Friday, May 2, 2014

...बात त्याची कशाला?

श्वासांत जागते भाग्य, भाग्य जळे सरणात
जो सरण घेई उशाला...बात त्याची कशाला?

आकाश चोळते अंगा, उटणे कधी प्रकाशाचे 
तो प्रकाश थैमानी ऐसा...बात त्याची कशाला?

उरगांनी गिळली धरती, धरतीने गिळले आभाळ
आभाळ खाते माती...बात त्याची कशाला?

तो सूर्य उगे हृदयात, हृदयाला आली भरती
जो अथांग प्रेमे व्याला....बात त्याची कशाला?

मी म्हणतो "मी" पण नाही...तू म्हणतो "तू" पण नाही
मग जो नाहीच अस्तित्वाला...बात त्याची कशाला?

3 comments:

  1. संजय , बहुत बढीया ! जिओ !
    म्यानातून उसळे तलवारीची पात
    वेडात मराठे वीर दौडले सात
    ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
    सरदार सहा सरसावुनि उठले शेले
    रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
    उसळले धुळीचे मेघ सात निमिषात
    आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
    अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
    छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
    कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
    खालून आग, वर आग, आग बाजूंनी
    समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
    गदीर्त लोपले सात जीव ते मानी
    खग सात जळाले अभिमानी वणव्यात
    दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
    ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
    क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
    अद्याप विराणी कुणी वार्‍यावर गात -
    स्वा सावरकरांच्या कवितात असा रिदम असायचा ! ( तुम्हाला हि तुलना म्हणजे शिवी दिल्यासारखे वाटेल कदाचित )
    या योगेश यांच्या कवितेत जो रिदम दिसतो तो आपल्या इथे जाणवतो !`

    ReplyDelete
  2. संजय ,
    कुणीतरी
    वेड्यात दौडले वीर मराठे सात चे उदाहरण दिले आहे
    कवी योगेश यांच्या शब्दाना मंगेशकर कुटुंबियांच्या स्वराचा अमृत स्पर्श झाला आहे !
    ते भाग्य आपल्या या रचनेस लाभेल का ?
    खूपच अप्रतिम ओळी झाल्या आहेत !
    अभिनंदन !

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती देत आहोत सर

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...