Wednesday, November 26, 2014

रामपालाख्यान


 


भारतात अलीकडे बुवा, बापू, स्वयंघोषित जगद्गुरु यांचे आणि त्यांच्या भक्तांचे एवढे पेव फुटले आहे कि हा पुरता देशच आध्यात्मिक झाला आहे कि काय असे वाटावे. बरे तसे समजावे तर देशातील भ्रष्टाचार, वंचितांवरील अत्याचार, बलात्कार यात मात्र कमी न होता वाढच होत असल्याचे दिसते. म्हणजे हा अध्यात्माचा पुर वस्तुत: निरुपयोगी, व्यर्थ आणि पोकळ बुडबुडा असल्याचे दिसून येईल. त्यातच हे स्वयंघोषित गुरु-जगद्गुरू ज्या गतीने एकामागोमाग तुरुंगात जावू लागले आहेत ते पाहता आणि त्यांच्यावरील गंभीर आरोप पाहता या सद्गुरुंच्या आश्रमांतुन अध्यात्म वाहते कि पाप, अन्याय, स्त्रीयांचे शोषण याच्या "मैल्या गंगा" वाहताहेत हा संभ्रम पडावा. आणि असे असुनही या महान सद्गुरुंचे चेले ज्या हिरीरीने आपल्या तुरुंगवासी बाबांची भलामन करतात ते पाहता भारतीय लोकांमधील विवेक केवढा सडलेला आहे याची जाणीव होते.

बरे हे शिष्य अडाणी, अशिक्षित असते तर एक वेळ त्यांच्या अंधभावनांना समजावून घेत प्रबोधन करता आले असते. प्रत्यक्षात हे चेले उच्च शिक्षित, प्रस्थापित आणी अनेकदा धनाढ्यही असल्याचे पहायला मिळते. अध्यात्माबद्दलची ओढ, ते पुरेपूर अवैज्ञानिक असले तरी, आपण समजावून घेऊ शकतो.  जीवनातील असुरक्षितता, ताण-तणाव व संभाव्य संकटाचे भय यातून माणूस असल्या निरर्थकतेत आपले समाधान व सुरक्षितता शोधू इच्छितो हे आपण समजावून घेतले तरी ज्यांच्या "बुवागिरीच्या" माध्यमातून ते हे सारे मिळवू पाहतात, अंधभक्तीने पिसाट होत जातात त्या बुवांची लायकी पाहिली तर थक्क व्हायला होते. आजवर आसारामबापू ते रामपाल यांच्या आश्रमांतून जे काही साहित्य जप्त झाले आहे  त्यात लैंगिकतेशी संबंधीत साधनेच अधिक आहेत. गर्भनिरोधकांपासून ते कामासक्ती वाढवणारे औषधे त्यात आहेत. म्हणजे आश्रमांत भक्तीनी स्त्रीयाही कोणत्या लीला करत असतील याचा तर्क बांधता येतो. सर्वच वेळीस जबरदस्ती केली जात असेल याची शक्यता नाही. अध्यात्माची पिपासा स्त्री-पुरुषांना एवढे अंध बनवते कि कामपिपासा हाही प्रश्न यातुन निर्माण झाला नाही तरच नवल!

रामपालबाबा

आसारामबापूनंतर सरवाधिक गाजत असलेले रामपालबाबाचे प्रकरण तर विलक्षण आहे. स्वत:चे सैन्य भारतीय भुमीवर बाळगणारा, शस्त्रास्त्रांचे साठे करणारा या बाबांच्या अनुयायांनी चक्क पोलिसांशीही युद्ध पुकारले. त्याला शेवटी अटक झाली असली तरी भारतीय कायद्यांना, न्यायालयांच्या आदेशांना न जुमानणा-या या बाबाचे आपण आधे कर्तुत्व आणि तत्वज्ञान पाहुयात.

रामपालचा जन्म झाला १९५१ साली सोनिपत (हरियाना) जिल्यातील एका गांवात. सिव्हिल इंजिनियरिंगमधील डिप्लोमा घेऊन हे महोदय पाटबंधारे खात्यात कनिष्ठ इंजिनियर म्हणुन कामाला लागले. असे असले तरी त्याला लहाणपणापासून अध्यात्माची आवड होती असे म्हणतात. प्रथम रामपाल कृष्णभक्त होता. हनुमान चालिसाचेही पाठ करायचा. पण पुढे त्याची भेट स्वामी रामदेवानंद या कबीरपंथी बाबाशी भेट झाली. यानंतर कबीरपंथाकडॆ रामपालचा ओढा वाढला. १९९४ पासून कबीरच सर्वोच्च दैवत आहे आणि कबीर व गरीबदासाच्या वाणीला वेद, गीता व पुराणांचेही समर्थन आहे असे तो सांगु लागला. उपदेश करु लागला. खरे म्हणजे सर्वच बुवा, बापू आणि प्रवचनकार/किर्तनकार जशी मुलभूत तत्वज्ञानाची मोडतोड करतात तशीच रामपालही करत होता. लोकांना नवनवीन दैवतांची हौस असते. मध्यंतरी एक अशीच उपटसुंभ देवता "संतोषीमाता" पडद्यावर अवतरली आणि तिची व्रते-उद्यापने कशी सुरु झाली हे आपल्याला माहितच आहे.

