Friday, October 24, 2014

महात्मा बळीचा खून ?

ब्राह्मण वामनाने बळीराजाचा खून केला असा बहुजनांचा सर्वसाधारण समज आहे. पहिली बाब म्हणजे मुळात वामनावताराची पुराणकथाच बनावट आहे, असत्य आहे. ऋग्वेदात अवतार घेण्याचे कार्य प्रजापतीकडे आहे, विष्णुकडे नव्हे. मुळात कुर्मावतार व वराहावतार हे प्रजापतीचे अवतार आहेत. (तै. आरण्यक आणि तैत्तिरीय ब्राह्मण) अवतार घेण्याचे कार्य पुढे पुरांणांनी वैष्णव पंथ वर आला तेंव्हा विष्णुकडे सोपवले. ऋग्वेदात विष्णु तीन पावलांत त्रिभुवन व्यापतो (ऋ. १.२२.१७) असे म्हटले आहे. तेथे विष्णु हा सुर्याचे रुपक म्हणून येतो. सकाळ-दुपार-सायंकाळ ही त्याची रुपकात्मक तीन पावले. याच कथेचा आधार घेऊन वामन आणि त्याला बळीराजाचे तीन पाऊल दान ही पुरणांत आलेली कथा बनवली गेली आहे. ही कथा ओरिजिनल नाही हे उघड आहे. बळी असूर होता त्यामुळे तो यज्ञ करत होता हे अधिक मुर्खपणाचे विवेचन आहे. असूर हे यज्ञविध्वंसक/यज्ञ विरोधक होते, यज्ञकर्ते नव्हेत. शुक्राचार्य हे असुरांचे गुरु होते व ते यज्ञाचे पुरोहित नसत असेही पुराणकथा सांगतात. विष्णुला मोठे ठरवण्यासाठी बळीचे माहात्म्य कमी न होईल अशा बेताने वैदिक इंद्र महत्ता वाढवण्यासाठी ही कथा रचली गेली आहे. अनेक बहुजनीय विद्वान त्यातून ब्राह्मण वामनाने बळीचा खून केला असा अर्थ काढतात...त्यात तथ्य नाही.

गंमत म्हणजे ऋग्वेदानंतर ज्या साहित्याचा नंबर लागतो त्या शतपथ ब्राह्मणात वामनावताराची येणारी कथा तर वेगळीच आहे, तिचा बळीशी काडीइतकाही संबंध नाही. शतपथ ब्राह्मण सांगते कि देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. सारे देव पळून गेले. मग समस्त असूर पृथ्वीची वाटणी करायला बसले असता वामनाला पुढे घालून देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. मग वामनरुपधारी विष्णुने तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांना भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५). आता ही कथा पुराणांपेक्षाही जुनी आहे. काय संबंध आहे बळीराजाशी या कथेचा? या कथा बनावट आहेत अथवा देवासूर युद्धांची ती काल्पनिक मित्थके आहेत एवढेच काय ते खरे आहे. एकाच अवताराच्या अन्वयार्थ एकच असलेल्या दोन कथा कशा बनतील याचा तरी विचार करावा कि नाही?

पण, खरे म्हणजे आमच्या बहुजनीय विद्वानांना बहुजन हे नेहमीच ब्राह्मणांचे वा आक्रमक आर्यांचे गुलाम होते, मुर्ख होते म्हणुन कपटी ब्राह्मण त्यांच्यावर मात करु शकले असे अन्वयार्थ काढत आपल्या सुमार बुद्धीचे डंके पिटवत आपली पराभुत मनोवृत्ती प्रकट करत असतात. वैदिक लोक कथा रचून रंगवुन सांगत बुद्धीभेद करण्यातही फार वस्तादही नव्हते हे सरळ या बळीकथेचे व देवासूर युद्धकथेचे अन्वेषन केले तरी लक्षात येईल. नाहीतर त्यांनी बेमालूम पचेल अशी तरी कथा रचली असती. उलट वैदिक हे सुमार बुद्धीचे होते हेच त्यांना आपल्या महत्तेसाठी अवैदिक दैवते ते महापुरुष यांचे अपहरण करावे लागले, खोट्या कथा रचाव्या लागल्या यावरुनच सिद्ध होते.

