Wednesday, October 7, 2015

गोमांस आणि आम्ही....

गोवंश हत्याबंदीबद्दल बरीच चर्चा होत आहे. खरे तर हे चर्चा तशी आपल्या मानसिक अजागळपणाचे लक्षण तर आहेच पण कायदेशीर व सांस्कृतिक बाब म्हणुनही अशी बंदी घालणेही चुकीचे आहे.

गाय, बैल, म्हैस, रेडा, घोडा, हरणे, रानडुक्कर अशा एन्क चतुष्पाद प्राण्यांचे मांस खाने हे भारतीय इतिहासाला नवीन नाही. सिंधू संस्कृतीतही गाय-बैलाचे मांस विपूलपणे खाल्ले जात होते हे संजीव सभलोक यांनी पुराव्यांसहित दाखवून दिले आहे. (वाचा http://www.sabhlokcity.com/2013/07/the-precise-method-of-cow-slaughter-in-the-indus-valley-civilisation/)

वैदिक यज्ञांत पशुहिंसेची रेलचेल असायची. त्यात गोवंशाला मोठे स्थान होते. किंबहुना गोमांस भक्षण हा पवित्र विधी होता. महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक काळातील उत्खननांतही शेळी-मेंढीसारख्या प्राण्यांबरोबरच गाय, बैल, म्हशी खाल्ले जात असत याचे पुरावे उपलब्ध आहेत. (पहा" महाराष्ट्र ग्यझेटियर- प्राचीन काळ:इतिहास:खंड १)

मनुष्य जेंव्हा पशुपालक अवस्थेत होता ते पशुपालकत्वच त्याने मुळात आपल्या अन्नाची सहज सोय व्हावी यासाठी स्विकारले होते. तो नंतर कृषीमानव झाला असला तरी त्याने आपल्या खाद्य सवयी सोडल्या नाहीत. सिंधु संस्कृतीच्या लोकांना बैल हा शेतकामासाठी अत्यंत उपयुक्त पशु वाटला असला तरी त्याला खायचे थांबवले नाही. किंबहुना नंतरच्या काळातही बैल जरी शिवाचे वाहन म्हणून मान्यताप्राप्त होत शिवासमोर कायमचे स्थान मिळवले असले तरी ती पुज्यता ठेवुनही त्याचा खाद्य म्हणुनही वापर कमी झाला नाही. देवाला प्रसाद म्हणून जे अर्पण केले जाते ते माणसाचेही खाद्य असते. पशुबळी यज्ञात होत असत तसेच ते आजही कोणत्या ना कोनत्या रुपात इतर देवतांसमोर होतच असतात. रेड्याचे बळी आजही दिले जातात. गाय-बैलाचेच बळी (किंवा खाद्य म्हणून) नेमके कधीपासून निषिद्ध झाले याचा निश्चित काळ जरी उपलब्ध नसला तरी तो गुप्त कालोत्तर (सहाव्या शतकानंतर) असावा असे अनुमान करंण्याइतपत शिलालेखीय पुरावे उपलब्ध आहेत.

पण ही निषिद्धे नेमकी कोणी व का करवून घेतली? बौद्ध व जैन धर्माचे ही प्रतिक्रिया असावी असे मानले जाते. पण तसे वास्तव दिसत नाही. बौद्ध धर्मात हिंसेचा निषेध असला तरी मांसाहाराचा निषेध नाही. म्हणजे भिक्षुंना कोनी मांस जरी वाढले तरी ते खाण्याचा निषेध नाही. बुद्ध म्हणतात, "Monks, I allow you fish and meat that are quite pure in three respects: if they are not seen, heard or suspected to have been killed on purpose for a monk. But, you should not knowingly make use of meat killed on purpose for you." (Book of the Discipline, Vol. 4, p. 325)

गोवंश मांसाहार निषेध शेतक-यांकडुनच प्रथम झाला असणे स्वाभाविक आहे. त्यासाठी प्राकृतिक कारणे, गोवंशाची प्राकृतिक अथवा यज्ञादि कारणांनी होणारी / झालेली घट शेतीसाठी घातक ठरणे हे व्यावहारिक कारण त्यामागे असणे स्वाभाविक आहे. वैदिक धर्मियांना गोमांस धर्मत्याज्ज्य नव्हतेच. त्यामुळे त्यांनी धर्मनियम बदलले म्हणून गोवंशीय मांस निषिद्ध झाले असे म्हणने अतार्किक आहे. त्यापेक्षा यज्ञांतही पुढे गोपालक ते शेतक-यांनी गोवंशाचा पुरवठाच बंद केल्याने त्यांना यज्ञीय गोवंश हत्या बंद करावी लागली असे म्हणने अधिक तार्किक ठरेल.  आणि ही परिस्थिती गोवंश संख्या घटल्याने, शेतक-यांची गरज म्हनून उद्भवणे स्वाभाविक आहे. जोवर ही संख्या मुबलक होती तोवर गोवंश हत्येचा निषेध करण्याचे काही कारण नव्हते. आजही अनेक दुर्मीळ होत चाललेल्या खाद्य पशुंच्या शिकारीवर बंदी केवळ याच कारणाने आली आहे हे विसरून चालणार नाही.

