Wednesday, April 29, 2015

सांस्कृतीक वर्चस्वतावाद आणि आपण!



("Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मी केलेल्या भाषणाचा सारांश.)

प्रबोधनकाळाने जगाला अद्वितीय गोष्टी दिल्या. ज्ञान, विज्ञान व अभिव्यक्तीची क्षितीजे अमर्याद विस्तारली पण याच काळाला एक काळीकुट्त किनार आहे व ती म्हणजे आधेचा आर्य श्रेष्ठत्वता वाद आणि नंतरचा नव्या नांवाने आणला गेलेला पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-यंचा गट व त्यांची विस्थापने. युरोपियनांना सेमेटिक संस्कृती मुळे तोडायची होती. जर्मनांना जर्मनांच्य सांस्कृतीक एकीकरणासाठी "जर्मननेस" शोधायची गरज होती. उल्रीच हटनसारख्या विद्वानाने सोळाव्या शतकात रोमन चर्चला नाकारण्यासाठी "जर्मन मर्द तर रोमन बायकी" असे म्हणायला सुरुवात केली. अडाम-इव्हापासुन सारी मानवजात निर्माण झाली हे नाकारत प्रत्यक वंशाची स्वतंत्र उत्पत्ती असुन सेमेटिक व निग्रो हे कमास्सल आहेत हे मांडायला सुरुवात झाली. ज्यु द्वेषाची कारणे सेमिटिक द्वेषात आहेत.

डॆव्हीड ह्युमसारख्या अठराव्या शतकातील श्रेष्ठ तत्वज्ञाने गोरेतर सारेच हीण आहेत असे स्पष्ट प्रतिपादित केले. काहींची मजल तर काळे हे युरोपियन व एप्सच्या मिश्रणातुन निर्मण झालेले निर्बुद्ध आहेत अशी मांडणी करण्यापर्यंत मजल गाठली. यात सेमिटिक नाळ तोडण्याचे प्रयत्न सुरु होतेच. भारत हीच मुळभुमी मानण्याकडे या काळात कल होता. त्यासाठी व्होल्तेयरसारख्या तत्ववेत्त्याने तर भारतीय ब्रह्म आणि अब्राहमात साधर्म्य शोधले तर रेनान या फ्रेंच विद्वानाने येशु ख्रिस्त हा सेमिटिक नव्हे तर "आर्य" होता असे प्रतिपादित केले. थोडक्यात एनकेनप्रकारेन युरोपातील धर्म-संस्कृतीचे मुळ मुळात सेमिटिक नाही हे त्यांना सिद्ध करायचे होते व आर्य सिद्धांत त्यासाठी आणला गेला.

पण पुढे भारत ही मुळभुमी हे अमान्य करण्याची लाट आली. कारण ठरला आर्य संकल्पनेला सिद्धांताची जोड देणा-या म्यक्समुल्लर. त्याने कलकत्त्यातील रिक्षा ओढणरे आणि बंडातील शिपाई हे आर्य असुच शकत नाहीत असे म्हटले. युरोपियन विद्वानांनी लगेच आर्यांचे मुळस्थान युरेशियात शोधायची मोहिम सुरु केली. हिटलरनंतर आर्य हाच शब्द धोकेदायक वाटु लागल्याने आर्यभाषा गट किंवा पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारे, त्यांचे मुलस्थान आणि त्यांची विस्थापने याकडे मांडणीची दिशा वळाली. भारतात टिळकांसारख्या विद्वानांनीही आर्यांना उत्तर ध्रुवाच्या निकट शोधले. आर्य सिद्धांतामुळे भारतातही मोठी उलथापालथ झाली. उत्तरेतील आर्य व दक्षीणेतील द्रविड अशी सरळ विभागणी होत त्याचे सांस्कृतीक व राजकीय पडसाद उमटले. प्रसंगी हिंसा तर विभाजनवादाचा डोंबही उसळला. आजही त्याचे निराकरण झाले नाही. याच सिद्धांतातुन मुलनिवासीवादही जन्माला आला.