खरे तर कबीर हे समतेचे उद्गाते, रुढी-परंपरांचे कट्टर विरोधक. हिंदू-मुस्लिमांतील अनिष्ट परंपरांवरही त्यांनी अनवरत आघात केले. ते एकेश्वरी होते आणि कोणताही धर्मग्रंथ त्यांना मान्य नव्हता. "पाहन पूजे हरि मिलैं, तो मैं पूजौं पहार। वा ते तो चाकी भली, पीसी खाय संसार।।" असे कबीर रोखठोक बोलतात. काशीला मृत्यु आल्यास मोक्ष मिळतो असे त्यांना त्यांच्या अंतकाळी कोणी म्हणाले तर त्यांनी त्यालाही विरोध केला. असे कबीर त्यांना सर्वोच्च देवतेच्या ठिकाणी ठेवत व तत्वज्ञानांची मोडतोड करत, प्रसंगी मुळ श्लोकांचे हवे तसे अर्थ काढत प्रवचने देत रामपालने आपले "आध्यात्मिक" बस्तान बसवायला सुरुवात केली. एवढेच करून स्वारी थांबली नाही तर स्वत:ला कबीरांचे अवतार घोषित केले.

नवीन बाबा यायला लागले कि जुन्यांना स्पर्धेचा धोका वाटू लागतो. आर्य समाजाचे प्रस्थ भारतात आजचे नाही. दयानंद सरस्वतींनी सुरु केलेला हा समाज आणि वेदमान्यता हाच त्यांच्या तत्वज्ञानाचा आधार. हरियाणात हा समाज अजून ब-यापैकी प्रबळ आहे. संघवाद्यांना हवा असलेला आर्य-अनार्य व वेद आर्यांचेच हा सिद्धांत आर्य समाजींना मान्य आहे. त्यामुळे साम्स्कृतिक वर्चस्वतावादाची आयती संधी मिळते. कबीरपंथी बुवाचे उत्थान त्यांनाही सहन होणे शक्य नव्हते. आणी रामपालबाबाला प्रसिद्धीसाठी कोणालातरी टार्गेट करणे भाग होते. त्यामुळे या दोन संप्रदायांत खटके उडणे स्वाभाविक होते. त्यात २००६ साली रामपालने दयानंद सरस्वतींविरुद्ध वादग्रस्त विधाने केली. त्यामुळे संतप्त आर्य समाजींनी कोरोन्था (रोहटक) येथील रामपालच्या आश्रमावर अक्षरश: चाल केली. रामपालचे शिष्य आणी आर्य समाजींत धमासान हाणामारी झाली. त्यात आश्रमातून झाडल्या गेलेल्या बंदुकीची गोळी लागून एक तरुण आर्य समाजी ठार झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत रामपाल व काही अनुयायांना अटक केली. आश्रमही जप्त केला गेला.

या घटनेने रामपालला अभुतपुर्व प्रसिद्धी मिळाली. त्याच्या अनुयायांत घट होण्याऐवजी वाढच होत गेली. जप्त झालेल्या आश्रमाचा ताबा मिळावा म्हणुन रामपालने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मार्च २०१३ मद्ध्ये न्यायालयाने ताबा देण्याचा निर्णय घेतला असता त्याची प्रक्रिया सुरु असतांना आर्य समाजींनी त्यात अडथळा आणण्याचा हिंसक प्रयत्न केला. यावेळीस पोलिसांनी केलेल्या फायरिंगमद्ध्ये दोन ठार तर शंभराहून अधिक जखमी झाले.

२००६ मद्ध्ये रामपालवर खुन व खुनाचे प्रयत्न हे आरोप दाखल झाले होते. दोन वर्ष जेलमद्ध्ये राहून जामीनावर सुटल्यानंतर न्यायालयाला तोंड दाखवणे बहुदा रामपालला अवमानास्पद वाटले असावे. त्याने आपल्या करोंथा येथील आश्रमालाच एक सुसज्ज किल्ल्यात बनवायचा घाट घातला. स्वता:ची सेनाही उभी केली. न्यायालयीन समन्सला कच-याची टोपली दाखवण्यात येवू लागली.थोडक्यात भारतीय संविधानालाच हे आव्हान होते.  हा गृहस्थ समन्सला दाद देत नाही म्हणून अटक वारंट काढावे लागले.

सतलोक आश्रमात वारंटची अंमलबजावणी करायला आलेल्या पोलिसांना रामपालच्या सेनेने अटकाव केला. पोलिस आत शिरायचा प्रयत्न करु लागताच त्यांनी चक्क पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांनी स्थिती पाहून माघार घेतली खरी पण हा संघर्ष तब्बल दोन आठवडे चालला. या संघर्षात (खरे म्हणजे युद्धात) पाच स्त्रीया आणि एका लहानग्याचा मृत्यू झाला. ७० पत्रकारांसह व १०५ पोलिसांसह दोनेकशे लोक जखमी झाले.यानंतर कोठे रामपाल शरण आला व पोलिस कोठडीत न पडता पंचकुला येथील इस्पितळात दाखल झाला. या कारवाईच्या वेळीस जवळपास १४ हजार अनुयायांना आश्रमातून जबरीने काढावे लागले.

वरील घटनाक्रम पाहता कबीराच्या तत्वज्ञानाची ऐशी कि तैशी करणारा हा रामपाल लाखोंच्या संख्येत अनुयायी बनवू शकला कसा या प्रश्नाचे उत्तर समाजाच्या खोट्या आध्यात्मिक हावरेपणात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आर्य समाजीही सुरुवातीपासून आक्रमक राहिले कारण वेद मान्यता सोडून हा प्राणी वेदांचेच नव्हे तर गीता-पुराणांचे विसंगत अर्थ काढत कबीराला एकमात्र श्रेष्ट सर्वोच्च परमेश्वर मानत तसा प्रसार करत अनुयायी बनवत राहिला हे त्यांना सहन होण्यासारखे नव्हते. संघ विचारसरणीला मुस्लिम असलेला, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला बंडखोर संत साक्षात परमेश्वराच्या स्थानी ठेवला गेलेला कसा सहन होइल?

