Saturday, November 14, 2015

दहशतवादाच्या मूळ उद्गमाचे काय?


प्यरिसमधील दहशतवादी हल्ल्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.

जगातील सर्व दहशतवादी संघटना आणि धर्मांध हिंसक मनोवृत्त्या पुर्णपणे चिरडल्याशिवाय असे नृशंस हल्ले थांबणार नाहीत!
ज्यांनीही अशा दहशतवादी संघटनांना स्वार्थापोटी वाढवले अशा राष्ट्रांचाही धिक्कार. जागतिक समुदायाने अशा राष्ट्रांचीही गय करू नये!

दहशतवादाचा भस्मासूर एवढा वाढण्यामागे प्यलेस्टाइनचे फाळणी करून इझ्राएलची निर्मिती केली व प्यलेस्टाईनचा प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतला गेला नाही या मुळ कारणात आहे हे कधीतरी लक्षात घेण्याची गरज आहे. अमेरिका हे जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र आहे हे मी अमेरिकन रेडियोवरुन दोन मुलाखतीतून २००२ साली म्हणालेलो आहे. चेन रिअक्शनमधून तो वाढत गेला. सद्दामला संपवायचे प्रयत्न केले, शेवटी धादांत खोटे आरोप ठेवत, युद्ध लादत त्याला जाहीरपणे फासावर लटकवले. जगाने ती मजा पाहिली. तो दहशतवादाचा कळस नव्हता काय?

सद्दाम हुसेन भरताचा मित्र होता. बांगला देशाला स्वतंत्र करण्यासाठी भारताने पाकशी युद्ध सुरू केले तेंव्हा सर्व आखाते राष्ट्रने भारताला तेलपुरवठा बंद केला होता. अपवाद फक्त सद्दामच्या इराकचा. बांगला देश स्वतंत्र केल्यानंतर त्यला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणरा इराकच सद्दामच होता. आपण पटकन विसरून जातो. पण हे योग्य नाहे. आज इराक उध्वस्त झाला आहे. कोनी केले हे पाप? त्याविरुद्ध आम्ही कोणता आवाज उठवला?

लाखो इराकी-अफगाणी-इराणी निरपराध नागरिक आजवर जे मेले तो दहशतवाद केवढा भयंकर होता! फक्त तो सत्तेकडून झाला, खाजगी संघटनांकदून नाही म्हणून तो दहशतवादच नव्हता कि काय? त्या दहशतवादामागेही धार्मिक प्रेरणा नव्हत्याच कि काय? की सबल करतात तो न्याय आणि दुर्बळांनी प्रत्युत्तर दिले तर तो दहशतवाद? रशियाच्या फौजांशी लढता यावे म्हणून तालिबानला कोणी जन्म दिला?

सर्वप्रथम युरोपियन राष्ट्रांनी आणि अमेरिकेने आपली जागतिक दादागिरी बंद केली पाहिजे, शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यांनाचा धंदा वाढायला मदत करणे बंद केले पाहिजे. आणि याकडे मुस्लिम दहशतवाद म्हणून बघत, त्यांच्या धर्मग्रंथांतील हिंसकतेचे तत्वज्ञान पुढे रेटायचे प्रयत्न करत न बसता आधी अमेरिका व युरोपियन राष्ट्रांनी काय पापे केलीत तेही पहावे व त्यांचाही खुल्या मनाने निषेध करावा. कुराणात जेवढी हिंसेची मुलतत्वे आहेत तेवढीच ती जुन्या करारात आहेत...अगदी नव्या करारातही हे सोयिस्करपणे विसरू नका. आज समजा अरबी राष्ट्रांत इस्लाम नसून ख्रिस्ती सोडून दुसरा कोनताही धर्म असता तरीही हीच स्थिती निर्माण झाली असती याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आयसिस ही अमेरिका व इझ्राएलची देणगी आहे. जशी तालिबान अमेरिकेचीच उपज होती. निर्मात्यावरच अखेर उलटणे हा दहशतवादी संघटनांचा अलिखित नियम आहे हे आपण ट्विन-टोवरवरील हल्ल्याच्या संदर्भात पाहू शकतो. रशियाचाही विस्तारवाद अधून मधून डोके वर काढतोच. त्यांची आयसिसविरोधी कारवाई मानवतेच्या दृष्टीकोनातून आहे या भ्रमात जगाने राहू नये.

