Tuesday, October 21, 2014

कोणाच्या धर्मांधतेचा धोका?


 महाराष्ट्रात नुकत्याच पार पाडलेल्या निवडणूकींच्या निकालानंतर सर्वाधिक चर्चा व चिंता लोक व्यक्त करत आहेत ती म्हणजे एम.आय.एम. च्या उदयाची. एम.आय.एम.च्या ओवेसीने जी धर्मांध भडकावू भाषणे केली ती लोक अजून विसरलेले नाहीत. धर्मांध ओवेसी हा लोकशाहीला धोका आहे असे मत बहुतेक व्यक्त करत आहेत.

देशाला कोणाच्या धर्मांधतेचा अधिक धोका आहे? संघाचा कि एमायएमचा? ८८ वर्ष शिस्तबद्ध रीतिने प्रचार करत, प्रसंगी धोरणे बदलत, गांधीवादी समाजवाद स्विकारत...फळत नाही म्हणून टाकत...पटेल ते गांधी जप करत चिकाटी म्हणजे नेमके काय असते याचे सार्थ दर्शन घडवत आता संपुर्ण सत्तेत आलेत. राज्येही व्यापली जातील ही चिन्हे आहेत. सध्यातरी ते रामजप करत नाहीत. कधी कोणता जप करावा...सोडून द्यावा याचे त्यांना चांगले भान आहे. एमायएमनेही (मुस्लिमांनी) आपली व्युहनीति बदलत संघाने हिंदुंचे केले त्याप्रमाणेच कोंग्रेसवर अवलंबून न राहता मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण सुरु केले असेल तर ते साहजिक आहे. मुस्लिमांचा भाजपवर कितपत विश्वास आहे हे यातूनच पुर्ण नसले तरी ब-यापैकी सिद्ध होते. कोंग्रेस नेहमीच संघाबाबत गाफील राहिली हेही वास्तव आहे. त्यांनी लोकांना ते धर्मांधतेविरुद्ध आहेत हे गृहितच धरले. पण ते वास्तव नाही हे आत सिद्ध झाले आहे. कोंग्रेसचे त्यामुळे पानिपत होणे स्वाभाविक होते....तसे झालेही आहे. भाजपचा सत्तेच्या पटावरील एकहाती उदय देश पुढे कोणत्या दिशेने जावू शकतो हे सांस्कृतिक व शैक्षणिक मंत्रालये ज्यापद्धतीने वैदिकवादाचा उद्घोष करत आहेत त्यावरून दिसते आहे. याची परिणती नव्या सांस्कृतीक वर्चस्ववादात होणार हे समजावून घ्यायला हवे. मुस्लिम समुदायही त्यांच्या सांस्कृतिक वर्चस्वतावादाला पुढे रेटणार नाहीत असे कशावरुन? आणि एक जर धादांत खोटे प्रयत्न करत असेल तर दुसरा का करणार नाही? ओवेसीच्या एमायएमचा उदय निवडणूका पंचरंगी झाल्या म्हणून वगैरे हे म्हणणे खोटे समाधान करुन घेतल्यासारखे आहे. देशभर हे लोन पसरले तर नवल नाही, किंबहुना ते अभिप्रेतच आहे. धोका संघाचा म्हणून भाजपचा अधिक आहे. कोंग्रेसला कोणताच धोका समजत नाही ही त्यांच्या मुजोरपणाची आणि जनतेत न मिसळण्याची अपरिहार्य परिणती आहे. त्यामुळे जे काही होते आहे त्या पापात त्यांचाही बरोबरीचाच सहभाग आहे.

म्हणजे सध्या देशाचे पारडे धर्मांधतेकडे झुकले आहे असे दिसेल. एमायएमचा निर्माण झालेला धोका हे त्याचेच उपफलित आहे. गुजराथ दंग्यांची त्याला पार्श्वभुमी नसेल असे मानणे कदाचित आपला भाबडेपणा असेल. नवमध्यमवर्गाला-तरुणांना आपण कोणत्या धोकेदायक पर्वात प्रवेश केला आहे हे आज समजणार नाही. समजेल तेंव्हा कदाचित उशीर झाला असेल.

ओवेसीने भडक भाषण केले, ठाकरेही करत, त्यांची भाषा उग्र होती म्हणून त्यांनी प्रत्यक्षात काही केले काय? हा प्रश्न अनुचित आहे. विचार कधीतरी कृतीत येत नाहीत असे नाही...किंबहुना ती सुरुवात असते. आधी हिंसा मानसिक पातळीवर अवतरते आणि ती संधी मिळाल्यावर कधी ना कधी प्रत्यक्ष कृतीत बदलते हे विसरता कामा नये.संघ स्थापनेपासून मुस्लिमद्वेष जोपासत आला. गांधीहत्येत त्यांचा प्रत्यक्ष हात असो अथवा नसो पण ती त्यांच्याच विचारधारेची परिणती होती हे नाकारता येणार नाही. सामाजिक असुरक्षितता निर्माण करत जाती-धर्माच्या टोळ्या बनवणे सोपे जाते हे संघाला समजते तसेच ते मुस्लिमांना समजत नाही काय? आपण सारे टोळीवादाच्या बाजुला आहोत कि विरोधात याचा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागेल. दोषारोप करत बसण्यापेक्षा सर्वच (संघ आणि एमायएम) धोके आम्ही दूर कसे ठेवू शकतो हे पहायला हवे.