आज शेतीपद्धती बदललेली आहे. पुर्वी ती सर्वस्वी बैलांकरवी होत असे. आधुनिक काळात बैलांची शेतीयोग्य उपयोगिता कमी झालेली आहे. दुधासाठी ज्या डेयरीज आहेत त्या भारतीय वंशाच्या गायी आपल्या फार्म्समद्ध्ये ठेवत नाहीत. जेही शेतकरी घरच्या सोयीसाठी गाय-बैल ठेवतात त्यांच्या अर्थशास्त्राला गायी/बैल ठराविक काळ हातभार लावतात. नंतर निरुपयोगी झालेले हे प्राणी विकून ते नवीन घेतात.

आता गोवंश हत्याबंदीमुळे जर हे प्राणी मरेपर्यंत पोसायचे असतील तर ते नवीन खरेदी करू शकणार नाहीत हे उघड आहे. ते नवीन खरेदी करणार नसतील तर स्वाभाविकपणे या प्राण्यांची पैदास कोण करणार? शेतक-यांची अर्थव्यवस्था संपवण्याचे हे शहरी कारस्थान म्हणावे काय? त्याचे प्रमाण येत्या दहा-पंधरा वर्षात घटत शेवटी भारतीय वंशाच्या गायी आणि बैल फक्त चित्रातच पहायला उरणार, असे होनार नाही काय? जर्सी गायींची पूजा हे भाकड गोभक्त करणार आहेत काय?

भावना आणि श्रद्धा या बाबींपेक्षा नेहमीच प्रबळ असते ती ऐहिक बाब. व्यक्तिगत अर्थशास्त्र जी बाब जीवंत ठेवते तीच बाब लोक अनुसरणार. धर्मसुद्धा अशाच सोयीनुसार बदलतो. बदललेला आहे. मग तो कोणताही असो. इसवी सन हजार पुर्वी  गोमांस भक्षण निषिद्ध नव्हते. धार्मिक निषिद्ध आले असले तरी अनेक हिंदू जाती-जमाती त्याचे भक्षण करतच होत्या व आजही करतात. हा केवळ आवडीचा भाग नसून किमान दरात प्रोटीनयुक्त मांस मिळवण्याचा हा सुलभ मार्ग होता. त्यात वावगे काहीही नाही. मुस्लिम/ख्रिस्ती धर्मात गोमांस त्याज्ज्य नाही, त्यामुळे ते खात असले तर त्यातही वावगे नाही. खाण्या-पिण्याच्या सवयी या प्रत्येकाच्या निवडीचा भाग आहे. गायी-बैल हे भारतात दुर्मीळ प्राण्यांपैकी नाहीत. पण त्यांना ही अशी बंदी घालून दुर्मीळ केले जाईल याबाबत शंका नाही.

"गोमाता" हा शब्द भावनिक केला जात आहे. भारतातील गायींची सध्यस्थिती पाहिली तर त्यांची अवस्था तिला हिंदू "माता" मानत असावेत असे दिसण्यासारखी नाही हे दुसरे वास्तव आहे. तिच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे म्हटले जाते. यातील कोटी म्हणजे संख्येतील कोटी नसून "तीन गटांत विभागलेले तेहतीस प्रकारचे देव" असा अर्थ आहे. ही कल्पना मुळात व्याकरणकार यास्काची. त्याने पृथ्वी, अंतरिक्ष  व द्युलोक असे तीन लोक कल्पत प्रत्येक गटात ११ वैदिक देवतांचे विभाजन केले. असे ते तेहतीस देव होतात. यातील सारे देव वैदिक असावेत हा योगायोग नाही.  ज्या वेळेस यज्ञांत याच गायीचे व वासरांचे मांस चवीने खाल्ले जात होते त्या काळी कदाचित ते त्रिलोक भक्षण करत असतील. आता त्या तेहतीस कोटी देवांचा हवाला देवून त्यांनीच गायीला "गोमाता" म्हणत आधुनिक काळात दुस-यांवर निर्बंध आणण्यासाठी आटापिटा करावा हे अनाकलनीय आहे.

मी गोमांसाचा भक्षक नाही. परदेशात मी खाल्ले तर चिकन, व तेही भारतीय रेस्तरां सोडुन कोठेही खाल्ले नाही. पण माझे इंग्लंड-अमेरिकेतील भारतीय मित्र मात्र बीफ खाणे निषिद्ध मानत नव्हते. ते स्वाभाविक आहे. ज्या देशात तुम्ही राहता तेथील लोकप्रिय खाद्यपद्धती तुम्हाला अंगिकाराव्या लागतत. विभक्तपणा दाखवत शहाजोगपणा करुन चालत नाही. शेवटी हा विषय व्यक्तिगत निवडीचा आहे. आणि व्यक्तिगत निवड जपने हाच लोकशाहीचा गाभा आहे. एखाद्या प्राण्याच्या हत्येवर व मांस खाण्यावर तेंव्हाच बंदी येवू शकते जेंव्हा एखाद्या प्राणी-प्रजातीचे अस्तित्वच धोक्यात आले असेल. त्याला कोणीही कधीही विरोध केलेला नाही. पण त्यांच्या चोरुन शिकारी कशा होतात हे सर्वज्ञात आहे. आणि अशा शिका-यांना आणि मांसभक्षण करणा-यांना कोणी अधार्मिक म्हटलेले नाही हा धर्माचा दांभिकपणा आहे.