मुळात आर्य नावाचा वंश पृथ्वीवर कधीही अस्तित्वात नव्हता. इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत हा विसाव्या शतकातील सर्वात मोठा फ़्राड आहे. पण हे लक्षात न घेता भारतीय सांस्कृतीक/सामाजिक/राजकीय इतिहासाची मांडणीही त्याच आधारे झाली. थोडक्यात ती खोटी व दिशाभुल करणारी मांडणी झाली. आधी आक्रमक आर्य म्हणवत गौरवाने स्वत:कडे पाहणारे वैदिक लोक युरोपियनांच्या पुढे पाऊल टाकत वैदिक आर्य भारतातुनच पश्चिमेकडे गेले व जगात संस्कृती पसरवली असे सिद्धांत मांडु लागले. आधीचा धार्मिक श्रेष्ठत्ववाद होताच...त्याला युरोपियन सिद्धांतनाने त्यांना बळ दिले. बहुजनीय अवैदिक समाजघटकांना हीण लेखले जात होते, आता या सिद्धांतामुळे सांस्कृतिक अर्थाने श्रेष्टत्व माजवण्याचा हा प्रयत्न होता. थोडक्यात अन्यांचे काहीही सांस्कृतिक अस्त्तित्व नाही हेच या वैदिक धर्मियांना सांगायचे होते. घग्गर नदीचे सरस्वती नामकरण करत सिंधु-घग्गर संस्कृतीचे निर्माते वैदिकच असेही सांगितले जाऊ लागले. युरोपियनांचा वर्चस्वतावाद वैदिकांनीही त्यांच्याच पद्धतीने खोट्याचा आधार घेत जपला आहे. गेल्या वर्षीपर्यंत घग्गरला घग्गरच म्हणनारे पुरातत्व खाते आता आपल्या डिसेंबर १४ मधील अहवालात घग्गर नांव वगळत सरस्वती हे नांव देवु लागले आहेत. ही सांस्कृतीक अपहरणांची पुनरावृत्ती होते आहे.

मुळात वैदिक धर्म येथला नाही. तो येथे आला धर्मप्रचाराने. मुळ वेद रचनाकारांशी येथील वैदिकांचा कसलाही आनुवांशिकी संबंध नाही. ते धर्मांतरील लोक आहेत. घग्गर नदी ही पुरातत्वीय, भुशास्त्रीय आणि खुद्द ऋग्वेदातील वर्ण्णने व नंतरच्या मिथ्सच्या आधाराने सरस्वती नाही हे सिद्ध होत असले तरी त्यासाठी पुरावे वाकवण्याचे, तुडवण्याचे व खोटे सांगायची स्पर्धा सुरु आहे.

युरोपियनांचा वर्चस्वतावाद आजही संपलेला नाही. आजही आखाती राष्ट्रांत जे चालु आहे त्यामागे सेमिटिकविरोध हे मुळ आहे. भारतातील वैदिक मुस्लिमांचा द्वेष करतात यामागील कारणेही युरोपियनांच्या सेमिटिक द्वेषात शोधावी लागतील. वर्चस्वतावाद हा गैर आहे. कोणतीही संस्कृती व भाषा पृथक व पुर्ण स्वतंत्र नसते. आजच्या सरेव संस्कृत्या या पुरातन मानवी समाजांचे एकत्रीत सुकृत आहे जे प्रदेशनिहाय वैशिष्ट्यंसह अभिव्यक्त झालेले आहे. पाळेमुळे शोधावी वाटणे हा एक मानसिक भाग झाला पण खोट्या गोष्टींत पाळेमुळे सापडणार नाहीत. भारतात आज जेही काही सांस्कृतीक संघर्ष आहेत तिचे मुळे श्रेष्ठतावाद व वर्चस्वतावादात आहेत. एखाद्या समाजघटकात जाणीवपुर्वक   सांस्कृतीक वारसे नाकारत हीणगंड निर्माण करणे यासारखे नैतीक अध:पतन कोणतेही असु शकणार नाही. एकमय समाजाची स्वप्ने पुर्ण होऊ शकणार नाहीत. त्या एकमयतेच्या दिशेने कसे जायचे हे या वर्चस्वतावादी वैदिक भुमिकेच्या सहास्तित्वात अवघड दिसत आहे. तरीही आपण प्रयत्न् केले पाहिजेत!

