Saturday, May 10, 2014

असाही विचार करून पाहुयात...!


सोनईतील हत्याकांड ते नितीन आगे, उमेश आगळे यांची निघृण हत्या. सत्र वाढत आहे. याबद्दल निषेध, कडकडीत बंद, जलदगती न्यायालयांच्या घोषणांचा आवाज एवढा दुमदुमत आहे कि जणू या पुरोगामी महाराष्ट्रात जातीव्यवस्थेमुळे होणा-या अन्याय-अत्याचाराविरोधात खरेच चीड उसळली आहे. एकीकडे शोषित-वंचितांनी स्वतंत्र वसाहती कराव्यात यापासून ते भीमा कोरेगांवचा पराक्रम आठवत शस्त्रे परजा अशी आवाहने सोशल मिडियातून होतांना दिसताहेत तर दुसरीकडे या घटनांतील अपराध्यांची जात पाहून त्या जातीच्या सर्व समाजाला दोषी ठरवू नये अशी आवाहने दुसरीकडून होत आहेत.

एकुणातच तात्पुरते का होईना सारे समाजघटक जागे होतांना दिसत आहेत. या अशा घटनांचा निषेध करत असतांना असे पुन्हा घडूच नये यासाठी आम्ही सर्वांनीच नेमके काय करायला हवे, असे का घडते आहे याबद्दल विश्लेशन करायला आमचे बोटचेपे पुरोगामी विचारवंत मात्र कमी पडत आहेत. शोषक विरुद्ध शोषित हा संघर्ष पुरातन आहे हे खरे आहे. बळी जाणारा हा बव्हंशी शोषित-वंचित समाजघटकांतीलच असतो हेही वास्तव आहे. परंतू शोषणाचे मार्ग बदललेले आहेत आणि जुन्या भुमिकांतून शोषक-शोषित संघर्षाकडे पाहून चालणार नाही याचे आमचे भान हरपलेले आहे. शोषितांचा शोषितांविरुद्ध वर्गीय/जातीय लढा असे वेगळेच स्वरूप आपल्या समाजव्यवस्थेत आकारू लागले आहे, आणि म्हणून त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करावा लागेल.

गेल्या काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर काही प्रेमप्रकरणांतून तर काही राजकीय कारणांतून घडल्या आहेत असे वरकरणी म्हणता येईल. प्रेमप्रकरणातून निर्माण होणारे संघर्ष आणि त्यातून उद्भवनारी हत्याकांडेही भारताला नवीन नाहीत. सर्वत्रच त्यांना जातीय परिमाने असतातच असेही नाही. पण बव्हंशी घटनांत "जात" हा घटक महत्वाचा ठरला आहे हेही वास्तव आहे. जे जातीविरहित धर्मात प्रवेशते झाले आहेत त्यांच्याबाबतही जातीचा अभिशाप सुटला आहे असे नाही. इतरांच्या दृष्टीने "ते" अजुनही विशिष्ट जातीचेच आहेत. जातीनिहाय उच्च-नीचतेची उतरंड वैदिक धर्मातून झिरपली आणि ती वैदिकांपेक्षा कठोरपणे अवैदिकच जास्त पाळत आहेत असे भिषण चित्र सध्या तरी दिसते आहे.

शिक्षण आणि आधुनिकीकरण यातून जातीनिहाय उच्च-नीचतेच्या भावनांना तिलांजली मिळेल हे जात्युच्छेदनाचे स्वप्न पाहणा-या महनियांना आम्हीच रसातळाला पोहोचवले आहे. जातींचे भान मुलांना विद्यार्थीदशेपासुनच कसे असते हे समीर मोहिते या तरुणाने केलेल्या सर्वेक्षणात सामोरे आलेले आहे. जातीव्यवस्थेला कठोर करत नेणारी आज जी नवीन आर्थिक आणि राजकीय परिमाने लाभलेली आहेत त्यावर मात्र व्हावे तसे संशोधन होत नाही हेही एक वास्तव आहे.

भारताचा पंतप्रधानपदाचा उमेदवारच जेंव्हा स्वत:ला "निचली जाती का" असे म्हणतो तेंव्हा त्यालाही कोणत्यातरी उच्च जाती अभिप्रेत आहेत, म्हणजेच जातीव्यवस्थेची उतरंड मान्य आहे असा अर्थ होतो. जर समाजाला ही उतरंडच मनोमन का होईना मान्य असेल तर समतेचा प्रश्न येतोच कोठे?  महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. ब्राह्मण, मराठे, ओबीसी हे घटक कथित "उच्च जातीय" अथवा "सवर्ण" आहेत हे गृहित धरुनच जेंव्हा कोणत्याही घटनेची चिकित्सा केली जाते तेंव्हा ती कितपत तथ्यापर्यंत पोहोचू शकेल याबाबत मला शंका आहे. आणि समजा, कथित मराठे अथवा ओबीसी स्वत:ला ते जे मुळात नाहीत ते मानत असतील तर त्यांचा दृष्टीकोन हा इतिहासातील पिचलेल्या समाजघटकांबद्दल आकसाचा, घृणेचा असनार हेही उघड आहे. येथेही आपण समतेबद्दल बोलायचा अधिकार गमावून बसलेलो असतो याचे भान दोन्ही समाजांना असणे आवश्यक आहे.