यात शेवटी मरणार आहेत ती सामान्य माणसे. मानवतेची मुलभूत तत्वे. अमेरिकेने त्यांची कधीच पर्वा केली नाही. कै. नरसिंह रावांनी अमेरिकेच्या संसदेत अमेरिकेला रेड इंडियनांच्या केलेल्या उच्छेदाबद्दल अमेरिकनांना झापत दहशतवादावर बोलण्याचा त्यांना काय अधिकार हा प्रश्न विचारला होता. व्हिएतनाम कसे विसरता येईल? दहशतवादाच्या मुळाशी जायचे तर ती महासत्तेच्या राजकारणात आहेत, कोणा धर्मात नव्हेत. प्रत्येक राष्ट्राला सध्या जागतिक नाहीतर प्रादेशिक महासत्तेची स्वप्ने पडू लागलीत. माओवाद्यांच्या भारतातील हिंसाचारामागे चीन असतो. मरतात आमची माणसे. मारतातही आमचीच माणसे. पण हा दहशतवादच नव्हे काय? तेथे तर धर्मही नाही!

वर्चस्वतावाद हा नुसता जागतिक सत्तांच्या संदर्भात नाही. वर्चस्वतावाद अनेक प्रकारच्या दहशतवादांना जन्म घालतो. इतरांना गुलाम करणे, त्यांचे भौतिक स्वातंत्र्य हिरावने अथवा मारुनच टाकणे ही त्याची अपरिहार्य परिणती आहे. हे सगळे थांबवून मानवतेची श्रेष्ठ मुल्ये प्रस्थापित करायची असतील तर सर्वप्रथम ओबामांनीच पुढाकार घ्यावा व अमेरिकेने जगावर आपली सत्ता राबवण्यासाठीचे प्रयत्न बाजुला करावेत. हा माणूस ते करू शकतो. मगच दहशतवादाविरुद्धचा लढा हा मानवी पातळीवर येईल...हिंसकतेच्या नाही. सध्या सर्वच दहशतवादी (मग ती राष्ट्रे असोत कि राष्ट्रप्रणित संघटना) मानवता आणि मुल्यांबद्दल बोलण्याची योग्यता हरपून बसले आहेत. वर्चस्वतावादाने सर्वांना पछाडले आहे. प्रत्येकजण दुस-यावर कुरघोडी करण्याच्या नादात द्वेषाचा आधार घेतो आहे.

आज समोरासमोर युद्धे करायचा काळ संपला आहे हे जागतिक सत्तांच्या लक्षात आले आहे. दहशतवादी कारवाया या वेगवान व अधिक परिणामकारक ठरत असल्याने राजकीय सत्ता दहशतवादी गटांनाच हाताशी धरून या नाहीतर त्या देशात हिंसाचार घडवतात हा इतिहास व वर्तमान आहे. धर्माची लेबले त्यांना दिली कि विशिष्ट धर्मियांबाबतचा जागतिक नागरिकांचा द्वेष वाढतो व जे खरे या कृत्यांच्या पाठीशी आहेत त्यावर मात्र चर्चा होत नाही. आपल्याला दहशतवादी घटनांकडे पहायचा दृष्टीकोण बदलावा लागेल.

हे सगळे थांबायचे असेल तर राष्ट्रांनाच बदलावे लागेल. "महासत्ता" हे बिरुदच मुळात मानवी स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांचे समर्थक पाहिले तर त्यात पाकचा कमी, अनेक राष्ट्रांचा हात दिसेल. हा सारा लढा जगावर स्वामित्व कोनाचे यासाठीचा आहे, त्याकडे तुकड्यातुकड्यात घडत जाणा-या अमानवीय हिंसेच्या घटनांतुन पाहून चालणार नाही!


