Friday, November 28, 2014

प्रकाशाची...

 

माझ्याकडॆ ओंजळभर प्रकाश आहे....
पुर्वसुरींनी दिलेला
माझ्या बोटांतून तो निसटण्याआत....
तुम्ही हातात घ्या....
पुढे द्या...
सर्वांनाच प्रकाशाची...
क्षणमात्र का होईना...
पण गरज आहे...!

2 comments:

  1. आप्पा -काय घाईघाईने कुठे चालला आहेस रे बाप्पा ?
    बाप्पा - अरे समुद्रात !
    आप्पा - समुद्रात ? का रे बाबा ?जीव प्यारा आहे ना बाप्पा - ?
    बाप्पा - अरे वेडा रे वेडा ! आज तारीख काय ?आज महापुरुषाचे महानिर्वाण !
    आप्पा - अरे नीट सांग रे बाबा - आजकाल गल्लोगल्ली महापुरुष झाले आहेत - भगवे - निळे - हिरवे - पांढरे -जानवेवाले -पंचावाले -टोपीवाले
    बाप्पा - अरे आपल्या थोरल्या महाराजांचा पुतळा होतोय समुद्रात आणि जागा पण भरपूर घेतली आहे - मग आपल्या बाबासाहेबांना पण त्यांच्या बरोबर घोड्यावर बसवून एकाच पुतळ्यात दोन विचार एकत्र आणले तर ?-
    आप्पा -अरे मस्तच की -माझेतर म्हणणे आहे की - सर्वांनाच घोड्यावर बसवले तर ?-महात्मा फुले , शाहीर आण्णाभाऊ साठे ,यशवंतराव होळकर - अहिल्याबाई - सगळेच घोड्यावर बसले आहेत आणि त्यामध्ये सिंहासनावर राजर्षी शाहू महाराज , संभाजी महाराज आणि शिवछत्रपति असा जर एक भव्य पुतळा केला तर ?
    बाप्पा - आणि एक बघ पटतंय का ते !आपल्या मंत्रिमंडळात जर ते घडू शकते तर मग समुद्रात का नाही ? आणि समुद्र तरी कुठला ते बघ ना ! संयुक्त महाराष्ट्राचा !
    आप्पा - अरे मग एक काम करुया ना !आत्ता मंत्रिमंडळात जसे सर्वसमावेशक मेळ घालण्याचे कार्य झाले अगदी तसेच इथेपण करुया !सर्वांनाच बरोबर घेऊन समुद्रात जाऊ या ! हे काही मानापमानाचे नाट्य नाही किंवा हा काही मराठी बाण्याचा पण मामला नाही !
    बाप्पा - आपण जिवंत स्मारक केले तर ?
    आप्पा - म्हणजे ?
    बाप्पा - अरे जी व न्त - - खरेखुरे ! म्हणजे असे बघ - असल्या फालतू खुर्चांच्या राजकारणात अडकलेल्या पवारसाहेब आणि रामदास आठवलेना चक्क लाइव्ह समुद्रात बसवले शिवाजी आणि बाबासाहेब यांच्या बरोबर तर ?
    आप्पा - एक अडचण आहे - साहेब घसरून पडले आहेत , म्हणून अजितदादांना विचारू आणि रामदास हे नाव जरा ब्राह्मणी वाटते म्हणून आठवले हे देवेंद्राच्या मागेमागे असतात असापण एक आरोप आहे - म्हणून त्यांच्याजागी दुसराच कोणी बघुया !केस पिंजारलेला - रागीट मुद्रेचा !
    बाप्पा - एक मिनिट - एक मिनिट
    आप्पा - काय आता ?
    बाप्पा - आपल्या संजयचे काय ? त्याला कोणीच कुठलीच खुर्ची देत नाहीत !किती वर्षे झाली !
    आप्पा - हळू बोल - हे एक फार मोठ्ठे सिक्रेट आहे
    बाप्पा - सांग कि रे - इथे बीच वर कोणी नाहीये -
    आप्पा - अरे संजयला तर कायमच रात्रीची ड्यूटी ठेवली आहे - समजा रात्री अपरात्री कुणी खरोखरच जिवंत झाला - शिवाजी महाराज संभाजीला किंवा डॉ बाबासाहेब अण्णाभाऊ साठेना काही दोष देऊ लागले तर ? तर आपला संजय दोघांचीही समजूत काढेल आणि आपला शैव धर्म सर्वाना कसा तारणार आहे ते पण सांगेल -
    बाप्पा - त्याला समुद्रात दिवाबत्तीचे अधिकार दिले की तो होळकरांच्या प्रेमापोटी श्रद्धेने करेल ! फक्त दादोजींचा पुतळा तिथे आणायचा नाही इतके त्या देवेंद्रला सांगुया !- आणि त्या भागवतांच्या मोहनला !ऐकतील ते !
    आप्पा - ठरले तर मग ! आजच ६ डिसेम्बराच्या मुहूर्तावर !
    बाप्पा - अरे अजून एक काम - आपल्या टी बाळू ला कुठेतरी घुसवता आले तर बघ ना !
    अरे ते पण हिंदुहृदय सम्राट होते ना ?
    आप्पा -कमाल आहे म्हणजे हे कसे जमणार ? बाबरी पाडण्याच्या दिवशी बाबरी पाडणारे
    हिंदूहृदय सम्राट आणि आपली घटना लिहिणारे डॉ बाबासाहेब हे एकत्र ?
    बाप्पा - जाऊ दे रे - झ्झाले गेले गंगेला - सॉरी - समुद्रात विसर्जन !

