Sunday, August 2, 2015

आम्ही कृतघ्न आहोत!काल जेजुरी येथे उमेश कुदळे व त्यांच्या तरुण मित्रांनी सावली प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या जेजुरीतील पहिल्याच व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना मी मांडलेले काही निवडक मुद्दे-
१. आम्ही १९४७ साली स्वतंत्र झालो असे मानत असलो तरी ते खरे नाही. खरे मानवी प्रगल्भ स्वातंत्र्य आमच्यापर्यंत आमच्यामुळेच पोहोचलेले नाही. आम्ही आमच्या जातींच्या, पोटजातींच्या, धर्मांच्या आणि स्वत:च्याच अविकसित मानसिकतेच्य बेड्यांत अडकलेलो आहोत.
२. आम्ही भारतीय कृतघ्न आहोत. ते महानायकांची नांवे घेतात, जयजयकार व्करतात पण त्यामागे प्रेरणा व आचरण हा उद्देश्य नसून केवळ आपल्या खोट्या अस्मितांचा बाजार मांडणे हा त्यांचा प्रमूख हेतू असतो. जयंत्या-पुण्यतिथ्या साज-या करणे हे आम्हीच व्यर्थ बनवून टाकले आहे. अम्ही कधीच पुरोगामी नव्हतो असे वाटावे अशी स्थिती आहे.
३. प्रगल्भ, विचारी, तर्कनिष्ठ नागरिक बनवले हा शिक्षणाचा मूळ हेतू. काय शिकावे हे शिकण्यासाठी शाळा-कोलेजेस. पण आम्ही शिक्षणाचे साध्य दूर ठेवले आणि आवड असो को नसो...त्या सर्व विषयांत उत्तमोत्तम मार्क पाडून घेण्याच्या स्पर्धेत उतरलो. कलामांनी आम्हाला महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवले. ते साध्य होण्यासाठी ज्ञानसत्ता आधी मिळवावी लागते. त्यासाठी आमच्याकडे योजनाच नसेल तर महासत्तेचे स्वप्न स्वप्नच राहील. आमचे शिक्षण विद्यार्थ्याला ज्ञानार्थी नव्हे तर पोटार्थी बनवते. तेही जेथे स्कोप वाटतो अशाच क्षेत्रात आम्ही झुंडीने घुसतो. खरे तर स्कोप नाही असे एकही क्षेत्र नाही. पण आम्ही आमच्या नैसर्गिक कल असणा-या विषयांकडे न वळता झूडीच्या नियमांनी अनियमित चालु लागतो. सर्वांना यश मिळणे असंभाव्य होऊन जाते.
४. आम्हाला इतिहासाचे प्रेम आहे असे आम्हाला वाटते. पण तेही खोटे आहे. आम्हाला आमचे महापुरुष ख-या-खु-या ऐतिहासिक मानवी स्वरुपात पहायचे नसतात तर आमच्या विचारधारांचे रंग लेपवून पहायचे असतात. विशिष्ट विचारधारांनी प्रेरित असाच इतिहास लिहिला जात असल्याने आम्हाला तटस्थ इतिहासच नाही. इतिहास आम्हाला संघर्षासाठी, जातीय महत्तांसाठी हवा असतो. इतिहास आपल्या गतीत घडून गेलाय...तो तुमच्या सोयीसाठी घडलेला नाही हे लक्षात घ्यायला हवे. सोयीने कोणाचे उदात्तीकरण करायचे नि कोनाला बदनाम करायचे वा दुर्लक्षित ठेवायचे हे धंदे इतिहासात चालत नाही याचे भान आपल्याला नाही.
५. समतेचा, स्वातंत्र्याच्या सिद्धांतापासुनही आम्ही कोसो दूर आहोत. आम्हाला आपल्या जाती सोडा, जातींअंतर्गतच्या पोटजातीतही समत्वाची भावना आजही आणता आलेली नाही. भटक्या-विमुक्तांसारख्या वंचित-शोषित जातींच्या प्रश्नांचा स्पर्षही आमचा तथाकथित संवेदनशिल मनांना होत नाही. आम्ही स्वत:ला धार्मिक समजतो. पण ज्याने यच्चयावत विश्व निर्माण केले त्या देवालाही आम्ही भिकारी बनवून टाकले. हा आमचा उद्दामपणा आहे. यच्चयावत विश्वातील कणाकणात परमेश्वर भरलेला आहे असे आम्ही एकीकडे म्हणतो आणि माणसांबद्दलच एवढे निघृण होतो. आजही अनेक मंदिरांत दलित अथवा स्त्रीयांना प्रवेश नाही. पानवठ्यांचीही हीच कहानी आहे. संताची वचने सोयीनुसार फेकायला आम्हाला लाज वाटत नाही, पण मानवतेबद्दलचा त्यांचा कनवाळुपणा आम्हाला शिकावासा वाटत नाही. देव-धर्म मानावी कि न मानावा, हा व्यक्तिगत प्रश्न असला तरी ही दांभिकता आमच्यात कोणी भरली?
६. आम्हाला जागतिकीकरणाचे आव्हान अजुनही नीटसे उमगले नाही. हे आव्हान नुसते जगण्याचे, पोट भरण्याचे नाही तर बदललेल्या परिस्थितीला समजावून घेत तीवर स्वार होत तिचा लगाम हाती घेण्याचे आहेत. खेड्यांचे खेडेपण शहरांनी आणि शहरांतील काही उपयुक्त मुल्ये खेड्यांनी घ्यायची गरज आहे. हे होत नाही. उलट दोहोंतील दरी वाढत चालली आहे व ते एकमेकांकडे साशंकतेने, असुयेने तर कधी द्वेषाने पहात आहेत. खरे तर निरंतर अभिसरणाची, चुका दूर मरत नवी उदात्त मुल्ये निर्माण करण्याची गरज आहे. ६५% खेड्यांतील जनता जोवर वैचारिक समृद्ध होत नही तोवर महासत्ता बनता येणे शक्य नाही.
७. आधुनिक साधनांनी जग आमच्या हातात, मोबाईलवरील इंटरनेटमुळे, आले आहे. पण आम्ही त्या जगाच्या उघड्या खिडकीकडे पाठ वळवत आमच्या विकृत्यांचा उन्माद-उच्छाद मांडण्यासाठी त्याचा उपयोग करीत आहोत. याला प्रगल्भ भारत म्हणता येत नाही. किमान आम्ही ’विद्यार्थी’ भारत तरी बनु का? प्रश्नच आहे ...उत्तर आपल्यालाच शोधावे लागेल.
(जवळपास दीड तास मी बोललो. अजुनही खूप मुद्दे होते. पण लक्षात राहिलेले हे. सावली प्रतिष्ठानच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा!)