माझे हे पुस्तक म्हणजे सिंधु-घग्गर संस्कृती, वैरिक व अवेस्तन धर्म, इंडो-युरोपियनंची विस्थापनांचे मिथक आणि एकुणातील जागतीक संस्कृत्यांचे मला सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांवर आधारीत वास्तव मांडते. हे अंतिम नाही याची मला जाणीव आहे. पण वर्चस्वतावादाविरुद्धचा लढा आजची प्राथमिकता आहे!

7 comments:

  1. अहंकारी वर्चस्व वृत्ति व द्वेषमुलक तुच्छता दृष्टी असणाऱ्या समुहाला त्यांचा कृत्याची फळे भोगाविच लागतात हा निसर्गनियम आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अहो जमदाडे साहेब ,
      कसली फळ भोगायची ? काय बोलताय ? त्या कार्यक्रमात मी तुम्हाला भेटलो ,तुम्ही म्हणजे अगदी इमानदार कुत्र्यासारखे आहात , उगीच छू म्हटलं कि सुटायचं !

      "अहंकारी वर्चस्व वृत्ति व द्वेषमुलक तुच्छता दृष्टी असणाऱ्या समुहाला त्यांचा कृत्याची फळे भोगाविच लागतात हा निसर्गनियम आहे" म्हणजे नेमके काय ?
      विषय काय आहे आणि तुम्ही काय बडबडत बसला आहात ? कसली अहंकारी वृत्ती आणि द्वेषमूलक तुच्छता ? वयाने तसे तुम्ही लहान आहात , निदान वृत्ती तरी प्रगल्भ दाखवत चला !
      एकदा माननीय श्रुती तांबे यांच्या फेसबुक वरच्याचर्चा वाचा , आणि मग काय वाटते ते तपासून बघा !
      एका जातीच्या ( ब्राह्मण ) द्वेषामुळे काहीही बोलत सुटणे तुम्हालाच बरे नाही .
      तुमचा नियम अगदीच रद्दड आहे
      इंग्रज काय किंवा ब्राह्मण काय , अत्यंत अभ्यासू आणि कल्पक वृत्तीचे असल्यामुळे स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रज चाकरीत राहूनही त्यांनी उत्तम पदे सांभाळली अनेक प्रकल्प राबवले
      ब्राह्मणांच्या तीक्ष्ण बुद्धीमुळेच इंग्रजांनी त्याना सरकारी सेवेत उच्च पदे दिली ब्राह्मणांनी पटापट सर्व नवी व्यवस्था आत्मसात केली , नवे कायदे अभ्यासले आणि ताज्या दमाने टिळक आगरकरांनी राष्ट्रीय शिक्षणाची सुरवात केली . राजवाडे सभागृहात सर्वत्र नजर फिरवली तरी जी तैलचित्रे लावली आहेत त्या वरूनही समजून येते कि अभ्यासू इतिहासकार कोण कोण आहेत ? तुम्हीच एकदा वाचा - नुसते शाहू महाराजांचे नाव घेऊन काहीही बरळत सुटायचे - त्याने तुमचेच नुकसान होणार आहे -
      आज पर्यंत इतके उपाय झाले , ब्राह्मण वर्गाला सरकारी नोकरीतून हुसकावून लावले - तरी त्यांचे काय बिघडले ?आज विलायतेत जास्त मागणी कोणाला आहे ?आज आय टी मध्ये कोणाला प्राधान्य आहे ?
      सर्वच ब्राह्मण वर्ग वेदाना चिकटून बसला आहे हा आपला भ्रम आहे - त्यातून आपला मूर्खपणा दिसून येतो - एक टक्केवारी जरी घेतली तरी असे लक्षात येईल कि ९९. ८० % टक्के ब्राह्मण समाजाला कोणतेही वैदिक ज्ञान किंवा पाठांतर नाही किंवा आवडही नाही , धार्मिक विधीमध्ये ओढ नाही , जवळ जवळ ७० टक्के ब्राह्मण वर्ग मांसाहार करतो आणि ६० % वर्ग मद्यपान करतो , सिनियर लोक सांगतात म्हणून देवाला नमस्कार करण्याची पद्धत आहे , त्यामुळे आपण वैदिक वैदिक म्हणून जो गजर करता ते तुमच्या सोयीसाठी आहे , मुळात कोणालाच त्याचे कौतुक नाही - उगीचच काहीतरी कालाच्या पडद्या आड गेलेल्या विषयांवर बडबड करणे हे संजय सोनावणी यांचे व्यसन आहे , इतकेच ! आणि फळे भोगावीच लागतील वगैरे विसरून जा ! कावळ्याच्या शापाने कधी गाय मारत नाही - आज ब्राह्मण वर्ग सर्वात पुढारलेला आहे , बुरसटलेले असतील तर ते इतर वर्ग आहेत !तरीही दाभोलकर आणि पानसरे यांच्या मृत्यूचे खापर ब्राह्मण वर्गावर ठेवले जाते हा एक भयानक प्रकार आहे !