मुळात एखाद्याला हाल हाल करून मारुन टाकावे अशी मानसिकता येते तरी कोठून? ही विकृती आहे हे तर उघड आहे. नितीन आगे या कोवळ्या मुलाला निर्दयपणे मारले जात असतांना मारणारे सोडा, हजारो बघ्यांचे अंत:करण थोडेही का द्रवले नाही? कोणीही हस्तक्षेपही का केला नाही? कि पोलिस म्हणतात त्याप्रमाणे हत्या सोडता असे काही घडलेच नाही? पुन्हा या प्रकरणाला दोन पक्ष आहेत आणि नेमका खरा पक्ष कोणाचा हे कसे ठरवायचे? डा. प्रकाश आंबेडकर एका वाहिनीवर मुलाखत देतांना म्हणाले, आगे प्रकरण हे जातीय नसून प्रेमप्रकरणातून घडले आहे. पण येथे हा प्रश्न निर्माण होतो, प्रेमप्रकरणात हत्या कोणत्या तत्वात बसते? आमचे काही आजचे विचारवंत उठाठेव करत म्हणतात, हे काय प्रेम करायचे वय असते काय? आता प्रेम करायचे वय नेमके कोणते याचा कसलाही शास्त्रीय डाटा उपलब्ध नाही. ते कधीही, कोणत्याही वयात होऊ शकते. प्रेमात लैंगिक भावना अनुस्युतच असतात. केवळ गप्पा मारण्यासाठी कोणी विभिन्नलिंगीच्या प्रेमात पडत नाही. दुसरे असे कि आगे प्रकरणात सांगितले जाते कि मुलगीच त्याच्या मागे लागली होती. पण याने फरक काय पडतो? हत्या झाली आहे हे अत्यंत निघृण असे वास्तव आहे, त्याच्याकडे डोळेझाक करत सारवासारवीचे उद्योग का केले जातात?

वास्तव हे आहे कि उभय घटकांत द्वेषाचे मळे फुलत आहेत. कथित विचारवंत आणि पुरोगामी म्हणवणा-या संघटना या द्वेषाला खतपाणी घालत आहेत. एकीकडे स्पृष्य म्हणून गणला गेलेला समाज पुर्वास्पृष्यांचा द्वेष करत आहे, आणि दोन्ही गटांना मैत्रीचे हात पुढे करायला त्यांचे नवे अहंकार आड येत आहेत. ब्राह्मण-मराठे जेवढा खोटा इतिहास उभारत आपल्या कथित अस्मिता चेतवताहेत तेवढेच पुर्वास्पृश्य समाजघटकही नव्या आत्मशोधात का होईना त्याची री ओढत आहेत. खरा इतिहास आणि खरे आत्मभान कोणालाच नको आहे असे वाटावे अशी भिषण समाजस्थिती आपणच निर्माण केली आहे.

बदलत्या अर्थव्यवस्थेने त्यात अजून तेल ओतले आहे. एकीकडे तळागाळातील, गांव-पाटलासमोर, धनदांडग्यांसमोर नित्य झुकलेला असलेला एके काळचा समाज झपाट्याने शिकून प्रगती साधत आहे. जुनी गुलामी नाकारत आहे. दुसरीकडे शेतीच्या तुकडीकरणाने, नवे शेती-तंत्रज्ञान अथवा आधुनिक शिक्षनाकडे पाठ वळवलेला पुर्व-सरंजामी समाज मात्र रसातळाला जात आहे. कथित खानदानी अहंकार तर जात नाही, पण आर्थिक बोजे असह्य झालेले, अशा परिस्थितीत आत्महत्या करण्यात हाच समाज अग्रेसर आहे हेही एक वास्तव आहे. नैराश्याने  या बव्हंशी समाजाला ग्रासलेले आहे आणि त्यांच्या सामाजिक संघटना या नैराश्यात भर घालत आहेत. मराठा आरक्षण ही त्याच नैराश्यावर मात करण्यासाठी व राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी केली गेलेली एक चाल आहे. त्यामुळे जातीय संघर्षाला आर्थिक व म्हणूनच एक नवे राजकीय परिमाण लाभलेले आहे. एके काळचा व्यवस्थेचा शोषकच शोषितांच्या हक्कांवर घात घालतो आहे हा उद्वेग एकीकडे तर नव्या अर्थव्यवस्थेत हतबल ठरत असनारे कालचे सरंजामदार एकीकडे असा हा समाज-मानसशास्त्रीय तिढा आहे. मनोविकृत्या हिंसकतेकडे झुकतात हा जागतिक इतिहास आहे. आणि गुलामगिरी नाकारतांना जुन्या व्यवस्थेचा निरंतर द्वेष करत राहण्यात कोणते शहानपण आहे?

आर्थिक हतबल नातेवाईक व आपापला समाज स्वार्थासाठी धरून रहायचा प्रयत्न करतो. धर्मवेड, जातवेड हे आर्थिक दुर्बलांना विकृत करत नेते हा समाजशास्त्रीय इतिहास आहे. राजकीय स्वार्थसाधकांना जात हेच भांडवल वाटते त्यामुळे ते जात-सापेक्ष तत्वज्ञानाचेच समर्थक असतात. अशा परिस्थितीत परस्परांकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा अत्यंत टोकाच्या द्वेषाचा असणार हे उघड आहे आणि ते तसे आहेही. सोशल मिडिया हे सध्याचे एक दिग्दर्शक माध्यम मानले तर त्यावरून आपली समाज-मानसिकता केवढी विकृत व द्वेषांधळी झाली आहे याचे दर्शन होते. प्रश्न एवढाच उरतो कि कोण कोणावर कुरघोडी करतो. आजवरच्या जातीय हत्याकांडांनी त्याचे उत्तर दिले आहे.

तथागत बुद्ध म्हणाले होते कि द्वेष हे तीन विषांपैकी एक विष आहे. सोनईचे प्रकरण असो कि नितीन आगेचे, ही आत्यंतिक द्वेषाची परिणती आहे. त्याला जेवढीही परिमाने आहेत त्यावर जोवर आम्ही सर्वच प्रामाणिकपणे विचार करत सामाजिक मानसिकतेत बदल घडवून आणु शकत नाही तोवर आम्हाला वीट येईपर्यंत फक्त निषेध मोर्चे वा बंदच पाळावे लागतील.

सामाजिक द्वेषापार जाण्यासाठी आमच्याकडे नेमकी काय व्युहरचना आहे हा खरा प्रश्न आहे. सामाजिक आत्र-हितसंबंध सामंजस्याचे होतील यासाठी कोणती रचना अभिप्रेत आहे हाही प्रश्न आहे. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे सामाजिक द्वेष उठवत, नामानिराळे राहणा-या समाजकंटकांबद्दल आमची भुमिका काय आहे हे आम्हालाच ठरवावे लागेल.

अन्यथा आज नितीन आगेबद्दल शोक करत असतांना आम्हाला उद्याच्या अन्य कोणाच्या हत्येचा/अन्यायाचा/अत्याचाराचा निषेध वारंवार करत बसण्याची वेळ येईल. उत्तर मात्र सापडनार नाही ते नाहीच!

