Thursday, July 16, 2015

तर मग हे कुंभमेळे कशासाठी?



भारतीय परंपरेत सामुहिक स्नानांनाही धार्मिक/सांस्कृतिक महत्व आहे हे आपल्याला सिंधू संस्कृतीत सापडलेल्या सार्वजनिक अवाढव्य स्नानगृहांवरुन दिसते. तेथे खाजगी घरांतील स्नानगृहे घराघरातही सापडलेली आहेत. घरात स्नानगृहे असतांनाही सार्वजनिक स्नानगृहेही असावीत याचा अर्थ त्यांचा संबंध धार्मिक कृत्यांशी असावा असे अनुमान करता येवू शकते.  सिंधुपुजनाचा उत्सवही त्या प्रदेशातील नदीबाबतच्या कृतज्ञतेशी जोडता येतो. ब्रह्मपुत्रेचीही अशीच पुजा करण्याची पद्धत आहे. नद्यांचा आणि मानवी संस्कृतीचा निकटचा संबंध असल्याने कृतज्ञतेपोटी नदीतील स्थान आणि तिची पुजा याला महत्व आले असल्यास नवल नाही.

कुंभ मेळाही नद्यांशीच संबंधीत असल्याने त्याचा येथे थोडक्यात विचार करुयात. कुंभ मेळा धार्मिक उत्सव असल्याचे जुने पुरावे मिळत नाहीत. रामायण-महाभारत या उत्सवाचा उल्लेख करत नाहीत. ह्यु-एन-त्संग याने सातव्या शतकात झालेल्या नाशिक येथील कुंभ मेळ्याचे वर्णन करुन ठेवले आहे. पुराणांतरी येणारी कुंभमेळा माहात्म्ये ही गुप्तकाळानंतरची आहेत. अमृतमंथनानंतर झालेल्या अमृतकुंभाच्या मालकीवरुन झालेल्या देवासूर युद्धात विष्णुने मोहिनीरुप घेऊन कुंभ पळवला तेंव्हा त्यातुन चार थेंब चार ठिकाणी नद्यांत पडले म्हणून त्या नद्या व स्थळे अतिपवित्र मानली जातात. त्या नद्या म्हणजे नाशिकची गोदावरी, प्रयाग येथील त्रिवेणी संगम, उज्जैनी येथील क्षिप्रा आणी हरिद्वार येथील गंगा. या प्रत्येक ठिकाणी कुंभमेळा दर तीन वर्षांनी क्रमाने भरतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणाची पाळी दर बारा वर्षांनी येते. यातही अर्धकुंभमेळा, महाकुंभमेळा व पुर्ण कुंभमेळा हे फरक आहेतच. महाकुंभमेळा दर १४४ वर्षांनंतर येतो तर दर बारा वर्षांनी येणारा पुर्ण कुंभमेळा फक्त प्रयाग येथेच भरतो.

कुंभमेळ्याचा संबंध ग्रह-सुर्य व राशींशी निगडित आहे. उदाहरणार्थ नाशिक येथील कुंभमेळा सुर्य आणि गुरु सिंह राशीत असतील तेंव्हा भरतो. ही खगोलीय घटना आहे व ती नियमित येते. पण मुळात भारतियांना राशी ग्रीकांकडून मिळाल्या असे मानले जात असल्याने कुंभ मेळ्याची सुरुवात भारतियांचा संबंध ग्रीकांशी आल्यानंतर झाली असण्याची शक्यता आहे. किंवा पुरातन नदीमाहात्म्याला ग्रह-राशींशी जोडत त्याची उदात्तता वाढवली गेली असल्याचीही शक्यता आहे. असे असले तरी कुंभमेळ्याची परंपरा फार पुरातन नाही.

कुंभमेळ्यात देशभरातुन नागा साधुंसह विविध पंथोपपंथांचे साधु-साध्व्या, योगी येत असल्याने याचे धार्मिक महत्व वाढले आहे हे सहज लक्षात येईल. अन्य कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात एवढ्या संख्येने साधु-साध्व्या येत नाहीत. त्यामुळेच कुंभमेळ्याला दर्शन पर्वणी असेही मानले जाते. हा कोणत्या धर्म परंपरेचा भाग असे शोधले तर पदरी निराशाच येते. कुंभमेळ्याची सुरुवात वैष्णव परंपरेतुन सुरु झाली असावी असे अमृतमंथनाच्ग्या पुराकथेतुन दिसत असले तरी कुंभमेळ्यात शैव व वैष्नव आखाडेही बरोबरीने सहभाग घेतात असे दिसते. यात शैव आखाड्यांची संख्या अधिक आहे. नाशिकबाबत म्हणायचे झाले तर शैव आखाडे त्र्यंबकेश्वर येथे तर वैष्णव आखाडे रामकुंडाला महत्व देतात व स्वतंत्र धार्मिक परंपरांचे भान दाखवुन देतात. एका अर्थाने हा उत्सव धार्मिक नसून सांस्कृतिक आहे हे उघड आहे. असो.

पण नाशिक येथेच २००३ मद्ध्ये झालेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ लोक ठार झाले होते हा मागचाच अनुभव आहे. मेळ्यात सरासरी आठ ते दहा कोटी लोक हजेरी लावतात असे अंदाज आहेत. जगातील हा असा एकमेव उत्सव आहे असेही मानले जाते. येथे कोणत्याही मुर्तीचे दर्शन हे धेय नसून साधुंचे दर्शन व नदीत स्नान हेच उपचार आहेत व पंथोपपंथांच्या पद्धतीने ते होतात. धार्मिक आखाड्यांतील मानपान हा मुद्दा कुंभमेळ्यांतही शिरलेला आहेच. आजच एका साध्वीचे लैंगिक शोषण एका साधुने केल्याच्या बातम्या आहेत. सरकारने या उत्सवाला हजारो कोटींची मदत केल्याने सरकारही बुद्धीवाद्यांच्या टीकेचे शिकार झालेले आहे. त्याहीपेक्षा वाईट बाब म्हणजे कुंभमेळा हा मुळच्या नदीपावित्र्याच्या कल्पनेपासून पार भरकटला आहे.