अवतारांचेच पहाल तर महाभारतातील नारायणीय उपाख्यानात फक्त सहा अवतारांचा निर्देश आहे. पुढे ती दहा, नंतर बुद्ध आणि हंस अवतार धरुन बारा तर भागवत पुराणात हीच संख्या २४ एवढी आहे. पुढच्या पुराणांत मात्र दहा ही संख्या नक्क्की केली गेली. का, याचे उत्तर नाही. बरेचसे अवतार काल्पनिकही आहेत. इसपुचा पहिल्या शतकापर्यंत कृष्ण हा पांचरात्र (नारायणीय)या अवैदिक संप्रदायातील एक मुख्य व्यूह (दैवत नव्हे) होता. त्याचे अपहरण तिस-या चवथ्या शतकाच्या आसपास झाले. वासूदेव आणि कृष्ण एक नव्हेत, देवकीपुत्र कृष्ण हा महाभारतपुर्ब साहित्यात ज्ञानी यती मानला गेला आहे व त्याच्या आईचे नांव (देवकी) असले तरी त्याच्या पित्याचे नांव उल्लेखलेले नाही. रामाचे म्हणाल तर अवतार या स्वरुपात रामोपासनेचा प्रचार बाराव्या शतकानंतर झालेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नारायण व विष्णू या देवताही वेगळ्या आहेत, एक नव्हेत. (महाभारतातील नारायणीय उपाख्यान पहा).

वैदिक ब्राह्मणांनी शुद्रांना (असुरांना) गुलाम केले असे म्हणणा-यांनी शिशुनाग वंशापासून ज्ञात इतिहासातच शेकडो-हजारो अवैदिक शूद्र राजे/सम्राट झाले आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना वैदिक लोक राजे होण्यापासून थांबवू शकलेले नाहीत, स्मृत्या असूनही. उलट वैदिक राजे किती याचा विचार केला तर हाताच्या बोटावर जेमतेम मोजता येतील.

असे असुनही आमचेच बहुजनीय विचारवंत गेल्या साताठशे वर्षांतील राजकीय गुलामगिरीने एवढे काजळी फासून बसलेत कि त्यांना प्रत्येक बाबतीत, अन्वेषण न करताच, वैदिकांचे वर्चस्व आणि कपट दिसते. आज त्यांचे वर्चस्व असेल तर त्याला कारण आपलीच पराभूत आणि रोगट मनोवृत्ती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आम्हाला तटस्थपणे अवलोकनाची सवयच नाही. हीपण वैदिकांनी सवय लावली का?

बळीचा खून झाला नाही...अथवा वामन अवतारच झालेला नसल्याने बळीराजाला पाताळात गाडल्याचीही कथा खरी नाही. वामन खरेच अवतार पद दिलेली (राम-कृष्णाप्रमाणे) व्यक्ती असती तर त्याची अनेक मंदिरे असती, एखादे पुराणही त्याच्यावर लिहिले गेले असते. तसे वास्तव नाही.

हे लक्षात घेत बहुजनांनी या जाणीवपुर्वक जोपासलेल्या पराभुत मनोवृत्तीतून बाहेर यायला हवे व प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचे खापर वैदिकांवर फोडणे बंद केले पाहिजे, नाहीतर ही गुलामी कालत्रयी संपणार नाही. मानसिक न्यूनगंड स्वत:हुन जोपासायचा आणि आम्हाला ब्राह्मण मानसिक गुलाम करतात हे म्हणायचे हे मुर्खपणाचे लक्षण आहे.

 या भाकडकथांवर विश्वास ठेवणे म्हणजे महात्मा सम्राट बळीला भोळसट ठरवण्यासारखे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.