तुम्ही काय खावे, काय नको यावर फालतू चर्चा करत...निष्पापांचे...केवळ मुस्लिम आहे म्हणून प्राण घेत असाल...तर हे लोक धार्मिक नसून धर्माचेच खुनी आहेत असे म्हणने क्रमप्राप्त आहे. यांना कोणता धर्म माहित आहे? उद्या विष्णुचा मत्स्यावतार, वराहावतार, कुर्मावतार म्हणून हेही निषिद्ध (खरे तर यांनी ते आधीच का बनवले नाहीत बरे?) म्हणायला लागले तर नवल वाटायचे कारण नाही,कारण ते एवढे बिनडोक आणि माथेफिरू आहेतच!

मी वैदिकतेबद्दल लिहिले तर अनेकांना चीड येते. पण शेवटी सत्याला तुम्ही कोठे कोठे डावलणार? हा धर्मच भाकड आणि हिंदुंचा घात करणारा आहे, बदनाम करणारा आहे हे जर टळटळीत वास्तवच आहे तर मी तरी काय करणार? तुमचे विखारी फुत्कार मला जाणवत असतात. 

पण जगा आणि जगू द्या. तुम्हाला जे प्रिय ते खा आणि दुस-यांना काय प्रिय ते खावू द्या. तुमच्या आंबट आमट्या आणि चतकोरभरचे फुलके सर्वांच्या माथ्यावर मारत तुमची जीही आजची खाद्य संस्कृती आहे ती दुस-यांच्या माथ्यावर थोपू नका. उद्या समजा एमायएम सत्तेवर आले आणि त्यांनी तुम्हाला गोमांसभक्षणाची सक्ती केली तर जशी तुम्हाला चालणार नाही तसेच गोमांस खाऊच नका ही सक्तीही अशाच अतिरेकीपणाची आहे हे समजावून घ्या! आमच्या जीवावर तुमच्या तथाकथिक हिंदुत्वाचे (पक्षी वैदिकत्वाचे) कोड पुरवण्याची नादानी तर बिल्कूल करु नका...कारण आम्ही किमान सत्य जाणतो!

23 comments:

  1. संजय सर ,
    वैदिक जन गोमांस खायचे म्हणून तुम्ही गोमांस खात नाही का हिंदू धर्मात गोमांस निषिद्ध आहे म्हणून खात नाही ? नेमके रहस्य काय आहे ?शैव धर्म गोमांस पुरस्कार करतो का ?
    शोभा राजाध्यक्ष ( डे ) जातीने सारस्वत ब्राह्मण,यांनी शिवसेनेने गोमांस भक्षणाला विरोध केल्यावर त्याच दिवशी गोमांस भक्षण केल्याचे स्वतः जाहीर करून कोणाला काय करायचे आहे ते करून दाखवा असे आव्हान केले आहे . याला म्हणतात धाडस !
    संजय सर अहो उभ्या आयुष्यात एकदा तरी धाडस करून दाखवा हो !
    पाटसकर काकां सारखे नुसताच बोलाचा भात आणि बोलाची कधी बस्स झाली.छत्रपती शिवाजीमहाराजांनी आणि मुरारबाजी तसेच बाजीप्रभू देशपांडे यांनी काय केले असते ?

    ReplyDelete
  2. संजय सर ,
    वैदिक जन गोमांस खायचे म्हणून तुम्ही गोमांस खात नाही का हिंदू धर्मात गोमांस निषिद्ध आहे म्हणून खात नाही ? नेमके रहस्य काय आहे ?शैव धर्म गोमांस पुरस्कार करतो का ?
    शोभा राजाध्यक्ष ( डे ) जातीने सारस्वत ब्राह्मण,यांनी शिवसेनेने गोमांस भक्षणाला विरोध केल्यावर त्याच दिवशी गोमांस भक्षण केल्याचे स्वतः जाहीर करून कोणाला काय करायचे आहे ते करून दाखवा असे आव्हान केले आहे . याला म्हणतात धाडस !
    संजय सर अहो उभ्या आयुष्यात एकदा तरी धाडस करून दाखवा हो !
    पाटसकर काकां सारखे नुसताच बोलाचा भात आणि बोलाची कधी बस्स झाली.छत्रपती शिवाजीमहाराजांनी आणि मुरारबाजी तसेच बाजीप्रभू देशपांडे यांनी काय केले असते ?