भारतियांनाना नद्यांचे, जलाशयांचे पावित्र्र्य खरेच होते. अन्यथा असे पुजनोत्सव/स्नानोत्सव सुरु झाले नसते. परंतू आम्हीच जलाशये/नद्या यांचे केवळ विनयभंगच नव्हे तर त्यांच्यावर एवढे पाशवी बलात्कार केले आहेत कि ते शरमुन, भयभीत होऊन संकोचले आहेत. साधुंचे म्हणावे तर त्यांच्यातिल मुळच्या आध्यात्मिक प्रेरणा नुसत्या आटलेल्याच दिसून येत नाहीत तर त्यातील अनेक पळपुटे अथवा समाजातुनच हाकलले गेलेले गांजेकस असल्याचे आपल्याला दिसून येईल. नागा साधुंबद्दल बोलावे तर ज्यांनी संसाराशी नातेच तोडले आहे अशांना अमुकच नदी पवित्र बाकीच्या नाहीत असे वाटावे यातच त्यांचा तात्विक फोलपणा दिसुन येतो. आखाड्यांचे म्हणावे तर ते एवढे मुजोर आणि राजकारणातही हस्तक्षेप करणारे आहेत कि खंदे राजकारणीही त्यांना शरण जातात. यापासून कोणत्याही पक्षाचा नेता अपवाद नाही हेही एक विशेष. शंकराचार्यांच्या निवडीतही आखाड्यांचा मुजोर अधिकार गाजवला जातो. त्यांची गुंडगिरीही सर्वशृत असली तरी एक उदाहरण देतो. १९९८ साली कुंभमेळ्यात जुना आखाडा आणि निरंजनी आखाड्याने दंगल केली आणि ज्योतिर्मठाचे शंकराचार्य पदाचे दावेदार मध्वाश्रमांना मारहाणही केली होती. कारण सरळ होते, मध्वाश्रमांना शंकराच्गार्य पद मिळु नये. अशी अनेक उदाहरणे आहेत. कुंभमेळा म्हणजे आपला स्वामित्वहक्क आहे असे या आखाड्यांना वाटते.

त्यामुळे मुळात धार्मिक संदर्भ नसलेल्या कुंभमेळ्याला धार्मिक संदर्भ दिले गेले आहेत. खरे तर हा लोकसंस्कृतीचा उत्सव. त्याला पुराणकथा जोडल्या गेल्या असल्या व जनसामान्यांना जितेंद्रिय साधु-महात्म्यांचेही दर्शन या निमित्ताने व्हावे हा निर्मळ उद्देश्य असला तरी जेथे साधुत्वच संपलेले आहे आणि नद्यांचे पावित्र्यही हरपवले गेले आहे ....

तर मग हे कुंभमेळे कशासाठी?

का शासनाने त्यासाठी हजारो कोटी खर्च करावेत?

आणि महत्वाचे म्हणजे....का लोकांनी तरी आपली खोटी दांभिकता दाखवण्यासाठी तिकडे फिरकावे?

संस्कृती सांगते कि नद्या आणि जलाशय जपा. त्यांचे पावित्र्य राखा. त्यात घाण करु नका. धर्मही तेथेच आहे.

पण या अधार्मिकांना धर्म कोणी सांगायचा?

26 comments:

  1. नासिकचे सुप्रसिद्ध ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांची "सिंहस्थ पर्वणी" (कुंभमेळा) वरती मार्मिक भाष्य करणारी हीच ती वास्तववादी कविता ............

    सिंहस्थ
    व्यर्थ गेला तुका ,व्यर्थ ज्ञानेश्वर
    संतांचे पुकार, वांझ झाले
    रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
    दंभ शिगोशीग, तुडुंबला
    बँड वाजविती, सैंयामिया धून
    गजांचे आसन, महंतासी
    आले खड्ग हाती, नाचती गोसावी
    वाट या पुसावी, अध्यात्माची
    कोणी एक उभा, एका पायावरी
    कोणास पथारी, कंटकांची
    असे जपीतपी, प्रेक्षकांची आस
    रुपयांची रास, पडे पुढे
    जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ
    त्यात हो तुंबळ, भाविकांची
    क्रमांकात होता, गफलत काही
    जुंपते लढाई, गोसव्यांची
    साधू नाहतात, साधू जेवतात
    साधू विष्ठतात, रस्त्यावरी
    येथे येती ट्रक, तूप साखरेचे
    टँकर दुधाचे, रिक्त तेथे
    यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची
    चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी
    येथे शंभराला, लाभतो प्रवेश
    तेथे लक्षाधिश, फक्त जातो

    अशी झाली सारी, कौतुकाची मात
    गांजाची आयात, टनावारी

    तुका म्हणे ऐसे, मायेचे माइंद
    त्यापाशी गोविंद, नाही नाही.
    ......................................................

    ReplyDelete
  2. कुंभमेळा म्हणजे नेमके काय?

    भारतातील सर्वात मोठा आणि अतिशय प्रेक्षणीय असा सोहळा म्हणजे कुंभमेळा. भारतात प्रयाग, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे दर १२ वर्षांनी हा मेळा भरत असतो. नाशिकच्या सिंहस्थ मेळ्याला आजपासून दिमाखात सुरुवात झाली आहे. या मेळ्यावर होणारा खर्च, त्याठिकाणी येणाऱे साधू-संत सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र, कुंभ मेळा म्हणजे नेमके काय हे जाणून घेवूयात...

    कुंभ मेळ्यामागची कथा :
    यामागची पुराणकथा अशी आहे की, समुद्र मंथनातून आलेले अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले होते. हे युद्ध सलग १२ दिवस चालले. या युद्धादरम्यान हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो. त्यामुळे दर १२ वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. दर तीन वर्षांनी एका स्थानावर कुंभमेळा भरविला जातो.

    नाशिकचा कुंभ मेळा "सिंहस्थ" का?
    चार मेळ्यांपैकी नाशिकमध्ये भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण तो सिंह राशीत येतो. सिंहस्थात सर्व महानद्या, तीर्थे, देव, ऋषी, समुद्र गौतमीकाठी वास करतात, असे म्हटले जाते. तर कृतयुगाची दोन लक्ष वर्षे संपल्यावर सिंह राशीत गुरू ग्रह असताना गौतमी गंगा भूतलावर प्रकटल्याने या काळाला 'सिंहस्थ' पर्व म्हटले गेले. हा सिंहस्थकाल १३ महिने असतो. म्हणून नाशिकमध्ये कुंभमेळ्याला सिंहस्थ म्हटले जाते. कुंभ मेळयाचा उत्सव सूर्य आणि गुरुच्या स्थितीवर निर्भर असते. जेव्हा सूर्य मेष राशित आणि गुरु कुंभ राशित येतात, तेव्हा कुंभ हरिद्वारमध्ये करतात. जेव्हा गुरु वृषभ राशित आणि सूर्य मकर राशित येतात, तेव्हा कुंभ प्रयागमध्ये करतत. जेव्हा गुरु राशित आणि सूर्य वृश्चिक राशित येतात तेव्हा कुंभ उज्जैनमध्ये करतात.