16 comments:

  1. आप्पा- आज टिपू आणि शिवाजीची फार आठवण येते आहे
    बाप्पा- मला म गांधींची आठवण येते आहे , त्यांचे म्हणणे होते की भारताने सैन्यच ठेवू नये म्हणजे पाकिस्तानचे हृदय परिवर्तन होईल , पण तुला टिपू आणि शिवाजीची का आठवण होते आहे ?
    बाप्पा- अरे दोघेही थोर योद्धे होते असे म्हणतात . त्यांनी इसीस वर हल्ला केला असता. आज प्रतिशिवाजी खूप आहेत , पण त्यांचा काय उपयोग ?
    आप्पा- नेमके तुमचे,सॉरी ,आपले पंतप्रधान इंग्लंड ला गेले आणि प्यारीस मध्ये इसिसने हल्ला केला ,नशीब इंग्लंड मध्ये काही झाले नाही . किंवा कोणी त्यांच्यावर संशय नाही घेतला .
    बाप्पा- तू काळजी करू नकोस . आपल्या पंतप्रधानाला काहीही होणार नाही.अतिरेक्याना असले लोक आवडत नाहीत त्यानापण अस्मिता असते बर का ! इंग्रजांसमोर दादरी बद्दल बोलणारे लोक इसिसला आवडणार नाहीत . याना मारून काय उपयोग असे म्हणतील ते ,
    आप्पा- दिवाळीतले रॉकेट वेगळे आणि खरे रॉकेट वेगळे ! आता शनिवार रविवार शबाना आझमी अरुंधती राय वगैरे मेणबत्या पेटवून एकत्र जमतील आणि कुठेतरी शेवटी रस्त्याच्या कडेला मेणबत्ती ठेवून घरी जातील ,आपापल्या नवऱ्याना सांगतील , फार उत्तम कार्यक्रम झाला , टीव्हीवर मी कशी दिसत होते रे जावेद ?माझी लिपस्टिक जरा भडक वाटत होती कारे ?
    बाप्पा- केजरीवाल मुलाखत देईल आणि राहुल गांधी निषेध करेल आणि संघाला जबाबदार धरेल .
    आप्पा- पण काहीही म्हण ,हे इसिसचे लोक असे का करतात ?यांचे कोणी ऐकत नाही म्हणून ?
    बाप्पा - तसे नाही रे - नुसते लक्ष वेधून घ्यायचे असते तर नागड्याने रस्त्यातून धावत गेले असते ,याना सुसंस्कृत केले गेलेले नाही हेच मूळ आहे . त्यांचा धर्मही तसे शिकवत नाही त्याना , पण हताश झालेले योद्धेही असे कृत्य करणार नाहीत . हे काहीतरी वेगळेच आहे .मानवी उत्क्रांतीच्या चौकटीत बसणारे नाही !
    आप्पा- भारतात मात्र ते येणार नाहीत , इथे इतकी लोकसंख्या आहे , की कितीही मेले तरी काहीच होणार नाही !२ दिवसांनी मुंबई नाही का सुरु झाली ?आपण सर्व मृत लोकाना श्रद्धांजली वाहिली पाहिजे !
    बाप्पा- आपण सर्व जगाच्या दुःखात सहभागी होऊया !

