Thursday, July 16, 2015

परंपरांचा अभिमान...

परंपरांचा अभिमान बाळगत असतांना आपण किती परंपरा कालौघात सोडून दिल्या आहेत हेही पहावे लागते. तरुणांना स्वातंत्र्य देणारा वसंतोत्सव आपण सोडला. वैदिकांचा इंद्रमह म्हणून एक उत्सव असे...तो दोन हजार वर्षांपुर्वीच सोडला. स्वयंवराची संकल्पना सोडली. कौमुदीमहोत्सव एके काळी खूप लोकप्रिय होता, पण तो आता स्मृतीशेष झाला आहे. जैन-बौद्धांचेही असे अनेक उत्सव असत, उदा स्तूपमह, गिरीमह. तेही आज राहिलेले नाहीत. नदीमह हा नद्यांतील स्नानासाठी यात्रा करण्याचा उत्सव होता. बहुदा तो कुंभमेळ्याच्या स्वरुपात आज अवशिष्ट असू शकतो. अर्थात त्यात विशिष्ट नद्यांतील स्नान अभिप्रेत नव्हते. पण ती परंपरा खंडित झाली आहे.

थोडक्यात आपण अनेक परंपरा कालौघात सोडून दिलेल्या आहेत. ज्या संकल्पना काळाशी सुसंगत राहत नाहीत त्या सोडून देणे व नवीन कालसुसंगत परंपरा निर्माण करणे हे कोणत्याही सुबुद्ध समाजाचे लक्षण असते. पण आम्ही कर्मठ झालो आहोत. सतीप्रथेसारखी निघृण परंपरा नष्ट करायला इंग्रजांनाच कायदे करावे लागले तेंव्हा कोठे ती परंपरा सुटली. कर्मठ समाज कधीही अक्षय्य प्रगती करत नाहीत. आज आम्ही परंपरांनाही मुळचा उदात्त हेतु कायम ठेवत कालसुसंगत करण्याचा प्रयत्न न करता उलट त्यंना विकृत करत चाललो आहोत. हे धर्म व संस्कृतीच्या अभिमान्याचे लक्षण नव्हे. यातून समाज पुढे जाणे सोडा, आहे तिथेच ठप्प होईल

आणि ठप्प झालेले समाज कोणतीही ऐहिक अथवा पारमार्थिक प्रगती करु शकत नाहीत.

3 comments:

  1. With you Sanjay Sir. नेहमीप्रमाणेच

    ReplyDelete
  2. With you Sanjay Sir. नेहमीप्रमाणेच

    ReplyDelete
  3. १) सती प्रथा हि पुरातन नाही, इस्लामी आक्रमणाच्या काळात ते पुरुषांना मारून स्त्रियांची अब्रू लुटत असत. हा इतिहास फक्त भारतातच नाही तर जिथे जिथे इस्लाम पसरला आहे तिथला आहे. अशा परिस्थितीत पतीचे युद्धात मरण झालेल्या स्त्रिया जोहार करत त्यालाच सती म्हणतात. राजस्थानात हि प्रथा जास्त होती कारण इस्लामी आक्रमणांना त्यांचीच जास्त तोंड दिले. ब्रिटीशांच्या सत्तेचा काळ आणि मुघल काळ यातील रेषा फार पुसत आहेत, त्यातच ब्रिटीशांची भारतीयांना दिली गेलेली वागणूक इस्लामी लोकांपेक्षा फार वेगळी होती असे नाही. फक्त त्यावेळी त्यांच्या अत्याचारामुळे एखादी स्त्री सती गेली तर जगात त्यांची छी-थू झाली असती म्हणून त्यांनी ती बंद केली. उलट हिंदुन्सारखा कडवट प्रतिकार सतीच्या रुपात केला ह्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. युद्धातील दग्धभू धोरणाचाच तो प्रकार आहे. २) ग्रीकांनी ज्योतिष्य भारतात आणले हे तद्दन झूट आहे. त्याआधी वैदिकांनी वर्षाचे १२ महिने, त्यात अधिक मास हे सुर्य व चंद्र भ्रमण यावरून निश्चित केले होते. यज्ञ करण्यासाठी वार व तिथीची विशिष्ट स्थिती आवश्यक असते अशावेळी "अग्नी " अनुकूल असतो असे म्हणतात तेव्हाच यज्ञ करता येतो. आपले हजारो सण, विशिष्ठ नक्षत्र, तिथी वार, महिना यांच्या काळात साजरे केले जातात, उदाहरणार्थ : महाशिवरात्री.
    ३) पण मुळात वैदिक जे ज्ञान स्वताचे म्हणून सांगतात आणि आपण ते ऐकून घेतो हीच मोठी चूक आहे. सर्व ज्ञान हे मुळात आगम ग्रंथ ह्या स्वरुपात होते. आगम म्हणजे आधी आलेले. म्हणजे वेदांच्याही आधी आलेले. हे ग्रंथ श्रुती स्वरुपात होते. कारण ते परमेश्वराने पार्वतीला सांगितलेले आणि ते सर्वांनी ऐकले. त्यातील एक छोटासा भाग हा "वेद" असू शकतो. बाकीचे आगम ज्ञान काळओघात नष्ट झाले किवा ते पुढे नेण्याची आपली कुवत नव्हती पण जे शक्य होते त्याचे पुनःराजीवन झाले.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...