49 comments:

 1. Fully agreed with you, Sanjay. Especially on point 3 and 6.

  ReplyDelete
 2. आप्पा - हे बघ बाप्पा , आपण काही हाडाचे लेखक नाही पण , संजयचे भाषण वाचून काहीतरी प्रतिक्रिया द्यावीशी वाटते .
  बाप्पा - अहो बोला आप्पा , संकोच करू नका , त्यासाठी तर हा ब्लोग आहे , असावा , कारण ज्याना नवीन विचार सुचतात पण जे गर्दी जमवू शकत नाहीत त्याना इथे नेहमीच वाव असतो .
  आप्पा - हे सर्व वाचताना , आपण दोन गोष्टींचा संदर्भ कायम राखत चर्चा केली तर ?
  बाप्पा - कोणता ?
  आप्पा - अमेरिका आणि चीन या महासत्ता ! - एक मूळची सुपीक आणि दुसरी प्रयत्नांनी बनलेली !
  आणिक एक जुना जो वाद होता टिळक आगरकर यांचा - तो पण विचारात घेतला तर ?
  बाप्पा - अगदी योग्य मुद्दा आहे . पण एक लक्षात ठेव एकीकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि दुसरीकडे मुस्कुट दाबी आहे आहे !एकीकडे लोकसंख्या कमी आणि रिसोर्सेस मुबलक आणि दुसरीकडे अमाप लोकसंख्या आणि तोकडे रिसोर्सेस !
  आप्पा - आधी स्वातंत्र्य हवे , सुराज्य आपोआप येईल हे खरे का आधी सुराज्य , मग स्वातंत्र्य आपोआप मागितले जाइल !नेमके काय खरे ?
  बाप्पा - भारताचा विचार करताना मुख्यत्वाने जाणवते की इतिहासाचा पगडा इतका आहे आपल्यावर की त्याचा अडथळा निर्माण होतो आपल्या प्रगतीत . ब्रिटीश गेले ते संस्थानिकाना स्वातंत्र्य देऊन , आणि प्रश्न निर्माण झाला ,
  आप्पा - अरे बाप्पा कुठे वहावत चाललास रे तू ?
  बाप्पा - सहाजिक आहे , आपला इतिहास आहे तसा चीनला पण आहे , चीन बघता बघता महासत्ता बनला आणि आपण नुसते बघत बसलो , लोकसंख्या दोन्हीकडे सारखीच असे मानले तर हे का आणि कसे घडले ?राजकीय बांधणी आणि इच्छाशक्ती दोन्ही चीनकडे आहे , आणि आपण व्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म स्वातंत्र्य अशा गोष्टींचा बाऊ केला . चीन मध्ये काय अविकसित नाहीत काय ? पण त्यांनी एक ध्येय ठेवले आपल्या देशाचे हित संबंध कसे जपायचे ते त्याना चांगले माहित आहे , त्यांनी तिबेट अलगद घशात घातला , नवीन रेल्वे मार्ग बांधले , प्रचंड रस्ते निर्माण केले
  आप्पा - नुसत्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असे म्हणून चालणार नाही , जनतेला हक्कांची जाणीव आहे का नाही तो भाग वेगळा , आज चीनला जगात मान आहे , तो आपल्याला मिळू शकत नाही - असे का ?आपण नुसतेच चर्चा करतो , आपल्याकडे विकासाला वातावरण नाही . स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव असे बुडबुडे सोडले आणि शांततेसाठी कबुतरे सोडली की आपण कृतार्थ मनाने लाथाळी करायला मोकळे !मुळात महासत्ता बनण्याच्या लायकीचे आपण नाही हेच सत्य आहे , तो आपल्या समाजाचा पिंड नाही , चीनला तसा इतिहास आहे , आपण ग्राम्राज्ये निर्माण केली आपल्या महासत्ता म्हणजे नंद आणि मौर्य !जागतिक महासता हे स्वप्न आपल्याला पडलेच नाही , इतिहास हेच आपल्याला शिकवतो .
  बाप्पा - मोक्षाची चिंता करत आपण वैदिक , शैव , बौद्ध आणि जैन विचारात गुंतून पडलो हे सत्य आहे . जगावर वैचारिक सत्ता लादण्याचेही आपल्याला कधी सुचले नाही . आजही आपण काय आहोत ? अंतर राष्ट्रीय बातम्यात आपल्याला काय स्थान असते ते बीबीसी किंवा सिएनएन पाहताना समजते . आपण विचाराने आजही इंग्रजांचे गुलामच आहोत !त्यांचे क्रिकेट हाच एकमेव खेळ आपण मनापासून जोपासला आहे .
  आप्पा - आपण महासत्ता बनू शकतो का ?
  बाप्पा -स्वप्नातही नाही ! ती काळाची गरजाही नाही . आपण गुलाम प्रवृत्तीचे आहोत हेच खरे ! आपण कान फाटके , फितूर आणि आळशी , असे इतिहास सांगतो !

