Monday, July 27, 2015

राइट टू प्रायव्हसी

अलीकडच्या सर्वच गदारोळात सर्वच नागरिकांच्या दृष्टीने खरे तर अत्यंत महत्वाची आणि मुलभूत मानवी अधिकारांवर गदा आणू शकणारी गंभीर बाब दुर्लक्षित राहिली. ही बाब म्हणजे २२ जुलै रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात "भारतीय घटनेनुसार नागरिकांच्या मुलभूत अधिकारांत प्रायव्हसीचा अधिकार सामाविष्ट नाही." असे ठामपणे म्हटले. यावर महाराष्ट्रात साम टीव्हीचे संपादक संजय आवटे वगळ्ता कोणीही जाहीर चर्चा घडवून आणली नाही. याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात याबद्दल आपण चर्चा केलीच पाहिजे.

आपले खाजगीपण, जोवर स्वत:ची उघड करण्याची इच्छा नाही तोवर,  गोपनीय ठेवण्याचा प्रत्येक व्यक्तिचा अधिकार आहे. सरकार अथवा कोणतीही खाजगी संस्था अथवा व्यक्ति या अधिकारावर घाला घालू शकणार नाहीत असे मानवाधिकार जागतिक जाहिरनाम्यात १९४८ सालीच कलम १२ अन्वये घोषित केले आहे व जगातील सर्वच राष्ट्रांनी यानुसार कायदे करावेत असा आग्रह केला आहे. त्यानुसार अनेक राष्ट्रांत हा कायदा लागू आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ व १९ नुसार भारतिय नागरिकांना गोपनियता जपण्याचे स्वातंत्र्य आहे असे आजवर मान्य केले गेले असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २७ पैकी फक्त २ खटल्यांत (१९५४ व १९६३ सालच्या) भारतियांना घटनेने असा काही अधिकार दिला नाही असे निकालांत नमूद केले आहे.

हे प्रतिज्ञापत्र आधार कार्डाच्या माध्यमातून व्यक्तींची गोपनियता सरकार व आधारसाठी ज्या खाजगी संस्थांनी (बायोमेट्रिकसह) जी माहिती गोळा केली आहे, तिच्या संरक्षणावर व संभाव्य गैरवापराबाबत प्रश्न उभे करत जी याचिका दाखल झाली होती त्या संदर्भात दाखल केले गेले होते हेही येथे लक्षणीय आहे. आधार कार्डासाठी जी माहिती (विशेषत: बायोमेट्रिक) गोळा केली जाते ती व्यक्तिच्या गोपनियतेच्या अधिकाराचा भंग करते व ते अघटनात्मक आहे असा दावाही याचिकेत केला गेला आहे.

मुळात प्रश्न असा आहे कि खरेच आपल्याला आपली खाजगी माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार घटना देते कि नाही? घटनेचे कलम २१ म्हणते कि प्रत्येक नागरिकाला जिविताची आणी व्यक्तिगत स्वातंत्र्याची हमी सरकार देत आहे. कोणत्याही व्यक्तिचे कायद्याने घातलेल्या मर्यादांव्यतिरिक्त जीवित अथवा स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. थोडक्यात कोणाच्याही व्यक्तिगत स्वातंत्र्यावर शासन अथवा अन्यांना घाला घालता येणार नाही असाच याचा अर्थ होतो. यातच खरे तर व्यक्तिच्या आपले खाजगीपण जपण्याचाही अधिकार गृहित धरला गेला आहे. त्यामुळे २७ पैकी २५ खटल्यांत झाजगीपण जपणे हा मुलभूत अधिकार मान्य केला गेला आहे. अर्थात घटनेतील हे कलम काही प्रमाणात अस्पष्टही आहे हे उघड आहे कारण यात खाजगीपणाची व काय खाजगी राहू शकते याची व्याख्या नाही. सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यात जशी काळाची गरज बदलत जाईल तशी या कलमात सुधारणा होऊ शकते असे म्हटले होते.

गेल्या २०-बावीस वर्षात नवीन तंत्रज्ञानामुळे कोणाचीही माहिती गोपनिय राहणे अशक्य होऊ लागल्याने गोपनियतेच्या अधिकाराची चर्चा सुरू होणे स्वाभाविक होते व सुस्पष्ट व्याख्येचीही गरज होती. आधार कार्ड योजना कोंग्रेस सरकारने जेंव्हा सुरु केली तेंव्हा आधारसाठी जमा होणा-या माहितीला कसलेही संरक्षण नव्हते. खाजगी कंपन्या तसेच व्यक्तिगत संगणकावरील डाटाही चोरीला जाऊ लागण्याच्या असंख्य घटना घडत राहिल्या आहेत. एवढेच नव्हे तर आधुनिक साधने वापरत व्यक्ति/संस्थावर होणारी खाजगी गुप्तहेरांकरवीची हेरगिरी, फोन ट्यपिंग, फोनची बिले, तत्संबंधी ध्वनी व संदेशांचाही डाटाही गैरमार्गाने मिळवणे, व्यक्ती-संस्थांना अनाहुतपणे एलेक्ट्रोनिक माध्यमांतुन पाठवला जाणारा पत्रव्यवहार/जाहिराती, व्यक्तीचा मेडिकल इतिहास, लैंगिक आवडी, आर्थिक स्थिती ईत्यादि बाबीही गोपनिय ठेवता येणे अवघड बनत चालले. त्यामुळे अशा सर्वच बाबींसाठी व्यक्तिला आपले खाजगीपण जपण्याचा मुलबःउत अधिकार देणे आवश्यक असल्याचे सरकारला पटू लागले. यातुनच २०११ साली "राईट टू प्रायव्हसी" विधेयक आणण्याचा घाट घातला गेला. नागरिकांनी व माध्यमांनी यावर फारशी चर्चाच न केल्याने या विधेयकासाठी दबावगटही निर्माण करता आला नाही. तरीही या बिलावर संसदेत बरीच चर्चा झाली, अनेक बदल केलेही गेले पण हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही.

