकेत साधी दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र चित्रपटात काम करायचं हे ऐकूनच तिने आणि तिच्या बहिणीने घरात धुमाकूळ घातला होता. या तिन्ही मुलांमुळे एक मोठी गोष्ट नागराजच्या हातात लागली होती ती म्हणजे त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर या तिघांसह अन्य कलाकारांचीही भाषा, त्यांची संवाद बोलण्याची ढब, हेल एकच वाटला. वेगवेगळे कलाकार येऊन एकच भाषा बोलायचा प्रयत्न करत आहेत असं वाटलं नाही इतकं सहजपणे ते जमून आलं...

    ReplyDelete
  19. आणि सारा वर्ग माझ्याकडे पाहून हसला

    हा चित्रपट म्हणजे माझ्या जगण्याची गोष्ट आहे. लहानपणापासून जे पाहिले, अनुभवले, जाती व्यवस्थेचा एक भाग म्हणून जे काही बरे-वाईट अनुभव वाटय़ाला आले ते कुठेतरी मनात साचलेले होते. लहानपणापासूनच किंवा मला कळायला लागल्याच्या वयापासूनच मनात न्युनगंड आला होता. जात, रंग, रूप, समाजातील स्थान, मिळालेली वागणूक, आजुबाजूचे लोक, समाज यांच्याकडून आलेल्या अनुभवातून हा न्युनगंड अधिक ठळक होत गेला. अगदी साधी बाब म्हणजे माझे नाव. 'नागराज' म्हणजे चित्रपटातील खलनायकाचे असलेले नाव माझे होते. नायकांची नावं कशी असतात प्रेम, आदित्य..तसं माझं नाव नव्हतं आणि ते तसं का नव्हतं याचं उत्तरही माझ्या बापाक डे नव्हतं. लहान वयात अगदी साध्या, क्षुल्लक वाटणाऱ्या माझ्या गरजा पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. मग यात शाळेत जाण्यासाठी भाडय़ाने सायकल घ्यावीशी वाटणं असो. अगदी छोटय़ा गोष्टी. जीन्सची पँट हे तेव्हा माझ्यासाठी मोठं स्वप्न होतं. या सगळ्या नाकारल्या गेलेल्या गोष्टीतून एक न्यूनगंड तयार होत गेला.
    माझा हा न्यूनगंड कमी होण्याऐवजी तो वाढवणाऱ्याच घटना माझ्या वाटय़ाला यायच्या. महाविद्यालयात शिकत असताना आम्हाला श्री. म. माटे यांचा एक धडा होता. मला पुस्तक वाचायची आवड असल्याने माटे असोत किंवा कोणीही बऱ्याचशा लेखकांची पुस्तकंच्या पुस्तकं वाचून काढली होती. त्यामुळे माटेंनी लिहिलेल्या त्या कथेत एका गवंडी कामगाराकडून मुलीची छेड काढली जाते, तेव्हा ती मुलगी त्याची 'काळ्या वडऱ्या'अशा शब्दांत संभावना करते, असा प्रसंग होता हे मला आधीपासूनच माहिती होते. तो शब्द माझ्यासाठीच लिहिलेला आहे त्यामुळे हा धडा शिकवताना आपण वर्गात असलो तर सगळे काळ्या रंगामुळे आपल्याकडेच पाहतील, अशी मनात भीती होती. त्यामुळे मी काही दिवस चक्क दांडी मारली होती. महाविद्यालयात जाणं टाळत होतो. त्या दिवसांत हा धडा शिकवून झाला असेल, असं मला वाटलं होतं. पण, तसं व्हायचं नव्हतं. मी नेमका ज्या दिवशी वर्गात गेलो, त्याच दिवशी हा धडा शिकवला गेला. आणि त्या प्रसंगातला 'काळ्या वडऱ्या' असा शब्द बाईंनी उच्चारल्यानंतर संपूर्ण वर्ग माझ्याकडे पाहून खदाखदा हसला होता. 'हाच तो' असा कुत्सित भाव त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होत होता.
    वास्तवाचं भान हे तेव्हापासून आलं होतं. आपल्याकडे आजुबाजूचे लोक कुत्सित नजरेने पाहतात, हसतात त्याचं खूप वाईट वाटायचं. आपलाही सन्मान व्हावा, मान मिळावा, असं आतून वाटायचं. 'फँड्री' तयार करण्याचा विचार मनात आला तेव्हा आपल्या जगण्यातल्या गोष्टी त्यात मांडल्या पाहिजेत, असं मी ठरवलं होतं.