      Delete
  2. आप्पा - आम्ही मुद्दाम कार्यक्रमाला आलो होतो
    बाप्पा - वेळ सांगितली सायंकाळी ५ . ३० आणि सर्व पिलावळ आली सव्वा सहाला
    आप्पा - बिचार्या राजवाडे यांच्या पुतल्यावरचि धूळही कोणी झटकली नाही , जमदाडे यांनी प्रास्ताविक केले तेही केविलवाणे
    बाप्पा - त्यानंतर स्वतः दस्तुरखुद्द लेखक उभे राहिले ते काय बरळत होते ते ऐकून तांबे गालातल्या गालात हसत होत्या ,त्यावरून समाजात होते की बरेच लोक इथे स्टेजवर मारून मुटकून आणले गेले आहेत आणि भिक नको पण कुत्रे आवर अशा भावनेने बसले आहेत त्यातच पहिले जमदाडे स्टेजवर बोलण्यासाठी एक पात ठेवला होता तिथून धडपडले असो
    आप्पा - तांबे बाईंचे भाषण अप्रतिम झाले त्यांनी नेमके मुद्दे स्पष्ट सुरेल आणि रसाळ मराठीतून उत्तम मांडले ,एखादे गद्य विवरण ,तेही पुरातन , किती रसाळ असू शकते , ते खरोखरच प्रत्यक्ष ऐकूनच समजले असते . त्यांनी नेमकेपणाने आपला विरोधही नोंदवला
    बाप्पा - नंतर हरी नरके बोलले ! एखादा वक्ता किती पाल्हाळ आणि विषयांतर करत भरकटत जातो त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हरी नरके !
    आप्पा - कार्यक्रम अगदीच कान्ताल्वाना झाला सभागृह भरले होते हे खरे , सुधीर बेडेकर मिश्किलपणे तोंडावर हात ठेवून हसत होते ,इतर मान्यवरांची तीच गात होती , हे आम्ही प्रत्यक्ष पाहिले !
    बाप्पा - संजय सोनावणी तर किती भरकटत जातात ते पाहिले की यांना इतिहासकार का म्हणतात तेच काळात नाही , या नेटक्या सभागृहात खरेतर अनेक कैलासवासी मान्यवर इतिहास तद्न्य लोकांच्या तस्वीरी लावल्या आहेत , त्यांच्यासमोर काय बडबड चालली होती ते अगदीच ओंगळ होते , त्यांच्यातील एकजण जरी असता तरी या सर्वाना फाडून खाल्ले असते !
    आप्पा - किती बिनडोक विधाने सोनावणी आणि नरके यांनी करावीत याला गणतीच नाही
    याच सभागृहात पूर्वी किती थोर सभा झाल्या आहेत .
    बाप्पा - अरेरे , संजय सोनावणी तुमची लाज वाटते - तेच तुणतुणे तुम्ही किती वर्षे वाजवणार ?
    आप्पा - आणि तुम्हाला लोक सर म्हणतात त्यावेळेस हसून हसून मुरकुंडी वळते - ते एक असुदे ,
    बाप्पा - तुम्ही स्वतःला इतिहास संशोधक कसे म्हणवता ते एकदा सांगाल का ? कै राजवाडे किती केविलवाणे दिसत होते !हिमालयाइतकि अशी थोर माणसे !उगीच टिळक आणि राजवाडे याना उडवून लावले म्हणजे माणूस मोठ्ठा होत नसतो !
    आप्पा - तुमचे मत तरी काय आहे ?आर्य याच मातीतले आहेत का नाही ?आर्य असे खरेतर काहीच नाही हेच जर सत्य असेल तर मग इतका दंगा कशासाठी ?
    बाप्पा - आत्ताचे सरकार पाणी अडवणार आणि घग्गर लाच सरस्वती म्हणणार , ती प्रक्रिया सुरु झाली आहे - हा विनोद तर फारच भारी वाटला - तुमची राजकीय वृत्ती उघडी पडली !