    ReplyDelete
  2. अशा हल्ल्यांमध्ये कौशल्य तर नक्कीच असते, पण हेतू काय असतो ? त्याना काय साधायचे असते ?निरपराध लोकाना मारून काय मिळते ? हा भ्याडपणा आहे.आपले विचार कोणीही मान्य करणार नाही ,आपल्या तत्वांना कोणी स्वीकारणार नाही अशी खात्री झाल्यामुळे हा मार्ग चोखाळला जातो.
    आजची टेक्नोलॉजी आत्मसात करून अशी हिंसा केल्याने शेवटी हार कोणाची होते ?
    संजय सर म्हणतात त्याप्रमाणे धार्मिक मूलतत्वे असतीलच असेही नाही ,कारण शस्त्रास्त्रांचे विक्रेते कशाचे काय करतील ते खरोखरच सांगता येत नाही . ते देशाचेही तुकडे करतील.धार्मिक भावना पेतावातील , आज खलिस्तान मागणी मागे पडली आहे , पण पुढचे काय माहित ?स्टेडीयम मधून बाहेर पडताना शोकाकुल फ्रेंच जनता राष्ट्रगीत म्हणत होती , आपल्याइथे शिवसेनेने काय केले असते किंवा भाजप विहिंप ने काय तारे तोडले असते ?

    ReplyDelete
  3. Sanjay, i know that Iraq was first Arab country to recognize Bangaladesh as a country, however, do you have any proof that they supplied oil to India during the war? because Iraq has officially taken side of Pakistan during the war. Also, you ignored my questions on Swarna Bharat Party. It seems those were difficult for you to answer.

    ReplyDelete
  4. LEKH SUNDAR AHE ! NEW YORK TIMES MADHYE PRASIDHA ZALYAS

    JAGATIC PADSAD UMATU SHAKTAT.

    KRUPAYA OBAMA ANI FRANCE CHYA RASHTRA -DHYASHANA EK

    TRANSLATED COPU PATHWAWI.

    ReplyDelete
  5. Dear Sir
    Do you think that if U.S. would not have attacked Afghanistan or Iraq , Taliban & ISIS would not have been formed ? Saddam was a cruel & sadistic dictator who killed millions. Should he be allowed to rule like this only because he was India’s friend s? When we talk about exploitation of recourses of Arab & African countries’ by superpowers, we forget that these countries are ( & were) independent countries . Their leaders & people should not have allowed it. Best examples are of Iran, Venezuela & Egypt. The biggest example is of our own country. Thankfully we had leaders like Nehru & Patel who never allowed recourse exploitation by U.S. & then U.S.S.R.
    Taliban & Saddam were oppressive & genocide regimes’ & were needed to be brought down for the good of humanity. Only U.N. needed to do it under their banner. If you think that Taliban & ISIS were reactions then –Are LeT, I.M. & other terrorist organisations operating in India also reactions of Indian policies ? I don’t think so. These are religious fanatics & not political activists like IRA. They consider their religion is superior to others & want to be rulers. (Though most of Muslim population is not like this & wants to live peacefully). Currently world needs a police & if U.N. is not doing it better that U.S. does the role.
    Coming to non interference in other countries affairs. If some countries government or group within is oppressive, totalitarian & is just killing or exploiting its people, who should help, liberate, save the people ? Natural answer is – people themselves. As in many freedom movements, people should rise & kick out the government. This is the only solution if we adhere to non interference. But then currently all European countries should refuse to accept the migrants & refugees in their countries & tell them to go back & fight for their own peace & rights. Do you support actions like this?
    Its no use to argue about who did what in the past & play the blaming game. By doing this we will only create sympathy & support for these monsters. ISIS needs to be crushed by force & whoever applies it we need to back them unconditionally

    ReplyDelete
  6. आप इतनी मेहनत करके आपके विचार लोगोन्के साथ शेअर करते रहते हैं. लेकिन टिपू , दहशतवाद और नरकासुर जैसे विशायोन्पर लोगोंको कुछभी इंटरेस्ट नाही दिखाई देता याह बडे दुखकी बात है
    आप जन जागृती करना चाहते है लेकिन - ?आप कहते है कि प्रतिक्रिया न देनेवालेभी हजारो लाखो लोग है ,लेकिन इसपर भरोसा कैसे करे ?
    मुझे अपेक्षा थी कि कामसे कम दहशतवाद के मामलेमे बहोत सारे लोग अपनी राय जताएङ्गे लेकिन निराशा बदलेमे मिल गई - !लोग पत्थर बन गे है ?