    ReplyDelete
  20. माणसाच्या मनातील माणुसकीला आवाहन
    हा चित्रपट खूप चांगला आहे, पाहिल्यानंतर अस्वस्थ करतो इथपासून ते यात काही नाही, फालतू आहे, असे म्हणून हसण्यावारी नेणारे असे वेगवेगळे अनुभव सध्या येत आहेत. काहींना हा चित्रपट प्रायोगिक वाटतो आहे. पण मला तसे वाटत नाही. सर्वसामान्य माणूस, बुद्धिजीवी ते अगदी अडाण्यापर्यंतच्या प्रेक्षकांना हा चित्रपट समजतो, कळतो. हा चित्रपट पाहतांना प्रत्येक जण त्याच्याशी जोडला जातो. ही प्रत्येकाला आपली गोष्ट वाटते. जात, धर्म, भाषा, प्रांत यांच्या भींती ओलांडून हा प्रत्येकाला आपला वाटतो. 'फँड्री' चित्रपट प्रत्येक माणसाच्या मनातील माणुसकीला, त्याच्यातील माणसाला आवाहन करतो. चित्रपटात जे आणि जसे आहे ते तसेच मांडले आहे. प्रेक्षकांना आवडावे म्हणून वेगळे असे काहीही केलेले नाही. म्हणूनच प्रेक्षकांना ते भावले आणि थेट मनाला भिडले असावे.
    नागराज मंजुळे (दिग्दर्शक)
    आणि आम्ही सिनेमा केला
    सिनेमा म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. मला मुळी कामच करायचं नव्हतं. हलगी वाजवताना मला नागराज दादाने बघितलं आणि त्याने सिनेमासाठी विचारलं पण, तेव्हा मला जमणार नाही. मला काय आवड नाही.. असं सांगून मी पळालो होतो. पहिल्यांदा नागराज दादाला पाहिल्यावर हा दिग्दर्शक तरी आहे का?, असाच प्रश्न माझ्या मनात आला होता. पण, तो रोज घरी येतच राहिला. माझ्या नकळत माझ्या वडिलांनी परवानगी देऊन टाकली होती. पण, मी तयार नव्हतो. हे घरी आले की मी धूम पळून जायचो. तासचे तास घरी यायचो नाही. पण, तीन महिने सतत घरी येत होते. त्यांनी काय माझा नाद सोडला नाही.. मग मीच एकदिवस सेटवर गेलो. आणि काम करायचंय सांगितलं. सेटवर खूप मजा होती. चांगलं भरपेट खायला मिळायचं. मी काय करतो आहे हे मला फारसं कळायचं नाही. नागराज दादाने अमूक एक किंवा या प्रकारे अभिनय करा, तमूक प्रसंगात असं वागा, अशा सूचना कधी दिल्या नाहीत. फक्त तो सांगायचा आणि आम्ही तसं वागायचो. खरं तर आम्ही चित्रपटाचं चित्रीकरण करतोय, असं कधीच वाटलं नव्हतं पण, ज्या दिवशी सिनेमा स्वत: पाहिला तेव्हा मला काय झालं माहिती नाही. ढसाढसा रडलो आणि तीन दिवस सतत रडतच होतो.. '

    ReplyDelete
  21. सोमनाथ अवघडे
    मी चित्रपट करणार हेच मला मजेचं वाटत होतं
    नागराज दादांनी मला पाहिले होते. ते आणि अन्य काही जण आमच्या घरी आले. ते आले तेव्हा खूप रात्र झालेली होती. हे आता काय करणार, अशी भीती तेव्हा वाटली. पण त्यांनी आम्ही सिनेमाच्या कामासाठी आलो आहोत, असे सांगितले. चित्रपटातील माणसे, तेथील वातावरण याबाबत वडिलांना जरा काळजी वाटत होती. पण नागराज दादा यांनी वडिलांना निर्धास्त केले. चित्रपटासाठी माझी निवड झाली, ती गोष्ट मला आणि माझ्या बहिणीला खूप 'एक्सयाटिंग' वाटत होती.
    राजेश्वरी खरात
    मला काम करायचंच होतं
    मी खूप बारीक होतो. बारीक असल्यामुळे ते मला चित्रपटात घेतील की नाही, अशी भीती वाटत होती. आणि ते मला घेणार नाहीत ही माहितीही काढली होती. पण, मला काहीही करून काम करायचं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून मी भरपूर खायला, जेवायला लागलो. फारच खायचो मी तेव्हा आणि त्यामुळे माझ्या तब्येतीत फरक पडला मी थोडा जाडही दिसायला लागलो. मग मला पिऱ्याची भूमिकाही करता आली.
    सूरज पवार
    संघर्ष आयुष्याला आकार देतो
    मी 'सत्यदेव दुबे' स्कूलचा विद्यार्थी आहे. नाटक आणि अभिनयाबाबत येथे मी जे काही शिकलो, अनुभव घेतला आणि घडत गेलो, त्या पद्धतीने मी आजपर्यंत काम करतो आहे. त्यामुळे प्रेक्षकांना माझे काम वेगळे वाटते. अर्थात यात श्याम बेनेगेल, गोविंद निहलानी, अमोल पालेकर या आणि अन्य सर्व दिग्दर्शकांचा मोठा वाटा आहे. 'फॅड्रीं'तील 'कचरु माने' मला पूर्णपणे नवीन होऊन साकार करायचा होता. माझा आजवरचा अभिनय, अनुभव आणि जमा केलेले संचित हे सर्व मी उतरवून ठेवले आणि पूर्णपणे नवीन होऊन काम केले. जर मी अभिनय करायला लागलो तर मला तेथेच थांबव, असे मी नागराजला सांगितले होते. इथे मी अभिनेता म्हणून माझा 'अहं' कधी गळून पडला ते माझे मलाच कळले नाही. माणूस म्हणून जगताना प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो आणि हाच संघर्ष माणसाच्या आयुष्याला आकार देत असतो.

    ReplyDelete
  22. ये 'फँड्री' क्या है
    'फँड्री' प्रदर्शित झाला तेव्हा मी तिग्मांशू धुलियाच्या चित्रपटात काम करत होतो. तर तिथे त्यांच्या सेटवर या चित्रपटाची चर्चा चालू होती. 'गुंडे' सारख्या यशराजच्या मोठय़ा हिंदी चित्रपटासमोर 'फँ ड्री' जोरात चालतोय. या चित्रपटात एक किशोर कदम हा आपल्या हिंदीतील लोकांसाठी ओळखीचा चेहरा आहे तो सोडून बाकीचे सगळे अगदीच नविन आहेत आणि तरीही चित्रपट चांगला चालतोय, याबद्दल तिग्मांशूने आश्चर्य व्यक्त केलं. दक्षिणेकडील निर्माते-दिग्दर्शक यांच्यातही या चित्रपटाविषयी कुतुहल आहे. हिंदीच्या तुलनेत इतक्या कमी बजेटमध्ये इतका चांगला चित्रपट कसा तयार झाला याचेही 'बॉलिवूड'च्या या मंडळींना आश्चर्य वाटते आहे. त्यामुळे 'ये 'फँड्री' क्या है' अशी चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं की 'फँड्री'च्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक मैलाचा खांब रोवला गेला आहे.
    ------------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete
  23. हिंदू मानसिकता आणि फॅसिझम