    कुंभमेळ्यात नेमके काय घडते ?
    कुंभ मेळ्याला कोट्यावधी भाविक हजेरी लावतात. विद्‌वान, सन्यासी, विविध पिठांचे शंकराचार्य, १३ आखाड्यांचे साधू, संत, महात्मा आणि महामंडालेश्वर यांची उपस्थिती असते. हे सर्व एकत्र येउन विविध संस्कार आणि अनुष्ठान करतात. अनेक धार्मिक-विधी केले जातात. त्यासाठी दहा हजाराहून अधिक मंडप याठिकाणी घातले जातात. सत्संग, निरुपण याठिकाणी होते. समाजासाठी नाविन्यपूर्ण कल्पना, संकल्पनांची देवाणघेवाण होते. जेथे कुंभ मेळा होतो तेथे नदीत स्नान केल्याने पाप धुतले जाते, अशी धारणा आहे. साधु, संत आणि तीर्थयात्री विशिष्ट तिथी, विशिष्ट वेळेत पवित्र नदी गोदावरीत स्नान करतात.

    शाहीस्नानाचे वैशिष्ट्य
    कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी विविध आखाड्यातील साधूसंतांनी ठरवून दिलेल्या क्रमाने स्वतःच्या आखाड्यातील साधूसंत व शिष्य यांच्यासह स्नान करतात. याला शाही स्नान असे म्हटले जाते. पहाटे चारच्या सुमारास स्नानाला सुरुवात होते. स्नानाला जाण्यापूर्वी साधू-संतांची हत्ती, उंट, घोडे अश्या थाटात वाद्यांच्या तालावर शस्त्रांसह मिरवणूक निघते. त्यात अंगाला भस्म लावून सहभागी झालेले नग्न अवस्थेतील नागा साधू अमानवी आकृत्यांप्रमाणे भासतात. हा नजारा अविस्मरणीय असतो.

    मोहमाया पलिकडचे जग
    कुंभमेळ्यात हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणा करणारे सिध्दपुरुष, काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास करणारे सन्यासी, शस्त्रधारी आखाड्यातील संतमहंत यांचे दर्शन होते. या मेळाव्यात सहभागी होणारे नागा साधू अथवा महंत नेमके कोठून मेळ्याला येतात आणि मेळा झाल्यावर पुन्हा कुठे जातात हे एक कोडेच आहे.

    ReplyDelete
  3. आप्पा - अरे बाप्पा , कुठे निघालास आषाढस्य प्रथम दिवसे ?
    बाप्पा - अरे हा नीज आषाढ . अधिकस्य अधिकम फलं झाले . ते मेघदूतही हल्ली मागे पडले आणि कालीदासही !
    आप्पा - आता सगळेच बदलू लागले आहे . पूर्वी सगळी गाणी तबल्याच्या साथीवर असत , आता हल्लीच्या गाण्यात तबलाच नसतो . साध्या भावनाही तार स्वरात बेंबीच्या देठापासून ओरडत सांगत असतात . दुःख असो वा आनंद - तोच आरडा ओरडा !
    बाप्पा - अगदी खरे आहे . !
    आप्पा - अरे गोदावरीत पहिली डुबकी मारायची त्या चंद्राबाबुला किती हौस , सगळा समाज उधळला चौखूर - किती जखमी आणि किती बुडाले - बापरे !
    बाप्पा - या कुंभ मेल्याला इतिहास नाही म्हणतो संजय ! तसे पाहिले तर महाभारतात नोंद नाही . आप्पा - मग पेशवाईत आणि शिवकालात वारकरी लोकाना सरकारी मदत मिळत असेल नसेल ?तसे पुरावे नसतील तर ? वारी निघतच नव्हती असे म्हणायचे का ?आणि एकदम सिंधू नदी आणि मोहन्जोदारो ला कशाला जायचे ? त्या ऐवजी त्या आखाड्यांचा इतिहास लिहिला असता , आणि नागा आखाड्यांचा आणि १८५७ चा इतिहास लिहिला असता तर ?
    आप्पा - ग्रीकांकडून म्हणे आपण ज्योतिष शास्त्र घेतले ?महाभारताच्या सुरवातीला कोणती ग्रह परिस्थिती होती त्याचे वर्णन आहे , ते काय सांगते ?
    बाप्पा - आपण रोमन लोकांकडून पब्लिक बाथ घेतल्या असे जर कोणी म्हणाले आणि मोहन्जोदारो ला अलीकडे आणले तर ? मुळात मला तर ही परकीय व्यापारी वसाहत वाटते . . त्याना हवी तशी बनवून घेतली . इंग्रजाना जसे सुरत तसे ग्रीकाना मोहन्जोदारो असे असू शकते ?
    आप्पा - खरे रे खरे . पटतंय बघ ! कित्ती कित्ती हुशार आहेस रे तू ! सारे आयुष्य तार खात्यात कडकट्ट कडकट्ट करण्यात घालवलेस , तिकडे हडाप्पाला गेला असतास तर सोने झाले असते रेआयुष्याचे !आता तरी लिही , संजय नाही का लिहित . रामायण हे महाभारताच्या नंतर झाले - मग आपणही लिहायला काय हरकत आहे ?पारशी हे गाई गुरे खाणारे होते , यज्ञ म्हणजे मांस भाजून खाणे आहे , नाही का ?
    बाप्पा - चाल निघतो , पावसाचा पत्ता नाही , मी आपला छत्री घेऊन हिंडतोय ,
    आप्पा - परवा एक शेतकरी भेटला छत्री घेऊन , मी विचारले , कुठे निघालास , तर म्हणाला ,
    आत्महत्या करायला . मी म्हणालो , मग हि चात्री कशाला ? तर म्हणाला एङ्गिओ कडून फुकट मिळाली आहे - कमाल आहे ना ?
    बाप्पा - काय रे पाटसकर साहेब दिसले नाहीत बरेच दिवसात ? वारीला गेले वाटते ? का कुंभ मेळ्याला ?

