Wednesday, September 10, 2014

ज्या देशात प्रागतिक लोक ......

व्यवसायाच्याच निमित्ताने माझ्या चीनसहित अमेरिकेपर्यंतच्या ६-७ वा-या झाल्या. विदेशात गेल्यानंतर नकळत का होईना आपल्या मायभुमीतील वास्तवाची तुलना होतच असते. विदेशातील सारेच काही महान आहे असे मानणा-यांपैकी मी नाही. तिकडेही, अगदी अमेरिकतही लबाड आणि बुडव्या व्यावसायिकांची आणि संधीसाधुंची कमतरता नाही. वरकरणी सुखासीन वाटणा-या अमेरिकनांतही दारिद्र्य नाही असे नाही. इंग्लंडमद्ध्ये चक्क मी एका भिका-याला शंभर पौंडांची भीक घालून खोटे का होईना समाधान मिळवले आहे. अमेरिकेत गुरुवार आला कि "आयम ब्रोक" म्हणनारे महा-कंपन्यांतील कामगार पाहिले आहेत. आपल्या देशातील सर्वच काही वाईट आहे असे मानणा-यांसाठी एवढे सांगुन लेखाच्या प्रतिपाद्य विषयाकडे वळतो.

मला अमेरिकेत आणि युरोपातील होलंड आणि इंग्लंडमधील आवडलेली बाब म्हणजे उद्योगांचे विकेंद्रीकरण. मी ज्या उद्योगांना भेट दिली त्यांच्या आसपास मला आपल्याकडे दिसते तशी छोट्या-मोठ्या उद्योगांची घनदाट भाऊगर्दी दिसली नाही. जपान-चीनमधील बाबही फारशी वेगळी नव्हती. तेथे मी उद्योग स्थापन करायचे ठरवले तर जागा मिळवणे, कंपनी स्थापन करणे इत्यादी तांत्रिक बाबी अत्यंत सोप्या असलेल्या दिसल्या. परदेशी म्हणून शंभर कागदपत्रांची कोणी मागणी केली नाही. अगदी स्पर्धकाला काही मदत मागितली तर आडपडदा न ठेवता उत्साहाने मदत मिळाली. हे जाउद्या, विमानतळांवरही अत्यल्प जाच. नम्र आणि हसत खेळत सेवा. एखादी माहिती वा रकाना भरला नाही तरी त्याचे विशेष वाटून न घेता हसत "देयर यु गो..." असे म्हनून वाटेला लावत. जपानमधील किस्सा. मी तेथे गेलो १९९८ साली. माझ्याकडे आधीपासुनच मोबाईल होता. तेथे आमचा फुजिया ओशिरो हा वितरक होता. तीन दिवस सलग सकाळी आठ ते रात्री बारा-एकपर्यंत आम्ही बरोबरच असायचो. या कलात मी त्याला मोबाईलवरून बोलतांना एकदाही पाहिले नाहे. मी चक्क गैरसमज करून घेतला. शेवटच्या दिवशी तो मला एयरपोर्टवर सोडायला आला. तेथे आल्यावर तो एक क्षण थांबला...झप्पकन कोटाच्या खिशतून इवले इंस्ट्रुमेंट काढले, पाच-दहा सेकंद काहीतरी बोलला आणि जेवढ्या तत्परतेने ते बाहेर काढले तेवढ्याच तत्परतेने खिशात. मला अक्षरश: लाजल्यासारखे झाले. मी त्याला त्याबदल छेडले असता तो हसत म्हनाला...."यु इंडियन्स आर टाकिंग...टाकिंग अन्ड टाकिंग...व्हेन डु यु वर्क?" आता मी अजुनच लाजलो. माझ्या कार्यालयात फोनच्या पाच लाईन्स असुनही मीही बाहेरुन फोन केला तर सतत एंगेज....


                                             (With Fujia Oshiro in his office)

असो. अनुभव भरपूर आहेत पण वरील अनुभवांच्या संदर्भात आपल्याला आपल्या अवस्थेची चर्चा करायची आहे.