    इस्लामच्या आक्रमकतेचे भय आणि पक्षपाती 'सर्वधर्मसमभाव'वाल्या राज्यकर्त्यांविषयीची उद्विग्नता यांनी ग्रस्त असलेले हिंदू लक्षणीय संख्येने आहेत हे खरेच. पण याचा अर्थ त्यांना मुस्लीम माणसांविषयी द्वेष वाटतो असा नाही. तसा द्वेष पसरवण्याचे प्रयत्न कटाक्षाने हाणून पाडलेच पाहिजेत. परंतु त्यासाठी 'हिंदू-फॅसिझम नावाचे संकट येऊ घातलेले आहे' असे आणखी एक भय ओढवून घेण्याची गरज नाही.
    प्रथम काही तथ्ये स्पष्टपणे अधोरेखित केली पाहिजेत. हिंदू धर्म नावाचा एकच एक व संघटित असा रिलिजन कधीच अस्तित्वात नव्हता व यापुढेही असणार नाही. एकमेकांशी सरमिसळ झालेले अनेक धर्माचरण-पंथ आणि तितक्याच वैविध्यपूर्ण श्रद्धा याच्या एकत्र समुच्चयाला, 'सिंधू नदीच्या पलीकडले' असे, अरब उच्चारणात 'स'च्या जागी 'ह' वापरण्याच्या दोषातून त्यांनी पाडलेले ते भौगोलिक नाव आहे. व्हॅटिकनच्या पोपप्रमाणे उदाहरणार्थ शंकराचार्याच्या हाताखाली नोकरशाही अस्तित्वात नाही व फतवे अमलात आणेल अशी दंडसत्ताही नाही. गावोगावीचे ब्राह्मण (व काही इतर जातींचे पुरोहित) अधर्म तर घडत नाही ना यावरचे निर्णय परस्पर देत असत, पण सत्ता जात-पंचायती, गाव-पंचायती व स्थानिक राजेरजवाडे यांचीच असे. पुरोहितांचे खरे कौशल्य धर्माप्रमाणे निवाडा देणे हे नसून झालेले निवाडे धर्मात बसते करून दाखवणे हे असे. जसे शापांना उशाप असायचेच तसेच चुकांना भरपाईवजा उपाय निघायचेच व आजही निघत आहेत. त्यामुळे हिंदू परंपरा परिवर्तनशील असण्यात आश्चर्य असे काहीच नाही. दंभ ही दुरिताने श्रेयाला दिलेली मानवंदना असते! दंभ या मूलत: वाईट गोष्टीचा चांगला उपयोग करून घेण्याचे श्रेय हिंदू परंपरेला दिलेच पाहिजे. सुधारणा करणे भागच पडते आहे असे दिसताच ती 'बसती' करून घेण्याला आधार मिळण्यासाठी बहुजिनसी शास्त्रार्थ निघू शकतील अशा भरपूर श्रुतिस्मृती व पुराणे आहेत. गीता हा एकच एक ग्रंथ मानला तरी तीत विविध उलट सुलट गोष्टींना आधार देणारी सर्व-दर्शन-जत्रा उपलब्ध आहे.

    ReplyDelete
  24. हिंदू-नोंदीत नागरिकांमध्ये नगण्य अल्पमतात असलेले 'सनातनी', हिंदू-धर्म हे नावही टाळून सनातन-वैदिक-धर्म नावाचा एकच एक धर्म वैध असल्याचे दावे करत असतात. पण बौद्ध व जैन हे अ-वैदिक जरी बाजूला ठेवले तरी वेदप्रामाण्य मानणाऱ्यांतसुद्धा अजिबात एकवाक्यता नाही. उपनिषदे हा वेदांचा शेवटचा काव्यात्मक भाग आध्यात्मिक असला, तरी यज्ञ-प्रधान भाग चक्क सुखवादी असून त्यात ईश्वरही नाही आणि मोक्षही नाही. उपनिषदाधारित 'वेदांत' या आध्यात्मिक प्रवाहातसुद्धा 'शांकरमताची' मक्तेदारी मानणे निराधार आहे. अनेक आचार्यानी पूर्वीच इतर पंथ काढले. नंतरच्या काळातसुद्धा खुद्द ज्ञानेश्वरमहाराजांनी शांकरमताशी बंडखोरी केलेली आहे. अगदी अलीकडच्या काळात उपनिषदांपासूनच निष्पन्न केलेला, डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकरमहाराज यांचा पूर्णवाद, हा इतका इहवादानुकूल आहे की तो जर पूर्वीच्या काळीच सापडला असता, तर हिंदू-रेफम्रेशन व एन्लायटनमेंटसुद्धा घडली असती की काय? असे माझ्या आशावादी मनाला वाटते. सेंट थॉमस अक्वायनसने ग्रीक तत्त्वज्ञानाला ख्रिस्तमार्गात स्थान मिळवून दिले. ''म्हणोनी अक्वायनसचा थोरू। विश्वासि जाहला उपकारू। अरिस्टॉलोक्ति उच्चारू। ख्रिस्ताचा केला.'' ख्रिश्चॅनिटीमध्ये प्रेषितोक्त धर्माचे दोष असूनही चर्च इतपत सुधारले की 'नास्तिकसुद्धा कृपा-प्राप्त होऊ शकतो' असा निर्वाळा सध्याच्या पोपनी दिला.
    सतान नस्से, सखा-ईश्वर व 'ए.टी.के.टी'
    ईश्वराच्या असण्याने काय तोटे होतात यावर खूपच बोलले गेलेले आहे. पण सतानाच्या नसण्याने किती प्रचंड फायदा होतो, हे अगदीच दुर्लक्षित राहिले आहे. ''राजा त्रलोक्याचा गुरुराज स्वामी वसे अंतर्यामी पांडुरंग'' - एकनाथ, अवघाची संसार (म्हणजे िहदीतला 'सन्सार') सुखाचा करीन आनंदे भरीन तीन्ही लोक, - तुकोबा, अशी वचने भरपूर सापडतात. 'वसेअंतर्यामी'मुळे तो कोणीतरी बाहेरचा बॉस राहात नाही. तिन्ही लोक म्हटले की नरकाला व्यापणारा, नरकाचाही स्वामी आणि पापी जिवांच्या अंतर्यामी राहून दु:ख 'भोगणारा'ही ईश्वरच राहतो! 'दुरितांचा स्वयंभूनिर्माता असा जो सतान' तो हिंदू परंपरेत कुठेही नाही. जीव दुरितांच्या आधीन होतो तो अज्ञानामुळेच आणि अज्ञान हे अभावात्मक असल्याने, ती युद्ध पुकारून पराभूत करण्याची गोष्ट नसते.