२०१३ साली हे विधेयक पुन्हा नव्याने प्रस्तावित केले गेले. त्यात आधार कार्ड अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी दिली असलेली बायोमेट्रिक माहितीही राईट टू प्रायव्हसीत सामील करण्यात आली. पण तेंव्हाही हे विधेयक संमत झाले नाही. २०१४ साली नवे सरकार आल्यावर या विधेयकाच्या मसुद्यात अजून काही बदल केले गेले. काही बाबी नव्याने घुसवल्या गेल्या तर काही वगळल्या गेल्या. यात व्यक्तिगत संवेदनशील माहितीला आधी असलेले संरक्षण डायल्युट केले गेले. आधारसाठी घेतली जाणारी माहितीलाही संरक्षण दिले गेले नाही. एवढेच नव्हे तर २०११ च्या विधेयकात पत्रकारांनी पत्रकारितेच्याच हेतुने (पण खाजगी बाबींना स्पर्ष न करता) प्रसिद्धीसाठी जमा केलेली माहिती या कायद्यात अपवाद केली गेली होती, जी २०१४ च्या विधेयकातून बाद करण्यात आली आहे. याला वृत्तपत्र स्वातंत्र्याचा भंग म्हटले जाऊ शकते.
   
आता सर्वोच्च न्यायालयात भारतियांना खाजगीपण जपण्याचा मुलभूत अधिकार नाही असे केंद्र का म्हणते हे लक्षात येईल. घटनेची व्याख्या संदिग्ध आणि काही बाबी तंत्रज्ञानाच्या प्रगतीने अवतरल्याने मुळचे कलम प्रायव्हसीच्या अधिकारासाठी पुरेसे नसणे स्वाभाविक आहे. त्यासाठीच राईट टू प्रायव्हसी बिल आणण्याचे घाटले. या बिलाचे (२०१३ च्या मसुद्याचे) महत्व खालील कारणांनी प्रत्येक नागरिकाला महत्वाचे आहे.

१) आधार कार्डामुळे व्यक्तिचे खाजगीपण सर्वार्थाने संपुष्टात येऊ शकते व तिचा वापर राजकीय/धार्मिक/सांस्कृतिक दमनासाठी करु शकते.
२) कंपन्यांची गोपनिय माहिती इलेक्ट्रोनिक माध्यमांतून जी अधून मधून ह्यक होत असते, अथवा डाटा प्रोसेस करणा-यांकडून परस्पर विकली वा नष्ट केली जाऊ शकते, याला कायद्याचे पुरेसे संरक्षण नाही.
३) विवाह/घटस्फोट/लैंगिक निवडी/शारिरीक व्याधींचा व आर्थिक इतिहास/राजकीय-धार्मिक मते/ खाजगी पत्रव्यवहार याचा शासन अथवा खाजगी संस्था / व्यक्ति दुरुपयोग करु शकतात.
४) सरकार ही संस्था आधारसाठी जमा केलेला डाटा प्रोसेस करणार असल्याने त्या डाट्याचा उपयोग ज्यासाठी जमा केला गेला आहे तो न करता नागरिकांचे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आणण्यासाठी करू शकते.

हे झाले थोडक्यात. खाजगीपणाचा व्यक्तिगत अधिकारास अपवाद आहेतच. ते खालील अपवादत्मक परिस्थितीतच सरकारला वापरता यावेत यासाठी २०११ च्या विधेयकात तरतुदी आहेत त्यातील काही अशा:

१) राष्ट्राच्या सार्वभौमतेला सुरक्षेला, शास्त्रीय, आर्थिक व अन्य संवेदनशिल माहितीला धोका पोहोचण्याची साधार शंका असेल तर,
२) एखादा संभाव्य गुन्हा रोखण्यासाठी,
३) सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असेल अथवा एखाद्या गुन्ह्याच्या तपासात आवश्यक असेल तर सक्षम् अधिका-याच्या अनुमतीने ई.

हे अपवाद केले गेले असले तरी या अपवादांचीही नीटस व्याख्या २०१४ चेही विधेयक करत नसल्याने घटनात्मक कलम २१ मधील तरतुदीबद्दल जी संभ्रमावस्था होती ती कायमच राहण्याचा धोका आहेच. सध्या मिडिया जी स्टिंग ओपरेशन्स करतात त्याबाबत व्यक्तिच्या गोपनियतेच्या अधिकाराचा भंग होत असला तरी त्याबाबत या संभाव्य कायद्यातही सुस्पष्टता नाही.