3 comments:

  1. ह्याच विषयावर खासगी दूरदर्शन वाहिन्यावर ब-याच चर्चा झाल्या. त्यामध्ये ही MIM चा धोका आवर्जून सांगण्यात आला, पण RSS -BJP हे संपूर्ण लोकशाहीवादी, आणि निधर्मी असल्याचे गृहीत धरूनच चर्चा झाल्या. RSS -BJP यांचा बहुसंख्याक जमातवाद जणू काही राष्ट्रवादी आणि देशभक्तीने भरभरून वाहणारा आहे असे भासवण्यात आले. अल्पसंख्याकांचा जमातवाद देशद्रोही आणि बहुसंख्याकांचा जमातवाद म्हणजे देशप्रेम अशी ही विभागणी होती. वास्तविक दोन्हीही धोके समान आहेत आणि सर्व समूह जीवनाला धोकेदायक आहेत, असे मत कुणी व्यक्त केले नाही.

    ReplyDelete
  2. प्रियवर,
    एमआयएम का इतिहास निजाम के रजाकारों का इतिहास है. हैदराबाद में आजादी के पहले हिन्दुओं का कत्लेआम करनेवाले लोगों का इतिहास है. तब कौन सा हैदराबाद में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ था. हैदराबाद पाकिस्तान में मिलना चाहिए, ना कि हिन्दुस्थान में, यह उनकी मांग थी. इसके लिए उन्होंने बहुसंख्यक हिंदु जनता पर जो अत्याचार किये, उसे इतिहास का प्राथमिक विद्यार्थी भी जानता है.

    एक और बात मुझे आज तक समझ नहीं आयी. मुस्लिम जब तक अल्पसंख्यक है, तब तक वे आपके साथ रहेंगे. जैसे ही वे बहुमत में आये, आपको उनके साथ रहने की छूट नहीं है. क्या यही पाकिस्तान, बंगलादेश और कश्मीर में नहीं हुआ? क्यों मुस्लिम दूसरे धर्मो के साथ समान शर्तों पर रहने को तैयार नहीं है? आज पाकिस्तान बंगलादेश में आतंकवाद है, वहाँ कौन सा संघ की शाखाएं है या हिंदु कट्टरपंथी है?

    क्या गोधरा नहीं होता तो गुजरात के दंगे होते? क्या हमें उन दंगों की पृष्टभूमि पर गौर नहीं करना चाहिये? आज गुजरात में दंगे क्यों नहीं हो रहे? क्यों तोगड़िया जैसे लोग खामोश कर दिए गए? क्या इन बातों का विश्लेषण आवश्यक नहीं है?

    आज भारत में हजारों जातियाँ, दसों धर्म, अनगिनत भाषाएँ हजारों सालों से पनप रही है.. क्या इसके बाद भी हमें धर्मनिरपेक्षता या पन्थ निरपेक्षता पर किसी का भाषण सुनना जरुरी है? और यह देश ऐसा तथाकथित धर्मनिरपेक्ष विचारकों के कारण नहीं है बल्कि यह इस देश की संस्कृति का मूल तत्व रहा है कि ईश्वर को पाने का कोई एक मार्ग नहीं है बल्कि सभी रास्तों से उसे पाया जा सकता है. आज मोदी का उदय कट्टर भारत का उदय ना होकर सर्वसमावेशी भारत का उदय है. दूसरी ओर कश्मीर में क्या हो रहा है देख लीजिए. सिर्फ दीवाली पर क्यों आये, यह बोलकर लोग दंगे कर रहे है. क्या इसके बाद भी कौन उदार और कौन कट्टर है, इसका सबूत आवश्यक है?

    दिनेश शर्मा




    ReplyDelete
    Replies
    1. एमाअयएमचे वाढणे नि:संशय चुकीचे आहे. परंतू त्यांना एकवटण्यासाठी तत्वज्ञान पुरवण्यात संघ जबाबदार ठरला आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. ओवेसीने मुर्खासारखे स्टेटमेंट दिल्यानंतर हिंदुत्ववादी म्हणवणारेही पुरेशा निषेधासाठी उतरले नाहेत हेही वास्तव आहे. मीच आयोजित केलेल्या ओवेसीच्या निषेधाच्या कार्यक्रमात न येणे समजा ठीक आहे पण स्वतंत्रपणेही कोणी उतरले नाही हेही वास्तव आहे. आता चिंता करण्यात काय अर्थ? पुढील पाच वर्षात जेवढा संघ बडेजाव करत जाईल त्याच वेगात एमाआयएम पसरणार हे वास्तव आहे. अनेक बहुजन जाती (हिंदू) एमायएमसोबत जाण्याचा आताच विचार करु लागल्यात. त्यांना एमाअयएम संघापेक्षा कमी जातीयवादी वाटत असतील तर संघाने परत एकदा आपल्या तथाकथित हिंदुत्वावर विचार करावा. या देशात हिंदू (वैदिक) अथवा मुस्लिम जातीयवादी संघटना व पक्षांना थारा नाही हे बजावून सांगायची वेळ असतांना संघवाले अजुनही नवप्राप्त सत्तेच्या मस्तीतून बाहेर येत नाहीत हा त्यांचा दोष आहे. रझाकार वगैरे बाबी आता कालबाह्य झाल्यात, त्या पाठबळावर एमाअयएमला झोडता येणार नाही कारण झोडण्यासाठी तेवढीच कारणे संघासाठीही आहेत. मुस्लिम हा या देशाचा अविभाज्ज्य घटक आहे, हे नाकारणारा कोणीही दिर्घकाळ टिकणार नाही.

      आणि दिनेशजी, जर बाबरी मशीद पाडली नसती तर गोध्रा झाले असते काय?

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...