(Note-इतिहासात दोन इडा आहेत. ऋग्वेदातील इडा म्हणजे अन्यधान्याची देवता आहे. ऐल वंश जीपासून स्थापन झाला त्या इलेला इडाही असेही म्हटले जाते. ती द्वैलिंगी आहे असेही म्हटले जाते. ती बुधाची पत्नी आहे. महिला "इडा-पिडा टळो" म्हणतात ते -हिदममद्धे बसवण्यासाठी कि वैदिक लोकांसाठी हे सांगणे अवघड आहे. बळीराजा महान असणारच यात शंकाच नाही कारण हजारो वर्ष त्याचे एवढ्या प्रेमाने स्मरण कोणी ठेवले नसते. बळीची हत्या झाली असती तर त्याच्या नांवाने "बलीप्रतिपदा" हा वर्षारंभाचा आनंदाचा दिवसही जनतेने ठवला नसता. त्याचे स्वरुप वेगळे झाले असते हे लक्षात घ्यायला हवे.)

13 comments:

  1. सोनवणी साहेब आपल्याला एवढेही माहित नाही कि सारे असुर ब्राह्मण होते. खर तर देवासूर संग्राम ब्राह्मण (असुर) आणि देव (क्षत्रिय + अन्य वर्ग उदा: यादव) असा होता. पुराण कथा व्यवस्थित वाचा. भृग वंशीय शुक्राचार्य आणि परशुराम सारखे असुरांचे गुरु होते. परशुराम तर केवळ ब्राम्हणांना शिक्षा द्यायचे. (ते रावणाचे गुरु होते). आपले सर्व देवता काळ्या रंगाचे होते. रावण व इतर असुर गौर वर्णीय होते बाली, वृषपर्वा (सर्व इंद्रजेता) ब्राह्मण होते. आर्य नावाची कुठलीही जाती कधीच अस्तित्वात नव्हती. ऋग्वेदात दाशराज्ञ (सुदास विरुद्ध १० राजे त्यात इक्वाषु वंशाचे राजे ही होते झालेले युद्ध) यज्ञात सुदासच्या पुरोहित वशिष्ठ ऋषीला ही राक्षस म्हणोन संबोधले आहेत. डोळ्यांवर चढलेला द्वेषाचा चष्मा काढून निष्पक्ष रूपेण इतिहास वाचा. सत्य कळेलच.

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही ब्लोग्ज नीट वाचलेले नाहीत हा माझा नव्हे तर तुमचा दोष आहे. ब्राह्मणच नव्हे तर येथील सर्व असूर संस्कृतीचे होते. वैदिक धर्म देव सम्स्कृतीतून आला. देव क्षत्रीय नव्हते आणि ब्राह्मणही नव्हते. संस्क्रुती आणि धर्म हे नीट समजावून घ्या. बाकी तुमच्या कल्पनाविलासमय अज्ञानाबद्दल लिहिण्यासारखे काही नाही.

      Delete
  2. अगदीच भुक्कड
    कोणतेही तारतम्य नाही आणि काहीच वजन नाही !
    दिवाळी वाया घालवली !
    त्यापेक्षा कविता बरी होती असे म्हणू फारतर !
    सणासुदीला अपशकुन नको - म्हणून तोंड आवरणे !योग्य -
    ज्याने कौतुक केले आहे याचे परीक्षण केले तर बरे होईल
    न आगा न पिच्छा असे खरडणे म्हणजे कथा नव्हे - प्रपंच काय काहीही छापेल -
    फुकटात कोणाला नकोय आजकाल असे !म्हणतात ?

    ReplyDelete
    Replies
    1. मनच विकृत असले तर कोणती प्रतिक्रिया आपण कोठे देत आहोत याचे भान कोठुन असणार? या बोगचा प्रपंचशी काय सम्बंध? कि दिवसाढवळ्या चढली?