आताचे सरकार ज्या विचारधारेने चालत आहे ती पाहता आधार तसेच अन्य माध्यमांतुन व्यक्तिच्या गोपनियतेच्या अधिकाराचा भंग होण्याची, गैरवापर होत दमनशाही आणता येण्याची शक्यता आहे हे अमान्य करता येणार नाही. ही भिती ठळक होण्याचे कारण म्हणजे केंद्रानेच प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे भारतियांना आपली व्यक्तिगत माहिती खाजगी ठेवण्याचे मुलभूत अधिकार नाहीत असे म्हटले आहे. म्हणजेच हे राइट टू प्रायव्हसी बिलही (२०१४) हे सरकारही पास करण्याची शक्यता धुसर दिसते आहे. खरे तर व्यक्तिस्वातंत्र्यात अर्थातच त्याची गोपनियता ठेवण्याचे स्वातंत्र्य अभिप्रेत आहेच. पण हे सरकारला मान्य असल्याचे दिसत नाही. आधार कार्डामुळे आपली सर्वच माहिती शासनाच्या व ज्या खाजगी संस्थांनी ती जमा केली आहे त्यांच्या मर्जीनुसार वापरली जाऊ शकते. ही माहिती (युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांकामुळे) कोणालाही मागे घेता येणार नाही त्यामुळे व्यक्तिवरील नियंत्रण आपसूक यंत्रणांच्या हातात जाऊ शकते. शिवाय ही माहिती ज्या सर्व्हर्सवर स्टोअर करुन ठेवली आहे ते सर्व्हर विदेशांत असल्याने अन्य कोणतेही सरकारसुद्धा तो डाटा बेकायदेशिरपणे वापरू शकते. या आणि त्याशी निगडित भित्या अनेक आहेत. त्यामुळे प्रायव्हसीचा अधिक काटेकोर कायद्यातून आपल्याला अधिकार व संरक्षण मिळवावे लागेल. अन्यथा आपण आपले स्वातंत्र्यच् गमावून बसण्याचा धोका आहे आणि त्याची आपल्याला सर्वात अधिक काळजी असायला हवी.
 

36 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Sanjay, did you not provide your personal data like finger prints etc. to US Embassy when applying visa for USA? I know you went to USA because you boasted your US trip is some article. At that time did you tell all thse things to US authorities? Or kept silent at that time?

    ReplyDelete
    Replies
    1. You are utter fool. USA Did not take any fingerprint while delivering visa to me. It was business VISA, mind well and stop bragging your nonsense.

      Delete
    2. Sanjay, please read my comment carefully. I said "personal data like finger prints etc'. I did not just mentioned fingerprints but also asked you about other data like birthdate/marital status etc which you must have provided to US embassy. (In above article you refer marital data as one of the points that can be misused). But it seems you did not understand English and hence responded to my comment with such poor reaction. Did you ask US embassy that what will they do and why they need all these data from you? Did you ask them how will they protect that data? Now your second comment on me that i have not read your past articles where you have provided me with answer to my question. But i again ask you three questions which i have assked you in the past and you did not provide any answer: 1. Why did you give false date for Guwahati balsts. 2 Clarification about when Panini lived. 3. Actual number of days/years Nehru spent in jail. Please answer these questions else take back your false claims. Now on fingerprints for US visa. I dont know when Mr. Pataskar visited and you visited USA, but USA made mandatory finger printing for all visa applicants from october 2006. Also, they take finger prints at the arrival in their country at immigration.

      Delete
    3. अमित, तू बालिश वर्तन करने बंद कर, आता तू वयाने मोठा झाला आहेस! एखाद्याच्या पाठिमागे असे हात धुवून लागणे बरे नव्हे! किती छळतो आहेस तू संजय सोनवणी यांना? लिहिताना संदर्भ देण्यात चूक झाली तर त्याचा एवढा बाऊ करण्याची गरजच काय? तुझ्या कडून चुका होत नाहीत काय? प्रत्येक वेळी काय माफी मागत बसावे काय? काही चुकले तर जे बरोबर आहे त्याचा संदर्भ देवून तुही खरे ते सांगू शकतोस, कोणीही ते पडताळणी नंतर स्वीकारू शकेल?