    ReplyDelete
  3. संजय सर ,
    वैदिक जन गोमांस खायचे म्हणून तुम्ही गोमांस खात नाही का हिंदू धर्मात गोमांस निषिद्ध आहे म्हणून खात नाही ? नेमके रहस्य काय आहे ?शैव धर्म गोमांस पुरस्कार करतो का ?
    शोभा राजाध्यक्ष ( डे ) जातीने सारस्वत ब्राह्मण,यांनी शिवसेनेने गोमांस भक्षणाला विरोध केल्यावर त्याच दिवशी गोमांस भक्षण केल्याचे स्वतः जाहीर करून कोणाला काय करायचे आहे ते करून दाखवा असे आव्हान केले आहे . याला म्हणतात धाडस !
    संजय सर अहो उभ्या आयुष्यात एकदा तरी धाडस करून दाखवा हो !
    पाटसकर काकां सारखे नुसताच बोलाचा भात आणि बोलाची कढी बस्स झाली.छत्रपती शिवाजीमहाराजांनी आणि मुरारबाजी तसेच बाजीप्रभू देशपांडे यांनी काय केले असते ?

    ReplyDelete
  4. संभाजी फायर ब्रिगेड चे म्हणणे काय आहे या विषयावर ?
    गोमांस खावे का खाऊ नये यावर त्याना संभ्रम का आहे ? खरेतर गोमांस खावे असाच आग्रह संजय सरांनी केला पाहिजे चौकाचौकात अंडा भुरजी सारख्या गाड्या लावून हा उद्योग सुरु केला पाहिजे बौद्ध मुस्लिम आणि इतराना मोफत वाटप केले पाहिजे बुद्ध तर डुकराचे सडके मांस खाउन मेला होता , सर्व बौद्ध लोक गोमांस भाक्षनास चढाओढीने सरसावतील . बाय द वे आपले घटनाकार डॉ बाबासाहेब काय म्हणतात गोमांस भक्षणा बद्दल ? ते संजय सरांनी नाही सांगितले . त्यांचा फतवा काय सांगतो ? निदान प्रकाश काय म्हणतो त्याची तरी दाखल घ्याहो संजय शेठ ,तुम्ही एकदम मोहंजोदारोत घुसता हे काही बरे नव्हे!
    चला कागदी पाटसकर बुवा , अंडा भुरजी बंद , आता गोमांस आणि पाव ! होऊन जाऊ दे !

    ReplyDelete
    Replies
    1. मानसी तू आज घरात बैल मारला आहेस का (कोण हा तुझ्या घरतला निरापोयोगी बैल- बाबा तर नाहीत ना? नाहीतर कशाचा तो बैल ? कागदाचा का? कृपया तो घेऊन तू बिफपाव च्या गाडीवर येऊ नकोस, तुला नाही पण मला लोक ठोकतील. खरा बैल घेऊन ये मग आपण हातगाडी तुझ्या घरासमोर लावून माल विकू.

      Delete
  5. मानसी तू नुसतीच माझी आडनाव बंधू आहेस म्हणून मला काका मामा करू नकोस, त्या आगाशेने तुला विचारले कि तू ब्राम्हण आहेस का तेव्हा तू काहीच उत्तर दिले नाहीस, दिले असते तर मी तुला किमान वैदिक म्हणू शकलो असतो, नशीब तू अगशेच्या गोत्यात आली नाहीस तू जा आता आणि घरी जाऊन झोप फार गारठा पडलाय. उद्या स्व्यैन फ्लू किवा डेंगू झाला तर गाई बैलांची आठवण तुला होईल. संजय सोनवणी हे गाई बैल खायचे जे बोलतात ते फक्त फारच उत्क्रांत आणि प्रजा प्रचंड संखेने वाढणाऱ्या लोकांच्या विषयाने लिहित आहेत, त्यात वैदिक सिंधू हे सगळे लोक येऊ शकतात. मानव कधी प्रबळ बनतो आणि कधी भाकरीला महाग होतो हे महाराष्ट्रातल्या आत्महत्या सांगतात. त्यामुळे संजय सोनावानीने एकतर वैदिक आणि सिंधू इथे आपले पाय ठेवावेत किवा महाराष्ट्रात यावे. महाराष्ट्रात पाऊस अनेक वर्षे अनियमित आहे. सिंह, धनु आणि मेष राशीला गुरु असताना मोठे दुष्काळ पडलेले आहेत हे मी आधीच माझ्या ब्लोगवर सह पुरावे लिहिले आहे. वृषभ हे प्रतिक कधी महाराष्ट्रात नव्हते. महाराष्ट्र फारतर शेळ्या मेंढ्या पालक लोकांचा प्रदेश होता. इथे नैसार्किग अनुकुलता फारच कमी होती, त्र्यंबकेश्वर हे शिवलिंग हेही कधीही अवैदिक गाई बैल खाणार्या लोकांचे नव्हते. कशी प्रयाग हेही साधे सोपे कोडे नाही, उत्तर वैदिक काळात क्षत्रिय वर्णाच्या लोकांचे ते प्रतिक आहे त्यामुळे त्यामुळे मानसी आणि अस्मिता ह्यातला अर्थ ह्या संजय नावाच्या संदेश वाहक )श्वान -सम( कुर्त्याने आम्हाला सांगू नये. त्यला जे खायचे ते खाऊ द्यात, असे भिकारी खाणारे स्वतःचे दात तरी बघतात का? दातातून आणि तोंडातून संस्कृत शब्द कसे तयार होतात ह्यावर मोठे विवेचन उपलब्ध आहे. ते ह्या पूर्ण सृष्टी गिळंकृत करणाऱ्या तिसर्या जगातल्या लोकांना कळणार नाही. हे शिव ह्या सृष्टीच्या निर्माण कर्त्याचे सगळ्यात पहिले गुन्हेगार आहेत. ह्यांनी एक पोळ पाळून त्याची किती पिल्ले जन्माला घालवली? सिंधूचे वृषभ चिन्ह नुसते खायच्या कामाचे नाहीये. आत्ताच्या आधुनिक संस्थेत काय रे गाई आणि बैल खता म्हणजे काय मोठे कौतुक सांगता? अरे तुम्ही आधीच सगळे गाई बैल, शेळ्या मेंढ्या, हरीण, जिराफ, गेंडे, गवे ह्यांना फस्त करून टाकले आहे. आणि आत्ता गाई बैलांसाठी कंठशोष करताय? आफ्रिकेत किती प्राणी संपले? तिथे हिंदू होते का मुस्लिम? इतिहास नुसता आपल्या शेणाच्या पवात्यात बसून सापडत नसतो. पाश्चात्य लोक अफिर्केत सिंह वाचवायला मरमर करतात आणि तुम्ही इकडे गाई बैल खायला सांगता? कोण खरे आणि कोण खोते, वैदिक कि भुकेकंगाल अवैदिक जंगली लोक? अरे इतकी पोटाची चिंता असेल तर काम करा ना, फुकटचे गाई बैल तुमच्या आई बापांची प्रोपार्ती आहे का?