22 comments:

  1. अतिशय हृदयद्रावक लेख !
    धन्यवाद !

    प्रसन्न

    ReplyDelete
  2. hello mr sonavani. its really sad these things are happening so frequently in last couple of years--but the worse part is total silence on the part of political parties. Thats why we get the impression that political parties are nervous to hurt 'maratha feelings'...im a caste brahmin & have seen the situations of dalits very closely,its pathetic..but then so is the situation of brahmins in villages....the caste is almost non-existent in rural marathwada and no one wants to take notice of that...when you talk of brahmin dominance, please do remember that its only a chunk of total populace...most of the brahmins face the same problems as the rest...pls do take a look at brahmins outside pune and dombivali....you might find some startling facts....dalits and brahmins ,however strange it may seem, are equally suffering at the hands of maratha politicians...they face the same economic stranglehold and marginalization. Im reading your blog for quite some time and as your loyal reader appeal you to spare a thought on this.
    thanks and regards
    shailesh kulkarni

    ReplyDelete
  3. आपण ह्या जातीवादाच्या नरकातून कधी बाहेर पडणार? याचा विचार प्रत्येकाकडून जरूर व्हावयास हवा. जाती-जातीतील, धर्मा-धर्मातील भिंतींना तिजांजली देवून आपणा सर्वांना मानावातावादाकडेच जाणे योग्य होईल, यात अजिबात शंका असण्याचे कारण नाही! २१ व्या शतकातही असल्या घटना घडत असतील तर ह्या घटना मानवतेसच काळीमा फासत आहेत, या पासून आपण काही बोध घेणार आहोत की नाही? हाच खरा प्रश्न आहे!

    अलोक यादव

    ReplyDelete
  4. खैरलांजी ते खर्डा, निखाऱ्याची वाट..

    आसाराम लोमटे - asaramlomte@gmail.com

    'खैरलांजी ते खर्डा' ही अत्याचाराची न संपणारी मालिका हेच सांगते की, आम्ही कितीही महासत्तेच्या गप्पा मारीत असलो, जातीयता संपली, असे बोलत असलो तरीही या समाजव्यवस्थेने दलितांच्या पदरात जे निखारे टाकले आहेत त्याचे चटके आजही जाणवतात. तसेच जग बदलू लागले आहे आणि जात आता अस्ताला चालली आहे असे कितीही वाटले तरी तसे घडत मात्र नाही..
    घटना बरोबर पंचवीस वर्षांपूर्वीची आहे. वसमत तालुक्यातल्या कुपटी या गावी नारायण धुळे या व्यक्तीबाबतीत घडलेली. धुळे यांच्याकडे शेळ्या होत्या. शेळ्यांची संख्या शंभर-सव्वाशेवर झाल्यानंतर त्यांना वाटले किती दिवस शेळ्यांमागे पायपीट करायची. आपण हक्काची जमीन घेऊ. त्यांनी सगळ्या शेळ्या विकल्या आणि गावातलीच चौदा एकर जमीन विकत घेतली. काल-परवापर्यंत जो माणूस कोणाच्या बांधावर शेळ्या चारताना दिसायचा तो जमिनीचा मालक बनला, पण हीच गोष्ट डोळ्यातल्या कुसळासारखी गावातल्या काहींना सलली. धुळे यांनी जमीन विकत घेतल्यानंतरही त्यांच्यामागे कोर्टकचेऱ्या सुरू झाल्या. शेवटी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. नारायण धुळे यांना जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे, आता फक्त तहसीलदारांची भेट घ्यायची आणि जमिनीवर ताबा मिळवायचा. त्यासाठीच नारायण धुळे आपल्या कुपटी या गावाहून पायी निघाले. शिरळी स्टेशनवरून त्यांना वसमतला रेल्वेने जायचे होते. धुळे जमिनीचा ताबा घेण्यासाठी तहसीलदारांना भेटायला जात आहेत हे माहीत असल्याने त्यांच्यावर टपून बसलेल्यांनी नेमका डाव साधला. झुडपातून पुढे येत एकाने त्यांची गच्च कंबर धरली आणि डोक्यात दुसऱ्याने जोराचा घाव घातला. खाली कोसळल्यानंतर नारायण धुळे यांचे दोन्हीही डोळे चाकूने काढण्यात आले. त्यानंतर त्यांच्यासमोर जो अंधार झाला तो कायमचाच.
    पुढे चालू...

    ReplyDelete
  5. साधारण दहा वर्षांपूर्वी वसमतला जेव्हा नारायण धुळे यांची भेट झाली तेव्हा त्यांना कारण विचारले, चक्क दोन डोळे काढून तुम्हाला आयुष्यातूनच संपविण्याचा प्रयत्न या लोकांनी का केला असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना १६ ऑगस्ट १९८८ सालची घटना आठवली. डोळ्यांसमोर(?) पटच तरळला त्यांच्या. ज्या प्रसंगात त्यांचे डोळे गेले तो प्रसंग सांगताना त्यांच्या हाता-पायाला जाणवत असलेली थरथर स्पष्टपणे दिसत होती. शेवटी घटनेच्या गाभ्यापर्यंत जाणारे कारण सांगितले त्यांनी, ''मी जोवर शेळ्या सांभाळत होतो तोवर कोणासंगंच दुष्मनी नव्हती. रोज एकाच्या बांधाला जायचो, पण जमीन घेतली अन् दुष्मन वाढले. आता हा आपल्या बरोबरीला यायला बघायलाय, असं लोक बोलायला लागले. जमीन घेतली अन् या लोकांच्या डोळ्यांत सलायला लागलो मी..'' धुळे सांगत असताना एक जीवघेणी विसंगती चटके बसावेत तशी जाणवू लागली. धुळे यांची जमीन ज्यांच्या डोळ्यांना सलत होती त्यांचे काहीच झाले नाही आणि यांना मात्र आपले डोळेच गमवावे लागले. धुळे यांचा गुन्हा काय? तर ते दलित. गावात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कितीही होतात, ते कोणालाच खटकत नाहीत. हे व्यवहार विनाबोभाट चाललेले असतात, पण दलिताने जमीन घेतली ही गोष्ट मात्र खटकणार, कारण काय तर तो आपली बरोबरी करतोय, त्याने आपल्या पायरीनेच राहावे.
    पुढे चालू...