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
  Replies
  1. I appreciate your views....!! Thank You

   Delete
  2. I appreciate your views....!! Thank You

   Delete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 6. आप्पा- आम्ही सकाळी फर्ग्युसन टेकडीवर फिरायला जातो त्यावेळी हमखास गोपाल कृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाजाच्या स्तम्भापाशी टेकतो ,सूर्योदयापूर्वी झोपलेले पुणे बघायला छान वाटते .
  बाप्पा -एक उनाड आगंतुक कुत्रे फर्ग्युसन रोड पासून कधीकधी आमच्या मागे येते ते थेट आमच्या घरा पर्यंत ! कितीही हाकला , तरी ते मागेमागेच येते , त्याला कितीही हुलकावण्या दिल्या तरी ते परत परत आमच्या मागेच येते , आम्ही रेंगाळलो की ते रेंगाळते !आम्ही त्याला सांगितले की आम्ही संघात जात नाही , आम्हाला मोडी पटत नाहीत , तरी पालथ्या घड्यावर पाणी ,आम्ही त्याला म्हटले की घाग्गर म्हणजेच सरस्वती नदी तरी काही उपयोग नाही ,
  आप्पा - त्याला " अविनाश " अशी हाक मारून बघ ना ! लगेच शेपटी हलवायला लागेल . नक्कीच पाटसकरकडचे असणार !आता भाद्रपदात काय करते बघुया . तो महिना त्यांचा हक्काचा असतो म्हणे . जरा जपून हं !
  बाप्पा -तू फारच टिंगल करत असतोस . म्हातारा माणूस आहे . सांभाळून घे !
  आप्पा - अरे हा आगंतुक माणूस किती आचरट आहे ? म्हातारा म्हणून खांद्यावर घेतला तर तो कानात घालायला लागतो -विषय काय आणि हा काय बडबडतो आहे ?
  आपला देश कधी महासत्ता होऊ शकेल का ? कोणीही आंबेडकर पुतळ्यापाशी बसलेले शेंबडे पोरागेपण सांगेल , इंडिया आणि महासत्ता ? काय डोक फिरलं का ? पण
  संघिष्ट पाटसकर चे डोळे उघडत नाहीत . हा पाटसकर उगाच उकरून उकरून वैदिक वैदिक चिवडत बसला आहे . संजय चावला की काय त्याला ?
  बाप्पा - अगदीच उद्योग नसेल तर , मोहनजो दारोची लिपी सोडवून दाखव ! म्हणजे संजय पण खुश आणि ब्लोगवर घाण करायची पण टळेल !

  ReplyDelete
 7. आप्पा - अमितने संजयचे कौतुक केलय ते पाहून आम्ही उडालोच !
  बाप्पा - बरे झाले ना ! संजयने त्याला क्षुद्र जंतू म्हटल्या पासून तो एकदम सुधारला ! हेही नसे थोडके .
  आप्पा - आमचा अमित ७ वी च्या स्कॉलरशिप ला बसल्यावर खूपच निवळला .
  बाप्पा - त्याचे विचार चांगले आहेत , पण त्याचा एक महिन्याचा पगार जणू संजयने बुडवल्या सारखा तो संजयला त्रास देत असतो ,
  आप्पा - अरे हल्ली बाल कामगार ठेवत नाहीत ना कायद्याने , म्हणून संजयने नको सांगितले , पण हा जो उखडला तो सारखा हात धुवून मागेच लागला . आता ठीक वाटतो , आपला संजय काही इतका वाईट नाही , बर का अमित , त्याने एक अख्खी घग्गर नदी , आणि सरस्वतीचे रहस्य सोडवले आहे , आता संजय मुठा नदी शोधणार आहे ,
  बाप्पा - म्हणजे रे काय अप्पा - मुठा का परत परत शोधायची ?
  आप्पा - अरे मुठा आहेच कुठे ? आहे ते गटार . संजयने युरोपात एका विद्यापीठाच्या मदतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या परत गटारातून शोधून त्याचा नकाशा मूळ प्राकृतात बनवायचे जाहीर केले आहे . अट एकच आहे त्या पाटसकर ला आवरा , हा काहीच काम करून देत नाही .
  बाप्पा - मग चला तर आता , आपण पाटसकरला गंगा आणि मोदी आणि गंगेची सफाई बद्दल सांगून त्याला फसवून संजयच्या ब्लोग पासून लांब नेउया म्हणजे संजयचा थेसिस शांत वातावरणात जन्माला येईल !
  आप्पा - चल अविनाश ! हे एवढ दुदू पी आणि चला चाल चाल करत , मेघदूताच्या मार्गानेच आपण जाउया !

  ReplyDelete
 8. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 9. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 10. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 11. कोणीतरी आवर घाला हो ह्या पाटसकराला, आता मात्र याने कमालच केली आहे. काय त्याची भाषा? काय त्याचे विचार? काय हा त्याचा हजरजवाबी पणा? वैताग आणला आहे याने! लोकांनी समजविल्यावर डोक्यात काही तरी प्रकाश पडेल असे वाटत होते, पण दुसऱ्यांचे ऐकून घेईल तर तो पाटसकर कसला? ह्या पाटसकराला कोपरापासूनच नव्हे तर साष्टांग दंडवत जरी घातले तरी काही उपयोग होईल अशी सुतराम शक्यता वाटत नाही! शेवटी पालत्या घड्यावर पाणी! दुसरे काय? किती त्रास द्यायचा लोकांना? पाटसकर असे नको रे करू, शहाणा बन बाळा शहाणा बन!