    ReplyDelete
  6. जे अविनाश पाटसकर नावाचे महार, मांग, उचली, वडारी, कैकाडी होते ते गावाबाहेर राहणारे लोक मेलेली जनावरे आणि डुक्करे खात होते, जो डुक्कर सगळ्या समाजाची हागणदारी साफ करतो त्याला आम्ही लहानाचे मोठे करायचे आणि तो तुमची घाण साफ करायचा त्याला आम्ही आपल्या पिल्लाप्रमाणे पाळून नंतर खाऊन टाकतो. तुम्ही मेलेले गाई बैल आम्ही खातो. तुमच्या पुण्यातल्या गुवाच्या पाट्या आम्ही डोक्यावर वाहत होतो, तेव्हा कुठे गेले होते सिंधूचे गटारांचे तत्वज्ञान? आमची पिढी ३०-३५ वयाची आहे. आम्ही सगळे भंगी वैदू, महार, मांग, फासू पारधी लोक आहोत. आम्हीही वैदिक ज्ञान आणि सिंधूचे पुरावे जाणतो. त्यामुळे उगाच फेकाफेकी का करता. मी आधीच सांगितले कि मी धनगर जातीपेक्षा हलक्या जातीचा पाटसकर आहे. वाटल्यास जातीचा दाखला नेटवर उपलब्ध करून देतो. मला कसली लाज आलीय. मला माझा समाज आणि सत्य शोधायचे आहे.

    ReplyDelete
  7. मेलेली गाय बैल डुकरे खाणे आणि हलाल करून गाय बैल बकर्या , मेंढ्या, कोंबड्या खाणे ह्यात फार फरक आहे. संजय सोनवणी एका दगडात भरतील दलित आणि मुस्लिम ह्यांचा निशाणा साधायचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी आधीच मेलेल्या जनावराचे मांस मुस्लिमांना खायला लावून दाखवावे. त्यांनी खाल्ले तर लागेल ते हरू आपण.. ते तर फक्त हलाल खातात हेही थोडे माहित करून घ्या, मजबुरी आणि ऐयास्शी यात फरक आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने हे कधीच सांगणार नाही, शेवटी दिपोसित जप्त झाले कि तोंड लाल करून उभे राहणार हे तुमचे भविष्य स्पस्थ दिसते आहे..