    ReplyDelete
  4. हजारो कोटी खर्च करून कुंभमेळा साजरा करणे म्हणजे एक कलंक आणि विकृती आहे!

    आज महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळ आहे आज शेतकरी हैराण झाला आहे आणि सरकार ब्राम्हणाच्या साठी कुंभमेळा आयोजित करण्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च करत आहे ....
    ज्या नाशिक जिल्ह्यात कुंभमेळा भरतो तिथे सध्या दुष्काळी स्तीती आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एक रुपया न खर्च करता ...
    जे लोक वर्षोनुवर्षे अंघोळ करत नाहीत कपडे घालत नाहीत नेहमी गांज्याची नशा करत असतात .....त्या हरमखोरांच्या अंघोळी साठी ३ हजार कोटी ख र्च केले जाणार आहेत ...१९९९ मध्ये कुंभमेळा मध्ये रामकुंडातील पाण्याचे परीक्षण केले त्या पाण्यात ६४ % टक्के मल आणि मूत्र आढळले होते जे लोक पाण्यात एवढी घाण करतात त्यांच्या साठी हजारो कोटी .......
    अरे हे काय आहे ????
    महाराष्ट्रात दुष्काळ आहे तर त्याला शासन सर्व शेतकऱ्यांच्या साठी ६०० कोटी रुपये देते प्रत्येकी शेतकऱ्यांना १०० रुपये पण येणार नाहीत आणि काही साधू भोंदू लोकांच्या साठी ३००० कोटी हा कुठला न्याय आहे .....
    देशात आज हि सर्व पक्ष हि मनुवादी चालवतात त्यांना शेतकरी मेला काय आणि दुष्काळ पडला काय फक्त यांना साधू लोकांना गांजा चरस अफू आणि रात्री साठीची सोय करायची त्यानंतर सारा देश जळून गेला तरी फरक पडत नाही .......

    मी कुंभमेळ्यात करण्यात येणाऱ्या हजारो कोटीच्या खर्चाचा निषेध करतो आहे जेथे हजारो शेतकरी आत्महत्या करतात तिथे हजारो कोटी खर्च करून कुंभमेळा साजरा करणे म्हणजे एक कलंक आणि विकृती आहे.

    सौजन्य : भारत मुक्ती मोर्चा

    ReplyDelete
  5. "लिहा वाचा" ह्यांनी फारच उद्बोधक माहिती दिली त्याबद्दल त्यांचे फार फार आभार, त्यांना गणितात फारसे कळत नसावे असे वाटते आहे, किमान २५० किमी गोदावरी वाहत नाशिकला येते, तिथपर्यंत जी पिल्लावळ पाण्यात वर्षाचे १२ महिने आणि अशी १२ वर्षे हगते मुतते त्यांचे मलमुत्र ६४ टक्क्यातील किती आणि साधूंचे किती हे तुमच्या डोळ्याला दिसत नाही हे वैज्ञानिक किवा तुमच्या डोळ्याचा, किवा तुमच्या वाकड्या बुद्धीचा दोष आहे. मी तुमच्या कॉपी पेस्ट केलेल्या प्रतिक्रियांना फारसे महत्व देत नाही. मी आधीच सांगितले आहे कि पाश्चात्य शास्त्राचे आणि शोधांचे अंधानुकरण करून आपल्या देशाची वाट लागली आहे ते तुम्ही वाचायची तसदी घेतली नसावी, कारण तुम्ही नुसते १२ वेबसाईट फिरता आणि इकडचे तिकडे कॉपी पेस्ट करता.. पगारी कामगार आहात तुम्ही... चालूद्यात तुमचे, कमीत कमी तुमचे पोट तरी भरते ना.. भारत मुक्ती मोर्चा याचा अर्थ काय आहे हे तरी तुम्हाला कळते का? जास्त डोक्याला त्रास देत नाही.. तुम्ही आपले पोट भरत राहा, मात्र हगायला गोदावरी, कृष्णा, नर्मदा तीरी अजिबात जाऊ नका.. नाहीतर मग त्या भारत मुक्ती मोर्चा चे काय होणार??

    ReplyDelete
  6. Mr. Pataskar is unable to accept the truth, reality!

    ReplyDelete
  7. कुंभमेळा?

    हा तर शुंभ मेळा

    ReplyDelete
  8. गोदावरीचा उगम आणि नाशिक साधारणपणे ३० किलोमिटरच्या आत आहे , ते तुम्हाला पटत नाही असे दिसते . आपण सविस्तर सांगता का प्लीज ते अंतर २५० किलोमीटर कसे ? आम्हाला समजून घ्यायला आनंद वाटेल पाटसकर बुवा !

    ReplyDelete
    Replies
    1. १) नदीच्या उगम स्थानाबद्दल कोणीही काहीही सांगत असते, मग काही (आत्ताचे) पुरोगामी त्याला सिंधूस्नान हे कृतज्ञता म्हणतात आणि तिकडे पंचगंगा इकडे उगवून तिकडे वाहते.
      २) खालीफांनी हिंदुदेश लुटण्यासाठी वरून सुरुवात केली, सोमनाथ १७ वेळा लुटले, काशी किमान ४-६ वेळा लुटले, त्याचवेळी ब्रिटिशांनी देश लुटण्यासाठी खालून सुरुवात केली, कारण त्यांचे प्रबळ आरमार, त्यांना दिल्लीशी काही देणेघेणे नव्हते, त्यांनी आधी मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि तिरुवरम पुरम हातात घेतले, तिथून रेल्वेचे रूळ टाकून लोखंड, सुवर्ण, आण्विक मुलद्रव्ये ह्यांची लुट ब्रिटीश करत होते (कारण जपानवर हल्ला झाला त्यावेळी आपण आपले रुग्वैदिक विरुद्ध शुद्र असेच शोध लावायला सुरुवात झाली होती.. हो कि नाही??).
      ३) असे लोहमार्ग, महामार्ग त्यांनी जोडले ते शिवाजींच्या गनिमी काव्याच्या पूर्ण विरोधी होते. जो प्रदेश लुटायला आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला कारणे दुर्गम दुर्ग, जंगले... आणि आज आपण त्याच टेकड्या आपल्या *** खालची खुर्ची हलू नये म्हणून ( ह्यात सरकारी नोकर, त्यांना लाच देणारे गुंठमंत्री, आपल्यासारखे मध्यममार्गी सगळेच समाविष्ट आहेत) त्यांनीच देश लुटायची पूर्ण मुभा ब्रिटिशांना दिली. त्यातील कावे लोकांना फक्त धार्मिक दृष्टीकोनातून कळले (१८५७ चे बंड) पण देशाची
      ४) पण देशाच्या रक्तवाहीण्यातून (मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि तिरुवरम पुरम) मधून देशाची लुट करण्यासाठी ह्या शहरांना लोहमार्गाने जोडले, ते गेल्या ६० वर्षात काय बदलले आहे.. लुटणारे वेगळे?? म्हणून शहरे वेगळी?? मग तुम्ही इथे बसून काय करता? नद्यांची लांबी मोजता? नाशिकची लोकसंख्या किती आहे? त्यात साधू किती? गुजराती किती? ते सगळे द्या मला मग २५० किमीचा हिशेब देतो.