मी सामाजिक जीवनात आल्या दिवसापासून एकच प्रचार करत आहे तो म्हनजे विकेंद्रीत अर्थव्यवस्थेचा. आज भारताची अर्थव्यवस्था वाढती असली तरी तिच्या केंद्रीकरणामुळे अत्यंत विषम वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्या. मुंबई, पुणे, औरंगाबाद ते कोल्हापूर अशी पश्चिम महाराष्ट्रातील शहरे उद्योग-व्यवसायांच्या अतिरेकी केंद्रीकरणामुळे अक्षरशा: बकाल बनत आहेत तर खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ मात्र उद्योग नाहीत म्हणून बकाल बनत चालले आहेत. पुण्या-मुंबईतच स्थापन होऊ शकतील असे खरे तर किती उद्योग आहेत? ज्या कारणांनी पुणे - मुंबईचे आकर्षण व्यावसायिकांना वाटते तशीच कारणे आम्हाला विखरून का निर्माण करता आली नाहीत? थोडक्यात उद्योगव्यवसायांचे संतुलित असे वितरण का करता आले नाही? तशी मानसिकता आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करायला हवी, कोणत्याही प्रकारचा बकालपणा हा आर्थिकच नव्हे तर सामाजिक अवनतीलाही कारण ठरतो यावर आमच्या तज्ञांनी व शासनाने का विचार केला नाही?

बरे, ही झाली एक बाब. दुसरी सर्वात महत्वाची बाब म्हनजे शेती हा अजुनही भारतीय अर्थव्यवस्थेचा व ५५% जनजीवनाचा मुख्य आधार आहे हे लक्षात घेऊन शेतीमालाधारित लघू ते मध्यम उद्योग, अगदी खेडोपाडीही काढण्यासाठी का उत्तेजन दिले गेले नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. भारतात आजही ३०% फळ-भाजीपाला पुरेशा साठवणुकीच्य साधनांचा अभाव, वाहतुकीच्या अपु-या सुविधा यामुळे वाया जातो. निर्जलीकरणासारख्या वा अन्य खाद्योद्योगांच्या सोप्या तंत्रज्ञानाच्या पद्धती आम्ही ग्रामीण शाळा-कोलेजांमधून अभ्यासक्रमातुनच जर शिकवल्या असत्या तर दोन बाबी नक्कीच झाल्या असत्या. शेतमाल म्हणजे राष्ट्रीय साधनसंपत्तीच आहे. ती वाया जाण्यापासून वाचली असती. मुल्यवर्धकता आली असती. आणि ग्रामीण तरुणांना रोजगारही स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाले असते. होलंड व इंग्लंडमध्ये मी अनेक अत्यंत छोट्या ते बहुराष्ट्रीय प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या. मांस-मासळीपासुन ते भाजीपाल्यांचे निर्जलीकरण कसे केले जाते हे पाहिले. आपल्याकडे उन्हात वाळवण्याची कला आहे. सुक्या मासळीची एकटी देशांतर्गत बाजारपेठच १७ हजार कोटींची आहे. जगभर मागणी आहे. परंतू सोप्या असलेल्या तंत्रज्ञानाशीही आम्ही आमच्या नागरिकांना ओळख करून दिली नाही. त्याचा परिपाक म्हणजे ग्रामीण व किनारपट्ती भागात वाढत चाललेली बेसुमार बेरोजगारी.

म्हणजेच विकेंद्रीकरण, कि ज्यायोगे लोकसंख्याही योग्य प्रमाणात वितरीत होईल, पाणी ते वीज यासारख्या मुलभूत सुविधांवर आज पडलाय तसा अतिरेकी ताण पडनार नाही आणि घरापासून ते जमीनींच्या किंमतीही आटोक्यात राहतील. आजवर आम्ही ते केले नाही. आतातरी ते करण्याची गरज आहे.

दुसरे म्हणजे पंतप्रधानांनी १०० स्मार्ट सिटी बनवण्याचा संकल्प सोडला आहे. या नव्या शहरांची गरज नाही तर अविकसीत भागांतील निवडक शहरे "स्मार्ट" बनवण्याची गरज आहे. अशा शहरांना सर्व पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील हे पाहण्याची गरज आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांत नवीन उद्योगांना परवानग्या देण्याचे थांबवले पाहिजे, लोकसंख्येचा ताण आता पुढे किमान वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. प्रगत देशांनी आपल्या प्रत्येक संसधनांचा व्यावसायिक वापर अत्यंत कुशलतेने केला आहे. विकेंद्रीकरणाचे धोरणही राबवले आहे. ते आपल्याला जमलेले नाही. ते आता तरे जमायलाच हवे.