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. गाई-बैल परदेशात खाणे, आणि ते हॉटेलात खाणे हा सर सभ्य प्रकार आहे. मी कुवैत, युएइ, इराक, इराण जॉर्डन, आणि सौदी अरेबियात कुर्बानी बघितली आहे. मोठ्या मैदानात तंबू ठोकून किवा बिल्डींगच्या बाजूला किमान १० ते १५ गाई वासरे, लहान-मोठे उंट, आणि बोकड ह्यांची हलाल करून कत्तल केली जाते. आबालवृद्ध हे बघत असतात. हलाल प्रकारात गळ्याची एक नस (रक्तवाहिनी) शोधून फक्त तीच कापली जाते. त्यातून रक्त वाहत राहते आणि पशु २०-२५ मिनिटे तडफडत राहतो, नंतर निपचित पडतो. शास्त्र हे आहे कि तडफड केल्याने त्याचे रक्त गरम होते आणि मटणाला चांगली चव येते, ह्याला हलाल म्हणतात(हालहाल). जे एका क्षणात मारले जाते किवा आधीच मेलेले असते त्याला हराम म्हणतात. कुठल्याही मुस्लिम माणसाला हे जाऊन विचारा तो हेच सांगतो. मी रोज बीफ खाणारे लोक ह्यांच्याबरोबर राहिलो आहे. त्यांना १० डिग्री सेल्शियश तापमानात एसी लावावासा वाटतो. मुळव्याध वाढलेले असते. वजन १०० किलोच्या पुढे गेलेले असते, किती गांड आपट केली तरी ते कमी होत नाही. आणि हृदयविकाराने ते मरतात. लाल मटणातून (रेड मिट) ब१२ हे व्हिटामिन मिळते, ते शरीराच्या व मेंदूच्या उत्साहवर्धक स्वभावाशी निगडीत आहे, ते हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट ह्यातून हि मिळते पण फारच कमी प्रमाणात जवळपास फक्त २%. युरोपियन लोक आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान असल्याचे कारण हे b१२ व्हिटामिन आहे असाही शोध आजकाल लागतोय. क्षत्रिय वर्णाला मांसाहार निषिद्ध नाही. त्याने आपल्या परिस्थितीप्रमाणे कुठले अन्न खायचे हे ठरवायची मुभा श्रीमद भगवतगीतेत स्वतः परमेश्वराने दिलेली आहे.

    ReplyDelete
  10. गाई-बैल रोज हट्टीपणाने खाणे हि मात्र धार्मिक विकृती आहे. आज प्रत्येक कुटुंब आपले अर्थार्जन स्वतंत्र करते. कोणी गरीब आहे तर कोणी श्रीमंत. श्रीमंत माणूस रोज सोहळा करू शकतो, जसे वैदिक लोक यज्ञ करून गाय बैल खात होते तसा! गरीब दुकानात जाऊन बीफ विकत आणतो आणि तो सोहळा साजरा करतो. त्यातही वासरू, बोकड तारानेताठे असले कि खाताना फार मजा येते. म्हातारी भाकड गाय कोण खाणार? भिकारी? ते फक्त बाटलेले पोटार्थी लोक करू शकतात. त्यांना धर्म हि पाळायचा आहे, दुसर्याच्या शहरात बॉंब लावायचे आहेत असे बहु उद्देशीय लोक असली खास कामे करू शकतात, पण भाकड गाय खाल्ल्याने ते नेमके आमच्या पोलिसांच्या हातात सापडतात, म्हणजे b१२ व्हिटामिन मिळते पण जरा हलक्या दर्जाचे. ह्यालाच कायद्याच्या पळवाटा असे म्हणतात. म्हणजे भाकड गाय खाणारे, आणि हराम खाणारे ह्यांचे प्रवर्तक हे सनज्य सोनवणी आहेत. त्यांनी कितीही गाई बैल ह्यांच्या माणसाचा प्रचार केला तरी शहाणी माणसे तिकडे ढुंकूनही बघणार नाहीत. आम्ही हिंदू गरीब श्रीमंत असले शौक करत नाही. खाल्ले तर बोल्हाई चे नाहीतर वरण भात चटणी भाकर!
    अरे तुमच्या गान्डीखाली १०० वेळा बॉंब लावून ज्यांनी भरदिवसा फोडले, १७०० वर्षे ज्यांनी दिल्ली, काशी येथे मुंडक्यांचा ढीग रचला, रक्ताचे पूर आणले, त्या लोकांसाठी तुमची हि तडफड चालली आहे?? तुम्हाला इथे राहायचा काय अधिकार आहे. बीफ खायचे ना तर त्या लाखो बालात्कारांचा हिशेब द्या, त्यांना न्याय द्या. १९४७ ला फाळणीच्या वेळी तुम्हाला हाकलून दिले होते तरी का इथे शेन खात बसला आहात. लातो के भूत बातो से नाही मानते.. तुम्हाला आता लाथा घालून बाहेर हाकलायची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांचे गाई बैल तुम्हाला बीफ म्हणून खायला हवेत का रे भडव्यांनो? आम्ही आमच्या भाकड गाईंना मेल्यावर कुत्र्या मांजरांना खायला घालू पण तुमच्या सारख्या डुकरांना देणार नाही. उद्या हे म्हणतील कि तुमचे आई वडील म्हातारे झालेत त्यांचा काय उपयोग आहे, त्यांच्या किडन्या, लिवर, डोळे दान करून पैसे मुलांना द्यावेत. किवा भुकेकंगाल लोकांना त्यांचे मांस खायला द्यावे. मीही इतिहासात मानवाने मानवाचे मांस खाल्ल्याचे असंख्य पुरावे देतो. शी शी शी असली आमची औलाद नाही. ते फक्त तुम्ही करू शकता.