  ReplyDelete
 12. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 13. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 14. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 15. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 16. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 17. माननीय पाटसकर साहेब नमस्कार ,
  आप्पा हे मुगभाट लेन , हरकुंवर बाईची चाळ , गिरगाव इथे ४० वर्षे राहत असत , मूळचे ते इंदूरचे ! , सरकारी कामा निमित्त त्या नंतर त्यांचे वास्तव्य लिस्बन ला होते . स्वातंत्र्यवीर मस्काऱ्हीनस आणि मोहन रानडे याना सोडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे . ते वैदिक असणे शक्य नाही , कारण ते सीकेपी आहेत
  बाप्पा हे हल्ली बालगोविंद हौसिंग सोसायटी दादर इथे असत , त्यांचे शिक्षण पुण्यात झाले त्यामुळे ते पुण्याचे वर्णन इतके अचूक करत असावेत . हे पहिल्या महाराष्ट्र सरकारचे उच्च अधिकारी होते . पुण्याच्या पानशेतच्या पुरानंतर कै . स गो बर्वे यांच्या बरोबर त्यांनी डेप्युटेशन वर बरेच काम केले होते . हे मूळचे आंग्रे घराण्यातले , पण स्थाईक प्रथम सांगली आणि नंतर दादर !त्यामुळे हे दोघे वैदिक असायची सुतराम शक्यता नाही इतके मी सांगू शकतो ।
  पूर्वी दैनिक सकाळ मध्ये आप्पा बाप्पा असे विनोदी कार्टून येत असे त्यावरून त्यांच्यापैकी एकाने या ब्लोग वर लिहिण्यास सुरवात केली असावी आणि वय तर्काने ७५ ते ८० असावे असा अंदाज आहे .
  यापुर्वू त्यातील एकाने आपला दूरध्वनी नंबर या ब्लोग वर दिला होता त्यावरून मी कुतुहलाने त्यांच्याशी गोष्टी करून राहिलो आणि ही माहिती आठवणीत होती ती सांगितली इतकेच .
  धन्यवाद !

  ReplyDelete
 18. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 19. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 20. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 21. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
  Replies
  1. This comment has been removed by the author.

   Delete
 22. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 23. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 24. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 25. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 26. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 27. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 28. साम्यवाद आणि भ्रष्टाचार ह्यांचा काय संबंध आहे? ह्यावर मी केलेला अभ्यास इथे देत आहे.... विलंबाबद्दल क्षमस्व... शिवाय मला कोणाचाही ब्लोग हायजाक करायची इच्छा नाही, मला सत्य शोधायचे आहे.. म्हणून हि धडपड करत आहे.

  ReplyDelete
 29. श्री रा रा पाटसकर
  आपला लेख नवीन पिढीला आवडेल असे वाटते
  चीनने केले ते चूक आहे की बरोबर असा एक प्रश्न जर नवीन पिढीला पडला तर ?
  आपली सत्ता बळकट करणे आणि त्यासाठी साम दाम दंड भेदाने आपल्या हितांचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य असते असे सांगणारे अनेक संस्कृत श्लोक असतील . त्यामुळे चीनचे चुकले असे म्हणण्यास वाव कमी आहे असे म्हणावेसे वाटते .
  चीन युद्धाच्या वेळेस कम्युनिस्ट पक्षाने काय दिवे लावले हे सर्वाना माहीतच असेल , पण , तरीही आपण नव्याने त्याची तोंड ओळख तरुणाना करून दिली हे चांगले झाले . नेहरू हे आतबट्ट्या चे राजकारण करणारे होते हे ऐकून विषाद वाटतो , मुलांचे चाचा नेहरू , गुलाब आणि नेहरू , उच्च तत्वे जपणारे नेहरू , राणी एलिझाबेथचे बूट जपणारे नेहरू आणि पंडित ही उपाधी लावणारे नेहरू , अशा या सर्व नेहरूंनी भारताचे हित किती आणि कधी आणि कसे साधले हा प्रश्न पडतो .
  आजही चौ एन लाय आणि नेहरू एकाच जीप मधून पाहिलेले स्पष्ट आठवते
  टाईम्स मधून आर के लक्ष्मण यांची कार्टून्स आठवतात . आपल्या पहिल्या पंत प्रधानाने आपणास नेमके काय दिले यावर संजय सोनावणी यांनी किंवा आपण एक लेख लिहावा हि नम्र विनंती .
  पं नेहरूंच्या काळात भ्रष्टाचाराची लागण झाली का ?
  क्रोफार्ड हा इंग्रज अधिकारी , ज्याच्या नावाने आज मुंबईत मार्केट आहे , तेंव्हा पासून भ्रष्टाचार आहे असे रेकोर्ड वरून दिसते .
  स्वराज्य मिळवण्या पूर्वी आपल्या नेत्यांनी इंग्रज अमलात भ्रष्टाचार निर्मुलना बद्दल आग्रह धरला का ? आधी सुराज्य म्हणणारे आगरकर याबाबत गप्प दिसतात - ते का ?