    ReplyDelete
  3. सर्व भाषणात श्रीमती श्रुती तांबे यांचे भाषण सुसंबद्ध झाले
    प्रा . हरी नरके तर इतके वहावत गेले की लोकांची चुळबुळ सुरु झाली मराठी भाषा अभिजात आहे का आणि इतर अनेक प्रश्न ज्यांचा काहीही प्रस्तुत विषयाशी संबंध नव्हता - असले विषय परत परत चघळले गेले - संजय सोनावणी याना तर वेडच लागले आहे - त्यांनी वैदिक आणि त्यांच्या संस्कृतीचे वर्चस्व याबद्दल इतके चऱ्हाट लावले की सर्वांचीच मस्त करमणूक झाली अनेक उपस्थित विद्वान आश्चर्याने एकमेकांकडे दृष्टीक्षेप टाकत होते सारांश म्हणजे संजय काय किंवा नरके काय , त्यांच्या विद्वत्तेला खूपच लिमिट आहे ,हे परत एकदा सिद्ध झाले
    हे सभागृह अतिशय प्रसिद्ध आहे , इथे अनेक चर्चा रंगल्या आहेत , पूर्वी जसे वसंत व्याख्यानमाला असे तसेच काहीतरी सुदृढ ऐकायला मिळेल असे वाटले होते , मी सरदेसाई सांकलिया अशा विद्वानांची भाषणे ऐकली आहेत पण, असली विद्वत्ता पाजळवलेली पाहून अगदीच भ्रमनिरास झाला .
    संजय सोनावणी यांचे विचार धान्दरटलेले असतात त्यात काहीच संशोधनाचा भाग नसतो थोड्याशा फिरत्या मांडणीने ते विषयाचा गाडा वैदिक परंपरा आणि इथले मूळनिवासी अशा टोकावर आणून ठेवतात
    मला एक समजत नाही , आर्य हे बाहेरचेही नाहीत , तो इंग्रजांचा त्यांच्या सोयीचा सिद्धांत आहे
    आर्य ही कल्पनाच निरर्थक आणि एका समाजाने (युरोपियन)आपले वर्चस्व टिकवण्यासाठी हा सिद्धांत पसरवला आहे - म्हणजेच इंग्रजांचे हे पिल्लू आहे , त्याच एका दमात सोनावणी लगेच पलटी मारून येथील ब्राह्मण लोकांनी आपल्याला बहुजन समाजाच्या वरचे जाहीर करत हाच सिद्धांत जपला असाही विचार मांडला आहे , थोडक्यात संस्कृत काय किंवा गोरा ब्राह्मण वर्ग काय , यांचे मूळ जर इथलेच असेल तर मग अडचण काय आहे , ते जर बाहेरचे नसतील तर मग तुमचा ओरडा कोणाविरुद्ध आहे ?
    हरी नरके तर म्हणाले "संस्कृत आणि त्या नंतरच्या प्राकृत भाषा - - - "ते ऐकून मी तर अक्षरशः चक्रावलो , कारण संजय सोनवणी नेमके उलट म्हणत असतात , - आधी प्राकृत आणि नंतर संस्कृत असे सोनावणी यांचे म्हणणे असते
    बोला संजय साहेब , तुमच्यातच एकवाक्यता नाही आणि कसली पुस्तके लिहिताय डोंबलाची ?, बाकी काहीही म्हणा ,
    माननीय श्रुती तांबे यांचे भाषण मात्र अतिशय श्रवणीय आणि मुद्देसूद होते ! त्यांचेच खरेतर अभिनंदन ! बाकी सर्वाना शून्य भोपळा !