    ReplyDelete
  25. सतान न मानण्याने जगाचे युद्धकेंद्री मॉडेलच कोसळून पडते. पारशी धर्मात एक सतानसदृश पदार्थ आहे. पण माणसाकडे सोपवलेले कार्य हे ईश्वराला फक्त सत्कृत्यरूपी 'रसद' पुरवण्याचे आहे 'कुमक' पुरवण्याचे म्हणजे त्याच्या सन्यात भरती होण्याचे कार्य माणसाकडे नाही. पारशी हे उद्यमशील आणि उदार असतात, पण जगाला पारशी करून सोडावे असे कर्तव्य त्यांना नसते.
    जे कुमक म्हणून भरती होतात ते क्रुसेड/जिहाद या मानवताविरोधी प्रकल्पात कृतकृत्यता मानू लागतात. सतानाच्या प्रभावाखाली आलेल्यांना सक्तीने, एकमेव प्रभूचे पाईक तरी बनवायचे किंवा नष्ट तरी करायचे, हे कार्य माणसावर सोपवलेले असले तरच 'सिहसक धर्मप्रसार' उद्भवतो. धर्म नावाच्या गोष्टीतून आलेल्या अनेकांपकी सर्वाधिक चिंताजनक प्रकार नेमका हा आहे. एकुणातच माणसाने करण्याची कामे ईश्वरावर सोडायची आणि ईश्वराने करण्याची कामे माणसाने हाती घ्यायची हा सर्वात मोठा लोच्या आहे.
    सतान व त्याचा युद्धात पराभव ही भानगड िहदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी या कोणातच नाही. ज्यूडाइझम, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम यातच ती आहे. त्यात वर म्हटलेल्या ''अक्वायनसच्या थोरू''मुळे ख्रिश्चनांत बऱ्याच सुधारणा झाल्यात. अ‍ॅनाबाप्टिस्ट या ख्रिस्ती पंथात तर आपले अपत्य प्रौढ होऊन त्याच्याशी वाद घालून त्याला पटविल्याखेरीज, बाप्तिस्मा द्यायचाच नाही अशी पद्धत आहे. इतके श्रद्धास्वातंत्र्य इहवादी राज्य-घटनासुद्धा देत नाही!
    हिंदू परंपरेत इतरांच्या मोक्षप्राप्तीची चिंता करायचीच नसते. त्यांना तो मिळणारच असतो. फरक फक्त किती जन्मांनंतर तो मिळेल एवढाच पडतो. ज्याच्या त्याच्या मगदूराप्रमाणे तो मिळतोच. ईश्वरप्रेमामुळे मगदूर वाढू शकतो तो मानसिकदृष्टय़ा, पण निष्ठावान म्हणून वशिला लागत नाही. सुकृत भरपूर असेल तर ''तत्त्वमसि'' हे वाक्य चुकून ऐकणाऱ्या लाकूडतोडय़ालाही तो मिळू शकतो. कोणत्याही जिवाला हिंदू तत्त्वज्ञान (जसे वस्तूंना विज्ञान लागू असावे तसे) लागू असतेच. त्यासाठी ना त्याला हिंदू गणले जाण्याची गरज असते ना इतरांना! जे मोक्षमार्गात मागे पडलेत, त्यांना सुचवून पहावे पण त्यांची प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर ईश्वरही काही करू शकत नाही.
    पापे ही पुण्यांनी कॅन्सल आउट होतात. म्हणजे दोन्ही भरपूर केली तरी तुमची केस ही नेट पुण्यवान ठरू शकते. बरे! चालू जन्मात चुकारपणा झालाच तरी ए.टी.के.टी.ची गॅरंटी असतेच. ज्यांना एकच एक जन्म आणि एकदाच निकाल, 'थेट स्वर्ग तरी नाहीतर थेट नरकच' आणि निष्ठा (फायडेलिटी) हेच पुण्य असे असते, त्यांच्यात जिहादीपण शिरू शकते. याउलट, िहदू ए.टी.के.टी.मुळेच अटीतटीला येत नाही.