  ReplyDelete
 30. राम राम संजय .
  नरहर कुरुंदकर यांची रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भाषणे झाली त्यांची क्लिप नेटवर मिळते ती अत्यंत श्रवणीय आहे , छत्रपति शिवाजी यांच्या जन्म तिथी बद्दल संदर्भ घेत त्यांनी अतिशय मार्मिक मते उधृत केली आहेत , तसेच जवळ जवळ आजकाल प्रत्येक जातीने आपापल्या जातींच्या थोर पुरुषांच्या वाटण्या कशा करून टाकल्या आहेत त्यावरचे त्यांचे भाष्य वेदना देणारे आहे . आपला समाज एकजिनसी जगतो का ? आणि का नाही एकजिनसी जगू शकत ? असा प्रश्न आहे .
  इतिहास संशोधनाची व्याख्या आणि इतिहास संशोधकांचे अहंभाव याबद्द्दल सांगत त्यांनी परमानंद पासून सेतू माधव पगडी यांच्या पर्यन्त अतिशय मार्मिक वर्णन केले आहे .
  संजय सोनवणी यांनी विचारलेला प्रश्न आम्ही कृतघ्न आहोत का त्याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे .
  आम्ही कृतघ्न आहोत . पण ते कशामुळे याचा विचार केला तर हाती काय लागते ?
  संजयची काहीकाही वाक्ये दिशाभूल करणारी आहेत . महासत्ता होण्यासाठी द्न्यांसात्ता मिळवावी लागते हे खरे नाही . चीनची प्रगती याला दुजोरा देत नाही . देशाची धोरणे आखणारे नेते आणि त्यांची दूरदृष्टी आणि जाज्वल्य इच्छाशक्ती यामुळेच महाशक्ती होण्याची वाटचाल सुरु होते . माओने अनेक चुका केल्या , जशा आपल्याकडे नेहरूंनी केल्या , पण त्या पचवून आज चीन कुठे पोचला आहे ? तिथे धार्मिक भावनांचे अवडंबर नाही , अल्प संख्यांक लोकाना कुरवाळणे नाही कारण निवडणुका नाहीत ,
  आपली निम्मी शक्ती एकमेकांवर कुरघोड्या करण्यात खर्च होते . त्यांच्याकडे इंग्रजी बोलणारा वर्ग अत्यंत कमी आपल्याकडे त्याउलट , पण तो वर्ग मूळ विचार धारेशी सहकार्य करणारा नाही , आपल्याकडे इलाइत वर्ग उगीच मेणबत्या पेटवून प्रकाशात रहाण्याचा प्रयत्न करत असतो , त्यांच्या स्वातंत्र्याची आस बेगडी आहे . केजरीवाल , शबाना आझमी , अरुंधती राय अशी शेकडो उदाहरणे आहेत . सिने नट नट्या आणि त्यांची भन्नाट जीवनशैली हे आपले आदर्श आहेत .
  आपण आपले कर्तव्य , आपले आरोग्य , आणि आपला देश यासाठी किती वेळ देतो ?चीनमध्ये जमीन एखाद्या प्रकल्पासाठी हवी असेल तर आपल्या सारखे उपटत नाहीत , त्यामुळे प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण होतात आणि आपल्याकडे टाटा सारख्या उद्योजकाला बंगाल मधून केवळ नेत्यांच्या अहंभावामुळे काढता पाय घ्यावा लागतो , मग आपण असा वेळ पैसा आणि श्रम वाया घालवत असू तर आपण कशी महासत्ता बनणार ? आपला हा जगन्नाथाचा रथ कोण ओढतो हे रहस्यच आहे .

  ReplyDelete
 31. आप्पा - भ्रष्टाचार हा आर्य चाणक्यापासून इथे अस्तित्वात आहे .
  बाप्पा - कदाचित मोहन्जोदारो पासून असेल रे , सनजचा विचार कर ना जरा .
  आप्पा - सॉरी ,सॉरी , असेल असेल , वैदिकात तर नक्कीच भ्रष्टाचार असणार , ते तर विचारानेच भ्रष्ट , बहुजनांचे देव चोरून आपल्याला हिंदू म्हणवून घेणारे .
  बाप्पा - वैदिकांनी समता स्वातंत्र्य शिकवलेच नाही , फक्त गुलामी शिकवली , ती जमीनदार लोकांच्या फायद्याची होती त्यामुळे त्यांनी त्याला खतपाणी घातले , राज्य रक्षण करणारे - तेपण वैदिकाना सामील , सामान्य जनता जागी झाली तर त्यांची गादी जाइल , थोडक्यात सवर्ण जगाला स्वातंत्र्य समतेचे मुळातच वावडे , त्यामुळे वैदिकांच्या धर्म कृत्यांना राज्यकर्ते आणि सरंजामदार यांनी खतपाणी घालत तो धर्म जागवला , यज्ञ संस्था बळकट केली .
  आप्पा - मग नेमके चुकले कोठे ?कारण आज सवर्ण वर्ग जुन्या देवता जपत , नवनवीन देवता जोपासतो आहे !
  आप्पा -भारतीयांचा धर्म हा आवडता विरंगुळा आहे , आपण नवीन काही करण्यापेक्षा जुन्याचेच ढोल बडवायला पुढे असतो ,
  बाप्पा - अन्न वस्त्र निवारा या मनुष्याने निर्माण करायच्या असतात हे विसरून त्यासाठी आपण देवालाच साकडे घालत असतो , ते बरोबर आहे का ?
  आप्पा - तेच तर आपला संजय शोधतो आहे !

  ReplyDelete
 32. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 33. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 34. माणसांना चिलटांची किमत आली आहे. धर्म राजकारण आणि गुन्हेगारी यांच्या जिवावर मोठे झालेल्यांनाच आता इथं नीट जगता येतं असं चित्र आहे न बाकी बहुसंख्य जनता कवडीमोलाची राहिली नाही. तर मग या देशाला महासत्ता कशासाठी आणि कुणासाठी व्हायचं आहे? नैतिकता आणि आदर्शांचा आता पत्ता नाही. राजकीय पक्ष आणि पुढारी रोज रोज नवनवी असत्यं बोलून दिवस ढकलतात. तत्वं, तत्वनिष्ठा या गोष्टींची कधीचीच राखरांगोळी झालीय. सत्तेचा खेळ खेळायला न् स्वत:च्या पोळ्या भाजून घ्यायला इथले पुढारी आणि नागरिक तत्वांच्या वल्गनाच आता करीनासे झालेत. सगळे राजकीय पक्ष आता एकसारखेच झालेयत आणि त्यांच्यात देशाचा विकास करण्याऐवजी जनतेला जन्ताएवढीही किमत न देता फक्त वापरणं चाललंय. राजकीय पक्षांच्या सामाजिक बांधिलक्या संपल्यात आणि ते आता फक्त सत्तेचे हावरे दलाल लोक राहिले आहेत. राजकारण हा श्रीमंत होणं, अधिकाधिक श्रीमंत होण्याचा व्यवसाय झाला आहे. इथल्या जातीजातींच्या आणि धर्मांधर्मांच्या मारामा-या कधीच थांबणार नाहीत, हे आता लख्ख स्पष्ट आहे. आणि मुळात आता देशातचं नाही सर्वत्र अनाचार बेबंद माजलाय आणि अनाचार, सर्व प्रकारची भ्रष्टता हेच इथलं जगणं झालंय. जो तो दुस-याला ओरबाडयतोय. आपल्याबरोबर दुस-याचंही शांत, सुखी जगणं कुणालाच मान्य नाही. इथले सगळेच्या सगळे लोक मानसिकेतनं कंगाल आणि लफंगे झाले आहेत. देशाच्या सगळ्याच क्षेत्रांचं सगळंच दुय्यम दर्जाचं, खोटं खोटं, नकली, फसवणुकीचं, बदफैली असं सुरू आहे. अस्सलता, जातिवंतपणा, दर्जेदारपणा, कसदारपणा, खरेपणा आणि सहानुभूतीशील माणुसकी यांचा निखळ आणि ठणठणीत दुष्काळ पडलेला आहे. आज देश म्हणून आपण जे मानतो, तो फक्त भूमीनं अस्तित्वात आहे, पण इथली माणसं या देशाची आहेत का आणि देशासाठी खरेपणानं काही करताहेत का? देशावर प्रामाणिक प्रेम करतायत का? देशाचा आणि माणुसकीचा प्रत्येक कायदा काटेकोरपणे पाळतायंत का? सगळा बेगडी आणि भोंदू बुजबुजाट झाला आहे. या बुजबूटालाच महास्ततेची वांझ स्वप्नं पडतायत.
  ज्या देशाला देशातल्या शेवटच्या माणसाच्या जगण्याच्या मूलभूत आणि नैतिक गरजा भावगता येत नाहीत तो देश कसला बोडक्याचा महासत्ता होणार? आणि तो महासत्ता होऊन उपयोग तरी काय?
  आधी या देशानं पायाखालची जमीन दुरुस्त, तंदुरुस्त, नैतिक, निर्मळ, निरोगी, आदर्श करावी न मग महासत्ता होण्याच्या गप्पा माराव्यात. तोवर काल्पनिक गाजरांची पिकं काढण्यात अर्थ नाही.