बरे रामपालला खरेच कबीराच्या तत्वज्ञानाशी काही घेणेदेणे नाही हे त्याच्या वेबसाईटवरील तत्वज्ञानावरुनच सिद्ध होते. कबीरवचनार्थांचीही त्याने मोडतोड केलेली आहे. आश्रमाचे रुपांतर गढीत करणे, विरोधकांशी हिंसक व अश्लाघ्य वर्तन करणे, शासनाशी युद्ध पुकारणे हे कोठल्या कबीरपंथी तत्वज्ञानात बसते? खरे तर आपले बस्तान बसवण्यासाठी व अस्तित्वात असलेल्या प्रभावी आर्यसमाजींशी मुद्दाम विरोध पत्करत, स्वतंच कारणे देत प्रसिद्धीच्या झोतात राहत अनुयायी वाढवण्याची ही चाल होती हे कोण नाकारेल?

म्हणजे हा संघर्ष आध्यात्मिक नसून केवळ धर्मसत्ता गाजवण्याच्या पिपासेतुन उद्भवलेला आहे. आणि ही गंभीर परिस्थिती आहे. खुनी, बलात्कारी म्हनून गाजणा-या स्वयंघोषित जगद्गुरुंच्या-संतांच्या रांगेत आता देशाविरुद्ध युद्ध पुकारणा-या एका जगद्गुरुची भर पडली आहे. आर्य समाजीसुद्धा खरे तर तेवढेच अपराधी आहेत. अवैदिक मुर्तीपुजेला दयानंद सरस्वतींनी विरोध करत वैदिक धर्माची पाठराखन करतांना त्यांनीही वैदिक धर्माची सोयिस्कर मांडणी केली. रा. स्व. संघालाही ती सोयिस्कर असल्याने ते आर्य समाजींचे पाठिराखे राहिलेले आहेत. रामपालने त्यांना आव्हान दिल्याने काही विचारवंतांना बरेच वाटते आहे. केवळ संघाला विरोध केला म्हणून भाजपाच्या राज्यात रामपालला अटक झाली असा आरोप करणे म्हणजे वस्तुस्थितीला बगल देण्यासारखे आहे.

त्यामुळे या प्रकाराकडे एवढ्या उथळपणे पाहून चालणार नाही. आर्य समाज वेदांची तोडमोड करत वैदिक माहात्म्य वाढवतो म्हनून कबीरवचनांची मोडतोड करत स्वमहत्ता वाढवण्यासाठी युद्धखोरपणा, हिंसकता आणि संविधानाविरुद्ध युद्धायमानता दाखवणे हे अधिक गंभीर आहे. सर्वच प्रकारच्या आध्यात्मिक (?) संस्थानांकडॆ आपण अधिक गांभिर्याने पाहिले पाहिजे. कायद्यानेही आता सर्वच आश्रमांच्या नियमित तपासण्या करण्याची गरज आहे. आता पोलिस/न्यायाधिशही कोणाना कोणा बाबाचे अनुयायी असतील तर मात्र अवघड आहे.

आपण देश म्हणून सुजाण नागरिक नव्हे हे आपण वारंवार सिद्ध करत आहोत. कोट्यावधी लोकांना अजुनही असले भोंदू आध्यात्मिक गुरु लागत असतील तर हा देश कालत्रयी महासत्ता बनु शकणार नाही याचे भान आपल्याला आले पाहिजे. अध्यात्म हा धंदा आहे. योग हा त्याहुनही मोठा उद्योग आहे. असे फोफावते उद्योग देशाची मानसिकता दुर्बळ करत नेतात, अर्थव्यवस्था पोखरत नेतात याचे भान असले पाहिजे!

15 comments:

  1. Mr. Sanjay, you said that you will answer questions on your post on Sanskrit language on 24th November. I am waiting for your answers.

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Amit,
      You should avoid writing reply in this fashion. We all should maintain decorum and dignity of any talk. It is not a political debate like on TV where the panelists quarrel like children. We all are changing, out views are changing, our friends and opponent are also changing. We should allow everyone to build his/her theory of life and test the same on the scale of his experiences. But we should not impose our thoughts on others. Then debate ends and war begins.
      Pls don’t take it otherwise. It is only to protect the dignity of each debate on this blog. We all should thanks Mr. Sonwani, who allows others to express their anger, defense and attacks on his blog. No other blogger in Maharashtra has so much courage.

      Dinesh Sharma

      Delete
    2. अमितला दिनेश भाऊंनी चांगलीच चपराक लगावली आहे!

      Delete
  2. आप्पा - वा वा - फारच डोंगरा इतकी माहिती मिळाली -
    बाप्पा - खरेच संजयने अनेक प्रकारचे परिपक्व लिखाण दिले आहे - - आपले काही प्रश्न आपण विचारून आपलेच हसे करून घ्यायचे कारे आप्पा - ? नाही म्हटले तरी थोडी लाज वाटते नाही का ?
    आप्पा - का नाही विचारायचे ? हा ब्लोग त्यासाठीतर आहे !असे संजयच सांगत असतो !आणि एक पाहिलेस का , आता संजयने अनोनिमास लोकाना या ब्लोग वरून कायमचा डच्चू दिलाय - त्यामुळे फालतूगिरी एकदम बंद !फार उत्तम झाले -एक दिलासा मिळाला !
    बाप्पा - संजयचे "भाषेचा उदय "हे प्रकरण अगदी सलग वाचले आपण ! खूप मन रमले त्यात - कितीतरी शिकायला मिळाले ! मनात अनेक प्रश्न - उप प्रश्न हिंदोळायला लागले - अजूनच हुरूप आला आहे !खरेतर दिव्यदृष्टी मिळाली असे म्हण जगाकडे बघायची -
    आप्पा - दृष्टीचे काही बोलू नकोस - आजच नवा चष्मा करून आणलाय !
    मला प्रश्न पडलाय की मग महाभारत आणि रामायण या कथापण कदाचित कनिष्क आणि तत्सम राजसत्ते बरोबर इकडे आल्या असतील का ?आणि संस्कृत भाषा इतकी तरुण असेल तर मारून मुटकून तिला म्हातारे कशासाठी केले जात आहे ? हा हव्यास कशासाठी ? केवळ तिला देवभाषा ठरवले आहे म्हणून ?हा इतका खटाटोप कोणी आणि कधी केला असेल - त्याचे काहीतरी गणित असणारच -त्याचे पुरावे सापडतात का तेपण पाहिले पाहिजे !
    बाप्पा - असेच जर भाषे सारखे देव या कल्पनेचे पण संशोधन केले तर ?