    ReplyDelete
  4. अविनाश पाटसकर बुवा ,
    "गप्प बसा "
    सगळ्या जगात हे दोनच शब्द स्वातंत्र्याच्या मुळावर घाव घालणारे ठरत आले आहेत तुमचे वय किती आणि तुम्ही आणीबाणी ला सामोरे गेला होतात का ते माहित नाही , पण या शब्दांनी आणीबाणीत घाण केली .
    आज संजय सोनावणी यांनी हा सुंदर ब्लोग उपलब्ध करून दिला आहे आणि अनेकांनी विचार करून आपली मते मांडली आहेत
    मी स्वतः प्रकाशनाला उपस्थित होतो , कार्यक्रम उशिरा सुरु झाला हे मान्य ,
    पण नट नट्यांना बघायला लोक तासन्तास रस्त्यावर उभे राहतात , त्यामानाने पुण्यातील खोदलेले रस्ते आणि वाहतुकीची दुर्दशा या पार्श्वभूमीवर कार्यक्रम आखीव रेखीव झाला ,
    लोक उलट सुलट बोलणारच , तसे पाहिले तर श्रुती तांबे यांचे भाषण सर्वोत्कृष्ट झाले , कारण त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व , नंतर प्रा नरके सरांचेही भाषण उत्तम झाले ,
    मुळात माननीय भालचंद्र नेमाडे सुद्धा मराठीच्या अभिजात तेबद्दल जास्त ओढ दाखवत नाहीत तिथे नरके सर तरी काय करणार ,आजच त्यांनी सर्वसाधारण समाज याबाबत उदासीन आहे असे म्हटले आहे , हा त्यांचा आवडता आणि जिव्हाळयाचा विषय आहे आणि त्यावर त्यांनी भरपूर काम केले आहे , त्यामुळे ते प्रकाशन समारंभात ते त्यावर बोलले ,
    आपण मात्र कुणी जरा तिखट लिहिले तर सरसकट " गप्प बसा " म्हणणे हा आपला कजागपणा झाला असे वाटते , आपण पुनर्विचार करावा हि विनंती

    ReplyDelete
  5. अविनाश पाटसकर बुवा ,
    "गप्प बसा "
    सगळ्या जगात हे दोनच शब्द स्वातंत्र्याच्या मुळावर घाव घालणारे ठरत आले आहेत तुमचे वय किती आणि तुम्ही आणीबाणी ला सामोरे गेला होतात का ते माहित नाही , पण या शब्दांनी आणीबाणीत घाण केली .
    आज संजय सोनावणी यांनी हा सुंदर ब्लोग उपलब्ध करून दिला आहे आणि अनेकांनी विचार करून आपली मते मांडली आहेत
    मी स्वतः प्रकाशनाला उपस्थित होतो , कार्यक्रम उशिरा सुरु झाला हे मान्य ,
    पण नट नट्यांना बघायला लोक तासन्तास रस्त्यावर उभे राहतात , त्यामानाने पुण्यातील खोदलेले रस्ते आणि वाहतुकीची दुर्दशा या पार्श्वभूमीवर कार्यक्रम आखीव रेखीव झाला ,
    लोक उलट सुलट बोलणारच , तसे पाहिले तर श्रुती तांबे यांचे भाषण सर्वोत्कृष्ट झाले , कारण त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व , नंतर प्रा नरके सरांचेही भाषण उत्तम झाले ,
    मुळात माननीय भालचंद्र नेमाडे सुद्धा मराठीच्या अभिजात तेबद्दल जास्त ओढ दाखवत नाहीत तिथे नरके सर तरी काय करणार ,आजच त्यांनी सर्वसाधारण समाज याबाबत उदासीन आहे असे म्हटले आहे , हा त्यांचा आवडता आणि जिव्हाळयाचा विषय आहे आणि त्यावर त्यांनी भरपूर काम केले आहे , त्यामुळे ते प्रकाशन समारंभात ते त्यावर बोलले ,
    आपण मात्र कुणी जरा तिखट लिहिले तर सरसकट " गप्प बसा " म्हणणे हा आपला कजागपणा झाला असे वाटते , आपण पुनर्विचार करावा हि विनंती

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...