    ReplyDelete
  6. ..आता खेडय़ात कुठे जातीयता शिल्लकराहिलीय? आता कुठे अस्पृश्यतेचे चटके बसतात? असा प्रश्न विचारणाऱ्यांनी या घटनांकडे जरा संवेदनशीलतेने पाहावे. दहावी-अकरावीच्या शाळकरी वयात केवळ गावातल्या एका वरच्या जातीतल्या मुलीशी बोलण्याची सजा ही एखाद्या विद्यार्थ्यांच्या जिवंतपणी मरणयातना देऊन त्याला आयुष्यातूनच संपविण्यापर्यंत जाऊ शकते. याचेही कारण तेच. नितीन आगे हा दलित आहे. त्याने आपल्या पायरीने राहावे, तो आमच्या मुलींशी बोलतो म्हणजे काय? असा पीळ या घटनांमागे आहे. 'खैरलांजी ते खर्डा' ही अत्याचाराची न संपणारी मालिका हेच सांगते की, आम्ही कितीही महासत्तेच्या गप्पा मारीत असलो, जातीयता संपली, असे बोलत असलो तरीही या समाजव्यवस्थेने दलितांच्या पदरात जे निखारे टाकले आहेत त्याचे चटके आजही जाणवतात. कुठे गायरान जमिनीवरून तणाव, तर कुठे पिण्याच्या पाण्यावरून राडा. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत हे सुरूच आहे. नागभूमी असलेल्या विदर्भात, सत्तेची केंद्रे एकवटलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि संतांची भूमी असलेल्या मराठवाडय़ात सगळीकडे कुठे ना कुठे अशा घटना घडत राहतात. कुठे जिवे मारले जाते, कुठे स्त्रियांची विटंबना होते, कुठे वस्तीच पेटविली जाते, तर कुठे बहिष्कार घातला जातो. आरोपी उजळ माथ्याने पुन्हा समाजात वावरतात. गावपातळीवरील सत्तावानांचा दरारा असा की, कोणी साक्ष देत नाही आणि अत्याचारित कुटुंबीयांचीच नावे जर साक्षीदार म्हणून असतील तर ती टिकत नाहीत. अशा प्रकरणांचे 'निकाल' लागतात, 'न्याय' मिळतोच असे नाही.
    पुढे चालू...

    ReplyDelete
  7. घटना घडतात तेव्हा काही दिवस वृत्तपत्रांतून बातम्या येतात, क्वचित अशा वेदनांना कलात्मक रूपही लाभते. नारायण धुळे यांच्यावरही 'झुम कम्युनिकेशन'ने 'अछूत' या नावाचा लघुपट दिल्ली दूरदर्शनासाठी काढला होता. वसीम अहमद दहलवी आणि उर्दू मासिक 'बानो'च्या संपादिका सादिया दहलवी यांची ती निर्मिती होती. हे झाले पडद्यापुरते, पण वास्तवात नारायण धुळे यांचे डोळे काढणारे आरोपी जामिनावर सुटल्यानंतरही धुळे यांना मात्र त्यांची हक्काची जमीन मिळाली नव्हती.
    जग बदलू लागले आहे आणि जात आता अस्ताला चालली आहे असे कितीही वाटले तरी तसे घडत मात्र नाही. अशा वेळी कुठे तरी ऐकलेले आठवत जाते, 'आधी लोक शिवाशिव करूद्यायचे नाहीत, पण जगू द्यायचे, आता शिवाशिव करू देतात, पण जगू देत नाहीत.' यातली शाब्दिक कसरत एक वेळ बाजूला ठेवू, पण जातीयता आधीही होती आणि आताही आहे. ज्यांना गावातच राहायचे आणि गावातल्याच जातीयतेच्या धगीचे चटके सहन करायचे त्यांच्या प्रतिक्रिया खूप भेदक असतात. एकदा बहिष्काराची झळ सहन करणाऱ्या एका वयोवृद्ध दलिताला विचारले, आता गावात राहताना काय वाटते? जराही वेळ न लावता ते म्हणाले, ''उशाखाली 'सरप' घेऊन झोपल्यासारखं वाटतंय.'' 'सरप' म्हणजे साप. जातीयतेचे चटके सहन करणाऱ्यांना कोणती जोखीम घेऊन जगावे लागते त्याचा हा जिवंत उद्गार! किती तरी प्रश्नांना नव्याने जन्म देणारा..
    समाप्त.

    ReplyDelete
  8. Dear sanjubaba- Dalit wicharwant M D RAMTECHE yanchya eka lekhanusar

    maharashtratil OBC samaj surwat jast jatyandh ahe.

    ReplyDelete
  9. प्रिय संजयजी,
    आपकी बातों से पूरी तरह सहमत हूँ. एक शिकायत है, आपके ब्लॉग पर कुछ लोग अपने ब्लॉग के असंबंधित लंबे लेख डाल देते है. कृपया उनसे हमें बचाइये. टिप्पणी छोटी ही होना चाहिए. लंबी भाषणबाजी से बातचीत की गंभीरता समाप्त हो जाती है.
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  10. या परिस्थितीत अत्याचारग्रस्त कुटुंबाला काही लाखांचं अर्थसाह्य, फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा, खूपच चर्चा झाली असेल तर लगोलग दोनपाच आरोपींना आत टाकणं इतक्याच उपायांवर महाराष्ट्र सरकार समाधान मानताना दिसत आहे. विशेष ग्रामसभा बोलावून सर्व जातिजमातीच्या लोकांत सलोखा होईल असं पाहावं, अत्याचारग्रस्तांना गावाकडून संरक्षण आणि साह्याची हमी मिळवून द्यावी असे काही उपाय 'सरकार'ला कधी सुचतच नाहीत, तर समाजही हळहळ व्यक्त करून झाल्यावर पुन्हा आपापल्या जातिपातीच्या तटबंदीत शिरताना दिसतो आहे. किंबहुना पोत्यातून आडमाप जोंधळे सांडावेत तशा गेल्या दीडदोन दशकांत शिवाजी महाराज नि फुले-आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या संघटनांचं पेव फुटलंय, आणि त्यालाच समांतर जातआधारित अत्याचारांची प्रकरणंही घडत आहेत, याची संगती उघडपणं लावण्याची वेळ आली आहे. एका बाजूला शिक्षण आणि वाढत्या समाजभानामुळं पूर्वापार मागासलेल्या जातीपातींची माणसं सामाजिक न्याय मागत आहेत, तर दुसरीकडं महाराष्ट्रातल्या विशिष्ट राजकीय पक्षांच्या छत्रछायेखाली वाढत चाललेली सरंजामी दंडेली गावागावातलं सामाजिक वातावरण पार नासवून टाकते आहे. यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे राजकारणी असोत की प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारे... या दंडेलीकडं डोळेझाक करणंच बहुधा त्यांच्या सोयीचं आहे.