    ReplyDelete
  26. युरोपियन हे 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशा थाटात, एकदम असा तरी नाहीतर तसा, तुटक निकाल लावतात. आशियाई हे निर्णयाभोवती गोलगोल फिरत स्पायरलमाग्रे जवळ पोहोचून, आता जवळ जवळ झालाच आहे असे म्हणून अलगदपणे निर्णय घेतात व त्यात परतीचा मार्गही शिल्लक ठेवतात. विरुद्ध गोष्टी बऱ्याच अंशी मिसळलेल्या असतात. भारतातील िहदूंत व इतरांतसुद्धा सर्वच बाबतीत अनौपचारिकता, व्यक्तिगत संबंध, गोड मानून / चालवून घेणे व कमालीची शिस्त-अ-प्रियता आहे. त्यांचे रेजिमेंटेशन अशक्य आहे. लोकसंग्रहार्थ (म्हणजे सामाजिक शिस्त रहावी म्हणून) प्रसंगोपात्त 'खल-निर्दालन' जरी उल्लेखिले गेले, तरी मुख्य शिकवण, ''खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढो'' हीच आहे. ईश्वराला सखा मानणे ही िहदूंची खासियत आहे. श्रीकृष्ण हा या गोष्टीचा शिखरिबदू (एपिटोम) आहे. तमाशात कृष्णावर आणि कृष्णाच्या तोंडी जे विनोद येतात ते ऐकून कोणाही भाविकाच्या भावना दुखावत नाहीत. िहदुत्ववादी सुधीर फडके व परंपरानिष्ठ गदिमा यांनी केलेले पुढील सिनेगीत भाविकांनी निरागसतेनेच घेतले.
    ''कृष्ण तुझा बोले कैसा ऐक ग यशोदे लपविलेस चेंडू म्हणतो उरी तूच राधे
    ..परतुनी मला दे
    कटिस मिठी मारी झोंबे मागतो रडूनी निरी धरून येऊ बघतो वरी हा चढोनी
    बाळपणी जाईल वाया जन्म अशा नादे.. परतुनी मला दे''
    जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी अस्तित्व, पुष्पं-पत्रं-फलं-तोयं अशा अíपण्याच्या गोष्टी, हे सारे खोलवर रुजलेले आहे. एसटीतून जाताना नदी लागली की अनेकांचे हात जोडले जातात. बसमध्ये दिवे लागले तरी हात जोडले जातात, टेक्स्टबुकला पाय लागला तर नमस्कार केला जातो. सावता माळ्याने श्रमातच विठ्ठल बघणे अशा अनेकानेक गोष्टींतून 'भावतोची देव' हे रुजलेले आहे.
    फॅसिझम/नाझीझमचे विशिष्ट स्वरूप
    कोणतीही क्रूर हुकूमशाही (टायरनी) अशा व्यापक अर्थाने फॅसिझम हा शब्द वापरणे योग्य नाही. भांडवलशाहीच्या एका अवस्थेत, इतरत्र प्रत्यक्ष साम्राज्य करूनच, अंतर्गत कोंडी सोडवता येणे, हे भांडवली राष्ट्रांना शक्य होते. त्यात ज्या राष्ट्रांनी यशस्वीरीत्या प्रत्यक्ष साम्राज्ये स्थापली नाहीत, त्यांना अभिजात भांडवली अरिष्ट भोगावे लागले. जनतेची दुरवस्था ही 'आपले साम्राज्य नाही म्हणून' अशी मांडता आली. अगोदरपासून साम्राज्ये असलेल्या राष्ट्रांना पराभूत करून 'आपले' साम्राज्य स्थापणे हाच एक 'तरणोपाय' असल्याचे जनतेला पटविता आले. लष्करीकरण, आक्रमकता आणि एकायतन सत्ता या गोष्टी जनतेलाही आवश्यक वाटल्या. त्यातून नाइलाजाने नव्हे तर ओजस्वी असूनही अनुयायी 'लाभले.' अंगात युद्धज्वर संचारावा यासाठी टोकाची द्वेषाधिष्ठित प्रेरणा निर्माण केली गेली. जर्मनीत शुद्ध आर्यन रक्त आणि ज्यू हे सर्व संकटांचे कारण ही खोटी गोष्ट काही काळ तरी बहुतेकांना खरी वाटली. 'हीच संधी आहे नपेक्षा सतान जिंकेल' ही कडेलोटाच्या काठावर असल्याची भावना, प्रेषिती व ग्रांथिक धर्माच्या पाश्र्वभूमीमुळे भल्याभल्यांच्या अंगात भिनू शकली. सत्य कळल्यानंतरचा जर्मनांचा पश्चात्ताप, सर्वच युरोपात पसरलेले असारवादी स्मशान-वैराग्य यातून आता सर्वच जग बरेच सावरले आहे. सतानाचा पराभव करण्याचा प्रकल्प हाच खरा सतान आहे ही अक्कल आता बऱ्याच जणांना आलेली आहे.
    मुख्य म्हणजे आता जागतिक भांडवलशाहीचे स्वरूप असे बनले आहे की अप्रगत देशातील श्रमिकांना घाबरणारा उलटय़ा काळजीचा व्यापार-टाळू-पणा प्रगत देश दाखवत आहेत. आता चीन विरुद्ध भारत ही स्पर्धा युद्धाने ठरणारी राहिलेलीच नाही. आज जर भारताला चीनवर लष्करी विजय मिळवण्याची निकड (क्षमतेचे सोडा) असती आणि भारतात एखादी चिनी-वंशाची जमातही असती तरच आज भारतात नाझीझम/फॅसिझम हे शब्द मूळ अर्थाने वापरता आले असते.