      Delete
    2. शिवाय इथे संजय सोनावानींनी सांगितल्याशिवाय आम्ही गोदावरीच्या उगमापासून नाशिक पर्यंतचे अंतर २५ किमी आहे हे का कबूल करावे?? त्यांना कुंभ स्नानाचा इतिहास ४०० वर्षापूर्वी आढळला नाही म्हणून मलाही ते मान्य नाही. नाशिकची लोकसंख्या किती आहे त्यांची सगळी घाण कुठे जाते?.. तिथे दरदिवसा नदीत प्रदूषण करणारे कारखाने किती आहेत.. भले जुने लोक अगदी बावळट होते पण नवीन काय घ्यायचे याचा उहापोह तरी करीत होते.. पण आपले पुरोगामी जे काही वरून (युरोपातून) तोंडात पडते ते झेलायची स्पर्धाच करताना दिसतात.. दुसर्याबरोबर तुलना करायला आधी आपले काय आहे ते कळणे आवश्यक असते, आम्हाला वारी-भंकस, कुंभ स्नान गलिच्छ, देश भिकारी हाच दृष्टीकोन असेल तर जा फिरा जगात.. तिथे शेरास सव्वाशेर आहेतच. शिवाय पोट आणि त्याखाली ६ इंचावर असलेल्या अवयावासाठी किती काथ्याकुट करावा लागतो ते बघा.. दिवसभर मर मर करून जे पैसे कमावता ते २ तासासाठी पुरत नाहीत.. होय कि नाही मित्रांनो? अरे कोणीतरी तिकडचा आहे का रे?? हे नुसते वारकऱ्यांवर आणि साधूंवर लाथा झाडतात.. त्यांना कोणीतरी तिकडचे सांगा की.. किती मस्त असते ते..

      Delete
    3. "नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ" विचारले जात नाही अशी बोलीभाषेतील म्हण आहे, मी ऐकली आहे कदाचित तुम्ही ऐकली नसेल. असो मला नदीचे अंतर माहित नाही हेही सांगतो, माझे मत हे सर्व नद्यांबद्दल प्रातिनिधिक मत आहे. पण माझ्या मतांची सत्यता लपवायचा कितीही प्रयत्न केला तरी ती लपत नाही

      Delete
  9. वारीबद्दल जे लिहिले तेच इथे या लेखात लिहिले आहे म्हणून दोन्हींच्या प्रतिक्रिया एकत्रच देऊन टाकतो.
    १) वारीचा इतिहास आणि ती ज्ञानेश्वरांसाठीच का? ( ज्ञानदेवे रचिला पाया तुका... आधी पाया रचल्याशिवाय कळस होऊच शकत नाही.- इथे फक्त सुरुवात कोणी केली हे सांगायचा उद्देश आहे, मला तुकाराम आणि ज्ञानदेव ह्यांचा नितांत आदर आहे त्यामुळे चुकीचा अर्थ काढू नये.) ज्ञानेश्वरांचा इतिहास सर्वांना माहित आहे, त्यांच्या आई वडिलांनी संन्यास स्वीकारून परत संसारात प्रवेश केला म्हणून त्यांना अखिल रुग्वैदिक सनातनी समाजाने वाळीत टाकले, त्यावर विद्रोह करून ज्ञानेश्वराने " भावार्थ दीपिका" तथा ज्ञानेश्वरी लिहिली. त्यानंतर मुद्दाम दरवर्षी संसारातून सन्यास घेण्याची मुभा बहुजन समाजाने "वारीच्या" रूपाने सुरु केली. हा तथाकथित सनातनी समाजाला मोठा सुरुंग त्या वारकर्यांनी लावला . हा इतिहास अप्पा बाप्पा ह्यांच्या खापर पणजीला सुद्धा माहित असेल, ५०० रु चा माल घेतला कि पूर्वजांचे दर्शन होते असे ऐकले होते??. इथे पुरोगामित्वाचा आव आणून जे लोक वारीला नावे ठेवतात ते किती कृतघ्न पणे स्वतःचा इतिहास विसरत असतील हेच दिसते. ह्यांना सिंधुस्नान हे कृतज्ञतेचे प्रतिक वाटते, पण कुम्भस्नान हे गलिच्छ, वा !! इथे त्यांना इतिहास सापडत नाही. कारण त्यावर कोणी गोर्या पश्चात्याने शिक्का मारला नाही. किवा शोध घ्यायला वेळ मिळाला नाही. असो.
    २) जे शेतकरी आणि माऊल्या आपल्या शेतात राबून राबून करपलेले आणि वाळलेले पाय नऊवारी साडी, (नऊवारी-फक्त नावाला कारण जे त्यातून जे दिसते ते करपलेले पाय) डोक्यावर १०-२० किलोचे तुळशी वृंदावन घेऊन घोळक्याने ट्राफिक अडवून शिवाय गावोगावी घाण करतात हो कि नाही अप्पा?? त्यापेक्षा युरोपला, दुबईला जा.. तिकडे दिवसा नाही पण रात्री मस्त फुगून तट्ट झालेल्या कोंबड्या आणि त्यांची तंगडी चाखायला मिळते.. म्हणूनच बहुतेक पुरोगामि लोकांना वारकर्यांचा फार राग असावा. हा जो वर्ग वारीबद्दल प्रतिक्रिया देत असतो त्यांच्या मनात किती घाण लपली आहे ते स्पष्ट दिसते, त्यांना इतिहासाशी काही देणेघेणे नाही..त्यांना संस्कृतीशी काही देणेघेणे नाही. हे फक्त पोटार्थी आणि चोटार्थी लोक ह्यांची ही झुंडशाही आहे. आणि सगळे एकजात नाव लपवून प्रतिक्रिया लिहितात. एकाचीही हीम्मत नाही कि एखाद्या नागा साधुसारखे नागडे होऊन समोर यायची. कारण हे घाबरतात, उगाच आपले ###@@%% झाले तर काय करता?? तत्वज्ञान कागदावर सोपे असते. चड्डी निघाली कि नागा साधू का असे १२ वर्षे आपले सगळे गुंडाळून राहू शकतात तेच कळेल.