    नितीन आगेची खर्ड्यातली झोपडीच खूप बोलणारी आहे. गावाबाहेर बोडक्या शिवारावर चार पत्रे मारून उभं केलेलं ते खोपटं गावातल्या दगडी चौसोपी वाड्यासमोर काय नि कसा टिकाव धरणार आहे? त्याचे वडील, राजू आगे हे खडी पाडण्याचं काम करतात. मुलाला शिकवायचं, मोठं करायचं अशा निश्चयानं दिवसाचे वीसवीस तास मजुरी करणारा हा माणूस पन्नाशीतच सत्तरीचा दिसतो. सध्या त्याला भेट देणारी पुढारी नि पत्रकारांची गर्दी ओसरली की, आपल्याला याच वाड्यापुढं वाकावं लागणार आहे, याचं भान त्याच्या दुबळ्या आवाजात ठासून भरलेलं आहे. असे असंख्य राजू आगे महाराष्ट्राच्या तालुक्यागावखेड्यांत असताना राज्याच्या पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणं, ही या बड्या घराचे वासे पोकळच असल्याची खूण आहे.

    खर्ड्यात राजपूत भामटे, कैकाडी व तत्सम भटक्या आणि अन्य अनुसूचित जातींची बहुसंख्या आहे, पण गावातले लोक भीतीनं फारसं बोलत नाहीत, आणि ही भीती पोलिसी ससेमिरा मागं लागण्याची नाही, तर प्रतिष्ठितांशी पंगा घेण्याचे परिणाम झेपणारे नाहीत याची जाणीव असलेली आहे. 'मोठ्या' लोकांना दबून असलेल्या बहुसंख्येची ही प्रातिनिधिक लोकशाही राज्याला कुठे घेऊन जाणार आहे? या प्रकरणातील संबंधित मुलीलाही तिच्या कुटुंबीयांकडूनच विशेष संरक्षणाची गरज असू शकते. काही काळानं सारं शांत झाल्यानंतर आणखी एक ऑनर किलिंग होणार नाही, याची काय खात्री द्यावी? राज्यातील एरव्ही बोलक्या असलेल्या संघटना अशा अनेक मुद्दयांबद्दल फारसं काही बोलत नाहीत, हेही बोलकं आहे.

    नितीन आगेच्या हत्येनं जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. 'जाणते' नेते असोत की 'मर्द' मराठ्यांचे प्रतिनिधी असोत... तथाकथित कोणत्याही 'डॉक्टरां'कडे त्या बऱ्या करणारी औषधे आजघडीला तरी दिसत नाहीत. खर्ड्याच्या किल्ल्यावरचं ऐतिहासिक संदर्भात लिहिलेलं ते वाक्य, 'हा मराठ्यांचा शेवटचा विजय'... वेगळ ्या संदर्भात मनात पुन्हा पुन्हा रणभेरी वाजल्यासारखं आदळतंय.
    End.

    ReplyDelete
  11. या परिस्थितीत अत्याचारग्रस्त कुटुंबाला काही लाखांचं अर्थसाह्य, फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा, खूपच चर्चा झाली असेल तर लगोलग दोनपाच आरोपींना आत टाकणं इतक्याच उपायांवर महाराष्ट्र सरकार समाधान मानताना दिसत आहे. विशेष ग्रामसभा बोलावून सर्व जातिजमातीच्या लोकांत सलोखा होईल असं पाहावं, अत्याचारग्रस्तांना गावाकडून संरक्षण आणि साह्याची हमी मिळवून द्यावी असे काही उपाय 'सरकार'ला कधी सुचतच नाहीत, तर समाजही हळहळ व्यक्त करून झाल्यावर पुन्हा आपापल्या जातिपातीच्या तटबंदीत शिरताना दिसतो आहे. किंबहुना पोत्यातून आडमाप जोंधळे सांडावेत तशा गेल्या दीडदोन दशकांत शिवाजी महाराज नि फुले-आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या संघटनांचं पेव फुटलंय, आणि त्यालाच समांतर जातआधारित अत्याचारांची प्रकरणंही घडत आहेत, याची संगती उघडपणं लावण्याची वेळ आली आहे. एका बाजूला शिक्षण आणि वाढत्या समाजभानामुळं पूर्वापार मागासलेल्या जातीपातींची माणसं सामाजिक न्याय मागत आहेत, तर दुसरीकडं महाराष्ट्रातल्या विशिष्ट राजकीय पक्षांच्या छत्रछायेखाली वाढत चाललेली सरंजामी दंडेली गावागावातलं सामाजिक वातावरण पार नासवून टाकते आहे. यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे राजकारणी असोत की प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारे... या दंडेलीकडं डोळेझाक करणंच बहुधा त्यांच्या सोयीचं आहे.

    नितीन आगेची खर्ड्यातली झोपडीच खूप बोलणारी आहे. गावाबाहेर बोडक्या शिवारावर चार पत्रे मारून उभं केलेलं ते खोपटं गावातल्या दगडी चौसोपी वाड्यासमोर काय नि कसा टिकाव धरणार आहे? त्याचे वडील, राजू आगे हे खडी पाडण्याचं काम करतात. मुलाला शिकवायचं, मोठं करायचं अशा निश्चयानं दिवसाचे वीसवीस तास मजुरी करणारा हा माणूस पन्नाशीतच सत्तरीचा दिसतो. सध्या त्याला भेट देणारी पुढारी नि पत्रकारांची गर्दी ओसरली की, आपल्याला याच वाड्यापुढं वाकावं लागणार आहे, याचं भान त्याच्या दुबळ्या आवाजात ठासून भरलेलं आहे. असे असंख्य राजू आगे महाराष्ट्राच्या तालुक्यागावखेड्यांत असताना राज्याच्या पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणं, ही या बड्या घराचे वासे पोकळच असल्याची खूण आहे.