    ReplyDelete
  2. या प्रकाशाकडे च्या फोटोचे कौतुक केले पाहिजे अत्यंत कल्पकतेचे आणि तितक्याच सुंदर कवितेचे -
    खूप त्रोटक मांडणी खूप काही सांगून जाते
    संजय जी अभिनंदन !

    आता आप्पा बाप्पा -
    मस्तच रे अप्पू
    मसाला चेष्टा
    अगदी दृष्ट लागावी अशी
    खूप आत्मभान ठेवून केलेली
    अगदी सर्वश्रेष्ठ थोर महात्म्यांची नावे घेऊनही कुठेही अतिरेक नाही
    आप्पा बाप्पा यांनी असाच संयम बाळगला तर
    अभिनंदन केलेच पाहिजे

    या ठिकाणी त्यांची टिपण्णी बरेच काही सांगून जाते
    आज दुष्काळ आणि आरोग्य असे कळीचे मुद्दे असताना शिव स्मारकात पैसा खर्च करणे किती योग्य आहे ?आणि त्यासाठी सरकारच कशाला हवे ?
    खरेतर असे प्रकल्प सरकारने राबवण्या ऐवजी शिवसेनेने किंवा अंबानी अडानी अशा तत्सम लोकांनी व्यावसाईक तत्वावर का राबवू नयेत ?
    हो अगदी भरपूर तिकीट ठेवूनही चालेल
    शिवसेनेच्या झुणका भाकरीचे कसे तीन तेरा वाजले ?ते पण लक्षात असू द्या
    आतातर सर्वत्र सरकार भागावेच आहे आतातरी रस्ते चांगले असायला कुणाचीच आडकाठी नाही एकमेकांवर ढकलाढकली करायला स्कोपच नाही केंद्र राज्य आणि पालिका सर्वत्र युतीचे राज्य आहे आता चुकलात तर मात्र युतीला क्षमा नाही
    संपूर्ण आयुष्य दुसऱ्याला दोष देण्यात गेले आतातरी काहीतरी करून दाखवा नाहीतर सेनेची सांगत बिनदिक्कत सोडा
    तो अस्तनीतला निखारा आहे '
    संघाला खड्यात घालेल हि शिवसेना
    मनसे आणि शिवसेना हे गुंडांचे टोळके आहे टी बाळू हापण एक लाफान्गाच होता आणि ही पोरेपण तसलीच आहेत हे आरशासारखे स्वच्छ सत्य आहे
    महात्म्यांच्या पुढे नतमस्तक होताना जर व्यवसाइक दृष्टीकोन ठेवायचाच असेल तर मग सरकारने लोकांचा पैसा का गुंतवायचा ?
    असाच काहीसा या आप्पा बाप्पा यांच्या कोपरखळ्या मारण्याचा अर्थ होतो आहे असे वाटते !

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...