दुसरी बाब म्हणजे भारतीय आपल्या कामात आनंद मानतात का कि केवळ दिवसाचे तास कसेबसे भरायचे आणि घरला पळायचे असा उद्योग करतात? म्हणजे भारतीय कामचुकार आहेत काय? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येईल. विमानतळांवरही हसतमूख स्त्री-पुरुष कर्मचारी मला दिसलेले नाहीत. मक्ख आणि वैतागवाने चेहरे. जणू ते प्रवाशांवर उपकार करत आहेत. कधी ड्युटीचे तास संपताहेत आणि बाहेर पडतो असे त्यांना झाले आहे. इतरत्र स्थिती काय आहे? फेसबुक आणि ब्लोगवरील हजर सदस्यांची संख्या खरे तर सुट्टीच्या दिवशी असायला हवी. प्रत्यक्षात आपल्याकडे उलटे होते. सोमवार ते शुक्रवार, सकाळी अकरा ते सहा येथे उदंड रिकामटेकडेच वाटावेत एवढे "कर्मचारीच" हजर असतात...सुट्टीच्या दिवशी मात्र ही संख्या कमी असते. मग फुजियो ओशिरोचा प्रश्न आठवतो...तुम्ही मग काम कधी करता? कामात कधी रमता कि नाही? तसे असेल तर तुमची नेमकी उत्पादकता काय? ज्ञान वर्धिष्णू ठेवण्यासाठी काय करता?

आपल्याकडे श्रमसम्स्कृती जशी लयाला जात आहे तशीच कामावरची प्रीतही हरवत चालले आहे. आधुनिक साधने ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी असतात, घटवून घेण्यासाठी नाही याचे भान आपली कार्य संस्कृती देत नाही...शिक्षणव्यवस्थाही देत नाही हे आपले दुर्दैव आहे.

मग नवीन संशोधने, नवीन कौशल्यांचा विकास, कार्यपद्धतीबाबत नवे प्रयोग कसे होणार? उलट एकुणातील कार्यक्षमता कमी होत मालकांचे आणि पर्यायाने राष्ट्राचे नुकसान होते आहे याचे भान आपल्याला उशीरा का होईना यायला पाहिजे.

सर्व बाबींवर शासनावर अवलंबून रहायची दुर्दैवाने भारतीय समाजाला सवय लागली आहे. आरक्षणाचे भूत सर्व जातींच्या मानगुटीवर जे बसलेय ते आपल्या समाजाच्याच एकुणातल्या नाकर्त्या मानसिकतेमुळे. आज जी प्रगती होते आहे तिने दिपून जात स्वता:च्या कोषात अडकण्याचे कारण नाही. आताची प्रगती हा एक फुगा आहे जो अजुन दहा-पंधरा वर्ष फार तर टिकेल. परकीय गुंतवणूकीचे एक चक्र असते. ते सुरुवातीला एतद्देशियांना फायद्याचे वाटले तरी ते एका क्षणी उलटे फिरु लागते व तोट्याची स्थिती येते. भारतीय हा तोटा गृहित धरून आतापासुनच पर्यायी अर्थव्यवस्थेचे तत्वज्ञानही कसे विकसीत करतात त्यावर आपली शाश्वत प्रगती अवलंबून आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

आपली मानसिकता हाच कोणत्याही बदलाचा मुलाधार असतो. साधने आसपास असतातच. ती शोधत त्यांचा कुशलतेने वापरु शकणारेच अर्थव्यवस्थेचे खरे चालक असतात. आपण मात्र चालक होण्याऐवजी व्यवस्थेच्या लोंढ्यात हाती येईल ते पळवत व्यवस्थेचा फायदा होतो आहे असा जेंव्हा आभास निर्माण करतो तेंव्हा या लोंढ्यात हाती काहीच लागू शकणारे अगणित असतात आणि ते शेवटी अगतीकतेच्या, पराभूत मानसिकतेच्या दुश्चक्रात अडकत जातात याचेही भान ठेवायला हवे.

ज्या देशात प्रागतिक लोक राहतात तेच देश प्रगत होतात...

आपण जोवर आपला समाजच प्रागतिक मनोवृत्तीचा बनवत नाही, तशी समाज-मानसिकता बनवत नाही, तोवर प्रगत देशांशी नुसती तुलना करून तरी काय होणार?

14 comments:

  1. संजयजी नमस्कार,
    आजचा लेख वाचून खूप छान वाटत आहे. हा लेख सकारात्मक आहे. आज आपल्या देशाला उद्योगी बनवणे हेच मोठे समाज कार्य आहे. समाजात फुट पाडणाऱ्या तेढ निर्माण करणाऱ्या चर्चा या पुढे होऊ नये.

    ...
    धन्यवाद,
    शिवचंद्र, पुणे.

    ReplyDelete
  2. 100 pound chi tumhi bhik englad madhe deta khup srimant aahet tumhi?