    खर्ड्यात राजपूत भामटे, कैकाडी व तत्सम भटक्या आणि अन्य अनुसूचित जातींची बहुसंख्या आहे, पण गावातले लोक भीतीनं फारसं बोलत नाहीत, आणि ही भीती पोलिसी ससेमिरा मागं लागण्याची नाही, तर प्रतिष्ठितांशी पंगा घेण्याचे परिणाम झेपणारे नाहीत याची जाणीव असलेली आहे. 'मोठ्या' लोकांना दबून असलेल्या बहुसंख्येची ही प्रातिनिधिक लोकशाही राज्याला कुठे घेऊन जाणार आहे? या प्रकरणातील संबंधित मुलीलाही तिच्या कुटुंबीयांकडूनच विशेष संरक्षणाची गरज असू शकते. काही काळानं सारं शांत झाल्यानंतर आणखी एक ऑनर किलिंग होणार नाही, याची काय खात्री द्यावी? राज्यातील एरव्ही बोलक्या असलेल्या संघटना अशा अनेक मुद्दयांबद्दल फारसं काही बोलत नाहीत, हेही बोलकं आहे.

    नितीन आगेच्या हत्येनं जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. 'जाणते' नेते असोत की 'मर्द' मराठ्यांचे प्रतिनिधी असोत... तथाकथित कोणत्याही 'डॉक्टरां'कडे त्या बऱ्या करणारी औषधे आजघडीला तरी दिसत नाहीत. खर्ड्याच्या किल्ल्यावरचं ऐतिहासिक संदर्भात लिहिलेलं ते वाक्य, 'हा मराठ्यांचा शेवटचा विजय'... वेगळ ्या संदर्भात मनात पुन्हा पुन्हा रणभेरी वाजल्यासारखं आदळतंय.
    End.

    ReplyDelete
  12. श्री दिनेश शर्माजी ,
    आप्पा - एक मराठी ब्लोग का आप जो फॉलो अप कर रहे हो उसके लिये
    आपका नम्रता से अभिनंदन !
    बाप्पा -आपने जो सुझाव दिया है वह बहुतही महत्व रखता है
    आप्पा - अनेक बार ऐसा देखनेमे आता है कि कोई भी लगातार अपने ढेर सारे विचार इस ब्लोगके वाचकोपर लादनेकी लगातार कोशिश करता है , इससे मूल विषयकी हानी होती है
    बाप्पा - और एक प्रचारकी माहौल हो जाता है मानो किसीने यह ब्लोग काप्चर किया हो !
    आप्पा - आपने जो बात कही है उसका हम अनुमोदन करते हुए संजय सरसे अनुरोध करते है कि ऐसे प्रचारकी लेख और टिपन्निको संजय सर नाम्रातासे रिजेक्ट करे

    ReplyDelete
    Replies
    1. One starts barking, another also starts barking. People should write and convey their thoughts, do not stop them on the behalf of lengthy articles. This is against the freedom of thought, importance is not related to short article or long article. Sonawani can decide whether article publish or not, your suggestion is not required at all.

      Suraj Kelawekar

      Delete
    2. सुरज केलावेकर ,
      आपण इंग्रजीत आपले विचार मांडले आहेत , त्यावेळी आपले आडनाव स्पष्टपणे मराठीत काय असेल ते कळत नाही , कृपया ही अडचण समजून घ्यावी ही नम्र विनंती !
      दुसरी गोष्ट म्हणजे , शर्माजी यांनी हिंदीत लिहून ते मराठी ब्लोगमध्ये सहभाग घेतात ही कौतुकाची गोष्ट आहे त्या बद्दल आप्पा बाप्पा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
      आणि कुणीकुणी लांब लचक पणे आपले विचार मांडत असतात , त्याबद्दल शर्माजी यांनी एक विचार मांडला होता आणि त्याला आप्पा बाप्पा यांनी अनुमोदन दिले आहे ,त्यात कुणीही कुणावर भुंकत नाही असे मला वाटते !
      मला असेच वाटते की विचार मांडताना सुटसुटीत असले तर ते जास्त प्रभावी ठरू शकतात आणि मांडणीची भाषा सुबोध असावी ,त्यासाठी म गांधींची इंग्रजी पहाणे नेहमीच महत्वाचे ठरते मराठीतसुद्धा अनेक पंत कवी होऊन गेले , ज्यांनी रकानेच्या रकाने भरल्या सारखे काव्य रचले आहे , त्यात व्याकरणाचे अनेक चमत्कार आहेत , छंद आहेत , सर्व काव्यालंकार आहेत पण आत्माच नाही ,

      अशा प्रकारे जर कुणी सुबक आणि आटोपशीर लेखनाचे महत्व आणि आग्रह धरत असेल तर त्याला भुंकणे म्हणणे म्हणजे जरा जास्तच भडक वाटते !
      सुरज सर , आपण थोर आहातच यात वादच नाही , पण आपण जर अशी भाषा टाळलीत , तर आपण अजून महान व्हाल अशी खात्री आहे !

      Delete
    3. मोहिनी परकर,

      सर्वच लेखन थोडक्यात लिहिता येत नसते, कोणी मुद्देसूद आणि प्रदीर्घ लिहिले म्हणून त्याचा बाऊ करणे अजिबात योग्य नाही. प्रदीर्घ लेख वाचणे न वाचणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, इथे काही वाचण्याची जबरदस्ती नसते. हिंदी भाषिकांची यामुळे अडचण होऊ शकते, ते आपण समजू शकतो, मराठी त्यांची मातृभाषा नसल्याने कदाचित त्यांना त्याचा कंठाळा येऊ शकतो. मात्र मराठी भाषिक सुद्धा त्यांचीच री ओढणार असतील तर खूप अवघड आहे. लोकांना त्यांच्या परीने लिहू द्यात, त्यांच्या लेखनावर गदा आणणे कितपत योग्य ठरेल? कोणाचेही विचार स्वातंत्र्य हिरावून घेणे चांगले नाही. पुन्हा सांगतो कोणती टिप्पणी प्रकाशित करायची आणि कोणती नाही हे सोनवणींना ठरवू द्या, उगीच पोकळ सल्ले नकोत.