    ReplyDelete
  10. अहो पाटसकर, तुमचे डोके ठिकाणावर आहे काय? काय ही भाषा? जरा जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा! भलतेच काहीतरी बरळत बसतो!

    ReplyDelete
    Replies
    1. इथे भारतीय वारी संस्कृती, कुंभ स्नान संस्कृती विरुद्ध पुरोगामी युरोपियन संस्कृती ह्यांची तुलना केली तर तुम्हाला का इतकी मिरची झोंबली? वारीला येणारे ९०% लोक शेतकरी आहेत. मर-मर कष्ट करण्यावर त्यांचा विश्वास आहे, त्याच्नाबद्दल तुम्ही जी हिणकस विधाने लिहिता ते चालते का? दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करतात म्हणून खोटा गळा काढणारे तुम्ही झुंडशाहीचे फक्त नेटवर बोलणारे चोर आहात.

      Delete
    2. पाटसकर चोराच्या उलट्या बोंबा! असत्य कथनात याचा कोणीही हात धरू शकणार नाही. हा माणूस चक्क खोटे लिहितो आणि "माझीच लाल" या अविर्भावात मिरविती! याला कोणीतरी वेळीच आवरा नाहीतर हा माणूस संघीय अजेंडा रेटण्याच्या नादात खऱ्या इतिहासाचे मातेरे केल्या वाचून राहणार नाही!

      Delete
    3. वा फारच उत्तम। संघ हाच हिन्दू धर्म आहे व त्याचे जीवित रूप आहे बकीचे सगळे मुर्दाड झाले आहे। तुम्ही 9थे किती खरडता पैन उपयोग शुन्य आहे। खरदत रहा

      Delete
    4. अरेरे, किती बेशरम आहे हा पाटसकर ! थोडी सुद्धा लाज नसावी काय ह्या माणसाला!

      Delete
  11. आप्पा - अगदी मनातले बोललात लिहा वाचा . शतशः आभारी आहोत . या अविनाश पातास्काराने जाम वैताग आणला होता . आपण धाडस करून त्याला दरडावले ते बरे केले .
    बाप्पा - त्यांच्या लिहिण्याचा उद्देश काय असतो तेच समजत नाही . बहुधा त्याना म्हातार्चाल लागला असावा . कारण ते त्रिंबकेश्वर अंतर २५० किलोमीटर म्हणतात .
    आप्पा - सूत्रबद्धता तर कुठेच नसते . चर्चा काय चालली आहे तेव्हडे सोडून यांची गाडी भलतीकडेच जात रहाते .

    ReplyDelete
  12. लिहा वाचा यांचे अभिनंदन . कारण श्री पाटसकर हे बुद्धिभ्रम झाल्यानंतर माणूस बरळतो तसे दिशाहीन लिहित असतात . आप्पा बाप्पा त्यांची चेष्टा करत असतात हे पण त्याना समाजात नाही . खरेतर आप्पा बाप्पा यांनी असे करू नये , बिचारा म्हातारा माणूस असेल , काही कारणामुळे एकटेपणा घालवण्यासाठी असे लिहित असेल , त्याना काहीतरी लिहून भडकावणे योग्य नाही .
    मी भारतीय आणि पाटसकर यांची मते बुरसटलेली वाटतात आणि लिहा वाचा आणि स्वतः संजय सोनावणी यांची मते प्रगत वाटतात , आप्पा बाप्पा हे खवचट लिहित असतात .
    श्री पाटसकर याना नम्र विनंती की त्यांनी मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी आणि दुसऱ्याच्या ब्लोगवर काहीतरी अर्थहीन लिहिणे बंद करावे त्यापेक्षा जास्तवेळ संघाच्या शाखेत घालवलीत तरी चालेल . पण इथे घाण करू नका .

    ReplyDelete
  13. अप्पा बाप्पा मला तर आपण फारच रुग्वैदिक वाटत आहात.. अहो आमच्या सारख्या अडाण्याचे म्हणणे तुम्हा महान लोकांना थोडेच समजणार? आणि हो ते रुग्वैदिक लोक दरडावाण्याची कामे करतात हो !! बाकी सगळे आत घालून ठेवतात.. (म्यानात हो) अप्पा बाप्पा अहो कटागेरी चे लोक आम्ही! आम्हाला थोडेच जमणार तुमच्यासारखी मुद्देसूद चर्चा करायला, थोडे सांभाळून घ्या.. बाकी गाडी वळणावर आणायला तुम्ही आहातच कि , चिलीम आणि बमबम भोले करत.. पण तुम्ही तर पक्के शैव वाटता, बमबम भोले करता अग्रसेनवर, मग कुम्भ्मेल्याचा शैव आखाड्यावर तुमचा राग का? फक्त संजय सर म्हणतात म्हणून का?

    ReplyDelete
  14. अप्पा-बाप्पा, विजयराज व तत्सम मला तुम्ही सर्व लोक १००% रुग्वैदिक सनातन्यांचे पूर्वज आहात अशी खात्री आहे, बोट बुडायला लागल्यावर उंदरे जशी पाण्यात उड्या मारतात आणि जिथे मिळेल तिथे आसरा घ्यायचा प्रयत्न करतात तशीच तुमची अवस्था तुमच्या निरर्थक आणि दुटप्पी प्रत्क्रीयान्वरून नेहमी दिसतअसते बहुतेक तुमचे हे रुग्वैदिक टोळके इकडे तिकडे कुठे जागा मिळत नाही म्हणून इथे होला हो करत बहुजनांचा बुद्धिभेद करत असता, नाहीतर शिव ( म्हणजे बम बम भोले गांजा ओढणारा असे ) व शिवाजी, राम ह्या बहुजानंबद्दल इतके विरोधी लिहिले नसते.. तुमची नाळ युरोपशी जोडली गेली आहे, इथे तुम्ही आलात फक्त लोकांना कसेही करून गुलाम करायला, त्यात तुम्ही कसे मागे पडणार? म्हणजे आधी रुग्वैदिकांनी हजारो वर्षे रक्त शोषले, मग ब्रिटिशांनी लुटले, आता तुम्ही परत सुरुवात केलीत. तुम्हाला प्रदूषण कसे होते ते कळत नाही असे नाही, पण तुम्ही मुद्दाम ढोंग करता न कळल्याचे!!

