Thursday, September 11, 2014

अभिव्यक्ती

लेखकाला अनेक प्रश्न पडत असतात. आपल्याला लिहावे असे मुळात का वाटते आणि ही प्रक्रिया नेमकी असते तरी कशी याचे आकर्षण वाचकांना असते. खरे तर व्यक्त होणे ही मुळात माणसाची मुलभूत गरज (innate need) आहे...ती नसती तर भाषा-कला-विज्ञान-धर्मादि सांस्कृतिक संकल्पना मुळात विकसीत करण्याची गरज आदिमानवालाच वाटली नसती आणि आज आपण ही चर्चा करायलाही नसतो. जेथे पहिली अभिव्यक्ती झाली तेथुन माणसाची संस्कृती सुरू झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

व्यक्त होण्याला पर्याय काय तर याचे उत्तर आहे मुळात हा असा प्रश्न जेंव्हा मनात निर्माण होतो तीही एक अभिव्यक्तीच असते. प्रश्न पडणे हे व्यक्त होण्याचेच लक्षण आहे. किंबहुना "हे असे का आहे?" हा प्रश्नच माणसाच्या अगणित अभिव्यक्तींची द्वारे उघडत असतो. स्वता:च स्वत:शीचा संवाद, जरी तो व्यक्त केला गेला नाही तरीही ती भावी अभिव्यक्तीचा पायाच असते.

तिसरे असे कि स्वत:चाच स्वत:शी होणारा संवाद...अनेकदा पोलिटीकल असतो का...तर उत्तर आहे होय. मनुष्य अनेकदा स्वत:लाही फसवत असतो वा स्वत:बद्द्ल खरे नसलेले समज करुन घेत असतो वा अभिव्यक्तिमार्फत स्वत:ची विभ्रमी प्रतिमा निर्माण करत असतो...आणि हे सारे पोलिटिकलच आहे. चवथे म्हनजे आपण केवळ एक हब आहोत कि किंगमेकर...प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पातळीवर हबच असतो. कारण लेखक कधीही स्वतंत्र नसतो तर त्या-त्या वर्तमानाच्या व इतिहासाच्या व्यक्तीगत आकलनाच्या परिप्रेक्षातच त्याची वैचारिक आवर्तने असतात...

समजा आदिमानवावर कादंबरी लिहायचे ठरवले तर केवढी पंचाईत होवून जाईल? कारण त्याची मनोभूमिका या वर्तमानात समजणे अशक्यप्राय आहे. कल्पनेच्या डोला-याने कदाचित ती सजवता येईलही कदाचित...पण ती अवास्तव आणि अनैसर्गिकच असेल....कारण मनोवस्था काहीकेल्या वर्तमानाचे संदर्भ सोडू शकणार नाही. म्हणजे आपण हबच असतो...किंगमेकर नव्हे.

पाचवे म्हणजे खरे तर कल्पना सुचते तोच क्षण असतो निर्मितीचा...पुढची सारी हमाली असते. त्यामुळे लेखन प्रसिद्ध झाल्याक्षणी लेखकाचा मृत्यू होत नसतो तर ज्या क्षणी कल्पना सुचते त्याच क्षणी खरे तर त्याचा मृत्यू झालेला असतो. पण एका कल्पनेशी मानवी जीवन संपत नसल्याने पुनरपी लेखकीय जननं सुरुच रहाते. मानवी मन हे पुन्हा सातत्याने कल्पनांच्या मुक्त अवकाशात विहरत असल्याने अंतिम लेखन ही गोष्ट आस्तित्त्वात असु शकत नाही. लिहितो तोच लेखक असेही नाही. लिहिणारा जरा जास्तच हमाली करतो असेच फारतर म्हणता येईल.

मुळात लेखन वाचले जावे यासाठी लेखक लिहितो. मुळात अभिव्यक्ती ही सामाजिक शृंगारासारखी अथवा त्यासाठीच आहे. त्यासाठीच तीत नटवेपणा हा अपरिहार्यपणे असतोच! त्यामुळे लिहुन झाल्यावर व ते एकदाचे प्रसिद्ध झाल्यावर त्याच्याशी नाळ तुटली असे सहजी होत नाही. फक्त "स्व" ची प्रारुपे मांडली म्हणजे कार्यसिद्धी झाली हे प्रत्यक्ष लेखनापुरते खरे आहे. त्याचा स्वीकार करणारे वा न करणारे वा प्रतिक्रियाहीन होणारे वाचक हा तरीही लेखकावर एकुणात प्रभाव टाकणारा घटक असतोच. आणि लेखकाला या प्रतिक्रियांच्या मंडपाखालून जावेच लागते. त्यामुळे तो निसरडा मामला नसून अनेकदा वाचकीय अभिव्यक्तीच्या परिप्रेक्षातच लेखक घडतो...त्याला तसे फारसे स्वातंत्र्य नसते. ऊदा. हजारो वर्ष महाकाव्यांनी जगभर राज्य केले...महाकाव्यांची शैली जावून क्रमश: गद्य आले...लेखकांनी अभिव्यक्तीची पद्धत बदलली. त्यामुळे लेखक कि वाचक...कोण श्रेष्ठ असा प्रश्न विचारला तर लेखकांची पंचाईत होवून जाते ती यामुळेच.