      Delete
    2. "pratibha pratima" या नावाने लिहिणाऱ्या निर्लज्य माणसा डोके ताळ्यावर ठेवून लिहित जा, उगीचच भयकल्या सारखे करू नकोस रे!

      Delete
  3. संजय सोनवणी ,
    अविनाश आणि दवे कुठे शेपूट घालून पळाले ?

    ReplyDelete
  4. अतिशय समयोचित लेख आहे
    दीपावली म्हणजे केवळ फटाक्यांची आतिषबाजी नाही
    आपला लेख , मग तो गणेश चतुर्थी असो किंवा दिवाळी , काहीतरी नवे विचार सांगत असतो -
    मनाला अंतर्मुख करत असतो - अभिनंदन
    एक गोष्ट मात्र समाजात नाही ! ब्राह्मण असुर आहेत असा पण आपला दावा आहे का ?
    दशावतार कोणत्या दबावाखाली निर्माण झाले ?जैन आणि बौद्ध कथाञ्च्यामुले अवतार कल्पना लोकप्रिय झाल्यामुळे हिंदू धर्मात दशावतार पेरले गेले काय ?
    जैन धर्मात अवतार कल्पना ही फक्त त्यानापण परंपरा या वैदिक धर्माच्या आधीच्या आहेत हे बिम्बवण्यासाठी त्यांच्यात निर्माण करण्यात आल्या का ?
    जैनांचे तीर्थंकर इतक्या दीर्घ परंपरेचे खरेच असतील का ?महावीर हा तीर्थंकर कितवा आणि तो तसाच ऐतिहासिक दृष्ट्या जुना असेल हे आपणास मान्य आहे का ? तीच गोष्ट बुद्धाची !
    तो पण असाच खूप जुन्या परंपरेतून आलेला आहे का ? कुठूनतरी आमचा धर्म हा हिंदू किंवा वैदिक परंपरेच्या पूर्वीचा आहे या सांगण्याच्या हट्टापायी या अवतारकल्पनांचा त्या त्या धर्मात जन्म झाला असावा का ?
    हे तीनही धर्म पुनर्जन्म मानतात का ?

    ReplyDelete
  5. संजय सर ,
    आपली बहुजनाची व्याख्या काय ?
    आपण पुनर्जन्म मानता ? आणि का ?
    आपण आपणास हिंदू आहात असे मानता का ? आणि का ?
    आपण घरटी एकतरी आपल्या देशासाठी सैन्यात गेला पाहिजे असे मानता का ?
    भारतात लष्करी शिक्षण अपरिहार्य करावे का ?
    आपण या देशाच्या सध्याच्या सीमा ह्या योग्य आहेत असे मानता का - तसेच पं नेहरू म्हणाले तसे एखादा नापीक जमिनीचा तुकडा चीनकडे गेला तर इतका हलकल्लोळ कशासाठी - असे मानता ?

    आता युद्ध पेटले तर मुस्लिम समाज काश्मिरात सरकारच्या बरोबर येईल का ? तसेच त्यावेळी बहुजन सरकारच्या बरोबर असतील का ?

    आपला (?) भारत पाकिस्तान किंवा चीन बरोबर युद्धात पडल्यास बहुजनांचे आपले आंदोलन मागे ठेवून देशाला वाचवणे महत्वाचे समजाल ?
    -आपण वैदिक द्वेष्टे का आहात ? त्यांनी समाजाचे अहित कशा प्रकारे केले आहे ? त्यामानाने मुस्लिम राज्यकर्त्यांनी आपला जास्त पाण उतारा केला आहे हे आपण मानता ?
    आपण एकेकाळचे इथले सार्वभौम सत्ताधारी हि खुमखुमी मुस्लिमाना कायम भारत द्वेषी बनवते हे आपण मानता का ?
    -