    ReplyDelete
  3. आप्पा - देव ही गरज आहे हे कसे विकसित झाले असेल ?एकाने दुसऱ्याला - तोंडातोंडी ? स्वानुभव हा भाव कधी रुजला असेल ?अनेक प्रकारे विचार करावासा - मांडावासा वाटतो रे बाप्पा - हे इतके प्रचंड संस्कृत लिखाण आणि वाग्मय कसे निर्माण झाले ?का ती देवांची भाषा - धर्माची भाषा - किंवा आज जसे हिंदी-इंग्रजी एकत्र वापर होतो - म्हणजे इलाईट क्लास फ़्लुएंट इंग्रजी आणि समाजासाठी हिंदी असा तर प्रपंच होत नसेल ना ?

    बाप्पा - अजून एक दुसरा विचार सुचतो - तो म्हणजे त्याकाळातले ब्राह्मण सुद्धा प्राकृत बोलत असणार ?त्याकाळीही आमची जात उच्च असे प्राकृतात मिरवत असणार ?शौच अशौच , विटाळ या कल्पना कधीच्या ? कारण आपल्या संस्कृतीत हे एक लोढणे कितीतरी वर्षे आपण वहात आहोत - अशा छोट्याछोट्या गोष्टींची दखलही जर घेतली तर विषय हलका आणि समजायला सोपा होत जाईल - नाही का ?
    आप्पा - पण काहीही म्हण बाप्पा - हे एक आक्रीतच आहे म्हणायचे !इतके चपखलपणे आपले घोडे कुणी दामटले असेल ?कोणाचा स्वार्थ असणार त्यात तेच कळत नाही - कारण सर्वांचीच भाषा प्राकृत मग कोणी इतका जीवघेणा उद्योग आरंभला असेल - आटापिटा केला असेल की इतिहासच फिरवून टाकायचा ?केव्हढे हे कारस्थान !
    बाप्पा - म्हणूनच तर एक मन म्हणते काहीतरी चुकते आहे !
    आप्पा - मग असेच विचार करत गेले तर ही एक थरार कथाच बनत जाते - प्रत्येक कथेत एक प्लॉट असतो तसा यात कोणाचा स्वार्थ धरायचा ?मुळात त्याकाळात ब्राह्मण वर्गही प्राकृतातूनच सत्ता भोगत असेल का ?असणारच ! ते तेंव्हा होतेच - असणारच - हो ना संजय ? एकदम नवीन भाषा आवश्यक का वाटू लागली असावी हेच कोडे उलगडत नाही - आणि त्यावर आपला पगडा असावा असे ब्राह्मण वर्गाला का वाटले असावे ? इतका आडनिडा द्राविडी प्राणायाम ब्राह्मणवर्ग करेल का कारण अगदी सोप्या भाषेत पाहिले - सिंहावलोकन केले तर - सत्तेची पकड घट्ट करण्यासाठी धडपड - हा मनुष्यस्वभाव आहे - तसे नसते तर फक्त पाणपोयाच बांधल्या असत्या राजेलोकांनी किंवा व्यापारी वर्गानी !पण आर्थिक सत्तेचे प्रकटीकरण करण्याचा एक मार्ग म्हणून सत्ताधीश अशी कामे करत असत - आजही करतात !
    आप्पा - ज्या वेळेस ग्रामराज्ये होती त्यावेळेस काय असेल आणि मगधा सारख्या महासत्ता निर्माण झाल्या त्यावेळची निकड वेगळी असेल का ? हाही एक विचार मनात येउन जातो !

    बाप्पा - थोडेसे गमतीने सांगायचे तर प्रभातचे साधे सरळ पण सकस चित्रपट आणि एकदम न झेपणाऱ्या नजरबंदी होणाऱ्या निर्मितीतून आलेला शोले सारखे प्रचंड आवाक्याचे आणि ताकतीचे चित्रपट -याचा एकत्र अभ्यास करताना आपले काय होते ?तसेच काहीतरी या संस्कृत आणि प्राकृत प्रकरणात होते !
    आप्पा - प्राकृत कडून संस्कृत किंवा संस्कृत कडून प्राकृत अशी वाढ ही काहीकेल्या नैसर्गिक का वाटत नाही ?
    बाप्पा - भारतीय उपखंडात एक सर्व समावेशक मापदंड म्हणून संस्कृतची निर्मिती - एका भाषेची मानावी का ? तर तसेही नाही ! ही काही सामाजिक किंवा धार्मिक गरज होत नाही ,सत्तेची गरजही असेल असे वाटत नाही ! का तसे असेल ?