    ReplyDelete
  15. सरतेशेवटी सारांश हाच कि, "भरकटलेली वारी किवा कुंभ मेळा" हे भरकटलेले नसून लेख भरकटत गेले आहेत. लेखावर तद्दन पुरोगामी लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे तर त्याही पलीकडचे प्रकरण आहे. कारणे,
    १) देशातील प्रत्येक नागरिकाला विचार, संचार स्वातंत्र्य आहे. त्यामुळे एखादा सामाजिक गट रस्त्याने चालत जातो तर त्यांचा तिरस्कार करायची, ते किती घाण करतात, अशी ओरड करायची, आणि जे ओरडनारे लोक आहेत तेच शहरात राहून जास्त घाण करतात. नद्यांचे प्रदूषण करतात.
    २) आपण खड्यातून तांदूळ मिळवतो, इथे तर तांदळात एखादा खडा असणे शक्यच आहे. मेळ्यात बलात्कार झाला, हाणामारी झाली, वारीत हमरीतुमरी झालीच तर त्यामुळे वारीची संकल्पना किवा मेळ्याची संकल्पनां पूर्णपणे बाद आहे असे सर्तीफिकेत द्यायचा आणि सुतावरून स्वर्ग गाठायचा पण भरकटलेला प्रयत्न पदोपदी दिसतो आहे.
    ३) आपण स्वतः चार भिंतीच्या आत गृहस्थ जीवन जगतो, कारण आपल्या तिजोरीत भरपूर पैसे असतात. जगात सर्वांनी आपल्यासारखेच जीवन जगावे हा का हट्ट? वरिला येणर्या लोकंना किवा मेळ्याला येणार्या लोकांना किती भयानक प्रश्नांनी गाठले आहे ते तुम्हाला माहित आहे का? शेतातली पिके गेली १० वर्षे करपत आहेत. पंढरपूरला जायला तुमच्याकडे पैसे आहेत, गाडी आहे. गरिबांना फक्त पाय आहेत. तेसुद्धा अनवाणी पायांनी वारीला जातात. नाग साधू नागडे असतात पण तरीही मनातल्या भावना उफाळून का येत नाहीत? जमेल का हे आपल्याला?

    ReplyDelete
  16. संजय सर ,
    आपला कुंभ मेळ्या बाबतचा लेख छान आहे . आपण नेहमीच नवनवीन विषय घेत चर्चाना चालना देत असता . त्यातून अनेक वेळा विषयांतर आणि गैरसमज होत चर्चा भरकटत जाते . मी अनेकदा लेख वाचत असते , ज्यांची मते रिजिड आहेत त्यांनी आपापल्या ब्लोग वर आपली मते मांडावी असे सुचवावेसे वाटते , कारण ब्लोग हा ज्याच्या त्याचा मतांची मांडणी करण्यासाठी तिथे अनेक वेळा पोरकट विधाने होताना दिसतात . उदाहरणार्थ ,
    कुंभमेळा
    कुंभमेळा हा जिवंत सांस्कृतिक कार्यक्रम आहे का ?
    आज समाजात अनेक स्तर दिसतात , काहीना वाटते की हे घडते आहे ते चांगले आहे , तर काहीना वाटते हा समाजाचा छळ आहे , ही विकृती आहे .याला मध्यम मार्ग नाही असेही कुणी म्हणत असते .
    गणेशोत्सव हा सांस्कृतिक ठेवा राहिला आहे का ? त्यात इतका बीभत्सपणा आला आहे की कुणाला त्यात भारताची विटंबना होत आहे असेही वाटू शकेल .तसेच कुंभ मेळ्याचे आहे. काही गोष्टी काळानुरूप नष्ट झाल्या पाहिजेत , गणेशोत्सवाचा उद्देश काय होता , आणि आज काय चालले आहे ? तसेच अमक्या राशीत अमुक ग्रह गेला म्हणून तो दिवस किंवा काल चांगला , पवित्र असतो , हे मानाने कितपत आजच्या पिढीला शिकवण म्हणून योग्य आहे ?पेशवाईत किंवा शिवकाळात प्रत्येक गोष्टीला पंचांग पाहिले जात असे , आज लोकल मध्ये सवाष्ण जेवायला घालण्याचा आणि वट पौर्णिमा साजरी करण्याचा छंद जोपासला जातो - हि काही कौतुकाची गोष्ट नाही ,पण इतक्या श्रद्धेने पंचांग पाहिले जाते का ?
    अंतर जातीय विवाहाचे प्रमाण मुंबईत सर्वाधिक आहे , ते का ? तर , जीवनात किती आडव्या भिंती घालून जगायचे ते आपण अधिकाधिक सुसह्य करत जातो , वयाप्रमाणे आपणास समजू लागते , की मोरे असो , कांबळे असो , किंवा जमादार निंबाळकर ,गोखले असो , सर्व एकाच प्रवासाला निघालेले असतो . मला खात्री आहे की अजून एका पिढीनंतर सर्व मतभेद गळून पडतील , कारण जीवन जगायला कमीत कमी काय लागते - तर , वेळ आणि प्रेम ,माया . ती द्वेषाची जागा जसजशी घेत जाइल तसतसे या शृंखला गळून पडतील .
    आई वडील भाऊ बहिण पत्नी आणि मित्र ही नाती समाजात जपली जातात . शहरात तरी असे दिसते , मी मुंबईची असल्यामुळे आज जितका वेळ मिळतो तो ही नाती जपण्यात जातो , आणि आपले सण ही नाती घटत करण्यासाठी असतात .
    कुंभमेळा हा आपला सण आहे का ?जी भाषा दुरावा निर्माण करते ती कसली भाषा , जी ओलावा निर्माण करते ती खरी भाषा .
    पाटसकर बुवा , आपण किती रिकामटेकडे आहात हे आपण ज्या वेगाने प्रतिक्रिया देत आहात त्यावरून सिद्ध होते आहे , त्यात आवेग शून्य आहे , नुसताच वेग आहे .तसेच आपले लिखाण अश्लीलतेच्या काठावर पोचले आहे . याचेही भान ठेवावे ही विनंती
    हो की नाही पाटसकर बुवा ?