      सुरेश केळवेकर

      Delete
  13. Thanks! Suresh sir,
    For your previous comment.

    Suraj kelawekar

    ReplyDelete
  14. सुरेश केळवेकर ,
    अहो तुम्ही आडगावहून पेडगावला जाता आहात ,
    एकतर तुमच्या लिहीण्यात जो "भुंकणे" हा शब्द आला त्याबद्दल मोहिनीताई विचारात होत्या असे मला वाटते !
    त्याबद्दल चकार शब्द नाही !
    आणि परत संजय ठरवेल कुठले ठेवायचे आणि कोणते नाही ठेवायचे असला प्रकार सारखा बोलून एक मात्र समजते की आपली विचार करायची कुवतच कमी असावी !
    त्याला तुम्हीतरी काय करणार ?
    आम्ही संजयचा ब्लोग वाचतो आणि प्रतिक्रिया देण्याचा आमचा अधिकार आहे आणि संजय ला चार शब्द सुचवणे हासुद्धा आमचा अधिकार आहे ! आम्हाला स्वातंत्र्य कळते आणि त्याची किंमत पण कळते !विचारांची देवाण घेवाण वेगळी आणि प्रचारकी लिहिणे वेगळे !अत्याचार आणि ते सहन करणे हा भाग वेगळा ,सोसणारे तो सोसतात , पं त्याचा आधार घेऊन आपली नित्यनियमित रेकोर्ड लावणे हे वेगळे !
    अतिशय भिकार अशी हि मनोवृत्ती आहे !आजचा मोदी यांचा प्रचंड विजय हा अशा फालतू राजकीय बघणाऱ्या किंवा सामाजिक सहानुभूती मिळवू पहाणाऱ्या आपल्या सारख्या (?)चुकार
    विचारवंतांच्या (?)विरोधातला विजय आहे !
    आपल्या सारखे अर्धवट लोक या देशाच्या प्रगतीच्या आड येत आहेत ! आज खरी गरज आहे ती अशा पिडीताना आधार धरण्याची आणि अशा त्रास देणाऱ्या व्यक्तीना शासन देण्याची , पण आपली भंपक वक्तव्ये थांबवून आपण जर काम केलेत तर आपणास लोक आदर्श सुधारक म्हणतील ,
    उठसुठ कुणाच्याही वक्तव्यावर सारखे चिखल उडवणे थांबवून
    आपण अंतर्मुख झालात तर बरे होईल !
    कारण संजय हा विचारी माणूस आहे ! आम्ही त्याचे नेहमीच कौतुक करतो ! पण जणूकाही तुमच्याकडे त्यांच्या कडून पॉवर ऑफ अटर्नी असल्यासारखे किंवा वशिल्याचा माणूस असल्या सारखे आपण अति उत्तेजीतपणे बोलत आहात ! हे एखाद्या बाई बरोबर बोलताना आपणास शोभत नाही !

    ReplyDelete
  15. सुरेश आणि सुरज हे सारखे संजय सरांच्या आड लपून काय करत आहेत ?
    त्यांचे ते कुणी खास जवळचे आहेत का ? आम्हालाही समजते की कोणतेही स्प्रस्तुत लेखन संजय सहन करत नाही आणि ते तत्काळ उडवून लावतो ,
    पण त्त्यासाठी आपण एखाद्या स्त्रीने किंवा एखाद्या शर्मा किंवा आप्पा बाप्पा ने जर काही मत नोंदवले तर भुंकणे सारखे शब्द वापरून एक प्रकारे त्यांचा अवमान करायचे लायसन आपल्याला संजयने दिले असेल असे आम्हाला वाटत नाही
    संजय असे कधीही करणार नाही अशी आम्हाला खात्री आहे ! अचानक उपत्सुम्भासारखे आपण या ब्लोगवर काहीही मैलोनमैल लिहू लागला आणि त्यात काहीच सुसंगत नसेल तर ते लोकाना कान्ताल्वाने वाटून त्यांनी प्रतिक्रिया देणे हे नैसर्गिक आहे , पण त्यावर अरेरावी केल्या सारखे आपण मत प्रदर्शन करणे हे सभ्यतेस सोडून आहे , आणि असे कुणी लिहिल्यावर
    त्याबाबतीत सर्व संजय बघेल असे अधिकारी भाषेत बोलणे अतिशय विचित्र वाटते !
    मी मोहिनी पार्कर , आप्पा आणि शर्मा यांच्या प्रतिक्रिया वाचल्या त्यात काहीच असभ्य नाही किंवा गैर नाही ! आपण इतके आकांड तांडव करण्याचे काहीच कारण नाही !
    आपण ज्या अत्याचाराबाबत बोलत आहात त्याचे कुणीही समर्थन करणार नाही , पण
    म्हणून सर्व आगपाखड विशिष्ठ वर्गावर करणे हेही चूकच आहे !
    आज सर्व जातपात विसरून बाबा आमटे यांच्या सारखे कार्य करण्याची गरज आहे !
    संत तुकडोजी महाराज यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून वागण्याची गरज आहे !