    ReplyDelete
  27. भारतीय राजकारणात मूल्यप्रणालींचे सपाटीकरण झाले आहे. काँग्रेसला पर्याय देऊ शकणारे कोणीतरी भक्कम हवे इतपतच हिंदुत्ववाद्यांचा खरा रोल आहे. खुद्द काँग्रेसमध्ये देदीप्यमान चिवटपणा आणि भाविक असूनही (किंबहुना भाविक असल्यामुळेच) हिंदुत्ववादी नसलेल्या हिंदूना आपल्याबरोबर राखण्याची क्षमता आहे. प्रांतीय पक्ष, कुंपणावरील पक्ष आणि थर्ड फ्रंट हे सारे मिळून काँग्रेसविरोधी मते प्रचंड प्रमाणात फोडू शकतात. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना निर्णायक बहुमत मिळणेच मुळात अवघड आहे. खुद्द हिंदुत्ववाद्यांचे अंतर्गत उपप्रकार हा एक स्वतंत्र मोठा विषय आहे. पण त्यात सनातनीही निष्प्रभ आहेत व गंभीर-फॅसिस्टही. हे सर्व राजकीय वास्तव, हिंदूंअंतर्गत जातिसंघर्ष व त्यांची वर मांडलेली मानसिकता, हे सारे लक्षात घेतले तर 'हिंदू-फॅसिझम'चा उदय होईल की काय? हे भय किती काल्पनिक आणि अनावश्यक आहे हे सहज ध्यानात येईल.
    --------------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete
  28. संजय सर ,
    प्रथम २२ फेब्रुवारी ला ज्या कोणी एक लिखाण लिहिले आहे फ्यांड्री संदर्भात ( हिंदू मानसिकताआणि फ्यासीझम ) त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि संजय सरांचे सुद्धा , कारण अशा सुंदर लेखाला त्यांनी जागा दिली
    फक्त त्या ज्यांनी तो लेख लिहिला त्यांनी आपले नाव लिहायला हवे होते अशा लोकाना खरोखर प्रत्यक्ष भेटून चर्चा करायला फारच छान वाटेल
    इतके सखोल विचार आजकाल वाचायला मिळत नाहीत भारतातील परिस्थितीचे आणि समाजाच्या मनोवृत्तीचे परिणामकारक विवेचन अगदी आमच्या हृदयातले दैवत असलेल्या नरहर कुरुन्दकर सरांची आठवण येते आहे
    संजय , एक विनंती म्हणून या लेखकाचा संपर्क ब्रमन्ध्वनि क्रमांक द्याल का किंवा माझा मेल अड्रेस त्याना दिला तरी चालेल कारण अशा अनेक लोकांची ओळख झाली तर बरे होईल असे मला वाटते इतके विचार पूर्वक लिखाण फार कमीच होत चालले आहे !कारण प्रत्येकजण पूर्वग्रह दुषित मनानेच लिहित असतो असे हल्ली जाणवते ,त्यांनी जे भारतीयांच्या मनोवृत्तीचे वर्णन केले आहे ते शतशः खरे आहे इतके सुंदर लिखाण विरळाच !
    आपण सर्वांनी मिळून अशा लोकांचे भरभरून कौतुक करुया ,यात आपल्या सर्वांचे प्रबोधन होत जाउन आपली वैचारिक बैठक निकोप होत राहील आपल्या अशा मंचावरून असे लेख येत गेल्यामुळे फारच फायदे आहेत आणि तोटा मात्र शून्य आहे
    आज गरज आहे ती खोट्या धर्मभावना आणि खोटे गंड याना गाडून टाकायची कमतरता असेल तर ती इच्छा शक्तीची !संजय सर आपण याची दखल घ्याल का ? अनेक जण आपले आभार मानतील
    आणि हो!, आपणच जर २२ फेब्रुवारिचा रिमार्क लिहिला असेल तर तो एक सुखद धक्का असेल !

    ReplyDelete
    Replies
    1. Sir, Apan mhanata (ani yethe share jhalela) lekh Shri. Rajeev Sane yancha asun aajachya Loksattat prasiddh jhala ahe. Sane Sir great vicharvant ahet. Jyanihi koni to yethe share kela tyanchehi abhar...pan mul lekhakache nav dile asate tar bare jhale asate.

      Delete
  29. आप्पा बाप्पा या बोगस नावाने लिखाण करणाऱ्या, तू तुझे खरे नाव सांगशील काय?

    ओंकार नाईक

    ReplyDelete
    Replies
    1. मला तर या दत्तात्रेय आगाशे वरतीच जास्त संशय येतोय!

      Delete
  30. 'फँड्री'चं बोचकारणं.......

    -चैतन्य प्रेम

    ज्वालामुखीतून बाहेर येणाऱ्या लाव्हारसाप्रमाणे 'फँड्री'तून जातव्यवस्थेचं विखारी रूप खदखदत बाहेर पडतं. 'फँड्री' एक घाव दोन तुकडे असा वार करीत नाही. तो बोचकारतो. चित्रपट पाहताना ते बोचकारणं जाणवत नाही. बाहेर पडल्यावर हळूहळू ती वेदना ठसठसू लागते. अस्वस्थ करते.
    स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले की, 'आपल्या धर्माइतकी उच्च तत्त्वं या जगाच्या पाठीवर दुसरीकडे नसतील, पण आपल्या धर्मानं माणसाला जितकी हीन वागणूक दिली तितकीही कुठे आढळणार नाही!' विचार आणि आचार यातली ही तफावत काळ जसजसा पुढे जात आहे तसतशी कमी होण्याऐवजी वेगवेगळ्या स्वरूपात आपलं अस्तित्व टिकवून आहे. आपल्या देशाची घटना, आपल्या देशाची प्रतिज्ञा, आपल्या क्रमिक पुस्तकांतील सामाजिक समतेचे धडे आणि कविता, भिंतींपासून ते पोस्टपर्यंत झळकणारे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चेहरे. हे सर्व शब्दांपुरतं आहे, चित्रांपुरतं आहे, भिंतींपुरतं आहे, सरकारी जाहिरातींपुरतं आहे. प्रत्यक्ष जगण्यात? जगण्यात ते हद्दपार आहे. सत्तेची शिडी चढण्यापासूनच जिथे जातिभेदाची आग पेटवावी लागते आणि जातीची समीकरणं लक्षात घेऊन बेरजेचं आणि वजाबाकीचंही राजकारण करावं लागतं ते सत्तेत आल्यावर वेगळं काय वागणार? अशा वातावरणात जगणारे आपण, चित्रपट म्हणून पाहायला जावं आणि एखाद्या बेसावध क्षणी एका सापळ्यात अलगद अडकावं तसं 'फँड्री'च्या सापळ्यात अडकतो. चित्रपटाचा पडदा कधी विरून जातो आणि आपण महाराष्ट्रातल्या एका गावातच बसून जिवंत प्रसंगांचे साक्षी होतो, हे आपल्याला कळतही नाही. ओबडधोबड चेहऱ्याची माणसं, त्यांच्या जीवनाची ओबडधोबड कथा. त्यात अंगार आहे, पण विखार नाही. क्लेश आहेत पण अभिनिवेश नाही. एखाद्या आरशाचे असंख्य तुकडे व्हावेत आणि प्रत्येक तुकडय़ात ते प्रतिबिंब भेसूरपणे उमटावे, तसा आपल्याही अवतीभवती विखुरलेला 'फँड्री' जागोजागी दिसू लागतो. जातपात आज संपली आहे, या गृहीतकाला गेलेला आणि आपणच लपवलेला तडाही अधिक तीव्रपणे उघडा होतो.