    ReplyDelete
    Replies
    1. समीर घाटगे, मी वैदिक द्वेष करत नसून तो एक वेगळा धर्म आहे असे मानतो. मानवतेच्या दृष्टीने मी मुस्लिम अथवा चिन्यांचाही द्वेष करत नाही. तुम्ही करत असाल तर ती तुमची संस्कृती आहे. युद्धे संस्कृतीसाठी नव्हे, राजकीय सार्वभौमतेसाठी होतात हे तुम्ही जरा माहित करुन घेतले तर बरे होईल. सांस्कृतीक लढे हे नहमीच राष्ट्राराष्ट्रांतील युद्धांपेक्षा गंभीर आणि प्रदिर्घकाळ परिणामकारक असतात.

      आणि मी सांस्कृतीक खोट्या वर्चस्वतावादाविरुद्ध आहे...म्हणून वैदिकांविरुद्ध आहे.

      Delete
  6. संजयकाका ,
    शंकराच्या पिंडीवर विंचू असेल तर तो चपलेने मारावा असा आपल्या कडे एक श्लोक आहे
    माझ्यामते ती आपली संस्कृती -!
    पण अति शब्दांच्या जंजाळात अडकल्याने आपण तारतम्य विसरलो -
    आपला हिंदू धर्म हा अगदी प्रक्टिकल आहे असे दिसते - पण त्याच वेळी नियम आणि त्यातून पळवाटा , अनवधानाने धार्मिक नियम तोडले तर प्रायःश्चित्त म्हणून ब्राह्मण वृन्दाकडून सुचवलेले उपाय यामुळे हसावे का रडावे तेच समजत नाही !
    पापकृत्य आणि त्यावरचे प्रायःश्चित्त यांचा शिवाशिवीचा खेळ हा एक प्रकारे - पापाना प्रवृत्तच करत असतो - " ओ के - इतकाच ना ? ब्राह्मणाकडून अभिषेक करून घ्या "- असे तोडगे पापाला खतपाणीच घालतात !हे कोणत्या धर्मात आहे ? वैष्णव , शैव , वैदिक , सर्व धर्मात आहे - एक कुत्रे नुसते चुकून भस्म अंगाला लागले म्हणून पावन होते आणि त्याला यमदूत हात लावू शकत नाहीत अशा भाकद्कथा शैव पंथात पण असतात !- एखादे बिल्वपत्र नजरचुकीने शिवलिंगावर पडले आणि अमक्याला मोक्ष लाभला असले चाळे शैव पंथात पण आहेत !
    अत्यंत सुंदर आणि तरल मनःस्थितीत लिहिलेले अमर लेखन हेसुद्धा धर्माच्या लिखाणात येते आणि धार्मिक तोडगे , प्रायःश्चित्त आणि पापाचे निराकरण करायची जपसंख्या आणि उपवास हेपण धार्मिक उपक्रमात मोडते - त्यामुळे नेमकी टीका करताना लोकांनी स्पष्ट केले पाहिजे
    तुम्ही जरी मानत असला की वैदिक हा( हिंदू धर्मापेक्षा ) वेगळा आहे तरी त्याला कायद्याची मान्यता कधी मिळणार ? त्यासाठी काय करावे लागेल ?
    पूर्वी साधारणपणे सरसकट जैन बौद्ध शीख सर्व हिंदूच असे धरले जायचे - आज हिंदू नेमके कोण ?
    शैव हिंदू आहेत का ?