  ReplyDelete
 35. भारत महासत्ता बनेल का, असा प्रश्न आपल्यासमोर आहे. केवळ या एका प्रश्नाच्या अस्तित्वाने देशातला एक वर्ग उल्हसित झालेला दिसतो. मात्र, नक्षलवाद्यांनी उभं केलेलं आव्हान, हिंदुत्ववाद्यांचे कावेबाज डावपेच, कधी काळी उदार आणि प्रामाणिक असलेल्या मध्यममार्गाची अधोगती, श्रीमंत आणि गरिबांमधली वाढती दरी, बाजारशरणतेतून माध्यमांची झालेली घसरण आणि बहुपक्षीय सरकारांच्या अस्तित्वामुळे निर्माण झालेली अस्थिरता व सुसंगत धोरणांचा अभाव, ही अशी सात प्रमुख कारणं आहेत, ज्यांच्यामुळे भारत महासत्ता बनू शकणार नाही. इतिहासाचा एक अभ्यासक या नात्याने माझं हे वस्तुनिष्ठ निरीक्षण आहे. याशिवाय, या देशाचा एक नागरिक म्हणून माझं असं प्रामाणिक मत आहे की, भारताने महासत्ता होण्याचा प्रयत्नदेखील करू नये!
  सकल राष्ट्रीय उत्पादन, “फोर्ब्स’ किंवा “फॉर्च्युन’ मासिकांच्या यादीत झळकलेल्या अब्जाधीशांची संख्या, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या किंवा एकूण शस्त्रास्त्रसाठ्यात असलेली अण्वस्त्रांची संख्या, अशा निकषांच्या आधारावर जगातल्या देशांचं मूल्यमापन करून जागतिक क्रमवाऱ्या जाहीर होत असतात. माझ्या मते, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे स्पर्धा परीक्षा नव्हेत. अशा क्रमवाऱ्यांमधून कोणापेक्षा कोण किती मोठं, अशी चढाओढ दिसते. दुर्दैवाने भारतातल्या अभिजनवर्गाला आणि विशेषतः इंग्रजी वृत्तमाध्यमांना अशा चढाओढीची चटक लागल्याचं दिसतं.