      Delete
  3. आप्पा - अगदी वाईट झाले नाही का , आपले कलाम सर गेले !
    बाप्पा - किती त्यांनी देशासाठी केले आपल्या ?
    आप्पा - असो . पण आपल्या चर्चा चालूच राहिल्या पाहिजेत !
    बाप्पा - जन पळभर म्हणतील हाय हाय - हेच खरे ,
    आप्पा - अहो बाप्पा साहेब मला एक सांगा , हा अमित आहे ना , तो काय संजयचा मागच्या जन्माचा वैरी आहे का ?संजयच्या मागे हात धुवून लागलेला असतो . एखादा खवट शेजारी किंवा सावत्र भाऊ असतो , तसा सदान कदा संजयच्या चुका काढत असतो . त्याचे म्हणणे तरी काय असते ?
    बाप्पा - मी त्याचे म्हणणे बरेच वेळा ऐकले आहे , वाचले आहे . अमीतला खोटेपणाची फार चीड आहे . आणि तो जे म्हणतो ते डावलाताही येत नाही , अवघड जागी दुखणे - अशी अवस्था आहे !
    आप्पा - मला वाटते , त्याचा एक ग्रह झालेला आहे संजय बद्दल !
    बाप्पा - म्हणजे ?
    आप्पा - म्हणजे असे - संजय बरेच वेळा आव आणतो , आपण सर्वज्ञ आहोत ," मलाच काय ते समजते , आणि मी एखाद्या गोष्टीचा जो अर्थ लावेन तेच अंतिम सत्य" , असा संजयचा एकूण अवतार आपण नेहमी बघत असतो , आणि त्याचाच सहाजिक राग या अमित ला येत असावा .
    बाप्पा - हे मात्र खरे हं ! म्हणजे असे बघ , संजयची काही घट्ट मते आहेत , त्यातून चिंतन करून तो काही पुढे जाऊ शकत नाही हीच संजयची खरी शोकांतिका आहे .
    आप्पा - अमित म्हणतो ते अगदी १०० % बरोबर आहे . नरेंद्र मोदी एखादाच ! ज्याला आधी मज्जाव केला आणि त्यालाच आता कौतुकाने अमेरिका कुरवाळते आहे . यातून काय दिसते ? स्वातंत्र्याचा जयघोष करणारी अमेरिका त्याच लायकीची आहे .संधिसाधू !
    बाप्पा - पण अनेकाना वाटते की जगात स्वातंत्र्याची रक्षणकर्ती कोण , तर अमेरिका . सुरवातीला रेड इंडियन्स लोकाना ढेकणा सारखे चिरडून आता स्वातंत्र्य आणि समता - बंधुभाव ? पी एल ४८० हे किती भयानक प्रकरण होते ? आपल्या देशाला गुलाम करण्याचाच डाव नाही का तो ?

    आप्पा -स्वतःचे खाजगी जीवन जगण्याचा हक्क हा मूलभूत कसा असू शकतो ?आचार्य रजनीश अमेरिकेत एकदा फक्त येशु बद्दल वाईट बोलले , त्याना देशाबाहेर हाकलून दिले .इतका जहाल धार्मिक पगडा आहे तिथे . अनेक गट आहेत , ते आपापसात कुरघोडी करत असतात .
    बाप्पा - आपल्याकडे काय अवस्था होईल ? खाजगी बाबी बाबत आपण मूलभूत हक्क म्हणून भांडू लागलो तर ? मुळात आपल्याकडे लिपस्टिक लावून , नटून , मुरडून , स्वातंत्र्य समता यांच्या नावाने गळा काढणारे पैशाला पासरी आहेत . . ते मुख्यतः प्रसिद्धीचे भुकेले असतात . मेणबत्या पेटवून मूक मिरवणुका काढणे हा त्यांचा आवडता उद्योग !
    आप्पा - अमोल पालेकर , शबाना आझमी , अरुंधती राय , शोभा डे अशी हि निरुद्योगी लिस्ट कितीतरी वाढवता येईल !गरिबाला असल्या अर्थहीन गोष्टीत काहीच रस नसतो .
    बाप्पा - संजयला काहीतरी खुसपट काढून नेहमी मी किती चौकस आणि सावध आहे हे सांगण्याची खुमखुमी असते इतकेच !
    आप्पा - अमित , तू अगदी बरोब्बर चिमटा काढलास , आमच्या सारखे खवट म्हातारे असूनही तू आमच्या आधी बाजी मारलीस ! हो ना संजय ?
    बाप्पा - संजयचा दुसरा विक पोईंट म्हणजे समाजवाद ! त्याची लक्तरे झाली आहेत .
    आप्पा - आपल्या देशात कोणत्याही तत्व ज्ञानाची फट फजिती व्हायला वेळ लागत नाही , समाजवादी नेत्यांनीच समाजवादाचा पराभव केला . तरी संजय च्या डोक्यातून समाजवाद जात नाही ! यासारखे दुःख नाही !