    ReplyDelete
  7. संजय सोनावणी - ऐका जरा -तुमचा अहंपणा सोडा -
    शिवलिंग आणि चुकून त्याच्यावर बिल्वपत्र पडून पुण्य लाभणे अशा भाकड कथा अनंत आहेत !
    वैदिक किंवा वैष्णवांनी जे विष्णूच्या बाबतीत सांगितले तेच शैवानी शिवाबाबत सांगितले - पाप पुण्य - यमयातना - सप्त स्वर्ग आणि सप्त नरक हे शैव धर्मात आहेत च- किंकर आहेत , यमदूत आहेत - मूळ प्रश्न तो नाहीच - मूळ प्रश्न जर वैदिक हिंदू नाहीत तर मग हिंदू नेमके कोण ?
    आपण सर्व साधारणपणे उभ्याच्या गौरी , हरतालिका , वटपौर्णिमा , नागपंचमी , असे सर्व सण साजरे करतो - गोपालकृष्ण , राम , पांडुरंग , शिवरात्र , सर्वच आपण मानत असतो - त्यात काही वावगे आहे का ? हे पाळत असून आपण हिंदूच असतो - वैदिक का अवैदिक ते काहीही असो !
    तुम्हीच तुमचा अनुभव सांगा बरे -
    आज असे आहे का ? वैदिक डॉक्टर शैव पेशंटला चुकीचे औषध देऊन ठार मारतो आहे ?
    वैदिक बिल्डर शैवाला महाग रेटने घर विकतो आहे आणि वैष्णवाला स्वस्त ?किंवा संगीत शिकताना असे घडते का ?वकील असे दुटप्पी वागतो का ?खेळात असे आहे का ? - मग आपली अडचण काय आहे ? आज आधुनिक भारतात सार्वजण एकत्र खांद्याला खांदा लावून जगत आहेत - आंतर जातीय विवाहांची संख्या वाढत आहे - आंतर प्रांतीय धागेदोरे जुळत आहेत ! बंगलोर हैदराबाद पुणे अशी नवी आर्थिक भरभराटीची शहरे उभी राहात आहेत
    आणि आपले झापड काही निघत नाही !फार वाईट वाटते ! आपण स्वतःस आधुनिक समजता आणि अत्यंत जुनाट मते कवटाळून त्यावर खल करत बसता - काय म्हणावे याला ?
    मधूनच "मी मुस्लिमांचा किंवा चिन्यांचा द्वेष करत नाही असा भंपक गांधीवाद कुरवाळण्यात काय हशील आहे ?तशी अनंत तत्वज्ञाने आहेत - ज्याचा उपयोग करत आपण आपलेच म्हणणे खरे करत बसू शकतो - भारत रत्नही मिळेल - विनोबना नाही का मिळाले ?पण ते काही खरे नाही !
    अर्धवट शिक्षित बहुजनांपुढे शब्दांचे बुडबुडे सोडून उगाच आपल्या मागे समाज आहे अशा भ्रमात जगणे अत्यंत पोकळ जगणे आहे -
    आपल्यावरचे आरोप स्पष्ट आहेत -
    जर वैदिक हिंदू नाहीत आणि आपण हिंदू असाल तर आपण वैदिकांच्या अध्यात मध्यात पडायचा प्रश्नच नाही - तुम्ही वायले - ते वायले - हाय का नाय ?
    वैदिक स्वतःला हिंदू समजत असतील तर ? आधी हिंदू म्हणजे काय ते तरी धड सांगा ! तिथे मूग गिळून गप्प ! वा रे वा ! धन्य आहे तुमची - मग म्हणायचंकी हिंदू असे काहीच नाहीये !
    शब्दांचे खेळ करण्यात तुम्ही संघावाल्यांचे थोरले भाऊ शोभता !