    ReplyDelete
  7. मला हल्ली अनेक प्रश्न पडतात .
    पूर्वी याहीपेक्षा भयानक दुष्काळ पडत असत , अकबर आणि शिवाजी यांच्या काळात असे दुष्काळ पडत होते , पण अशा आत्महत्या होत नव्हत्या असे का ?
    पूर्वी सत्तेचे राजकारण असायचेच , धर्माचा पगडाही आजच्या पेक्षा भारी होता , पण असा दहशतवाद नव्हता ,
    दहशतवाद आणि सूड यांचे काय नाते आहे ?महाभारतात अश्वत्थाम्याने रात्री पांडवांची ५ मुले मारली तो दहशतवाद होता का ?का सूड होता ?दहशतवाद हा भ्याडपणा असतो का ?
    जगात जर अभ्यास केला तर प्रचंड विषमता आहे , अमेरिका ऑस्ट्रेलिया ,युरोप,अशा खंडात आणि आफ्रीकाआशिया खंडात लोकसंख्या आणि देशाचा आकार आणि सुबत्ता यात प्रचंड तफावत आहे . उदा. ऑस्ट्रेलिया आपल्या ५ पात मोठा असून त्याची लोकसंख्या मुंबई महाराष्ट्रापेक्षा कमी आहे . असे असल्यामुळे जगात रिसोर्सेसचा वाटप सम प्रमाणात नाही असे म्हणायचे का ?जगातल्या अशांतीला विकसित देश जबाबदार आहेत का ?
    तुम्ही माझे विचार आणि त्यावरचे आपले भाष्य छापाल का ? आजकाल पं दिनेश शर्मा , मी भारतीय आणि लिहा वाचा तसेच पाटसकर हे आपल्या ब्लोग वरून अदृश्य झाले आहेत , असे का ?आपली विषयाची मांडणी एकाकी होत आहे , सर्वार्थाने चर्चा करणारे कमी होत आहेत ही काळजी करण्या सारखी बाब आहे .

    ReplyDelete
  8. Now this is something I can speak with some confidence. But' then again you have hit the nail on it's head !
    हा सारा लढा जगावर स्वामित्व कोनाचे यासाठीचा आहे, त्याकडे तुकड्यातुकड्यात घडत जाणा-या अमानवीय हिंसेच्या घटनांतुन पाहून चालणार नाही!
    This is absolutely the crux of the matter. Middle east has been kept burning for more than 5 decades now just to control the flow of oil. Thanks to Brezenski !
    Every terrorism in the other is survived by some or the other state supporting it.
    ISIS is an sad outcome of America's failed policy in Iraq and insensitive/short sighted opression of sunni's by Maliki government. SA and US then tried to use them against their another objective.. topple Syria's Assad. Turkey's erdogen is providing route for ISIS's stolen syrial/iraqi oil to be sold in the world black oil market. Approximate income of ISIS per month is in the range of 2 to 5 million USD ! That's why they are surviving so far. It is said that ISIS has a helpdesk for their oil operations. Russia's entry into the equation has thrown all calculations off balance though. And here is my question to you Sanjay Sir. Why do you think Russia has expansionist objectives? From what I can gather, they were hit below the belt in Ukraine. And Russia has avoided any major conflict in the region. Their Crimea operation was smooth as a butter, not even one bullet was fired and not even one civilian/soldier died.

    Regards,
    Niraj.

    ReplyDelete
  9. आप्पा- अमीत आणि राहुल यांनी टीफूछःय़ाआ बद्दल जे लिहिले आहे त्याचा प्रतिवाद आपण केला नाही हे खेदकारक आहे .
    बाप्पा- आपण आपली मते कशावर आधारित करून लेख लिहिता ?आणि जर अमित किंवा आहुलाने काही उणीवा मांडल्या तर त्यावर आपण निरुत्तर झाला आहात असे दिसता कामा नये . त्यांचेही मुद्दे महत्वाचे आणि विचार करायला लावणारे आहेत . कृपया त्यांची उत्तरे द्यावीत हि विनंती . आपल्या फिल्टर मुळे हे लिखाण कचऱ्याच्या टोपलीत जाईल का अशी भीती वाटते आहे .
    आप्पा- त्यासाठी आम्ही सर्वांचाच जय जय कार करणार !जय महाराष्ट्र !जय स्वर्ण भारत !जय हिंदू वैदिक आणि जय शैव ! हो ते एक बरे असते .