    आप्पा - तुकाराम रामदास उत्तम लेखन मराठीतून करत होते आणि छत्रपति शिवाजी महाराजांनी मात्र आपला राज्यकोष संस्कृत मधून का लिहावा ? फारसी नको हे ठीक , पण मराठी का नको ? ते मात्र समजत नाही ! का काव्याइतकि गद्य मराठी सशक्त झाली नव्हती असे समजायचे ?

    बाप्पा - स्थानिक प्राकृत असा एक शब्दप्रयोग संजयने केला आहे तो पण समजत नाही - असे करत गेले तर मूळ प्राकृत कोणती धरायची ?गंगाकाठची का कृष्णाकाठची ?
    आप्पा - आणि या सर्व उद्योगात दक्षिण भारताचे काय ?कनिश्क आले,शक आले - त्यांच्या कडून अनेक सामाजिक बदलांची सुरवात झाली - पण त्यापूर्वी दक्षिणेत काय चालले होते - तिथपर्यंत वरून येणाऱ्या लाटांचा परिणाम झालाच नसेल तर - तेथील प्राकृत कशी होती ?देशभरातील प्राकृताचे व्याकरण एकच एक असेल असे पटत नाही त्याची संगती लागत नाही !
    बाप्पा - बापरे - चार वाजले - चहाची वेळ झाली - घरी ओरडा सुरु असेल - आता मोबाइल घेतला पाहिजेल !
    आप्पा - आमच्या घरी चल , चहानंतर फोन करू आणि मग निवांत गप्पा चालू ठेऊ !
    संजयला विचारू येणार का ते ! काय संजय ?

    ReplyDelete
  4. आप्पा - बाप्पा , बरे झाले आलास ते अरे हे बघ रे जरा , अमित म्हणून कुणीतरी आहे , आपले दिनेश शर्मा सर त्याला सांगताहेत , तरी हा ऐकतच नाही !
    बाप्पा - अरे हो मीपण वाचत होतो काल , सारखा चुंबन घेतल्याचा पुरावा मागत असतो -
    आप्पा - आपण किती चिडायचो पूर्वी गाणे गाता गाता वैजयंतीमाला आणि देवानंद झुडपाआड गेले की , आठवतंय ? पिटातले पब्लिक ओरडायचे - बास रे , बाहेर या ! तसेच हा अमित पिटातला वाटतोय
    बाप्पा - आणि हे बघ अमित , सगळ्याच गोष्टी इतक्या ताणायच्या नाहीत , संस्कृतमधून संजय बोलणार होता असे म्हणतोस ना , अरे इतके का हळवे होतात कधी ? त्याप्रमाणे संजय संस्कृत बद्दल आणीकही "उद्या " लिहीन म्हणाला होता - सोडून द्यायचे , इतका उतावळा होऊ नकोस !
    आप्पा - आज संजय एक ब्लोग चालवत आहे आणि त्याचे काही चांगले उद्देश आहेत हे तरी लक्षात येते आहे ना ?मग अशा काही गोष्टी सोडून देणे इष्ट नाही का ?
    बाप्पा - अरे काय सांगू हा आप्पा मला म्हणाला होता , जर अमितने त्याचा हट्टीपणा सोडला तर मी तुला वाडेश्वर मध्ये आप्पे खाऊ घालीन - आता तूच बघ - !
    आप्पा - वारे वा - कोण असे म्हणाले होते चोराच्या उलट्या बोंबा ! साधे गणित आहे आप्पा आप्पे कधी घालील का खायला ?तूच म्हणालास की अमितने जर संजयचे - नाही नाही - संजयने जर अमितचे - नाही - हं - जर संजयने शनिवार वाड्यावर सार्वजनिकरीत्या जर -
    बाप्पा - बोल बोल -
    आप्पा - तेच तर नाही न आठवत - काहीतरी केले तर बाप्पा - तू मला शनिवार वाड्यावर पाणीपुरी देणार होतास !
    बाप्पा - अहो पेशवे सरकार , शनिवार वाड्यावर पाणीपुरी ? कोणत्या जमान्यात आहात ? आता तिथे फक्त लावणी कार्यक्रम होतात - ते बघू फार तर ! चल- तिथे दिसेल कदाचित चुंबन जिहाद वाला एखादा -एकात एक काम !
    आप्पा - पण अमित आता संजयला छळू नकोस , दिनेश शर्मांचे पण थोडे ऐक ! अरे मोठ्ठे लोक सांगतात ते ऐकावे !आणि तुला काही बघायचे असेल तर एखादा इंग्लिश पिक्चर बघ !

    ReplyDelete
  5. साहित्य संमेलन हे रिकाम्या लोकांचे उद्योग असून, तेथे फक्त चर्चा होते, त्यावर पुढे काहीच होत नाही. शहाणपणाला मर्यादा असते; पण मूर्खपणाची काही हद्द नसते. इतकेच या संमेलनाबाबत म्हणता येईल. साहित्य संमेलन म्हणजे ब्राह्मणी शहाण्यांचे उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलन आणि त्याच्या आयोजनची खिल्ली उडवली.

    महात्मा फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्यातील फुले वाड्यात झालेल्या कार्यक्रमानंतर नेमाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साहित्य संमेलन, मराठी भाषेचा अभिजात दर्जा, भाषा सल्लागार समितीचा अहवाल आदी विषयांवर त्यांनी परखडपणे मते मांडली.

    'संमेलनासंदर्भातील माझी मते पटणारी नाहीत. संमेलनातून मराठी संस्कृती प्रतिबिंबित होते का हा खरा प्रश्न आहे. साहित्य संमेलनांसाठी राजकारणी-उद्योजकांकडून पैसा घेतला जातो. उत्सव साजरा करण्यासाठी उद्या शत्रूकडूनही पैसे आणतील. हे सगळेच अनाठायी आहे. संमेलनातून साहित्य किती पुढे जाते हा प्रश्नच आहे. चुकून काही लोक यांना संमेलनात सापडतात आणि जे सापडतात ते नंतर पस्तावतात,' अशी टीकाही नेमाडे यांनी केली.