    ReplyDelete
  3. संजय सोनावनी ,
    नमस्कार ,
    शिवचंद्रानी सुंदर सुचना केली आहे
    आपला देश आणि जपान इंग्लंड यात आकार आणि लोकसंख्या निकषावर खूपच फरक आहे - आपल्याकडे धरणे नाहीत , वीज नाही , रस्ते नाहीत , त्यामुळे पुण्याजवळचे भोरचे सर्व कारखाने बंद पडले नुसते सबसिडी देऊन काहीही होत नाही !- त्यात प्रचंड घोटाळे - आर्थिक आणि सर्वच !भ्रष्टाचार तर पाचवीला पुजलेला !
    आपल्या ब्राह्मणांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असे आशीर्वाद दिल्यामुळे लोकसंख्या अफाट वाढली आहे ,त्यासाठी सर्व ब्राह्मणाना शिक्षा दिली पाहिजे आणि असे आशीर्वाद न देण्याचा कायदा केला पाहिजे !
    मात्र आपण त्यापुढे जाउन असेच सकारात्मक लिहित जावे हि विनंती
    राजकारणास योग्य असे भाष्य कमी करून समाजकारणाचे व्रत घेतले
    आणि पुढील ३००० वर्षे वैदिक अवैदिक बाबत काहीही बोलला नाहीत तरी या देशाचे काहीही बिघडणार नाही - कारण मुसलमान आले - इंग्रज आले - तरी देश धर्म टिकून आहे -
    आपण या जगात नव्हता त्यावेळेस हे जग चालूच होते आणि आपण नसाल तरी चालूच राहील ,त्यामुळेच शिवाजी महाराजांनी बहुतेक संत तुकारामांचा खून तितका सिरीयसली घेतला नसेल - तुम्ही शैव अवैदिक वैदिक हा विषय बंद केला की म्हणजे आपलेही कल्याण होईल आणि आमच्या बहुजन समाजाचे - उगीचच तुमची भाषणे आणि लेख वाचून अवघडल्यासारखे होते -
    आपली जय मल्हार मधली मल्हाराची भूमिका अप्रतिम आहे !,
    नाटके करण्यात आपण माहीर आहात -
    त्याबद्दल अभिनंदन !

    ReplyDelete
  4. आप्पा- अरे वा , मान गये उस्ताद !
    बाप्पा - का हो ? काय झाले - इतका आनंद का ओसंड्तोय ?
    आप्पा - काय सांगू - आज मला समजले ब्राह्मणांचे पाप काय ते ! इतक्या वर्षात हा मुद्दा कधी जाणवलाच नाही म फुले सुद्धा सांगू शकले नाहीत राजर्षी शाहू महाराज पण चकले !
    आप्पा - कसला मुद्दा ? अहो संजय बघा काय म्हणतो आहे - तो तिकडे लांब लांब समुद्र पार करून गेला होता - बाप रे - किती लांब - आणि त्याला दिसले की सगळीकडे लोक काम करताहेत - संप नाही - दंगली नाहीत - तिकडून सूर्य उगवतो त्या जपानमध्ये तर लोक मोबाइल्र पण वापरत नाहीत - म्हणजे अगदी कमी ! म्हणे तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस - वारेन बुफेट तर मोबाईलच वापरत नाही - अगदीच ब्याकवर्ड दिसतो - आमच्या कडे बघ !
    बाप्पा - म्हणजे आपल्या सारखे नाही ?
    आप्पा - नाही नाही नाही फक्त कामापुरतेच बोलतात हसतात - त्यांना सिक्लीव्ह नाही लागत , बाप्पा - कामगार तर जास्त काम करून आपला निषेध व्यक्त करतात
    आप्पा - अरे पण आपल्या इथे सर्व कोलमडते - सगळे योजलेले फसते ! का ते विचार ?
    बाप्पा - का ?
    आप्पा - हे आपले वैदिक ब्राह्मण , यांनी जर अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असे आशीर्वाद दिले नसते तर आज हि वेळ आलीच नसती - दरवर्षी वटपौर्णिमेला ब्राह्मणाचे आशीर्वाद - मग काय पाळणा हलायला कितीसा वेळ लागतोय - खायची तोंडे इतकी वाढली - याला सर्वस्वी ब्राह्मण जबाबदार आहेत कमावणारा एक आणि पिलावळ दहा जणांची !
    बाप्पा - असे कसे होईल ? त्यांचे सर्व आशीर्वाद खरे कुठे झाले ?
    आप्पा - अरे पण या आशीर्वादामुळे सर्वच बिनसले ना !
    बाप्पा - अजून काय सांगत होता संजय ?
    आप्पा - तिकडे खेड्यातून क्रांती होऊन सर्व विकेंद्रीकरण झाले ! सगळे उद्योग खेड्यात गेले
    बाप्पा - आपल्याकडे खेड्यात जायला रस्ताच नाही ! कसे करणार काम ? कच्चा माल आणि पक्का माल कसा नेणार आणणार ?- वीज नाही - पाणी तर नाहीच नाही - पाउस अजून देवावर भरोसा अथेवुन - ज्यांच्या हाती कारभार होता त्यांनी प्रचंड पैसा खाल्ला ! कालवे अर्धवट , खेडी अंधारात !मग उद्योग तर दुरकी बात आप्पासाहेब !
    खरे आहे , पण आता व्हित्र बदलणार म्हणतो आहे संजय - मोदी काहीतरी करतील असे संजय म्हणत होता - कुणाला सांगू नको - पण गंगा पण म्हणे पवित्र होणार आहे असे म्हणे !
    आप्पा - मी काय म्हणतो - बघ - पटतंय का ते - संजयला म्हणाव , मोडीना काहीतरी करायचंय चांगल हे नक्की - आणि संजयला पण तसेच काहीतरी करायचं बहुजनांसाठी - मग काय - मस्तच बाप्पा - मोदी आणि संजय एकत्र आले तर ? सगळे जगच बदलून जाइल
    आपल्यालाच ओळखणार नाही - हीच का ती मुळा मुठा - अहो पाणी बघा किती स्फटिकासारखे ! आप्पा -आणि मासेपण आहेत पाण्यात - जिवंत !- नौकाविहार चालला आहे - कमाल आहे या संजयची आणि मोदीची ! आणि हो हे केल सर्व कोणी - बहुजनांनी - यात ब्राह्मण अजिबात नव्हते - वैदिक तर औषधालाही नव्हते !
    बाप्पा - करेल का संजय अशी एखादी योजना यशस्वी ? आप्पा - त्याच्याकडे विचार आहेत - त्याला म्हणावे हे जरा वैदिक प्रकरण बाजूला ठेव ३-४ हजार वर्षे - आधी काहीतरी करून दाखवू मग हक्कानी सार्याना ऐकायला लावू -
    आप्पा - चल चल - संजय पुढच्या सभेत सांगेलच काहीतरी भव्य दिव्य !मोठ्ठा माणूस आहे तो !
    बाप्पा - असे जर प्रत्येकाने - टाटा बिर्ला गोदरेज महिंद्र सोनावणी असे एकेआने काम केले तर भारत ओळखू येणार नाही - सरकारी काम नको रे बाबा ! - प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी म्हणून काम करायचे -
    आप्पा - चाल माझे या महिन्याचे पेन्शन देईन मी !
    बाप्पा - मी माझे औषधाचे पैसे देईन ! काही मारत नाही इतक्यात -
    आप्पा - संजय कर रे बाबा काहीतरी !