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-बाप्पा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी तथाकथित समाजवादी नाही. मला एकदा समाजवाद्यांनी बैठकीला बोलावले होते. मी गेलोही होतो. सर्वांना झापडून आलो. म्हणालो, ज्यांचा तुम्हाल कळवळा आहे त्यांच्या धार्मिक-सामाजिक भावना समजावून न घेता तुम्ही तुटून प्डता त्यामुळे तुमचा ’त्यागी’ म्हणून फारतर आदर होतो पण तुम्हाला व तुमच्या विचारांना दूर ठेवले जाते. मग प्रबोधन कसले? ९९% पुरोगाम्यांना हे आजही समजत नाही. मी कोनतही वादी नाही. असला तर माझाच माझ्याशी वाद आहे. राहिले अमितचे. तो बिनडोक जंतू आहे. ज्या प्रश्नासाठी मुर्खासारखा एवढा काळ माझ्या मागे लागलाय त्याचे उत्तर माझ्याच एका ब्लोगमद्धे पुर्वीच आलेले आहे. न वाचता कुंटकबुद्धी दाखवणारे मुर्ख, मला त्यामुळेच उत्तर द्यायला आवडत नाही. मी सर्वांना वाट्टेल ते लिहिण्याचे स्वातंत्र्य देतो याचा अर्थ सोयीने घेऊन कुत्सितपणा दाखवायची वृत्ती माझा नव्हे तर त्यांचाच अपमान व बदनामी करत असते हे कधी समजेल? आता अमेरिकेचे. अमेरिकेत माझे दोन रेडियो इंटर्व्ह्यु झाले. त्यात मी जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र अमेरिका अहे असे म्हटले होते. (त्यांची अपेक्षा मी पाकिस्तान म्हणेल अशी असावी.) नरसिंहराव यांनी अमेरिकेच्या संसदेत अमेरिकनांनी स्थानिकांचा जो नरसंहार केला त्याबद्दल जाब विचारत भारतात लक्ष घालू नका असे सुनावले होते. महान माणूस. ही लायकी मोदींची नाही. असो. नेहमीप्रमाणेच आभारी.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. आप्पा - संजयने लगोलग उत्तर दिले बर का बाप्पा ! वर्मी घाव बसला की असे होते असे म्हणतात
    बाप्पा - संजयला समाज प्रबोधन करावेसे वाटते . पण त्याला बाबा आमटे होता येत नाही - त्याचेही दुःख आहे , हातातले सोडता येत नाही , वेदना बघवत नाहीत , प्रश्न समजल्या सारखे वाटतात , उत्तरे हातात आल्यासारखी भासतात , पण पारा हातात घ्यायला गेल्यावर जसे होते , तसे काहीसे होते .संजयची शोर्टकट घेत सामाजिक प्रश्न सोडवण्याची वृत्ती ही फसवी आहे . असावी !
    आगरकर आणि टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा काढल्या बद्दल तो सन्मानित करत नाही , उलट आगरकरांना दोष देतो की त्यांनी खालच्या जातीच्या मुलाला शिक्षणाचा अधिकार डावलला , आणि ह्या शिक्षणात ब्राह्मणाना प्राधान्य असेल असे काहीसे उद्गार काढले हे मात्र ते समाज मनावर बिम्बवतात .
    आप्पा - याउलट महात्मा फुलेंचे कौतुक करण्यात ते पुढे असतात . तसे का हे त्यांनाच जास्त परखडपणे सांगता येईल . ब्राह्मणद्वेष हेच त्याचे एकमेव उत्तर आहे . लो टिळकांच्या नंतर जेधे प्रभूतींच्या काळात पुण्यात जे राजकारण रुजले त्याची ही फळे आहेत .
    बाप्पा - यशवंतराव म्हणत की जेधे यांच्यामुळे मी राजकारणात आलो ! जेधेनी पण शेतकरी कामगार पक्ष काढला १९४७ ला , आणि नंतर परत काही काळानंतर परत काँग्रेस मध्ये स्वगृही परतले - यशवंतराव खरोखर त्यांचे शिष्य शोभतात .

    आप्पा - समाज , समाजाचे २ भाग - अमीर गरीब - उच्च , नीच - यश हि गमतीदार गोष्ट आहे , एकदा ज्या रस्त्यावर भेटते तो राजमार्ग बनतो आणि माणूस सहसा तो सोडत नाही . एकाला चलो रे , वगैरे नुसत्या गप्पा - नेमके हेच संजयाच्या वागण्यात दिसते .
    बाप्पा - तरुण वयात यशा सारखे सुंदर काहीही नसते . नवीन मार्ग चोखाळायला नकोसे वाटते . काही जणाना समाज कार्य करायची हौस असते . पण समाजाला तुमच्या मार्गदर्शनाची काही मर्यादे पर्यंतच गरज असते हे व्यावहारिक सत्य आहे . . समाज भोळा वगैरे अजिबात नसतो , साव असतात तसे चोरही असतात , सद्वर्तनी असतात तसे भामटेही असतात . विकृत लोक तर असंख्य तऱ्हेची असतात .
    आप्पा - पानशेत प्रलयानंतर दुसऱ्या दिवशी , खडकवासला फुटले असा हाकारा करत , लोकाना लुबाडणारे असतातच . जिथे आपत्ती येते तिथे मदत कार्य करायला टाटा सारखे लोक धावतात आणि ते ओरबाडून घ्यायला लफंगे पण गोळा होत असतात . या नियमाला कोणताही देश अपवाद नाही , कोणताही धर्म अपवाद नाही .
    आप्पा -त्यामुळेच असा व्यावहारिक अभ्यास बाजूला ठेवून संजय पुस्तकी सिद्धांत मांडत असतो , त्यामुळे वासरात लंगडी गाय , अशी अवस्था होते आणि त्याचे काहीसे कौतुक होते . परवाचे थरुरांचे भाषण किती ओघवते होते , तशी हिम्मत पाहिजे , तसा दर्जा पाहिजे .
    बाप्पा - अहो आप्पा , इतके बोलताय संजयला , खरेतर आपण दोघेही त्याला घालून पाडून बोलतोय , लेकरू उदास होईल रे , आपला राग संजयवर नाहीच आहे , आपला रोख समाजाचे विघटन करणाऱ्या लोकांवर आहे , आजच बघ , मेमनच्या मदतीला न्यायालयात पाठींबा देणारे कोण आहेत ? म .गांधींचे वंशज ! ओवेसी ओरडतोच आहे ,