    भाषा सल्लागार समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात शालेय शिक्षणापासूनच मराठीची सक्ती करण्याविषयी सुचवले आहे. त्याविषयी बोलताना नेमाडे म्हणाले, 'मराठी ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे. त्यामुळे भाषेची काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, जे लोक काळजी करण्याचे बोलतात, त्यांचीच काळजी केली पाहिजे. शेतकऱ्यांची मुले मुख्यमंत्री होतात. ते भाषेसाठी काय करतात? इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंदच केल्या पाहिजेत. इंग्रजीत शिकवणे म्हणजे बुडवण्यासारखे आहे. कर्नाटकात असे चालत नाही.'

    मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन भाषेपुढील प्रश्न सुटणार आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 'आधी घरात मराठी नीट केली पाहिजे. अभिजात दर्जाने पैसे मिळतील. मात्र, पैशांनी प्रश्न सुटत नाही. मातृभाषा नीट आलीच पाहिजे. आपल्याला स्वप्नदेखील मराठीतच पडली पाहिजेत. इंग्रजी येण्यापूर्वी चिनी भाषा यायला हवी. इंग्रजी भाषा शिकण्याविषयी दुमत नाही. मात्र, शंभर टक्के इंग्रजी आलेच पाहिजे असे नाही,' असेही स्पष्ट मत त्यांनी मांडले.

    नेमाडे उवाच...

    >> कुठल्याशा ताहिती बेटावर चार मराठी माणसे राहतात, असे कळल्यावर तिथेही हे टोळभैरव साहित्य संमेलन भरवतील.
    >> संमेलनातून मराठी संस्कृती प्रतिबिंबित होते का आणि त्यातून साहित्य किती पुढे जाते हा खरा प्रश्न आहे.
    >> मराठी ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे. त्यामुळे भाषेची काळजी करण्याचे कारण नाही.
    >> शेतकऱ्यांची मुले मुख्यमंत्री होतात. ते मराठी भाषेसाठी काय करतात?
    >> मराठी शाळा बंद पडत असताना महाराष्ट्रात इंग्रजी शाळांचे पेव फुटत आहे. ते रोखण्यासाठी इंग्रजी शाळांवर बंदी घालावी.

    ReplyDelete
  6. आप्पा - भालचंद्र नेमाडे हे अत्यंत फाटके लेखक आणि विचारवंत आहेत हा काही नवा शोध नाही !
    बाप्पा - त्या ऐवजी त्यांनी दलितांना बंदुकीचे परवाने द्यावेत या मागणी विषयी टिपण्णी केली असती तर त्यांना शोभून दिसले असते
    आप्पा - कोसला म्हणजे नेमाडे यांना मटका लागला असे लोक म्हणतात ते अगदी खरे आहे !
    बाप्पा - आज इंग्रजी शिवाय पर्याय नाही
    आप्पा - प्रत्येकाने उच्च इंग्रजी शिकावे - त्यासारखी उच्च भाषा आपल्या पहाण्यात नाही
    बाप्पा - आपल्याकडे जे लिखाण आहे ते अत्यंत खालच्या प्रतीचे आणि टाकावू आहे - आप्पा -
    ना सी फडके काय किंवा वि स खांडेकर काय सर्व एकाच लायकीचे आहेत - नेमाडे तर अगदीच रद्दड आहेत - त्यांना काहीच जमत नाही - हिंदू हि तर अगदीच फसलेली आहे - त्यापेक्षा तुंबाडचे खोत किंवा कुणा एकाची भ्रमण गाथा कितीतरी श्रेष्ठ म्हणता येईल - कुसुमाग्रजांचे लेखन सुद्धा काहीतरी थोर लिहायचे या अट्टाहासापायी लिहिलेले वाटते - ठरवून -
    आप्पा - आणि ना सी फडकेच्या लायकीचा म्हणजे रणजीत देसाई किंवा शिवाजी सावंत !
    बाप्पा - त्यामानाने इंग्रजीत असंख्य विषयावर लिखाण आहे !- ती जगाची भाषा आहे
    आप्पा - नेमाडे हे संसानाती लिहिणारे आणि बोलणारे म्हातारे म्हणून प्रसिद्ध आहेत !बोअर

    ReplyDelete
  7. नेमाडे हा गेमाडे आहे
    तो काही लेखक म्हणून प्रसिद्ध नाही !
    खटपट्या लटपट्या आहे - त्याच्या विचारणा कोणीच गंभीरपणे घेत नाही !
    त्याचा लेखनाचा काळ संपला आहे प्रतिभा त्याला सोडून गेली आहे
    त्यामुळे प्रकाशक त्याला टाळतात

    ReplyDelete
  8. श्री. नेमाडे हे अनेक वादग्रस्त विधाने करण्या बाबत प्रसिध्द आहेत. कबुल आहे. परंतु त्यांनी केलेल्या अनेक विधनांवर आज नक्की सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करण्याची जरूरआणि गरज आहे. मराठीसाहित्यसंमेलन ही खरोखरच मुळातूनच आज एक वादग्रस्त गोष्ट आहे . मराठीसाहीत्यसंमेलन , त्याचा मूळ हेतू , त्यामुळे होणारे फायदे, मराठी भाषा आणि मराठी साहित्य यासाठी त्या संमेलनाचा उपयोग, अध्यक्ष्यपदाची निवडणूक , अध्यक्षांची नेमणूक इत्यादी गोष्टींवर आज खरोखरच गंभीरपणे प्रत्येक मराठी माणसाने आणि प्रत्येक साहित्यीकाने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे इतके तरी आपण सर्वांनी स्वत:शी प्रामाणिक राहून मान्य केलेच पाहिजे . श्री. नेमाडे काय म्हणाले या पेक्षा ते जे काही म्हणाले त्यातल्या कोणत्या गोष्टीत खरोखरच तथ्य आहे हे आपण तपासून पहिले पाहिजे. आणि त्यातल्या काही गोष्टी आपल्याला मनोमन पटत असतील तर त्या प्रामाणिकपणे मान्य केल्या पाहिजेत. या सर्व विषयाकडे कोणताही पूर्वग्रह मनात न धरता आपल्याला सक्रिय दृष्टिकोन आवश्यक आहे