    ReplyDelete
  11. आप्पा-पाटसकर सर ,आपण फारच ओघवते लिहून सर्वांची मने जिंकून घेतली आहेत आणि एक गोमांसा बद्दल संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या भंपक लिखाणाचा भ्रमाचा भोपळा फोडला आहे त्याबद्दल अभिनंदन !
    बाप्पा-आपण इतके सुंदर प्रमाण दिले आहे की सर्व निरुत्तरहोतील तरी काही प्रश्न शिल्लक राहतात ते अस ,काशी आणि अलाहाबाद येथे गाईंचे थवेच्या ठावे हिंडत असतात ते पाहून आणि त्यांनी रहदारीला होणारा त्रास पाहून वैताग येतो त्यावर आपण काही उपाय सुचवू शकलात तर आपण फार थोर वाटा उचालालात असे होईल. आपले काहीकाही लेख उत्कृष्ट असतात तर काहीकाही अत्यंत किचकट असतात , आपण जितके सुलभ लिहाल तितके आम्हाला आवडेल . ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो आणि आपण या भारत वर्षास पुनरुत्थानाचा मार्ग दाखवावा ही नम्र विनंती .
    आप्पा - संजय सोनावाई यांच्याबद्दल आणि वैदिकांचे ते जे उगाच हाल करत असतात त्या बद्दल आपण लिहिले ते बरे झाले , आपल्याकडून सनातन बद्दल ऐकायला आवडेल .

    आपले मनःपूर्वक अभिनंदन !

    ReplyDelete
  12. गोमांसाबद्दल मुसलमान लोकांचे चोचले पुरवायची काय गरज आहे ?
    संजय सोनवणी अनेक प्रकाराने असे लिहितात की त्यांना नेमके काय अपेक्षित आहे तेच कळेनासे होते. पाटसकर साहेबांनी नेमका मुद्द्यावर हात ठेवला आहे. मानसी पाटसकर या काहीही लिहित असतात त्यांच्या लिखाणात अपरिपक्वता दिसते
    काशी येथील गाइञ्च्या तान्द्यान्बद्दल जो निषेधाचा सूर दिसतो तो अगदी बरोबर आहे ,
    वसुबारस या दिवशी जी पूजा आपण करतो ती प्रतिकात्मक असते

    ReplyDelete
  13. पाटसकर यांनी बहुमुल्य योगदान देऊन माझे डोळे उघडले आहेत हे मात्र नक्की . पण चौकाचौकात सोडलेल्या गाईंचे काय ? मुसलमान लोकांच्या बद्दल त्यांनी लिहिले ते मनाला भिडणारे आहे . हा सर्व राजकारणी लोकांचा खेळ आहे आणि त्यात संजय सोनावणी अजूनच गोंधळ वाढवत आहेत . त्यांचे वैदिकांच्या वाटेला गेल्या शिवाय समाधानच होत नाही , ते पितृ पंधरवाड्या बद्दल लिहितील असे वाटले होते पण शून्य . असल्या गोष्टीत त्यांचे कोण ऐकणार ? त्यांनी प्रयत्न करून तरी बघावा .

    ReplyDelete
  14. ब्रिटिश उत्तर कलात गायराने संपत अलित हे संजई saranni लिहिले आहे स्वताह्ला पशुपतिचे भक्त त्यन्ना गाया रस्त्यवार कस्श हा प्रश्न विचरा कारण 60 वर्शे ह्यंचे राज्य होते. सनतन गोल्या घ्लतओ मी तुमच्या शब्दला शब्दन्नी गदटो. शिवाय गयिच्या पोताट 100 किलो प्लास्टिक आनी लोखन्ड़ मिलते ति तुम्ही का खात नाही तिचा फक्त देहाच प्यारा का. भरपूर अहि म्हनुण कसेही ओरबदा एसे होत नही हो sonawani

    ReplyDelete
  15. थोडा संताप सोडला तर छान लेख पाटसरसाहेब. जैन व बौध्द धर्माचे अहिंसा अहिसा यज्ञविरोध प्रचारामुळे आणि राजकीयप्रभावामुळे अहिंसावादाचा बराच प्रचार झाला तसेच त्याचे कटटर सोवळयात रुपांतर झाले. त्यामुळे हिंदू समजल्या जाणाऱ्या बऱ्याच समाजात बराच कटटरपणा तसाच इतरांप्रती तुच्छेतेची भावना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पाळली जाते. मग ते मुंबई किंवा इतर ठिकाणी असो. उर्वरित समाज तर बकरे/कोंबडयावरच भागवतो. तेही त्यांचया सवयीचे झाले आहे. पण गोहत्या बंदी हे हिदुत्ववाद्यांच्यादृष्टीने पर्यावरणाचे रक्षण आहे काय हे ही तपासावे. का त्यांना माहिती नाही वैदिकांतही गोमासभक्षण अभक्षणीय आहे. कटटर शाकाहारी लोकांनी अशी कोणती वैश्विक संशोधने केली का त्यांनी स्वव्यापार नफा सांभाळत स्वत:चे फक्त ग्रुपींग केले, मासाहार किंवा शाकाहार या दोन्हीचा अतिरेक भारताबाहेरुन आलेले असोत कि भारतातील यातील कटटर प्रवृत्तींनी केला आहे. पण माझ्या मते उपयुक्त आहार मनुष्यमात्रास योग्य होईल. संजय सरांनी दुसरीही बाजू मांडली अभिनंदन . पण पाटसकर व संजय सर यांच्या लेखणीतून एकत्रित बॅलन्स विचार करण्यास आम्ही प्रवृत्त होतो. धन्यवाद दोघांचे . अभय, मुंबई.