    ReplyDelete
  31. डुकराचा स्पर्श म्हणजे अपशकुन मानणाऱ्या समाजानं ही डुकरं पकडणाऱ्या समाजाला गावकुसाबाहेर आसरा दिला. या समाजाच्या जगण्याची ही कथा. या जगण्यावर मात करू पाहणाऱ्या जब्याची ही कथा. 'गावात राहायची लायकी तरी आहे का', या प्रश्नाच्या उंबरठय़ावर हा जब्या अनेकदा ठेचकाळला आहे. त्याचं अक्षर सुंदर आहे, अभ्यासाची त्याला आस आहे, अभ्यासातही तो हुशार आहे. पण 'चातुर्वण्र्य हा गुणकर्माप्रमाणे आहे, जन्मजात नाही,' या तत्त्वानुसार त्याची जात काही गळून पडलेली नाही! ती जात आणि आपलं जिणं लपवण्याचा त्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा विकृत आनंद समाजाला हवा आहे. त्याच्या अभ्यासाच्या गोडीला आणखी जोड आहे ती वर्गातल्या शालू या उच्च जातीच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमाची. तो वर्गात शिकतो तिथे चोखामेळा महाराजांचा अभंग शिकवला जात आहे, 'ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा'. त्यातलं समतेचं तत्त्व चार-पाच मार्काच्या प्रश्नासाठी मुलंही शिकत आहेत. त्याच वेळी शाळेच्या आवारात सरपण तोडणारी आई जब्याला दिसते. तीही शिकणाऱ्या मुलाला मोठय़ा मायेनं न्याहाळण्यासाठी वर्गाच्या खिडकीत येते. वर्गात गणवेष असतो. गणवेषाच्या समानतेत घरातलं दारिद्रय़ लपतं. खिडकीत आलेल्या आईच्या रूपात मात्र ती गरिबी, तो अडाणीपणा सारं काही प्रकट होतं आणि वर्गात उमटलेली हास्याची लकेर जब्याचं काळीज चिरत जाते. आपली जात, आपलं जातीनिहाय कर्म लपविण्याची जब्याची धडपड अशी अनेकदा फोल ठरते. चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जे सहजपणे समोर येतात आणि अंतर्धान पावतात. ते प्रसंग नाटकी होण्याचा, एकसुरी होण्याचा, बटबटीत होण्याचा धोकाही मोठा होता. चित्रपट तसा झाला नाही, यामागे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचाच ऋजू आणि संयत स्वभाव आहे. खूप काही भोगून माणूस आक्रस्ताळा तरी होतो किंवा सहनशीलतेतून आलेल्या दुर्दम्य शक्तीनं तो परिस्थिती पालटण्यासाठी सरसावतो. नागराज दुसऱ्या पठडीतले आहेत हे चित्रपटातून आणि त्यांच्याशी झालेल्या संवादातूनही जाणवलंच. आज जातपात संपली आहे, जातपात म्हणजे जणू अफवा आहे, असंच अनेक जण बेलाशक मानतात. वास्तव तसं नाही, असं नागराज म्हणाले. त्या वेळी काही प्रसंग डोळ्यासमोर आले.