    उगीच नुसती बडबड करत बसता - तुमचे दुखणे हा तुमचा मानसिक रोग आहे असे दिसते - जग किती मजेत आहे - भरपूर काम करत प्रगती करत आहे - नवे नवे प्रयोग करत आहे -आणि तुम्ही एकसारखे वैदिक शैव तुणतुणे वाजवत बसला आहात ?
    एक सांगा बरे - अहो संजय कुमार ! मी महिन्यातले पंधरा दिवस शैव मत मानत जगलो आणि उरलेले पंधरा दिवस वैदिक मत मानत जगलो तर मला काय होणार आहे ? काहीही नाही !- तेच सण - तेच संस्कार - तेच श्लोक - तेच मंदिर तोच शंकर आणि तोच विष्णू - सर्व भावना त्याच ! पण मी जर मुस्लिम असलो तर- ख्रिश्चन असलो तर ? फार फार फरक पडतो कि नाही ?
    स्वतःलाच विचारून बघा ! खोटारडेपणा हा यशाचा मार्ग नाही ! धर्माभिमान असणे म्हणजे जातीय असणे नव्हे !आणि धाम्भिक गांधीवाद उराशी बाळगून कधी मानवतावादी होता येत नाही ! या मातीत मुस्लिम किंवा ख्रिश्चनांच्या श्रद्धा नाहीत - त्यांची तोंडे मक्केकडे ! आणि तरीही त्यांना आपण समजून घ्यायचे ? त्यांना आपल्या तशा वाजवण्याचा त्रास होतो - धार्मिक भावना दुखावतात - कमाल आहे !
    एक बरे झाले न च्या जागी न आणि ण च्या जागी ण बोलणारा मुख्यमंत्री मिळाला - नाहीतर हे आनिपानी ऐकून जीव वैतागला होता !

    ReplyDelete
  8. , संजय
    वैदिक आणि शैव याबद्दलचे लिखाण वाचून बुचकळ्यात पडायला होते

    हिंदू कोण असे विचारले तर आपण सांगता - हिंदू असे कोणीच नाही !
    वैदिक आणि शैव या दोनही प्रेरणा मान्य करत जगणारे महाराष्ट्रात असंख्य आहेत आणि त्यामुळे काहीच बिघडले नाही - असे असताना आपण कायम वैष्णव किंवा वैदिक , असुर , ब्राह्मण आणि त्यांचे मूळ असा वितंडवाद घालत असता - जरा काही आपल्या विरुद्ध लिहिले किंवा टीका केली की आपल्याला चालत नाही - हे काही निरोगी मानसिकतेचे लक्षण नव्हे !
    आपण स्वतःला कसलेतरी दूत समजता अस दिसत पण आपल्या विचारात अजिबात प्रगल्भता नाही - आपल्या प्रतिक्रियांचा तीखत पणा कमी होत नाही आणि वेळ पडली की अविनाश आणि दवे यासारखे भाडोत्री चवली पावालीवाले लोक आपण बाळगून आहात - सर्वजण आपणास विनोदी विचारवंत म्हणतात ते काही उगीच नाही ! सरस्वती नदी असो , सिंधू संस्कृती असो , किंवा ऋग्वेद काळ असो - संस्कृत भाषा असो - आपले विचार गांजा ओढणाऱ्या दांडेकर पुलावरच्या
    अडाणी प्रवृत्तीचे वाटतात !
    आपले विचार झोपडपट्टीतील बेलगाम वृत्तीचे निदर्शक आहेत -धश्चोट मनाने शब्दांचे खेळ करत आपण झोपडपट्टीत लोकप्रिय व्हाल पण साहित्य संमेलनात नाही - रकाने भरायला आपल्याला दिवाळी अंकात संधी मिळेल पण विद्वानांच्या जगात आपणास शून्य किंमत आहे !
    हे वांझोटेपण आता पुरे करा -खरे अभ्यासू बना -
    खरोखरच आपला ब्लोग वाचून अनेक जिज्ञासू अनेक प्रश्न विचारात असतात - त्यातील बहुतेकाना पडलेला प्रश्न एकाच असतो - वैदिक हे देशाचे शत्रू आहेत का ? ते स्वतःला हिंदू म्हणवतात ते कायद्याने बंद करायला आपण का प्रयत्न करत नाही ? - पण आपण तसे काहीच न करता नुसता आरडा ओरडा करत बसता - आणि अनेक विचार करणारे आपला हा दोष आपल्याला दाखवत असतात तर उलट आपण त्यांनाच टोचत असता - दिनेश शर्मा किंवा विवेक पटाईत किंवा आप्पा बाप्पा - अजून असेच बरेच !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...