  ReplyDelete
 36. आप्पा - मी भारतीय यांचे मनापासून अभिनंदन !
  बाप्पा - अत्यंत उच्च शब्दात आपण सुंदर विश्लेषण केले आहे , आपले कौतुक केले पाहिजे . आपल्या लिखाणातला एकही शब्द टाकाऊ नाही , किंवा एक शब्द जरी गाळायचे म्हटले तरी गाळू शकत नाही , प्रत्येक वाक्यरचना चपखल आहे मी भारतीय यांना एक विनंती आहे की त्यांनी भारतीय मानसिकते बद्दल लिहावे . इथे जो द्वेष पेरला गेला आहे तो जाणून बुजून आहे हे तर खरे आहेच , पण त्याचा शेवट काय होणार ?
  आप्पा - आपण कधीही सुपर पॉवर होऊ शकत नाही असे आम्हीही म्हणत असतो , इथला मध्यमवर्ग याला किती जबाबदार आहे ?या देशाचा कणा इंग्रजी सत्ते नंतर शेतकरी होता का मध्यमवर्ग ?कारण देशएकत्र बांधणे हा प्रकार इंग्रजांनी केला हे नाकारता येत नाही , त्यांनी या देशाला एक पद्धती दिली , पोस्ट रेल्वे , पी डबल्यु डी ,कवायती सैन्य , अंतर राष्ट्रीय ओळख , याबाबत त्यांचे काम बरेच आहे त्यापूर्वी आपण आपली धार्मिक मुल्ये घेऊन जगत होतो , पण इंग्रजांनी आपल्याला इंग्रजी भाषा दिली , आणि मध्यम वर्ग जन्माला घातला .
  बाप्पा - तो त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी निर्माण केला हे जरी मान्य केले तरी , पण त्याचे महत्व अफाट आहे . अनेक चळवळी मध्यम वर्गाशिवाय यशस्वी झाल्या नसत्या हेही नजरेआड करता येत नाही . टिळक गांधींच्या काळात त्यांच्या अग्रलेखांचे सामुदायिक वाचन आणि चर्चा या मध्यमवर्गा कडून होत असे -पण हाच मध्यमवर्ग आरक्षणाच्या बडग्याने कोलमडला का ?त्याचा कणाच मोडला गेला तो शास्त्रोक्तपणे का अनवधानाने ? समाजवाद जोपासण्यात मधम वर्गाचा वाटा काय आहे ?
  आप्पा - इथे समाजवाद रुजला तोच विकृत ध्येये ठेवून ? नेहरुना इथले स्वातंत्र्योत्तर
  समाजकारण हाताळता आले नाही . त्यांच्या आत्म केंद्रित राजकारणाने देशाला अनेक संकटाना सामोरे जावे लागले . आपण महासत्ता बनू शकत नाही याचे दुसरे कारण आपण मुस्लिम प्रश्न कुजत ठेवला , नव्हे अनेक प्रश्न आपण कुजातच ठेवत आलो , त्यामुळे असंतोष धुमसत जाउन राष्ट्रीय प्रश्नांवर एकत्र येण्याचा गंभीरपणा संपला आणि एक निरोगी लोकशाही राबवण्याचे स्वप्न कायमचे भंगले . नंतर सत्तेच्या राजकारणाने असंतुष्ट लोकाना एकत्र आणताना जाती , गरिबी आणि वर्ग विग्रह यांच्या नावाखाली अनेक अव्यावहारिक स्वप्ने रंगवण्याची परंपराच निर्माण होत गेली , अनेक पक्ष निर्माण झाले , मोडले , पण समाजमन जे जातीच्या युद्धात गुरफटले ते कायमचेच , आता या विषावर उतारा नाही !
  बाप्पा - सर्वात अल्पसंख्य पण सर्वात बुद्धिमान असा ब्राह्मणवर्ग अशा चमत्कारिक परिस्थितीमुळे राजकारणापासून अलग झाला आणि त्यांचे मार्ग बदलले . हे कोणाचे अपयश आहे ?आपण नेहमी पटकन ब्राह्मण वर्गाला दोष देत असतो , तिलाकाना तेल्या ताम्बोल्यांचे पुढारी म्हणत असत , सावरकरांचे विचार तर आपल्याला झेपलेच नाहीत , पण आपण सोयीस्करपणे ब्राह्मण वर्गावर समाजाच्या अंतर कलहाच्रे खापर फोडतो -
  आप्पा - आम्ही परत एकदा मी भारतीय चे अभिनंदन करतो आणि त्यांनी अशा चर्चेत अधिक भाग घेत राहावा अशी नम्र विनंती करतो , कारण आजकाल इथे अशा लोकांचा दुष्काळ आहे . आणि म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काल सोकावतो अशी परिस्थिती आहे , पाटसकर नावाचा फालतूपणा हा ब्लोग विनोदी बनवण्याचे काम मात्र नियमित करत आहे .

  ReplyDelete
 37. आप्पा - मी भारतीय यांचे मनापासून अभिनंदन !
  बाप्पा - अत्यंत उच्च शब्दात आपण सुंदर विश्लेषण केले आहे , आपले कौतुक केले पाहिजे . आपल्या लिखाणातला एकही शब्द टाकाऊ नाही , किंवा एक शब्द जरी गाळायचे म्हटले तरी गाळू शकत नाही , प्रत्येक वाक्यरचना चपखल आहे मी भारतीय यांना एक विनंती आहे की त्यांनी भारतीय मानसिकते बद्दल लिहावे . इथे जो द्वेष पेरला गेला आहे तो जाणून बुजून आहे हे तर खरे आहेच , पण त्याचा शेवट काय होणार ?
  आप्पा - आपण कधीही सुपर पॉवर होऊ शकत नाही असे आम्हीही म्हणत असतो , इथला मध्यमवर्ग याला किती जबाबदार आहे ?या देशाचा कणा इंग्रजी सत्ते नंतर शेतकरी होता का मध्यमवर्ग ?कारण देशएकत्र बांधणे हा प्रकार इंग्रजांनी केला हे नाकारता येत नाही , त्यांनी या देशाला एक पद्धती दिली , पोस्ट रेल्वे , पी डबल्यु डी ,कवायती सैन्य , अंतर राष्ट्रीय ओळख , याबाबत त्यांचे काम बरेच आहे त्यापूर्वी आपण आपली धार्मिक मुल्ये घेऊन जगत होतो , पण इंग्रजांनी आपल्याला इंग्रजी भाषा दिली , आणि मध्यम वर्ग जन्माला घातला .
  बाप्पा - तो त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी निर्माण केला हे जरी मान्य केले तरी , पण त्याचे महत्व अफाट आहे . अनेक चळवळी मध्यम वर्गाशिवाय यशस्वी झाल्या नसत्या हेही नजरेआड करता येत नाही . टिळक गांधींच्या काळात त्यांच्या अग्रलेखांचे सामुदायिक वाचन आणि चर्चा या मध्यमवर्गा कडून होत असे -पण हाच मध्यमवर्ग आरक्षणाच्या बडग्याने कोलमडला का ?त्याचा कणाच मोडला गेला तो शास्त्रोक्तपणे का अनवधानाने ? समाजवाद जोपासण्यात मधम वर्गाचा वाटा काय आहे ?
  आप्पा - इथे समाजवाद रुजला तोच विकृत ध्येये ठेवून ? नेहरुना इथले स्वातंत्र्योत्तर
  समाजकारण हाताळता आले नाही . त्यांच्या आत्म केंद्रित राजकारणाने देशाला अनेक संकटाना सामोरे जावे लागले . आपण महासत्ता बनू शकत नाही याचे दुसरे कारण आपण मुस्लिम प्रश्न कुजत ठेवला , नव्हे अनेक प्रश्न आपण कुजातच ठेवत आलो , त्यामुळे असंतोष धुमसत जाउन राष्ट्रीय प्रश्नांवर एकत्र येण्याचा गंभीरपणा संपला आणि एक निरोगी लोकशाही राबवण्याचे स्वप्न कायमचे भंगले . नंतर सत्तेच्या राजकारणाने असंतुष्ट लोकाना एकत्र आणताना जाती , गरिबी आणि वर्ग विग्रह यांच्या नावाखाली अनेक अव्यावहारिक स्वप्ने रंगवण्याची परंपराच निर्माण होत गेली , अनेक पक्ष निर्माण झाले , मोडले , पण समाजमन जे जातीच्या युद्धात गुरफटले ते कायमचेच , आता या विषावर उतारा नाही !
  बाप्पा - सर्वात अल्पसंख्य पण सर्वात बुद्धिमान असा ब्राह्मणवर्ग अशा चमत्कारिक परिस्थितीमुळे राजकारणापासून अलग झाला आणि त्यांचे मार्ग बदलले . हे कोणाचे अपयश आहे ?आपण नेहमी पटकन ब्राह्मण वर्गाला दोष देत असतो , तिलाकाना तेल्या ताम्बोल्यांचे पुढारी म्हणत असत , सावरकरांचे विचार तर आपल्याला झेपलेच नाहीत , पण आपण सोयीस्करपणे ब्राह्मण वर्गावर समाजाच्या अंतर कलहाच्रे खापर फोडतो -
  आप्पा - आम्ही परत एकदा मी भारतीय चे अभिनंदन करतो आणि त्यांनी अशा चर्चेत अधिक भाग घेत राहावा अशी नम्र विनंती करतो , कारण आजकाल इथे अशा लोकांचा दुष्काळ आहे . आणि म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काल सोकावतो अशी परिस्थिती आहे , पाटसकर नावाचा फालतूपणा हा ब्लोग विनोदी बनवण्याचे काम मात्र नियमित करत आहे .

