Saturday, May 31, 2014

माणसाचे माणुसपण...



"माझे साहित्य म्हणजे माणुस आणि मानवी संस्कृत्यांच्या तळाचा शोध आहे. जगाच्या ज्ञात इतिहासात हजारो संस्कृत्यांचा उदय झाला आणि त्या नष्टही झाल्या. त्या त्या संस्कृत्यांचे श्रेष्ठ देवही कालौघात नष्ट झाले. मार्डुक उरला नाही कि ओसायरिस, इंद्र-वरुण उरले नाहीत कि एल-बेल. देवच नष्ट होतात तर त्यांच्या देवत्वाची महती ती काय? संस्कृत्या नष्ट होतात त्या आपल्याच वजनाखाली चिरडत जातात म्हणून. तरीही माणसाचा संस्कृतीचा हव्यास सुटत नाही. अमूक काळातील, अमुकची संस्कृती श्रेष्ठ कि कनिष्ठ असे ठरवायचे मापदंड नसतांना आम्ही आमच्याच संस्कृती श्रेष्ठत्वाबद्दल आग्रहाने बोलायला फार आतूर असतो. संस्कृती म्हणजे मालकी हक्कांचा आमचा अथक झगडा, मग तो नैतीक असो, भावनिक असो, कायदेशीर असो कि अनैतिक असो.

इतिहासात महासत्ता, राजकीय असोत कि सांस्कृतिक...त्याही नष्ट झाल्या आहेत. ग्रीक गेले, नंतर रोमन गेले, बायझंटाईन कोसळले. अलीकडे इंग्रजांचे अर्ध्या जगावरील राज्य संपले. आज अमेरिकेची जागा घ्यायला कोण पुढे येतेय यात स्पर्धा आहे. आमच्या आजच्या संस्कृतीचा इतिहास दोनशे वर्षांपलीकडे जात नाही...पण आम्ही आमची नाळ संस्कृतीच्याच नांवाखाली हजारो वर्षांपर्यंत भिडवायचा प्रयत्न करतो.

प्रत्येक काळात आहे त्या संस्कृतीचे विरोधक असतात. म्हणजे ती संस्कृती परिपुर्ण नसते. असंतुष्टांचे असणे हेच मुळात संस्कृतीश्रेष्ठत्वाच्या तत्वाच्या विरोधात जाते. मनुष्यच सम्स्कृतीचा विनाश करतो आणि तरीही त्याला सम्स्कृतीच्या बेड्या तोदता येत नाहीत. संस्कृती म्हणजे मानवी स्वातंत्र्याला अधिकाधिक बेड्या घालणारी यंत्रणा आहे. जेवढी बंधने अधिक, मग ती नैतिक असोत, धार्मिक असोत, सामाजिक असोत कि कायद्याची, तेवढे आम्ही सुसंस्कृत असे म्हनण्याचा, मानण्याचा प्रघात आहे. आमची सम्स्कृती ही मुलात काय करु नये अशा नकारात्मक बंधनांवर उभी आहे. अशी संस्कृती मुळात का हवी आहे? कृत्रीम पायावर उभा असलेला, चिरस्थायी नसलेला राष्ट्रवाद का हवा आहे? धर्मवाद का हवा आहे?

धर्माशिवाय माणूस जगु शकत नाही हे मानसाचे कृर वास्तव आहे. विज्ञानाचाही तो धर्म बनवतो. नास्तिकही नास्तिकतेवर श्रद्धा ठेवतो तेथेच तो आस्तिक बनतो. विज्ञानही धर्माप्रमाणेच चिकित्सा नाकारू लागते. तेथेही विज्ञाननिष्ठ पुरोहितांचे स्तोम माजते. विरोधी आवाज सहजी ऐकून घेतला जात नाही, ही मानसाची शोकांतिका आहे.

आणि

(आज कल्की, कुशाण, व ओडिसी या माझ्या कादंब-यांच्या प्रकाशन समारंभातील माझे मनोगत. भाषण उत्स्फुर्त होते. त्यामुळे वरील जसेच्या तसे नाही, पण जवळपास हेच!)

माणसाचे माणुसपण शोधणे हे माझे कर्तव्य मी समजतो. माणुस हा असा आहे. तो वैश्विक व्हावा असे तर किमान स्वप्न आहे. आज तरी संपुर्ण ज्ञात विश्वात मनुष्य एकाकी आहे. पण असे असुनही संस्कृती, राष्ट्र, धर्म, जाती, वर्ग वगैरेंनी तो एवढा विखम्डित झाल आहे कि या पृथ्वीवरही तो सर्वात असुनही एकाकी आहे. या सा-या मानसिक प्रवासांचा केंद्रबिंदू म्हणजे आज प्रकाशित होणा-या कादंबरीत आहेत."

2 comments:

  1. 'आमची सम्स्कृती ही मुलात काय करु नये अशा नकारात्मक बंधनांवर उभी आहे. 'अत्यंत समर्पक विधान. पण पिढ्या घडवायच्या असतील तर काय करू नये हे सांगायची वेळ येतेच. त्यामुळे नकारात्मकता असावी पण ती सकारात्मक असावी. असं मला वाटतं.

    ReplyDelete
  2. मस्त आयडीया आहे रे विजयकुमार !
    नकारात्मता असावी पण ती सकारात्मक असावी !

    आम्हाला समजल नाही रे !
    हे कस काय असते
    कुणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगील काय ?

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...