    ReplyDelete
  9. नेमाडे यांचे काही परखड मुद्दे खरेच मानण्यासारखे आहेत, उदा..."साहित्य संमेलनांसाठी राजकारणी-उद्योजकांकडून पैसा घेतला जातो". उत्सव साजरा करण्यासाठी उद्या शत्रूकडूनही पैसे आणतील. हे सगळेच अनाठायी आहे. संमेलनातून साहित्य किती पुढे जाते हा प्रश्नच आहे....पण साहीत्य संमेलन काही कोणत्या एका जातीची मक्तेदारी नाही". जातीवाचक बोलणे टाळायला हवे होते.

    ReplyDelete
  10. लिहा वाचा हे आसरामाचे चिरंजीव आहेत हे सत्य ते का लपवून ठेवत आहेत ?
    कारण त्याना जो संघाचा पुळका आहे त्यावरून ते सिद्ध होते आहे
    उद्या डॉ आंबेडकर यांना जाऊन ६४ वर्षे होतील त्यांना वंदन करण्याचे लिहा वाचा यांना स्मरण कसले होणार डोंबल ?कारण लिहा वाचा अडकलेले भगव्या रंगाच्या कफनीत -
    लिहा वाचा यांना दलितांचे काहीच नाही !
    अत्यंत बेलगाम भाषा करत स्त्रियांना दुखावणे हा त्यांचा आवडता उद्योग दिसतो - आणि वर खोटे आरोप करून त्यांना दुसऱ्याला डिवचायला आवडते -

    असले उद्योग करणाऱ्या भगव्या वृत्तीच्या माणसाला स्त्रियांच्या वेदना कशा कळणार ?
    तुमची भगवी हुकुमशाही फार तर १-२ वर्षे टिकेल हे लक्षात ठेवा !

    ReplyDelete
    Replies
    1. मोहिनी परकर नावाने लिहिणाऱ्या नराधमा, पुरे झाला तुझा चावटपणा ! अक्कल गहाण ठेवली आहेस काय?

      Delete
  11. साध्वी बरळली

    साधू, संन्यासी, तथाकथित बुवा-बाबा, साध्वी हे सारे लोकांना अध्यात्माचा उपदेश करताना, संयम बाळगा, कुणाचे मन दुखवू नका, असे आवर्जून सांगतात. मोह सोडा आणि परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्याची आराधना करा, असाही उपदेश ही मंडळी करतात. पण काही साधू संन्याशांनी, बाबा-बुवांनी देशात खुले आम अध्यात्माचा बाजार मांडला. शब्दांचा खेळ मांडून जनतेला झुलवायचे-फसवायचे आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा, असा या मंडळींचा धंदा झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच आपण संत कबीरांचे वैचारिक वारसदार आहोत, असा दावा करणाऱ्या रामपालला हरियाणा पंजाब उच्च न्यायालयाच्या आदेशाने अटक झाली. आपली अटक टाळायसाठी त्याने जंग जंग पछाडले. त्याला पकडल्यावर त्याने मांडलेल्या धार्मिक-अध्यात्माच्या बाजाराचे खरे स्वरूपही उघड झाले. सत्तेच्या मोहाने राजकारणात आलेल्या साधू आणि साध्वींनी जनतेला भडकावत, चिथावण्या देत आणि सवंग प्रसिद्धी मिळवायचा पायंडा पाडला आहे. उमा भारती, खासदार आदित्यनाथ, साध्वी ऋतंबरा ही सारी राजकारणातली नेते मंडळी भगवी वस्त्रे परिधान करत असली, तरी त्यांनी सर्वस्वाचा, मोहाचा त्याग केलेला नाही. अवगुणावर त्यांना मात करता आलेली नाही. वादग्रस्त वक्तव्ये करून ही मंडळी सतत गाजत आणि वाजत राहिलेली आहेत. आता या मालिकेत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग खात्याच्या राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचेही नाव झळकते आणि गाजते आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात या साध्वीने कॉंग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवताना कसलाही संयम ठेवला नाही. कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांचे नाव न घेता, भांडी विकणाऱ्यांचा मुलगा एका नेत्याचा जावई झाला, अब्जाधीश झाला, त्याने गरिबांना लुटले, त्यांचे शोषण केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, असा दाखला देत, या साध्वीने पुढे जी काही मुक्ताफळे उधळली ती संतापजनक आणि लोकशाहीची विटंबना करणारी असल्यानेच, गेले तीन दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ सुरू आहे. या साध्वी म्हणाल्या, "आता तुम्हाला दिल्लीत सरकार कुणाचे हवे, रामजाद्यांचे की हरामजाद्यांचे?' कॉंग्रेसवर तोफ डागताना आपण काय बोलत आहोत, बरळत आहोत, याचे भान साध्वी ज्योतींना राहिले नाही. जाहीर सभेत त्यांनी आपली अक्कल पाजळली. अकलेेचे दिवे लावले आणि त्याचा प्रकाश पडायच्या ऐवजी अंधारच निर्माण झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहात कॉंग्रेस आणि विरोधी सदस्यांनी या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत गोंधळ घातल्यावरही ही साध्वी माघार घ्यायला तयार नव्हती. मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे आपण माफी मागायचा प्रश्नच येत नाही, असा आडमुठेपणा त्यांनी कायम ठेवला होता. आपल्या भाषणावर त्या ठाम होत्या. पण, कॉंग्रेस आणि विरोधकांनी राज्यसभेचे कामकाजच बंद पाडले. लोकसभेत वारंवार गोंधळ घातला. साध्वीच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानेच शेवटी मोदींना या वादात हस्तक्षेप करावा लागला. आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून त्यांनी शब्द जपून वापरा, असे वर्तन सहन करणार नाही, अशी दमदाटी केली. त्यांच्याच आदेशावरून या साध्वीने त्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल माफीही मागितली. पण, तरीही संसदेतला गोंधळ मात्र थांबलेला नाही.