शेवटचा प्रश्न. एका चर्चेत खूप मागे विचारला गेला होता कि "स्व आणि विश्व यांना एकमेकांचे कोंदण देणे अथवा न देणे आणि या परस्परसंबंधावर लेखन करणे हे ''आरश्यात आरसा'' या टाईपचे अगणित, अमर्यादित स्व व विश्वे निर्माण करण्यासारखे खूळ तर होत नाही ना ?" खरे तर हा प्रश्न नसुन उत्तरच आहे. मुळात खूळ असते म्हणुन लेखक बनतो. आणि कोणतीही कलाकृती ही आरशात आरसा अशीच असते आणि स्व आणि विश्व यातील परस्परसंबंधांचा त्याची कृती ही एक धांडोळा असते...आरसा मळकट असु शकतो...तसाच चकचकीतही...ते लेखकाचे व्यक्तिगत यशापयश म्हणता येईल, पण मतितार्थ तोच आहे. ज्याला वास्तव पारदर्शी म्हणता येईल असे लेखन केले तर त्याला साहित्य म्हणता येईल का? मुळात साहित्याचा अर्थ हाच कृत्रीमतेचा सोस असा आहे. या कृत्रीमतेतून वास्तव व पारदर्शी असल्याचा आभास काही श्रेष्ठ लेखक देत असतात. पण तोही कृत्रीमतेचा सोसच असतो हे लक्षात ठेवायला पाहिजे. मुळात संस्कृतीचा अर्थच मुळी अधिकाधिक कृत्रीमता आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

शेवटी "स्व" पुरते जगणे हे नित्य नवेच असते. प्रत्येक अनुभव हे अभिनवच असतात. प्रत्येक जीव हेच मुळात स्वतंत्र आस्तित्व असल्याने ते सामुदायिक यंत्रमानवांचे जगणे नसुन विश्वात काहीच नवे नाही आणि तरीही नित्य नवे आहे हा अनुभव व्यक्तींना येतो. "मी आणि विश्व यात मी बघणारा आहे आणि विश्वही मला बघत आहे...हा विभेद तेंव्हाच नष्ट होतो जेंव्हा बघणारा आणि पाहिला जाणारा एकाकार होतो." (ब्रह्मसुत्र) असे जेंव्हा होते तेंव्हा माणसाची अभिव्यक्तीची आदिम गरजच नष्ट होते...मग कसला लेखक आणि कसला वाचक? किंबहुना अशा अवस्थेत काहीच शिल्लक उरत नाही.

लेखकाला लिहावे वाटते म्हणुन लेखक लिहितो आणि वाचकाला वाचायला आवडते म्हणुन वाचक वाचतो. वाचकाला असंख्य लेखकीय पर्याय असतात...लेखकाचे तसे नसते. वाचकच नसेल तर लेखक येणार कोठुन? लेखक आणि वाचक मिळुन समग्र साहित्य-समाज बनतो...तेंव्हा लेखक आणि वाचक यांच्यातील श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या भावना तारतम्यानेच घ्याव्या लागतात.

5 comments:

  1. आप्पा - संजयजी , आपण इतके मार्मिक लिहिले आहे की पहिली काही मिनिटे दिग्मूढ होऊन विचारात गुरफटला गेलो - दु ss ध करून गवळ्याचा हाकारा आला आणि परत या जगात आलो -
    बाप्पा - खरेच अगदी मनातले बोललास - मी वाचत होतो - आणि - कधी संपले समजलेच नाही !
    आणि अशा लेखाचे कौतुक करायचे नाही तर कशाचे करायचे ?
    आप्पा - किती तरी विचारांच्या साखळ्या निर्माण झाल्या - रेल्वेतून प्रवास करताना खिडकीतून लहानपणी बघत असे , एक वायर झपझप पटकन धावत दुसरीला टेकायची - क्षणात स्पर्श करत परत दूर -जायची परत जवळ यायची !किती मन रमून जायचे त्यात
    बाप्पा - अशी विचारांची किती आवर्तने मनात लेख वाचताना - सांगू - आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणजे काय ते अगदी थोडेथोडे स्पर्शून गेल्याचा भास झाला असे वाटले - कुणास ठाऊक - पण फारच अप्रतिम !
    आप्पा - संजयला खांद्यावर घेऊन नाचावेसे वाटले ! प्रेमातच पडलो आपणतर या लिखाणाच्या !
    बाप्पा - थोडे थोडे अध्यात्माच्या अंगाने जात आहे असे वाटतंय तोवर प्रत्यक्ष सुईणीच्या भाषेतले एखादे वाक्य परत या दिव्य अनुभूतीची गाथा समोर मांडत - संजयाने असा काही सूर लावला होता की त्याला स्वर मालिकेचा हुंकार म्हणायचे - - का ओंकार ? भावना शब्दात नाही मांडता येत - अंतर्मुख करणे हेच लेखनाचे सार असते का संजय ? अरे किती सुंदर लिहिले आहे तुझे तुलाच माहित नाही - हीच गम्मत आहे - आपल्या संतांच्या लिखाणात कस्तुरीमृगाची उपमा दिली आहे ती किती खरी आहे !
    आप्पा - मला वाटते एकदा मनात उमटलेला विचारतरंग हा पक्का होत नसावा - तो शांत पाण्यावर उठणाऱ्या दगड फेकल्यावर नाचणाऱ्या लाटेसाराखां असतो - एकामागून एक चिंतन मनन करत आपण राग आळवावा तसे विचार आळवत असतो - त्यातून एक कोमल रस तयार होतो - तो मनात पाझरतो आणि लेखणी बोलू लागते सारखा उमटत राहतो आणि त्यावेळेस जाणवते या प्रसूती वेदना आहेत - !काहीतरी नवीन जन्माला येते आहे !
    बाप्पा - भावना आणि विचार - हे कोडे न संपणारे आहे - आधी काय ? आदि मानवाला पहिले लिहावेसे का वाटले असेल -भीती ,संकट नाविन्य ,काय सांगायचे असेल ?माणूस याला असेल का ?अस्थिर असताना काय असेल ? आपण आपल्याशी संवाद करू शकतो हा शोध तर किती थोर आहे !अमाप सामर्थ्य आहे त्यात !
    आप्पा - संजय असेच लिहित रहा
    बाप्पा - संजय असेच अचानक तुझ्या प्रतिभेची लकाकी आम्हास दिसू दे !
    आप्पा - संत लोकाना केव्हढी देणगी होती ना - केव्हढे ब्रह्मांड त्यांना समजले होते आणि किती त्यातले ते आपणास देऊ शकले असतील , आणि आपण घेतले असेल ?
    बाप्पा - आपली झोळी रिकामीच राहिली - आज संजयाने हा आनंद दिला - !

    ReplyDelete
  2. या आप्पा बाप्पा सारखी हि बामणी औलाद अशीच लाडात येत्ये आणि तुमची वाट लावते

    ReplyDelete
  3. संभोगातून समाधीकडे वाचल्यावर असेच वाटले होते -
    तो क्षण महत्वाचा असतो बाकीची हमाली असते -
    असे आयुष्यात हमालीचे किती प्रसंग येतात ?
    आपल्याला आजूबाजूच्या बद्दल प्रश्न पडणे आणि शंका येउन उत्तर सुचणे हा एक प्रकार आणि आपल्याला अस्तित्वाबद्दल प्रश्न पडणे आणि याचा कुणीतरी निर्माता आहे का ? निर्माता मानला की सुरवात आली आणि अंतही आला - मग या मधल्या जगण्याचे प्रयोजन काय हा मूलभूत प्रश्न !
    आपल्याला काहीतरी होते आहे - त्रास होतो आहे - शंका येते आहे हे समाजाने सुद्धा आदिमानवाला किती अवघड गेले असेल - जीवन नुसते चक्राकार - भिरभिरते - स्थिरता नाही - जीवनाला आशय असतो हे सुचणे हीच केव्हढी क्रांती आहे !
    आपण शक्य तितक्या सोप्या भाषेत विवेचन केले आहे - ते समजायला अनंत काळ मागे जावे लागते - सगळीच प्रक्रिया चिंतनावर अवलंबून ! आपल्या बुद्धीला ताण असतो का कल्पनाशक्तीला ?
    एकंदरीत फारच वाचनीय आहे - असेच अजून लिहा संजय सर !

    ReplyDelete
  4. हा कोब्रा म्हणजे एक करमणुकीचे साधनच बनला आहे! हा दोन्ही प्रकारच्या उलट-सुलट प्रतिक्रिया स्वतः च देत आहे! कधी डोक्यावर घेतो तर कधी एकदम जमिनीवरती आपटतो! सोनावनींनी याचे काय घोडे मारले आहे, यालाच ठावूक? ठीक आहे, आपले मनोरंजन होत आहे, हे ही नसे थोडके!

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...