Wednesday, March 18, 2015

मुस्लिम संघर्ष

१) Non believer (काफिर) पैगंबरंच्या दृष्टीने कोण होते? हा खरा प्रश्न आहे. प्रथम ते काफिर ज्यू होते आणि त्यात ख्रिस्चनांची भर पडली. ते का काफिर ठरले? कारण ज्यू हेच आपले प्रथम अनुयायी होतील असे पैगंबरांना वाटले होते. मुळात इस्लाम हा ब-यापैकी ज्यू धर्मतत्वांच्या निकटचा आहे. "अल्लाह" हा शब्द ज्यूंच्याच "एल - अल" या शब्दांतुन निर्माण झाला आहे. अल्लाह हा अरब जगताला इस्लअमपुर्व काळापासुन माहित होता. पण ज्युंनी पैगंबरांचे प्रेषितत्व नाकारले आणि ज्यू शत्रू (काफर) झाले. ख्रिस्ती धर्मही ज्युंचीच पडछाया असल्याने तेही काफर. त्यात जेरुसलेमच्या धर्मस्थळावरून काही शतके क्रुसेडस झाली. त्यात हे वैर वाढत गेले. याचा हिंदू धर्माशी कधीही संबंध नव्हता.
२) अरब, ज्यु हे वाळवंटी प्रदेशातील रहिवासी. टोळ्यांत राहणारे. स्वाभाविकच त्यांच्यात पणी, अन्न आणि स्त्री यावरुन आपापसात झगडे होत राहणे अपरिहार्य होते. तत्कालीन टोळीजीवनातील आवेश, हिंसकता याचे प्रतिबिंब धर्मतत्वांत पडणे स्वअभाविक आहे. उदा. वैदिक धर्मही टोळीजीवनातुनच निर्माण झाला. त्यातही परधर्मियांबद्दल पुरेपुर अनास्था, हिंसकता, लुटींचे समर्थन आहे. हवे तर वेद पुन्हा वाचुन घ्या. वैदिकांचा मुख्य देव इंद्रही युद्धायमान असाच आहे. धर्म हा परिस्थितीचे अपत्य असतो.
३) आपण आज मुस्लिम राष्ट्रे हा शब्द बिनदिक्कत वापरतो, पण अमेरिका ते युरोपातील राश्ट्रांना "ख्रिस्ती राष्ट्रे" हा शब्द वापरत नाही. बव्हंशींचा तो अधिकृत धर्म असुनही. आणि युरोपिय राष्ट्रांनी एखाद्या ख्रिस्ती राष्ट्रावर एकत्र येत हल्ला चढवल्यचे उदाहरण नाही. इराकबद्दल ते का हे लक्षात घ्यायला हवे.
४) ख्रिस्त्यांना ज्युंबद्दल प्रेम आहे म्हणून नव्हे तर मुस्लिम राष्ट्रांवर सातत्याने कुरघोडी करायची आहे म्हणून. पाकिस्तानला अमेरिकेने त्यासाठीच "पाळले" आहे. हिंदु राष्ट्रावर वचक रहावा म,हनून हे आम्ही कधीही लक्षात घेत नाही.
५) दहशतवादाबत्द्दल म्हणाल तर प्रत्येकाने बायबल (विशेषत: ’जुना करार") वाचायलाच हवे. हिंसेची मुलतत्वे त्यात, जेवढी कुराणमद्ध्ये आहेत, तेवढीच दिसून येतील.
६) आद्य आत्मघातकी दहशतवाद ज्युंनी शोधला, दुस-या शतकापासून निरलसपणे वापरला. फार कशाला अलीकडेच लिट्टॆला आत्मघातकी दहशतवादाचे धडे देणारे ज्यूचे मोसादच होते.
७) अरबी राष्ट्रे, (जी आज मुस्लिम आहेत), ख्रिस्ती (जे आज बव्हंशी युरोपियन नि अमेरिकन खंडीय आहेत) आणि अल्पसंख्य पण व्यापारी वृत्तीचे ज्यू हा तिढा अरबांच्याच भुमीवर निर्माण झाला आहे. मुस्लिम राष्ट्रे सरळ युद्धात ख्रिस्ती राष्ट्रांशी आणि ख्रिस्ती-सपोर्टेड ज्युंशी सरळ लढ्यात जिंकु शकलेले नाहीत आणि जिंकण्याचे सुतराम शक्यता नाही. जगतील सर्व महत्वाची माध्यमे ख्रिस्त्यांच्या हाती आहेत. अरबी माध्यमांची विश्वासार्हता एक तर प्रश्नांकित तरी आहे आणि त्यांचा रीचही जास्त नाही. त्यामुळे मुस्लिमांना दहशतवादाचा आश्रय (त्यंच्या दृशःतीने तो गनिमी कावा) घेतल्याखेरीज गत्यंतर काय? अमेरिका हे जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र आहे हे मी खुद्द अमेरिकेतच जाहीर मुलाखतीत म्हणून आलोय. केवळ आर्थिक कारणांसाठी जग त्यांचे पोलिसिंग सहन करत असेल तर जागतिक समुदायांनी विचार करायला हवा.