    ReplyDelete
  5. pune mumbai chi bakal avastha honyas baramaticha batat karnibhut aahe.

    ReplyDelete

  6. ब्राह्मणांनी महात्मा गांधी यांना का मारले?

    ५५ कोटीं हा तर निव्वळ बहाणा




    ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस समोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पुण्यातील ब्राह्मण अतिरेकी नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांच्यावर हाताच्या अंतरावरून तीन गोळ्या झाडल्या. गांधी हत्येच्या खटल्यात शंकर किस्तैैया आणि मदनलाल पहावा हे दोन आरोपी वगळता सर्व आरोपी महाराष्टराष्ट्रातील होते. तसेच सर्वच्या सर्व जण ब्राह्मण होते. गांधी हत्येच्या आरोपींमध्ये विनायक दामोदर सावरकर, दिगंबर बडगे (हा नंतर माफीचा साक्षीदार बनला.),  नारायण आपटे, विष्णू करकरे यांचा सामवेश होता. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना बेरेट्टा जातीचे पिस्तुल खरेदी करण्यासाठी दत्त्तात्रय परचुरे आणि गंगाधर दंडवते यांनी मदत केली. हे दोघेही ब्राह्मणच होते. 

    येथे प्रश्न असा निर्माण होतो की, महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी महात्मा गांधी याना का मारले? ब्राह्मणांच्या मनात गांधीजींबद्दल असा कोणता राग होता?

    या खटल्यातील एक आरोपी आणि नथुराम गोडसे याचा भाऊ गोपाळ गोडसे याने गांधी हत्येवर "५५ कोटींचे बळी" हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात केलेल्या दाव्याचा थोडक्यात तपशील असा : "भारताच्या फाळणीच्या वेळी भारत सरकारच्या कोषात जी शिल्लक होती, त्यातील ५५ कोटी रुपये पाकिस्तानच्या वाट्याला गेले होते. पाकिस्तानने काश्मिरात सैन्य घुसविल्यामुळे भारत सरकारने हे ५५ कोटी रुपये देण्याचे नाकारले. मात्र महात्मा गांधी यांनी अशा प्रकारे वचन मोडणे चुकीचे असल्याचे सांगून पाकिस्तानला ठरल्या प्रमाणे ५५ कोटी रुपये देण्यास सांगितले. इतकेच नव्हे, तर आठवड्यात उपोषणही केले. त्यामुळे १३ जानेवारी १९४८ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक पाकिस्तानला हा पैसा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रक्षुब्ध झालेल्या गोडसे आणि त्याच्या मित्रांनी महात्मा गांधी यांची हत्या केली..."