    ReplyDelete
  10. To Anonymous,
    "Do you think that if U.S. would not have attacked Afghanistan or Iraq , Taliban & ISIS would not have been formed ?"

    I would definitely think so. Taliban is a sponsored terrorism of US and Saudi Arabia is a known fact. They were financed, supported to be used against the soviet occupation of Afganistan. This is already known to many.

    ISIS's parents are still not general knowledge yet and I am not sure why. Anybody doing simple google search would find that out.

    ISIS and Taliban are not reactions, they are creations, "reaction" meme is a justification given for their creation.

    Saddam was a dictator but he was indeed very popular in his own country. The people he killed were kurds and Iranian in a nearly 8 year between Iraq and Iran. We must remember that US financed and supplied arms to both Iraq and Iran during this war ! Donald Rumsfield personally visited Iraq in that period. And one more thing, Iraq was a very secular country during his rein. Women were educated, no compulsory burqa etc.
    The camel in the tent is Saudi Arabia, the largest and most cunning financier of ALL of world's terrorists, actually the worst types takfiris.
    So yes, ME more about politics and oil that religion. Taken out politics/oil, religious extremism is very likely to die or stop impacting rest of the world.

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
  11. Hi Amit,

    I am not sure what is the idea about nit picking. The article on the whole is awesome. The point mentioned by you if proven otherwise, will that make any negative/significant impact to the message or the essence of the article?

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
    Replies
    1. Niraj, Mr. Sonawani want proof of everything. If there is no proof he denies those things. For example as there is no proof of existence of sanskrit as a language before 400 AD, he denies its existence before that. So, he must produce proof of everything that he claims. Hence i asked him to prove that Iraq supplied oil to India during the 1971 war. Whats wrong in it? This is not nit picking. I have every right to ask questions if Sanjay is writing anything in public domain. Many times he does not answer my questions and use abusive language is also proof that he makes baseless statements. You guys remember how he falsified date of Guwahati blasts to suit his argument?

      Delete
    2. Hi Amit,

      Actually my point was slightly different. Even if it's proved that Iraq did not provide oil to India, does it any way impact what the article is trying to convey on terrorism? I think it does not. That's why it looked like nit picking to me.

      Cheers,
      Niraj.

      Delete
  12. Sanjay sir lekh chan ani sagale point atishay barobar ahet pan tathakathit eka dharmacha dahshatvad ha mahasatta nastana chalu hoata ani aaj hi chalu ahe israil pasun nirman zala he jara atich yavpak zala evadhach.. Maha satta asu nasu jagach rajkaran kontya hi sthiti asu jo paryant hinseni apala samprday vadhvava as ekhadya dharmach dharm shastra sangat asel tar to kayamach rahanar.. Semetic parparetil dharma hinsela pratishta detat yat nakarnyat kahi artha nahi ani te rahatil tovar he kami adhik pramanat chalanar..

    ReplyDelete
  13. दहशतवाद हा विषय नुसता सेमेटिक धर्म, ज्यू, इस्राइल, मुस्लिम विरुद्ध क्रिश्चन ह्यांच्याशी निगडीत नाही, त्याही पूर्वी ७ व्या शतकात इस्लामी दहशतवाद अखंड हिंदुस्तानात पसरला होता. इथे रक्ताचे पूर व्ह्याले ह्याला संजय सोनवणी काय प्रवाद करणार आहेत?