८) भारतातील मुस्लिम हे बव्हंशी याच भुमीचे, कृषी संस्कृतीचे नागरिक आहेत, टोळी संस्कृतीचे नाहित. अरबी-इराणी मुस्लिम समाज आणि भारतीय मुस्लिम समाजाला एकाच तागडीत तोलने योग्य नाही. सर्वात अधिक मुस्लिमच सुफी, वारकरी, वैष्णव संत भारतात झालेले आहेत हे वास्तव नजरेआड करुन चालणार नाही.
९) युरोपियनांना सेमेटिकांशी नाळ एकोणिसाव्या शतकापासुनच तोडायची होती. हिटलरचा थिंक ट्यंक रोझेनबर्ग म्हणतो, गो-या युरोपियनांचा आणि सावळ्या सेमेटिकांचा भाषिक/वांशिक आणि सांस्कृतिकही संबंध नाही. मुळात आर्य सिद्धांत आणि नंतर इंडो-युरोपियन सिद्धांत जन्माला घातला गेला कारण युरोपियनांना आपल्या संस्कृतेचा इतिहास पुर्वेकडे शोधायचा होता. आधी भारत नि चीन हे स्पर्धेत होते, पण नंतर त्यांनी याही स्थानांना नाकारत नवी मुलस्थाने शोधायला सुरुवात केली. दुर्दैवाने (अस्तित्वातच नसल्याने) गेल्या दोनशे वर्षांतही असे कोणतेही मुलस्थान त्यांना सापडलेले नाही.
१०) पण याच सिद्धांतामुळे येथील वैदिकांना युरोपियन (पक्षी ख्रिस्ती) जवळचे वाटतात कारण त्यांच्या सिद्धांतामुळे जेवढे युरोपियनांचे वर्चस्वतावादी धोरण अंगिकारता येते तेवढेच स्वमाहात्म्यही गाजवता येते. ज्युंबद्दलचे वैदिकांचे प्रेम हे केवळ आणि केवळ मुस्लिमांवर दबाव बनवून आहेत म्हणून आहे, अन्य काही हेतु नाही.
११) थोडक्यात ख्रिस्ती विरुद्ध अरबी (सेमेटिक) इस्लाम या संघर्षात वैदिकजन अकारण मुर्खपणाच्या वर्चस्वतावादी भावनेतुन पडले आहेत.
१२) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, या संघर्षाचे आकलन नसलेले भारतीय मुस्लिम, केवळ धर्मभावनेने प्रेरीत होत अरबी मुस्लिम/ख्रिस्त्यांच्या संघर्षात "जणु आपलेच नाक कापले गेले" या भावनेतून पाहतात तेही मुर्खपणाचे आहे. प्रत्येक मातीचे संघर्ष वेगळे असतात, धर्म कोणतेही असोत. आज अरबस्तानात अगदी इस्लामहुन अधिक शांततामय धर्म असता तरी संघर्ष हाच राहिला असता.
१३) युरोपियन पक्षी आजचे ख्रिस्ती हे वंशवादी होते आणि आहेत. (अपवाद क्षमस्व) त्यांना जेरुसलेमच्या सेमेटिक येशु ख्रिस्तानेच ख्रिश्चन धर्म स्थापन केला याशी काही घेणेदेणे नाही. खरे तर सुळावर जाईपर्यंत येशू हा ज्यूच होता हे वास्तव लक्षात घेतले जात नाही. ख्रिस्ती राष्ट्रांनीच ज्यूंची जास्त हत्याकाडे केली, हकालपट्ट्या केल्या (भारत सोडून) अन्याय केले हे ज्यु विसरले असतील असे समजू नका. भविष्यात ज्यू विरुध ख्रिस्ती हा संघर्ष पेटला तर मला आश्चर्य वाटणार नाही., पण सध्या मुस्लिम हा दोघंचा शत्रू आहे आणि त्याचे परिणाम अरबांच्याही नृशंसपणातुन दिसत आहेत. किंबहुना अरब राष्ट्रांवर अंतिम चाल करण्याची पुर्वतयारी सुरु आहे. आज जाहीरपणे अरबांची (म्हणजेच अरबी मुस्लिमांची) बाजु घेण्याची हिम्मत कोणी दाखवण्याची शक्यता नाही कारण त्यांनाही या संघर्षाचे आकलन आहे काय हा खरा प्रश्न आहे.
१४) भारतीय मुस्लिमांनी आणि हिंदुंनीही (वैदिक सोडून, कारण आता वैदिक बांधव मला काय उपदेश करायला येणार आहेत याची मला पुरती जाणीव आहे.) कसल्याही स्थितीत, अरब मुस्लिम राष्ट्रे असोत कि ख्रिस्ती राष्ट्रे, यांच्या जागतीक, ऐतिहासिक संघर्षातून, हिंसाचारातुन वेगळे अर्थ काढत आपापसात तेढ् माजवु नये. भारतीय मुस्लिमांनी आयसिस अथवा तालिबान किंवा कोणीही, या संग्फ़्ह्रषात सामील कोणतेही ख्रिस्ती राष्ट्र व त्यांच्या कारवाया करणा-या अमानवी संघटनांना किंवा सैन्यांना (सैन्य अनेकदा दहशतवाद्यांसारखे वापरले जाते) यदाकदाचितही सहानुभुती दाखवत आपापसात तेढ माजवायचे प्रयत्न करु नयेत.