    गोपाळ गोडसे याने केलेला हा दावा बिलकूल खोटा आहे. पहिला मुद्दा असा की, फाळणीच्या वेळी पाकिस्तानला एकूण ७५ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यातील २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाकिस्तानला देण्यातही आला होता. उरलेले ५५ कोटी रुपये देण्याचे भारत सरकारने रद्द केले नव्हते. या पैशाचे हस्तांतरण केवळ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आले होते. 

    दुसरा मुद्दा असा की, १३ जानेवारी १९४८ रोजी भारत सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला त्या आधी महात्मा गांधी यांना मारण्याचे एकूण ५ प्रयत्न झाले होते. १९३४ मध्येच गांधींना मारण्याचा पहिला प्रयत्न झाला होता. म्हणजेच ५५ कोटींच्या घटनेच्या तब्बल १४ वर्षे आधीपासून गांधींना मारण्याचे प्रयत्न ब्राह्मण करीत होते. त्यामुळे ५५ कोटींचे बळी हा गोपाळ गोडसे याचा दावाच खोटा ठरतो. 

    मग प्रश्न उरतो की, ब्राह्मणांनी महात्मा गांधी यांना का मारले? या प्रश्नाची आम्हाला ३ प्रमुख उत्तरे आम्हाला सापडली आहेत. ही उत्तरे अशी : 

    १. महात्मा गांधी हे भारताचे निर्विवाद नेते होते. इतकेच नव्हे, तर जगाच्या राजकारणावर त्यांच्या विचार-आचारांचा प्रभाव होता. असे असले तरी गांधी हे जातीने ब्राह्मण नव्हते. ते बहुजन समाजातून आले होते.ब्राह्मणेतर माणसाचा एवढा गाजावाजा होणे हे ब्राह्मण श्रेष्ठत्वाच्या गंडाने पछडलेल्या ब्राह्मणवाद्यांच्या पचनी पडत नव्हते.

    २. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका विलक्षण होता की, बहुजन समाजातीलच नव्हे, त्याकाळातील अनेक बडे ब्राह्मण नेते महात्मा गांधी यांची अनुयायी होते. पंडीत जवाहरलाल नेहरू हे यातील सर्वांत मोठे नाव. काश्मिरी ब्राह्मण असूनही नेहंनी गांधी यांचे अनुयायीत्व पत्करणे, ब्राह्मणवाद्यांना पसंत नव्हते. महाराष्टड्ढातूनही अनेक ब्राह्मण गांधीजींचे अनुयायी बनले होते. साने गुरुजी आणि विनोबा भावे ही त्यातील काही ठळक नावे. यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी खवळून उठले होते.

    ३. महात्मा गांधी यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना आपले अध्यात्मिक गुरू मानले होते. तुकाराम महाराज हे महाराष्टड्ढातील ब्राह्मणवाद्यांच्या दृष्टसीने क्रमांक एकचे शत्रू होते. आणि नेमके त्यांनाच गांधीजींनी गुरुस्थानी मानल्याने ब्राह्मणवाद्यांचे पित्त न खवळते तरच नवल.

    महात्या गांधी ब्राह्मण कुळात जन्मले असते आणि त्यांनी तुकोबांऐवजी रामदासांना गुरू मानले असते, तर महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्यांची हत्या केली नसती. त्याऐवजी त्यांचे मंदीर बांधून नित्यपुजा चालविली असती.

    ReplyDelete
  7. sajnajy sonavani tumhi baherche udyog dhande nustei picnic trip sarkhi pahun firun aalat ka, thode kahi technology ka nahi aanli sobat.