    ReplyDelete
    Replies
    1. अभय पवारसाहेब, हिंदू हा एकमेव धर्म पर्यावरणाच्या विचार करून त्याच्या सान्निध्यात राहणारा धर्म आहे, त्याचे मूळ तत्व जगा आणि जगू द्या हे आहे. म्हणूनच हिंदू धर्मात झाडे, फुले, दगड, डोंगर, नद्या, नाले, पशु, पक्षी यांची पूजा केली जाते. पशु बळी हि संकल्पना हिंदुंवर लादली गेली आहे. जेव्हा हिंदुंवर परकीय अक्रमने झाली तेव्हा आपण मानसिक दृष्ट्या फार दुबळे होतो, तो दुबळेपणा घालवण्यासाठी बळी हि प्रथा अस्तित्वात आली. ती वैदिक लोकांची देणगी आहे. अथवा मानवाचे दात, आतडी पूर्ण शाकाहारी पदार्थ खाण्याच्या दृष्टीने बनले आहेत. सुळे फारच बारीक आहेत. व पुढचे दात चोकोनी असून टोकदार नाहीत. हा उत्क्रांतीचा एक टप्पा आहे, यदाकदाचित मानव रोज मांसाहार करू लागला तर हि दातांची ठेवण बदलेल. ड्राक्युला सारखे माणसाचे दात असतील. इतर प्राण्यांच्या मानाने माणूस कष्ट फार कमी करतो, त्याने इतके मांस हट्टीपणे खालले तर हृदयविकार आणि तत्सम आजार बळावतात. रोज मांसाहार त्यामुळे निषिद्ध आहे, श्रावण (किवा चातुर्मास) हि तीच संकल्पना आहे. सोम, गुरु, शनिवारी हिंदू मांस खात नाहीत. नाहीतर मध्यपूर्वेत काय आपल्या देशातच प्राणी शिल्लक राहिले नसते. हे मी फक्त कट्टर वैदिकांचे लिहित नाही तर बहुजन समाजाचे लिहित आहे हेही तुम्हाला कळले असेलच

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  16. संजय सर शोभा डेचे भाऊ बनायचा प्रयत्न करत आहेत, असे विपर्यस्त विधान करून स्वस्तात प्रसिद्धी मिळते ती त्यांना हवी आहे. बाकी एकदा मी चुकून गोमांस खाल्ले नव्हे तोंडात घातले तेव्हा त्याला इतका उग्रट वास येत होता, चावायला राबरापेक्षा चर्बट होते. एक एक तुकडा २ इंच बाय २ इंच इतका होता. ज्यांना फक्त उदरभरण करायचे आहे ते ढेकुण, झुरळ, कावळे, कुत्रे काहीही खाऊ शकतात. ते पुढे येउन आधी संपवा. शेतातली कीड खा, शेतकरी तुम्हाला आशीर्वाद देतील. हा अभिनव व्यवसाय आहे. शेतीप्रधान देशात फारच चांगला चालेल काय हो सर! शिवाय गाई बैलांना चारा सुद्धा उपलब्ध होईल. त्या किडीची अभिनव डीश बनवून शोभा डे ला पाठवून द्या. रोज जे शेन खाते त्यापेक्षा आज वेगळे खायला मिळेल तिला. चीनमध्ये लोक असेच काहीबाही खातात. मग त्यात काय वाईट आहे?

    ReplyDelete
  17. हि देशाच्या दुसर्या फाळणीची बीजे रोवण्याचे काम चालले आहे. कॉंग्रेसने पहिली फाळणी नीट केली असती तर हि वेळच आली नसती. आता मात्र चुकून फाळणी झाली तयार गोमांस खाणार्यांना कायमचे पाकिस्तानात पाठवून द्या. तिथे काय खायचे ते खा अगर उपाशी मरा. हिंदूद्रोही म्हणजे देशद्रोही. हा इथला नियम आहे.

    ReplyDelete
  18. Mr. Avinash Pataskar I want to update my knowledge about Hindu, can you tell me who is Hindu? or what is definition of Hindu?

    ReplyDelete
    Replies
    1. जगातील जो मनुष्यप्राणी एके ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी गेल्या ६५००० वर्षात जात राहिला व ज्या ठिकाणी गेला तिथली संस्कृती अंगीकारून तिथे राहिला पण आपली संस्कृती तिथे लादायचा प्रयत्न केला नाही त्याला हिंदू असे म्हणतात.

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...