    ReplyDelete
  12. राजकारणाची वैतरणी
    अध्यात्माच्या नावेत बसून हा भवसागर पार करायचा, वैतरणीचा पैलतीर गाठायचा आणि मोक्ष मिळवायचा असे अध्यात्मिक गुरू प्रवचनातून लोकांना उपदेश करण्यात तरबेज आहेत. स्वत:चे श्राद्ध घालून संन्यास धर्म स्वीकारणाऱ्या काही संन्यांशांना राजकारणाचा-सत्तेचा मोह आवरता येत नाही. अंगावर भगव्या कफन्या घालून शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता आणि मठांची उठाठेव करणाऱ्या संन्याशांची संख्याही देशात कमी नाही. त्याग जनतेने करावा आणि यांनी आपले उखळ पांढरे करून घ्यावे, असा हा किफायतशीर धंदा आहे. अध्यात्मिक गुरूंचा धंदा भरभराटीला आल्यावर जनतेत त्यांच्या भगतगणांची संख्या वाढते. जनतेत प्रभाव निर्माण होतो. नेमक्या त्याच लोकप्रियतेवर स्वार होत, राजकारणात घुसणाऱ्या साधू संन्याशांना पुढे सत्तेची मस्ती चढते आणि मग त्यांचा संयमही जातो. अहंकार रोमारोमात भिनतो. साध्वी निरंजन ज्योती यांच्याबाबतीत नेमके असेच घडले आहे. उत्तर प्रदेशातल्या "मल्लाह' म्हणजे नावाड्यांच्या जातीत जन्मलेल्या निरंजन ज्योती, यांचा फतेहपूर भागातल्या दलित आणि मागासवर्गीयांवर प्रभाव आहे. उत्तर प्रदेशातला भाजपचा दलित, मागासवर्गीयांचा चेहरा असा त्यांचा लौकिक आहे. निरंजन ज्योती यांनी संन्यास घेतल्यावर कानपूरच्या मुसानगर भागात आश्रमही स्थापन केला. जनतेला त्या हा भवसागर-जीवनाची वैतरणी पार कशी करायची, याचा उपदेश करायला लागल्या. भाजपने त्यांची लोकप्रियता हेरली आणि पक्षात घेतले. 2002 आणि 2007 मधली विधानसभेची निवडणूकही त्यांनी भाजपतर्फे लढवली होती. त्या पराभूत झाल्या. 2012 मध्ये मात्र हमीरपूर विधानसभा मतदार संघातून त्या विजयी झाल्या. 2014 मधल्या लोकसभेच्या निवडणुकात फतेहपूर मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. मोदींनी केंद्रात त्यांना सत्तेचे पद दिले. मुळातच अहंकारी असलेल्या निरंजन ज्योती यांना सत्तेची बाधा झाली. अहंकार वाढला आणि आपण म्हणजे साक्षात परमेश्वराचे अवतार आहोत, अशा आविर्भावात त्या सरकारी अधिकाऱ्यांना डाफरायला लागल्या. त्यांच्यावर तोंड टाकायला लागल्या. प्रशासनातले अधिकारी शांतपणे त्यांच्या या तोफखान्याला सामोरे जात. विरोधकांनीही आपण केलेली टीका सहन करायलाच हवी, अशा घमेंडीत त्या प्रचार सभेत बरळल्या आणि हे बूमरॅंग त्यांच्यावरच उलटले. राजकारणाची वैतरणी पार करणे एवढे सोपे नाही, हे या वादंगाने त्यांना आता समजले असेल. आधी अर्वाच्य, असभ्य बोलायचे आणि नंतर माफी मागायची याला काही अर्थ नाही. साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेले आगलावे वक्तव्य सत्ताधारी भाजपलाही महागात पाडणारे ठरले, त्याचे कारण या आधीही पक्षातल्या आदित्यनाथ, गिरिराज सिंह या साधू-संन्याशांनी असली चिथावणीखोर वक्तव्ये केलेली आहेत. साध्वी निरंजन ज्योती यांना वेळीच रोखले नाही, तर त्या या पुढच्या काळात यापेक्षाही खालच्या थराला जाऊन भाषणबाजी करतील, सामाजिक विद्वेष निर्माण करणारी वक्तव्ये करतील, याची खात्री झाल्यानेच कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेत, संसदेचे कामकाजच रोखून धरले आहे. निरंजन ज्योती यांनी माफी मागितलेली असल्याने त्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्नच येत नाही, असे सांगत संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांची मागणी साफ फेटाळली आहे. विरोधकांनीही अधिक गोंधळ न घालता सरकारलाच असली वक्तव्ये सहन करणार नाही, असा इशारा देऊन संसदेचे कामकाज चालवायला हवे.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...