    ReplyDelete
  14. आप्पा- बाकी काहीही म्हणा , आज नीरज ,अमित किंवा राहुल , एकेक जण स्पष्टपणे आपले वेगळे विचार मांडत आहेत , तुमचाच ब्लोग वापरून तुमच्या मतांचे खंडन करत आहेत
    बाप्पा- भाषा सभ्य आहे , विचार मूलतः वेगळे आहेत , त्यांचे कौतुक केले पाहिजे . त्यांच्यावर खेकसून उपयोग नाही !
    आप्पा- परवा बालगंधर्व पुलावर सभा पाहिली , डॉ दाभोळकर यांचे निमित्त , आणि काय धुमाकूळ चालला होता ? अरेरे ,अशी किती प्रजा आपल्याकडे आहे देव जाणे .
    बाप्पा- शेजारीच एक इमारतीचे काम चालले होते , तिथल्या कामगाराला विचारले , तुला दाभोळकर माहित आहेत ? हे आंबेडकर माहित आहेत ? तो म्हणाला , कोण आहेत हे ? आता कीव कोणाची करायची ? समाज परिवर्तन , अंधश्रद्धा निर्मुलन हे सगळे पांढरपेशे शब्द आहेत असे वाटू लागते . इमारतीच्या सुताराला ,गवंडी आणि बिगारी यानां काहीच माहित नाही या चळवळी बद्दल,ती माहिती होणे हा काही त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न नाही !
    आप्पा- आता मुळात त्या पुलाचे नाव आणि पुणे यांचा काहीही संबंध नाही , पुलाला आजही सर्व लोक बालगंधर्व पूल असेच म्हणतात ! इथेच आपल्या सामाजिक जाणिवांची सुरवात होते.विठ्ठल रामजी शिंदे असे नाव समाज मान्य करत नाही . त्याचवेळी महर्षी शिंदे यांची थोरवीही अमान्य करत नाही , फक्त जागा चुकली !
    बाप्पा - विठ्ठल रामजी शिंदे हा एकच पूल असा नाही ,आज लकडी पूल , नवा पूल , झेड ब्रीज अशी अनेक उदाहरणे देता येतील , सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे तेच हाल झाले आहेत.
    आप्पा- अगदी बरोब्बर बोलत आहेस रे तू ,इसीस किंवा तालिबान या काही अचानक निर्माण झाल्या नाहीत , सद्दाम हुसेन हा थोर होता का हा अभ्यासाचा विषय आहे , पण तो अमेरिकेच्या वाकड्यात गेल्यावर काय महाभारत घडले ?
    बाप्पा-आपली इंदिरा गांधी एकमेवाद्वितीय होती. खुद्द इंदिरा गांधीने पी एल ४८० रद्द केले , त्या बद्दल संजय सोनवणी यांनी ने कधी लिहिले नाही , किसिंजर प्रभूतीना तिने कसे अंधारात ठेवले त्या बद्दल लिहिले नाही,बांगला देश हे या उपखंडात घडलेले
    महानाट्य आहे त्या बद्दल चकार शब्द नाही , अमेरिकेचे सातवे आरमार बंगालच्या उपसागरात आले तरी इंदिरा डगमगली नाही , आणि तितक्याच सहजपणे तिने माणेकशा यांना त्यांची जागा दाखवली , त्यांचा सन्मानही केला . खरेतर सरकारने त्याना भारतरत्न द्यावयास पाहिजे , पण भाजप आणि काँग्रेस दोघेही त्याना विसरले त्यांच्या अंत्य विधीलाही कोणत्याही पक्षाचे नेते आले नाहीत किंवा राष्ट्रीय दुखावटा पाळला गेला नाही . नालायक राजकारणी लोकांपेक्षा शूरवीर खरेतर किती वंदनीय असतात ? सांगा हो संजय सरकार , तुमच्या शैव परंपरेत असे बसते का ?
    आप्पा- बऱ्याच दिवसात तुमचे शैव वैदिक वाचायला मिळाले नाही - काय भानगड आहे ?तुम्ही आम्हाला विसरला तरी आम्ही नाही तुम्हाला विसरणार !

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...