    ReplyDelete
  6. स्वतःचे खाजगी जीवन हा जणू मूलभूत अधिकार आहे असा डांगोरा पिटणे म्हणजे स्वतःची दिशाभूल करणे आहे . आज भारताइतका स्वैरपणा कोणत्याही देशात पहायला मिळत नाही . मुसलमान त्यामुळेच हा देश आपला मानतात , पण जणू आपण इथले पुरातन शासक आहोत असे समजून इथे गुर्मी दाखवत असतात , ते एक असो !
    पण मूळ मुद्दा असा आहे - माहिती गोळा करणे ही आजच्या काळात महत्वाची गरज आहे . त्याचे अनेक फायदे असतात . अनेक योजना आखताना या माहितीचा फायदा देशाला होता असतो .
    संजय सर आपण जेंव्हा असा मुद्दा हाताळता त्यावेळेस त्याचा दुरुपयोग करत अल्पसंख्य समाज अशाच तत्वांचा वापर करत देश विघातक गोष्टी साध्य करण्यासाठी आपली बाजू उचलून धरेल त्याचे काय ? परदेशात तर अनेक उपक्रमात अनेक प्रकारची माहिती सरकारला मिळत असते . त्यात वावगे काहीच नाही . आपण लिहिले आहे तसा गैर वापर होईल असे म्हणणे अवाजवी वाटते
    भित्यापाठी ब्रह्म राक्षस ! हेच खरे .
    आपला मुद्दा न पाटण्या सारखाच आहे !

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. Sorry! Not need to visit your blog! We are not idle like you!

      Delete
    2. First learn how to write in English, then try to read.

      Delete
    3. You do not need at all to teach how to write and how to read it in English to us, that we are able. We know how much your English writing is ineffective!!!

      Delete
    4. तुम्ही आम्हाला इंग्रजी कसे लिहायचे आणि कसे वाचायचे हे शिकविण्याची अजिबात आवश्यकता नाही, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुमचे इंग्रजी लिखाण किती कुचकामी आहे ते आम्हाला माहित आहे.

      Delete
  10. Avinash Pataskar, your blog is rubbish / nonsense / twaddle. This is a fact, please do not try to advertise here.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. Avi,

      What is this?

      Now your behavior is a height of madness.

      Delete
  11. कुठलीही बाब गोपनीय असणं, चारचौघात सांगण्यासारखी नसणं, त्यातील एखाद्याला बाजूला घेऊन, 'तुला त्याबदद्ल नंतर सांगेन' म्हणणं, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी काळबेर आहे असच समजावं. एव्हढा माहितीच्या अधिकाराचा लढा कशासाठी दिला? फक्त देशाच्या सौरक्षण विषयक बाबी सोडून आणि पती-पत्नीतील बेडरूम मधील अफेअर सोडून काहीही गोपनीय असता कामा नये असे वाटते. त्यामुळे आधार कार्डावरील वैयक्तिक माहिती गुप्त ठेवण्याचे काही कारणच नाही. उलट निवडणूक कार्ड, रेशन कार्ड, निरनिराळे ओळख पत्र बाद करून फक्त 'आधार कार्ड' हेच सर्व बाबींसाठी सक्षम कार्ड आहे. कारण त्यावर ते इश्यू करणार्या अधिकार्यांच्या समोर कंप्यूटरवर फोटो घेण्यात येतो, डोळ्यांच्या बुबूळाचे फोटो घेण्यात येतात, बोटांचे ठसे घेण्यात येतात, त्यात ब्लड ग्रूप आणि डीएनए काउंट टाकून ते अधिक सक्षम करावे.

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. "विकास तुझ्यासारख्या भंकस लोकांना उत्तर द्यायची तुझी लायकी नाही आधी इतिहास वाच, तो काळात नसेल तर भूगोलाचा नकाशा बघ तोही तुझ्या डोक्यात घुसत नसेल तर डोके फोडून घे हा एकाच पर्याय तुझ्या सारख्या लोकांना शिल्लक आहे कारण तुम्ही धोबीचे कुत्रे न भारतीय न अमेरिकन…"

      -----------------------> पाटसकर किती राग राग करणार? अहो तुमच्या भल्यासाठीच सांगत होतो की तुमचा ब्लोग एकदम रटाळ आहे ते, उगीच तुमचा उत्साह कमी करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. तुमचे इतिहासाचे आणि भूगोलाचे ज्ञान अगाध आहे? आमच्या सारख्या भंकस माणसाला ते कसे काय समजणार? तुम्ही आम्हाला अमेरिकन धोबीचे कुत्रे करून टाकले यातच तुमचे मोठेपण आहे!