9 comments:

  1. आपण आपल्या "दहशतवादाची रूपे" या पुस्तकात याच विषयावर अगदी खोलात जाउन चर्चा केलेली आहे. त्यात अजून काही माहिती मिळाली. :)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. प्रिय संजयजी,
    स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद, योगी अरविन्द से लेकर महात्मा गाँधी तक देश के ९९.९९% हिंदु आर्यो के बाहर से आने की बात का पुरजोर विरोध करते रहे हैं. राष्ट्रिय स्वयंसेवक संघ भी इस सिद्धांत का सतत विरोध करता रहा है. फिर यूरोप के गोरे लोगों से खुद को जोड़कर देखनेवाले हिंदु आपको इन दिनों मे कहाँ दिख जाते हैं? १९ वे सदी मे एकाध विचारक की सोच की गलत दिशा का आरोप क्या आज की पीढ़ी पर थोपना जायज है?
    मुस्लिमों से आपकी प्रार्थना क्या वास्तव मे कोई सुन रहा है? आज भी बर्मा के मुस्लिमों पर अत्याचार होनेपर भारत मे दंगे होते है. पश्चिम मे कोई किताब या कार्टून निकलने पर हमारे यहाँ सडकें रोकी जाती है? किंतु पाकिस्तान मे बच्चों की स्कूल पर हमला होने पर कोई बाहर नहीं आता.
    अमेरिका मे आप अमेरिका को लतिया कर बाहर आ सकते है. इसमें कोई बहादुरी नहीं है. क्या ईरान में जाकर खुमैनी को और रूस मे पुतिन को लतिया कर आप बचकर वापस आ सकते है? दुनिया को असली खतरा अमेरिका से नहीं, साम्यवाद से है. दुनिया को असली खतरा सभी मार्गो से सत्य की खोज का अधिकार देनेवाले धर्मो से नहीं, अपनी ही बात सही माननेवालों सम्प्रदायों से हैं.
    कभी उनकी भी तो चिकित्सा कीजिये.
    कुछ दिनों के लिए ही सही, अपने निशाने तो सुधारिये?