    ReplyDelete
  16. एक प्रकारे अनेकांनी हे जे कोण सुरज आणि सुरेश त्याना जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत संयमित आणि योग्यच आहे
    आज जे निकाल आले आहेत ते काय दर्शवतात ? आज सर्व भारतीय समाजाने आपणा सर्वाना अंतर्मुख केले आहे
    अनेक वेळा असे वाटते की जात पात स्पृश्य अस्पृश्य , उच्च नीच हे सर्व राजकारणी लोकांनी उभारलेले विषय आहेत , आज मोदींच्या प्रचंड विजयाने समाजाने दाखवून दिले आहे की हे सर्व भेद आम्ही मानत नाही आणि त्याचा बागुलबुवा उभा करणाऱ्या संघटना आणि पक्ष याना आम्ही भिरकावून देतो !
    समाजात वर्ग संघर्ष उभा करणारे समाजाचे शत्रू असतात हेच खरे !अनेकवेळा राजकारणी लोक त्याला ब्राह्मण वर्गाविरुद्ध वापरत असतात
    संजयला पण अशीच सवय आहे !
    सदासर्वदा तो वैदिक वर्गाकडे वळत असतो , या सर्वाला एक ठोक उत्तर आजच्या निकालांनी दिले आहे !आणि भारतीय जनमानसाची खरी ओळख दिली आहे !आपल्याला सर्वाना प्रगती हवी आहे ! प्रगती करून घेतलेला वर्ग आपल्या डोळ्यासमोर आहे , आणि सरंजामशाही वृत्तीने वागणारा उच्च शेतकरी वर्ग आपण बघत असतो , अत्याचार कोण करते तेपण आपणास माहित आहे ! पण ते सोडून वैदिक नावाखाली एकुणात ब्राह्मण वर्गावर घसरायचे संजय सोनावानींचे कसब मानले पाहिजे !मला कल्पना आहे की हे विचार संजय कधीच मांडणार नाही कारण आपल्याच ब्लोगवर त्यांनी सेन्सोर्शिप बसवली आहे
    आज अशी परिस्थिती आहे की संघ परिवार आणि त्यांचे कार्य याचा खरा चेहरा लोकांसमोर येत आहे ,जातीविरहित खरी प्रगती लोकांना दिसतेआहे ऽअनि जातीयतेच्या तथाकथित चित्रणात खरा दुरात्मा कोण हेही सर्वांच्या नजरेसमोर येत आहे !
    वैदिक अवैदिक असले पांचट सिद्धांत आता कोणाचीही नजरबंदी करू शकणार नाहीत !
    संजय सोनावणी सारखे मराठा जमीनदारांनी नेमलेले स्वस्त प्रचारक आणि त्यांची बुद्धिभेद करणारी भाषणे आणि ब्राह्मणद्वेष यांचा काहीही प्रभाव पडणार नाही !
    किती लाजिरवाणी परिस्थिती झाली या सर्वांची !
    हा संघ विचारांचा आणि कृतीचा विजय आहे !
    जाती भेदाचे खरे विष या संजय सारख्या भाडोत्री लोकांनी पसरविले आणि त्याबद्दल त्याना बिदागीतरी काय मिळणार ? ते मेटे आणि काका पुतण्याच जाणोत !बिचारे भुजबळ ! राणे ! अरेरे ! संजय अरे बाबा तू आपला शेळ्या हाकायला जा बरे !
    अविनाश

    ReplyDelete
  17. सुरेश मी महिन्याच्या सुट्टीत तुमच्याकडे आलेली पोरे आहेत का ?
    रिकामा न्हावी आणि भिंतीला तुमड्या लावी असला प्रकार करत असतात कि काय ?
    त्यांचे काहीतरी जागेवर आहे का ?
    आजकाल तुला पण संजय बाबा , सेन्सॉर करायची सवय लागली आहे !
    पण असले भंगार लेख कशाला तुझ्या ब्लोगवर प्रसिद्ध करत असतोस ?
    तो बुद्ध काय नि काय काय ! त्याचा काहीतरी उपयोग आहे का ?असले विचार राणे देशमुख आणि काका पुतण्याला आवडतात ,पण त्यानासुद्धा शेतमजूर मिळत नाहीत म्हणून आजकाल ते चिडलेले असतात !
    ही आमची दलित मुले आजकाल अभ्यासात भराभर पुढे येत आहेत , ब्राह्मणाना मागे सारून नवीन विक्रम करत आहेत !पण त्यांना ब्राह्मण जवळचे मित्र वाटतात हेपण सत्य आहे याचे कारण खेडेगावात जे वातावरण असते त्यात ब्राह्मण नसतोच ! तिथे आहे कुठे ब्राह्मण ? मग ?
    तिथे सगळा कारभार ९६ कुळींचा - पण त्यांना आता आरक्षण हवाय ! आणि एकीकडे लाज वाटते !
    पुण्या मुंबईला प्लाटफॉर्म बदलला किंवा चार पावलं चालून रस्ता बदलला की कुणी जात विचारत नाही किंवा धर्म ! हा खरा शहरी धर्म ! काम करा , कसब दाखवा , जग तुमचच आहे !पण खेड्यात हे जातीचे भूत माणसाला गुलाम करते आणि हे ९६ कुळी आमची पाठ सोडत नाहीत !
    आम्ही आज ३ पिढया शहरात आहोत , कोणतेही आरक्षण न घेता आम्ही सुखी आणि उत्तम मित्र परिवार बाळगून आहोत ,आम्ही म्हणायचेच झाले तर दलित पण सगळ्या प्रकारे हिंदू म्हणूनच जगात असतो ! गणपती नवरात्र दिवाळी सगळ साजरे करतो !आम्हाला कुणीही दलित म्हणून त्रास देत नाहीत !माझी शेजारी ब्राह्मण आहे आणि आम्ही सुखी आहोत आम्हाला सर्व स्वातंत्र्य आहे !दिलासा आहे
    हे जातीचे राजकारण हा आपल्या राजकारणी लोकांनी दिलेला आहेर आहे त्याचा आपण निषेध केला पाहिजे आज भा ज प वनवासी कल्याण कार्य क्रम राबवत आहे त्यात मला काम करायचे आहे मी जर काही काम करून अशा लोकाना मदत करू शकलो तर ?

    ReplyDelete
  18. भुंकणे, भुंकणे म्हणजे तरी काय?

    samir ghatge May 16, 2014 at 3:52 AM,

    VIVEKANAND SERAO May 16, 2014 at 4:11 AM,

    Anonymous May 16, 2014 at 4:48 AM,

    AMRUTA VISHVARUP May 16, 2014 at 5:39 AM

    वरील लोकांच्या टिप्पण्या वाचल्यावर हेच स्पष्ट होते की हा जो यांनी आकांडतांडव चालविला आहे, हे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून मानवी लिखित भुंकणे नव्हे काय?

    अनघा

    ReplyDelete
  19. Exactly true comment.

    Anil sadhu.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...