  ReplyDelete
 38. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 39. आप्पा - तुमच्या तोंडी लागण्यापेक्षा तुमची क्षमा मागणे जास्त सोपे आहे
  बाप्पा - म्हणून आमचे चुकले असेल त्याला क्षमा करा .
  आप्पा - आम्ही पानशेतच्या पुरात भरपूर क्षत्रीयता दाखवत , जिवावर उदार होत समाजाला मदत केली , पोहत जाउन अनेकाना घराबाहेर पडायला मदत केली त्यांचे सामान खांद्यावरून वाहिले .,मदत केंद्रात एकत्र काम केले ,
  बाप्पा - आपण रोज भरपूर पळता हे वाचून आनंद वाटला , आपले आरोग्य जपत चला ही नम्र विनंती
  आप्पा - आमच्याकडे मुंबईत ही सोय नाही . त्याचा विषाद वाटतो .
  बाप्पा - धन्यवाद ! या वयात आम्ही पळू शकत नाही !

  ReplyDelete
 40. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 41. आप्पा - आम्ही काय केले ते आम्ही सांगत असतो , आमच्या पूर्वजांचे गोडवे आम्ही गात नाही , हाच क्षत्रिय आणि सीकेपी मधला फरक आहे .
  बाप्पा - आमच्या काळी ओम भवति भिक्षांदेही असे म्हणत वारावर जेवून मोठे होण्याची धडाडी ब्राह्मण वर्गात होती , आम्हा सीकेपी ना सुद्धा आदराने ठाण्यात शिक्षणासाठी लोक जवळ करत असत , त्यामुळे गाळात जाण्याची वेळ आम्हावर आली नाही , आप्पाचे वडील तर तो ११ महिन्याचा असताना वारले , पण त्याने कधी बर काढला नाही . असो .
  आप्पा - "आपले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे आपणासी निंदी दुःखे त्या नाव मुमुक्षु "
  असे समर्थ वचन आहे !
  बाप्पा - आपण दासबोध वाचावा असे सुचवावेसे वाटते .

  ReplyDelete
 42. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 43. आप्पा - संजय सरांनी फेसबुक वर लिहिले आहे की त्याना मोडी विरोधात लिहायचे नाही , कारण मोदिनी काही केलेलेच नाही तर प्रतिक्रिया काय देणार ? हे अगदी भंपक पानाचे विधान आहे .
  बाप्पा - विरोधी पक्ष काँग्रेस संसदे बाहेर बाता खाबालात आहे पण त्याच गोष्टी संसदेत मांडत नाही .
  आज मुलायम सिंगानीही काँग्रेसला धारेवर धरले आहे .
  आप्पा - मोदींचे मूल्यमापन करायची योग्यता संजय मध्ये नाही असे म्हणायचे का ? संघ हा अत्यंत विचारी आहे तो आशी आलेली सत्ता सहजा सहजी घालवून बसणार नाही !एखादा गायक मैफिली साठी बसला , राग आळवणी सुरु झाली , तंबोरे जुळले , तबला सज्ज झाला , तर त्याला रागदारी मांडायला , त्याच्या पद्धतीने राग मांडायला वेळतर दिला पाहिजे ना ? पण , संजय आधीच त्याला बेसूर कसे म्हणू शकतो ? थोडा वेळ द्या . बाप्पा - मोडी सरकार पाकिस्तानला इंगा दाखवत जन्मात आपल्या बाजूने वळवणार ! इंदिरा गांधीने हेच केले , पाकिस्तानचे लचके तोडणारे आपण एकटेच नसणार . दुसरा बांगला देश घडणार हे नक्की !\
  बाप्पा - अरे , तू इतके बेधडक कसे बोलू शकतो ? तू काय भविष्य जाणतोस का ? का तू संघातल्या आतल्या गोटातला आहेस रे ? आप्पा - इतकी साधी गोष्ट आहे - मोदीने एकदा गुजराथ वर पकड बसवली ? कशी ? ते आठवा , नंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही - तीच कथा इथे रिपीट होणार - फक्त मोठा क्यानव्हास !
  आप्पा - तुम्ही चूक करताय संजय सोनवणी !

  ReplyDelete