    ReplyDelete
  17. संजय सर ,
    आपला कुंभ मेळ्या बाबतचा लेख छान आहे . आपण नेहमीच नवनवीन विषय घेत चर्चाना चालना देत असता . त्यातून अनेक वेळा विषयांतर आणि गैरसमज होत चर्चा भरकटत जाते . मी अनेकदा लेख वाचत असते , ज्यांची मते रिजिड आहेत त्यांनी आपापल्या ब्लोग वर आपली मते मांडावी असे सुचवावेसे वाटते , कारण ब्लोग हा ज्याच्या त्याचा मतांची मांडणी करण्यासाठी तिथे अनेक वेळा पोरकट विधाने होताना दिसतात . उदाहरणार्थ ,
    कुंभमेळा
    कुंभमेळा हा जिवंत सांस्कृतिक कार्यक्रम आहे का ?
    आज समाजात अनेक स्तर दिसतात , काहीना वाटते की हे घडते आहे ते चांगले आहे , तर काहीना वाटते हा समाजाचा छळ आहे , ही विकृती आहे .याला मध्यम मार्ग नाही असेही कुणी म्हणत असते .
    गणेशोत्सव हा सांस्कृतिक ठेवा राहिला आहे का ? त्यात इतका बीभत्सपणा आला आहे की कुणाला त्यात भारताची विटंबना होत आहे असेही वाटू शकेल .तसेच कुंभ मेळ्याचे आहे. काही गोष्टी काळानुरूप नष्ट झाल्या पाहिजेत , गणेशोत्सवाचा उद्देश काय होता , आणि आज काय चालले आहे ? तसेच अमक्या राशीत अमुक ग्रह गेला म्हणून तो दिवस किंवा काल चांगला , पवित्र असतो , हे मानाने कितपत आजच्या पिढीला शिकवण म्हणून योग्य आहे ?पेशवाईत किंवा शिवकाळात प्रत्येक गोष्टीला पंचांग पाहिले जात असे , आज लोकल मध्ये सवाष्ण जेवायला घालण्याचा आणि वट पौर्णिमा साजरी करण्याचा छंद जोपासला जातो - हि काही कौतुकाची गोष्ट नाही ,पण इतक्या श्रद्धेने पंचांग पाहिले जाते का ?
    अंतर जातीय विवाहाचे प्रमाण मुंबईत सर्वाधिक आहे , ते का ? तर , जीवनात किती आडव्या भिंती घालून जगायचे ते आपण अधिकाधिक सुसह्य करत जातो , वयाप्रमाणे आपणास समजू लागते , की मोरे असो , कांबळे असो , किंवा जमादार निंबाळकर ,गोखले असो , सर्व एकाच प्रवासाला निघालेले असतो . मला खात्री आहे की अजून एका पिढीनंतर सर्व मतभेद गळून पडतील , कारण जीवन जगायला कमीत कमी काय लागते - तर , वेळ आणि प्रेम ,माया . ती द्वेषाची जागा जसजशी घेत जाइल तसतसे या शृंखला गळून पडतील .
    आई वडील भाऊ बहिण पत्नी आणि मित्र ही नाती समाजात जपली जातात . शहरात तरी असे दिसते , मी मुंबईची असल्यामुळे आज जितका वेळ मिळतो तो ही नाती जपण्यात जातो , आणि आपले सण ही नाती घटत करण्यासाठी असतात .
    कुंभमेळा हा आपला सण आहे का ?जी भाषा दुरावा निर्माण करते ती कसली भाषा , जी ओलावा निर्माण करते ती खरी भाषा .
    पाटसकर बुवा , आपण किती रिकामटेकडे आहात हे आपण ज्या वेगाने प्रतिक्रिया देत आहात त्यावरून सिद्ध होते आहे , त्यात आवेग शून्य आहे , नुसताच वेग आहे .तसेच आपले लिखाण अश्लीलतेच्या काठावर पोचले आहे . याचेही भान ठेवावे ही विनंती
    हो की नाही पाटसकर बुवा ?

    ReplyDelete
  18. मेडम आपणच आपल्या लेखात किती भरकटलेल्या आहात ते बघा,
    १) ब्लोगवरील आपली मते स्वतःसाठी असतील तर घरात फोटोफ्रेम करून लावावीत असा माझा सल्ला आहे.
    २) मी फक्त कुंभमेळा आणि वारीबद्दल लिहित होतो, त्यात तुमची गाडी अचानक गणेशोत्सवावर घसरली का ते कळले नाही.
    ३) अमुक एक ग्रह … पूर्वी कालनिर्णय आकाशातील ग्रह बघूनच लोक करत होते. अजून ५००० वर्षांनी २६ डिसेंबर नाताळ कसा म्हणून लोक विचारातील. कदाचित त्यावेळी येशूला लोक विसरून गेलेले असतील.
    ४) मी वारीला आणि मेळ्याला अनुमोदन दिले म्हणजे मी आंतरजातीय विवाहाच्या विरोधी असा निष्कर्ष काढून तुम्ही तुमची गाडी परत घसरवली.
    ५) तुमच्या सणांमुळे तुमची नाती घट्ट होतात तसेच वारकर्यांचे आणि साधूंचे आहे, त्यांना नाती नसतात का? त्यांचे नाते तर परमेश्वराशी आहे.
    ६) माझा लिहिण्याचा वेग आणि आवेग ह्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे?
    ७) माझे लेखन नाही पण आपला समाज अश्लीलतेच्या डबक्यात पडलेला आहे. लाल दिव्याची संस्कृती फोफावली आहे. लग्न करून प्रेम करणारे लोक आहेत. नेटवर अतिशय अश्लील साहित्य लहान लहान मुलांना सहज उपलब्ध होत आहे. त्याबद्दलचे शब्द शाळेतच सर्रास उच्चारले जातात. नेटवर मुले शोध घेतात तेव्हा त्यांना अनेक प्रश्न पड्तात. बिचारे घाबरून जातात ते बघून. असो

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...