    ReplyDelete
  8. अरेरे ,
    काय हे संजय ,
    आपल्या भारताचे नाव खराब करता कामा नये
    लहानपणी व्यापार खेळतो त्यातली नोट तू भिकाऱ्याला घातलीस आणि सांगतो आहेस १०० पौंडाची नोट म्हणतो आहेस - अस करू नये बाळ - अशाने आपल्या देशाची अब्रू जाते - निदान फाटकी नोट तरी घालायची !कारण धनगराना ते लोक फाटकेच समजतात - तू कितीही - मल्ह्रारराव होळकर आणि अहिल्याबाई होळकरांची - पानिपाताचे राडे करणारे हे पापी लोग ! नंतर कितीही घात बांधले तरी पापे धुतली थोडीच जाणार ?
    आणि ते म वगैरे फारच विनोदी झाले आहे - भांनातच रे ! एकदम फिल्मी ! पुरेवाट लागली !
    कसेकाय हे सुचते इतके विनोदी ? तुम्ही खरेतर चित्रपट ! काढा म गांधी पेठ - गांधी गोडसेच्या घरी जातात वगैरे - ईश्वर अल्ला तेरो नाम गाणे गातात -
    मला तुमची हि कल्पना जाम आवडली होते हा पण एक विनोदी - प्रकारच आहे कारण त्यांनी स्वतःला कधीच असे जातिवाचक समजून घेतले !नाही - अजूनही पाकिस्तान त्या पैशाची मागणी करते आहे - लक्षात ठेवा - देऊन टाका ते !

    ReplyDelete
  9. असे का होते आहे ?
    आमच्या संजयला असे का त्रास देता रे तुम्ही ?
    उगी उगी - अस रडायचं नाही - त्यांचे घर आपण उन्हात बांधू - हो की नाही नरके काका ?
    चेष्टा का करतात ? कशाला गेला होतास रे संजय तू तिकडे ? आणि खोटी फाटकी नोट कशाला घालायची भिकाऱ्याला - आणि काय सांगितलेस त्याला तू ? ये आमच्या भारतात - आमच्या कंपनीत म्यानेजर करीन ? - म्हणूनच तो घाबरून गेला असणार !
    संजयला आता कुण्णी कुण्णी त्रास देऊ नका ! आता तो धनगराना आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसणार आहे ! त्याला चांगले वजन वाढवू द्या !
    त्याच्या कंपनीत सगळेच धनगर - सिक्युरिटी , ड्रायव्हर , क्लार्क रीसेप्शनिस्स्ट , म्यानेजर -सगळेच धनगर - -इतका आमचा संजय परोपकारी आहे !
    अविनाश आणि सारंग दवे - अरे लक्ष आहे का तुमचे सरांकडे ? कोण त्यांना त्रास देत आहे बघा जरा - आणि ते आता मुळा मुठा प्रकल्प घेत आहेत हातात - त्यांना - विचारा मदत हवी आहे का !
    अल्पेश , कुमावत , संग्राम निकाळजे - अरे बघा सरांकडे - अगदीच रडवेले होतात - कधीकधी -मग एकदम काहीतरी सुरु करतात लहान मुला सारखे -गांधी गोडसे हे नेहमीचे फ़ेमस राडेबाज नाटक - लई बेस्ट - पब्लिक जाम खुश !गान्धीनापण लई आवडायचे हे नाटक - कारण ७५ वर्षे झाली तरी गडी टुनटुणीत - आणि दुध पिउन - नेहरू आणि पटेल यांना पण बोअर झाले - आता स्वतंत्र झाला गप मस्त मजेत रहावे - तर नाही - सारखा म्हातारा छळत होता - गोडसेने गोळी घातली त्यावेळेस काय खुश झाले ! वा वा ! आता लेडी मौंटब्याटनला घरी मुकामाला बोलावता येईल - नाहीतर हा म्हातारा कधीही दार वाजवायचा ! बरे झाले - पस्पर पावणेतेरा !

    आत्ता हवे होते , त्यांनी सगळ्या ब्राह्मणाना चांगली असती -
    काय म्हणता ? प्रतिशिवाजी आहेत - ते बारामतीचे - नको ते काही आम्हाला आरक्षण देत नाही - आम्ही त्यांच्याशी कट्टी केली आहे !

    ReplyDelete
  10. ब्राह्मणांनी गांधीना मारले का गांधीनी ब्राह्मणाना मारले ?
    गांधी मारामारी करायचे नाहीत म्हणजे ब्राह्मणांनीच गांधीना मारले असेल
    किती वाईट आहेत ना ब्राह्मण -
    मराठी ब्राह्मण -
    मराठी कोकणस्थ ब्राह्मण
    मराठी पुणेरी कोकणस्थ ब्राह्मण -
    मराठी पुणेरी एकारांती कोकणस्थ ब्राह्मण -
    आता किती उरले आहेत ? सगळ्यांना संपवा !
    निम्मे भारतातून पळाले ?
    हरकत नाही - उरलेल्याना सोडू नका !
    आमचा महात्मा मारला रे यांनी !
    नोटेवर टाकला त्याला आम्ही -
    सलाम गांधी !