    दिनेश शर्मा

    ReplyDelete
    Replies
    1. दिनेश शर्माजी ,
      सादर प्रणाम,
      इधर आप्पा बाप्पा नामसे ऐसा कहा गया है कि महम्मद पैगंबर के बारेमें सलमान रश्दी साहाब ने जो सातानिक व्हर्सेस किताबमे चर्चा की है उसका संदर्भ लेके संजय जी क्यो कुछ चर्चा करते ?
      संजय सहाबको मुसलमान लोगोंका तुष्टीकरण करनेकी आदत तो नही है
      और एक माजेकी बात मी बताना चाहता हुं
      संजय साब कभीभी स्पेसिफिक सावालाका स्पेसिफिक जवाब नही देते
      अस्सल इतिहासकार या चिंतन करनेवाले ऐसा कभीभी नही करते
      आप जैसे उच्च विचार लिखनेवले लोग जब लिखते है कि रा स्व संघ , विवेकानंद , स्वामी अरविंद म गांधी जैसे लोग आर्य हिंदुस्तानाके बाहारसे इधर आए इस विचाराका विरोध करते है तबभी संजायाजीमे इतनी तमीज नाही ही कि दिल खोलकर उसका स्वागत करे , इसलिये उनकी विचारोन्को सराहानेवाले लोगोन्की अपरीपाक्वतापर बुरा असर होता जा रहा है
      संजायाजीके वृत्तीमे निरोगी आदान प्रदानकी कमी महसूस होती है
      दलित और मागास समाजाको येह एक शाप ही , जबतक एसेम जोशी साने गुरुजी जैसे सुशिक्षित (ब्राह्मण ) वर्गाके पास नेतृत्व था तबतक यह बात नाही ठी लेकिन जबसे संजय जैसे लोग चीन्तानाकी धुरा साम्भाले बैठे है तबसे यह विखार दिखाई देता है
      इनसे कैसे सच्चे चिन्तनकि अपेक्षा करे?

      Delete
    2. प्रिय बंधु,
      किसी के प्रतिउत्तर देने या नहीं देने से सत्य की सत्ता को कोई खतरा नहीं पहुँचता. सत्य की सत्ता अविरत और अविरल चलती ही रहती है.
      यह संजय सर की आजादी है कि उन्हें उत्तर देना है तो दे, जब देना है दें और ना देना है तो ना दें.
      दिनेश शर्मा

      Delete
  4. संजयजी तुम्ही कुठला ही धर्मग्रंथ उदा. ऋग्वेद वाचलेला असावा, असे वाटत नाही. केवळ आजची द्वेषपूर्ण महाराष्ट्राची राजनीती करण्यासाठी तुम्ही लिहितात, आणि जुना इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतात निदान मला तरी असे वाटते. पण सत्य कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी ते बदलणे अशक्य.

    ReplyDelete
  5. वैदिक आणि हिन्दू वेगले अहेत??

    नविनच माहिती मिलाली।

    लहानपणीपासून दोन्ही एकाच अर्थाचे आहेत असे मला वाटायचे।

    आपण मल जरा विस्तृतपणे सांगा म्हणजे माज्या माहितीमधे भर पडेल।

    नक्की उत्तर द्या

    आपला नियमित वाचक।

    ReplyDelete
  6. आप्पा - बराच विचार करत होतो त्यावेळेस जाणवते की संजयाच्या लिहिण्याचा रोख काय असतो ?तर वैदिक आणि बहुजन ,उद्देश काय असेल तो असो ,त्यातून समाजाची काय आज पर्यंत प्रगती झाली ? तर काहीही नाही ,
    बाप्पा - मग संजयाने काय करायला हवे ?तू म्हणशील त्याने मुसलमान समाजाचा पर्दा फाश केला पाहिजे कारण ते त्यांच्या अल्ला विषयी काहीच ऐकून घेत नाहीत , संजयने जर सलमान रुश्दी सारखे लिखाण मनापासून वाचून त्यावर काही भाष्य करायला पाहिजे
    आप्पा - खरच किती सुसंगत आणि पुराव्यासह लिखाण केले आहे त्याने सैतानिक व्हर्सेस चे किती गुप्त इतिहास त्याने जगासमोर मांडला आहे !त्याला मारण्यासाठी किती मोठ्ठी रक्कम लावली होती
    नाहीतर आपले वैदिक , संजयला माहित आहे की हा हातखंडा प्रयोग आहे , कुणीही यावे आणि टप्पल मारून जावे अशी या वैदिकांची अवस्था आहे , पण तसे नाही , आज परिस्थिती फार वेगळी आहे
    बाप्पा - खरी काळाची गरज आहे ती भारतातून सलमान रुश्दी सारख्यांनी बिनधास्त चर्चा घडवून आणाव्यात आणि महम्मद खरा कोण होता ते जगास सांगावे , संजयाने साधे सलमान रुश्दिचे कौतुकही करू नये हे पण आश्चर्यच ! का असे वागावे , वैदिक धर्मातल्या चुका काढायचा ठेका त्याने घेतला आहे , तो स्वतः वैदिक नसून , पण कुराणातल्या चुका आणि भ्रष्ट्पणा तो खपवून घेतो ?

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...