      Delete
    2. पाटसकरांचे डोके फिरले आहे, बाकी काहीही नाही! काय लिहितात याचे यांना थोडेही तारतम्य नसते. अजागळपणे लिहून उगीच स्वतःला मनस्ताप करून घेत असतात. म्हातारपणी असले चाळे योग्य नव्हेत. थोडे धीराने घ्यायला शिका!

      Delete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. अरे पाटसकरा,
    तुला घाण करायला हाच ब्लोग मिळाला आहे काय? जे काही गुण उधळायचे आहेत ते तू तुझ्या ब्लॉग वरतीच उधळ, कसे? इतरांना तत्वज्ञान शिकवायला जी बुद्धिमता लागते ती तुझ्यात अजिबात नाही हे विसरू नकोस. काहीतरी संघाचा फडतूस आणि खोटा इतिहास लादण्यात हा व्यस्त असतो. विषय काय असतो, हा लिहित काय असतो याचे भान याला मुळीच नसते. असले रिकामटेकडे उद्योग करायला तुला कोणी सांगितले आहे, ते तरी सांग? विषय भरकटवून तुला मिळते तरी काय? शहाणे व्हायचे आहे ना तुला? बघ, हे सगळे तुझ्याच हातात आहे. तुझ्या भावी वाटचालीला खूप-खूप सदिच्छा!

    ReplyDelete
  15. प्पा - पूर्वी संध्याकाळी लोक पारावर जमत असत , आपापापल्या वकुबाने चर्चा होत असत , घडामोडी कळत असत , योग्यायोग्य आणि चांगले वाईट काय त्याचा उहापोह होत असे , घटना समजत असत , असत , एक समाजाचा महत्वाचा हिस्सा होता , कधी मारुती मंदिरा ला लागून तर कधी सरकारी कचेरीला टेकून तर कधी चौकाच्या वळणावर , हा पार म्हणजे एक साधे सोपे शिक्षणाचे केंद्र होते , आता चित्र पालटले टीव्हीने सगळेच बदलून टाकले . अजहीरातीने गुदमरवून जीव हैराण झाला .
    बाप्पा - पण अशा वेळी संजय सारख्या लोकांनी आपापले ब्लोग सुरु केले , एक नवी चावडी तयार झाली , नव्या पाराजवळ बार झाले , रेशनचे दुकान झाले , लोतारीची विक्री सुरु झाली , पण संजय सारख्यांनी नवा मार्ग घडवला , ज्याला काही जाणून , , त्याना पूर्ण समजावून देण्याची खूप कष्ट घेतले आहेत . कधी कधी त्याचेही सांगणे एकसुरी होते हे पण खरे ,
    आप्पा - पण अविनाश पाटसकर च्या पेक्षा फारच चांगले !. पाटसकर यांनी खरेतर आत्म परीक्षण करावे , त्यांचा ब्लोग म्हणजे फ़ालतू गिरिचा कळस आहे . भविष्य वर्तवण्याचे हिडीस काम ते करतात .एकीकडे स्वतःस आरक्षणाचा पुरस्कार करणारे म्हणवतात , एकीकडे वैदिकांच्या बाजूने उभे राहतात , त्यांच्या विचाराना काहीही बैठक नाही , अत्यंत बाळबोध अपरिपक्व विचार तितक्याच ढिसाळ भाषेत ते सांगतात . त्यांनी या ब्लोगवर विनंती करणे की " माझा ब्लोग वाचा " यासारखी विनोदी गोष्ट नाही . अत्यंत जुनाट विचारांची री ओढणारे हे पाटसकर अत्यंत दयनीय संघवाले असावेत , ते ब्राह्मण आहेत का ते त्यांनी स्पष्ट सांगावे . ते सारख्या कोलांटउड्या मारत असतात .
    बाप्पा - सर्वांनी त्यांचा निषेध केला पाहिजे !
    आप्पा - अशी ब्लोग वाचा म्हणण्याची वेळ येणे म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे , अरे रे .
    उत्तिष्ठ ! ध्वज प्रणाम एक दोन तीन ! संघ द्वीकीर !!! चला आपली चड्डी सावरत निघा आणि या ब्लोगवर परत असले ओंगळ लिहू नका . नाहीतर भागवताना काय वाटेल त्याचा तरी विचार करा . नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वान्दितोहम
    महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे त्वतस्ते शकायो नमस्ते नमस्ते