    ReplyDelete
  11. असे बावळटासारखे काहीतरी लिहू नका हा ब्राह्मण सरकला आहे - ऐका जरा -
    संजय आता जाणार आहे मोदींच्याबरोबर अमेरिकेत - का ? मोदी बहुजन आहेत ना ? तेव्हढे पुरेसे आहे , आणि त्यांना इंग्लिश येत नाही ना - म्हणून संजय हवा - अहो संजयचे इंग्लिश ऐकून सगळे बकरे शेळ्या तल्लीन होतात - कृष्णाची बासरी ऐकून व्हायच्या तश्श्या !
    जाताना संजय प्लांचेटची गंमत सांगणार आहे आणि येताना गोडसे कित्ती वाईट होता ते सांगणार आहे - आणि मी मुळा मुठा साफ करून देतो असे म्हणणार आहे - अगदी स्फटिकासारखे पाणी !
    झीनत अमान गाणे म्हणू शकेल इतके - सत्यम शिवम !सुंदरम - स्वच्छ !
    कोणाला सांगू नका - आजच संजय पत्रकार परिषद घेत आहे - त्याचे नवे संशोधन !-उपनिषदात लिहिले आहे ती गंगा आणि हि गंगा एक नाहीतच मुळी - खरी गंगा ही वेगळीच - त्यामुळे ही गंगा साफ करायची बांधिलकी आपोआप संपली - खरी गंगा पवित्रच आहे - त्यामुळे पहिले इलेक्शन वचन पूर्ण होणार ! कित्ती कित्ती हुशार आहे आमचा संजय !त्याला मंत्रिमंडळात घ्या ! कित्तीतरी योजना आहेत त्याच्याकडे - पण लक्षात कोण घेतो - इतक व्यक्तिमत्व वाया जात आहे - ! अजूनही वेळ गेली नाही - देशाचे ,ब्राह्मणाना वाटणीवर आणेल ,आपली आयात शून्यावर आणेल आणि निर्यात १००० पटींनी वाढवेल - देशातच पोलाद आणि इतर खनिजे वापरून देशात रोजगार करेल -

    , समुद्र हटवण्याची त्याची आयडीया तर भन्नाट आहे आपली प्रजा अपुरी पडेल इतके काम - फक्त एक बघा जरा - धनागाराना आरक्षण देऊ इतकेच म्हणा - की गडी खूष !

    ReplyDelete
  12. नक्कीच अशी सरांची छळवणूक कराणारा कोब्रा असला पाहिजे
    आमचे सर येशु सारखे क्षमाशील आहेत - त्यांना राग येत नाही ! आता त्यांनी ठरवले आहे की विपश्यना केंद्रात जायचे आणि ध्यान धारणा करायची - लोकांना बघवत नाही - हा कोब्रा तर मागेच लागला आहे - काय हे ! अविनाश आणि सारंग दवे कुठे गेले - या सरांनी बहुजनांसाठी इतके केले , परंतु अशा वेळी कुणीही येत नाही मदतीला - बुद्धाच्या शांतीनेच वागावे लागेल
    जग कसे दुष्ट आहे त्यांनी आपले अनुभव सांगितले ते परदेशात गेले ते - पण हा कोब्रा चेष्टा करत असतो !- त्याला ठेचला पाहिजे - मी त्याला चांगला ओळखतो - त्याचा निषेध असो - म्हातारा म्हणून हा वयाचा फायदा घेत असतो - त्याचा तीव्र निषेध !आज संजयाच्या ऑफिसातले सर्व जन काळ्या फिती लावून काम करणार ! हरी नरके यांचा विजय असो !

    ReplyDelete
  13. We should take the note of a fact that the outburst of communal riots killing about a million Hindu and Muslim took place in bordering and partition-affected regions. No Hindu or even a Muslim, who truly was badly affected by that insanity, ever thought of killing Gandhi holding him responsible for the inhuman bloodbath.

    http://sanjay-sonawani.hubpages.com/hub/mahatmagandhiassasination

    ReplyDelete
    Replies
    1. हम सांप्रदायिक दंगों के विस्फोट में हिंदू और मुसलमान की सीमा और विभाजन से प्रभावित क्षेत्रों में हुई एक लाख के बारे में हत्या कि एक तथ्य का ध्यान रखना चाहिए. वास्तव में बुरी तरह से है कि पागलपन से प्रभावित किया गया था, जो कोई हिंदू या यहां तक ​​कि एक मुस्लिम, कभी अमानवीय खूनखराबे के लिए उसे जिम्मेदार पकड़े गांधी की हत्या के बारे में सोचा.

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...