    ReplyDelete
  32. उत्तर प्रदेशात एकदा गेलो होतो. गावजेवण होतं. जेवणाच्या पंगती उठत होत्या. तिथून दूरवर एका मोकळ्या मैदानात शेकडो लोक बसून होते. इथे गर्दी थोडी कमी झाली. पानं रिकामी होती. एकाला म्हटलं, ''तिथे लोक बसून आहेत, त्यांना बोलवू की.'' तो हसून म्हणाला, ''ठाकूर लोग जबतक खाना नहीं खाते, वो कैसे आएंगे?'' मी विचारलं, इतके लोक जेवून जात आहेत, नेमके कोणत्या समाजाचे किती लोक अजून आलेले नाहीत, हे त्यांना कसं कळणार? तो म्हणाला, सर्वाना नीट समजतं की आपण कधी जायचं ते!
    महानगरातल्या माझ्या नाभिकाच्या दुकानाजवळ एक जिलबी आणि पुरीभाजीचं दुकान होतं. रोज सकाळपासून तिथे भरपूर गर्दी असे. एकदा न राहवून नाभिक म्हणाला, ''हमारे गाँव में इसके हाथ का पानी भी कोई नहीं पीता. यहाँ देखिए कितनी भीड है!'' त्या एका वाक्यातनं त्या माणसाचं गावातलं स्थान काय असेल आणि त्याच्या जगण्यात किती अपमान असेल ते समोर उफाळून आलं. तेव्हा जात-पात आजही आहे. शहरात ती दिसत नाही, म्हणतात पण ओळख जरा वाढली की दुसऱ्याची जात खुबीने विचारूनही घेतली जाते.
    चित्रपटातल्या पात्रांची जातही अशीच सहजतेनं समोर येते. त्या जातीनुरूप त्यांचं त्या गावातलं स्थान आणि मान यांची प्रतवारी सांगून जाते. त्याचबरोबर उपेक्षितांच्या भावजीवनातील गुंताही दाखवून जाते. सायकल दुरुस्तीचं दुकान चालवणारा चंक्या देवांच्या तसबिरींना उदबत्ती दाखवून नमस्कार करतो तेव्हा त्या देव्हाऱ्यालगतची अण्णा भाऊ साठेंची तसबीर असो की लेकीच्या लग्नासाठी ओबडधोबड भिंतीला चिंध्यांच्या बोळ्यांनी दिला जाणारा निळा रंग आणि त्या निळ्या रंगावर शुभविवाह लिहून कलश काढणं असो. संपूर्ण समाज एका श्रद्धातंतूला धरून ठेवू पाहात आहे आणि त्याच समाजात आपणच जातीपातीवरून दुही माजवतो आहोत, याचीही सल तीव्र होते. चित्रपटाचा शेवट मनात रुतणारा आहे. इतक्या धक्का देणाऱ्या शेवटाची आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत कल्पनाही नसते. या शेवटाचे अनेक अर्थ जाणवतात. सर्व वर्गसोबत्यांसमोर आणि मुख्य म्हणजे शालूसमोर डुक्कर पकडण्यात आधी टाळाटाळ केल्यानं बापाच्या हातून जब्यानं मार खाल्ला असतो. त्या माराची मजा तिच्यासकट सर्वच बघ्यांनी अनुभवली असते. त्यामुळे जब्या थिजला असतो. पकडलेलं आणि दोरीला टांगलेलं डुक्कर घेऊन जब्या परितक्त्या बहिणीसह जात असताना काही कुटाळके तिच्या बहिणीला डिवचू लागतात. तीही उलटून बोलते तेव्हा 'गावात राहायचंय ना', असा प्रश्न गुर्मीत येतो आणि जब्या बेभानपणे डुकराची काठी जमिनीवर टाकून त्या लोकांवर दगड मारू लागतो. त्याआधी कपारीत लपलेल्या डुकराला बाहेर काढण्यासाठी जब्यानं तसे दगड मारले होते. जणू तो दाखवतो की त्या प्राण्यापेक्षा तुम्हीच हीन आहात. हे दगड मारून तो त्यांच्यातल्या पशुत्वालाच तडाखे देत असतो आणि अखेरचा तो दगड! हा दगड आपल्यावरच येतो. अगदी अनपेक्षितपणे. बेसावध क्षणी. हा दगड बाजारकेंद्रित जगण्यावरही आहे. लोकांना आवडतं तेच विकायचं, या एकमेव तत्त्वानं जगाला आज वाकवलं आहे. त्या बाजारशरणतेतून चित्रपटाचा कॅमेराही आज लोकांना जे आवडतं तेच दाखवू लागला आहे. लोकांना वास्तव आवडत नाही. लोकांना अस्वस्थ करणारं काही आवडत नाही. तो कॅमेराही त्यांना ते दाखवत नाही. जे त्यांना आवडतं तेच तो दाखवतो. हा दगड त्या कॅमेऱ्यावरही आहे आणि त्या कॅमेऱ्यातून अमुकच बघायचं असा हट्ट धरणाऱ्या आपल्यावरही आहे. चित्रपट संपला की हसतखिदळत बाहेर पडून आपल्या जगण्याच्या चाकोरीत भिरभिरू लागण्याच्या आमच्या मनोवृत्तीवरच हा दगड आहे. ज्वालामुखीतून बाहेर येणाऱ्या लाव्हारसाप्रमाणे 'फँड्री'तून जातव्यवस्थेचं विखारी रूप खदखदत बाहेर पडतं. 'फँड्री' एक घाव दोन तुकडे असा वार करीत नाही. तो बोचकारतो. चित्रपट पाहताना ते बोचकारणं जाणवत नाही. बाहेर पडल्यावर हळूहळू ती वेदना ठसठसू लागते. अस्वस्थ करते. 'फँड्री' जातव्यवस्थेचा प्रश्न मनात रुतवतो. त्यावर तो कोणताही ठोकळेबाज उपाय सांगत नाही. उपाय शोधलाच पाहिजे, ही तगमग मात्र मनात रुजवतो. आपल्या अवतीभवतीही असे अनेक जब्या आहेत, त्यांच्याकडे तो लक्ष वेधतो. नागराजना विचारलं की, तुम्हाला जातव्यवस्थेच्या शेवटाचा काय उपाय वाटतो? ते म्हणाले, भावनेला जात नसते. माणूस जर माणसासारखा वागला तर जातीचा प्रश्नच उरणार नाही..

    ReplyDelete
  33. खूप मागे एक गुजराती कविता वाचली होती. तिचा कवी आता आठवत नाही. तिचा आशय असा होता की, युद्धात हरलेल्या पोरस राजाला सिकंदरसमोर आणलं गेलं. सिकंदरनं विचारलं की, मी तुझ्याशी कसं वागू? पोरस म्हणाला, एक राजा दुसऱ्या राजाशी जसं वागेल तसं वाग. कवी म्हणतो, 'मी तुझ्याशी कसं वागू', हा प्रश्न आज एका माणसानं दुसऱ्या माणसाला विचारला तर? माणसानं माणसाशी कसं वागावं? 'फँड्री' माणसातली माणुसकी तपासत हा प्रश्नच नकळत विचारतो. या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्यानं शोधायचं आहे, ते जितक्या लवकर सापडेल आणि त्या उत्तराशी प्रामाणिक राहून त्याप्रमाणे जगणं साधेल तितक्या प्रमाणात अवतीभवतीच्या 'जब्यां'चं जीवन आनंदाचं होणार आहे.
    ----------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...