    ReplyDelete
  16. अरेरे , किती बोअर विचार आहेत या पाटसकर चे !अहो म्हातारबाबा जरा डोक चालवा . लहानपणी मुले किल्ला करत असत आणि रस्त्यावर लिहित असत , मोफत किल्ला - आणि बाण काढून दाखवत असत येथे किल्ला आहे - तसे तुमचे चालले आहे - माझा ब्लोग वाचा , कित्ती ठोंबे आहात तुम्ही ! अरेरे - तुमच्या घरच्याना किती वाईट वाटत असेल , तुम्ही अर्ध्या चड्डीत जाता फिरायला , इश्श !
    असे कसे हो तुम्ही पाटसकर बुवा ? तुम्ही ब्राह्मण का हो ? देशस्थ ? ऋग्वेदी का यजुर्वेदी ?
    असे करू नये , अहो धर्म कधीच मोडीत निघाले आहेत ! कसले धर्माचे रक्षण करताहात ?
    किती बोअर प्रार्थना आहे . नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धीतोहम --
    समर्थ भवत्वा शुशाते भृशम - किती कंटाळवाणा प्रकार आहे ,
    तुमची आई किती वैतागली असेल ना , आणि पत्नी ? इश्श ! तिला तर लाजेने चुरर्र होत असेल तुमची अर्धी चड्डी बघून , त्या भागवताला सांगून जरा गणवेश तरी बदला , कसा हो असा हा गणवेश , सगळच दिसते हो इतकी ती चड्डी विशाल आकाराची . तुमचे मन विशाल असेल , विचार विशाल भारताचे असतील पण चड्डी इतकी विशाल कशाला ?
    इश्श ! काहीतरीच !- काय म्हणताय ? अय्या ! तुम्ही म्हणजे अगदीच हे आहात बर का !

    ReplyDelete
  17. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे,
    त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
    महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे,
    पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
    प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता,
    इमे सादरं त्वां नमामो वयम् |
    त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं,
    शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ||
    अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं,
    सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् |
    श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं,
    स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
    समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
    परं साधनं नाम वीरव्रतम्
    तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
    हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
    विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
    विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
    परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
    समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

    ही एका मान्यताप्राप्त संघटनेची प्रार्थना आहे . त्याची टिंगल करायची काय गरज आहे . तुम्हाला पाटसकर यांच्या विषयी लिहायचे असेल तर लिहा , पण त्याबरोबर अशी प्रार्थनेची टिंगल करणे म्हणजे स्वतःच्या संस्कारांची पातळी दाखवणे आहे , हा थिल्लरपणा आपणास शोभत नाही , निदान हा ब्लोग आप्पा बाप्पा म्हणतात तसा संजयने एका ठराविक पद्धतीने चालवला आहे , अशी बेताल वक्तव्ये संजयने रद्द करावीत असे वाटते . श्री अविनाश पाटसकर हे अत्यंत फालतू विचार मांडतात हे पण तितकेच खरे आहे . आजकाल अनानिमास असे लिखाण करणारे ब्लोग ब्लोग ची बैठक जास्त नितीमुल्ये जपणारी झाली आहे , त्याबद्दल संजय सरांचे अभिनंदन !

    ReplyDelete
  18. Forever I bow to thee, O Loving Motherland! O Motherland of us Hindus, Thou hast brought me up in happiness. May my life, O great and blessed Holy Land, be laid down in Thy Cause. I bow to Thee again & again.

    We the children of the Hindu Nation bow to Thee in reverence, O Almighty God. We have girded up our loins to carry on Thy work. Give us Thy holy blessings for its fulfillment. O Lord! Grant us such might as no power on earth can ever challenge, such purity of character as would command the respect of the whole world and such knowledge as would make easy the thorny path that we have voluntarily chosen.

    May we be inspired with the spirit of stern heroism, that is sole & ultimate means of attaining the highest spiritual bliss with the greatest temporal prosperity. May intense and everlasting devotion to our ideal ever enthuse our hearts. May our victorious organised power of action, by Thy Grace, be wholly capable of protecting our Dharma and leading this nation of ours to the highest pinnacle of glory. - Bharat Mata Ki Jai!

    ReplyDelete
  19. Forever I bow to thee, O Loving Motherland! O Motherland of us Hindus, Thou hast brought me up in happiness. May my life, O great and blessed Holy Land, be laid down in Thy Cause. I bow to Thee again & again.

    We the children of the Hindu Nation bow to Thee in reverence, O Almighty God. We have girded up our loins to carry on Thy work. Give us Thy holy blessings for its fulfillment. O Lord! Grant us such might as no power on earth can ever challenge, such purity of character as would command the respect of the whole world and such knowledge as would make easy the thorny path that we have voluntarily chosen.

    May we be inspired with the spirit of stern heroism, that is sole & ultimate means of attaining the highest spiritual bliss with the greatest temporal prosperity. May intense and everlasting devotion to our ideal ever enthuse our hearts. May our victorious organised power of action, by Thy Grace, be wholly capable of protecting our Dharma and leading this nation of ours to the highest pinnacle of glory. - Bharat Mata Ki Jai!

    ReplyDelete
  20. अशीच मंत्र्नुग्ध करणारी साने गुरुजींची रचना आठवते

    बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
    हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
    राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

    वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
    तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

    हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
    ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

    करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
    विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

    या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
    हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

    ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
    जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

    ReplyDelete
  21. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

    जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
    तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

    जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
    तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

    समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
    अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

    सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
    तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

    कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
    समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

    प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
    कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

    असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
    सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

    भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
    सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

    असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
    परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

    जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
    त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

    ReplyDelete
  22. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

    जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
    तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

    जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
    तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

    समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
    अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

    सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
    तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

    कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
    समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

    प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
    कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

    असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
    सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

    भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
    सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

    असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
    परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

    जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
    त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

    ReplyDelete
  23. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...